आध्यात्मिक बाबा /गुरूंची मार्केटिंग टेक्निक्स

आध्यत्मिक बाबा /गुरु हि या लोकोत्तर विभूती अत्यंत हुशार आणि एकंदरीतच थोर असतात .
त्यांच्या व्यवसायाला जगभर डिमांड तर भरपूर आणि कायम आहेच पण हे मार्केट तसे tricky आहे. Organised religions हे खरे तर यांचे इंटर्नल established competitors . पण आपला ब्रँड एस्टॅब्लिश कसा करावा , त्यातिल आपले niche मार्केट कसे डेव्हलप करावे , सस्टेन्ड ग्रोथ कशी करावी या बाबतीत कुठल्याही मॅनेजमेंट बाबा /गुरु ला लाजवतील अशी टेक्निक्स हि मंडळी वापरतात . स्वतःच्या व्यवसायाबद्दल अत्यंत ऑब्जेक्टिव्हली आणि रॅशनली विचार करणारी हि मंडळी असावीत . एकेकाळी या व्यावसायिकांच्या वर मी भयंकर चिडून बिडून असायचो (आदूबाळ च्या भाषेत तरुण था मय ) आजकाल मात्र या थोर व्यावसायिकांची मार्केटिंग टेक्निक्स बघून मी थक्क होतो . स्पेक्ट्रम च्या एका बाजूला महाराष्ट्रातील निमग्रामीण आणि निमशहरी भागातील आर्थिक कनिष्ठ वर्गात गेल्या १० -१५ वर्षात प्रचंड एस्टॅब्लिश झालेला ब्रँड नरेंद्र महाराज आणि दुसऱ्या एन्ड ला ओशो ते श्री श्री .... निखळ करमणूक ...... केव्हातरी मी या धाग्यावर मी नरेंद्र महाराजांच्या मार्केटिंग टेक्निक बद्दल लिहीन या धाग्यावर .... कोणाकडे असले काही इनपुट्स असले तर इथे शेअर केल्यास धमाल येईल टीप : यात एस्टॅब्लिश्ड धर्म पकडत नाहीये आणि मी कोणाच्याही श्रध्दा स्थानाच्या धोतराला हात घालायच्या हेतूने हे लिहीत नाहीये ( मी सफाईने टणाटण चे नाव घेतले नाहीये )

field_vote: 
0
No votes yet

मी नरेंद्र महाराज या गृहस्थांवर फार लिहिणार नसून त्यांच्या मार्केटिंग टेक्निक्स बद्दल थोडे लिहीत आहे कारण त्यांनी वापरलेल्या मार्केटिंग टेक्निक्स बद्दल मला कुतुहूल युक्त आदरच ( !) आहे. ( या गृहस्थांवर बहुधा साती आणि गब्बर जास्त लिहू शकतील .... जास्त लोकल knowledge असल्यामुळे ) हे गृहस्थ पूर्वी सरकारी नोकरीत असावेत . यांचा client base हा निमशहरी आणि निम ग्रामीण भागातील फार जास्त शिक्षित नसलेला समाज असावा ( आमचा ड्राइवर परम भक्त आहे ) या समाजाच्या मानसिक गरजा आणि अध्यात्मिक भूक (बहुधा )जाणून हे गृहस्थ ती गरज /भूक भागवत असावेत . पश्चिम महाराष्ट्रातल्या एका मोठ्या समाजघटकावर त्यांचा प्रभाव आहे. त्यांनी ज्या पध्धतीने मार्केटिंग मेथोड्स अपग्रेड केल्या आहेत ते भयंकर इंटरेस्टिंग आहे. बाबांच्या नावाचे पेन , गंडे , पेंडंट , स्टिकर अश्या चिल्लर गोष्टी त्यांनी केव्हाच मागे टाकल्या आणि एक नवा मार्केटिंग अप्रोच या व्यवसायात आणला .
१. ब्रँड बिल्डिंग : साधारणपणे अर्धशिक्षित समाजाच्या मनावर जी स्लोगन्स एस्टॅब्लिश्ड असतात किंवा अपील एस्टॅब्लिश्ड असते त्याच्याशी स्वतःला जोडून घेणे : उदाहरणार्थ : साधारण २००० सालच्या आसपास छोटया शहरांमधे ( उदा संगमनेर ) बोर्ड दिसू लागले : स्व स्वरूप संप्रदाय नरेंद्र महाराज , गण गण गणात बोते नरेंद्र महाराज ,जगा व जगवा ( किंवा तत्सम ) नरेंद्र महाराज . अश्या छोट्या शहरांमध्ये छोटे छोटे भक्तगट सुरु व्हायला सुरुवात झाली
ब्रँड बिल्डिंग २ : रुजू घातलेल्या ब्रँड चा विस्तार व्हिजुअल बमबारबर्डमेंट करून ब्रँड बेस पक्का करणे : फोटू वाले पेन , गंडे, पेंडन्ट , स्टिकर वगैरे चिल्लर आयटम बरोबरच महाराजानी मग एक कॅलेंडर काढलं : महिना १ : विवेकानंदांच्या डिरेस मध्ये म्हाराज महिना २ श्रीकृष्णाच्या डिरेस मध्ये ( मुकुट वगैरे घालून ) महाराज .... वगैरे ( शिवाजी महाराज सुटले बिचारे या फोटू मधून ) कॅलेंडर लै पॉप्युलर झाले
एका बाजूला भक्तांच्या पर्मनंट दर्शन सोयीकरिता नाणीज आश्रमाचा विस्तार चालू होताच ( अजूनही चालू आहे ) अनुग्रह देण्याची शिष्टीम , महाराज पत्नींनी लिहिलेले चमत्कार युक्त चरित्र ज्याची तुफान विक्री वगैरे हे व्यवस्थित जोरात चालू आहेच Revenue generation for ऑपरेटिंग एक्सपेन्सेस साठी अधून मधून फंड रेसिंग ड्राइव्स पण चालतातच

स्टेप ३ Upgradation ; महाराजांनी मधल्या काळात स्वतःला अपग्रेड करून आता ते स्वामी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज , दक्षिण पीठ , नाणीज झालेले आहेत .
स्टेप ४ : ग्लोबल अपील तयार करणे : ४ -५ वर्षांपूर्वी स्वामींनी उत्तर अमेरिकेचा दौरा करून प्रवचने मुलाखती वगैरे धमाल केली ( माझे वैयक्तिक मत : बऱ्याच public figures चा अमेरिकेचा दौरा हा भारतातल्या लोकल अपील करता जास्त असतो . याची इतरही उदाहरणे आहेत . जगातल्या सर्व भागांप्रमाणेच तिकडेही काही देशी खुळे, काही गोरे खुळे भेटतातच मुलाखती वगैरे घ्यायला ,) त्याचे भारतात अपील लै होते . या नुसार यांचेही भक्त लै खुश आणि impressed आहेत . स्वामींना सारखे अमेरिकेत ( सुध्दा ) कसे बलावले जाते आणि तिकडे त्यांचा कसा वट आहे या गोष्टी भक्तवर्गाकरिता आनंदाच्या आणि अभिमानाच्या आहेत
स्वामी आता ग्लोबल अपील असणारे बिग लीग अध्यात्मिक गुरु झाल्यामुळे माझा त्यांच्या पुढील प्रगतीमधील इंटरेस्ट संपला .

