उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १३

आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अ‍ॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे
आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू करत आहोत.
============

आर्थर्स थीमच्या पुढे थोड्या अंतरावर 'द एशियन बॉक्स' नावाचं एक मुख्यतः थाई पदार्थ मिळणारं एक हॉटेल आहे. ते सुद्धा चांगलं वाटलं.

0
Your rating: None

शावर्मा!

कान्दिवली (पश्चिम)मध्ये अल-शावरमा म्हणून कोंकणी ख्रिश्चन बुवाचा, पोईसर जिमखान्याच्या समोर एक जॉइंट आहे. साधारण दीडशेच्या रेंज मध्ये जाडजूड अप्रतिम शावर्मा मिळतो. हुनानी सॉस आणि हुम्मूसने भरलेला. ह्यात तंदूर वर 'लाईव्ह' भाजलेलं चिकनही मिळतं. इथे आसपासच्या परिसरात ८०-१०० च्या रेंज मध्ये छोट्या स्टॉल्सवरही शावरमा मिळतो, पण 'अल' इज द बेष्ट. तोच आद्य शावर्मा वाला असावा ह्या परिसरातला.

शावर्मा न खालेल्या अभागी जनांनी इथून सुरुवात करावी.

लोकसत्ता मध्ये ह्याच्याबद्दल एकदा जे छापून आलेलं ते त्याने उत्साहाने एन्लार्ज करून तिथे डकवलेलं आहे.

डरतात वादळांना जे दास त्या धृवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे

शावर्मा न खालेल्या अभागी

शावर्मा न खालेल्या अभागी जनांनी इथून सुरुवात करावी. >>>>

tumhi maagachyaa janmaat Sanzagiri hotaa kaa? te asalyaa pinka Taakataat.

(जस्ट किडिंग देन, जस्ट किडिंग

(जस्ट किडिंग देन, जस्ट किडिंग नाऊ.)
हाय 'कम्बख्त', तूने पी ही नही
हे गालिबने म्हटलं की चालतं. आम्ही कोण?

:'(

सगळंच इतकं सिरीअसली घेतलं तर (मुंबईत तरी) जगणं कठीणे.

आणि 'संझगिरी'मताबाबत सहमत. किंबहुना कणेकर ते जास्त करतात असं म्हणणं योग्य आहे.

डरतात वादळांना जे दास त्या धृवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे

अनु तै , बाकी जाऊ दे , पण

अनु तै , बाकी जाऊ दे , पण संझगिरी च्या फालतू पिंका ना विरोध केल्याबद्दल तुम्हाला पाठिंबा !!!

kaahitari khalle naahi mhanun

kaahitari khalle naahi mhanun direct ABHAGI mhanane paTale naahi itakech.

चर्चातली बिस्किटं

नाताळबाबाच्या आगमनाच्या संध्याकाळी, २४ डिसेंबरला, 'ग्रेस' नावाच्या स्थानिक आणि स्वतंत्र चर्चमध्ये बिस्किटं खाल्ली. इतर कोणत्याही दुकानात किंवा स्थानिक, हिप्पी बेकऱ्यांमध्ये किंवा फार्मर्स मार्केटमध्ये मिळतात त्यापेक्षा फार निराळी लागली नाहीत. बिस्किटं फार गोड होती, त्यामुळे ती प्रतिगामी असल्याचं दुबार सिद्ध झालं. बिस्किटं बेक केलेली असली तरीही अमेरिकेत बिस्किटांना कुकी म्हणायची पद्धत आहे!

'काय ऐकलंत' या धाग्यात निराळा प्रतिसाद देत नाही. मला 'ग्रेस' चर्चात घेऊन जाणारी मैत्रीण, व्हॅलरी, चांगली गायिका आहे. चर्चात ख्रिश्चन रॉक म्हणता येतील अशी ख्रिसमस कॅरल्स ऐकली. व्हॅलरी शेजारीच उभी राहून, चांगल्या मोठ्या आवाजात गात असल्यामुळे तिचा आवाज स्वतंत्र ऐकता आला. स्टेजवरचे गायक-गायिका सपाट गात होते आणि व्हॅलरीच्या गाण्यातला भरजरी पोत सहज कानावर येत होता.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुंबईमध्ये उत्तम पिझ्झा कुठे

मुंबईमध्ये उत्तम पिझ्झा कुठे मिळेल कोणाला काही कल्पना आहे का (डॉमिनोज, पिझ्झा हट किंवा तत्सम चेन्स सोडून)

जुनोस् हा भारी अंडररेटेड

जुनोस् हा भारी अंडररेटेड ब्रँड आहे. चिकन खीमा पिझ्झा झकास असतो, आणि दरही वाजवी आहेत. शुशा असाल तर मला कल्पना नाही, पण चांगलेच असावेत.

