आजचे दिनवैशिष्ट्य - १४
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.
---
राखी गुलजार चा बड्डे....
राखी गुलजार चा बड्डे नसला म्हणून काय झालं. गाणी मस्त आहेत. म्हणून काढत नाही.
.
.
.
.
.
.
.
.
यातल्या दुसऱ्या व तिसऱ्या - अशा दोन्ही गाण्यांमधे "पवन" ला स्त्री मानून उल्लेख आहे. "आंचल ना छोडे मेरा पागल हुई है पवन्", "ए री पवन". (आणखी - वैजयंतीमाला च्या "पवन दिवानी" मधे पण). पण सर्वसामान्यपणे पवन हे पुरुषाचे नाव मानले जाते. विशेष आहे आनंद बक्षींची (आणि मजरूहची) शायरी.
.
.
मोहरा, विश्वात्मा +१
मोहरा आणि विश्वात्माबद्दल सहमत.' तू चीज बडी है मस्त मस्त' हे गाणं म्हणजे व्यवस्थित भिमपलास आहे. विश्वात्मामधील 'सात समंदर' हेसुद्धा भिमपलासाच्या जवळ जाणारं आहे. गुप्तमधल्या गाण्यांत पार्श्वसंगीताचे तुकडेच्या तुकडे उचलले आहेत. तरीही 'मुश्किल बडा ये प्यार है' आणि 'मेरे ख्वाब्बों में तू' ही आपली फेवरिट.
अबापटबोवा, हा घ्या दुवा
६:४२ ते ७:११
माझे विधान अतिरंजित होेते. क्षमस्व. पण; आर्त तरीही मंद, संयत चालींची सगळ्याच गाण्यांमध्ये, विशेषत: ब्ल्यूज्, भीमपलासची पकड त्या तीव्र स्थानी दिसतेच. (नैनों मे बद'राऽ' छाए, खिलके बि'छऽड'नेको... इ.) एक हार्लेम ऑन माय माईंड असे काहीसे गाणे ऐकले होते, त्यातही हे जाणवले होते. ब्लूजचे संदर्भ पटकन आठवत नाहीत.
विष्णुपंत , चिल माडी
विष्णुपंत ,
++माझे विधान अतिरंजित होेते.++
चिल माडी . एवढं सिरियसली घेऊ नका हो .
या ताई हुशार असाव्यात . त्यांनी कुठेही 'आधारित 'म्हणलेलं नसून फक्त (काही ) चालीतील साम्य दाखवायचा प्रयत्न केलाय. त्यांनी scatting आणि तराणा यांची तुलना दाखवलीय त्याचंही फक्त तसंच .
जोपर्यंत त्या 'आधारित' म्हणत नाहीत तोपर्यंत ते टेक्निकली चूक ठरत नाही . परंतु भीमपलास आणि ब्लूज , scatting आणि तराणा यांचा संबंध दाखवणे जरा ओढून ताणून वाटते.
जाऊ दे हो !! ऐका दोन्ही आणि मजा घ्या .. बाकी सोडून द्या ..
तू चीज बडी है मस्त मस्त' हे
तू चीज बडी है मस्त मस्त' हे गाणं नुसरत च्या दम मस्त कलंदर चे पद्धतशीरपणे बॉलीवूडकरण आहे. जसे की मेरा पिया घर आया, सासों की माला, सानु एक पल, इन्ना सोना तुझे, आत्ता आलेले मेरे रष्के कमर, आणि नुसरत ची बरीच गाणी. जिथे सुफी मौला / देव असेल तिथे हिरॉइन. आणि समजत नसलेले उर्दू शब्द काढून तिथे फालतू मिळमिळीत हिंदी शब्द. बाकी विजू शाह अत्यंत सुमार संगीतकार आहे.
- ओंकार
केन्स बद्दलची अख्यायिका -
केन्स बद्दलची अख्यायिका -
During a 1934 dinner in the U.S., after one economist carefully removed a towel from a stack to dry his hands, Mr. Keynes swept the whole pile of towels on the floor and crumpled them up, explaining that his way of using towels did more to stimulate employment among restaurant workers.
