करीमची सातवी चूक
करीमची सातवी चूक
परवा भारतीय सर्वोच्च न्यायालयाने प्रायव्हसीचा हक्क मान्य केला, आणि त्यात समलिंगी संभोग करणाऱ्यांनाही तो हक्क असू शकतो असे म्हटले. यासंबंधातला आपला दोन वर्षांपूर्वीचा निर्णय चूक होता असेही मान्य केले. सनातन्यांना, संस्कृतिरक्षकांना हे कितपत पचेल याबद्दल शंकाच आहे. भारत सरकारचा सुप्त पवित्राही त्याविरोधातच आहे असे म्हणावे लागेल. एकूणच "त्या" विषयाबद्दल जगभर प्रचंड मत-मतांतरे आहेत. लक्षणीय बाब म्हणजे ज्या ७६ देशांमध्ये अशा "अनैसर्गिक" कामसंबंधाविरुद्ध आजघडीला कायदेकानू आहेत, त्यातले अर्ध्याधिक, ४२ देश पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात होते. कुठेही ब्रिटिश राज्य आले की हे कायदे लगेच लागू केले जायचे!
या सर्वाला सांस्कृतिक आधार होता बायबलचा. बायबलच्या लेव्हिटिकस २०:१३मध्ये म्हटलं आहे, "एखाद्या पुरुषाने जर दुसऱ्या पुरुषाबरोबर असे कामसंबंध ठेवले, की जे केवळ स्त्रीबरोबर ठेवायचे असतात, तर दोघांनीही एक अत्यंत तिरस्करणीय कृत्य केले आहे. त्यांना मृत्युदंड देण्यात यावा, आणि त्या शिक्षेची नैतिक जबाबदारी त्यांच्यावरच असेल".
इंग्लंडमध्ये आठव्या हेन्रीच्या कारकीर्दीत (इ.स. १५०९-४७) जेव्हा या राजाने कॅथलिक चर्चबरोबर काडीमोड घेऊन स्वतःचे चर्च ऑफ इंग्लंड स्थापन केलं, त्यानंतर आधी चर्चच्या अखत्यारीत असणाऱ्या खटल्यांना सेक्युलर कोर्टात पाठविले गेले. त्यासाठी निर्माण केलेल्या नव्या कायदेकानूंमध्ये या कायद्यांना मूर्त स्वरूप देण्यात आलं. १५३३ साली "बगरी" (buggery) कायदा अस्तित्वात आला, ज्यात अशा "गलिच्छ आणि अनैसर्गिक" वर्तनाला मृत्युदंडाची शिक्षा ठरविण्यात आली.
नंतर जेव्हा ब्रिटिश साम्राज्य कोसळलं, आणि सर्व देश मुक्त झाले, तेव्हाही या नवस्वतंत्र देशात अनैर्सगिक कामसंबंधाविरुद्धचे कायदे जसेच्या तसे कायम ठेवण्यात आले. पश्चिम आफ्रिकेतला घाना हा देशही त्यातलाच. या देशाने ब्रिटिश अंमल तर पाहिला होताच, शिवाय कित्येक शतके अरब व्यापाऱ्यांशीही या देशाचा घनिष्ठ संबंध आला होता. समलिंगी संभोग आफ्रिकन लोकांना माहीतच नव्हता; ही गलिच्छ देणगी आपल्याला या दोन परकीय लोकांनी दिली आहे; आणि ती लवकरात लवकर नष्ट करून आपली संस्कृती शुद्ध करावी असे मत निदान ८०-८५% लोकांचे आहे.
या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर माझ्या आसपास घडलेली एक सत्यकथा आता सांगतो. आक्रा या घानाच्या राजधानीतल्या झोपडपट्टीत एक "करीम" रहात होता. (त्याचे खाजगीपण जपण्यासाठी नाव बदलले आहे.) करीमचे वय सुमारे ३२ वर्षे असेल. करीमची आई ख्रिश्चन आणि वडील मुसलमान होते. दुर्दैवाने करीम तीन वर्षांचा असतानाच आई वारली, वडिलांनी दुसरे लग्न केले, आणि त्या नव्या संसारात करीमला स्थान नव्हतव. नातेवाईकांच्या दयेवर करीम मोठा झाला, सातवीपर्यंत शिकला, पुढे एका ऑटो दुरुस्तीच्या दुकानात काम करू लागला, आणि त्यात त्याने थोडाफार जमही बसवला.
