स्वप्निल पाखरं...

स्वप्निल पाखरांना,
तमा का बंधनाची...?
उघडी सदा तयांना,
दारे भूत-भविष्याची...

मौजेत भिरभिरावे,
असीम भविष्यगगनी...
कधी हळवेही थोडे व्हावे,
बघता मागे वळोणी...

रंगतांना आकाश उद्याचे,
भरावा रंग विश्वासाचा...
रंगांत ह्या असावा,
एक रंग आठवणींचा...

येईल उद्या देखील,
तूफान वाटेत आडवे...
जून्याच ह्या भस्मासूराला,
बिंधास तू भीडावे...

चिमुकल्या पीलांसाठी,
बांधावे घरटे वात्स्ल्याचे...
उडण्यास अन् तयांना,
द्यावे पंख नव्या स्वप्नांचे...

- सुमित विसपुते
०५/०७/२०१८

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुंदर!
शेवटचे कडवे .... अ-प्र-ति-मच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

Embrace your inner sloth.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."