.
हे घ्या अन्ना - एकदम गंगा.
हे घ्या अन्ना - एकदम गंगा.
https://bhasha.maharashtra.gov.in/ShasanYavharKosh.aspx
यात alienation = अन्यसंक्रामण, pacification = प्रशमन वगैरे हायक्लास शब्दांबरोबर double cross = फशी पाडणे वगैरे विनोदही आहेत.
उपप्रश्न
हा सिद्दी जर यादीसकट येण्याऐवजी यादीशिवाय आला असता, यादी घरीच विसरला असता, तर मुंबईतले शिवडी, माझगाव नि कोणतेकोणते किल्ले जे त्याने उद्ध्वस्त केले, ते कदाचित वाचू शकले असते काय?
नाही म्हणजे, यादीच नाही म्हटल्यावर कोठलेकोठले किल्ले उद्ध्वस्त करायचे, झालेच तर टार्गेट मीट किंवा एक्सीड झाले की नाही, हे कसे कळणार?
म्हणून याद्या ठेवणे ही एक चांगली सवय आहे. अप्रेझलच्या वेळी उपयोगी पडते.
शहाणा मुलगा होता सिद्दी यादी सकट. चांगल्या सवयी होत्या त्याला. (कदाचित ममवंचा पितामह किंवा आदिपुरुष असावा काय?)
सिद्दीला विसरभोळेपणाचा त्रास
सिद्दीला विसरभोळेपणाचा त्रास असावा. लिंबू-कोथिंबीर आणायला जाई तर मिरच्या हमखास विसरे. जनानखान्यांत जाताना बायकांची नावे विसरे. त्याच्या आईने मग त्याला याद्या करायची सवय लावली. मग सिद्दी सगळीकडे यादीच घेऊन जाई. बाजारात, जनानखान्यात, हमामखान्यात(!) आणि बऱ्याच ठिकाणी.
एकदा काय झाले, त्याने केली मुंबईवर चाल! मुंबईकरांची हीऽ तारांबळ उडाली. सिद्दी एका हातात नंगी तलवार, नि दुसऱ्या हातात एक कागद घेऊन येताना पाहून मुंबईकर सैरावैरा धावू लागले... कोणी विचारले, की हा एकच किल्ला घेऊन गप्प बसेल का हा मर्कट?
तर उत्तर आले- नाही! एक यादीच केली आहे त्याने! तो बघा- आला सिद्दी, यादीसकट!
आणि अशा रितीने...
...
...
...
मित्रहो, इथे ते उत्तर देणाऱ्याचा शिरच्छेद केला गेला- रणांगण हे बाष्कळ श्लेष करण्याची जागा नव्हे ह्याची समज द्यायला.
पुण्यस्मरण : मेहदी हसन (१३
पुण्यस्मरण : मेहदी हसन (१३ जून २०१२)
.
.
वो जिनके होते है खुर्शीद आस्तीनोंमे
उन्हे कहीं से बुलाओ... बडा अंधेरा है.
.
खुर्शीद : सूर्य
.
----------
.
एक बस तू ही नही जो मुझसे खफा हो बैठा - बद्दल तुम्हाला सलाम ओ, निर्णयन मंडल.
.
ही एक गझल पण ऐकून टाका.
.
.
.
शे सारखा क्रांतिकारक मानव इतिहासात झाला नसावा
बड्डे : क्रांतिकारक चे गव्हेरा (१९२८)
.
शे सारखा महान (????) क्रांतिकारक मानवी इतिहासात झाला नसावा. न कधी होईल.
.
हो. ऐकलंय. ठीकठाक आहे.
हो. ऐकलंय. ठीकठाक आहे.
माझ्या एका मित्राने सज्जादबद्दल बरंच काही सांगितलं होतं. फार मनस्वी होता म्हणे सज्जाद. म्हणे घरी तीन श्वान पाळले होते व त्या तीन श्वानांच्या गळ्यात पाट्या होत्या व त्यांच्यावर म्हणे - ३ मोठ्या संगीतकारांची नावं लिहिली होती. येणाऱ्याजाणाऱ्या प्रोड्युसरला सज्जाद सांगायचा की बघा ते तिथे आहेत व मी इथे. हे मान्य असेल तरच मी तुमच्याबरोबर काम करेन.
