एssss.... ऋषी पकूsssssर

"ऋषी कपूर" माझा आवडता;तसाच मेघनाचाही लाडका. त्याच्याबद्दल आमच्या ज्या गप्पा झाल्या; त्या इथे नोंदवून ठेवतोय.--
मनोबा :
अमर अकबर अ‍ॅन्थोनी हिट्ट झाला.अमर अकबर अ‍ॅन्थोनीनं कमर्शिअल सिनेमात एक बेंचमार्क बनवून ठेवलाय.
त्यातली गाणीही हिट्ट झाली.अमिताभच्या त्या धमाल शैलीची सगळीकडे तारिफ झाली.पण...
अमिताभनं जसा आपल्या भूमिकेला न्याय दिला, तसाच न्याय ऋषी कपूरनं आपल्या भूमिकेलाही दिल्याची तारिफ मात्र म्हणावी तेवढी ऐकू यीत नाही.मला अमिताभचा "अ‍ॅन्थोनी" आवडतो; तसाच किंवा त्याहून अधिक "अकबर इला़हबादी" आवडतो.
अमिताभच्या बॅचमधले मला आवडणारे हिरो म्हणजे स्वतः अमिताभ (जंजीर, अभिमान्,शोले,डॉन वगैरे पर्य्म्तच्या काळातला), धर्मेंद्र (ह्याला त्याच्या क्षमतेइतक्या भूमिका पुरेशा मिळाल्या नाहित असं मला वाटतं. नैतर विनोदी, अ‍ॅक्शन्, पोक्त- गंभीर,सालस्-सज्जन आणि अगदि रोमँटिकही अशा सर्वच भूमिकांत हा फिट्ट असे.) आणि ऋषीकपूर.
ऋषीकपूरचं व्यक्तिमत्व प्रसन्न वाटतं. त्याच्या वावरात सहजता आहे.तो हसतो तेव्हा अगदि सहज, आनंदानं हसतोय असं वाटतं.
त्यचे डोळे, चेहरा, विलक्षण बोलका आहे. तो रडतो तेव्हा त्याचं दु:ख बघणार्‍याला स्पष्ट जाणवतं.त्याच्या व्यक्तिमत्वात एक गोडवा आहे. गोडव्यात सहजता आहे. मुद्दाम गोग्गोड दिसण्यासाठी केलेले प्रयत्न नाहित.जरा विचित्र वाटेल; पण मला त्याच्यात आणि पु लं मध्ये एक साम्य जाणवतं.एक प्रकारचा गोडवा,सहजता, लहान मुलाकडे असतो तसा उत्साह.पु लं नी थोडीफार गाणी गायलीत. ती मला आवडतात. "इंद्रायणी काठी " हे पु लं नी गायलय. भीमसेन जोशींनीही गायलय.मला भीमसेनांचं घनगंभीर, पहाडी आवाजातलं गाणं आवडत असलं तरी चित्रपटात पु लं नी गायलेलं सुद्धा विसरता येत नाही.त्यात एक मार्दव आहे. आपलेपणा आहे. एक छानसं ...ऊबदार वाटणारं काहीतरी आहे.आनि हो काहीएक मिश्किल उत्स्फूर्तपणाही आहे.
तर पु लं च्या गायनात किंवा एकूणातच व्यक्तिमत्वात मला जे आवडतं ना, तेच बहुतांशानं ऋषी कपूरमधलंही आवडतं.
सहजता, गोडवा,मार्दव.आणि मार्दव वगैरे असलं तरी त्यात स्त्रैण्,बायकी असं काही नाही.तो पुरुषी गोडवाच.ह्या लोकांचा वावर नुसता पाहत रहावासा वाटतो, बोलणं ऐकावसं वाटतं लक्ष देउन.ताजं शहाळ्याचं पाणी पिताना तहान भागल्याची जाणीव, तृप्ती असते ना,
शहाळ्याचं ताजं पाणी पिताना ते पहिल्या घोटासोबत जे अल्लाद अल्लाद गोडसर काहीतरी वाटतं ना,अगदि तसच मला ह्यांच्याबद्दल वाटतं.
गोग्गोड प्रसन्न्,उत्साही छकुले.माझी मुलं त्यांच्या लहानपणी अशी असली तर मला खूप आवडतील.
मेघना :
ऋषी कपूर बिच्चारा वाटतो मला.
एकतर याचा बाप राज कपूर. त्यानं पोरासाठी मारे पदरचे पैसेबिसे घालून पिक्चर वगैरे काढला. त्यामुळे ऋषी कपूरमधे अभिनयासारखा काही गुण असेल असं लोक मुळातच मानत नाहीत. 'स्टारपुत्रांचे कसले आलेत गुण? आले बापाच्या जिवावर थोबाडाला रंग लावून नाचायला..' ही जनरल प्रतिक्रिया. बरं, कधी दुर्लक्ष न करता येण्यासारखं काम केलंच, तर 'त्यात काय कौतुक? रक्तातच आहे ते...' हे वर. बरं, हा पठ्ठ्या दिसायला गुलजार. पातळ ओठ, कुरळी झुलपं, जीवघेणं हसू, धारदार नजर, गुलछबू इमेज... कारकून, मजूर, खाणकामगार, हमाल, मास्तरडा.. या सगळ्या भूमिका त्याच्यासाठी बाद. हाणामार्‍या - बाद. (एका सिनेमात ऋषी कपून पुनीत इस्सरला जोरात ठोसा मारतो आणि पुनीत इस्सर कोलमडून पडतो असा एक सीन होता. त्यावर मी पंधरा मिनिटं हसत बसले होते. बहुतेक 'खोज' नावाचा सिनेमा. सिनेमा आहे, मान्य आहे. पण ऋषी कपूरनं पुनीत इस्सरला मारायचं? बेशर्मीकी भी कोई हद होती है!) बहुतेकदा वाट्याला येणार ते हिरॉईनच्या मागे लागणं आणि नाचगाणी.

