Skip to main content

इंटरनेटवरच्या चर्चा करून आपण काय साधतो?

खासगी आयुष्यात सरकारी हस्तक्षेप ? (http://www.aisiakshare.com/node/553) या धाग्यात प्रस्तुत विषयावर वेगळी चर्चा सुरु झाली ; त्याचा वेगळा धागा बनवण्यात येत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी इंटरनेटवरच्या अनेक चर्चा बघतो आणि मला प्रश्न पडतो की ज्याचा आपल्या आयुष्याशी यत्किंचितही संबंध नाही अशा विषयावर चर्चा करून आपण काय साधतो?

संजय

राजेश घासकडवी Mon, 27/02/2012 - 07:55

चर्चा करण्याची फायदेशीर कारणं वेगवेगळ्या स्वरूपाची असतात.
१. दुसऱ्याचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न - हा हेतू असेल तर चर्चा का करावी असा प्रश्नच उद्भवत नाही
२. आपल्या बुद्धीमत्तेचं प्रदर्शन - काही जण आपली बुद्धीमत्ता दाखवून लोकांकडून वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करतात. यात गैर काहीच नाही. काही लोक सुंदर गाऊन लोकांची वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करतात तसंच.
३. वेळ घालवण्यासाठी एक खेळ - टेनिसचा चेंडू मागेपुढे टोलवण्याने तरी जगाचा किंवा त्या खेळणाऱ्यांचा काय फायदा होतो? शब्दचेंडू मागेपुढे टोलवण्यातही तसाच आनंद असतो.
४. नवीन ज्ञान मिळवण्यासाठी व देण्यासाठी - इथल्या चर्चा वाचून अनेकांनी आपल्या ज्ञानात भर पडल्याचं वेळोवळी सांगितलेलं आहे. मुद्दामून त्या हेतूने कोणी चर्चांमध्ये भाग घेतो असं नाही, पण ज्ञान वाढणं हा निश्चितच फायदा आहे.

राहाता राहिला आपल्या आयुष्याशी काडीइतकाही संबंध नसलेल्या गोष्टींविषयी चर्चा करण्याचा मुद्दा. मला असं वाटतं की जवळपास कुठचेच विषय आपल्याशी असंबद्ध नसतात. काहीतरी दूरान्वयाने संबंध लागतो. त्या संबंधांचा दुवा खरोखरच आपण समजतो तितका कमकुवत आहे की नाही, हे तरी आपण चर्चेत भाग घेऊन समजू शकतो.

संजय क्षीरसागर Mon, 27/02/2012 - 09:10

>१. दुसर्‍याचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न- हा हेतू असेल तर चर्चा का करावी असा प्रश्नच उद्भवत नाही

= उलट आहे,चर्चेतूनच मतपरिवर्तन होतं

>२. आपल्या बुद्धीमत्तेचं प्रदर्शन
= येस! नानावटींच्या संख्याविषयींच्या लेखांना प्रोत्साहन मिळावं म्हणून मी सदस्यत्व घेतलं आणि त्यांना व्य. नि. पाठवला.

>३. वेळ घालवण्यासाठी एक खेळ -

= तसं असेल तर तो वैयक्तिक प्रश्न आहे

>४. नवीन ज्ञान मिळवण्यासाठी व देण्यासाठी
= आय अ‍ॅग्री! म्हणून तर मी लिहिलंय `ज्याचा आपल्या आयुष्याशी यत्किंचितही संबंध नाही अशा विषयावर चर्चा करून आपण काय साधतो?' कारण निरुपयोगी माहिती जमवण्यात अर्थ नाही, इट क्लटर्स द ब्रेन.

>मला असं वाटतं की जवळपास कुठचेच विषय आपल्याशी असंबद्ध नसतात. काहीतरी दूरान्वयाने संबंध लागतो. त्या संबंधांचा दुवा खरोखरच आपण समजतो तितका कमकुवत आहे की नाही, हे तरी आपण चर्चेत भाग घेऊन समजू शकतो.

