मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने - भाग -३
प्रेम म्हणजे अनुभूती असते, असेच कधी तरी मी व माझा मित्र प्रेम या विषयावर चर्चा करत होतो. नवतारुण्याच्या उंबरठ्यावर आम्ही दोघे ही तेव्हा होतो त्यामुळे भावना महत्त्वाची की संबध महत्त्वाचे यावर चर्चा चालू होती, अचानक त्या चर्चे मध्ये आमचीच एक मैत्रीण सामील झाली. सर्व चर्चा ऐकल्यावर तीने फक्त आपल्या केबीन मधून एक डायरी घेऊन आली व खालील कविता समोर ठेवली, अमृता प्रीतम यांची.
मैं तैनू फ़िर मिलांगी
कित्थे ? किस तरह पता नई
शायद तेरे ताखियल दी चिंगारी बण के
तेरे केनवास ते उतरांगी
जा खोरे तेरे केनवास दे उत्ते
इक रह्स्म्यी लकीर बण के
खामोश तैनू तक्दी रवांगी
जा खोरे सूरज दी लौ बण के
तेरे रंगा विच घुलांगी
जा रंगा दिया बाहवां विच बैठ के
तेरे केनवास नु वलांगी
पता नही किस तरह कित्थे
पर तेनु जरुर मिलांगी
जा खोरे इक चश्मा बनी होवांगी
ते जिवें झर्नियाँ दा पानी उड्दा
मैं पानी दियां बूंदा
तेरे पिंडे ते मलांगी
ते इक ठंडक जेहि बण के
तेरी छाती दे नाल लगांगी
मैं होर कुच्छ नही जानदी
पर इणा जानदी हां
कि वक्त जो वी करेगा
एक जनम मेरे नाल तुरेगा
एह जिस्म मुक्दा है
ता सब कुछ मूक जांदा हैं
पर चेतना दे धागे
कायनती कण हुन्दे ने
मैं ओना कणा नु चुगांगी
ते तेनु फ़िर मिलांगी
(पंजाबी)
मैं तुझे फ़िर मिलूंगी
कहाँ किस तरह पता नही
शायद तेरी तख्यिल की चिंगारी बन
तेरे केनवास पर उतरुंगी
या तेरे केनवास पर
एक रहस्यमयी लकीर बन
खामोश तुझे देखती रहूंगी
या फ़िर सूरज कि लौ बन कर
तेरे रंगो में घुलती रहूंगी
या रंगो कि बाहों में बैठ कर
तेरे केनवास से लिपट जाउंगी
पता नहीं कहाँ किस तरह
पर तुझे जरुर मिलूंगी
या फ़िर एक चश्मा बनी
जैसे झरने से पानी उड़ता है
मैं पानी की बूंदें
तेरे बदन पर मलूंगी
और एक ठंडक सी बन कर
तेरे सीने से लगूंगी
मैं और कुछ नही जानती
पर इतना जानती हूँ
कि वक्त जो भी करेगा
यह जनम मेरे साथ चलेगा
यह जिस्म खतम होता है
तो सब कुछ खत्म हो जाता है
पर चेतना के धागे
कायनात के कण होते हैं
मैं उन कणों को चुनुंगी
मैं तुझे फ़िर मिलूंगी !!
कविता वाचली, जिवनात पहिल्यांदा अमृता प्रीतमच्या लेखनीची ओळखत त्या वेळी झाली. अद्भुत! मागे मी लिहले होते, प्रत्येक गोष्ट शब्दात व्यक्त करणे जवळ जवळ अशक्य असते, तसे काहीसे घडलं होते जेव्हा ही कविता सर्वात प्रथम वाचली होती तेव्हा. त्यानंतर अनेक पारायणे झाली या कवितेची, प्रत्येक वाचनानंतर खूप काही नवीन सापडतं जातं या कवितेत. व ज्यांना अमृता प्रीतम व त्यांचे जीवन या बद्दल थोडेफार जरी माहिती असेल तर या कवितेचे मर्म समजेल.