अवांतर : १. बघा यू ट्यूब वर इंडिया "India forums Jagadguru narendracharyaji part १ अँड २
२. बघा यू ट्यूब वर " नरेंद्र दाभोलकर ओपन चॅलेंज

Disclaimer : मी नरेंद्र महाराजांचा शिष्य किंवा विरोधक नसून त्यांच्या मार्केटिंग टेक्निक्स नि इंप्रेस झालेला एक माणूस आहे. नरेंद्र महाराज व त्यांचे शिष्य अनुयायी यांना दुखावण्याचा यात हेतू नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही थोड्याशा चिल्लर करेक्शन्स आणि ऑब्झर्व्हेशन्स बापटाण्णा.
गण गण गणात बोते हे शेगावींच्या गजान महाराजांचे. ह्यात थोडासा चेंज करुन न.महाराजांनी 'गणी गण गणात बोते' काढले. (दोन्हीचा अर्थ अथवा भाषा मला माहीत नाही)
सुरुवातीचे नमहाराज तब्येतेने किरकोळ दिसत. मी फोटो पाहिले आहेत. आमच्या कोल्हापुर येथील महाविद्यालयात शिकणारे रतनागिरी साईडचे दोघे जण त्यांचे फोटो हॉस्टेलात बाळगायचे. आम्ही चेष्टा करायचो.
नंतर एकदम पाहण्यात आले त्यांचे भगवे पेन, क्लिपा आणि डायर्‍या. मी पाहिले जास्त करुन रोहा, अलिबाग, महाड, कोल्हापुर अशा डेपोच्या कंडक्टरांकडे.
काही दिवसांनी/वर्शांनी त्यांच्या सत्संगाचे पोस्टर अखिल महाराष्ट्रातील स्टॅन्डवर आणि बसेस वर दिसु लागले. (प्लीज नोटीस द स्पॉट्स. दुसरीकडे कुठेही नाही पाह्यले)
त्यानंतर काही वर्शानी तरुण भारत, विवेक अशा प्रकाशनात त्यांनी केलेल्या धर्मांतरिताच्या शुध्दीकरण चळवळी प्रकाशित होउ लागल्या.
त्यानंतर काही वर्शानी तरुण भारत, विवेक अशा प्रकाशनात त्यांनी नाणीज येथे केलेल्या कार्याच्या गौरव्पर बातम्या प्रकाशित होउ लागल्या.
त्यानंतर काही वर्शानी तरुण भारत, विवेक अशा प्रकाशनात वैयक्तिक त्यांच्याबद्दल विविध टाइपच्या बातम्या आणि प्रवचने पण (उदा. हिंदू जनजागरण, नेत्यांच्या भेटी, स्ंमेलने)प्रकाशित होउ लागल्या.
त्यानंतर काही दिवसानी त्यांच्या धर्मपीठ संदर्भात बातम्या प्रकाशित होउ लागल्या.
त्यानंतर काही दिवसानी त्यांच्या शंकराचार्य घोषणासंदर्भात बातम्या प्रकाशित होउ लागल्या.
नंतर डायरेक्ट त्या शंकराचार्य रुपात मी पोस्टरवर पाहिले. (ते खांद्यावर छोटा ध्वज, आडवे गंध वगैरे)
.
बस्स इत्ताईच मेरेकू मालूम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो correction नाय हो addition हि ...चांगली आहे , यकदा अम्रीकेतली मुलाखत यू ट्यूब बघा , लय मज्जा !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही म्हटता ते इतरही ठिकाणी लागू आहेच.
१)लोकांना ( गिह्राइकाला )काय पाहिजे ते ओळखायचे ,ते त्याला द्यायचे आणि आपल्याला काय हवे ते घ्यायचे.
२)सुखसोयी दिल्यास धर्यादाय संस्थे अंतर्गत मिळणारी करमाफीमुळे कॅास्टकटिंग होते.
३)काही प्रसिद्ध व्यक्तिंची भेट अप्रत्यक्ष घडवून आणतात.गुप्तता पाळली जाते.मध्यस्थी करतात.
नावं घेऊन सांगण्यासारखे पुरावे नसतात पण यामागे खूप मोठा आंतरराष्ट्रिय घपला(रॅकेट)असते.
४)बहुतेक पासवर्ड देतात त्याचा वापर करून व्यवहार पक्का केला जातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पंधरावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते दिवस असे होते की त्यादरम्यानच नरेंद्र महाराजांबद्दल बरंच काही वृत्तपत्रात छापून येत असे. अर्थातच वादग्रस्त मजकूर.

याच कालात... मी व माझे दोन मित्र एकदा कर्‍हाड हून रत्नाग्रीस जात होतो. मित्राची कार होती. कोल्हापुरात एक काम होते व दुपारचे जेवण पण कोल्हापूरात घ्यायचे म्हणून कोल्हापूर मार्गे जायचे ठरले. कोल्हापूर ते रत्नाग्री रस्त्यावर कुठलेसे एक गाव आहे तिथे रस्त्याला लागूनच एक मंदिर आहे. मोठे थोरले मंदिर. मंदिर आहे म्हणून आम्ही तिथे जाताजाता दर्शनास गेलो. दुपारचे दोन-अडीच वाजलेले असावेत. दर्शनास जाताना आम्हाला हे माहीती नव्हते की इथे काही कार्यक्रम चालू आहे... किंवा कसे ते. तिथे नरेंद्र महाराजांचे व्याख्यान/प्रवचन चाललेले होते. मंदिरात प्रवचनास अनेक लोक बसलेले होते. तिथेच सभामंडपात भक्तगणातील एका बाईच्या मुलाने शी करून ठेवलेली होती. त्याचा घाण वास येत होता. आम्ही तिघे वैतागून मंदिराच्या सभामंडपातूनच वापस फिरलो. व बाहेर जाताना नरेंद्र महाराजांचे आम्हाला उद्देशून "ते पहा चाललेले आहेत ... हेरगिरी करायला आलेले होते ते ... गुप्तहेर" असे सुवचन** ऐकू आले. आणि आम्ही धन्य झालो. माझी कुंडलिनी तिथेच जागृत झाली. इडापिंगलासुषुम्ना असा (काय शिंची कटकट आहे...) प्रवास करत सगळ्या चक्रांना जागृत करत ती माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचली व आत्मसाक्षात्कार सुद्धा झाला.

हा प्रतिसाद मुद्दाम नरेंद्र महाराजांच्या शिष्यांना दुखवण्यासाठीच दिलेला नाही. पण आजकाल कुणीही कशानंही दुखावला जातो. तेव्हा त्यांची मनं दुखावली गेली तर ते गेले उडत.

------------

** मंदिरात आमच्या शिवाय दुसरे कोणीही उभे/चालत नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही "हा असा" प्रतिसाद देणार हे बाबांनी केव्हाच म्हणजे तेव्हाच ताडलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वस्तात सुटका झाली तुमची असं समजा !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो ना अभूतपूर्व फॅनॅटिक भक्तगण चिडले नाहीत हे नशीब. येडपट कुठचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिलं म्हणजे - अनेक आभार! "सामाजिक बाबीकरणा"च्या एकंदर प्रक्रियेबद्दलच मला फार फार उत्सुकता आहे.

माझी निरीक्षणं / थियरीज / किस्से विस्कळित स्वरूपात लिहितो.