= हे मंजूर आहे पण अत्यंत प्रदीर्घ चर्चेतून विषयाचा आपल्याशी दूरान्वयानेही संबंध (मला तरी) दिसत नाही म्हणून प्रतिसाद!

असो, तुमच्या संयत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ही तुम्ही वेगळी पोस्ट केलीये पण माझं म्हणणं ऑलरेडी मांडून झालंय. मी आता या चर्चेत पुन्हा भाग घ्यायला उत्सुक नाही.

संजय

राजेश घासकडवी Mon, 27/02/2012 - 18:36

In reply to by संजय क्षीरसागर

हे मंजूर आहे पण अत्यंत प्रदीर्घ चर्चेतून विषयाचा आपल्याशी दूरान्वयानेही संबंध (मला तरी) दिसत नाही म्हणून प्रतिसाद!

मी चर्चा का व्हाव्यात, व बरेच लोक त्या चर्चांमध्ये का भाग घेतात याची ढोबळ कारणं सांगितली. तुम्हाला जर एखाद्या विषयाचा दूरान्वयेही संबंध दिसला नाही तर त्या चर्चेकडे जरूर दुर्लक्ष करावं. लोकांनादेखील तसंच वाटावं ही अपेक्षा योग्य नाही. तुमच्या मूळ विधानात 'बहुतेक लोक दूरान्वयाने संबंध नसतानाही चर्चा करतात' अशी इतरांविषयीची तक्रार जाणवली. ती नसती तर पुढची चर्चा उद्भवलीच नसती.

मी Mon, 27/02/2012 - 18:53

In reply to by संजय क्षीरसागर

सहमत..पण

>>कारण निरुपयोगी माहिती जमवण्यात अर्थ नाही, इट क्लटर्स द ब्रेन.

:) परत विचार करा.

यशवंत कुलकर्णी Mon, 27/02/2012 - 12:48

संजयजी,

`ज्याचा आपल्या आयुष्याशी यत्किंचितही संबंध नाही अशा विषयावर चर्चा करून आपण काय साधतो?'

चर्चा आपणही करता पण फक्त आपल्याला हव्या तशाच. [दुवा मनोगतावर नेतो]

तुम्ही चर्चा करता त्या आयुष्‍याशी संबंधित , आणि इतर करतात ते आयुष्‍याशी संबंधित नाही असे आपल्यासारख्या स्वयंभू ज्ञानियाने म्हणणे समजले नाही.

तुम्ही तुम्हाला हव्या त्या विषयावर इथे चर्चा कधी सुरु करताय याची प्रतिक्षा करीत आहे.

रमाबाई कुरसुंदीकर Mon, 27/02/2012 - 15:12

उत्तम प्रश्न विचारला आहेस संजय तू. मी तरी चर्चा वाचते ते वेळ जात नाही म्हणून. दुपारी धान्य निवडून झाल्यावर जरा विरंगुळा म्हणून. वाट्टेल त्या विष्यावर चर्चा आम्हा मराठी माणसांना नव्या नाहीत्.पूर्वी टिटो,आयसेनहॉवर ह्यांना ईशारे,सल्ले देणारे लेख व प्रतिक्रिया मी केसरीत वाचल्या आहेत.मग सध्याच्या तुमच्या इंटरनेटच्या जमान्यात मराठी माणूस काय मागे रहातोय? शक्यच नाही.चर्चेने काय साधते माहित नाही पण आपण ईतरांपेक्षा काकणभर सरस आहोत ही भावना सुखावह असावी.
[ सहसा चर्चेत सहभागी न होणारी ] रमाबाई

संजय क्षीरसागर Mon, 27/02/2012 - 15:15

आणि इतर करतात ते आयुष्‍याशी संबंधित नाही असे आपल्यासारख्या स्वयंभू ज्ञानियाने म्हणणे समजले नाही.