डरतात वादळांना जे दास त्या धृवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे

मुंबैत कुठे? चिकन खीमा पिझ्झा

मुंबैत कुठे? चिकन खीमा पिझ्झा म्हणजे आमच्या तुर्की लाह्माजुनचाच भाऊबंद दिसतोय. भारी लागत असणार.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

गेल्या आठवड्यात इटालियन खायची

गेल्या आठवड्यात इटालियन खायची इच्छा झाली. स्क्वीसितो आणि रोयाल इटली चा थोडा कंटाळाच आला होता.
म्हणून सेनापती बापट रस्त्यावर पॅन्टालून्सच्या पाठीमागील गल्लीत असलेल्या 'टेल्स अँड स्पिरिट' मध्ये इटालियन खाल्ले.
मोझरेला सिगार्स, फार्मर्स पिझ्झा आणि बक्लावा विथ बटरस्कॉच आइसक्रीम मागवले. सगळे पदार्थ चवीला अफलातून होते.
इतके खाल्ल्यावर पास्ता साठी पोटात जागा शिल्लक राहिली नाही म्हणून नाइलाजाने बिल मागवले.
पुढच्या वेळी पास्ता ट्राय करण्यात येईल. इटालियन फूड प्रेमींसाठी हायली रेकमेन्डेड.

तसंच कोरेगांव पार्कातलं

तसंच कोरेगांव पार्कातलं दारीओस, इथे पण इटालियन लाजवाब आहे.

धॉन्नोबाद! अवश्य ट्राय

धॉन्नोबाद! अवश्य ट्राय करण्यात येईल हो मास्तरजी.

बाकी से.बा.रोडपासून पुढे जरा औंधात वाट वाकडी करून गेल्यास 'ला बुशी ड'ऑर' नामक फ्रेंच बेकरीही अवश्य भेट द्यावी अशी आहे. आल्मंड क्रोसाँ एक नंबर.

https://www.zomato.com/pune/la-bouchee-dor-aundh

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

गणा मास्तर , काल सपत्नीक लंच

गणा मास्तर , काल सपत्नीक लंच ला तिथेच गेलो होतो . मस्त जागा आहे . चिपोटलॆ चिली अटॅक आणि लेमन अँड मेलडी मशरूम घेतली . छान होते . एकच गोष्ट खटकली ... मॉक टेल्स कमालीची जास्त गॉड होती ( नाव टेल्स अँड स्पिरिट्स असली तरी स्पिरिट्स अजून नाहीयेत बहुधा )

स्पिरिट्स नाहीयेत अजून.

स्पिरिट्स नाहीयेत अजून. तुमचा प्रतिसाद वाचून मॉकटेल्स नाही ट्राय केले ते बरे झाले असे वाटले (स्माईल)

पुण्यात जंगली महाराज

पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर, कलमाडी पेट्रोल पंपा समोर एक लहानसं उपहार गृह आहे, बहुदा मथुरा. तिथे भाजणीचे थालीपीठ आणि टोमॅटो ऑम्लेट अप्रतिम मिळते.

आणि त्याच्या पुढे संभाजी पार्क जवळ 'पांचाली' आहे, तिथे क्ल्ब सॅण्डविच चांगला असतो.

तुम्हारे महल चौपारें | यही रह जायेंगे सारे |
अकड किस बात की प्यारें | ये सर फिर भी झुकाना है ||

आज दुपारी हिंजवडी - भूमकर चौक

आज दुपारी हिंजवडी - भूमकर चौक रस्त्यावरील 'मल्हार' मध्ये मटन थाळी चापली.
इथल्या प्रथेप्रमाणे बोकडाचे मटन मिळण्याचा प्रश्नचं नव्हता त्यामुळे बोल्हाईचेचं खाल्ले.
अफलातून चवीचा रस्सा, तितकचं उत्तम सुकं मटन आणि अळणी सूप होतं. एकंदरीत चवीसाठी पाचपैकी चार गुण.
अँबियन्स आणि सर्व्हिस साठी शून्य गुण.