मायक्रो-बाबा
इथे सोयीसाठी 'बाबा' म्हटलं असलं तरी हा लिंगनिरपेक्ष प्रकार आहे. बाबी देखील असू शकते.

प्रचंड जनाधार असलेल्या "मेगा-बाबां"ची ऑर्गनायझेशनही मोठी असते. मेगा-बाबा निस्पृह आहेत असं जरी मानलं तरी त्यांना सगळीकडे कंट्रोल ठेवणं शक्य होत नाही. मग निरनिराळ्या प्रकारचे / पातळ्यांवरचे गैरप्रकार मेगा-बाबांचे एक्झिक्युटिव्ह भक्त करतात. काही सामान्य / नॉन-एक्झिक्युटिव्ह भक्तांना ते दिसतं/खटकतं आणि ते व्यथित होऊन मेगा-बाबांच्या संप्रदायापासून दूर जाऊ लागतात.

पण अध्यात्मिक भूक भागलेली नसतेच. एन्टर मायक्रो-बाबा. मेगाबाबांच्या मार्केटिंग / ब्रँड डेव्हलपमेंट कँपेनमधल्या एका कच्च्या दुव्याचा फायदा मायक्रो-बाबा घेतात.

मेगा-बाबांचा एक विशेष असतो. ते कधी "तुमचे देव झूठ आहेत. मीच सर्वशक्तिमान ईश्वर." असं म्हणत नाहीत. जनमानसांत आगोदरच रुजलेल्या देवभावनेवर आपला ब्रँड बेततात. (उदा० साईबाबा दत्ताचे अवतार.) यामुळे मार्केट पेनिट्रेशन सोपं जात असावं. मायक्रो-बाबा याच दोरीला पुढे ओढून म्हणतात - क्ष देवाचा अवतार मेगा-बाबा, आणि तितकाच / तेवढ्याच ताकदीचा त्यांचा पट्टशिष्य/गुरुबंधू/सहानुग्रही मी - मायक्रो-बाबा!

अशा प्रकारे "ब्रँड प्रोपोझिशन" तयार होतं. मग उपरोल्लेखित "व्यथित सामान्य भक्तां"ना आपल्याकडे आकर्षित करणं हे काम. ते कसं करायचं? तर मेगा-बाबांच्याकडे ज्या गोष्टी खटकल्या, त्याच्या दुसर्‍या टोकाच्या गोष्टी करणे. उदा. (मेगा-बाबा) ठरलेल्या वेळांतच दर्शन देणे वि० (मायक्रो-बाबा) दिवसाच्या कोणत्याही वेळेला उपलब्ध असणे. (मेगा-बाबा) भक्तांच्या लायनी वि० (मायक्रो-बाबा) एक्स्क्लुजिव्हिटी / पर्सनल टच (मुलीच्या दहावीच्या वेळेला फोन करून आशिर्वाद देणे. अभिमंत्रित पेन भेट म्हणून देणे.)

मग मॉनेटायझेशन.

मेगा-बाबांनी आपल्या फिक्स्ड कॉस्ट वाढवून ठेवलेल्या असतात. भक्तांचे ताफे, हिमालयात आश्रम, चकाचक वेबसाईट. त्यामुळे सतत मॉनेटायझेशन करत राहणे ही अपरिहार्य गरज बनते. उलट मायक्रो-बाबा एकूणच इकॉनॉमीज ऑफ स्मॉल स्केलचे बंदे असतात. मायक्रो-बाबा, मायक्रो-बाबा-पत्नी, एखाद-दोन मुलं. त्यांचे खर्च असे कितीसे असणार? पुन्हा मायक्रो-बाबांना डोकं असलं तर त्यांनी भक्तही चांगले निवडलेले असतात. मॉनेटायझेशनच्या अदृश्य पद्धतींविषयी नंतर तपशीलवार कधीतरी. आणिक साईड/मार्जिनल बिझिनेस असतातच. (उदा. मायक्रो-बाबा-पत्नी देवगडच्या असल्या तर आंब्यांचा पुरवठा बाय डिफॉल्ट त्यांच्याकडून होतो. मायक्रो-बाबांचा मेव्हणा इन्शुरन्स एजंट असतो, वगैरे.)

मायक्रो-बाबा महत्त्वाकांक्षी असतील तर स्केल वाढवून मेगा-बाबा होऊ शकतात. किंवा स्पेशलायझेशन करू शकतात. उदा. नर्मदा परिक्रमा करणारे मायक्रो-बाबा, फेसरीडिंग करणारे मायक्रो-बाबा, वगैरे. पण बरेच मायक्रो-बाबा आहे त्यात समाधान मानून राहतात.

अवांतरः ऐसीच्या एखाद्या भावी विशेषांकासाठी 'अध्यात्मिक गुरु / बाबा' हा विषय एक नंबर आहे.

_________________________________

एक्झिक्युटिव्ह भक्त म्हणजे मेगाबाबांची भक्ती हा पूर्णवेळ व्यवसाय असलेले भक्त. बर्‍याचदा हे आश्रमाबिश्रमात कार्यकारी पदांवर असतात. याउलट सामान्य / नॉन एक्झिक्युटिव्ह भक्त म्हणजे लायनीत उभं राहून प्रसाद घेणारे.

अतिशयोक्ती नाही. हा प्रकार याचि डोळा पाहिला आहे

चार पैसे बाळगून असलेले, आणि ते सोडण्याइतका भोटपणा असलेले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

मॉनेटायझेशनच्या अदृश्य पद्धतींविषयी नंतर तपशीलवार कधीतरी.

तुमच्या 'नंतर कधीतरी'ची यादी प्रचंड वाढलेली आहे हे नोंदवून मी खाली बसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉरी Smile

अदृश्य मॉनेटायझेशन हा खरोखरच अतिशय मनोरंजक प्रकार आहे. ते सगळं नेटवर्क उभं करायला या मायक्रो-बाबांनी अक्षरशः वर्षं वेचलेली असतात. ते सगळं या प्रतिसादात अवांतर झालं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

आबा तुम्ही फार अवांतर करता. चला अवांतर सोडून, त्याच विषयाचे पटापट डिट्टेलवार धागे काढा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सामाजिक बाबी करण , वा !! शब्द आवडला ...भारी analysis आहे ... ( एकदा मी अवांतर लिहिलेले दोन्ही references यू ट्यूब वर बघाच ... गुरुजींचा उपदेश एका ते त्या मुलाखतीत आध्यत्मिक उपदेश करताना म्हणतात आदमीने स्टेडफास्ट होना चाहिये .... हे वाचून मी गडाबडा लोळलो होतो . अत्यंत unglobal बॅक ग्राउंड वरून येऊन ग्लोबल लेव्हल ला ( म्हणजे जी आपल्याकडे इंग्लंड मधून चालू होऊन अमेरिकेत संपते ) फारसे शिक्षण नसतानाही करेक्ट साऊंडिंग keywords टाकण्याची क्षमता ही माणसे कुठून आणतात ? टेलिप्रॉम्प्टर च्या जमान्यात स्वामी अजून ग्लोबल स्टेज गाजवतील अशी मला खात्री आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बापट बाबा आणि आबा बाबा दोघांची प्रवचनं गंमतीशीर आहेत. अभ्या अजूनही भक्त मंडळींपैकी वाटतोय; साधं सरळ लिहितोय. अनुभवी मंडळींनी आणखी लिहावं अशी विनंती.