पण या माणसानं इतक्या मर्यादांतूनही काय कामं केल्येत राव!

'दामिनी'मधल्या मीनाक्षीला आणि सनी देओलला राष्ट्रीय पुरस्कार वगैरे मिळाला. त्यांचं ठीक आहे. त्यांच्या भूमिका आणि संवाद इतके खटकेबाज आणि भावखाऊ होते, की आंधळ्याचंही लक्ष त्यांनी वेधून घेतलं असतं. पण ऋषी कपूर? तो त्या सिनेमातला सर्वाधिक उपेक्षित कलाकार आहे. काय त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलतात... अगदी सुरुवातीला तो श्रीमंत आहे, यशस्वी आहे. त्याच्या देहबोलीत आत्मविश्वास ठासून भरलेला आहे. दामिनीकडे बघणारी त्याची नजरही कशी बक्षीस जिंकून आणणार्‍या प्रेमिकाची नजर आहे. पण त्यातला आत्मविश्वास बघता बघता हरवत जातो. असहाय, हताश, दुभंग होत गेलेला तो माणूस, त्याची अगतिकता. आणि मग त्याच्या संतापाला आणि निर्धाराला सावकाश चढत गेलेली धार...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हा राव! रुशिकपूरचा (साधारणपणे उच्चार असाच करतात, जसे 'अमिताबच्चन') अशा अँगलमधून कधी विचारच केला नव्हता. तुम्ही म्हणता त्यात प्वाईंट ए. मध्यंतरी 'कपूर अँड सन्स' पाहिला त्यातही रुशिकपूरचं काम आवडलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>एकतर याचा बाप राज कपूर. त्यानं पोरासाठी मारे पदरचे पैसेबिसे घालून पिक्चर वगैरे काढला.

