जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १४

" हे जहाज काही तासातच संपूर्णपणे ऊध्वस्त होऊन समूद्राच्या तळाशी जाईल "

" काहीही मूर्खासारखं बडबडू नकोस जँक "

" हो, तो खंर बोलतोयं. माझाही ह्या गॉल्टच्या सूरक्षा पथकावर फार विश्वास नाही.
मी एक आर्कीटेक्ट आहे.
ह्या जहाजाची रचना अशा पद्धतीने करण्यातच नाही आली, की हे ऊलटं होऊनही शेवटपर्यतं पाण्यावर तरंगत राहील.
त्यामूळे आपल्याला आता लवकरात लवकर या हॉलमध्ये पाणी भरण्याच्या अगोदरच ईथून बाहेर पडायला हवं "
मी. रॉबेननी जँकच्या बोलण्याला दूजोरा देत सर्वाचीं समजूत काढली.

त्यांचं बोलणं सूरू असतानाच तो सूरक्षा अधीकारी गॉल्ट व ईजींनरूममधील स्टीफन एकमेकांशी वाद घालत प्रवाशांच्या गर्दीपासून दूर जात होते.
" ऑफीसर तूम्ही माझं ऐकत का नाही आहात ?
जेव्हां ही घटना घडली तेव्हां माझी वाईफही खालच्या डीजे बार मध्येच होती. त्यामूळे तीला वाचवण्यासाठी मला आता लवकरात लवकर तीथे जायला हवं "

" नाही तूम्हांला तीथे जाता येणार नाही. मी तर असं म्हणेन की तूम्ही आता फार काळजी न केलेलीच बरी...कारण आमचे बहूतेकसे कर्मचारी वरतीच आहेत. ते सर्व सांभालून घेतील "

" जर समजा ते सर्व सांभालू शकले नाही तर ?
आणी जर ते मेले असतील तर ?"

" मग तूमची वाईफही यातून वाचू शकणार नाही.
मी शांतपणे सांगतोय ऐका माझं....ईथून बाहेर जाण्याचा काहीच फायदा नाही.
तूम्ही तर या जहाजाचेच कर्मचारी आहात ना......मग.....तूम्हाला तर सर्व प्रोटोकॉल माहीत असायला हवेत "

" तूम्ही जर आता मला या हॉलमधून बाहेर जाऊ दिलं नाहीत तर मी आरडाओरडा करून सर्वानाच सांगेन की तूम्हीं त्यांना खोटं बोलून फसवत होतात.
जर असं झालं तर ही लोकं तूमच्यावर तर घसरतीलच पण जहाजात स्वतःच्या परीवाराला शोधण्यासाठी एक दूसऱ्याचे जीवही घ्यायला मागे पूढे पाहणार नाहीत "

" स्टीफन मी तूम्हांला शेवटचं सांगतोय. मी तूम्हाला या हॉलमधून बाहेर कूठेच जाऊ देणार नाही.
मला माफ करा पण तूम्हांला अडवण्याचा मला संपूर्ण अधीकार आहे "
यावेळी गॉल्ट रागाने लाल झाला होता. स्टीफनला शांत ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करून तो अखेर वैतागला.

" नाही, नाही ऑफीसर तूमच्याजवळ कोणताच मार्ग नाही. ईथे आजारी व जखमी प्रवासी आहेत. त्यामूळे तूम्हांला याच्यांसोबत थांबायलाच हवं.
पण मी आता माझ्या वाईफला शोधण्यासाठी वरती जात आहे.....सो तूम्ही चूकूनही मला अडवण्याचा प्रयत्न करू नका "

