जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १२

अचानक लिफ्टचा दरवाजा जँकने ऊघडायच्या अगोदरच बाहेरच्या बाजूने ऊघडला गेला होता.
कदाचीत कोणीतरी आत येण्यासाठीच तो दरवाजा बाहेरून ऊघडला असावा.
त्या दोघांचीही आता चांगलीच ततंरली होती.
काळे बूट, स्पँनीश बॉटम असलेली काळी पँटं, गळ्याभोवती गूडांळलेली काळी टाय आणी अंगात सफेद शर्टावर चढवलेला काळ्या रंगाचाच ऊंची कोट. त्यावर डाव्या बाजूला एका जहाजाचे चिञ असलेला ऊठावदार लोगो.
वाढलेली परंतू फ्रेचं क्लिअर कट असलेली आकर्षक दाढी. आणी डोक्यावर सोनेरी आकृतीने सजवलेली काळ्या रंगाचीच दर्जेदार कँप
त्यांच्या एकंदरीत पोशाखावरून व हावभावावरून ते एखाद्या क्षेञातील खूपच अनूभवी ईसम भासावे अशा अवीर्भावात ते त्या दोघांसमोरही लिफ्टमध्ये ऊभे होते.
त्यांना पाहताक्षणी जँकची दातखीळी बसली होती. त्याच्या तोडांतून शब्दच फूटेनासे झाले होते. ज्युलीच्या चेहऱ्यावरही घाबरल्याचे भाव स्पष्ट झळकत होते.
त्या दोघांनाही लिफ्टमध्ये पाहून तो ईसम त्यांना पकडेल, आरडाओरडा करून वेबला व त्याच्या साथीदारांना एकञ गोळा करेल. अशी अपेक्षा असताना त्यांनी जँकला एक छोटंस गोड स्माईल दिलं आणी त्यांचा ऊजवा हात जँकसमोर धरला.

" हँलो आय अँम स्मीथ, स्मीथ रोलींग
आय एँम कँप्टन ऑफ दीस शीप "

त्यांच्या आवाजात जरब होता. कदाचीत जँकला भेटल्याचं समाधानही त्यांच्या डोळ्यात लखलखत होतं.
त्यांना पाहून जँक प्रथम गोधंळूनच गेला. पंरतू ज्युलीने खांद्यानेच हलकासा धक्का देत त्याची तंद्री ऊडवली. मग भानावर येत त्याने स्मीथशी हातमिळवणी केली.
जँक आणखिन पूढे काही बोलणार तेवढ्यात स्मीथनी त्याला पून्हां थांबवलं.

" आय नो एव्हरीथीग, तूम्हा दोघांनाही मला आता कोणतंच स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही.
मला माहीत आहे तूम्ही दोघं ईथे कसे पोहोचलात.
नाही पोहोचलात नाही, तूम्हांला तर ईथे या जहाजात नकळतच आणलं गेलंय, हो ना ? " एवढी मोठी गोष्ट कँप्टन स्मीथनी अगदी सहजपणे बोलून दाखवली होती. त्यामूळे जँकमधील आणी त्यांच्यामधली अैचारीकता आता काही अंशी कमी झाली होती.

" तूला हे माहीत आहे का ? की वेबने तूमच्या दोन्हीं मीञानाही ईथेच या जहााजात वरती तीसऱ्या मजल्यावर कैद करून ठेवलंय "

" काय ?" ज्युली

" हो वेबने त्या दोघांनाही या जहाजात आणलंय " स्मीथ
जँक व ज्युली मोठी जोखीम पत्करून त्या दोघांना शोधण्यासाठी त्यांच्या रूममधून ईथपर्यंत आले होते. आणी कँप्टन स्मीथकडून आता आयताच जँकला त्या दोघांचाही ठावठीकाणा मिळाला होता. त्यामूळे आता लवकरात लवकर स्मीथचे आभार माणून रॉन व रॉकीपर्यतं पोहोचण्याचा विचार जँक करत होता.
तेवढ्यात स्मीथनी पून्हा जँककडे नजरेचा एक कटाक्ष टाकला आणी बोलू लागले.

" विल्यम........विल्यमला ओळखतोस तू ?"

" नाही, कोण विल्यम ?" जँक

" विल्यम हिलरी, ईटरनँशनल स्मग्लर. ज्याने तूम्हाला ईथे या जहाजात आणून कैद करून ठेवलंय. तो अफीम, चरस, गांज्या व अशा अनेक अमली पदार्थाचां कूविख्यात व्यापारी आहे.

" पण हे सर्व तूम्हाला कंस माहीत " ज्युली ऊगाचचं काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेली.

