कुच‌क‌ट पुणेरी फ्रेंच‌ आजी आणि ख‌डूस‌ देशी आजोबा!

टीप: आजी आजोबांना तुम्ही तुमच्या स्वतःच्या कल्पित वयोमाना नुसार काका-काकू सुद्धा म्हणू शकता :)चित्रपट तसा जरासाच‌ जुना आहे, बहुतेक २-३ व‌र्ष‌.

एक छोटा मुलगा अस‌तो, 'ह‌स‌न‌'. मुंबईच्या मच्छीबाजारात केसाळ मत्स्य-प्राणी (sea urchins) निवडतांना त्यांचा वास (केसाळ मत्स्य प्राण्यांना 'सुवास' येईलसं वाटत नाही) घेऊन पाहणे जरूर आहे, हे त्याला माहिती असतं, त्यामुळे मासेविक्या सगळे केसाळ मत्स्य-प्राणी त्याला विकून टाकतो. अनेक वर्ष हा मुलगा आईच्या हाताखाली "जेवणाचा आत्मा महत्वाचा!" "स्वाद‌ म्हणजे आठवण" "स्वयंपाक करतांना मन भूत होतं!" वगैरे वाक्य‌ ऐक‌त‌, स्पिरिच्युअल‌ स्वयंपाकात‌ तरबेज होतो. हे लोक मुंबईत फ्यामिली रेस्टोरंट चालवत असतात म्हणजे फ्यामिलीने जाण्याचं रेस्टोरंट नसेल कदाचित, (ढाबा-स‌दृश‌) पण फ्यामिलीने चालवलेलं रेस्टोरंट असतं!

मुलाचं नाव हसन असल्यामुळे जातीय-दंगली मध्ये त्यांचं घर, आणि आई, दोन्ही आगीत स्वाहा होतात. इथवर कथानक जेमतेमच पकड घेत असलं तरी नंतर आई नसलेली ही फ्यामिली पडत,झगडत, आधी इंग्लंड, व तिथून पुढे फ्रांस मध्ये येऊन धडकते, आणि कुचकट पुणेरी फ्रेंच आजी आणि खडूस देशी आजोबांच्या निर्विवाद अभिनयकौशल्यामुळे साधी साधी वळणंही खुसखुशीत होतात. ओम पुरी आजोबांच्या भूमिकेत, टीपिकल घासाघीस वगैरे करून हेलन मिरेन ह्या कुचकट फ्रेंच आजीच्या बरोबर १०० फुटावर आपलं रंगीबेरंगी इंडियन तंदूरी हॉटेल काढतात!

तिकडे मिरेन आजी स्वतःच मिशेलिन स्टार (Michelin Star) मिळवलेली उत्तम शेफ असते, त्यामुळे आधी ती तंदुरी कडे लक्ष देत नाही, पण आजोबांचा मुलगा हसनच्या हातात अन्नपूर्णा असते, त्यामुळे त्यांचं हॉटेल हळू हळू जम बसवू लागतं... म‌ग‌ मात्र‌ तिला ही स्पर्धेची खुमखुमी चढते! उभा दावा मांडून दोन्ही पक्ष छोट्या छोट्या गोष्टी उकरून एकमेकांवर कुरघोडी करू बघतात, पण हसनला मात्र आजीच्या हाताखालची sous chef मैत्रीण मिळते, आणि त्या दोघांची वैर मिटवण्याची धडपड आजी-आजोबांच्या विरुद्ध दिशेने चालू असते.

भारतीय, आणि फ्रेंच, ह्या दोन्ही खाद्य-संस्कृती अतिशय प्राचीन आणि त्यामुळेच, सहजी बदल स्वीकारणाऱ्या नसतात. त्यामुळे, "तुम‌चे मिळ‌मिळीत‌ प्र‌कार तुम्हालाच‌ असू देत‌!" "इथे र‌हाय‌च‌ं असेल, त‌र मिर‌ची, आणि गाण्यांचे ढ‌ण‌ढ‌ण आवाज, दोन्ही ज‌रा खाली उत‌र‌वा!" अस‌ल्या शाल‌जोडीत‌ल्या स‌ंवादांमुळे म‌जा येते.

हसनचं काम करणाऱ्या अभिनेत्याच्या चेहऱ्यावर निरागस गोडवा आहे, त्याने पात्राची ओळख बरोबर पकडली आहे. हसन हर प्रकारे प्रयत्न करून फ्रेंच आजीचा शिष्य होतो... दोन्ही खाद्य-संस्कृतींच्या संगमातून उत्तमोत्तम पदार्थ बनवू लागतो... पण गोष्ट तिथे संपत नाही. हसनचा त्या पुढचा प्रवास कसा असेल, आणि आजी-आजोबांचे नाते कसे उलगडेल, हे प्रश्न शेवट पर्यंत आपल्याला गुंगवून ठेवतात.

एकूण फ्रेंच-कंट्रीसाईड ची सुंदर पार्शवभूमी, हृदयस्पर्शी क्षणातुन उलगडणारी अतिशय सहज कथा मला खूप आवडली. लहान मुलांबरोबर बघू शकण्यासारखा स्वच्छ चित्रपट आहे. हसनचं कुटुंब इंग्लंड सोडून फ्रांसला कशाला येतं? कारण सुपरमार्केटातल्या भाज्या पाण्यासारख्या बेचव असतात. तेच फ्रांसच्या एका खेड्यातले टोमॅटो, ऑलिव्ह, घरी बनवलेला ब्रेड, आणि प्रेमळ अगत्य, हे त्यांना भावतं.

आजकाल असा अभिनय, अशा भाज्या, नि असं अगत्य सुद्धा, चित्रपटात बघूनच 'भूक' भागवावी लागते, म्हणून कदाचित... 'The Hundred Foot Journey' चा स्वाद‌ दीर्घ‌काळ‌ मनात रेंगाळेल‌!

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सिनेमा कुठे मिळाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कुठे मिळेल्?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फुल‌मनाम‌ ... म‌स्त अस‌तात तुम‌चे लेख्. न‌वी न‌वी माहीती देतात्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रेलर पाहून उत्सुकता होती म्हणून नेटफ्लिक्सवर यायची वाट पाहिली, पण तिथेही डायरेक्ट ॲानलाईन नव्हता... परवा स्थानिक वाचनालयात दिसला, तर लगेच झडप घातली Smile
गूगल शोधात टाॅरंट वगैरै मला करता येत नाही, पण आमचे बहुतेक खूप मैत्र धडाधड वापरत असतात.

अमेरिकेतील सार्वजनिक वाचनालयांच्या मी अक्षरश: प्रेमात आहे. त्याबद्दल पण लिहायचं आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचनालयांबद्दल अगदी सहमत. लिहीच त्याबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान!
काही अनघड सिनेमे पाहिलेत पुर्वी. पण त्यांची नावं आणि स्टोरी आठवत नाही. बहुतेक स्लो चित्रिकरणवाले सिनेमे चांगले असतात का?
( एक मित्र सुचवायचा मग मी पाहायचो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम‌च्या ग्र‌ंथाल‌यात आहे ही डी व्ही डी. मी घेइन्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0