अलीकडे काय पाहिलंत? - ३३

आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.

-------

field_vote: 
0
No votes yet

'हैदर' पाहतो आहे. खूप अस्वस्थ करणारा सिनेमा. कधीतरी तपशिलात लिहीन म्हणून इथे जागा अडवून ठेवतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

"गेट आउट" नावाचा जबरदस्त थ्रिलर पाहिला. ट्रेलर बिलर न बघता डायरेक्ट पिक्चर बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यात आल्या आल्या आधी हॅम्लेट आणि आज 'जरा समजून घ्या' चे प्रयोग पहायला मिळाले. त्यात हॅम्लेट ने पुष्कळ निराशा केली. नेपथ्य , संगीत , वेशभूषा आणि प्रकाशयोजना या आघाड्यांवर कुठलीच खास समज नव्हती. सुमित राघवन एक रोचक आणि दिलचस्प अभिनेता आहे पण त्याच्यामधल्या अनेक शक्यता नुसत्या दिलखेचक ( कधी कधी तर वगनाट्य श्टाईल मध्ये ) ड्वायलाग टाकून टाळ्या मिळवण्याच्या भानगडीत वापरून घेता आलेल्या नाहीत. अजूनही पुष्कळ लिहिता येईल , पण हॅम्लेट चे अनेक पदर या प्रयोगाला सापडलेले नाहीत आणि त्यामुळे एक अत्यंत बहुपेडी नाट्य-कथानक इथे सपाट करून देतात. संगीत ऐकून तर वैतागून गेलो ! हॅम्लेट आणि लिआर्ट्स मधील द्वंद्वयुद्धाची कोणतीही शारीरिक तयारी दिसत नव्हती ! आणि तलवारी वगैरे खऱ्या , तलवार म्यानातून काढल्याचा फुल्ल -हत्ती गणपती मंडळ - इश्टाईल -खांनननणण असा साऊंड इफेक्ट होता पण तलवार खुपसल्यानंतर रक्त वगैरे काही आलेलं नव्हतं! नाटकातील नाटक हा इतका जबरदस्त आणि स्ट्रॉंग आणि दुर्मिळ प्लॉट असलेलं हे नाटक आहे , पण त्याचा देखील प्रभावी वापर -म्हणजे अभिनय शैलीमध्ये काही बदल , उत्तम आणि लाईव्ह गाणी - नव्हता !! एक ना दोन अनेक तक्रारी आहेत ! हे झालं मंचावर घडणाऱ्या गोष्टींचं ! प्रेक्षक ही कमी नव्हतेच ! हशा आणि टाळ्या कुठे द्याव्यात याचं एक ट्रेनिंग सेशन घ्यावं का प्रेक्षकांचं असं वाटण्याइतपत लोक कुठेही हशा आणि टाळ्या देत होते ! असो !

जरा समजून घ्या - आत्ताच पाहून आलो. मुळात या प्रकारचं चर्चा नाट्य हा माझा आवडता प्रकार नाही, तरीही मोहन आगाशे यांचा करिष्माच भारी आहे. चटपटीत , मनोरंजक , ८० च्या दशकांतील नाट्य दिग्दर्शनाचा थोडासा पोत असलेलं ( मला किंचित संजय पवारांची आठवण होत होती , पण तो पूर्वग्रह असू शकतो) , तरीही आजच्या दैनंदिन आणि घरोघरी आत्यंतिक परिचित असणाऱ्या टीव्ही पे चर्चा फॉरमॅटचा चतुर आणि योग्य दृक-श्राव्य वापर करून हा प्रयोग छान लय घेतो ! आता यातली चर्चा , त्याचा विषय , त्यातले ताणेबाणे यावर खूप बोलावं , लिहावं लागेल , त्यातही सर्वच गोष्टी आवडल्या , पटल्या असं नाहीच; तरीही मोहन आगाशे अखेरपर्यंत त्यांची जादू पसरवत राहतात आणि इतर कलाकार त्यांना योग्य साथ देतात ! वा ! मजा आया!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