ह्म्म्म थोडा अळणी ब्रॉथ मस्त

ह्म्म्म थोडा अळणी ब्रॉथ मस्त लागतो. फक्त मीठ-मीरी भुरभुरुन पण गरम आणि बाहेर पाऊस असावा (स्माईल)

आज गावातल्याच अन्नपूर्णा

आज गावातल्याच अन्नपूर्णा डायनिंग हॉल नामक एका लिंगायत जेवणासाठी प्रसिध्द ठिकाणी दुपारचे जेवण झाले (गेल्या आठवड्यात बॅटोबा सोलापूर मुक्कामी आले असता त्यांना येथेच नेले होते पण आडनिड टायमामुळे जेवणाला न्याय देता आला न्हवता) मस्त शेंगाभाजी (शेंगादाण्याच्या कूटाची भाजी) पेंडपाला (दाळीची उसळ्/भाजी) शेंगाचटणी, दही, कोशिंबीर आणी पातळ, नरम, पांढर्‍याशुभ्र ज्वारीच्या भाकर्‍यांनी अगदी तृप्त जाहलो. वर लिटरभर ताक दोघात संपवण्यात आले. खिशाला जास्त ताण न देता अप्रतिम बेत जमला.

.

.

शेंगाचटणी, दही, वेडी झाले.

शेंगाचटणी, दही,

वेडी झाले.
___

शेंगादाण्याच्या कूटाची भाजी

आई गं इट साऊंडस सो यमी.

सहमत, घाईघाईत जेवण उरकावे

सहमत, घाईघाईत जेवण उरकावे लागले होते पण काय चव होती महाराजा! लयच जब्री. आंध्रा मेसप्रमाणे लिंगायत मेस हा प्रकारही आता अधोरेखित केल्या गेलेला आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मायला ,हे विंट्रेस्टिंग

मायला ,हे विंट्रेस्टिंग वाटतंय ..सोलापूरला व्यावसायिक किंवा वैयक्तिक काही कॉन्टॅक्ट नसल्याने येणे जाणे नाही . त्यामुळे हे नशिबात नाही ( हां , म्हणजे तुम्हीच काही कट्टा वगैरे ठरवलात , आणि आग्रहाने वगैरे .. तरच ) तर असं जेवण इतर कुठे भेटतं ? कोल्लापूर , सातारा , पुणे , रत्नांग्री , मुंबय वगैरे

बापटाण्णा तुम्ही ऑल्वेज वेलकम

बापटाण्णा तुम्ही ऑल्वेज वेलकम हो. याल तवा कट्टा करु. त्यात काय एवढं.
बाकी असं जेवण मला तरी दुसरीकडे कुठे मिळालं नाही. काही ठिकाणी भाकर्‍या बर्‍या असतात तर काही ठिकाणी तर्री जहाल. काही ठिकाणी चव आवडते पण भाव परवडत नाही. सगळ्याच बाजूने खुष व्हायचा हा मामला आहे. पंजाबी डिशेस म्हणून त्या ग्रेव्हीवाल्या भाज्या आणि चित्रविचित्र नावाचे परदेशी डिशा खाववत नाहीत. कोल्लापूर सातारा म्हणले तरी आख्खा मसूर, मिसळ, तांबडा पांढरा आणि मटण हे ओव्हरहाइप्ड आयटेम आहेत. तुळजापूरी मटण कोल्हापूरला कधीच ऐकणार नाही चवीत आणि जहालपणात.

कोल्लापूर सातारा म्हणले तरी

कोल्लापूर सातारा म्हणले तरी आख्खा मसूर, मिसळ, तांबडा पांढरा आणि मटण हे ओव्हरहाइप्ड आयटेम आहेत.

एका सांगली-सातारा-कोल्हापूर कडील तांबडा पांढरा प्रेमीकडून या वाक्याचा जाहीर निषेध (स्माईल)

मर्दा तेच्यासाठी यायला लागतंय

मर्दा तेच्यासाठी यायला लागतंय तुळजापूरला. मटण खायला लागतंय. मग निषेधाचा इचार करायला यील.
आम्ही दोन्हीकडं ५-५ वर्सं काढून बसलांव.

हो नक्की येणार. बादवे

हो नक्की येणार. बादवे सांगलीमध्ये सिटीपोस्टजवळपण एक लिंगायत खानावळ आहे तिथे कोणी जेवलाय का ? छान असतं म्हणतात. मी कधी गेलो नाही पण.