" मी गेल्या दहा वर्षापासून या डिस्कवरी जहाजावर कँप्टन पदाची सूञे सांभालतोय. हे जहाज अर्जेटीनातील सी.एम.ए.( क्रूझ ऑफ मरीन अर्जेटीना ) या जलपर्यटन सेवा पूरवणाऱ्या प्रायव्हेट कंपनीच्या मालकीचं आहे.
हिलरीने अमाप पैशांच्या जोरावर अनेक मोठमोठ्या कंपनीशी व्यापारी संबध प्रस्थापीत केले. बरीच बेकायदेशीर कामं करून या समाजामध्ये त्याने मानाचे स्थान मिळवले. त्यामूळेच तर त्याचा अमली पदर्थाचां काळा बाजारही वाढीस लागला. आणी एवढं करूनही तो लोकांच्या नजरेत माञ एक प्रामाणीक व यशस्वी ऊद्योगपती म्हणूनच मिरवतो.
पण यावेळी त्याची नजर प्राचीन, ईतीहासातून लूप्त झालेल्या कीगं बार्बोसाच्या ईनव्हीजीबल ट्रेजरवर आहे. संसोधन कर्त्याच्या मते त्या अदृष्य खजाण्यात एक लक्ष सोन्याची नाणी, दागदागीने, चांदीच्या मूद्रा, आणी आणखीन बऱ्याच मैल्यवान, कीमंती वस्तूचां समावेश असण्याची शक्यता आहे. म्हणूनच तर तो अवाढव्य खजाणा मिळवण्यासाठीच हिलरीने तूम्हांला या जहाजावर आणलंय. "

" पण मलाच का ?
हा खजाणा शोधण्यासाठी तो ईतर कोणाकडूनही मदत मीळवू शकला असता ना. "
जँकने अगदी योग्य वेळी त्याच्या मनातील शंका बोलून दाखवली होती.
पून्हा एक मोठा दिर्घ श्वास घेऊन कँप्टन स्मीथ पूढे बोलू लागले.
" कदाचीत जँक तूला हे माहीत नसेल,....................तूझ्या वडीळांचा खूनही विल्यमनेच केला होता.

" काय ?" जँक अगदी रागाने, चवताळून ओरडला. नकळत त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या वडीळांचा निरागस चेहरा येऊन गेला.

" हो,
तूझे वडील मी. जॉन फ्लेचर अर्जेटीनांतील एका सूप्रसीद्ध ट्रेजर हंटीग एजंसी मध्ये कार्यरत होते.
मला वाटतं तू कदाचीत तेव्हां खूपच लहान असशील. जॉनचा प्रामाणीकपणा आणी त्यांची कूशल बूद्धीमत्ता पाहून त्या एजंसीने ईनव्हीजीबल ट्रेजर हंटीगंच्या गूप्त खजाण्याचे काम जॉनकडे सोपवले होते.
तूझे वडील दिवस राञ त्या प्रोजेक्टवर काम करत असायचे. तेव्हां मी नूकताच सी.एम.ए. मध्ये नेव्ही ट्रेनीगसाठी रूजू झालो होतो. तूझ्या वडीळांची मेहनत आणी बूद्धीमत्ता मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहीली होती.
अखेर मी. जॉनची मेहनत पूर्णत्वास गेली. आणी थोड्याच कालावधीत मी. जॉननी त्या खजाण्यासंदर्भात काही महत्वाचे पूरावे मिळवले. त्या पूराव्यामार्फत ते कीगं बार्बोसाच्या ईनव्हीजीबल ट्रेजरपर्यतं पोहोचू शकले असते. "

" पोहोचू शकले असते म्हणजे ? जँकच्या वडीळांसोबत पूढे काय घडलं ? ते खजाण्यापर्यतं पोहोचलेतच नाहीत " ज्युली

" नाही, त्यावेळी या विल्यम हिलरीची नजर त्या गूप्त खजाण्यावर होती. विल्यमही त्याच ट्रेजर हंटीग एजन्सीमध्ये तूझ्या वडीळांसोबत कार्यरत होता. त्याने खजाणा लूटून झटपट श्रीमंत होण्याची कमकूवत स्वप्ने पाहीली होती.
आणी यशाच्या शीखर गाठत असतानाच जे नको घडायला हवं होतं तेच घडलं. एका राञी घडलेल्या कार एक्सीडटं मध्ये तूझ्या वडीळांनी त्यांचा जीव गमावला होता. "
कँप्टन स्मीथचे ते रखरखीत वाक्य क्षणार्धात जँकच्या हद्याचा ठोका चूकवून गेले होते. त्याचे डोळे पाणावले. त्याने शेवटंच त्याच्या वडलांना हॉस्पीटल मध्ये पाहीलं होतं. तो त्यावेळी खूप रडत होता. हॉस्पीटल मधील यूगासमान भासणारा प्रत्येक क्षण त्याला दूखःची आठवण करून देत होता.