शास्त्रीय समजुती किती खऱ्या किती खोट्या -
लिंक:https://youtube.com/watch?v=GtE6l1_Pl5s
( docu. 42:00)
__________________

आदूबाळ आणि सर्व_संचारी यांच्या पुढच्या खरडींवर लक्ष ठेवून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरेच दिवस मराठी चॅनेलवर अर्धवट बघितलेला, गजेंद्र अहिरेंचा अनुमती, हा मराठी चित्रपट संपूर्ण पाहिला. त्यानंतर या दिग्दर्शकाचे नांव, अजेंद्र गहिरे ठेवावे, असे वाटले. बाळ गाडगीळांनी वापरलेला 'मेलोमेलोड्रामा' हा शब्द या चित्रपटाला चपखल बसतो. बायको कोमात, निवृत्त शिक्षकाकडे तुटपुंजे पैसे, उच्च शिक्षण न घेतल्यामुळे मुलाची साधारण नोकरी, जावयाची फारशी आर्थिक मदत करण्याबद्दलची अनिच्छा, बापाची आणि मुलीची घुसमट आणि बायकोला कृत्रिम रीत्या जिवंत ठेवायचे की नाही याची अनुमती द्यायला नायकाचा विरोध, याभोवतीच चित्रपट फिरतो. त्यांत नायक विक्रम गोखले असल्यामुळे, भावनांचे ओव्हरॲक्टिंग करतानाच अंडरप्ले केल्याचा अभिनय स्वाभाविकच. नटसम्राट टाईप भावनिक कांगाव्याचे क्षणोक्षणी दर्शन घडते. त्यांतल्या त्यांत, रीमा लागूने नॉर्मल अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे, पण तिलाही, मराठी नाटकातील टिपिकल, 'मस्तपैकी कॉफी', हा वाकप्रचार काही टाळता आला नाहीये. बाकी सई ताम्हणकर, सुबोध भावेला घेतलंय एवढंच!
हल्ली माझ्या मेंदूतली एकामागोमाग अनेक केंद्रे, असंवेदनशील, झाली असल्यामुळे, हा चित्रपट बघताना मी निर्विकारच राहिलो. चित्रपटभर, तो दाढीचे पांढरे खुंट वाढलेला, पाणावलेल्या डोळ्यांचा, भप्प चेहेराच माझ्या डोळ्यांवर आदळत राहिला. त्यावर उतारा म्हणून, पाठोपाठ सुरु झालेला, 'मुंबई-पुणे-मुंबई भाग १' पण बघून टाकला.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

विक्रम गोखले यांचा ओव्हर ऍक्ट करतानाच अंडरप्ले करण्याचा स्वाभाविक अभिनय' हे आवडलं. बादवे मेलो मेलो ड्रामा हे मुकुंद टाकसाळे यांचं आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"नायक विक्रम गोखले असल्यामुळे, भावनांचे ओव्हरॲक्टिंग करतानाच अंडरप्ले केल्याचा अभिनय स्वाभाविकच." हे मलाही फार आवडलं. "नटसम्राट टाईप भावनिक कांगावा" हेही भारी आहे. त्याच मुशीतून आलेली "मस्तपैकी कॉफी" माझ्याही डोक्यात जाते. कडवट लोकांनी पिण्याचं पेय आहे ते, "मस्तपैकी" कसली डोंबलाची!