लिंगायत फूड हे माझ्यासाठी

लिंगायत फूड हे माझ्यासाठी आजवर अंडररेटेड होते. मिरजेतही एक लिंगायत खानावळ आहे नगरपालिकेच्या जस्ट मागे, यशवंत बँकेच्या बिल्डिंगसमोर. आजवर कधीच गेलो नाही. गेले पाहिजे एकदा.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

पंजाबी डिशेस म्हणून त्या

पंजाबी डिशेस म्हणून त्या ग्रेव्हीवाल्या भाज्या आणि चित्रविचित्र नावाचे परदेशी डिशा खाववत नाहीत.

हाहाहा खरय.

लंचला अ‍ॅमीज ऑर्गॅनिक सुप्स

लंचला अ‍ॅमीज ऑर्गॅनिक सुप्स पीऊन कंटाळा आलाय. आज कुछ तूफानी करते है! जैसे पिझ्झा स्लाईस ऑर इंडियन रेस्तराँ. (स्माईल)
इंडिया पॅलेसचा अँबियन्स इअतका डीम प्रकाशमय आहे. हे लोक व्यवस्थित ट्युबलाईटस का लावत नाहीत? काय डिप्रेस्ड असतो अँबियन्स.

संतोष बेकरी च्या मागचं !!! (

संतोष बेकरी च्या मागचं !!! ( सालं त्या पराठा वाल्याचा जागचं पण बरं होतं ) जुन्या बऱ्या जागा बंद झाल्या कि दुःख होतं . गेल्या शतकातील सगळ्यात दुःखद घटना म्हणजे ईस्ट स्ट्रीट वरचं आद्य चायनीज 'कामलिंग' बंद पडलं ती !!!( आणि सूड म्हणून त्या जागी मयूर थाळी चालू झालं , अररारा )

=))

चायनीज 'कामलिंग'

रेस्तराँचं नाव "कामलिंग"? (लोळून हसत) आबांच्या 'जलपर्णी'साठी सुदान चायनीजपेक्षा हे नाव अधिक शोभलं असतं!

अगदी अगदी. मला एका पात्राचं

अगदी अगदी. मला एका पात्राचं नाव "लिंगडोह" असं ठेवायची फार इच्छा झाली होती. असो. पुढील भागासाठी "कामलिंग" नोटवून ठेवतो आहे.

...आबा कावत्यात!

Kamling हे वर्जिनल नाव .

Kamling हे वर्जिनल नाव . मोबाईल वरून टायपल्यामुळे त्याचे कामलिंग झालं ... त्यावेळचा प्रचलित उच्चारात क वर चंद्रकोर आणी पुढे मलिंग असा आहे ( बरं होते रे ... हळहळयुक्त कॉमेंट )

पुन्हा एकदा डेक्कन रोंदेवू ( नीट टायपत का नाहीये ?)

काल बऱ्याच काळानंतर डेक्कन रोंदेवू ला गेलो . दारातच सुर्या 'ज डेक्कन... अशी पाटी बघितली आणि एकंदरीत प्रकार लक्षात आला ( फार फार वर्षांपूर्वी डेक्कन रोंदेवू व्हायच्या आधी याच जागी हॉटेल सूर्या होत. अतिशय साधारण, सुमार , कुठलेही वैशिष्ट्य नसलेला बार /रेस्टो )