" त्या दृष्ट हिलरीनेच एक कूटील बेत रचून तूझ्या वडलांचा अँक्सीडटं घडवून आणला होता. त्याने जेलमध्ये जाण्यासाठी कोणताच पूरावा मागे सोडला नाही. त्यामूळे जॉनच्या मृत्यूची केस देखील फार वेळ तग धरून राहू शकली नाही. परंतू त्या कार अँक्सीडटं मध्ये ईनव्हीजीबल ट्रेजरमधील सर्वच पूरावे जळून नष्ट झाले होते. जे फक्त जॉनलाच माहीत होते.
त्यामूळे हिलरीच्या क्रूर यशालाही काहीच महत्व ऊरले नाही. "
ते दोघंही स्मीथचे बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होते.

" शेवटी पंधरा वर्षाच्या कठोर मेहनतीने हिलरीने हरवलेली सर्वच कागदपञे, पूरावे, नकाशे व काही महत्वपूर्ण बाबी पून्हा गोळा केल्या.
परंतू कसलातरी अतीमहत्वाचा पूरावा माञ तो अजूनही मिळवू शकलेला नाही.....असा पूरावा जो फक्त तूझ्या वडीळांनाच माहीत होता. आणी मरण्याआधी तूझ्या वडीळांनी तो तूलाही सांगीतला होता.
कदाचीत यासाठीच हिलरीने तूला कैद करून या जहाजात आणलं असावं. आणी तूझे तिघंही मीञ तूझ्यासोबतच आहेत हे कळल्यावर कोणताच पूरावा मागे राहू नये म्हणून हिलरीने त्यांनाही या जहाजात आणलं "

कँप्टन स्मीथनी सांगीतलेली सर्वच हकीकत अगदी अद्भूत होती. रहस्यमय होती. त्या दोघांसाठीही स्मीथबरोबरचा अनूभव अगदी नवीनच होता.
" शेवटी खजाण्यासंदर्भात सर्व पूरावे मिळवूनही माझ्याजवळ असा कोणता महत्वाचा पूरावा असावा की ज्यासाठी हिलरीला मला ईथपर्यतं आणावं लागलं. "
जँक स्वतःशीच पूटपूटत होता.
ज्युलीही जँकची मनस्थीती पाहून शांत ऊभी होती. कदाचीत जँकला थोडा वेळ शांतच ऊभं राहू द्यावं असा तीचा हेतू असावा.

" पण तूम्हांला हे सर्व माहीत असूनही तूम्ही हिलरीची मदत का करताय ?"
शेवटी न राहवून ज्युलीने अगदी महत्वाचा प्रश्न कँप्टन स्मीथना विचारला होता.

ज्युलीचा प्रश्न ऐकून कँप्टन स्मीथचा चेहरा अचानक पडला. त्यांच्या नजरेत भरून आलेली चितां स्पष्ट झळकत होती.
कदाचीत ज्युलीच्या नजरेला नजर देत ते बोलू शकले नसते म्हणूनच ते थोडा वेळ शांत राहीले.
जँकही सावधपणे स्मीथच्या चेहऱ्यावरचे हावभाव टीपण्याचा प्रयत्न करत होता.
डोळ्यात दाटून आलेले अश्रु लपवत स्मीथ बोलू लागले.

" त्या हिलरीने फक्त तूम्हांलाच नाही तर माझ्या मूलीलाही या जहाजात कैद करून ठेवलंय. आणी तो मलाही आता ब्लँकमेल करतोय. तो खजाणा शोधण्यासाठी वादळी वाऱ्याचा आवेग असलेल्या तूफानी समूद्रात जहाज नेण्याची जबरदस्ती तो माझ्यावर करतोय.
कंस शक्य आहे हे ?
जर मी सूदूर दक्षीणेच्या दिशेने जहाज नेले तर जहाजतील अन्य प्रवाशांच्या जिवाधोका ऊत्पन्न होऊ शकतो. "
जँकनेही आपली स्वतःची, रक्ताचं नातं असलेली, जवळची माणंस गमावल्याचं दूखः अनूभवलं होते.
शेवटी आपल्या भावनांवर नियंञण ठेवत काहीच अडचण नाही असा आव आणत कँप्टन स्मीथनी सूटकेचा सूस्कार सोडला.

" आपल्याला आता लवकरात लवकर या लिफ्टमधून बाहेर पडायला हवं. नाहीतर ईथे पून्हां माझ्यासारखाच कोणीतरी यायचा. " स्मीथ

हो चला लवकर आपल्याला आता रॉनला व रॉकीलाही भेटायचं आहे
ज्युलीची घाई पाहून ते तीघंही काही सेकंदातच लिफ्टबाहेर आले.