ह्या सगळ्या प्रकारातून करमणूक करून घेणं दुष्टपणाचं आहे हे समजतंय, पण थांबवता येत नाही तर निदान करमणूक करून घ्यावी हा विचार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थत्ते चाचा नि दिलेला मिपा गृहपाठ केलेला असल्याने आता आम्हालाही करमणूक करून घ्यायची आहे तेव्हा सांगा आपणास पहिला भक्त/ अनुयायी मिळाला का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभ्या अजूनही भक्त मंडळींपैकी वाटतोय; साधं सरळ लिहितोय.

डोंबलं..
मी आणि भक्त?
कितीतरी लोकल महाराजांना फोटोशॉपात तेजोवलय प्राप्त करुन देणारा मी त्यांचा भक्त?
मी स्वतः तेजोवलय दिलेय, शंकराचार्यांचे ड्रेस दिलेत, एका म्हाराजाला हातावर पायावर शुभचिन्हे दिलीत. एका महाराजाला तर त्याचा हात फोटोत नीट आला नाही म्हणून स्वतःचा हाताचा फोटो लावून दिलाय. त्या फोटोतल्या महारा़जांच्या लांब बोटांचे कौतुक एका भक्ताकडूनच एकून धन्य झालोय. कित्येक महाराजांना सोन्या चांदीची आसने दिलीत बसायला. मठाचे मंदीराचे अपूर्ण काम पूर्ण करुन दिलेय. नसलेल्या शिखरावर सोन्याचा कळस बसवून दिलाय. एका महाराजांच्या छातीवर राम पंचायतन बसवून दिलेय. एकाला त्याच्या पूर्ण गुरुपरंपरेसहीत गॅलक्सीत बसवलेय. एकाच्या पत्र्याच्या गाडीवर सोन्याचा मुलामा लावून दिलाय. समोरच्या प्रवचनातील ३० लोकांच्या घोळक्याला लाखालाखाच्या गर्दीत ट्रान्सफर करुन दिलेय. कित्येकांना सेलिब्रिटीसोबत उभे केलेय. इव्हन सेलिब्रिटींना माहाराजांच्या पाया पडायला पण लावलेय. एकाच्या तर पाया पडायला मी घोडा आणि हत्तीला पण भाग पाडलेय. एवढे असताना मी भक्त????
मी भक्त फक्त अ‍ॅडोब फोटोशॉपचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

SmileSmile
बोटांच्या कौतुकाचा सेम किस्सा माझ्या मित्राच्या बाबतीत झाला होता. बाबाच्या फ्लेक्स वरच्या फोटो मधले हात याचे होते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखादं तरी चित्र दाखव ना आम्हाला! एक चित्र हजार शब्दांचं काम करेल; हे बापट बाबा आणि आदूबाळ* बाबा किस झाड की पत्ती, असं म्हणता आलं पाहिजे सगळ्यांना.

पहिला भक्त मला मिळणं कठीण. शेवटी मी पडले हस्तिदंती मनोऱ्यात, एसीत आणि गुबगुबीत खुर्चीत बसून वायफळचे मळे पिकवणाऱ्यांतली!

*प्रत्यक्ष आबा नामक आयडी आल्यामुळे आदूबाळ असं पूर्ण नाव वापरणं क्रमप्राप्त आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उदा: हा महाराज म्हणजे आयटीत काम करणारा मिपाकर मित्र आहे. कोण असावा ते तुमचे तुम्ही पहा.
baba

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्या देवांना चार-सहा-आठ हात असतात. आणि महाराजांचा 'ठाकूर'!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या महाराजांनी स्त्री आयडी घेउन एक धागा काढून पदार्पण केले होते मिपावर. मग उघडे पडल्यावर खर्‍या नावावर आले. सध्या एका रोमन सम्राटाच्या नावाने वावरतायत. जिथे तिथे अध्यात्म हा यांचा स्थायीभाव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे वा बाळमहाराज, चेहरा न पाहता तुम्ही कुंडली मांडलीत कि, खरे महाराज आपणच आहात. धन्य हो.
बोला अंतरज्ञानी बाळमहाराज कि जय.
.
बादवे आपला अंदाज चुकला बरंका. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंदाज कसला. खरडफळ्यावर तुम्ही स्पष्ट लिहिल होतं याबद्दल... Smile
आणि फेसबुकावर त्यांच ते प्रोफाइल पिक आहे सध्या. फक्त चेहेरा ब्लर केलेला आहे म्हणून ओळखण्यासाठी कोणा अंतर्ज्ञानी बाबामहाराजांची गरज नाही.
आता अंदाज चुकला म्हणायलाही वाव नाही .. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाळमहाराज ह्या इमेजमधील काय काय त्या आयडीचे आहे सांगू शकाल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जे समजायचय ते समजलं बाकी डिटेल्स विचारून नक्की काय साध्य करायचय??

बाकी तुमच्या समाधानासाठी- चेहेरा सोडून सगळं फोटोशॉपमधलं मटेरिअलच दिसतय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अं अं,, चेहरा तर नाहीच इथे. तरी पण फोटोशोपच्या कलाकारीला तुम्ही त्या आयडीचे नाव देऊन त्याची कुंडली मांडून मोकळे झालात की नै. महाराज लोकांनापण हेच साध्य करायचे असते. आणि ते करतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो चेहेरा इथे ब्लर केला असला तरी ओरिजिनल फोटो बघितल्यावर त्या फोटोतला चेहेरा ब्लर करुन हा फोटो केलाय हे सांगायला अंतर्ज्ञानाची गरज नाही..

तुम्ही हा मुद्दा (चेहरा तर नाहीच इथे) काढणार हे माहीत होतं .. म्हणूनच विचारलं की नक्की काय साध्य करायचय तुम्हाला??

बाकी ब्लर करून चेहेर्‍याचे फक्त काही अ‍ॅट्रीब्युट्स लपवता येतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेहेहेहे
मला साध्य कुठे काय करायचय?
अदिती म्हणली "एखादं तरी चित्र दाखव ना आम्हाला! एक चित्र हजार शब्दांचं काम करेल;" तेवढ्यासाठीच ते टाकले.
आता तुम्ही सांगा ना प्लीज, ती कुंडली मांडून तुम्ही काय साध्य केले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही चित्रात कुंडली मांडलीत.. मी ती वाचली ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या महाराजांनी स्त्री आयडी घेउन एक धागा काढून पदार्पण केले होते मिपावर. मग उघडे पडल्यावर खर्‍या नावावर आले. सध्या एका रोमन सम्राटाच्या नावाने वावरतायत. जिथे तिथे अध्यात्म हा यांचा स्थायीभाव आहे.