'मुंबई-पुणे-मुंबई'बद्दल तुमचं काय मत पडलं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुंबई-पुणे-मुंबई १'

उगाचच कानाखाली काढाविशी वाटावी असा सिनेमा आहे. बोअरिंग आणि मद्दड!!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>> पण तिलाही, मराठी नाटकातील टिपिकल, 'मस्तपैकी कॉफी', हा वाकप्रचार काही टाळता आला नाहीये.
--- खी: खी: खी:! मराठीतले एक सदैव 'कार्यरत' असणारे लेखक आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपण कसे भरभरुन जगणारे रसिक आहोत याचं फेसबुकवर प्रदर्शन मांडणारे किञ्चितलेखक यांच्या स्वच्छंदपणे जगण्याच्या लक्षणांत सदैव 'बाहेर पडणारा पाऊस - अहाहा - टेकडीवर फिरायला जाणं - अहाहा - मस्तपैकी वेलची घालून केलेल्या कॉफीचा वाफाळता मग - अहाहा - आयुष्य सुंदर आहे - अहाहा' असं डोकावत असतं, ते आठवलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...पुण्यात आता स्टारबक्स, झालेच तर गेला बाजार सीसीडी नाहीतर बरिस्ता पोहोचले आहेत ना?

(इफ आय अॅम नॉट मिष्टेकन, मागच्याच भेटीत फ.कॉ.रोडवर की कुठेशीक स्टारबक्षात डोकावल्याचे अंधुकसे आठवते. आणि एक-दोन भेटींमागे कुठेशीक सीसीडीतही टपकलो होतो असे वाटते. सो, अनलेस आय वॉज़ हॅल्यूसिनेटिंग, पुण्यात स्टारबक्स नि सीसीडी आहेत.)

बरे, स्टारबक्स/सीसीडी मरूद्यात, वैशाली/रूपाली/पुण्यातली तमाम उडपी रेष्टारण्टे वारली तर नाहीत ना?

नाही म्हणजे, डोंट गेट मी राँग. मस्तपैकी वेलची घालून केलेल्या कॉफीच्या वाफाळत्या मगाशी - ज्या काहीशा पारंपरिक कॉफीस, इफ आय अॅम नॉट मिष्टेकन, मागल्या पिढीत 'मैफिलीतली कॉफी' किंवा 'संगीत कॉफी' म्हणून ओळखले जात असे - आपले काहीही वाकडे नाही. इट हॅज़ इट्स ओन प्लेस. आपल्याला आवडते ब्वॉ. ("कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?" - पु.ल.) गोग्गोड असते, दुधाळ असते, परंतु तरीही आवडते. (पण त्या ठराविक माहौलातच. एरवी आवर्जून पिईनच, अशातला भाग नाही.) (आख़िर रूट्स का मामला है, बाबा!)

तर आपला आक्षेप 'मस्तपैकी' वेलची घालून केलेल्या वाफाळत्या कॉफीस नाही, तर तीस अंतिम सत्य मानण्यास, कॉफीजगतात त्यापलीकडेही काही असू शकते, हे नाकारण्यास वा त्याकडे ढुंकूनही न पाहण्यास आहे. माणसाने संगीत कॉफी प्यावी, उडप्याकडची प्यावी, दोन भांड्यांतून खेचूनखेचून मद्राशीष्टाइल प्यावी, एस्प्रेसो प्यावी नि कडक काळीकुट्ट तुर्कीसुद्धा प्यावी. जायफळ घालून प्यावी, वेलची घालून प्यावी, दालचिनीची पूड घालून प्यावी नाहीतर काहीही न घालता प्यावी. बिनदुधाची प्यावी, दूध घालून प्यावी, फेसाळती प्यावी, नाहीतर वरून फेस टाकून प्यावी.

असो चालायचेच.

..........

हीतसुद्धा अनेकदा वेलची घालतात, बरे का! पण साखर (असलीच तर) बेताचीच असते, नि दूध अजिबात नसते.

, इटालियन कापुचिनोवर वरून जायफळाची किंवा दालचिनीची पूड शिंपडली, तर ती अपस्केल. तुर्की कॉफीत वेलची घातली, तर ती एक्सॉटिक. खुद्द इटालियन कापुचिनोत वरून घातलेले फेस आणि वाफाळते दूध यांचे मिश्रण म्हणजे क्या कहने! पण आमची भटांची, 'मस्तपैकी' वेलची घातलेली 'वाफाळती' कॉफी तेवढी डौनमार्केट? यह कौन सी बात हुई?