" तूम्ही दोघं माझ्या मागून या., आता आपण माझ्या प्रायव्हेट कँबीनमध्ये जाऊया. .....................................मला तूम्हालां या जहाजावीषयी खूप महत्वाचं काहीतरी सांगायंच आहे "
मग थोड्याच वेळात ते तीघंही कॉरीडॉरमधून पूढे गेले.

" कँप्टन तूम्ही आमची एवढी मदत करताय त्याबद्दल खूपच धन्यवाद " ज्युलीने चालतानाच घाईघाईत स्मीथचे आभार मानले.

" धन्यवाद कसलं त्यात
माझ्या कँबीनमध्ये जहाजातील प्रत्येक रूमची एक-एक राखीव चावी ठेवण्यात आली आहे. तूम्हाला या कॉरीडॉरमध्ये आता फार वेळ ऊभं राहून चालणार नाही. वेब व त्याच्या माणसांनी तूम्हाला ईथे माझ्यासोबत बोलताना पाहीलं तर सर्वच प्लान फिस्कटेल. तूम्ही रॉनला व रॉकीला भेटून पून्हां लवकरात लवकर तूमच्या रूममध्ये परता की मग झालं " स्मीथ ज्युलीला शांतपणे समजावत होते.

" कसला प्लान कँप्टन ?" जँकने स्मीथकडे पाहत विचारले.

" ईथे नको, माझ्या कँबीनमध्ये गेल्यावर मी तूम्हांला सर्व सवीस्तर सांगतो "

थोड्याच वेळात कॉरीडॉरमधून पूढे जात ते तीघंहीजण स्मीथच्या कँबीनपर्यतं पोहोचले.
कँबीनमध्ये जहातील प्रत्येक बॉयलर रूमच्या एमर्जन्सी लॉक सीस्टीम्स व अँड्वान्स टर्बाईन कंट्रोल करण्याच्या आधूनीक सीस्टीम्स सेट करण्यात आल्या होत्या.
स्मीथनी फस्ट आणी सेकंड फ्लोर साठी ठरवून दिलेले दोन वेगवेगळे काचेचे बॉक्स ऊघडले. आणी त्यातील २०७ व ३२४ नंबर लिहीलेल्या दोन राखीव चाव्या बाहेर काढल्या.
मग थोड्या वेळाने ते कँबीनची आवराआवर करत खूर्चीवर रेलून बसले. त्यांनी टेबलावर सजवून ठेवलेल्या प्लेटमधील टोस्टचा तूकडा मोडला आणी बोलायला सूरूवात केली.

" मी आता काय सांगतोय ते तूम्ही दोघंही निट ऐका.
ऊद्या जहाजातील मूख्य फंक्शन हॉलमध्ये विल्यमने एक मोठी बर्थडे पार्टी ऑर्गानाईज केली आहे.

" काय, बर्थडे पार्टी ?
कोणाची ?"
ज्युलीनेही टोस्टचा तूकडा तोडांत चघलत स्मीथना विचारले.

" विल्यमचा ऊद्या बर्थडे आहे. त्यामूळे आजपासूनच वेब व विल्यमचे सर्व साथीदार आपआपली नेमून दिलेली कामं करण्याच्या तयारीला लागले आहेत.
खरंतर जहाजातील सर्वच प्रवासी ऊद्या पार्टी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये असतील..............माझ्या मते या जहाजातून सूखरूप निसटण्याची हीच एकमेव संधी तूमच्याजवळ असेल. "

" काय ?
आम्ही या जहाजातून बाहेर पडायंच. पण कंस काय कँप्टन ?
शक्य आहे का हे ?"
जँकने लागलीच मनातील शंका स्मीथसमोर ऊपस्थीत केली.

" हो, जर योग्य वेळी आणी योग्य पद्धतीने तूम्ही बाहेर पडलात तर नक्कीच शक्य आहे.
ऊद्या, माझी मूलगी एलीजाबेथ, तूमचे दोन्ही मीञ व या जहाजातील अनूभवी नावीक स्टीफनही तूमच्यासोबत असेल.
ईथून बाहेर जाण्यासाठी जहाजातील स्टर्नजवळ ( जहाजाचा मागील भाग ) एका राखीव बोटीमधून निसटण्याची व्यवस्था मी तूमच्यासाठी केली केली आहे.
हे बघ "
कँप्टननी कपाटाच्या ड्राव्हरमधून गूडांळून ठेवलेला एक मोठा नकाशा बाहेर काढला आणी टेबलावर पसरवला.