काही व्यक्ती जिवन स्वप्नवत जगतात, त्यातील एक म्हणजे अमृता प्रीतम. स्त्रीची व्यथा, दुखः त्यांनी सशक्तपणे आपल्या लेखनीद्वारे व्यक्त केल्या. "मैं तैनू फ़िर मिलांगी" ही फक्त कविता नाही आहे. आपल्या प्रेमीची वाट पाहत असलेल्या प्रियसीच्या अतंरगातील अवस्था आहे , अमृता जेव्हा खूप आजारी होत्या व त्यांना आपल्या अंताची कल्पना आली होती तेव्हा ही कविता त्यांनी इमरोज साठी लिहली होती. अमृतासाठी इमरोज काय होते हे त्यांच्या लेखनीतून वारंवार येत असे, पण ही कविता म्हणजे इमरोज वर त्यांचे असलेल्या उत्कंठप्रेमाची साक्ष आहे.
प्रेम, विरह, मिलन या तीन गोष्टीवर उभी असलेली ही कविता, पाहताना साधी वाटते एकदम सोपी शब्द रचना पण जेव्हा त्यातून अर्थ ध्वनीत होतो, जेव्हा त्या कवितेचा भावार्थ आपल्याला समजतो तेव्हा ही कविता आपल्या मनाच्या कुठल्यातरी नाजुक कोपर्याला हलकसे स्पर्श करुन जाते. प्रत्येक ओळ आणि ओळ आपल्या समोर कवियत्रीच्या मनातील भावना चित्रवत उभ्या करतात.
मैं तैनू फ़िर मिलांगी
कित्थे ? किस तरह पता नई
शायद तेरे ताखियल दी चिंगारी बण के
तेरे केनवास ते उतरांगी
जा खोरे तेरे केनवास दे उत्ते
इक रह्स्म्यी लकीर बण के
खामोश तैनू तक्दी रवांगी
मी तुला कशी, कुठे भेटेन माहिती नाही, शक्यतो तुझ्या कुठल्यातरी कलाकृतीतील अनुभुती म्हणून, एखादी मनातील तेजस्वी कल्पना म्हणून, एक कलाकृती म्हणून येईन व तुझ्या केनवास वर अवतरीत होईन. नाहीतर त्याच केनवासवर एक रेघ म्हणून असेल, तुला नकळत तुला पाहत राहीन. काय सहज सुंदर कल्पना आहे, आपल्याच प्रेमीच्या कलाकृतीमध्ये येण्याची आस, ती रचना. वाचताना आता सोपं वाटतं, पण थोडं विचार करून पाहिले की लक्ष्यात येईल ही विरह नक्की आहे, कवयत्रीला तो मान्य देखील आहे पण तीची इच्छा आहे परत येण्याची आपल्या आवडत्या व्यक्तीकडे. शक्य नसेल तर इतर माध्यमातून पण यायचे आहे, त्याच्यात हरवून जायचे आहे.
जा खोरे सूरज दी लौ बण के
तेरे रंगा विच घुलांगी
जा रंगा दिया बाहवां विच बैठ के
तेरे केनवास नु वलांगी
पता नही किस तरह कित्थे
पर तेनु जरुर मिलांगी
उच्च! वरील ओळी शब्दात कश्या व्यक्त कराव्यात, शब्द अपुरे पडत आहेत. कसं ही करून मला तुझ्या सोबतच रहायचे आहे, तुझ्यापासून मी दुर राहू शकत नाही ही भावना व अतुट प्रेमाची उच्चतम अवस्था अश्या प्रकारे सहज भाषेत व्यक्त करणे अमृताच जाने. तिला विश्वास आहे, ती नसली तरी प्रेमीच्या मनातून, त्याच्या अंतरंगातून ती कधीच जाणार नाही म्हणून तीला खात्री आहे, त्याच्या कलाकृती मधून, रंगाच्या छटामधून ती डोकावत राहिल, अनेक वेळा.