एव्हांना जँकच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन सर्वानी एकञच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
मी. रॉबेनसोबत एलीजाबेथ, जँक व त्याचे तीघंही मीञ त्या हॉलमधून बाहेर पडण्यासाठी कॉरीडोरच्या ऊलट्या झालेल्या पायऱ्यांवरून वरती जात एका मोठ्या दरवाज्याजवळ येऊन पोहोचले. तेवढ्यात एक स्ञी तीच्या लहान मूलाला कशीबशी समजावत त्यांच्याजवळ घेऊन आली.
" मला सांगा तूम्ही याला काय सांगीतलंत. हा माझं काही ऐकतच नाही.
आपण खरंच या जहाजाच्या तळामधून बाहेर पडू शकतो का ?.....नाही ना.
प्लीझ तूम्ही याला समजवाना. मला माहीत आहे की हे शक्य नाही पण.... "

" हो हे शक्य आहे "

" काय ?....म्हणजे तूम्ही खरोखरच आम्हाला या जहाजातून सूरक्षीत बाहेर काढू शकता "

" हो लूसी, या हॉलमध्ये थांबून आता काहीच फायदा नाही.
माझ्या अंदाजानूसार जवळजवळ एक-दोन तासातच हे संपूर्ण जहाज पाण्याने भरून समूद्राच्या तळाशी जाईल "

त्यांची आपआपसात चर्चा सूरू असतानाच स्टीफनही तीथे येऊन पोहोचला होता.
" ओ हाय मीस्टर रॉबेन
तूम्ही एक आर्कीटेक्ट आहात ना. मला माहीत आहे. मी तूमच्या शीप मेकीगं कंपनीविषयीही खूप ऐकलंय "

" हो मी फ्लोटवेसल कंपनीचा सीईओ आहे "

" मग तूम्हाला या जहाजाच्या रचनेवीषयी देखील संपूर्ण माहीती असेल ना. "

" थोडीफार "
रॉबेननी मूद्दामूनच स्टीफनच्या प्रश्नांच तोडकं ऊत्तर दिलं. कारण ते पहील्यांदा स्टीफनच्या बोलण्याचा ऊद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होते.

" प्लीझ रॉबेन तूम्ही मला सांगू शकाल का ?
डिजे बारमधील डिस्को कूठे आहे मला तीथे लवकरात लवकर जावं लागेल "

" कदाचीत एक मजला खाली परंतू हे जहाज ऊलटं झाल्यामूळे ते आता वरती असेल.
पण तूम्हाला तीथे का जायच आहे.
तूम्ही आता काय डान्स करण्याच्या मूडमध्ये आहात का ?"

" नाही, जेव्हां ती लाट आली तेव्हां माझी वाईफही खाली डीजे बारमध्येच होती त्यामूळे तीला शोधण्यासाठी तरी मला आता लवकरात लवकर तीथे जायला हवं "

" ओ स्वारी मला हे खरंच माहीत नव्हतं.
तूम्ही फक्त हे सांगा की ईथून जहाजाच्या तळाकडे पोहोचण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग कोणता आहे "

" स्टाफच्या सीढ्या, जशा कीचमध्येही आहेत तीथूनच आपण डीजे बारमध्येही पोहोचू शकतो.
ओ, बाय द वे मी.....मी तूम्हांला माझी ओळख करून द्यायलाच विसरलो......माझं नाव स्टीफन, मी या जहाजाच्या ईजींन कम्पार्टमेटंमधील बो कँबीनेटचा मूख्य ईजींनीअर आहे....मी "

" मग स्टीफन तूम्ही कँप्टन स्मीथना तर ओळखत असालच ना "
जँकने स्टीफनचं वाक्य पूर्ण न होऊ देताच त्यांना विचारलं.

" या जहाजात असा कोण आहे जो कँप्टन स्मीथना ओळखत नाही ?"

" कँप्टननी तूमच्या जहाज चालवण्याच्या कैशल्याविषयी आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगीतल्या होत्या. तूम्ही जहाजाच्या डेकवरती स्टर्नजवळ आमची वाट पाहत ऊभे राहणार होतात., बरोबर "

" ओ म्हणजे तू जँक आहेस तर ?
मी तूला ओळखलंच नाही रे !
विल्यम तूझ्यासोबत खूपच वाईट वागला.मला त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती. जर ही मोठी लाट आलीच नसती तर आपण केव्हांच या जहाजातून बाहेर पडून अर्जेनटीनाच्या कीनाऱ्यापर्यतं पोहोचलो असतो. पण दूदैवाने आपला संपूर्ण प्लानच फीस्कटला रे "

" स्टीफन माझे वडील कूठे आहेत ? तूम्ही त्यांना कूठे पाहीलं आहे का ?"
एलीजाबेथने काळजीच्या स्वरातच स्टीफनला विचारलं.