" या जहाजाचा प्रवास सी.एम.ए च्या क्रूझ ऑर्गानायझर डिपार्टमेटंने चिलेमधील वाल्दीवीया सी पोर्ट पासून ते ईग्लडंमधील साऊथहँम्पटन पर्यतं ठरवला होता.
पण विल्यमला हि बातमी कळताच संधी साधून त्याने माझ्या मूलीला कीडनँप केलं. आणी मला बँकमेल करण्याचा सपाटा लवला.
मी जर त्याला साऊथ शेटलँड बेटांपर्यतं सोडलं नाही तर तो माझ्या मूलीला ठार मारण्याची धमकी मला देतोय "

" पण कँप्टन एलीजाबेथला विल्यमने नक्की ठेवलंय तरी कूठे ?"
ज्युलीने पून्हा घाईघाईत बावळटासारखं टोस्टचा तूकडा चघलत स्मीथना विचारलं.

" तूमच्यासारखंच, वरती चैथ्या फ्लोरवर.....एका रूममध्ये त्यांनी माझ्या मूलीला कैद करून ठेवलंय "
स्मीथ यावेळी माञ रागानेच ऊतावीळ होऊन बोलत होते.

" पण विल्यमला तूमच्याकडून नक्की हवंय तरी काय ? कँप्टन "
जँकने स्मीथकडे पाहत पून्हां विषयाला दूजोरा देण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

" विल्यमच्या म्हणन्यनूसार मी त्याला व त्याच्या साथीदारानां आणी सोबत तूम्हा चैघांनाही दक्षीणेकडील शेटलँड बेटापर्यतं सोडावं. आणी मगच जहाज ऊत्तरेला ईग्लंडच्या दिशेने रवाना करावं.
कारण त्याच्या मते तो गूप्त खजाणा साऊथ शेटलँन्ड बेटांमध्येच कूठेकरी लपवण्यात आला आहे. पण आजतागायत कोणालाच त्या बेटाचा पत्ता लागला नाही.

" पण कँप्टन
विल्यम साऊथ शेटलँड बेटापर्यतं जाण्यासाठी दूसऱ्या जहाजावरून देखील जाऊ शकला असता ना. मग त्याने डिस्कवरीसारख्या मोठ्या जहाजाचीच निवड का केली ?"
जँकने स्मीथना अगदी योग्य प्रश्न विचारला होता.

" कारण विल्यमचे सी.एम.ए. ( क्रूझ मरीन ऑफ अर्जेनटीना ) शी घनीष्ट व्यापारी संबध आहेत. शीवाय दक्षीणेकडून सध्या डीस्कवरीशीवाय दूसरं कोणतंच जहाज प्रवास करत नाही. त्यामूळे त्याला डिस्कवरीवर येण्याशीवाय दूसरा कोणताच पर्यायच ऊरला नव्हता.
म्हणूनच मी परीस्थीतीचं गांभीर्य लक्षात घेऊन तूमच्यासाठी दक्षीण अमेरीकेचं शेवटचं टोक म्हणजेच केप हॉर्नच्या विशाल सागरात पोहोचल्यावर स्टीफनसोबत जहाजातून बाहेर पडण्याचा प्लान रचला.
जर तूम्ही ऊद्या राञीच या जहाजातून बाहेर गेला नाहीत. तर मग पूढील प्रवास तूमच्यासाठी खूपच धोक्याचा होईल. विल्यम तूम्हांलाही शेटलँन्ड बेटांपर्यतं खजाणा शोधण्यासाठी सोबत घेऊन जाईल.
जँक तूला कदाचीत कल्पना नसेल पण तो दक्षीणेकडील मार्ग खूपच धोक्याचा आहे. त्या समूद्रात सतत वेगवान वारे वाहत असतात.
नूकत्याच प्रक्षेतीत झालेल्या जागतीक हवामान नियञणं प्रणालीच्या अहवालानूसार अंटार्टीकावरील ऊच्च हवेच्या दाबामूळे तेथील बर्फ वेगाने वितळण्यास सूरूवात झाली आहे. त्या वाऱ्यामूळे जवजवळ संपूर्ण अंटार्टीक महासागरातील भूगर्भीय सरंचनेतच ऊलटा पालट होण्याची शक्यता आहे. जर असे घडले तर त्याचा फटका अंटार्टीकाच्या सर्वच बेटानां बसू शकतो. आणी त्यामूळेच मोठमोठ्या लाटांचा प्रवाह ज्याला आपण शास्ञीय भाषेत स्तूनामी म्हणतो त्या लाटा ऊत्तरेकडील भूखंडावर आदळण्याची शक्यताही वर्तवली गेली आहे.
म्हणूनच जगभरातील क्रूझ कंपन्याना सावध करण्यासाठी आंतराष्ट्रीय सी मरीन एजंसीनी धोक्याची सूचना देऊन त्या भागात जहाज नेण्यास प्रतीबंध घातले आहेत.

