संघ दक्ष, बातम्यांकडे लक्ष - भाग २

अनेक लोक अनेक वेळा अनेक ठिकाणी काहीतरी निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्खपणाची विधानं करतात. कधीकधी या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणांपायी नसताना हातापायीही होते. कधी हे प्रकरण तिथेच न थांबता दंगे होतात, ऑफिसं तोडली जातात, हल्ले होतात, बसेस जाळल्या जातात, खूनही पडतात. आजकाल या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणा करण्यात हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक, कट्टर राष्ट्रवादी संघटनांना, आणि मोदीभक्तांना ऊत आलेला आहे. तर हा धागा अशांची विधानं, कृत्यं, घोषणा वगैरेंची चेष्टा किंवा निषेध यांचं एकत्रित संकलन करण्यासाठी काढलेला आहे. यात काही काळ जुन्या बातम्याही चालतील - गेल्या दोनतीन वर्षांतल्या - पण अगदीच काहीतरी अनमोल रत्न असल्याशिवाय त्यामागे जाऊ नये.

प्रेस्टिट्यूट्स, सिक्युलर, विचारजंती, मोदीद्वेष्टे वगैरेंनी केलेल्या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणाबद्दलच्या बातम्या इथे मांडू नये, त्यासाठी स्वतंत्र धागा काढलेला आहे.

---

पाकिस्तान हा नरक नाही असे म्हटले म्हणून देशद्रोहाचा खटला टाकला.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/advocate-registers-case-ag...

जावडेकरांनी नेहरु, बोस, पटेल यांना पण फासावर चढवून नवीन इतिहास लिहिलाय.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/prakash-javadekar-says-neh...

field_vote: 
0
No votes yet

नेहरू, पटेल, बोस फासावर चढले!: जावडेकर

(अवांतर - 'न'वी बाजूंची बदनामी थांबवा.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही बातमी प्युअर खोडसाळ रिपोर्टिंग आहे. प्रेस्टिट्यूट धाग्यावर टाका.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

+१

व्हर्बल टायपो उर्फ टंग ऑफ स्लिप आहे म्हणजे बोलताना वाक्यात स्वल्पविराम/अर्धविराम राहून गेला.

पण आगाखान पॅलेस वि कोलू पिसणे वाल्या गटातून "असा" टंग ऑफ स्लिप होणे रोचक आहे.
-------------------------
पण संघाचे लोक प्रत्येक गोष्ट तोलून मापून विचारपूर्वक बोलतात असं म्हटलं तर ........ नव्या इतिहासाची बीजं दिसतात.

नेहरू, पटेल फासावर गेले. १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं नाही. ब्रिटिशांनंतर काही/बराच काळ इटलीचं राज्य होतं. त्यानंतर २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळालं. नरेंद्र मोदी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

टंग ऑफ स्लिप

बाकी सर्व असो, पण... 'टंग ऑफ स्लिप'??????

(बोले तो, तुम्हाला बायेनीचान्स 'स्लिप ऑफ द टंग' म्हणायचे होते काय?)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

बोले तो, तुम्हाला बायेनीचान्स 'स्लिप ऑफ द टंग' म्हणायचे होते काय?

हो तसंच म्हणायचं होतं पण चुकून "टंग ऑफ स्लिप" झाली. Wink

(मुद्दाम केलेली चूक एक्सप्लेन करावी लागली. कुठे नेऊन ठेवली 'न'वी बाजू आमची !!! )

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

हा हा हा. Smile
"नावात काय आहे असं तुकाराम म्हणाले आहेतच" या वक्तव्यावर अहो हे तर शेक्स्पिअर म्हणाला असं म्हणण्यासारखा होता न.बांचा प्रतिसाद.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

बोले तो, हे उद्धरण तुलसीरामायणातले नाही???

माय ब्याड!

असो.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

काशी से कुछ ग़रज़ थी न क़ाबे से वास्ता
हम ढूँढने चले थे मोहब्बत का रास्ता
देखा तुम्हारे दर को तो सर को झुका दिया
जब कुछ न बन सके तो दीवाना बना दिया

हमको तुम्हारे इश्क़ ने क्या-क्या बना दिया
जब कुछ न बन सके तो तमाशा बना दिया

काशी से कुछ ग़रज़ थी न क़ाबे से वास्ता
हम ढूँढने चले थे मोहब्बत का रास्ता
: क्या बात है! सुभानल्लाह! शायर "गब्बर सिंग " ?

नाय नाय. शिवान रिझवी किंवा एसेच बिहारी. चित्रपट - एक मुसाफिर एक हसीना

एसेच बिहारी हा अति इग्नोर्ड पण गुणवान गीतकार आहे असे माझे मत आहे. गब्बु पटतय का?