करीमच्या "दुर्दैवाने" तो समलैंगिक होता. सतरा-अठराव्या वर्षी ही गोष्ट त्याच्या ध्यानात आली होती, आणि नंतर एका (पुरुष) पार्टनरबरोबर तो निष्ठेने राहू लागला होता. करीम वृत्तीने धार्मिक होता, आणि दर शुक्रवारी नेमाने मशिदीत नमाजाला जात होता. एक दिवस मशिदीत नवा कट्टर इमाम आला आणि त्याने फतवा काढला की आपल्या परिवारातल्या कोणत्याही गे मनुष्याला जिवंत ठेवू नका!
करीमवर "गा माशी यूथ" नावाच्या तरुणांच्या पथकाकडून हल्ले सुरु झाले. काठ्या, चाबूक वापरून त्याला मारहाण करण्यात आली. शेवटी एका हल्ल्यात त्याला सांगण्यात आले की हा शेवटचा इशारा आहे. पुढच्या वेळेला तुला आम्ही पेट्रोल ओतून जाळून टाकणार आहोत.
घानाच्या पोलीस महानिरीक्षकाने दुसऱ्या एका केसच्या संदर्भात एका लेखी उत्तरात अमेरिकन कोर्टाला सांगितले होते की "गा माशी" या संघटनेला राष्ट्राध्यक्ष आणि इतर काही मोठे राजकारणी यांचा पाठिंबा असल्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध कृती करू शकत नाही!
आक्राच्या एका काहीशा निर्मनुष्य भागात करीम आणि त्याचा पार्टनर एका संध्याकाळी चालत चालले असताना एक ट्रक अचानक त्यांच्या शेजारी येऊन थांबला. 'अल्ला हो अकबर'च्या घोषणा देत त्यातून दहा-पंधरा लोक उतरले आणि त्यांनी या दोघांवरही सपासप मशेटीचे वार सुरु केले. करीमचा पार्टनर तडफडून जागीच मरण पावला; मानेवर एक निसटता घाव झेलूनही करीम शेजारच्या शेतातून जिवाच्या आकांताने पळत सुटला. लवकरच पाठलाग थांबला आणि ट्रक तिथून घाईघाईने फरारी झाला.
पाच मैल पलीकडच्या गावातल्या वैद्यकीय केंद्रावर करीम कसाबसा पोचला आणि दारात बेशुद्ध पडला. करीमच्या मानेवरच्या जखमेची डॉक्टरांनी मलमपट्टी केली, पण ती खूण मात्र नंतर कायम राहिली. रात्री त्याच्या एका मित्राने त्याला हलवून हलवून जागे केले आणि तो घाबऱ्या स्वरात म्हणाला "तू इथे आहेस हे त्यांना कळलं आहे, आणि ते निघालेत. आपल्याला ताबडतोब निघायला पाहिजे इथून!" त्या मित्राच्या वाहनाने करीम आक्राच्या बंदरात पोचला. आपल्या अनेक मित्रांकडून करीमच्या मित्राने तीनेक हजार डॉलर्स जमवून आणले होते. त्यातून त्याने काही खलाशांना दोन हजार डॉलर्स दिले, आणि त्यांनी त्याला एका मोठ्या कंटेनर जहाजाच्या इंजिन रूममध्ये दोन आठवडे लपवून दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबिया या देशात सोडले.
कोलंबियात करीमने दुसऱ्या एका आफ्रिकन ग्रुप बरोबर संधान बांधलं; बरेचसे सोमाली, पण त्याच्यासारखाच दुसरा एक घानाचा "गे" मनुष्यही त्यात होता; उत्तरेकडे वाटचाल करायला सुरुवात केली. माणसांचे स्मगलर्स/वाटाडे यांना कोयोटी (coyote, एका प्रकारचे कोल्हे) अशी संज्ञा सर्वत्र वापरली जाते. अशाच एक कोयोटीने त्यांना कोलंबिया-पनामा सरहद्दीवर नेलं. तिथून स्थानिक खेडुतांनी त्यांना जंगलात दोन दिवस चालण्यासाठी दिशादर्शन केले. जेव्हा ते पनामात पोचले तेव्हा त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना आत्मसमर्पण केले. त्यांना महिनाभर कोठडीत टाकले गेले. पुढे पनामाच्या अधिकाऱ्यांनी त्याना प्रवासाची कागदपत्रे बनवून पुढच्या प्रवासासाठी मुक्त केलं, पण दोन आठवड्याच्या आत देश सोडून जाण्याचा हुकूमही दिला.