" हे तर खूपच भंयकर आहे कँप्टन. यामूळे जहाजातील प्रवाशांच्या जिवालाही धोका ऊत्पन्न होऊ शकतो "
जँकला आणखीन पूढे काय बोलावे काहीच सूचत नव्हते. तो नूसता कँप्टन स्मीथच बोलणं लक्षपूर्वक एकत होता.

" ईजींन कम्पार्टमेंटमधील काही शीपमन व डेट्युपी ईजींनीअर वगळता अजूनही जहाजातील प्रवाशांना या धोक्याद्धल आणी शेटलँडच्या गूप्त प्रवासाबद्धल कोणतीच कल्पना नाही. सर्वानीच ऑलरेडी ईग्लडंपर्यतच्या प्रवासाचं बूकीगं केलं आहे.
पण तूम्ही काही काळजी करू नका मी याबद्धल स्टीफनलाही सर्वच कल्पना दिली आहे. तो ऊद्या राञी ८ च्या सूमारास डेकवरील एका बोटीजवळ तूमची वाट पाहत ऊभा असेल. स्टीफन बोट चालवण्यात अगदी माहीर आहे. तो एका दिवसातच तूम्हांला अर्जेनटीनाच्या कीनाऱ्यावर सोडेल "
" तंस झालं तर खूपच बरं होईल. आम्हालाही आता लवकरात लवकर घरी पोहोचण्याची घाई झाली आहे. ज्युलीची आई तीची वाट पाहत असेल. आम्ही एलीजाबेथला घेऊन स्टीफनसोबत सूखरूप घरी पोहोचू.
पण कँप्टन जहाजातील ईतर प्रवाशांचं काय ? " जँक

" तीच तर अडचण आहे जँक. हवामानातील विलक्षण बदलामूळे जहाजातील सर्वच सी.एम.ए. ( क्रूझ मरीन ऑफ अर्जेनटीना ) शी कनेक्ट असलेल्या रेडीओ कनेक्शनचे सीग्नल्स अर्जेनटीनार्यतं पोहोचू शकत नाही आहेत "

" पण तरीही आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहीजे कँप्टन. आता शांत बसून चालणार नाही "
जँकला एव्हांना परीस्थीतीचे गांभीर्य लक्षात आले होते.

" म्हणूनच तर मी स्टीफनला व हँमडंला तूमच्यासोबत पाठवतोय,
तूमच्या अर्जेनटीनातील बोटीमधल्या प्रवासात हँमडं रेडीओ रीसीव्हरने सीग्नल ट्रँक करून सी.एम.ए. शी संपर्क साधेल व त्वरीत डिस्कवरच्या प्रवासातील धोक्याबाबत त्यांना कल्पना देईल. आणी जर समजा हवामानात कमालीचा बदल झालाच तर तो सी.एम.ए. कडून जहाजातील प्रवाशांसाठी मदतीची व्यवस्थाही करेल.
बोलता बोलता आपल्याला खूपच ऊशीर झाला नाही का ?
आता तूम्ही लवकरात लवकर रॉनशी व रॉकीशी भेट घेऊन त्यांना आपल्या ऊद्याच्या योजनेबद्धल थोडक्यात कल्पना द्या "

" ठीक आहे कँप्टन तूम्ही एलीजाबेथलाही ऊद्याच्या प्लानबद्धल कळवा.
बंर आम्ही आता निघतो नाहीतर खूपच ऊशीर होईल "
मग फार वेळ न घालवतान स्मीथनी दिलेल्या चाव्या घेत ते दोघंही कँबीनबाहेर पडले. त्यांना आता थेट रॉनला व रॉकीला भेटून लवकरात लवकर त्यांच्या रूममध्ये परतावं लागणार होतं.
कॉरीडॉरमधून सावधपणे पूढे जात ते दोघंही तीसऱ्या मजल्यावर रॉनच्या व रॉकीच्या रूमपर्यतं पोहोचले.
त्यांच्या रूमचा दरवाजा बाहेरूनच लॉक करण्यात आला होता. मग जँकने कँप्टनकडून घेतलेल्या 324 नंबर असलेल्या चावीने तो दरवाजा ऊघडला. व ते दोघंही आत शीरले.
रूममध्ये समोरच बेडवर रॉकी निपचीत पडून होता. तर रॉनची नजर जँकने बाहेरून ऊघडलेल्या मूख्य दरवाजावर खिळली होती.
जँकला पाहून त्याच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ते समाधान पसरले होते. आपल्या जवळची व्यक्ती खूप दिवसांनी भेटल्यावर जसा आनंद होतो अगदी तसाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर लखलखत होता.
अपेक्षा नसताना अचानक त्या दोघांना पाहून रॉकीही बेडवर ऊठून बसला. त्याचा चेहरा ओढला गेला होता. त्वचा शूश्क पडली होती. डोळ्यांभोवती काळी वर्तूळे गोळा झाली होती. तरीही तो हसत त्या दोघांच स्वागत करण्यासाठी तप्तर होता. अखेर खूप दिवसांपासून तो वेबच्या कचाट्यातून मूक्त झाला होता. जँकला व ज्युलीला पाहताच त्याला थोडं बंर वाटलं.