सही जवाब! १० पैकी १० मार्कस. गुण!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्री श्री अभ्या!
बाबांचे बाबा!. महाराजांचे महाराज!!. इच्छापूर्ती महाराज!!!.
ता.क. : काही महाराजांना हातावर शुभचिह्ने हवी असतात. स्वस्तिक, ओम्, त्रिशूळ वगैरे. एका महाराजांचा हात आणि वरदहस्त फोटो लगोलग पाहायला मिळाला होता. हातात नव्हते ते फोटोत होते. (तेव्हा हस्तसामुद्रिकाविषयी कुतूहल होते म्हणून लगेच लक्ष्यात आले.) फोटोतला हात पाहून 'बघूया तरी' म्हणून भेट घेतली होती. हे महाराज हात हवेत पालथा ठेवून आशीर्वाद देतात हेही समजले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFLROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकरणं दाबून टाकण्यासाठी निरनिराळ्या क्षेत्रातील लोक कोणी मध्यस्थाच्या शोधात असतात.महाराज ते काम करून टाकतात ( consideration).ते काम नक्की कोणी केलं हे जाणण्याची इच्छा नसते.काम बिनबोभाट होणे गरजेचे असते.
१ )अे लिस्टातला मंत्री हेलि ने थेट आश्रमात,एका मातीने लिंपलेल्या झोपडीत ध्यान करून निघून जातो.अर्ध्याएक तासाने एका मोठ्या अे लिस्टातल्या उद्योगपतिलाही ध्यान करायची उर्मी येते.--------.एखादं डील.
२)लाच खाणे इत्यादीत पकडला गेलेला अधिकारी- त्याला कोणीतरी बाबांकडे नेतो - पायावर घालतो- अडचणीतून सुटका.
भक्तांना अडचणीतून सोडवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हात पोहोचलेला बाबा पावरफुल होतो.
३)निरनिराळे भक्त 'मिळवणाय्रा'चेल्याचं प्रमोशन होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याचं जुनं अ‍ॅनालिसिस आपल्या गुर्जींनी केलेलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रतिसाद काढला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही.
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद चांगला होता की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

का हो ? ल्याह कि !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण लिहावे या करता आज जगद्गुरू नरेंद्राचार्यांना साकडे घालावे का ? त्यांच्या कडून आदेश आल्यावरच लिहायचे वगैरे असे तर नाहीये ना ? जगद्गुरूंच्या नवीन चमत्कारी कहाण्या ऐकण्यासाठी हा भक्त उत्सुक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नुसत्या नरेंद्रांवर नका अडकू. पाठोपाठ, निर्मल महाराज, कृपालु महाराज, आनंदमयी माँ, आणि अशा असंख्य माँ आणि बाबाजींची टेक्निक्स सांगा. आता रिटायर झालोय, तर एखादा नवीन व्यवसाय सुरु करीन म्हणतो. म्हणजे तिरशिंगमहाराजांनी लाथ मारली, म्हणजे केवढी कृपा झाली ... असल्या आख्यायिका सुरु करीन म्हणतो, बस्तान बसल्यावर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती

मला इतरांची मार्केटिंग टेक्निक्स माहित नाहीत. आपणच भर घालावी.पण त्यातल्या त्यात आपल्याला पटतो निर्मल बाबा , दोन गोष्टींकर्ता 1. त्याच्या जाहिरातीत चक्क लिहिलेलं असतं कि बाबा का अगला 'शो' अमुक तारीख को तमुक थिएटर मे होगा. उगाच सत्संग , अनुग्रह अशी फसवाफसवी नाही . माणूस खरच निर्मळ असणार . 2. तुफान करमणूक कोशन्ट !!!! या माणसा इतकी भीषण असंबद्ध आणि ठार विनोदी उत्तरे Mad magazine मध्ये सुध्दा सापडणार नाहीत. "बाबा बेटी कि शादी नाही हो रही , क्या करे " चे उत्तर कलसे माखन खाना छोडो किंवा हवाई जहाज चलाना सिखो यापैकी काहीही असू शकते ,,,, आपण जबरी फ्यान आहे असल्या प्रश्नोत्तराचे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा. सहमत. त्यांचा 'शो' फारच विनोदी असतो. काय ते मुसमुसणारे भक्त. "मेरे नजर के सामने ये चॉकलेट क्यू आ रहा है" अशी सुरूवात करत. ' गरीबोंमे १ कि. चॉकलेट्स बाट दो' पासून ते 'रोज भगवान का नाम लेकर एक चॉकलेट खाओ' पासून सुचवलेले भन्नाट तोडगे. वेळ जात नसेल तर जरूर पहावा. हम्खास करमणूक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माता अम्रुतानन्द मयी नावाच्या एका मासाहेबन्चे चक्क एक वैद्यकीय विद्यपीठ आहे.म्हणजे किती माया गोळा केली असेल? या सर्व सन्त महन्तान्मुळे आपला महान देश कुठे चाललाय हेच कळेनासे झाले आहे. जगद्गुरू नरेन्द्राचर्य महाराज हे तर सरकारी खात्यात अफरातफर करुन आल्याच्या अख्यायिका व्रुत्तपत्त्रान्मधून वाचल्याच्या आठवतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां तर अदृश्य मॉनेटायझेशनचं एक उदाहरण.

-----
नाशिकच्या अंबड/सातपूर एमायडीश्यांमध्ये ऑडिटांसाठी जात असे. एकदा असाच "फायनान्शियल प्रोसेस ऑडिट"साठी एका कंपनीत गेलो होतो. पर्चेस प्रोसेसचं ऑडिट होतं. पर्चेसवाले लोक कार्गोच्या दाराजवळ एका पिंजर्‍यात बसतात. आसपासच्या ब्लू कॉलर्ड कामगारांपेक्षा आपण वेगळे / व्हाईट कॉलर्ड हुच्च आहोत हे दाखवण्यासाठी त्यांच्या पिंजर्‍यात माळावर गुरं सोडावीत तसा एसी सोडलेला असतो, किंवा कोणतंतरी भयानक एरोसोल मारलेलं असतं.

या कंपनीच्या पर्चेस पिंजर्‍यात चक्क धुपाचा सुगंध. पिंजर्‍यात सगळीकडे देवादिकांच्या तसबिरी. डॉटमॅट्रिक्स प्रिंटरला गंधाचं बोट. पर्चेसवाला माणूसही एकदम आध्यात्मिक दिसणारा. गळ्याला विभुती वगैरे. ही कंपनी जागतिक दर्जाच्या अडग्यांनी भरलेली होती. एखाद्याने त्रास द्यायचा ठरवला तर अत्यंत चिवटपणे देत असे. म्हणून मी आधीच त्यांच्याशी विनम्रपणे वागत असे. हे संतमणी पाहिल्यावर एमेन्शीचा धर्म टाकून, गळ्यातल्या पट्ट्याशी प्रतारणा करत रीतसर नमस्कार केला, हातात कार्ड दिलं आणि डेटाची मागणी केली.

आश्चर्य म्हणजे संतमणींनी अगदी हातातलं काम बाजूला ठेवून डेटा उपसून दिला. शंकांचं त्वरित निरसन केलं. काही कागदी घोडे पुराव्यादाखल पाहिजे होते ते बिनतक्रार मिळवून दिले. माझा आध्यात्माच्या सात्विक शक्तीवर एकदम विश्वास बसला. मेच्या ऐन उन्हाळ्यात मला त्यांच्या पिंजर्‍यात फारच प्रसन्न वाटत होतं म्हणून तिथेच बसलो. संतमणींचं निरीक्षण करावं हा हेतूही होताच.

तर संतमणींना सतत फोन येत तरी असत किंवा ते करत तरी असत. साधारण एक इनकमिंग :: तीन आऊटगोईंग असं प्रमाण होतं. प्रत्येक फोनवर ते हॅलोच्या जागी त्यांच्या ट्रेडमार्क वाक्याचा उच्चार करत. मग अत्यंत पेट्रनायझिंग आवाजात संभाषण. त्या संभाषणात काही अत्यंत आश्चर्यकारक वाक्यं असत. उदा. "...विलास! चेक आला का बाळा?" किंवा "सिद्रामला सांग मिळेल ऑर्डर. श्रद्धा ठेव." किंवा "पुढच्या महिन्यात अकरा तारखेला सत्संग ठेवला आहे, त्याच्या आधी तुझी वर्कॉर्डर सुटेल असं मला आतून वाटतंय."