= मी असं म्हटलेलं नाहीये. ज्या चर्चेच्या संबधात मी म्हटलंय ते पाहिलंत तर तुम्हाला मुद्दा लक्षात येईल.

>तुम्ही तुम्हाला हव्या त्या विषयावर इथे चर्चा कधी सुरु करताय याची प्रतिक्षा करीत आहे.

= जिथे चर्चा झालीये तिथे प्रतिसाद दिलात तर प्रतिक्षा करावी लागणार नाही.

संजय

संजय क्षीरसागर Mon, 27/02/2012 - 15:32

>पूर्वी टिटो,आयसेनहॉवर ह्यांना ईशारे,सल्ले देणारे लेख व प्रतिक्रिया मी केसरीत वाचल्या आहेत

= क्या बात है!

मी कधीही कुणाला उकसवण्यासाठी काहीही करत नाही, तो माझा स्वभावच नाही पण तुमच्या प्रतिसादात तुम्ही योग्य मुद्दा अत्यंत मार्मिकतेनं उचललायं त्याबद्दल आभार .

संजय

'न'वी बाजू Mon, 27/02/2012 - 21:58

In reply to by यशवंत कुलकर्णी

कोतवालकीचे लायसन बगू?

चोरीस गेले. किंवा हरवले. आपणांस सापडले आहे काय?

बाकी, हेल्मेट आवडले हो. कुठून उचललेत?

लिखाळ Mon, 27/02/2012 - 19:40

मी इंटरनेटवरच्या अनेक चर्चा बघतो आणि मला प्रश्न पडतो की ज्याचा आपल्या आयुष्याशी यत्किंचितही संबंध नाही अशा विषयावर चर्चा करून आपण काय साधतो?

कल्पना नाही

चिमा Mon, 27/02/2012 - 21:16

माणसांना एकमेकांसोबत राहायचं असतं. चर्चा हे त्याचं निमित्त असतं म्हणे.

............सा… Mon, 27/02/2012 - 21:56

संजय तुम्हाला या संस्थळावर बघून आनंद झाला. मला वाटतं, माणूस हा काही निर्जन बेटासारखा राहू शकत नाही. One feels a need to CONNECT!!! आणि तेच संवादाच्या, चर्चेच्या माध्यमातून साधले जाते. आता हेच पहा ना आपण चर्चा एका विषयावर करतो आहोत पण अ जाता जाता मी हे सांगून गेले की - आपल्याला येथे पाहून मला आनंद झाला. हा जो संवादाचा ओलावा आहे तो मला आवडतो.

राजन बापट Mon, 27/02/2012 - 22:38

मूळ प्रश्न हा एकंदर माहितीच्या देवाणघेवाणीच्या मुळापाशीच - आणि म्हण्टलं तर कलाक्रीडाज्ञानविज्ञानादि गोष्टींच्या मुळाशीच जाऊन पोचतो. "आपल्या आयुष्याशी संबंध" असलेल्या गोष्टी म्हणजे नक्की काय? घरगुती कामे , रोजीरोटीच्या दृष्टीने गोळा केलेला स्किलसेट , मूलभूत दळणवळणाकरता केलेल्या सोयी आणि एकंदरच उपजीविका, चरितार्थ या पलिकडे इतर कशाचाच "आपल्या आयुष्याशी संबंध" नसतो काय ?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 27/02/2012 - 22:40

In reply to by राजन बापट

हे अगदीच दुसरं टोक असू शकतं. पण जगात चालणार्‍या सगळ्याच गोष्टींत प्रत्येकाला रस असेलच असं नाही. एखादा विषय ऑप्शनला टाकण्यासारखं एखादा चर्चाविषय ऑप्शनला टाकता येतंच.