(आणि गोग्गोडचेच म्हणाल, तर कधी खाली मायॅमीच्या बाजूला गेला असाल, तर तेथील क्यूबन उल्हासनगरात जे 'काफे कुबानो' नामक एवढ्याशा कपातले एस्प्रेसोमधले साखरेचे संपृक्त द्रावण मिळते, ते तेवढे 'एथ्निक' म्हणून लै भारी होय?)

टिपिकल अमेरिकन ब्लॅक कॉफी हा प्रकार मला व्यक्तिशः तितकासा आवडत नाही. वेळप्रसंगी चालवून घेतो झाले. परंतु तरीही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आंबेमोहोराचा मऊ गुरगुट्या तोही वाफाळता वगैरे भात.
वाफाळता भात वर पिवळे धम्मक वरण. त्यावर तुपाची ( नुसते तूप नव्हे, साजुक तूप) धार. लिंबाची फोड वगैरे
नवीन आठवणी: भुट्टा वुइथ पाऊस (रिमझिमता- हातात हात , धुवांधार कोसळता वगैरे). ऑर भुट्टा वुइथ कडाक्याची थंडी धुके वगैरे. मगदुराप्रमाणे पेग वगैरे.सोनेरी फसफसते कडवट घसा जाळीत इ.
अति जुन्या आठवणी: धारोष्ण निरसे दूध कडब्याच्या वासासकट, वैलावरचे खरपूस सायवाले दूध
क्वचित कधीमधी फडफडते मासे, कालवण हुमण सुक्के वगैरे.
बाकी अधून मधून मऊसूत पोळ्या-तुपाची वाटी, ' थाल्पिट' , निखारा चूल भाकरी.. आंबाडीची भाजी वर जिवंत किंवा कशीही लसणी/णाची फोडणी...

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"ᴴᴰ [Documentary] Fukushima - Radioactive Forest" युट्युबवर.
आपण सुटलो/ पळालो, प्राण्यांचं काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागच्या आठवड्यात कधी तरी 'मुरांबा' नामक मराठी चित्रपट नेटफ्लिक्सवर बघितला. तो बघितला एवढी शिक्षाच माझ्यासाठी पुरेशी आहे का चमचाभर पाण्यात जीव देण्याशिवाय गत्यंतर नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी कंटाळवाणा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुरांबा आणि तत्सम चित्रपट फक्त ममवं साठी असतात. ऐसीकर, कंपुबाज आणि तत्सम लोकांसाठी नसतातच ते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