" नाही स्मीथचा तर कूठेच पत्ता नाही.
जेव्हां जहाजाच्या भक्कम काचा फूटून पाणी ईजींनकम्पार्टमेंट मध्ये शीरलं तेव्हा सर्वाची एकच धावपळ ऊडाली. जो तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फंक्शन हॉलच्या दिशेने धावू लागला.
पण तू काळजी करू नकोस तूझे वडील नक्कीच कूठेनाकूठे सूखरूप असतील "
स्टीफनचं बोलणं एेकून एलीजाबेथच्या डोळ्यात नकळतच पाणी आलं होत. पण ज्युलीने तीची समजूत काढल्यावर ती अखेर शांत झाली.

" आपल्याला आता एकञच राहायला हवं.
आपण सर्वजण वरच्या दिशेने जाऊन अगोदर एलीनाला शोधून काढू.....मग डीजे बार मध्ये पोहोचल्यावर बाहेर पडायचा मार्ग शोधायलाही आपल्याला फार वेळ लागणार नाही "

" ठीक आहे जर कोणी मागे राहीलात तर मला दोष देऊ नका "

" हे मॉम आपण पण यांच्यासोबत जायचं ना "
लहानग्या कॉर्नरने लूसीचा हात पकडूनच तीला विचारलं.

" हो बेटा चल जाऊया "

स्टीफनने ऊलट्या झालेल्या पायऱ्यावर चढून त्या दोन्ही माय-लेकांना अगोदर वरती घेतलं.

" थांबा आम्ही दोघंही तूमच्यासोबत येतोय "
एलीजाबेथला हा आवाज ओळखीचा वाटला होता. म्हणून तीने मान वळवून आवाजाच्या दिशेने मागे पाहीलं. आणी ती अचानक घाबरून शांत बसली.

" विल्यम तू "
विल्यम सोबत कूगनही त्या हॉलमधून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याजवळ पोहोचला होता.
खरंतर त्यानेच सर्वाना कीडनँप करून त्या जहाजात आणलं होतं. जँकने खूनशी नजरेने विल्यमकडे एकवार रोखून पाहीलं. आणी अचानकच तो विल्यमच्या अंगावर धावून गेला. जँकने त्याचा गळा दाबून धरला होता. पण रॉनने व स्टीफनने लगेचच पूढे येत त्याला विल्यमपासून दूर केलं.

" तूझ्यामूळेच, तूझ्यामूळेच आम्ही या जहाजात अडकलो. मी तूला सोडणार नाही "
जँक पून्हा त्याच्या दिशेने धावत गेला. त्याला विल्यमचा जीव घ्यावासा वाटत होता. तो रागाने लाल झाला.

" जँक मूर्खपणा करू नकोस. सोड त्याला
विल्यमला मारून तूला काहीच मीळणार नाही. आपण हवं तर विल्यमवर कायदेशीर कारवाई करू "
रॉन मोठ्याने ओरडत त्याच्याजवळ गेला आणी जँकला विल्यमपासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागला.

" जँक थांब. रॉन बरोबर बोलतोय. सोड त्याला विल्यमला मारून तूझा काहीच फायदा होणार नाही. ऊलट तूच या सर्वात निष्पाप अडकशील.
रॉबेनचं म्हणनंही खंर होतं. विल्यमला जोरात सीढ्यांवर ढकलून जँक रागाने बाजूला झाला.
सर्वजणच विल्यमकडे खूनशी नजरेने पाहत होते.