हे "मिक्सिंग ऑफ वर्क अँड प्लेझर" काही मला समजेना. म्हणजे फोनवर हा माणूस क्षयझ कंपनीच्या पर्चेस मॅनेजरच्या हैसियतीने बोलतोय की अबक संप्रदायाच्या अध्वर्यूच्या हैसियतीने?

त्या भेटीत काही ते गूढ उकललं नाही. पण संतमणी वेळोवेळी दिसत होतेच. कँटीनमध्ये, पोर्चमध्ये, इकडे तिकडे. नवा माणूस समोर आला की किंचित वाकल्यासारखं करे, आपले हात संतमणीच्या गुडघ्यापर्यंत येतील इतपत. संतमणीही तसंच करीत. प्रोफाईलमध्ये पाहिलं तर एकमेकांना "ठो दे रे ठो"चा बालसुलभ खेळ खेळतायत असं वाटे. पण माणसाकडे प्रचंड जनाधार आहे हे लक्षात आलं.

पुढे अनेक महिन्यांनी एका घरगुती कार्यक्रमासाठी नाशिकला गेलो. तिथे अशाच कार्यक्रमात भेटू शकणारे एक लांबचे काका होते. मला पाहून म्हणाले, "अरे! तू संतमणींना भेटला होतास ना! म्हणाले मला..."

मी आश्चर्याने पडायचाच बाकी राहिलो होतो. "तुम्ही त्यांना कसं ओळखता?" असं विचारल्यावर संतमणीच्या नेटवर्कची पूर्ण माहिती मिळाली. हे काका कोणतंसं स्मॉल स्केल वर्कशॉप चालवत. संतमणी त्यांचे अध्यात्मिक गुरू. आलेल्या प्रत्येक चेकचा थोडा हिस्सा संतमणीच्या संस्थेला द्यायचा दंडक त्यांनी घालून घेतला होता. (जकात सारखा प्रकार.) त्यांचे कस्टमर हेही संतामणीचे भक्त. आणि त्या कस्टमरचा कस्टमर म्हणजे संतमणी काम करत असलेली कंपनी.

आता माझ्या लक्षात आलं. कंपनीच्या टियर वन, टियर 2 सप्लायर सिस्टीमच्या गाड्यावर संतमणी नावाची माशी बसली होती. एक कंपनी, अनेक सप्लायर, त्यांचे अनेक सप्लायर. संतमणीला शेकडा दहा टक्केच लोकांना भक्त करण्यात यश मिळालं तरी मोठंच कार्य झालं हे सगळं नेटवर्क उभं करण्यात त्यांची बरीच वर्षं गेली असणार. हे सप्लायरचं पेमेंट सोडणार, तो त्याच्या सप्लायरचं, तो त्याच्या सप्लायरचं. प्रत्येक चेकपाठी थोडी रक्कम निघाली तरी व्हॅट प्रणालीसारखं cascading होऊन मोठाच रोकडा निघत असणार.

काका संतमणींबद्दल भरभरून बोलत होते: कसा साक्षात्कारी सत्पुरुष आहे, पैशाच्या बाबतीत कसा स्वच्छ आहे, दर गुरुपौर्णिमेला कसा उत्सव असतो, वर्षातून एकदा प्रयागाला जातो वगैरे. बेनिफिट ऑफ डाऊट द्यायचा झाला तर हे खरं देखील असेल. माझा वैयक्तिक अनुभव तर अत्यंत चांगला होता. पण मॉनेटायझेशनचा हा प्रकार मात्र थक्क करून गेला.

____
आकड्यांचं ऑडिट एक बोअर असेल तर फायनान्शियल प्रोसेस ऑडिट पंधरा बोअर असतं. यापुढचा एक "वॉकथ्रू" नावाचा प्रकार असतो. तो केल्यावर आपलं वय एकशेपंचवीस वगैरे असावंसं वाटायला लागतं, जीवनेच्छा संपून जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

वा वा , झकास माहिती. पण हे संतमणी फारच उच्चं दर्जाचे दिसतात. त्यांच्या साखळीत न आल्यास खिंडीत गाठून ठोकल्याचे तुम्ही ऐकले नाहीत हेच या गृहस्थाचे महान पण दाखवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदूबाळ खल्लास वर्णन केलंय संतामणीचं. तुमच्या शैलीचा फॅन झालोय मी तर. अजून असेच अनुभव वाचायला उत्सुक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

अनुमोदन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभ्या तुझे उपकार संतमंडळी कधीच विसरणार नाहीत.किती ती समाजसेवा करतोस!
आदूबाळ हा सर्व गोष्टी आतून बाहेर माहित असलेला मनुक्ष.त्यांच्या पुराणांना ब्रम्हदेवाचा दिवस पुरायचा नाही.
अण्णाबापटना कशी काय उपरती झाली अनुग्रह घ्यकयची अचानक?
गेलो होतो तुंगारेश्वरला वनविहारला तर वेगळाच अनुभव आला वरच्या मठात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अण्णा बापट हे नामकरण आवडले आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्या प्रमाने स्वयंपाक जरी एकच असला तरी प्रत्येक स्त्रीच्या हाताची चव वेगळी असते तसे या लोकांचे बोलायचे तत्वज्ञान एक असले तरी मार्केट पेनीट्रेशनचे तंत्र प्रत्येकाचे जरा हटकेच असते असा अनुभव आहे. बाकी प्रतिसाद सुरेख

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

अध्यात्मिक बाब्यांवरती माझा कितीही राग असला तरी TV वरचे अध्यात्मिक चॅनेल हि मनुष्य प्राण्याला मिळालेली अनमोल देणगी आहे असं मला प्रामाणिकपणे वाटते absolute stress busters !!! तुम्ही कितीही टेन्शन मध्ये असा ,जे काही १०-२० अध्यात्मिक चॅनेल आहेत त्यापैकी आपल्या चवीला सूट होणार चॅनेल पकडा , १० मिनिटात आपण टेन्शन वगैरे विसरून जातो . मी हि थेरपी अधून मधून घेतो . एका टोकाला संतश्री रामदेव महाराज यांचा कार्यक्रम तर मी ते "आज कोणता असाध्य रोग योग करून बरा होणार "सांगण्याच्या कुतुहुलाने बघायचो . पण finally त्यांनी जेव्हा systemic lupus erythimatosus नावाचा autoimmune disease बरा होतो सांगितल्यावर मि खचलो . दुसऱ्या टोकाला आसाराम बापू ही धमाल आणायचे !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांनी जेव्हा systemic lupus erythimatosus नावाचा autoimmune disease बरा होतो सांगितल्यावर मि खचलो .

Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे काहीच्च नाही. साधारण १५ एक वर्षांपुर्वी जेव्हा रामदेवबाबाचा अवतार हळूहळू आकार घेत होता तेव्हा टीव्हीवर सकाळी त्यांचा कार्यक्रम नुकताच सुरू झालेला होता. अश्याच टीव्हीवरल्या एका शिबीरात पाहिलेलं नवल. कल्याणच्या एका वृद्ध गृहस्थाने "कपालभाती आणि अनुलोम-विलोम मुळे माझे केस तर काळे झालेच आहेत आणि मला परत दात येऊ लागलेत" असा अनुभव सांगितला होता. (शप्पथ खरं सांगतेय. )\
बहुतेक तरूणसागर नावचा एक जैन मुनी तर जे काही शिरा ताणत बोलतो ते ही तसच करमणूक करणारं. ही च्यानलच विनोदी असतात यात काही शंकाच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुनीश्री तरुणसागर ह्यांचं एक सदर पेपरात वाचत असे. बरच तार्किक नि सेन्सिबल बोलतात असं माझं मत. मुख्य म्हणजे बुद्धीवादी, विवेकवादी किम्वा अगदि नास्तिक लोकांबद्दलही त्यांच्या मनात फारशी कटुता,तक्रार दिसली नाही. त्यांच्या मनात असलच तर किंचित कौतुक असावं वाटलं. चमत्काराचे दावे दिसले नाहित.
व्यावहारिक, विचार करायला लावणारं कंटेंट त्यांच्या लिखाणात असे. म्हणजे इसापनीतीच्या कथा, पंचतंत्रातल्या कथा, सॉक्रेटिसच्या म्हणून ज्या कथा ऐकतो तसे काहीसे, किम्वा काही थॉट एक्स्परिमेण्ट्स. हे सगळे त्यात दिसले. किंवा कबीराच्या दोह्यात जे विचार दिसतात किंवा तुकारामांच्या अभंगात ...तसे काहिसे दिसले. (जरी का नवस सायासे पुत्र कन्या होति, तरि का करणे लागे पति !)
उदा --
मानवी मनातल्या लोभ हव्यास हपापलेपणाचं काय करायचं ह्यावर अध्यत्म क्षेत्रातली फारच उपदेश/विचार करताना दिसतात. (मुळात हव्यास,लोभ वाईटच आहे का, फक्त नाशच घडवतो का, in fact "Greed is good" वगैरे बाबी बाजूला ठेवूत. )
तरुणसागर संपत्तीची आवश्यकता, त्यासाठी कष्टाची तयारी असावीच वगैरे सांगतात. पण त्यासोबत सतत रेझ युवर बार, आणि अतिरिक्त अतृप्तता, ह्याला आवर घाला म्हणतात. ( काही सोशालिस्ट नेत्यांप्रमाणेच हे विचारधारा आहे.)
पण फक्त हे कमी करा, तमुक करु नका; असं सांगून साम्गून कितीसा उपयोग होणार?
विविध काळात अनेकानेक द्रष्ट्यांनी हेच सांगूनही लोकं काही ऐकतच नाहित. आणि शेवटी [पदरी निराशा घेउन तनावग्रस्त राहतात.
तरुणसागर ह्यांनी आयडिया दिली की मुळात स्मशानाला अपवित्र, वाईट वगैरे मानणं सोडा. ते सत्य आहे हे स्वीकारा.
स्मशान दूर गावाबाहेर, वस्तीपासून अलग असं नकोच.
खरंतर वस्तीच्या नेहमीच्या मार्गावर, अगदि भर चौकात असावं.
जीवनाची नश्वरता त्यामुले सदोदित समोर राहिल.
एरव्ही मृत्यू, क्षणभंगुरता कितीही "माहित" असली ; तरी तीव्रतेने ती जाणवते एखादा मृत्यू दिसल्यावर. शिवाय लगोलग माणूस ते सगळं विसरतोही, रोजच्या धकाधकित. गोष्ट "माहित" असली तरी त्याची "जाणीव" सतत जागी नसते.
त्यासाठी स्मशानं मध्यवस्तीतच हवीत.
.
.
किंवा एकदा त्यांची अशी ओळ होती--
धर्म, धार्मिकतेला नास्तिक, विवेकवादी वगैरे लोकांकडून कसलाच धोका नाही. धोका असलाच तर धार्मिक असल्याचं सांगून बजबजपुरी माजवणारे,झुंडशाही करणारे, फुकटात काही मिलवून देउ पाहणारे, अंधश्रद्धा पसरवनारे ह्यांच्यापासूनच आहे. हिर्याला धोका दगडाचा वा मातीचा नसतो. तर हिरा असल्याचा दावा करणार्‍या नकली हिर्‍यांपासून , काचेच्या खड्यांपासून असतो.

अर्थात ते सदर वाचून दहा बारा वर्षं होउन गेलित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबाच्या आणि अंआ च्या तरुणसागर ह्या माणसाबद्दल च्या मतांमधे १८० अंशाचा फरक दिसला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकन एनाराय जन्तेला "प्रेम ज्योतिष" नावाच्या बाबाच्या जाहिराती बर्‍याचदा बघायला मिळतात. या खेरीज असा कुठला मेजर ब्रँड आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

नशीबवान आहात! आमच्याकडे फक्त दोन महिन्यात वीस पौंड वजन कमी असल्याच जाहिराती लागतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोचक विषय आणि अनुभव

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
विवेकाची ठरेल ओल - ऐसे की बोलावे बोल |
आपुल्या मते उगीच चिखल
कालवू नको रे ||

या धाग्यावर प्रचंड अवांतर झालेले आहे. Sad
___
आबांनी मात्र चार चांद लावले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Biggrin he is the...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

सर्वोच्च आणि पर्सिस्टंट करमणुकीसाठी दररोज वाचा , हसा आणि लठ्ठ व्हा वगैरे
Dainik Sanatan Prabhat
dainiksanatanprabhat.blogspot.com/

त्यातला त्यात वेळ कमी असल्यास किमान या पेज वरचे परात्पर गुरु डॉ आठवले यांचे सुविचार व फलक प्रसिध्धी तरी वाचाच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मठामध्ये येणारे सर्वच जण एकाच लेवलला एन्ट्री घेत नाहीत.काही भक्तच पुढे महाराज होतात.काही अचानक प्रकट होतात.उद्देश एकच इकडचं तिकडे करून मठासाठी पैका जमा करणे.काहीवेळा घरातून पळन आलेली मुलं मठाचा आसरा घेतात.छाटी/भगवे वस्त्र नेसून कामाच्या बदल्यात अन्न आणि आसरा. मुलाची हुशारी पाहून बढती मिळते.सर्वच चेले महाराज होत नाहीत.प्रमोशन मिळत नाही.असा एकजण भेटलेला तुंगारेश्वरला.वय ६५.म्हणाला इकडे येऊ नका माझे सर्व आयुष्य वाया गेलं.मीच महाराज होणार होतो पण अचानक हा बाबा आला खालच्या मठातून."&%₹*&%**%&₹".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आचरट बाबा , तुमच्या या तुंगारेश्वर प्रकर्णात काहीतरी भारी ष्टुरी दिसतीय , सांगणार का जरा डिट्टेलवार ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मीच महाराज होणार होतो पण अचानक हा बाबा आला खालच्या मठातून."&%₹*&%**%&₹".

ROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा एकजण भेटलेला तुंगारेश्वरला.वय ६५.म्हणाला इकडे येऊ नका

अचरटबाबा* - त्या म्हातार्‍याला तुमच्या कडे बघुन असे का वाटले की तुम्ही मठ जॉइन करणार आहात.