असे निर्वासित अर्थातच स्थानिक इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, पनामात त्यांना एक महिना डांबून ठेवले, तर कोस्टारिकाने ताबडतोब कागदपत्रे दिली. अशी "अधिकृत" कागदपत्रे मिळाली की त्यांना उजळ माथ्याने बसने वगैरे प्रवास करता येत असे. पुढे असेच कधी कोयोटीच्या मदतीने, कधी स्वतःच्या बळावर निकाराग्वा, होंडुरास, मेक्सिको मार्गाने ते एल पासो, टेक्ससपाशी - अमेरिकेच्या दरवाजात आले. मेक्सिकोचे हुआरेझ हे शहर चार पुलांनी एल पासोला जोडलेले आहे. त्यातल्या एका पुलावरून जाऊन करीमने स्वतःला अमेरिकन अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करून, राजकीय आश्रयासाठी अर्ज भरला.
एल पासो हे अस्ताव्यस्त पसरलेले शहर "बेकायदेशीर" प्रवेश करणाऱ्यांचे एक महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. तिथले बंदिवास-केंद्र सुमारे ७६५ बंदी सामावून घेऊ शकते. त्यांचे गुन्हेगार आणि राजाश्रय-इच्छुक असे दोन्ही प्रकार असतात. गुन्हेगारांना नारिंगी आणि राजाश्रय-इच्छुकांना निळा वेष दिला जातो. बंदिवानांसाठी तिथे व्हॉलीबॉल, टेबलटेनिस इत्यादी खेळांची सोय आहे. सिनेमाही पाहू शकतात. न्हावी, डॉक्टर, कायदा-ग्रंथालय अशा सोयीही त्यांना दिल्या जातात. एका बंदिवानावर सरकार दिवसाला सुमारे १६४ डॉलर्स खर्च करते. रोजचा इतका खर्च असताना सरकार निदान त्यांचे अर्ज लवकर निकालात काढेल असे कोणालाही वाटेल. पण यातील बरीचशी केंद्रे खाजगी कंपन्या चालवीत असल्यामुळे, आणि त्यांचे उत्पन्न बंदिवानांच्या संख्येवर अवलंबून असल्यामुळे, सर्व व्यवस्थेचे हितसंबंध बंदिवानांचा तिथला मुक्काम लांबवण्याकडेच गुंतलेले असतात.
पाच-सहा महिने टेक्सासमध्ये काढल्यावर करीमला न्यू जर्सीमध्ये हलविण्यात आलं. न्यू जर्सी आणि न्यू यॉर्कमध्ये अशा अनेक सेवाभावी स्वयंसेवक संस्था आहेत, ज्या बंदिवासातील लोकांना भेटायला स्वयंसेवक पाठवितात. बंदिवानांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, त्यांच्यासाठी फोन इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे आणि मुख्य म्हणजे तिथे नियमितपणे गेल्यामुळे व्यवस्थेवर जुलूम-जबरदस्ती करण्याविरुद्ध दबाव आणणे असे या भेटींचे प्रयोजन असतं. काही स्थानिक चर्चेस, मशिदी त्यांचे पास्टर्स, इमाम इत्यादीही पाठवितात. तिथले पोलीस लोक अशा भेटीला आलेल्या लोकांना उत्तम सहकार्य देतात. मीही अशा प्रकारचा स्वयंसेवक म्हणून काम करतो.
हे असले काम मी का करतो, याचे उत्तर देणे सोपे नाही. त्याने अनेक मित्रांच्या भावना दुखावतात. "आम्ही मेहनतीने उत्तम, उच्च शिक्षण घेऊन इथे येऊन कायदेशीरपणे राहतो, तर आमच्या ग्रीन कार्डला दहा-दहा वर्षे लागतात. हे असले बेकादेशीर घुसणारे, फालतू, कदाचित गुन्हेगारही असणारे लोक तुला कसे काय आवडतात?" अशी त्यांची भावना असते. अमेरिकेने ग्रीन कार्डच्या दिरंगाईचे जे दिवे लावलेत, त्यामुळे मला त्यांच्या या भावना समजूही शकतात. पण "मायदेशच जेव्हा एखाद्याला खायला उठतो, तेव्हा त्याने काय करायचे", या माझ्या प्रश्नाला त्यांच्याकडेही उत्तर नसतं, किंवा "जगाचे सर्व प्रॉब्लेम्स सोडविण्याचा अमेरिकेने मक्ता घेतला आहे काय?" या प्रकारचे असतं. त्याला साधे उत्तर असे, तुम्ही जर स्वतःला जगातली सर्वोच्च महासत्ता समजत असाल, उच्चासनावर बसल्यागत सर्व जगाला मानवी हक्कांवरून सतत उपदेशाचे डोस पाजत असाल, तर ही नैतिक जबाबदारी तुमच्यावर नक्कीच येते.