" विल्यम तूझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू हे का केलंस.
केवळ एक खजाणा मिळवण्याच्या लालसापाई तू या थरावर जाशील असं मला कधी वाटलं नव्हतं "

" एवढंच नाही रॉबेन, माझ्या वडीळांनाही यानेच मारलं होतं. मी आता याला सोडणार नाही "
जँक चवताळला. पण स्वःला कसंबस शांत ठेवत तो पून्हा विल्यमपासून दूर झाला. स्टीफनने व रॉननी अजूनही जँकचे हात पकडून ठेवले होते. नाहीतर त्याने केव्हांच विल्यमचा जीव घेतला असता.

" मला माफ कर जँक.
मी तूम्हांला या जहाजावर आणलं ते माझं चूकलंच. मी असं करायला नको होतं.
पण जँक माझ्यावर विश्वास ठेव. मी तूझ्या वडीळांना मारलं नाही. हवं तर तू माझ्याविरूद्ध नवी केस ऊभी करून पून्हा चौकशी करू शकतोस "

" त्याने काय होणार आहे कोर्ट निकाल दीलेली केस पून्हा ओपनच होऊन देणार नाही. "

" तूझे वडील एका कार अँक्सीडंट मध्ये वारले होते " विल्यम

" पण तो कँर अँक्सीडंटही तूच घडवून आणला होतास ना " जँक

" नाही जँक, तूला माझ्याबद्धल खूप मोठा गैरसमज झाला आहे "
विल्यम स्वःची कातडी वाचवण्याचा पूरेपूर प्रयत्न करत होता. ऊलट्या झालेल्या पायऱ्यांवर ऊभे राहून सर्वजणच त्या दोघांमधील वादावादी ऐकत शांत बसले होते.

" चला आपल्याला आता निघायला हवं जर आपण या जहाजातून सूखरूप बाहेर पडलो तरच याच्यावर पूढे योग्य ती कारवाई करता येईल "

" हो जँक, रॉबेनच म्हणनं बरोबर आहे. आपल्याला आता निघायला हवं "
अखेर रॉनने जँकची कशीबशी समजूत काढून त्याला विल्यमपासून दूर नेलं.
सर्वजणच घडलेल्या प्रकार पाहून निःशब्द झाले होते.

" वरच्या बाजूने, आपल्याला आता फक्त वरच्या बाजूने जायचं आहे "
रॉबेननी पून्हा सर्वाना समजावून सागीतलं.
तेवढ्यात स्टीफनला हॉलच्या बाहेर जाताना पाहून तो सूरक्षा अधीकारी मोठ्याने ओरडला.

" स्टीफन आम्ही सर्व दरवाजे सील करणार आहोत. तूम्हांला पून्हा या हॉलमध्ये येता येणार नाही "
पण गॉल्टच्या ओरडण्याला न जूमानता सर्वजण केव्हांच वरच्या दरवाज्यामधून पलीकडील किचनमध्ये पोहोचले होते.

" त्याच आहेत ना स्टाफच्या सीढ्या बरोबर "
रॉबेननी किचनमधील सीढ्यांकडे बोट दाखवत स्टीफनला विचारले.

" हो त्याच आहेत "
रॉन सीढ्यांजवळ गेला पण त्यांच्या समोरच कीचनमधील मोठमोठ्या अवजड वस्तूचां ढीग पसरला होता. आणी त्या सीढ्यांच्या पलीकडून आगीचे मोठमोठे ओघ कीचमधील मोठ्या हॉलमध्ये येत होते.

" शीट यार आपण ईथे अडकलो आहोत तरी मी तूम्हाला सांगत होती. आता हॉलमधील मोठे दरवाजेही त्या गॉल्टने बंद केले आहेत.
आपण त्याचं ऐकायला हवं होतं "
ज्यूली रागानेच सर्वाना ओरडून सांगत होती.

" हे गाईज, ईथे काय आहे "
जँकने बाजूच्या दरवाजाकडे जात स्टीफनला विचारलं.