राजन बापट Mon, 27/02/2012 - 22:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"आपल्या आयुष्याशी यत्किंचितही संबंध नाही अशा विषयावर चर्चा करू नये" याचा व्यत्यास "जगात चालणार्‍या सगळ्याच गोष्टींत प्रत्येकाला रस असेलच" असा असू शकत नाही. "आपल्या आयुष्याशी यत्किंचितही संबंध नसलेल्या "काही" गोष्टींमधे आपल्याला रस घेणे/चर्चा करणे शक्य आहे" असा होईल. तेव्हा "जगात चालणार्‍या सगळ्याच गोष्टींत प्रत्येकाला रस असेलच" असे म्हणणे विपर्यासाचे वाटते.

Nile Mon, 27/02/2012 - 22:41

In reply to by राजन बापट

चरितार्थ या पलिकडे इतर कशाचाच "आपल्या आयुष्याशी संबंध" नसतो काय ?

कृपया नविन प्रश्न विचारून नविन चर्चा सुरु करू नयेत, क्षीरसागरांचा वेळ जातो!!

'न'वी बाजू Mon, 27/02/2012 - 22:51

In reply to by Nile

(अवांतर)

एक अमेरिकन म्हण या संदर्भात आठवते. गोषवारा साधारणतः असा:

'डुकराबरोबर चिखलात कुस्ती खेळू नये. दोघेही घाण होता; डुकराला मात्र मजा येते.'

काळा मठ्ठ बैल … Mon, 27/02/2012 - 22:55

निरुपयोगी माहिती जमवण्यात अर्थ नाही, इट क्लटर्स द ब्रेन.

तुमचा होत असेल ब्रेन क्लटरबिटर आमचा नाय होत.
आता कुणाचा ब्रेन क्लटर होतो त्यचा आमच्या आयुष्याशी यत्किंचितही संबंध नाही.
मग अशा विषयावर चर्चा करून आपण काय साधतो?
संपलं माझं भाषण.

पिवळा डांबिस Mon, 27/02/2012 - 23:17

ज्याचा आपल्या आयुष्याशी यत्किंचितही संबंध नाही अशा विषयावर चर्चा करून आपण काय साधतो?
संस्थळचालकांचा बौद्धिक विकास!!!
:)
(मुसु मोड सुरू अरे, कोणी मोक़ळा सोडला रे या यल्लोनॉटीला? जा, एक राखेचा तोबरा घेऊन या!!> मुसु मोड बंद)

राजन बापट Mon, 27/02/2012 - 23:22

In reply to by पिवळा डांबिस

अरे या यलोनॉटीला काय खाऊ घातलंय रे ! आम्हाला पण सांगा. आम्ही वर्षाचा खुराक पाठवून देतो "तिकडे". ;-)

संजय क्षीरसागर Mon, 27/02/2012 - 23:54

>तुमच्या मूळ विधानात 'बहुतेक लोक दूरान्वयाने संबंध नसतानाही चर्चा करतात' अशी इतरांविषयीची तक्रार जाणवली. ती नसती तर पुढची चर्चा उद्भवलीच नसती.

= नाही, तुम्ही ही चर्चा वेगळी काढल्यानं तसा अर्थ वाटतोयं

>‘ गे सेक्स ’ ( पुरुषांमधील समलिंगी संबंध) वैध ठरविण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला केंद्रीय गृह मंत्रालयाने आज लेखी विरोध करण्यात आला’

= यावर इथे चर्चा करून आपण नक्की काय साधतोयं असा माझा साधा प्रश्न होता.

आपण ‘गे’जना मदत करणार आहोत की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध करणार आहोत की गृह मंत्रालयाला धारेवर धरणार आहोत?

लोकांचे प्रतिसाद बघा मग कळेल की ‘कशा विषयी नक्की काय साधायचंय’ यावर एकही प्रतिसाद नाहीये, मग साधणं तर दूरच.

