माणसे
सबंध रात्रभर,आकाश
पाताळ एक करून
खऱ्या जाणिवेचा,
त्यांच्या सत्याच्या शोध
घेतात ही माणसे...
कधी ऐकलं नाही
कधी बोललं नाही
असं काहीतरी वेगळं
सांगतात ही माणसे...
तहान,भूक
त्यांना लागत नसे
तशावेळी,कुठेतरी
एकटक नजर लावून
असतात ही माणसे...
काय बरे
विचार करतात ?
दिवसभर कुठे
असतात ही माणसे...
कशी असतात...?
कशी दिसतात...?
माणसांसारखीच
वागतात
का ही माणसे...
@आदित्य अ. जाधव,उमरगा;
०९४०४४००००४,
दि,०६-१२-२०१६,पुणे;
वेळ-१२:०७मि,रा;
प्रतिक्रिया
सर्व शास्त्रज्ञ, संशोधक,
सर्व शास्त्रज्ञ, संशोधक, डॉक्टर्स, समाजसुधारक __/\__
त्यांच्याशिवाय आयुष्य भयाण झाले असते.
आदित्यजी वेगळीच आहे कविता
कविता आवडली.
कविता तरी वाटते ना...?
माझी लिखाण शैली अशी आहे, आपले काही मत असेल तर जरूर कळवावे