" ही कीचनमधील सर्वीस लीफ्ट आहे "

" ओ नो
जहाज ऊलंट झाल्यामूळे आता ही लिफ्टही बंद पडली असेल.
दूसरा कोणताच मार्ग नाही. आपल्याला आता या लिफ्टमधूनच वरच्या दिशेने जावं लागेल "
मग सर्वजण बाहेर पडण्यासाठी त्या लिफ्टजवळ गेले. पण त्या लिफ्टचे दोन्ही दरवाजे बंद झाले होते.

" आपल्याला बाहेरून जोर लावूनच हे बंद दरवाजे ऊघडावे लागतील तरच आपण पलीकडे जाऊ शकतो "
रॉनने पूढे येऊन ते दरवादे खोलण्याचा नीष्फळ प्रयत्न केला. पण केवळ हाताने ढकलून ते मशीनद्वारे बंद झालेले जाड दरवाजे खोलणे शक्य नव्हतं.

" नाही असं काम होणार नाही. हे बंद दरवाजे असे सहजासहजी ऊघडणार नाहीत. यांना खोलण्यासाठी आपल्याजवळ लोखंडाची कोणतीही अशी वस्तू हवी ज्याद्वारे आपण या डावीकडील व ऊजवीकडील दोन्ही दरवाजामधील फटीमध्ये ती वस्तू अडकवून ही लिफ्ट खोलू शकतो "

जँकने खाली पडलेला लोखंडाचा एक चपटा पाईप ऊचलला आणी त्या दोन्ही दरवाज्यांच्या गँपमध्ये अडकवला. मग सर्वानी एकञच जोर लावून कसेबसे ते दोन्ही दरवाजे ऊघडले.
रॉकी पूढे पाऊल टाकणार तेवढ्यात रॉबेननी त्याला घट्ट पकडून ठेवलं होतं.

" संभालून, घाई करू नकोस, खाली बघ "
खाली पाहताच रॉकी दचकला.
क्षणभरात त्याच्या अंगावर काटा येऊन गेला. त्याने पूढे ऊगारलेल्या पायाखाली काहीच नव्हतं.
रॉनने एकवार वरच्या दिशेने नजर फिरवली.
जहाज ऊलटं झाल्यामूळे लिफ्टचा ईलेव्हेटर बॉक्स ( लीफ्टमधील मांणसाची खालीवर ने आण करणारं कँबीन ) वरतीच अडकून राहीला होता.
त्याने समोर पाहीले तीथेही तसाच लिफ्टचा दूसराही एक दरवाजा होता पण तोही बंदच होता.
म्हणजे ती लीफ्ट एकाच वेळी दोन्ही बाजूकडील माणंसाना खालीवर घेऊन जाण्याचे काम करत होती.
" जर आपण पलीकडे गेलो तर तीथे काय आहे.
वरती जाण्याचा मार्ग "

" हो तीथे वरती जाण्यासाठी सीढ्या आहेत "

" मग आता आपल्याला पलीकडील रूममध्ये जाण्यासाठी तो समोरील लिफ्टचा बंद दरवाजा ऊघडावा लागेल.
आणी त्यासाठी आपल्याला ईथून त्या दरवाज्यापर्यतं पोहोचणारी कोणतीही लांबंलचक वस्तू मध्ये टाकावी लागेल. जेणेकरून आपण त्या वत्तूमार्फत पलीकडील रूममध्येही पोहोचू शकतो. आणी........"

जँकचं बोलणं सूरू असतानाच विल्यम व रॉकीनी किचनमधील एक मोठा स्टीलचा टेबल लिफ्टजवळ खेचत आणला होता.

" याने काम होईल "

" हो नक्कीच "
मग सर्वानी एकञच जोर लावून त्या टेबलाची एक बाजू समोरील दरवाज्यापर्यतं पूढे सरकवली. आणी त्या दरवाजाच्या खालच्या फटीत तो टेबल अडकवला.
त्यामूळे त्यांना आता त्या टेबलावरून समोरच्या बंद दरवाज्यापर्यतं पोहोचणं अगदीच शक्य झालं होतं.