संजय

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 28/02/2012 - 02:28

In reply to by संजय क्षीरसागर

एखाद्या चांगल्या वाटलेल्या गोष्टीचं कौतुक करून काय मिळवतो? एखादी गोष्ट चुकलेली आहे असं वाटलं तर का चुकलेली आहे, त्यात काय सुधारणा करता येतील, चूक होण्याची कारणं काय असतील याचा विचार मला महत्त्वाचा वाटतो. चूक वाटलेल्या गोष्टीमधेही सगळंच काही व्यर्थ नाही हे ही कदाचित चार लोकांच्या मतांवरून लक्षात येतं.

मला सगळंच समजलेलं आहे, माझी मतं काय ती (निदान माझ्यापुरती का होईना) शेवटची आहेत अशांसाठी चर्चा करून काही साध्य होणार नाहीच. पण उरलेल्या लोकांचा बौद्धीक व्यायाम (कोण रे mental masturbation म्हणतंय?) होतो हे स्पष्टच आहे.

मच्छिंद्र ऐनापुरे Tue, 28/02/2012 - 00:08

सगळा धागा- बिगा विस्कटला तेव्हा निष्कर्ष निघाला- उद्देशहीन आणि साध्य परिणामशून्य! मात्र ही आहे ' शहाणपट्टी दाखवण्याची जागा'
इतक्यात येईल बग्..घ..घा ... एखादी शहाणपट्टी.....

चक्रपाणि Tue, 28/02/2012 - 05:30

चर्चांमधून प्रकाशात येणारी मतमतांतरे पाहता या चर्चांमधून स्वत:चा वैचारीक कल आजमावता येतो, असे मला वाटते. आपली वैचारीक बैठक कोणत्या धाटणीची आहे, हे चर्चांमधली कोणती मते आपल्याला सर्वाधिक आकृष्ट करतात, यावरून कळत असावे. आणि त्यानंतरची पायरी म्हणजे ही बैठक योग्य की अयोग्य हे ठरवले जाणे; आणि आवश्यक असल्यास, वाव असल्यास, इच्छा आणि तयारी असल्यास ती सुधारली जाणे. चर्चाविषय कितीही बाळबोध/प्रगल्भ, विस्तृत/संकुचित, सर्वसमावेशक/वैयक्तिक इ. कोणत्याही स्वरूपाचा असला तरी आपण त्याचे विश्लेषण किती खोलात जाऊन/वरवर करू शकतो, आपल्याला तो विषय, त्या विषयावरील चर्चेत अपेक्षित मतमतांतरे याबद्दल किती अचूक अंदाज बांधता येतो/आकलन होते, हे सुद्धा आजमावता येते.

Churchill Wed, 29/02/2012 - 04:57

चर्चा करण्यावरच आम्ही जिवंत रहातो, नावच बघाना चर्चिल! आमच्या अस्तित्वाच्या पायालाच असा हात घातल्याबद्दल क्षीरसागरांचा तीव्र निषेध.

आम्ही सर्व चर्चा समान मानतो. आता समजा जर कोणी आपल्या नात्यातल्या किंवा जिवलग किंवा चांगल्या ओळखीच्या माणसांशी सोडून इतरांशी बोलायचंच नाही असं म्हटलं तर त्यांनी जावं कुठे? आपल्या नात्यातला नसतो तो कोणाच्यातरी नात्यातला तरी असतोच ना? हे माणसांना अप्लाय होतं तसंच चर्चांनाही. सर्वांनाच आपलं म्हणा क्षीरसागरजी. आणि ज्यांना आपलं म्हणून पोटाशी घ्यायची इच्छा नाही, त्यांना सोडून द्या. दुसरं कोणीतरी आपलं म्हणेल. काय?

आतिवास Wed, 29/02/2012 - 15:44

मूळ प्रश्नकर्त्याला चर्चेत रस नाही हे त्यांनी स्पष्ट केल्यावर पण आपण (त्यात मीही आहे) चर्चा करतोय हे मला पुरेस विशेष वाटलं. चर्चा करायची नसताना इतके मुद्दे, करायची असती तर .. असा विचार मनात येऊन गेला!!