ऋषीकपूरने सांगितल्याप्रमाणे राजकपूरने बॉबी हा ऋषीकपूरला लॉंच करायला काढला नव्हता. तेव्हाच्या कोणत्याही हिरोला द्यायला पैसे नव्हते म्हणून घरातला फ़ुकटचा हिरो घेतला. गायक म्हणून नवोदित शैलेन्द्रसिंग.
तरीही त्या बोदल्याला न घेता ऋषीकपूरला घेतला हे ऋषीकपूरचं क्रेडिट.

ऋषीकपूरसाठी राजकपूरला पिक्चर काढावा लागला नाही. बोदल्याच्या करिअरसाठी त्याने धरम करम आणि बीबी ओ बीबी हे पिक्चर काढले

मनातला छोटा-मोठा प्रश्न- मेघना भुस्कुटे कुठे आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"मेरा नाम जोकर" मधील अजुनही पपी फॅट असलेल्या ऋषीकपूरचे, ग्लॅमरस सिम्मीबद्दलचे:स्वतःच्या शिक्षिकेबद्दलचे अर्धवट वयातील आकर्षण - काय इनसाईटफुल डायरेक्शन आहे राज कपूरचे.
मेरा नाम जोकर मधील विदूषकाच्या जीवनात आलेले प्रीतीचे विविध रंग परत परत पहावेसे वाटतात. तर ऋषीकपूरबद्दल बोलायचे झाले तर त्याची भूमिका आवडली होती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो चित्रपटच अफाट आहे. मुळात तो कथानक म्हणून उत्तमच, शिवाय त्याचं सादरीकरण भारी आहे. दिग्दर्शन, वगैरेही अफलातून आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरुण ऋषी कपूरचे सिनेमे मी फार बघितले नाहीत. ठीक आहे तो, एवढंच. पण अलीकडे आलेल्या सिनेमांतला 'शुद्ध देसी रोमान्स' हा सिनेमा आवडला; त्यात अर्थातच परिणीती चोप्रा आणि सुशांत सिंग राजपूत या हिरॉइन-हिरोंना दमदार रोल्स आहेत; पण ऋषी कपूरलाही चांगला रोल आहे. त्यातही त्याचा तरुण पोरांची काळजी करणारा, गोड म्हातारा भाव खाण्यासारखा आहे. तीच गोष्ट ऋषी कपूर आणि नीतू सिंग, दोघांचीही 'बेशरम' या सिनेमात; हा सिनेमा यथातथाच आहे, पण हे दोघं लक्षणीय.

राज कपूरचा प्रभाव ओसरून, ऋषी कपूरचा गोग्गोडपणा उतरून तो चांगला जाडगेला, एका पोराचा बाप झाल्यावर त्याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देणं सोपं झालं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कधी सिरीयसली धेउ शकलो नाही कपुरांचा आणखीन एक बटाटेवडा स्वेटर छान छान घालतो इतपतच मत होत शिवाय उदास वाटल तर त्याचा दीवानातला भीषण विनोदी डान्स बघितला तर फार हसुन तरतरी यायची सॅारी पंख्यांनो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला सुद्धा ऋषिकपूर फारसा आवडला नाही. निपो त्याला उत्साही, खळाळणारं तारुण्य म्हणत असंत. पण मला कधी तसं वाटलं नाही. गाणी चांगली मिळाली त्याला. पण त्याने छाप सोडली नाही कुठल्याही चित्रपटात. "मेरी उमर के नौजवानो" गाणं बरं आहे.

( मनोबा, हा असा अचानक धागा काढलास म्हणून प्रथम हे चेक केलं की ऋषि कपूर परलोकवासी झाला की काय ? )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋषि कपूर पेक्षा त्याची बायको आवडते. ( कारण तुला माहीती आहेच. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>ऋषि कपूर पेक्षा त्याची बायको आवडते.