" अरे पण तूम्ही दोघं अचानक ईथे कसे काय ?
आणी आमच्या रूमची चावी तूम्हांला कोणी दिली "
रॉनने जँकच्या हातातील चाव्यांकडे बघत त्याला विचारलं.

" या जहाजाच्या कँप्टनने, कँप्टन स्मीथनी "

" काय ?
पण तू त्यांना कसा काय ओळखतोस "

" आम्ही दोघंही आमच्या रूममधून जेव्हां बाहेर पडलो तेव्हां कॉरीडॉरमध्ये कीचनच्या सर्वीस लिफ्टजवळ कँप्टन स्मीथशी आमची भेट झाली.
आता या जहाजातून बाहेर पडण्यासाठी देखील स्मीथच आपली मदत करणार आहेत "

" पण ते का आपली मदत करतील ?"

" कारण त्यांच्या मूलीला देखील विल्यमनेच या जहाजातील एका रूममध्ये कैद करून ठेवलंय "

" आता हा विल्यम कोण ?"

" विल्यम हिलरी, त्यानेच तर हा खजाणा मिळवण्यासाठी आपल्याला या जहाजात आणलंय "

" जँक तू काय बोलतोयेस मला काहीच कळत नाही रे !
जरा नीट सांगशील का ? काय झालंय ते "

" अरे हा विल्यम खूप मोठा स्मग्लर आहे रे. तूला आठवतंय गूहेत असताना आपल्याला अमली पदार्थाचां साठा दिसला होता "

" हो मग "

" तोही या विल्यमच्याच बिजनेसचा एक भाग होता. न जाणो त्यांने अजून कसले कसले ऊद्योग सूरू केले असतील.
पण यावेळी तो कोणतातरी गूप्त खजाणा मिळवायच्या मार्गावर आहे. त्याने तो खजाणा शोधण्यासाठीच आपल्याला या जहाजावर आणलंय.

मला कँप्टन स्मीथनी सांगीतलं की माझ्याजवळ असा कोणतातरी महत्वाचा पूरावा आहे ज्यामूळे विल्यम आपल्याला या जहाजावर घेऊन आलाय. म्हणूनच तो आणखीन काही करायच्या अगोदरच आपल्याला त्याच्या तावडीतून सूखरूप निसटावं लागेल "

" तू काय बोलतोयेस ते मला अजूनही निट समजलेलं नाही "
जँकचं घाईघाईत बोलणं ऐकून रॉन अगदी गोधळंला होता.

" ते जाऊदे आता मी काय सांगतो ते तूम्ही दोघंही निट ऐका. आमच्याकडे वेळ फार कमी आहे.
आपल्याला ऊद्याच राञी या जहाजातून बाहेर पडावं लागेल "

" पण कंस काय जँक ?
वेब व त्याची माणसं प्रत्येकवेळी आपल्यावर नजर ठेऊन असतात. मी ही ईथून निसटण्याचे खूप प्रयत्न केले पण अजूनपर्यतं या रूमच्या बाहेरदेखील आम्ही पडू शकलो नाही. "

" रॉन माझ्यावर विश्वास ठेव यावेळी माञ नक्कीच आपण या जहाजातून बाहेर पडू
ऊद्या विल्यमचा बर्थडे आहे. त्यामूळे आपल्याला जहाजातून बाहेर निसटण्याची हीच एक ऊत्तम संधी असेल.
कँप्टन स्मीथच्या म्हणन्यानूसार राञी ८ वाजता आपण चैघांनी एलीजाबेथला घेऊन जहाजाच्या डेकवर पोहोचायचं आहे. तीथे स्टर्नजवळ स्टीफन आपली वाट पाहत ऊभा असेल मग तो आपल्याला त्याच्या बोटीने अर्जेनटीनाच्या कीनाऱ्यापर्यतं सोडेल "