संजय क्षीरसागर Wed, 29/02/2012 - 17:50

>चर्चाविषय कितीही बाळबोध/प्रगल्भ,..... हे सुद्धा आजमावता येते.

= एक प्रसंग आठवला, माझ्या वेळेस सीएचा निकाल सधारण चवदा टक्के लागायचा. एकदा टी. एस. ग्रेवल म्हणून बोर्ड ऑफ स्टडीजचे चिफ दिल्लीहून आले होत तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं की आम्ही तीन-तीन, चार-चार सप्लिमेंटस लावलेल्या असतात आणि मार्क आठरा किंवा वीस, हा काय प्रकार आहे? आमचं किमान पन्नस टक्के तरी बरोबर असेल की नाही?

ग्रेवल म्हणाले ‘तुम्ही चूक लिहित नाही, कारण इतका अभ्यास केल्यावर तुम्ही बरोबरच लिहित असणार’

यावर आणखीनच गोंधळ उडाला, विद्यार्थी म्हणाले, ‘अहो, मग तुम्ही मार्क का देत नाही?’

त्यावर ग्रेवल म्हणाले ‘ तुम्ही जे लिहिलंय ते विचारलेलचं नसतं!’

आलं लक्षात? चर्चा एकदम विद्वतापूर्ण आहे पण आपण नक्की काय साधतोयं ? हा प्रश्न होता.

मला असं म्हणायचंय

१) सुप्रीम कोर्ट फक्त वैध किंवा अवैध याचा निवाडा करू शकतं, म्हणजे एखाद्या बाबतीत कायदाच अस्तित्वात नसेल तर सुप्रीम कोर्टाची कक्षा शून्य होते. या बाबतीत सुप्रीम कोर्ट जेव्हा गेशिप वैध आहे असं म्हणतं याचा अर्थ , ती बेकायदेशीर ठरेल असा कोणताही कायदा नाही.

तुमच्या लक्षात आलं? हे नेगटीव रुलींग आहे, (चूक नाही म्हणून बरोबर या अर्थानी) पण गेजनी इतका जल्लोष केला आणि त्याचा अर्थ काढला की सुप्रीम कोर्टानी गेशिपला मान्यता दिली!

२) गेशिप बेकायदा ठरवायची असेल तर त्याला सरकारनी तसा कायदा करायला हवा पण सत्तेतल्या लोकांचे हेतू अनाकलनीय असतात, ते तसा कायदा करण्याऐवजी सुप्रीम कोर्टाकडे टॉस मारुन वाट बघत होते.

३) गेशिप हा हार्मोनल प्रॉब्लम आहे आणि जसा इन्फर्टिलिटी हा त्या व्यक्तीचा दोष असू शकत नाही तसं गेशिपचं आहे हे मला मंजूर आहे.

आता या परिस्थितीत नेटवर चर्चाकरुन आपण काय साधतोयं असा माझा प्रश्न होता.
>ज्यांना आपलं म्हणून पोटाशी घ्यायची इच्छा नाही, त्यांना सोडून द्या. दुसरं कोणीतरी आपलं म्हणेल. काय?
= म्हणून तर मी चर्चेत नाहीये, चर्चिल! (तुमचं नांव मात्र आवडलं)

पण आता मला एक नवीनच उलगडा झालायं (पत्रं आणि नवी पोस्ट यावरनं) की गेजना सहानुभूतीचा उपक्रम नेटवरून चालूये, मग हे आधी सांगीतलं असतं तर इतकी चर्चा कशाला झाली असती? मी फक्त तेच विचारत होतो.

>चर्चा करायची नसताना इतके मुद्दे, करायची असती तर .. असा विचार मनात येऊन गेला!!

= आता तुमच्या लक्षात येईल की एक साधा प्रतिसाद देताना त्या मागे किती विचार असतो. जे शीर्षक दिलंय ‘नेटवरच्या चर्चातून आपण काय साधतो’ ते माझ्या प्रतिसादातून मला म्हणायच नव्हत.चर्चेचा प्रस्ताव मी ठेवला नव्हता, तो प्रतिसाद होता आणि प्रशासानानं चर्चा म्हणून वेगळा काढला.