आत मध्ये गेल्यावर AC चालू नाही हे लगेच जाणवलं . रेस्टॉरंट मध्ये फकस्त १ टेबल ऑक्युपाइड . बाकी शुकशुकाट .स्टाफ बदललेला दिसला. आणि होता तो सुध्दा पूर्णपणे म्हराटि स्टाफ म्हणजे आता ब्लू डायमंडी झूल पूर्णपणे उतरलेली दिसली . येऊन चूक केली का काय अशी शंका आली .
परंतु पहिला सुखद धक्का म्हणजे मूळ मेन्यू परत आलेला . शंका आली म्हणून शेफ कोण विचारले . आश्वस्त करण्यात आले कि ( मध्ये सोडून गेलेले ) मूळ शेफ परत रुजू झाले आहेत , म्हणूनच ओरिजिनल मेन्यू परत आलेला .
जेवणाबद्दल विशेष काही नाही हेच विशेष . सर्व प्रेपशन्स अत्यंत व्यवस्थित . ( इथे अत्यंत लिमिटेड असा कॉंटिनेंटल , ओरिएंटल , देशी आणि इटालियन असा मेन्यू होता/आहे . अत्यंत चविष्ट , हि ह्याची ख्याती होती/आहे ) आणखीन धक्का म्हणजे ५ वर्षापूर्वीच्याच प्रायसेस . !!!
तात्पर्य : जायला हरकत नाही . पूर्वीची श्टाईल वगैरे नाहीये , थोडी जुनी , दुर्लक्षित छटा आलेली आहे ..... पण खाद्य पदार्थ आम्हाला तरी ओरिजिनल प्रमाणेच उत्तम मिळाले !!
( डेक्कन रोंदेवू चालू झाले तेव्हा डेक्कन वर असा पर्याय नव्हता . पूर्णपणे अपमार्केट असे वातावरण , उत्तम फूड व ड्रिंक्स . चालवणारी मंडळी तेव्हा पूर्व ब्लु डायमंडी ( आणि पश्चिम बेकर्स बास्केट आणि पोलका डॉट्स ) होती . परदेशी कलिग्जना सुध्दा डोळे झाकून रेकमेंड करावे अशी जागा होती . प्रॉब्लेम एकच होता , कि लय फिरंगीपणा चालायचा . वेटर्स ना मराठी बोलण्यावर जवळ जवळ बंदी होती. हे एका वेटर कडून कळल्यावर तेथील वरिष्ठांना '' घेण्यात " आले होते आणि लय मजा आली होती. मुद्दा मराठी बोलायलाच पाहिजे हा नव्हता , पण भर पुण्यात , भर डेक्कन वर मराठी बद्दल जवळ जवळ बंदी या माजाचा होता आणि हे अयोग्य असा होता ) हि मंडळी जाऊन सुद्धा काही वर्षे झाली मध्ये मेन्यू बदलण्याच्या कसरती झाल्या पण आता पूर्वपदावर आले आहेत तेव्हा नक्की जावे अशी जागा

हे नक्की कुठे? जे एम रोडवर

हे नक्की कुठे? जे एम रोडवर कलमाडी पेट्रोल पंपाच्या जस्ट अगोदर आहे काय?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

नाय. आपटे रोडवर संतोष बेकरी

नाय. आपटे रोडवर संतोष बेकरी मागे. आधी पापा जॉन्स जिथे होतं तिथे जाणार्‍या गल्लीत.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ओह तिकडे होय. त्या इंटरमीजियट

ओह तिकडे होय. त्या इंटरमीजियट भागात जास्त कधी फिरलो नाही. आमच्याकरिता जेयम आणि यफसी हेच मुख्य रस्ते.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

अ-प्रातिनिधिक अनुभव

मी ऑक्टोबरमध्येच तिथे गेलो होतो. माझा अनुभव उत्तमच होता. त्यांच्या वाईनविषयी खात्री नव्हती म्हणून मी बिअर घेतली. ज्यांनी वाईन घेतली त्यांनी सांगितलं की ती वाईट होती. मात्र, माझा अनुभव प्रातिनिधिक नाही, कारण मी ज्यांच्यासोबत गेलो होतो त्या बाई तिथल्या मालकांपासून वेटरपर्यंत सगळ्यांच्या ओळखीच्या होत्या आणि त्यामुळे आम्हाला व्हीआयपी वर्तणूक मिळाली.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे बरे केलेत

" त्यांच्या वाईनविषयी खात्री नव्हती म्हणून मी बिअर घेतली "
हे बरे केलेत . सध्याच्या स्टाफ ला मद्यविषयक प्रबोधन करण्याची गरज आहे असे दिसते . काल ब्लडी मेरी च्या ग्लास ला कापलेली ( तिखट )मिरची लावून आली .

अवांतर : जंतू ...बिअर ? ऑल वेल ?

तुम क्या जानो...

>>जंतू ...बिअर ? ऑल वेल ?<<

मला बिअरविषयी फार प्रेम नाही, पण दुसरा बरा पर्याय उपलब्ध नसेल तर, किंवा यजमानांचं मन राखण्यासाठी किंवा उन्हाळ्यातल्या भर दुपारी वगैरे पिऊ शकतो.

तात्पर्य : उदारमतवादी असणं फार त्रासाचं काम असतं बापट.

१. ह्याला अपवाद म्हणजे जर्मनीत आणि बेल्जियममध्ये प्यालेल्या काही बिअर. पण ते एक असोच.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

संतोष बेकरी मागचं ना? की

संतोष बेकरी मागचं ना? की समोरचं, त्या पराठावाल्या जागेतलं?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.