You are in QUEUE.
.
.
.
आप कतार में हैं
.
.
.
आपण रांगेत आहात; कृपया प्रतीक्षा करा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मौशुमी चॅटर्जीही मग आवडत असणार तुम्हाला दोघांना Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मौशुमी चॅटर्जीही मग आवडत असणार तुम्हाला दोघांना

स्त्रीवाद म्हणजे काय हे पुरुषांनी स्त्रियांना शिकवू नये असं म्हणतात..... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा हा हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मौशुमी चॅटर्जीही मग आवडत असणार तुम्हाला दोघांना

अजिबात नाही.

ज्या कारणासाठी नीतू सिंग आवडते ते मौशुमी कडं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह ओके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या कारणासाठी नीतू सिंग आवडते ते मौशुमी कडं नाही.

त्या 'कारणाचे' कारनामे मागे, 'डेबोनेर' मधे प्रसिद्ध झाले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिरशिंगराव, त्या एप्रिल १९७६ च्या अंकाच्या मुखपृष्ठावरील चित्रात फारसा दम नाही. बियर पिल्यासारखं वाटतं. आम्हाला जरा जास्त स्ट्राँग म्हंजे टेकीला वगैरे लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बादवे डेबोनेरची नक्की ष्टुरी काय आहे? पूर्वी भरल्या वांग्याची झणझणीत भाजी असायची. 2000च्या दशकात कधीतरी त्यातला मसाला वगळून नुसतीच उकडलेली वांगी वाढणं सुरू झालं. हे पाप कुणी आणि का केलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

काहींच्या मते त्यांना सगळं ट्रॅफिक त्यांच्या इलेक्ट्रॉनिक व्हर्जन कडे वळवायचं होतं कारण प्रिंट व्हर्जन मधून प्रॉफिट कमी होतो म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"प्रेमरोग" - एक सुंदर चित्रपट आहे. फक्त शेवटचे ते आगीत जाळणे वगैरे नाट्यमयता सोडता. त्यात पद्मिनी कोल्हापूरकर व ऋषी कपूर दोघांची कामे मस्त आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबासारखा "सहज गप्पाटप्पा" स्टाइलमधला एक लेख लिहीता आला तर धन्य होइन. मनोबा हेच तुझं बलस्थान. यावरच भर दे. बाकी फाट्यावर. लिहीत जा रे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋषिक‌पूर ची एक ब‌ऱ्यापैकी अदाकारी यात आहे. प‌ण झीन‌त नं बाजी मार‌लिये ....
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झीन‌त‌ची अदाकारी कोण‌ प‌हात‌ं म्ह‌णे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आम्ही पाह‌तो की. अदाकारी हा श‌ब्द तित‌कासा ब‌रोब‌र नाही .... प‌ण ....

हे बेस्ट आहे .....
.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुर्बानी पाहीलाय‌स‌ का तु? त्यातील झिनुबेबी, स्त्रियांनाही पेट‌वेल अशी दिस‌ते.
प‌ण म‌ला त्यात‌ली अम‌ज‌द‌खानची भूमिका क‌मालीची आव‌ड‌ते. एक‌द‌म सुप‌र्ब!! लाज‌वाब्.
____
आप‌ जैसा कोई गाणं - नाझिया ह‌स‌न .... उफ्फ्फ!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झीन‌त‌ अमान‌ फ‌टाकाच‌ आहे, स‌वाल‌च‌ नाही. साधासुधा नै त‌र चांग‌ला सुत‌ळीबॉम्ब‌ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अग‌दी म‌स्त व‌र्ण‌न केल‌स्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो तर. इतकंच काय तर ती दोन तीन पिढ्यांना एकदाच तितक्याच प्रमाणात आवडू शकते. आमचा एक मित्र व त्याचे वडील, दोघेही झीनतचे डाय हार्ड फॅन आहेत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमिताभच्या काळातील चांगले अभिनेत्यांविषयी बोलत असताना शशी कपूर राहिला की...
की तुमचं वेगळे मत आहे त्याच्याविषयी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0