जा खोरे इक चश्मा बनी होवांगी
ते जिवें झर्नियाँ दा पानी उड्दा
मैं पानी दियां बूंदा
तेरे पिंडे ते मलांगी
ते इक ठंडक जेहि बण के
तेरी छाती दे नाल लगांगी
वाह क्या बात है, वेगाने उसळणार्या, मुक्त होऊ पाहत असलेल्या एका पाण्याचा झरा व्हावे, नाही तर एक ठेंब होऊन तुझ्यात विरून जावे. मिलन! या पेक्षा उत्कृष्ट मिलन दुसरे कुठले असू शकते ? रचनेचा भावार्थ जर पाहिला तर तुझी माझी भेट कशी व्हावी, तर ती अशी असावी की मी तुझ्यात व तु माझ्यात विरून जावे. जी व्यक्ती खरचं वाहत्या पाण्यासारखं जगली असेल, मनसोक्त, आपल्याला हवे तसे तीच एवढी सुंदर रचना उभी करू शकते, ज्यांनी त्यांचे आत्मचरित्र वाचले असेल त्यांना ते लगेच समजेल, आजच्या काळात लिव्ह-ईन-रिलेशन लोकांना पचनी पडत नाही तेथे अमृता प्रितम १९४०-४५ च्या आसपास लिव्ह-ईन-रिलेशन मध्ये राहत होत्या, इमरोज त्यांच्यापेक्षा वयांनी लहान होते. या वरून कल्पना येईल.
मैं होर कुच्छ नही जानदी
पर इणा जानदी हां
कि वक्त जो वी करेगा
एक जनम मेरे नाल तुरेगा
एह जिस्म मुक्दा है
ता सब कुछ मूक जांदा हैंपर चेतना दे धागे
कायनती कण हुन्दे ने
मैं ओना कणा नु चुगांगी
ते तेनु फ़िर मिलांगी
जीवन-मरण, शरीर-आत्मा काहीच नाही, काळाच्या ओघात सगळे नष्ट होईल, मला माहिती आहे. मला तुझ्या सोबत रहायचे आहे पण हळूहळू सगळे नश्वर होत चालले आहे, मी ही जाईन, अशी वेळी येईल की सर्व संपलेले असेल. अमृता प्रीतम नी ही कविता फक्त लिहलेली नाही आहे तर जगल्या आहेत. प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ त्यांच्या अंतर्मनातून उमटत जात आहे हे वाचणार्याला समजतं, म्हणून म्हणालो त्या कविता जगल्या आहेत. अनेकवेळा छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरत असतो, अचानक नाती तोडतो, एखाद्याचे भावविश्व आपण उद्घवस्त करतो नकळत त्यावेळी आपण जीवनाचे सत्य कुठेतरी विसरतो. त्या म्हणतात "कि वक्त जो भी करेगा" काळाला काय करायचे आहे ते करू दे, हा वेळ तर तो माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. शरीर जाणार आहे, मी जाणार आहे पण कुठे ना कुठेतरी मी तुझ्या सोबत असेन, तुझ्या मनात, तुझ्या हदयात. एक एक अणू-रेणू गोळा करेन, स्वतःला पुन्हा तुझ्या समोर घेऊन येईन, काही होवो तु व मी कधी ना कधी तरी एक नक्कीच होऊ, तेथे बंधन नसेल, तेथे नश्वर वस्तुची गरज नसेल फक्त तु व मी असू आपली भावना, प्रेम असेल. काही हो आपण पुन्हा एकत्र येऊ. प्रबभ इच्छा व उत्कठ प्रेम यांचा संगम म्हणजे ही कविता. आपल्या एक एक अक्षरातून आपल्या समोर उभी राहत जाणारी एक प्रेम कविता.