.
फार मनस्वी होता म्हणे सज्जाद.
फार मनस्वी होता म्हणे सज्जाद. म्हणे घरी तीन श्वान पाळले होते व त्या तीन श्वानांच्या गळ्यात पाट्या होत्या व त्यांच्यावर म्हणे - ३ मोठ्या संगीतकारांची नावं लिहिली होती. येणाऱ्याजाणाऱ्या प्रोड्युसरला सज्जाद सांगायचा की बघा ते तिथे आहेत व मी इथे. हे मान्य असेल तरच मी तुमच्याबरोबर काम करेन.
निळ्या अक्षरांतल्या प्रकाराला माज म्हणतात. मनस्वीपणा नव्हे.
मनस्वी
फार मनस्वी होता म्हणे सज्जाद.
सज्जादचे किस्से हिंदी सिनेव्यवसायात गाजले होते. अत्यंत उर्मट होता. पण एकेका गायकाकडून त्यानं असं काही गाऊन घेतलं आहे की ज्याचं नाव ते. तलतकडून एका गाण्याला न्याय मिळत नव्हता म्हणून ते सतरा वेळा गाऊन घेतलं असा एक किस्सा आहे. लताचा आवाज वरच्या पट्टीत जाऊ शके म्हणून नौशाद आणि शंकर-जयकिशनसारखे संगीतकार गाणीच्यागाणी वरच्या पट्टीत बांधत. आणि त्यांच्यासाठी लता किंचाळत असे ते लोक डोक्यावर घेत. पण सज्जाद पूर्ण त्याउलट. बोर्डावर लावलेलं 'काली काली रात' किंवा 'रुस्तम सोहराब'मधलं 'ए दिलरुबा' वगैरे गाणी नीट ऐकलीत तर लक्षात येईल की लता नेहमीपेक्षा खालच्या पट्टीत गाते आहे. तिला ते गायला अवघड जाई असं म्हणत. एरवी सगळीकडे मिजास करणारी लता सज्जादसमोर पूर्ण नमली, कारण तिला कळत होतं की हे गाणं वेगळं आहे. नंतर अनेक वेळा ती सज्जादची आठवण काढत असे. आता हे ऐका -
एक किस्सा
अंमळ हुशार लोकांना चारचौघांत कसं वागावंं-बोलावं हे फारसं समजत नाही; देवपूजा करणारे लोक त्याला मनस्वीपणा समजतात.
सज्जादच्या बाबतीत हे तितकंसं खरं नसावं. आताप्रमाणेच तेव्हाही हिंदी फिल्म व्यवसाय हांजीहांजी, हितसंबंध पाळणं आणि कोण कुणाच्या कंपूत वगैरे गोष्टींवर चालत असे. सज्जादला हे मान्यच नव्हतं आणि त्यासाठी वाटेल ती किंमत देण्याची त्याची तयारी होती. उदा. त्यानं संगीत दिलेली पहिलीच फिल्म दोस्त - त्यात नूर जहाँची दोन गाणी बेफाम गाजली -
नूर जहाँ त्या वेळी नं. १ होती आणि तिचा पती शौकत रिझवी निर्माता होता. त्याच्या मते गाणी गाजण्याचं सगळं श्रेय त्याच्या बायकोचं होतं. हे सज्जादला मान्य होणं शक्यच नव्हतं (आणि ते खरंही नव्हतं). त्यामुळे पुन्हा सज्जाद आणि नूर जहाँ एकत्र आले नाहीत. त्या काळचा नूर जहाँचा दबदबा पाहता हा सज्जादच्या करिअरवर आपल्या हातानं कुऱ्हाड मारण्याचा निर्णय होता असं म्हणता येईल. असं त्यानं अनेकदा केलं.
.
.
सज्जाद हुसेन हे १९ वेगवेगळी वाद्ये वाजवू शकत होते. अतिशयोक्ती वाटते. पण अगदी चारपाच वाद्ये वाजवता येणं ही सुद्धा जबरदस्त बात है.