संघटनेने मला करीमचे नाव दिले आणि मी त्याला भेटायला न्यू जर्सीच्या बंदिवासात गेलो.
भेटायच्या हॉलमध्ये वीसेक टेबले. प्रत्येकी चार खुर्च्या. एक निळी, गार्डकडे तोंड करून असलेली, बंदीवानासाठी. बाकी तीन गुलाबी, बाहेरच्यांसाठी. करीम आला, मी स्वतःची ओळख करून दिली. करीमला हे सगळे नवीन दिसलव. मी कोण, कशासाठी आलो आहे हे लक्षात आल्यावर तो "गॉड ब्लेस यू, सर!" म्हणाला आणि मग पाच मिनिटे ढसढसा रडला. काय बोलावे हे मला अर्थातच कळत नव्हते. शांत झाल्यावर मी त्याच्या एकूण शारीरिक आणि मानसिक स्थितीची चौकशी केली. एकूण तसे ठीक होते; हिंसा, बलात्कार इत्यादि अमेरिकन बंदिवासातले प्रॉब्लेम्स अजून त्याच्यापर्यंत पोचले नव्हते. त्याच्या अर्जाची सुनावणी पूर्ण होत आली होती. पुढच्याच आठवड्यात त्याची शेवटची कोर्टाची तारीख होती.
दुर्दैवाने, करीमच्या वाट्याला आलेला पन्नाशीचा गोरा न्यायाधीश वॉलेन्स्की हा निर्दय आणि वंशद्वेष्टा म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने राजाश्रय नाकारायचे प्रमाण देशातले सर्वोच्च, सुमारे एक्क्याऐंशी टक्के आहे. सर्व जबानीत वॉलेन्स्की करीमला एकच प्रश्न विचारीत राहिला, की "तू समलिंगी आहेस कशावरून? माझा नाही विश्वास बसत!". करीमकडे हॉस्पिटलचे प्रवेशपत्र, मानेवरची मशेटी-वाराची जखम आणि त्याच्या चुलतभावाचे आणि एका मित्राचे प्रतिज्ञापत्र एवढा पुरावा होता, पण वॉलेन्स्कीचे समाधान त्यातून झालं नाही. घानामधल्या समलिंगी-विद्वेषाच्या वातावरणाच्या, त्यातून घडलेल्या अनेक हत्यांच्या घटनांच्या बातम्यांकडेही आमच्या वकिलाने त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण वॉलेन्स्कीच्या "त्या" प्रश्नाचे समाधान झालं नाही.
महिन्याभरातच, वॉलेन्स्कीचा करीमला राजाश्रय नाकारणारा निकाल आमच्या हाती आला. आम्ही वरच्या, तीन न्यायाधीशांच्या अपिलेट बोर्डाकडे दाद मागितली, पण हे अपिलेट बोर्ड केवळ खालच्या न्यायाधिशाने योग्य प्रक्रिया पाळली आहे का, एवढेच बघते. मूळ निर्णय बदलण्याच्या भानगडीत सहसा पडत नाही.
त्या अपिलेट बोर्डचा निकाल हाती आला: त्यांनी वॉलेन्स्कीचा निर्णय उचलून धरणारा निकाल दिला होता.
दोन-तीन दिवसांत करीमला डीपोर्ट करायला पोलीस आले. त्याने गजांना घट्ट धरून आक्रोश, विनवण्या केल्या. पण त्याचे दुबळे हात गजांपासून खेचून काढणे त्या चार महाकाय पोलिसांना अगदीच सोपे होते. करीमला एका व्हीलचेअरमध्ये साखळदंडांनी बांधून बसवून आक्राच्या विमानात नेले गेले, आणि त्याचे दोन्ही हात बेड्यांनी खुर्चीला अडकविले गेले.
विमान घानाच्या दिशेने रवाना झाले.
गरीब असणे, पोरके असणे, काळे असणे, मुसलमान असणे, "तिसऱ्या जगा"तील असणे आणि समलिंगी असणे या करीमच्या सहा मूळ चुका होत्याच. पण त्या दैववशात होत्या. करीमची सातवी चूक - जी त्याची स्वतःची होती - ती म्हणजे अमेरिकेच्या अंगभूत करुणेवर, दयाबुद्धीवर विश्वास टाकणे. ती आता त्याच्या जिवावर उठली होती.