महाबोर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र पिक्चर. सतत बद्धकोष्ठी पेन्शनराचे भाव वागवत हिंडणारा च्युत्या हिरो, त्याचे मूर्ख आणि भोचक आई-बाप, चिकणी पण ह्या भोप्याचा पिच्छा न सोडवू शकणारी हिरोईन, पानचट संवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हाहाहा अगदी अगदी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय? म्हणजे हा चित्रपट नितांतसुंदर नाही????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कौशल्य आणि कला यांतला फरक न समजणारे गोग्गोड लोक अाणि त्यांचा गोग्गोडपणा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कुणी नंदिता दासचा 'मंटो' पाहिला का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बहुचर्चित तुंबाड पाहिला. धारपांचा आत्मा सापडेल अशा आशेनं गेलात तर निराश व्हाल. सोहम शाह तुम्हाला आय कँडी वाटत असला तर मोठ्या पडद्यावर ओलेत्या आणि अर्धनग्न अवस्थेत तो बराच काळ बघायला मिळेल ह्या कारणासाठी जाऊ शकता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतूजी तुम्ही दोन वाक्यांत तुंबाडला उडवून लावलंत!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नारायण धारपांचं काहीही वाचलेलं नाही. पण आता एवढी रसभरीत वर्णनं केल्यावर तुंबाड बघावा लागणार. कधी येईल तो नेटफ्लिक्सवर? घरचा, मोठ्या टीव्ही सोफ्यावर बसून बघितला की मोठ्या पडद्याचा आनंद ऑलमोस्ट मिळतो. सिनेमा चालतोय का बराच, तसं असेल तर कदाचित नेटफ्लिक्सवर इतक्यात येणार नाही. ख्रिसमसची सुट्टी कारणी लावता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भयपट पहायची हिंमत होणार नाही पण धारपांनी रंगविलेले समर्थ (समर्थच ना?) पहावेसे वाटतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुठेतरी श्री राही अनिल बर्वे यांची मुलाखत वाचली. ते म्हणाले की तुंबाडची कथा त्यांना एका मित्राने फार पुर्वी नागझिऱ्याला सांगितली. नंतर त्यांनी जेव्हा धारपांची कथा वाचली तेव्हा त्यांचा अपेक्षाभंग झाला. नेमके शब्द आठवत नाही पण त्यांना कथा फारच उथळ वाटली. मी स्वत: धारपांची दोन-तीन पुस्तके वाचली आहेत आणि धारप हे सामान्य दर्जाचे लेखक आहेत असे माझे मत झाल्याचे स्मरते. कदाचित पुन्हा वाचतांना मत बदलेल. पण रत्नाकर मतकरी आणि धारप हे उगाचच उचलुन धरलेले लेखक आहेत हे मत मी ठामपणे मांडतो. आणि या मताच्या पुष्ट्यर्थ काही लिहीण्याची जबाबदारी निर्लज्जपणे नाकारतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राही स्वत: अनिल बर्व्यांच्या लिखाणाला बोअर म्हणून निकालात काढतो. त्याच्या मते मराठीतला पहिला आणि शेवटचा जागतिक दर्जाचा लेखक म्हणजे जी. ए.
त्याची पुढची मेगा-बजेट फिल्म ही जी. एं. च्या विदूषक कथेवर आहे. रक्तब्रम्हांड म्हणे!
कालच विदूषक पुन्हा वाचली. ह्या शब्दबंबाळ डायलॉगी कथेला पडद्यावर कसे दाखवणार हे फार औत्सुक्याचे आहे.
विदूषकात अभयराज आणि विजयराज प्राथमिक दिव्ये ऑलरेडी पार करून आलेली असतात. ही दिव्ये सामान्य प्रजाजनांनी सुचवलेली असतात. ही दिव्ये उदा. पर्वताच्या एका कड्यावरून दुसऱ्या कड्यावर लोंबकळत जाणे इत्यादी टाइपची आहेत. आता चित्रपट जर ही प्राथमिक दिव्ये दाखवणार असेल तर त्याचा बाहुबली होऊ नये म्हणजे झालं!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंधाधून व तुंबाड हे दोन सिनेमे पाहिले. दोन रविवार मस्त गेले.
अफाट मेहनत घेतलीये दोन्हीही दिग्दर्शकांनी हे दिसतं. डिटेलिंग, स्ट्राँग कथा, पदोपदी उत्कंठा वाढवणारं संगित आणि मुख्य कलाकारांचा संयत, समजुतदार अभिनय यामुळे पिक्चर्स जबरदस्त झालेत. राघवन आणि राही यांच्या पुढच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष असेल यापुढे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अफाट मेहनत घेतलीये दोन्हीही दिग्दर्शकांनी हे दिसतं. डिटेलिंग, स्ट्राँग कथा, पदोपदी उत्कंठा वाढवणारं संगित आणि मुख्य कलाकारांचा संयत, समजुतदार अभिनय यामुळे पिक्चर्स जबरदस्त झालेत.

अंधाधुनबद्दल हे विधान ठीक आहे, पण स्ट्राँग कथा आणि मुख्य कलाकारांचा संयत, समजुतदार अभिनय हे तुंबाडचं वैशिष्ट्य खरंच वाटलं का? मला तर सोहम शाहनं पैसा घालून स्वतःला सगळ्या अंगांप्रत्यंगांनी दाखवत ठेवण्याचा अट्टहास केलाय असं वाटलं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||