.
.
.
.
------
.
चिंजं, तुम्ही बोर्डावर डकवलेलं गाणं "काली काली रात" व हे खालील गाणं "वो तो चले गये ए दिल" - या दोन गाण्यांच्या चालींमधे साम्य जाणवतंय मला. तुम्हालाही जाणवतंय का ओ ??
.
.
जन्मदिवस : मदन मोहन (२५ जून
जन्मदिवस : मदन मोहन (२५ जून १९२४)
.
मदनमोहन हे पिडां काकांचे सुद्धा आवडते आहेत.
.
जाना था हमसे दूर हे मस्त गाणं बोर्डावर लावल्याबद्दल निर्णयन मंडलास माझ्यातर्फे एक कडक सॅल्यूट.
.
हे सुहागन चित्रपटातलं गाणं ऐका. मदन मोहन चं संगीत आणि रफी सायबांच्या आवाजातली गजब की मिठास.
.
मृत्युदिवस : आधुनिक भारताच्या
मृत्युदिवस : आधुनिक भारताच्या उभारणी, नियोजन, पंचवार्षिक योजनांमध्ये मोठा सहभाग असणारे सांख्यिकीशास्त्रज्ञ पी.सी. महालनोबीस (१९७२)
आंतरराष्ट्रीय सांख्यकीशास्त्र परिषद आणि भारत सरकार यांच्यातर्फे दर दोन वर्षांनी प्रगतिशील देशांतल्या सांख्यिकीशास्त्रज्ञांना "Mahalanobis International Award" देण्यात येतं. २०१७ मध्ये अनेक वर्षांनंतर एका भारतीयाला या पुरस्कार प्रदान करण्यात आला.
https://isi-web.org/index.php/activities/awards/isi-awards/mahalanobis-…
त्यापेक्षा हे घ्या
जादू तेरी नजर
https://www.youtube.com/watch?v=0wgvQU9S6Dw
(मुद्दामून एम्बेड करत नाहीये ;-))
पुण्यस्मरण : साहित्यिक, डावे
पुण्यस्मरण : साहित्यिक, डावे विचारवंत तिरुनल्लूर करुणाकरन (२००६)
.
विकिपेडिया वरून साभार -
.
Having studied Marxism and Indian philosophy in depth he formed a unique vision of his own combining the best aspects of both and this vision is the central illuminating force of all his poems. In many of his poems he depicts the physical and spiritual experience of collective human labour as a creative process of self-assertion and self emancipation of mankind.
.
ह्या तांबड्या रंगाने रंगवलेल्या भागाचा अर्थ जो कोणी मला सांगेल त्याला माझा लाल सलाम.
.
बड्डे : सिनेदिग्दर्शक व
बड्डे : सिनेदिग्दर्शक व अभिनेता गुरुदत्त (१९२५)
.
निर्णयन मंडल, काय हे ? अजून तेच परवाचं गाणं बोर्डावर तसंच ठेवलंयत ? गुरुदत्तची इतकी मस्त मस्त गाणी असून सुद्धा.
.
नैष्ठिक निग्रह नैय्ये तुमच्याकडे.
.
माझ्यातर्फे हे घ्या. अतिव रोमँटिक. पडद्यावर मधुबाला व गुरुदत्त. "कलेजा खल्लास" गाणं आहे हे.
.
.
.
.
-------
.
.
आणखी एक. हे गुरुदत्त पेक्षा लताबाईंसाठी ऐकावं. गाणं ऐकताना - पायो जी मैने राम रतन धन पायो - ची धुन आठवते.
.
.
.
आज ऑफीसला येताना एफ एम वर
आज ऑफीसला येताना एफ एम वर
राखी गुलजारआणि विजू शाह (तू चीज बडी है मस्त मस्त आणि ओये ओये या गाण्यांचे संगीतकार आणि कल्याणजी वीरजी शाह यांचे पुत्र) यांचे वाढदिवस आहेत असे कळले.राखी तर स्वातंत्र्य दिनी जन्मली. एफ एम वाले काहीही भकतात.