नाही म्हटलं तरी तो टेबलही फार काही मोठा नव्हता. फक्त सात फूट लांबी व दोन फूट रूंदी असलेल्या त्या टेबलावरून पूढे जाणं खूपच अवघड व धोक्याचं काम होतं. जर त्या लाबंलचक टेबलावरून पूढे जाताना कोणी तोल जाऊन खाली पडला असता तर त्याचा मृत्यू निच्छीत होता.

" आम्ही या टेबलाला समोरील दरवाजावर दाबून धरतो. तूम्ही सर्वजण लवकरात लवकर या टेबलावरून पूढे जा "
रॉबेननी व कूगनने त्या टेबलावर जोर देऊन त्या टेबलाला कसंबसं पकडून ठेवले होतं.
मग जँक त्यावरून सावकाशपणे पूढे जाऊन समोरच्या दरवाज्यापर्यतं पोहोचला.
पण तो दरवाजा त्या टेबलावरील छोट्याशा जागेवर ऊभं राहून ऊघडणं निव्वल अशक्य होतं.

" मला ईथे दरवाजावर पकड मिळत नाही आहे. हा दरवाजा या छोट्याशा टेबलावर ऊभं राहून मला खोलता येणार नाही "

जँकने दूसरा एखादा मार्ग शोधण्याच्या हेतूने आजूबाजूला नजर फिरवली. सूदैवाने वरच्या मजल्यावरील लिफ्टचा दरवाजा ऊघडा होता.

" जर आपण तीथून वरती गेलो तर "
जँकने स्टीफनला विचारले.

" ईटरटेन्टमेंट सेक्शन आहे तीथे "

" मग आपण तीथेच जाऊया कारण आता
ईथून बाहेर पडण्याचा दूसरा कोणताच मार्ग नाही.
चला या लवकर माझी मदत करा आपल्याकडे वेळ फार कमी आहे "
जँकनंतर विल्यम त्या टेबलावरून पूढे आला होता.

" विल्यम ऐक, तूझ्या दोन्ही हाताची बोटं एकमेकांत गूंतवून ठेव मग मी तूझ्या हातावर पाय देऊनच वरच्या ऊघड्या दरवाज्यापर्यतं झेप घेईन "
जँकने पूढे आलेल्या विल्यमला सांगीतले.
त्या दोघांची चर्चा सूरू असतानाच अचानक कीचनमध्ये एक विस्फोट होऊन सगळीकडे आग पसरली.

" आता तूम्ही सर्वजण लवकरात लवकर या टेबलावरून पूढे या नाहीतर कीचनमधल्या आगीत तूम्हीही जळून राख व्हाल "

जँक मोठ्याने ओरडला व विल्यमच्या हातातील पकडीमध्ये पाय ठेवून त्याने वरच्या रूममध्ये झेप घेतली.

" ठीक आहे लूसी, कॉर्नरला पाठव अगोदर "
लहानगा कॉर्नर खाली पडण्याच्या भीतीमूळे त्या छोट्याशा टेबलावरून पूढे जाण्यासाठी घाबरत होता. पण त्याने अखेर कशीबशी हिम्मत करून टेबलावर पाय ठेवला.

" कम ऑन कॉर्नर घाबरू नकोस "

" तूला काही होणार नाही खाली बघू नकोस "
लूसी त्याला धीर देत होती.
तेवढ्यात अचानकच वरती अडकलेल्या ईलेव्हेटर मध्ये हालचाल झाली. त्याबरोबर मीशेल घाबरून धावतच त्या टेबलावरून विल्यमजवळ पोहोचला आणी मग विल्यमच्या हातावरती पाय ठेऊन त्याने कशीबशी वरती झेप घेतली.
मग त्यापाठोपाठ थोड्यावेळाने ज्युली, एलीजाबेथ, लूसी, स्टीफन, रॉन व रॉकीही विल्यमच्या हातातील पकडीमध्ये पाय ठेऊन वरती पोहोचले. जँक प्रत्येकाला हात देऊन वरती घेण्याचं काम करत होता.
आणी अचानकच ईलेव्हेटरच्या वरती दडून राहीलेली आग फडफडून बाहेर येऊ लागली.
रॉबेनही त्या टेबलावरून पूढे जात विल्यमच्या हातावर पाय देऊन वरती पोहोचले होते.
आता फक्त विल्यम आणी कूगनच वरच्या ईटरटेन्टमेंट सेक्शनमध्ये जायचे बाकी होते.