" बंर चल आम्ही आता नीघतो ऊद्या बरोबर ७:३० ला तूम्ही दोघंही आम्हांला डेकवर भेटा.
ही घे तूमच्या रूमची चावी "
रॉनकडे ३२४ नंबर असलेली चावी देत त्याला बोलण्याची आणखीन संधी न देता ते दोघंही त्याच्या रूममधून बाहेर पडले.
खरंतर रॉन व रॉकी सूरक्षीत आहेत यातच जँकचं समाधान होतं.
मग थोड्यावेळाने ते दोघंही दूसऱ्या मजल्यावर जाऊन त्याच्या रूममध्ये सूरक्षीत पोहोचले.
न राहवून कँप्टनने सांगीतलेल्या जहाजातील प्रवाशांच्या धोक्याबद्दलचा विचार जँकला सतावत होता.
तो नकळतच या सर्व प्रकरणात गूंतत चालला होता. असा कोणता महत्वाचा पूरावा त्याला माहीत होता ज्यासाठी विल्यमने त्याला या जहाजातील प्रवासात आणले होते.
ज्या पूराव्याअभावी ते खजाण्यापर्यतं पोहोचू शकत होते.
त्याला काहीच आठवत नव्हतं.
जँकचे वडीळ गेले तेव्हां तो फक्त आठ वर्षाचा होता. त्याची आई खूप रडत होती पण ती का रडतेय हेही त्याच्या बाळमनाला त्यावेळी कळलं नव्हत.

" हे बघ जँक तूझ्याशीवाय हिलरी तो खजाणा मिळवू शकणार नाही. आणी जर त्याला कळलं की तूलाही तो महत्वाचा पूरावा आठवत नाही तर तो तूझा जीव घेण्यासही मागे पूढे पाहणार नाही "
एखाद्या हूशार मूलीसारखं ज्युलीने जँकला समजावलं.
तो पून्हा मनावर ताण देऊन भूतकळात शीरला.
खूप जूना चिञपट पाहावा तसा भूतकाळातील एक एक क्षण त्याच्या डोळ्यांसमोरून पूढे सरकत होता. पण तरीही त्यात महत्वाचं असं त्याला काहीच आठवेना.
तेवढ्यात अचानकच त्यांच्या रूमचा दरवाजा बाहेरून ठोठावण्यात आला.

" आपण बाहेर गेलो होतो ते वेबला कळलं तर नाही ना "
दरवाजा ठोठावण्याचा आवाज ऐकून ज्युली हळू आवाजातच पूटपूटली.

" बघूया तर आगोदर ते दरवाजा कशासाठी ठोठावतायेत "
ते दोघंही थोडावेळ शांतच राहीले.
मग दरवाजाच्या खालच्या भागात असलेल्या मीनी डोअरमधून दोन जेवणाची ताटं आत सारण्यात आली. आणी थोड्यावेळानं दरवाजा ठोठावणंही आपोआप बंद झालं.
दूपारच्या अपूऱ्या जेवणानंतर त्यांनी संध्याकाळपर्यतं काहीच खाल्ल नव्हतं.
त्यांना खरंतर खूप भूकही लागली होती. मग फार वेळ न घालवता त्यांनी खीडकीजवळ बसून चंद्राच्या मंद प्रकाशात जेवण केलं.
जेवण झाल्यवर जँकने घडलेल्या सर्वच घटना पून्हां आठवण्याचा प्रयत्न केला.
त्याला रॉकीच्या आईकडून समजलेली रॉकी हरवल्याची बातमी, काळ्या जाकेटवाल्या ईसमाने त्याच्यावर केलेला अनपेक्षीत हल्ला, त्या तीघाही मिञांची डोगंरावर फिरायला जाण्याची योजणा, डोगरांवरून ऊतरताना त्यांची वेबसोबत झालेली भेट, झाडामागून अचानक नाहीसा झालेला वेब, राञीच्या अंधारात त्यांना पकडण्यासाठी सोबत माणसं घेऊन वेबने केलेला पाठलाग, अचानक पायाखालची जमीन सरकल्यामूळे त्यांना समजलेलं गूहेचं रहस्य, विल्यमच्या अमली पदार्थाचां लागलेला शोध, त्याच गूहेत रॉकीचं सापडणं, आणी शेवटी त्या सर्वाचीच जहाजावर झालेली रवाणगी.
कोणत्याच घटनेची योग्य लीकं मिळत नव्हती. त्या घडलेल्या सर्वच घटना म्हणजे निव्वळ एक योगायोग होता.
विचारांच्या गर्दीत त्याचे डोळे अकस्मीतरीत्या झाकले जात होते. शेवटी तो नकळतच झोपेच्या आहारी गेला.
जँकच्या आयूष्यात आणखीन पूढे काय काय घडणार होतं हे येणारा काळच ठरवणार होतां.

क्रमशः
पूढील भाग लवकरच...............

प्रतिक्रिया

पालींची बदनामी थांबवा!!!!!!