तुम्हारे इकरार को फूल की तरह नहीं पकड़ा था, अपनी मुट्ठी में भींच लिया था. वह कई बरस मेरी मुट्ठी में खिला रहा. पर मांस की हथेली मांस की होती है, यह मिटटी की तरह हमेशा जवान नहीं रहती. इस पर समय की सलवटें पड़ती हैं और जब यह बंजर होने लगती है तो इसमें उगा हर पत्ता मुरझा जाता है. तुम्हारे इकरार का फूल भी मुरझा गया............अमृता प्रीतम
अमृताप्रीतम एक लेखिका, कवयत्री म्हणून जेवढ्या भावतात त्यापेक्षा ही जास्त त्यांच्यात असलेली प्रेमिका मला भावते, वादळी व्यक्तीमहत्त्व होते यात शंका नाही, त्यांच्या चांगल्या गोष्टीपेक्षा जास्त चर्चा त्यांच्या साहिर लुधयानवी सोबत असलेल्या संबधाच्या, इमरोज वर करत असलेल्या जिवापाड प्रेमाच्या व त्यांच्या सिगरेट पिण्यापासून त्यांच्या व्यक्तीगत सवयींच्याच झाल्या. पण ज्यांना त्यांची लेखनी भावली ते अमृता प्रितमला कधीच विसरू शकणार नाहीत, अशी एखादीच अमृता प्रीतम शतकामध्ये जन्मते, तिच्या लेखनी ला, तीच्या भावविश्व जपण्याच्या प्रवृत्तीला, स्वप्न पाहण्याची व ती खरी करण्याची जिद्दीला माझा मनापासून सलाम! ज्यांना भेटतं जेव्हा सहज शक्य होतं तेव्हा भेटू शकलो नाही अश्या मोजक्याच व्यक्तीमध्ये अमृता प्रितम येतात याची हुरहुर मनाला कायम लागून राहील.
>>अमृता प्रीतम यांचे साहीत्य
>>अमृता प्रीतम यांचे साहीत्य वाचले पाही
काव्या पासून सुरवात करा, अत्यंत "बोल्ड" म्हणता येईल असे व्यक्तीमहत्व होते हे :)
सर्व वाचून झाल्यावर मग शेवटी त्यांचे रसीदी टिकिट नावाचे आत्मचरित्र वाचायला घ्या. स्वतःशी प्रामाणिक राहून लेखन करणार्या निवडक लेखकांमध्ये अमृता यांचे नाव येतं.
आवडली
कविता आवडली.
अमृता प्रीतम हे नाव लहानपणीसुद्धा ऐकलेले आहे (राष्ट्रीय पुरस्कारांमुळे), पण त्यांची रचना आज पहिल्यांदाच वाचतो आहे. धन्यवाद, राजे.
- - -
कविता वाचताना मनात आलेले अवांतर विचार :
(मला माझे एक थोडे आश्चर्य वाटते. कधीकधी मला या कवितेतल्यासारखी अचाट रूपके अतिशय प्रामाणिक वाटतात आणि भावतात. तर कधीकधी अन्य कवितांत अशी रूपके मला ती नाटकी, गतानुगतिक नक्कल वाटतात. रूपके खरोखरच गतानुगतिक (कन्व्हेन्शनल) असल्याचे थेट ठाऊक आहे, ती उदाहरणे म्हणजे माझ्या पौगंडावस्थेत लिहिलेल्या कविता. परंतु कित्येकदा नवशिक्या कवींनी लिहिलेल्या कवितांबाबतसुद्धा मला हेच वाटते. अशा बाबतीत अनुभव मोकळढाकळे-प्रामाणिक नाहीत, असे म्हणण्याकरिता मला अंतर्ज्ञान नाही. पण असे वाटते खरे.
.