आक्राच्या विमानतळावर करीमला स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले गेले. तो येऊन पोचल्याची बातमी ("कशी कोण जाणे") क्षणार्धात त्याच्या मशिदीत पोचली. पोलिसांच्या गाडीने जेव्हा करीमला त्याच्या नोंदलेल्या पत्त्यावर नेऊन सोडले, तेव्हा त्याची वाट पहात पंधरावीस मशेटीधारी टपूनच बसलेले होते. त्यांनी फक्त पोलिसांची गाडी दृष्टीआड होण्याची वाट बघितली. मग "अल्ला हो अकबर" एकच गजर झाला!
या अशा करीमना 'संपविणाऱ्यांना' कसे संपवायचे हा माझ्यापुढे प्रश्न आहे.
विशेषांक प्रकार
अरेबिअन पाइट्स पुस्तकांत काही
अरेबिअन नाइट्स पुस्तकांत काही कथा आहेत अनैसर्गिक संबंधांच्या. पण ते लग्न वगैरे नव्हते. हे प्रकार कल्पित नसणार. श्रीमंत लोकांचा शौक असल्याने त्यांना माफ असावे.
भूमध्य समुद्राच्या आसपासच्या देशांतल्या लोकांत हे प्रमाण अधिक आहे किंवा आहेच. तसे नसते तर टेन कमांडमेंट्समध्ये असे करू नका लिहावे का लागले? आता पुढची पायरी असे लोक लग्न करून राहायला मागत आहेत.
करीम ची आठवी चूक - जे
करीम ची आठवी चूक - जे (अमेरिकन) सरकार करीम ला कधीच उत्तरदायी नव्हते त्या सरकारकडून करुणामय, परार्थवादी, अनुकंपायुक्त वागणूकीची अपेक्षा करणे.
----
दुर्दैवाने, करीमच्या वाट्याला आलेला पन्नाशीचा गोरा न्यायाधीश वॉलेन्स्की हा निर्दय आणि वंशद्वेष्टा म्हणून प्रसिद्ध आहे.
टिपिकल अनिवासी भारतीय माईंडसेट. आपल्याला न आवडणाऱ्या भूमिका असणारा माणूस हा रेसिस्टच असतो ही ठाम समजूत.
(जसं निवासी भारतीयांपैकी अनेकांना वाटते की कोणताहि माणूस लबाडी, भेदभाव, अथवा शोषण केल्याशिवाय धनवान होऊच शकत नाही - तसं)
The usual trolling comment,
The usual trolling comment, with zero knowledge of the people involved.
हॅहॅहॅ
या मुद्द्यात इन्व्हॉल्व्ह्ड लोकांची इत्यंभूत माहीती मला असती तर माझा कॉमेंट जास्त संयुक्तिक, सुयोग्य झाला असता का ?
मला वाटलं होती की पॉलिसिज, व प्रोसिज्युअर ची माहीती महत्वाची असते - मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी.
अभ्यास सुरु कराच
न्यायाधीश वॉलेन्स्की...ने राजाश्रय नाकारायचे प्रमाण देशातले सर्वोच्च, सुमारे एक्क्याऐंशी टक्के आहे.
तुम्ही अभ्यास सुरु करण्याचा संकल्प करून सोडा आता.
अभ्यास वाढवणे हे फक्त तेव्हाच शक्य असते जेव्हा अभ्यास थोडाफार केलेला असतो.
rhetorically च बोलायचे झाले तर - "न्यायदेवता आंधळी असते" हे अक्षरश: माध्यमिक शाळेत ऐकायला मिळणारे वाक्य आहे. निबंध लिहायला लावायचे या विषयावर माध्यमिक शाळेत.
त्याचे प्रमाण जास्त आहे म्हणून काय झाले ? अमेरिका हे कायद्याचे राज्य असलेले राष्ट्र आहे. (व म्हणूनच करीम अमेरिकेत राजाश्रय मागायला आला.) कायदा व त्यातून उद्भवणारी प्रक्रिया व्यवस्थित पाळून फक्त कायद्याच्या दृष्टीने जे पात्र आहेत त्यांच्या बाजूने शरणार्थी म्हणून निवाडा करणे हे न्यायाधीशाचे काम आहे. तुमच्या आयडिऑलॉजिकल प्रेफरन्सेस ला भाव देणे हे अमेरिकन काँग्रेस चे काम आहे. न्यायाधीशाचे नाही. तुम्हाला ढीग वाटेल की न्यायाधीशाने करूणा, दया, अनुकंपा, परार्थ, संवेदना यांना वाव द्यावा.
तुमचं चालू द्या.
