Skip to main content

विद्रोही कवी प्रकाश जाधव यांच्या कविता

कविता

विद्रोही कवी प्रकाश जाधव यांच्या कविता

- विद्रोही कवी प्रकाश जाधव (दस्तखत)

या असंबद्ध रात्रींचे संदर्भ लागत नाहीत तात्त्विकांना
चार भिंतीतल्या सांद्र उजेडात
त्यांच्या सर्वदूर विचारांची उत्तुंग झेप औपचारिक अन् सरड्या एवढी
जिने उतरून खाली आल्याशिवाय
दिसणार नाही हा अपारदर्शी अंधार...

---

सद्याच्या... म्हंजे वर्तमान जगात
रिलेशनशीपचा पार चक्काचूर
झाला आहे...

"ऐ माँ बता मेरा धरम्। कौन हूं मै?"
"हिंदू है ना इस्लाम तू। दुनिया के वासना की बेदस्तूर चिंगारी तू।
धरम्? धरम् को मारती हूं इसपे। रंडियो का इक ही धरम् बेटे;
गांड मराने का शौक है तो लवडा जेब में रखो!"

सल्तनत बंदूक की नाली से जन्मती है।...
आमेनच्या धीर गंभीर खसखशी नंतर
चर्चच्या उत्तुंग टोकावरल्या बेलची हालचाल नाही
सगळेच कसे पढी खाल्ल्यासारखे कायम
समाजवाद येण्याची चिन्ह इतकी सूम अन्
सर्द असूच शकत नाहीत...

मारणाऱ्यांनी मारत रहावे
मरणाऱ्यांनी मरत रहावे
आया बहिणींची स्वस्त मरणे पहाता पहाता
लोकशाहीतील क्षुधित घुबडे उद्या माझेही मरण घेऊन उभी असतील
माझ्या बायकोसमोर निर्वस्त्र,...

---

माणूस नामका धरम्

रात धुंड्या दीस धुंड्या
पर कोन आयताच गवशा नय
पीर धुंड्या दरगा धुंड्या
पर होनी को किसने टाल्या नय
जुम्मेसे बैठ्या मह्यनेसे बैठ्या
पर हज का पानी आठ्या य
खुद को धुंड्या माळरान धुंड्या
कोन पाक नजर गवशा नय
दीस भाय धुंड्या रात बेगम धुंड्या
पर माणूस नामका धरम गवशा नय

जयदीप चिपलकट्टी Thu, 19/10/2017 - 08:18

या कवितांचं विडंबन करण्याचा मोह आवरायला मला फार कष्ट पडले आहेत. The editors owe me a bucket of cold water.

पुंबा Mon, 23/10/2017 - 11:04

या असंबद्ध रात्रींचे संदर्भ लागत नाहीत तात्त्विकांना
चार भिंतीतल्या सांद्र उजेडात
त्यांच्या सर्वदूर विचारांची उत्तुंग झेप औपचारिक अन् सरड्या एवढी
जिने उतरून खाली आल्याशिवाय
दिसणार नाही हा अपारदर्शी अंधार...

ही कविता फार आवडली..
एक प्रश्न: कविता इथे संपते का? त्याच्या पुढच्या ओळी ह्या कवितेचा भाग आहेत का स्वतंत्र कविता आहे?

१४टॅन Mon, 23/10/2017 - 21:29

मुख्य म्हणजे काय पोचवायचा प्रयत्न केलाय ते बेटं मेंदूपर्यंत आलंच नाही.

सद्याच्या... म्हंजे वर्तमान जगात
रिलेशनशीपचा पार चक्काचूर
झाला आहे...

हे अगदीच बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना झालंय. परत शेवटची ओळ अतिमहा दवणीय करते कवितेला. सगळ्यात भेसूर दात विचकून दाखवणाऱ्या कुत्र्याने एकदम शेपूट मुडपून पळ काढावा तसं काहीसं.