(ओम नमः) शिवाय

हिन्दी चित्रपट बघायच्या बाबतीत मी फार चोखंदळ आहे. सहसा परीक्षण वाचल्याशिवाय पहात नाही. तरीही कित्येकदा अपेक्षाभंग होतोच. तर नेहमीच्या पद्धतीला फाटा देऊन एकतरी अ‍ॅक्शन चित्रपट, परीक्षण न वाचता, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता पहायचा असे ठरवले होते. त्यामुळे 'शिवाय' ची जाहिरात बघितली आणि सरळ तिकीटेच बुक केली.

नरकचतुर्दशीच्या सुमुहूर्तावर थेटरात स्थानापन्न झालो. रिकाम्या खुर्च्या मनांत धडकी भरवत होत्या. पण एकदा चित्रपट सुरु झाला आणि आम्हाला, दर क्षणाला, साक्षात त्या भगवान शंकराचे दर्शन होऊ लागले. अजय देवगण हा साक्षात 'शिवाय' म्हणजे शंकराच्या रुपात हिमालयाच्या उंच शिखरांमधे लीलया बागडत होता. अत्युच्च शिखरांवरुन खालच्या भयाण दरीमधे अंग झोकून द्यायचे आणि कंटाळा आला की एखाद्या कड्यावर हुक अडकवून मस्त झोके घ्यायचे. काही अपघात, होणे शक्यच नव्हते कारण तेच! साक्षात शिवाय (अभिनयाशिवाय, अशी एक हीन कोटी मनांत चमकून गेली.) तर अशा त्या भोलेनाथला मधेमधे चिलिम ओढताना दाखवणे क्रमप्राप्तच होते, प्राणवायु कमी असला तरी! ज्यांच्या पराक्रमाने छाती ५६ इंचाची होते, अशा भारतीय सैनिकांनीही शिवायच्या लीला पाहून तोंडात बोटे घातलेली दिसतात तेंव्हा ती छाती ५६ ची ६६ इंच होते की काय, अशी आम्हाला धास्ती वाटत होती.

अर्थातच आमच्या या शिवायला गिर्यारोहणासाठी आलेली एक बल्गेरियन पार्वती भेटते. त्यांचे प्रेम काय, असे तसे असणारे ? हिमवादळात सुद्धा, इतरांना वाचवून झाल्यावर हा महादेव पार्वतीसह एका टांगत्या तंबूत प्रणयाची रात्र रंगवतो. निसर्गधर्म द्येवालाही चुकला नाही. पार्वती पोटुशी रहाते. तिला परत जायचे असते माहेरी. पण शंकराच्या रिक्वेस्टवरुन ती मुलीला जन्म देऊन जाते कायमची माहेरी. शंकराला मुलगी कशी, हा प्रश्न नाही विचारायचा. परत ती मुलगी मुकी पण बहिरी नाही. बल्गेरियन पार्वतीला आणि तिच्या मुलीला जन्मजात हिंदी येतच असतं. तान्ही असल्यापासून शिवाय तिला पाठीशी बांधून हिमशिखरांत बागडण्याचे काम चालूच ठेवतो. एकदा मुलीला आईचा फटु आणि लेटर सापडते. बालहट्टापुढे शिवाय शरण. मुलीसकट बल्गेरियाला निघतो. कारण तिथे तांडवनृत्य करुन बालकांचे लैंगिक शोषण करणार्‍या आंतरराष्ट्रीय नरराक्षसांचा संहार करण्याचे स्क्रिप्ट विष्णुनेच लिहून ठेवले असते. त्यांतच संकर्‍याच्या मुलीचेच अपहरण होते. आरारारा! मग काय होणार ? तो तिसरा डोळाच उघडतो. एकदा तिसरा डोळा उघडल्यावर समोर येईल ते भस्म! शेवटच्या मारामारीत तर बर्फाचे डोंगर बघून शिवाय ला होमपिच मिळाल्याचा अत्यानंद होतो आणि बर्फाच्या त्रिशूळानेच तो म्येन व्हिलनचा वध करतो. आता या आधुनिक शंकराला मदत करायला, तिथली भारतीय एम्बसी, त्यातील आणखी एक पार्वतीचा रोल करायला उत्सुक असलेली सुंदरी मदत करते. शेवटच्या प्रसंगात पुन्हा ती अँग्लो-इंडियन मुलगी बापाला रडवते. साक्षात भगवान असल्यामुळे त्याला कुठल्याच देशाचे कायदेकानून लागू नसतात, कैलासावर परत येण्यासाठी.

चित्रपट संपल्यावर भगवान शंकराला मुलगी होती का, यावर गुगल शोध घेण्याचे मनोमन ठरवूनच ओम नमः शिवाय चा जप करत घरचा रस्ता धरला.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अगं बने! असा खराखुरा सिनेमा आहे?!

(नबा यायच्या आधी) अँग्लो इंडियन की बल्गो इंडियन? की इंडो बल्गेरियन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अँग्लो इंडियन की बल्गो इंडियन? की इंडो बल्गेरियन?

असे प्रश्न पडू देण्याच्या अगोदर प्रथम शंकर हा मुळात इंडियन नागरिक होता किंवा कसे, याचा तपास होणे आवश्यक आहे.

(अधिक तपशिलांकरिता: कैलास पर्वत)

(कथेच्या शेवटी बल्गेरियातील इंडियन एम्बसीचे लोक शंकराच्या वतीने इंटरव्हीन करायला मुळात तयार कसे होतात, तेच कळत नाही. बोले तो, भारतात कायमस्वरूपी आश्रयास आलेल्या तिबेटन रेफ्यूजीज़च्या वतीने भारताबाहेर इंडियन एम्बसी इंटरव्हीन करते काय? शिवाय (नो पन इण्टेण्डेड), याने तर मुळात कैलास पर्वतदेखील सोडलेला नाही; भारतात कायमस्वरूपी आश्रयास येण्याची बातच सोडा! मग व्हॉट क्लेम ह्याज़ ही टू कॉन्सुलर अक्सेस फ्रॉम अन इंडियन डिप्लोम्याटिक मिशन अब्रॉड? मुळात बल्गेरियन सरकारने इंडियन एम्बसीला या म्याटरमध्ये एंटरटेनच कसे केले?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(प्रतिसाद योग्य जागी हलविला आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हात्तेरेकी! असंए होय!
'शिवाय' ह्या नावाचा उच्चार ऐकल्यावर कुणाशिवाय? कशाशिवाय? असे प्रश्न सोडवणारा चित्रपट असावा असं वाटलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'शिवाय' ह्या नावाचा उच्चार ऐकल्यावर कुणाशिवाय? कशाशिवाय? असे प्रश्न सोडवणारा चित्रपट असावा असं वाटलं होतं.

...नुसतेच नाव वाचून 'माताय'च्या धर्तीवरची एखादी शिवी (नो पन इण्टेण्डेड)?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त! पिच्चर पहिला नाही, पाहीन असे स्वप्नात सुद्धा वाटत नाही. पण समीक्षण आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

यावर अमोल परचुरेने रिव्ह्यू दिलाय तो पण लै भारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0