संजय

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/02/2012 - 21:45

In reply to by संजय क्षीरसागर

गेशिप हा हार्मोनल प्रॉब्लम आहे

अरेरे! चर्चा करण्याआधी माहितीवाटप केंद्र सुरू करण्याची आवश्यकता आहे. घ्या, चर्चा सुरू केल्यामुळे हे तरी समजलं.

गेजना सहानुभूतीचा उपक्रम नेटवरून चालूये

आक्षेप! समलैंगिक हे कोणी पूरपीडीत, भूकंपपीडीत प्रमाणे पीडीत लोकं आहेत आणि इतर भिन्नलिंगी संबंध ठेवणारे त्यांचे उद्धारकर्ते आहेत, त्यांच्यावर काही उपकार करत आहेत अशी माझी भूमिका अजिबात नाही. समलैंगिकांवर वर्षानुवर्ष अन्याय होत आहे; आजही तो होऊ नये अशी इच्छा आहे.
धनंजयने इतरत्र लिहील्याप्रमाणे, 'प्रेयर्स फॉर बॉबी'मधल्या केसचा विचार करता समाजाचा मतबदल करण्याची आवश्यकता आहे. चर्चा करून हे करता येतं. जसे शब्द समाजाच्या बोलीतून शब्दकोषात जातात, तसा बदल कायद्यातही होऊ शकतो.

"मुळात समाजाला रोग लागला आहे, मुलं जन्माला घालण्याचा" ... शब्दशः नाही पण भालचंद्र नेमाडे. हेटरो लोकंच रोगट आहेत, समलैंगिक आनंदही घेतात आणि प्रजाही निर्माण करत नाहीत.

Nile Wed, 29/02/2012 - 22:06

In reply to by संजय क्षीरसागर

ग्रेवल म्हणाले ‘तुम्ही चूक लिहित नाही, कारण इतका अभ्यास केल्यावर तुम्ही बरोबरच लिहित असणार’

यावर आणखीनच गोंधळ उडाला, विद्यार्थी म्हणाले, ‘अहो, मग तुम्ही मार्क का देत नाही?’

त्यावर ग्रेवल म्हणाले ‘ तुम्ही जे लिहिलंय ते विचारलेलचं नसतं!’

आमच्यात न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे विचारलेल्या प्रश्नासाठी चूकच असतं. ते बरोबर आहे म्हणणारे गाढव मास्तर आहाला मिळाले नाहीत हे आमचं नशिब. नाहीतर आमचाही क्षीरसागर झाला असता!!

गेशिप हा हार्मोनल प्रॉब्लम आहे आणि जसा इन्फर्टिलिटी हा त्या व्यक्तीचा दोष असू शकत नाही तसं गेशिपचं आहे हे मला मंजूर आहे.

तुमचा प्रॉब्लेम मात्र जेनेटिकल दिसतो.. अरे रे.. यावर औषधही नाही बहुतेक! असो.

चक्रपाणि Wed, 29/02/2012 - 23:59

In reply to by संजय क्षीरसागर

आलं लक्षात? चर्चा एकदम विद्वतापूर्ण आहे पण आपण नक्की काय साधतोयं ? हा प्रश्न होता.
याचं उत्तर माझ्या आधीच्याच प्रतिसादात दिलं आहे. त्या प्रतिसादात जे-जे नमूद केलं आहे, ते वैयक्तिक साध्य/ध्येय असू शकतं. आणि 'अशा' चर्चांमधून ते नक्कीच साध्य होतं :)

नंदन Fri, 02/03/2012 - 04:47

In reply to by संजय क्षीरसागर

की गेजना सहानुभूतीचा उपक्रम नेटवरून चालूये,

हे विधान Ad hominem चे उत्तम उदाहरण आहे, हे समजण्यासाठी काही भूतपूर्व आंतरजालीय चर्चांची मदत झाली. निदान माझ्या दॄष्टीने तरी हा जालचर्चांचा हा एक फायदा आहे असं sheepish-पणे नमूद करू इच्छितो :)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 02/03/2012 - 05:42

In reply to by नंदन

हे समजण्यासाठी काही भूतपूर्व आंतरजालीय चर्चांची मदत झाली.

