Skip to main content

सोनी टीव्ही: पेशवा बाजीराव मालिका

सोनी TV वर हिंदीतून २३ जानेवारी २०१७ पासून रोज (सोम-शुक्र) संध्याकाळी ७:३० वाजता भव्य दिव्य "पेशवा बाजीराव" मालिका सुरु झाली आहे. पहिला एपिसोड मी बघितला. एका तासाचा होता. मला खूप आवडला. एखादा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट बघतोय असेच वाटत होते.

उत्तम आणि श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत. कलाकारांचा अभिनय छान वाटला. एडिटिंग टाईट आहे. कथा रेंगाळत नाही! यात घटना खूप नाटकीय पद्धतीने पेश केल्या आहेत तरीही त्यामुळेच बघायला इंटरेस्ट वाटतो नाहीतर मग अशा ऐतिहासिक कथा डॉक्युमेंटरी वाटण्याची भीती असते.

ज्यांनी पहिला एपिसोड बघितला आणी जे पुढेही सिरीयल बघणार असतील ते या लेखाला पतिसाद देऊ शकतात, चर्चा करू शकतात. त्यानिमित्ताने ऐतिहासिक ज्ञानात भर पडेल. एक उत्तुंग मराठी ऐतिहासिक व्यक्तिरेखा एका आघाडीच्या राष्ट्रीय वाहिनीवर दाखवण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ आहे आणि ही एक चांगलीच गोष्ट आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी वर "बाजीराव मस्तानी" मालिका आली होती. ती सुद्धा छान होती.

समीक्षेचा विषय निवडा

चिमणराव Wed, 25/01/2017 - 15:41

पाहिला. फारच सुरेख. त्यातील काही घटनांचे ऐतिहासिक खरेपणा वगैरे फार टीका न करता पाहतोय.
The Bible /history tv18 वर संपली ती सुद्धा आवडली. २८ तारखेपासून येणाय्रा the barberians ची वाट पाहतोय.