माझ्या हा आस्वादानुभवाचे वैयक्तिक विश्लेषण करायचा प्रयत्न मी पुष्कळदा करतो. हा केवळ प्रसिद्ध नावाचा दबदबा आहे का? असा परखड प्रश्न मी स्वतःला केला आहे. माझ्या वतीने उत्तर "नाही, असा पक्षपात नाही" असे उत्तर आहे. (पण स्वतःला विचारलेल्या परखड प्रश्नांची प्रांजळ उत्तरे देणारे थोडेच असतात, हे मला ठाऊक आहे.) यात कवीच्या प्रतिभेचा आणि कवित्वाचा भाग आहेच, असे मला वाटते.
.
आध्यात्मिक कवितांच्या बाबतीत माझी ही गत पुष्कळदा होते. "तुझ्याशी एकरूप झालो, कैवल्य अनुभवले" वगैरे आशयाचे काव्य तुकारामाच्या अभंगांत वाचतो, तेव्हा प्रामाणिक भासते. अशा आशायाची आधुनिक भक्तिगीते पुष्कळ वाचायला मिळतात. पण त्यांत मला पुष्कळदा नुसती साचेबद्ध शब्दफेक जाणवते. हातच्या काव्याबाहेरून, म्हणजे इतिहासातून किंवा लोककथांतून माहिती असलेले तुकाराम-चरित्र मनात येते, म्हणून माझा पक्षपात होतो का? असे खरेच वाटत नाही. तुकाराम स्वतःचे खरेखुरे अनुभव अभंगात सांगण्यात भावनिक दृष्ट्या यशस्वी झाला आहे, असेच वाटते.
.
पुन्हा या कवितेबाबत बोलावे, तर अमृता प्रीतमने ही कविता कोणाला उद्देशून लिहिली आहे, हे मला ठाऊक नाही. तिने खरोखरच त्या "तू"वर आयुष्य असे रंगीबेरंगी उधळून टाकले की नाही, मला ठाऊक नाही. उलट आजवर माझा गैरसमज होता, की ती अगदी धीरगंभीर-वगैरे लेखिका आहे. पण तरी कविता वाचताना असे वाटते, की मी तिच्या मनातच शिरलेलो आहे. माझ्या मते तरी ही शक्ती या कृतीतली आहे, कवयित्रीच्या प्रसिद्धीसमोरचा माझा लाचारपणा नाही.
.
हा विचार, हे वैयक्तिक आस्वादविश्लेषण मला खूप वेळ पुरणार आहे. उत्तराबद्दल उतावीळ होण्यात काही हशील नाही.)
धनंजय, सर्वात प्रथम
धनंजय,
सर्वात प्रथम प्रतिसादासाठी धन्यवाद व तुमच्या अवांतर विचाराबद्दल देखील.
खरं तर ते विचार अवांतर नाहीत :) मुद्दाचे आहेत. अनेकदा प्रसिद्ध व जनमानसात लोकप्रिय असलेल्या लेखकाचे लेखन आपल्याला खरचं आवडलं का हे ठरवणं अवघड जातं, मग आपले मित्र, कोणीतरी समिक्षक, कुठला तरी लेख आपल्याला ते लेखन आवडलं हे मान्य करायला भरीस पाडतात व नंतर नंतर कळत जाते की नाही आपल्याला नाही आवडलं! आधी आवडणं हे त्या लेखकाच्या नावाच्या प्रसिद्धीमुळे होतं हे आपल्याला कळू लागते. खूप किचकट आहे समजावून सांगणे व समजुन घेणं देखील पण आपण एकाच दिशेचे प्रवासी आहोत.
पुढील भाग हा एका अत्यंत अप्रसिद्ध व्यक्तीच्या काव्यावर आहे त्यात शक्यतो मी वरील विचारांवर उत्तर देऊ शकेन असे वाटतं आहे :)
कृपया हा लेख या विभागातून
कृपया हा लेख या विभागातून ललितमध्ये घ्या. चूकून चूकीचा विभाग निवडला गेला आहे :(