सदर धाग्यावर वा अन्यत्र सांख्यिकीची प्राथमिक तत्त्वं आणि ती वापरण्यामागची प्राथमिक गृहितकं लिहून, लेखकानं दिलेल्या विदेतून लेखकाचा दावा खरा असण्याला पुष्टी मिळते. याचे तपशील आणि 'न्यायाधीश देतात तो न्याय का न्यायाधिशांनी न्याय देणं अपेक्षित आहे' यांतला फरक समजावत बसण्यासाठी मला वेळ नाही. त्यामुळे तुमचं चालू द्या.
Hyper-masculinity हे मध्ययुगीन मूल्य हाणून पाडलेच पाहिजे!
धोरणाचा विचार करण्याविषयी: १९९४ साली जॅनेट रीनो यांनी एका "गुप्त" मेमोत सर्व इमिग्रेशन जजेस ना आपल्या देशात ज्यांची परिस्थिती विशेष नाजूक आहे अशा गटांतील राजाश्रय केसेसचा विचार करताना (उदा. गे-द्वेष्ट्या देशातले "गे" आणि ट्रान्स-जेंडर ), त्यांना राजाश्रय देण्याकडे कल ठेवण्याचे आवाहन केले होते. ट्रम्पने आता बरोबर त्याच्या विरुद्ध जाऊन, शक्यतो अशांना राजाश्रय नाकारण्याकडे कल ठेवण्याचे सांगितले आहे. अमेरिकेच्या दक्षिणेतील वंशवादी गोर्यांच्या राजकीय तत्वप्रणालीत "जबरी मर्दपणा " (Hyper-masculinity) हे एक "मूल्य" आहे हे आपण जाणतोच, त्याच्याशी हे सुसंगतच आहे. पण हे मध्ययुगीन प्रतिगामी मूल्य हाणून पाडलेच पाहिजे!
झालं तर मग. एका जज ने आपली
झालं तर मग. एका जज ने आपली मर्यादा सोडून एक आयडीऑलॉजिकल स्टँड घेतला व दामटला.
आता प्रत्युतर म्हणून कार्यकारी मंडल उलट बाजू दामटतेय.
---
अमेरिकेच्या दक्षिणेतील वंशवादी गोर्यांच्या राजकीय तत्वप्रणालीत "जबरी मर्दपणा " (Hyper-masculinity) हे एक "मूल्य" आहे हे आपण जाणतोच, त्याच्याशी हे सुसंगतच आहे. पण हे मध्ययुगीन प्रतिगामी मूल्य हाणून पाडलेच पाहिजे!
अगदी. तुमच्या आवडत्या वाळवंटी लोकांमधे ते असण्याची सुतराम शक्यता नाही. इंडियन मुजाहिद्दीन हे तिबेट मधल्या लामा लोकांनी स्थापन केलेले व चालवलेले आहे. हिज्बुल, हर्कतुल, लष्कर, जैश ही तर श्वेतांबर दिगंबरांनी स्थापन केलेली आहेत. अल्काईदा गट हा तर शांताबाईने स्थापन केला.
कशाचं काय!
तुमच्या आवडत्या वाळवंटी लोकांमधे ते असण्याची सुतराम शक्यता नाही. इंडियन मुजाहिद्दीन हे तिबेट मधल्या लामा लोकांनी स्थापन केलेले व चालवलेले आहे. हिज्बुल, हर्कतुल, लष्कर, जैश ही तर श्वेतांबर दिगंबरांनी स्थापन केलेली आहेत. अल्काईदा गट हा तर शांताबाईने स्थापन केला.
या सगळ्याचा या धाग्याशी संबंध काय?
नेमका संबंध सांगतो. खालील
नेमका संबंध सांगतो. खालील वाक्यात जो संबंध आहे तोच.
अमेरिकेच्या दक्षिणेतील वंशवादी गोर्यांच्या राजकीय तत्वप्रणालीत "जबरी मर्दपणा " (Hyper-masculinity) हे एक "मूल्य" आहे हे आपण जाणतोच
----
न्युजर्सी हे अमेरिकेच्या दक्षिणेत येत नाही.
जबरी मर्द पणा चा धाग्याच्या मूळ मुद्द्याशी काय संबंध ?????
मिलीन्दजी
हे मला समजले नाही
धोरणाचा विचार करण्याविषयी: १९९४ साली जॅनेट रीनो यांनी एका "गुप्त" मेमोत सर्व इमिग्रेशन जजेस ना आपल्या देशात ज्यांची परिस्थिती विशेष नाजूक आहे अशा गटांतील राजाश्रय केसेसचा विचार करताना (उदा. गे-द्वेष्ट्या देशातले "गे" आणि ट्रान्स-जेंडर ), त्यांना राजाश्रय देण्याकडे कल ठेवण्याचे आवाहन केले होते.