" सर तूम्ही पहील्यांदा वरती जा.
मी तूम्हांला वरती जाण्यासाठी माझ्या हाताची पकड करून ठेवतो "
कूगन घाईघाईने ते टेबल पकडायचं सोडून त्या टेबलावरूनच पूढे आला होता.
मग विल्यमने कूगनच्या हातावर पाय देवून वरती झेप घेतली. आणी अचानकच खूप वेळापासून थबकणारा ईलेव्हेटर वेगाने खाली आला. व कूगन ऊभ्या असलेल्या टेबलाला खाली घेऊन गेला. कूगनही त्या टेबलाबरोबर खालच्या आागीत जाऊन मरणार होता पण अगदी शेवटच्या क्षणी त्याने विल्यमच्या पायाला घट्ट पकडून ठेवले होते. जँक विल्यमचा हात पकडून त्याला वरती खेचण्याचा अतोनात प्रयत्न करत होता. पण त्या दोघांचही वजन घेऊन वरती खेचणं जँकला अशक्य होत होतं.

" सोड त्याला विल्यम नाहीतर तूम्ही दोघंही मराल "
जँक मोठ्याने ओरडला.

" नका सर मला सोडू नका. मी तूमच्याबरोबर अगदी शेवटपर्यतं असेन. मला मरायचं नाही. प्लीझ मला वरती घ्या "
कूगन जीवाच्या आकांताने ओरडू लागला. पण विल्यमने त्याला अजीबात दाद दिली नाही. ऊलट कूगनसोबत खाली जाण्याच्या भीतीने विल्यम त्याच्या हातावर जोरजोरात लाथा मारू लागला.

" मला माफ कर कूगन माझा नाईलाज आहे.... "
विल्यम ओरडत असतानाच नकळतच त्याच्या पायावरची पकड सूटून कूगन खालच्या आगीत जाऊन पडला होता. त्याची एक अवीरत कीकांळी आख्या जहाजात घूमली होती. व त्याबरोबरच कीचनमधील गँस टर्बाईनमध्ये मोठा विस्फोट होऊन आगीचा एक घवधवीत ओघ ईलेव्हेटरला घेऊन पून्हा वरती आला होता.
त्या काही क्षणातच जँकने विल्यमला वरच्या ईटरटेन्टमेट सेक्शनमध्ये घेतले होते. स्टीफनने लिफ्टचा दरवाजा बंद करून घेतल्यामूळे कीचनमधील आग त्यांच्या रूमपर्यतं पोहोचू शकली नव्हती. केवळ स्टीफनमूळेच आगीत जळण्यापासून सर्वजण वाचले होते.
त्या किचनमधील भयानक विस्फोटामूळे फंक्शन हॉलमध्येही जबरदस्त ऊलथापालट झाली होती.

" ए हा धमाका कीचनमध्ये झाला का ?"
गॉल्टने हॉलमधील एका ईजींनीअरला विचारले.

" हो सर गँसच्या बँलमध्ये काही गडबड झाली असेल "

" तूला काय वाटतं हे बंद दरवाजे हॉलमध्ये आगीला आत योण्यापासून रोकू शकतील "

" हो सर
आपण आता हातावर हात ठेऊन शांत बसण्याशीवाय दूसरं काहीच करू शकत नाही "

" असो त्याच्या आत्म्याला शांती मिळो "
गॉल्टने वरती कीचनमध्ये गेलेल्या स्टीफन व ईतरांसाठी प्रार्थना केली. त्याच्या मते ते सर्वजणच आगीत जळून राख झाले होते.

क्रमशः
पूढील भाग लवकरच................

प्रतिक्रिया

पालींची बदनामी थांबवा!!!!!!