हो हो. गुणवान गीतकार होतेच. पण कदाचित ते लो प्रोफाईल मेंटेन करणारे असू शकतात की ज्यामुळे ते प्रसिद्धिझोतात आले नसतील व त्यामुळे इग्नोअर्ड राहिलेले असतील.

“आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. राजसत्तेमध्ये कुणावर तरी राज्य करतो असा भाव आहे. कुणी तरी राजा आणि कुणी तरी प्रजा असा भाव आहे. धर्मसत्तेमध्ये एकच भाव आहे आणि त्यागाचा भाव आहे.”

आता आपल्या मुख्यमत्र्यांनीच असं म्हटल्यावर काय बोलणार?

'पाकिस्तान झिंदाबाद' यापलीकडे आणखी काय बोलू शकणार?

(गेला बाजार, जीनांनी तोंडदेखले का होईना, पण 'तुम्ही तुमच्या देवळांत, मशिदींत, नाहीतर वाट्टेल त्या खड्ड्यात जायला मोकळे आहात, या राज्याला (पाकिस्तानला) त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही; नि कालौघात असे दिसून येईल, की (या पाकिस्तानात) हिंदू हिंदू राहणार नाहीत नि मुसलमान मुसलमान राहणार नाहीत - म्हणजे धार्मिक अर्थाने नव्हे, कारण तो ज्याच्यात्याच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे, तर एकाच राष्ट्राचे समान नागरिक या अर्थाने' वगैरे वगैरे म्हणण्याचा निदान बहाणा तरी केला होता. (शिवाय, अमेरिकन जनतेस उद्देशून केलेल्या (हे का, ते जीनाच जाणोत!) पाकिस्तानची भावी रूपरेखा मांडणाऱ्या आपल्या रेडियोवरील कोणत्याश्या भाषणात, 'कोणत्याही परिस्थितीत, पाकिस्तान हे ईश्वरी ध्येयाने प्रेरित मुल्लामौलवींनी चालविलेले धर्माधिष्ठित राज्य होणार नाही' असेही म्हटले होते.) पुढे काय झाले, तो भाग अलाहिदा. पण निदान उघडपणे बोलताना तरी...)

(पण काहीही म्हणा, कितीही झाले तरी आमचे हिंदू हे बोलूनचालून पडले हाडाचे प्रामाणिक. बोलायला एक नि करायला एक असे त्यांच्याकडून होऊच शकणार नाही! हरामखोरी जरी करायची झाली, तरी ती 'बाबांनो, ही अशीअशी हरामखोरी करण्याचा आमचा इरादा आहे', असे रीतसर जाहीर करून मगच करणार. चांगले आहे!)

------------------------------

धर्माशी (कोणत्याही धर्माशी) आमचे नेसेसरिली वाकडे नाही, परंतु धर्मसत्ता ही शुद्ध हरामखोरी आहे, असे आमचे प्रामाणिक मत आहे.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

" धर्मसत्ता ही शुद्ध हरामखोरी आहे"

हे तर सनातन सत्यच !!! १०० % सहमत

आता भारताचे आणि त्यातला त्यात महाराष्ट्राचे लवकरात लवकर तालिबानीकरण होणारच तर मग.
मध्यवर्ती सरकार या असल्या प्रतिगामी विचारांचे आल्यावर हे असे होणार याची कल्पना होतीच.
पण मग आम्ही पुरोगामी मंडळी प्राणपणाने विरोध करून हे तालिबानीकरण रोखण्याचा प्रयत्न करणारच आणी करतोच आहोत.
पण हाय अल्ला ! आता काय ? मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर आता उलटी गिनती सुरु झाली म्हणायची.
शेजारच्या बांग्लादेशाप्रमाणे प्राणांतिक हल्ले होण्याची शक्यता वाढली आहे. काय करावे बरे ?
एखाद्या पुरोगाम्यांच्या मानवाधिकारांची चाड असणाऱ्या देशात राजकीय आश्रय मागावा काय ?

wait ..... अर्रर्रर्रर्र पण आपण आत्त्ताच आपण या असल्याच एका देशात आहोत. मग आता काय करावे बरे ?
UNO मध्ये दाद माघावी काय ? काहीतरी हालचाल लवकरात लवकर केली पाहिजे.

Puri Shankaracharya claims computers have origin in Vedas

आधी वेद निर्माण झाले आणि नंतर सर्व आकाशगंगा त्या वेदांमधून प्रसवल्या असं म्हणून टाका ना.... वचने किं दरिद्रता.