म्हणजे परीस्थीती नाजुक आहे हा निकष मानणे व त्या आधारावर विशीष्ट न्याय देणे हा सबेजेक्टीव्ह प्रकार वाटतो. खर म्हणजे एखादे राजकीय धोरण असल्यासारखे ते वाटते. ते राजकीय पक्षाचे असल्यास समजु शकतो पण न्यायपालिके त असे विशिष्ट निकष व धोरणे असणे वा त्याचा गुप्त आग्रह असणे ही तर गंभीर बाब आहे. आणि गुप्त तेने असे धोरण का राबवावे लागावे ते ही कळले नाही.
सर्वसाधारणपणे न्याय हा तटस्थतेने केस बाय केस सिच्युएशन बघुन केला जातो जावा असे अपेक्षित असते. भारतात तरी कदाचित असे न्यायपालिके संदर्भात ऐकलेले आठवत नाही की एक धोरण अशा गुप्त रीतीने आग्रह केला जातो व असे न होणे हे बरे वाटते.
कोणाला राजकीय आश्रय द्यायचा हा अर्थातच सब्जेक्टिव्ह निर्णय असणार
कोणाला राजकीय आश्रय द्यायचा हा अर्थातच सब्जेक्टिव्ह निर्णय असणार आहे. एकतर ज्या परिस्थितीत हे लोक आपला देश सोडून पळालेले असतात, त्या स्थितीत पुरेसा कागदपत्री पुरावा गोळा करणे अत्यंत अवघड असते. त्या देशातल्या एकूण "कल्चर" बद्दलची जनरल माहिती विचारात घेऊनच अर्जाच्या सत्यासत्यतेची छाननी करावी लागते. घाना किंवा युगांडात मोठ्या प्रमाणावर "गे" लोकांवर प्राणघातक हल्ले करणारी "दक्षता पथके" आहेत असे बातम्यांवरून दिसतंय. राज्यसंस्थेचाही त्याला सुप्त/उघड पाठिंबा दिसतो.
एके काळी (१९८४ च्या दिल्लीतील शीख हत्याकांडानंतर) हजारो शिखांना अमेरिकेने राजाश्रय दिला होता. त्यातल्या प्रत्येकावर "हल्ला" झालाच होता असे नाही. पण एकूण परिस्थिती लक्षात घेतली गेली.
आता राजाश्रयाच्या अनेक प्रकरणात "लुच्चेगिरी" असणार हे उघड आहे. सध्या हजारांनी पंजाबी तरुण अमेरिकेत घुसत आहेत. न्यूयॉर्कमध्ये त्यांना एक हजार डॉलर्स मध्ये खोटे स्टेट ओळखपत्र आणि चार हजार डॉलर्स मध्ये ट्रकचे (खोटेच) ड्रायव्हिंग लायसन्स मिळते. या लोकांबाबतचा माझा ऍटिट्यूड फारसा सहानुभूतीपूर्ण नाही . पण नंतर ते प्रामाणिकपणे ट्रक चालवून पैसे मिळवितात, गुन्हेगारीने नाही, हेही सत्य आहेच. आदर्श इमिग्रण्टचे हे प्रमुख लक्षण मानले जाते! अमेरिकन अर्थव्यवस्थेला ट्रक ड्रायव्हर्स ची गरज आहे. त्यामुळे यातले खरे फेल्युअर हे अमेरिकन राज्यसंस्थेचे , "ट्रक ड्रायव्हर व्हिसा" निर्माण करण्यातले आहे.
पण समोरचा माणूस खरा आहे का लुच्चा आहे, हा तसा पूर्णपणे सब्जेक्टिव्ह डिसीजनच असणार आहे. आता लुच्चेगिरीचे प्रमाण (माझ्या मते) वीस-पंचवीसटक्के असावे, का ऐंशी टक्के, हा ज्याचा त्याचा "आयडियॉलॉजिकल" प्रेफरन्स असणार आहे.
व्हिसा सिस्टीम ला का भीक घालावी?
आणि खरं सांगायचं तर अशा "बेकायदेशीर " मार्गाने घुसून ट्रक/टॅक्सी चालविणाऱ्या पंजाब्यांबाबत माझ्या मनात थोडीफार कौतुकाचीच भावना आहे, आणि मराठी माणूस यात का नाही याचे दुख्खही . आजच्या जगात आणि जागतिकीकरणात सर्वसाधारण माणसासाठी एकही गोष्ट "न्याय्य" प्रकारे होताना दिसत नाही. अशा परिथितीत त्याने व्हिसा सिस्टीम ला का भीक घालावी?