नाही म्हणजे दोन-चार संदर्भ लिंकाही दे की!

संजय क्षीरसागर Wed, 29/02/2012 - 23:54

>हेटरो लोकंच रोगट आहेत, समलैंगिक आनंदही घेतात आणि प्रजाही निर्माण करत नाहीत.

= आता कुणाचा काय दृष्टीकोन आहे ते लक्षात आलं

>आमच्यात न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे विचारलेल्या प्रश्नासाठी चूकच असतं

= येस, नॉट रिलेवंट देअर फोर राँग असं तुम्ही काही शिकलाच नाहीत म्हणून सगळे प्रतिसाद असे आहेत.

संजय

रामपुरी Thu, 01/03/2012 - 04:06

In reply to by संजय क्षीरसागर

"नॉट रिलेवंट देअर फोर राँग"???
मग तुमचे मनोगतावरचे सगळे लेख "राँग" मधेच मोडतील कारण ते "नॉट रिलेवंट" आहेत. कारण तुमचं लेख लिहिणं व्यर्थ आहे. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे फक्त चरितार्थ सोडून बाकी सगळंच व्यर्थ आहे. नाही का?
प्रत्येकाने असाच विचार केला असता तर मानवजमात अजूनही गुहांमध्येच राहताना दिसली असती.

(अवांतरः बाकी तुमचे लेख वाचत नाही. त्याबद्दल काळजी नसावी. पण प्रतिसाद मनोरंजक असतात. "मी, माझे, माझ्यासारखे, ईत्यादी" अहं-अहं वाचून खूप मनोरंजन होते.)

काळा मठ्ठ बैल … Thu, 01/03/2012 - 08:33

हे नेगटीव रुलींग आहे, (चूक नाही म्हणून बरोबर या अर्थानी) पण गेजनी इतका जल्लोष केला आणि त्याचा अर्थ काढला की सुप्रीम कोर्टानी गेशिपला मान्यता दिली!

एक प्रसंग आठवला,
ब्रिटिशांच्या वेळेस पारधी जमात गुन्हेगार म्हणणारा कायदा होता.
मग भारत स्वतंत्र झाला.
मग तो कायदा रद्द झाला.
पारध्यांना आनंद झाला.
आता तुम्ही म्हणाल. आनंद कसला? हे नेगटीव रुलींग आहे.
आलं लक्षात? कोण नेगटीव आहे ते?

गेशिप बेकायदा ठरवायची असेल तर त्याला सरकारनी तसा कायदा करायला हवा

गेशिप हा हार्मोनल प्रॉब्लम आहे

आता तुमच्या लक्षात येईल की एक साधा प्रतिसाद देताना त्या मागे किती विचार असतो.

पण आता मला एक नवीनच उलगडा झालायं (पत्रं आणि नवी पोस्ट यावरनं) की गेजना सहानुभूतीचा उपक्रम नेटवरून चालूये

बापरे. तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमना एकच उपायः बाबा रामदेव. जा त्याच्याकडे

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 02/03/2012 - 03:26

In reply to by काळा मठ्ठ बैल …

गेशिप हा हार्मोनल प्रॉब्लम आहे

गेशिप म्हणजे काय?
इथे हे मिळालं:
A type of relationship, like friendship, or even a sexual relationship, involving at least one gay person...Having an association with a gay person.
मुलांनो, आपल्यापैकी बहुतेकांचेच हॉर्मोनल प्रॉब्लेम आहेत; लक्षात येतंय का?

बरं मग लेस्बियनशिप म्हणजे काय?