*:कारण तुम्ही झाडाझुडपांचे बाबाबंगाली आहात. हे आदरानीच म्हणते आहे विश्वास ठेवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोठ्या कंपनीत जसे प्रमोशन ,हेवेदावे।फेवरिटिझम इत्यादी चालते त्याचे अगदी जवळून दर्शन झाल अचानक.( one who brings grist to the mill--)जो गिह्राइक पटवतो तोच शेवटी लिडर होतो ,केवळ सिनिअर असण्याने वरच्या पोस्ट मिळत नाहीत.बाबा लोक आणि त्यांचे मार्केटिंग हा एक पैलू झाला पण त्या संस्थेत बाबा होण्यासाठी कलह चालूच असतो.मुख्य बाबा गेल्यावर "गादीवर" बसणार कोण हा प्रश्न सगळ्याच क्षेत्रातला इथेही असतोच.

माझी समिक्षा दूर ठेवून फक्त काय घडलं हे प्रकरण जसंच्या तसं लिहितो नंतर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदा मित्राबरोबर भटकंती म्हणून तुंगारेश्वरला(##) गेलो होतो तेव्हाची गोष्ट आहे.हे देऊळ डोंगरात वर चार किमी चालण्याच्या अंतरावर आहे.वळणावळणाचा ट्रक जाईल असा कच्चा रस्ता आणि दाट झाडी.तशी उंची दीडदोनशेच मिटरस असेल पण वाहनरस्त्याने लांबी वाढते.देऊळ छान आहे आणि श्रावणात गर्दी असते.मागच्या बाजूस मोठा धबधबा आहे.नोव्हेंबर महिना असल्याने चाल सुसह्य होती.देवळाच्यानंतरही रस्ता पुढे वर जात होता आणि वर माथा बराच वर होता.तिथे पाटी होती ***मठ ८ किमी.तसे दहाच वाजले होते.ठरवलं जाऊन येऊ.बघुया काय आहे.
रमतगमत वरती जायला दीड वाजला.रस्त्यात जाणारे येणारे कोणीच दिसले नाही.अगदी वर गेल्यावर एक आश्रम दिसला रानातच.आत गेलो तर सुंदर बैठा आश्रम, चहुबाजूनी खोल्या, मध्यभागी मोठा चौक,सारवलेले अंगण.सगळीकडे बघितले आणि एका ठिकाणी खोलीत मंदिरासारखे वाटले तिकडे आत शिरलो.फक्त एकच मनुष्य आत मुर्तीपाशी काही करत होता.कृष्णाचे असावे मंदिर आणि सुवास दरवळत होता.आम्ही दुरच बसलो आणि त्या माणसाने खुणेनेच देवाकडे तोंड करून बसा सुचवले.तिथे पाच मिनिटे काढून बाहेर आलो . 'भोजनकक्ष' पाटीने लक्ष वेधून घेतले.तिकडे जाऊन प्रथम भोजन केले आणि अंगणात येऊन झाडाखाली बसलो.दुपारचे पोटात अन्न गेल्याने बरं वाटलं.आता लक्षात आलं की मधल्या अंगणात कडेने उंबराची झाडे आहेत, पिकलेली उंबरं माकडांच्या उड्यांनी पडताहेत,आत आल्यापासून जो एक भगवी छाटी लावलेला म्हातारा लांब दांड्याच्या झाडूने उंबरं झाडत होता तो अजूनही झाडतोच आहे.उंबरं पडतच होती सारवलेल्या अंगणात.
आम्हाला बसलेले पाहून म्हाताय्राने कुठून आलात विचारले.
"महाराज कुठे असतात?" मित्राची उत्सुकता.
"असतील कुठल्यातरी खोलीत नाहीतर मठात.असे एकाजागी बसतात काय."
"मी पाहू का?"
"बघ ना, उघड्या असलेल्या कोणत्याही खोलीत जा."
मित्र गेला.
"महाराजाला भेटायला आला का?"
"इकडे तुंगारेश्वरला आलो होतो तेव्हा कळले आणि वर आलो."
"तुम्ही आलात त्या रस्त्याने कोणी येत नाही. असाच एक रस्ता डोंगराच्या इकडेही आहे तिकडूनच येतात वाहनाने.खाली मोठा मुख्य मठ आहे."
उंबरं झाडायचं काम चालूच.पडतच होती सारखी.माकडांची मोठी टोळी छप्परावरून झाडावर नाचत होती.
आणि अचानक
"हा कसला महाराज?" "&%#@&"!!
"मी शिव्याच घालतो."
"येऊ नका इकडे तुम्ही.मी इकडे म्हातारा झालो बघा. सर्व आयुष्य फुकट गेलं.आता कुठे जाणार?"
"कुठे होता?"
"लांब तिकडे जालन्याला होतो.गरीबीला कंटाळून लहानपणीच घरातून पळालो.कल्याणला आलो.मग खालच्या मोठ्या आश्रमात सोय झाली काही कामं करायची ,जेवण्या झोपण्याची सोय झाली.जरा मोठा झाल्यावर कळू लागल्यावर आवडायला लागले.महाराज मला जवळ ठेवू लागले.इकडचा हा वरचा मठ झाल्यावर इथे पाठवले.मीच बघायचो."
एवढ्यात एक उंच माणूस एका खोलीतून बाहेर आला आणि अंगण ओलांडून दुसय्राएका खोलीत गेला.सहाफुट दोन असेल ,नागडा.
"हाच तो."
"हा कसला महाराज? मी शिव्याच देतो. भायंदरचे बिल्डर येतात खलबतं चालतात.सगळे धंधे चालतात."
"खरं म्हणजे मीच होणार होतो महाराज, पण हा खालच्या मठातून वर आला. महाराज झाला. &%#%"
माझा मित्र खोल्या फिरून आला. "नाही भेटले महाराज."
"तू एक वेडा."
"??"
माकडांच्या टोळीचा मोठा गलेलठ्ठ हुप्प्यावर इतर बारके तरुण नर लक्ष ठेवून आजूबाजूला फिरताहेत. कार्यभाग उरकताहेत. पळापळीत उंबराचा सडा पडून राड.झाडणे चालूच.
ऐकायला दोघे झालो अन म्हाताय्राचा आवाज वाढायला लागला.
"मी शिव्या द्यायचो ,पोलीस बोलावले होते."
"घाबरतो काय? म्हटलं घाला गोळ्या,न्या पकडून."
"ते बोलले तुमचा आतला मामला आहे,घ्या तुमचं तुमी मिटवून."
चारपाचजण एका खोलीतून बाहेर आले. जीप सुरू केली. आम्हाला प्रवचन ऐकताना बघून थांबले.
एकाने आम्हाला मागून हाताने खूण केली 'डोक्यावर परिणाम झाल्याची.'
_____________________________________
[ ## वसई रे स्टेशनवरून सातिवलीला बस/ ओटो जातात सहा किमी.इ एक्स हाइवेवर आहे. हाइवे ओलांडून पलीकडे दीड किमीवर तुंगारेश्वर वनाची हद्द सुरू होते.ठाणे-नालासोपारा/विरार बसेस सातिवली/वसई फाटा इथे थांबतात.]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉलिड!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

उत्तम लिखाण आहे. लहानशी कथादेखील छान रंगवून सांगितलेली आहे. तुम्ही लघुकथा लिहिण्याचं मनावर घ्या. याच विषयाबद्दल असं नाही, इतर कुठचे प्रसंग किंवा किस्से या पद्धतीने लिहिलेत तर अतिशय वाचनीय होतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बापरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झकास !!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0