आजच्या जगात आणि जागतिकीकरणात
आजच्या जगात आणि जागतिकीकरणात सर्वसाधारण माणसासाठी एकही गोष्ट "न्याय्य" प्रकारे होताना दिसत नाही. अशा परिथितीत त्याने व्हिसा सिस्टीम ला का भीक घालावी?
अगदी बरोबर.
कालच्या जगात व जागतिकीकरणापूर्वी सर्वसाधारण माणसासाठी प्रत्येक गोष्ट "न्याय्य" प्रकारे होताना दिसत होती. नैका ???????
उदाहरण तुम्हीच दिलेले आहे. पंजाब दहशतवादामुळे ग्रस्त पंजाबी व्यक्ती ८० च्या दशकात. भारताने ९५ च्या आसपास .wTO मधे प्रवेश केला.
(अर्थातच ---- ह्याचा संबंध काय, गब्बर - असा प्रश्न येईलच आता.)
साहेब, तुमचा मूळ लेख पटला.
साहेब, तुमचा मूळ लेख पटला. करीमबद्दल फार वाईट वाटले. हे बदलणे कसे शक्य व्हावे हीच कळकळ मनात आली.
मात्र,
आणि खरं सांगायचं तर अशा "बेकायदेशीर " मार्गाने घुसून ट्रक/टॅक्सी चालविणाऱ्या पंजाब्यांबाबत माझ्या मनात थोडीफार कौतुकाचीच भावना आहे
हे आजिबात पटले नाही. पैसा चारायची धमक आणि बेदरकारपणा असणारे अश्याप्रकारे बेकायदेशीरपणे घुसतात. आणि गरीब परिस्थितीतले करीम बळी पडतात. त्यांना जगायचा अधिकारदेखिल नाकारला जातो.
But that is because the legal route has been denied to them,
पैसा चारायची धमक आणि बेदरकारपणा असणारे अश्याप्रकारे बेकायदेशीरपणे घुसतात. : Agreed . But that is because the legal route has been denied to them, in spite of a legitimate need of the US Economy: The same argument under which the US imports software engineers by the thousands.
कायच्याफकिंगकाहीही! यावरून
कायच्याफकिंगकाहीही! यावरून फार तर तो इतरांपेक्षा कर्तव्यदक्ष आहे (असायलमच्या बहुतेक केसेस फेक असतात हे लक्षात घेता), किंवा गेलाबाजार इमिग्रंट-अनफ्रेंडली आहे असं म्हणता येईल (देअर इज ॲबसोल्युटली नथिंग राँग विथ दॅट इदर). पण डायरेक्ट रेसिस्ट?
त्या बिचार्या करीमचं वाईट झालं यात वाद नाही, पण त्याचं भांडवल करून लेखकाने जी मुक्ताफळं उधळली आहेत ती दुर्दैवी आहेत. (तरी इस्लामोफोब, झेनोफोब, होमोफोब वगैरे शिक्के मारायचे राहून गेले!!) इतका जर 'गोर्या' 'रेसिस्ट' अमेरिकनांचा राग असेल तर त्यांनी दिलेली ग्रीनकार्डं, एचवनबी, सिटिझनशिपा त्यांच्या तोंडावर फेकून सुदान, घाना, नायजर मधल्या होमोफोबांचं प्रबोधन करायला जावं. बरी अद्दल घडेल गोर्यांना!!
कथा वाचली
कथा वाचली. जे झाले ते वाईटच झाले. पण....
आमच्या काळी (होय, मी आता म्हातारा होत चाललो आहे !) एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या मागे लागायचा. मग त्या मुलीचे मित्र / भाऊ वगैरे त्या मुलाला तुडवून काढायचे. तरी तो मुलगा त्या मुलीचा नाद सोडायचा नाही. मग तो मुलगा "चुxपागल" समजला जायचा. मात्र करीम साठी कोणता शब्द योजावा हे भाषिक दौर्बल्यामुळे (थँक्स टु अजो) कळत नाहिये.
या कथेवरुन करीमला व्यवहारज्ञान अजिबातच नव्हते हा प्राथमिक निष्कर्ष काढता येईल. गरीबाला पोटाची काळजी असावी. xxची नसावी हा नियम जगात सर्व गरीबांसाठी समान आहे याचा पुन:प्रत्यय आला.
असो. करीमला त्या जगात तरी "जन्नत" नसीब होवो याहून अधिक काय मागाणार !
नि:शब्द
नि:शब्द