आधी democrat मग republican

माझा एक अमेरिकेतील मित्र म्हणतो की " साली ही अमेरिकेत येऊन स्थायिक झालेल्या भारतीयांची गम्मत आहे जेव्हा येतात तेव्हा anti इमिग्रेशन policies कश्या चूक आहे वगैरे तावातावाने बोलतात एकदम कट्टर democrat असतात . मग हळूहळू ग्रीन कार्ड कडून citizenship ची यशस्वी वाटचाल की या विषयावरची भाषा हळू हळू कट्टर republican होत जाते " खरे आहे का हो हे ? इथे बरेच अमेरिका वासी दिसताहेत , काय म्हणणे आहे त्यांचे ?

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

ह्यात चुक काय आहे? एकदा आतले झाल्यावर बाहेरच्यांसारखे का वागायचे?

बरोबर का चूक असा विषय नाहीये , ( ते आपण कोण ठरवणार ? ज्याचे त्याला ) , कुतुहूल आहे ( की एकतर हे generally खरे आहे का ? आणि जर खरे असले तर ही वैचारिक कोलांटीउडी का होते ) म्हणून पोस्ट टाकली

ऐसी वरच्या हाम्रीकावासींचे प्रतिसाद वाचुन तर हे खोटे आहे असे वाटते. इथले जवळजवळ सगळेच हाम्रीकी सिटीझन हाम्रीकेला इव्हील स्टेट मानतात.

तसं ते बरंच काही मानतात अनु राव.
ते स्वतःला उदारमतवादी, खरेखुरे पुरोगामी, खरेखुरे लिबरल आणि असे बरेच काही मानतात (आणि हो, ते मानतात तेच आणि तेवढंच बरोबर असंही ते मानतात बरं का). मग ??

सदैव शोधात..

अनुतैंंचा सांपल साईझ फार लहान आहे; पण त्यात दोष अनुतैंचा नाही हे नमूद केल्याशिवाय राहवत नाही.

(मु.पो. - आष्टीन, राज्य - टेक्सास, देश - भारत) अदिती

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मूळ प्रश्नाबद्दल मत कळेल ?

अभ्यास नाही म्हणून माझं फार मत नाही. त्यातल्या त्यात निळोबांचं (Nile) मत रोचक वाटतं.

व्यक्तिशः रिपब्लिकन लोक समलैंगिकांना समान नागरी हक्क आणि स्त्रियांच्या गर्भपाताबद्दल न्याय्य(!) भूमिका घेत नाहीत आणि क्रिएशनिझमचा 'सिद्धांत' सोडून देत नाहीत तोवर त्यांच्या पक्षाबद्दल सहानुभूती बाळगणं कठीणच. किंवा मग डेमोक्रॅटांनी तिसरं महायुद्ध सुरू केलं आणि रिपब्लिकनांनी त्याला विरोध केला तर ...

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अनुतैंंचा सांपल साईझ फार लहान आहे;

माझे सॅम्पल मधे ९० टक्के ऐसीकर आहेत / असतील.

मूळ प्रश्नाबद्दल आपले मत कळेल ?

सुट्टीच्या मोसमात आमच्या ठाण्याला पुण्याची ट्रेन थांबली की प्लॅटफॉर्मवरचे पॅसेंजर डब्याच्या दारातल्या लोकांना आत सरकायला सांगून आत शिरतात. पुढे गाडी कल्याणला पोचली की कल्याणच्या प्लॅटफॉर्मवरच्या प्रवाशांना आत घ्यायला टाळाटाळ करतात आणि डब्याचे दार आतून लावून घेतात.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

अशीच एक खांडेकरांची बोधकथा होती.

"आतले आणि बाहेरचे" असा एक धडापण होता शाळेत.

याविषयी पुष्कळ चर्चा अगोदर झालेली आहे. थोडा अभ्यास करावा लागेल. आमच्याकडून हा होमवर्क.

धन्यवाद , पण बाप रे , बराच मोठा आणि व्यापक गृहपाठ दिलाहेत . चर्चा वाचली , पण माझा प्रश्न तरीही आहेच १. हे खरे आहे का ( statistically significant percentage ) आणि जर खरे असेल तर २. या वैचारिक कोलांटी उडी किंवा लब्बाडी चे कारण काय ?

आणखी एक मुद्दा ...... आधीच्या चर्चेत समाजातल्या काही ठराविक वर्गातील मंडळी अमेरिकेत गेल्याने हे होत असावे अश्या अर्थाचे एक मत वाचले . माझ्या मते गेल्या १० - ५ वर्षात समाजातील जास्त घटकांमधील ( जास्त wider बॅकग्राऊंड ची ) मंडळी अम्रीकेत गेली आहेत असे वाटते .... म्हणूनच पुन्हा पहिला आणि दुसरा प्रश्न

त्याविषयीही मतप्रदर्शन झालेले आहे. वेळेअभावी, पुन्हा लिहायचा कंटाळा म्हणून शोधा असे सांगितले. पहा सापडे आहे का नाहीतर मी लिंका देईन सवडीने.

पण, थोडक्यातः अमेरिकेत आता येणारी तरूण पिढी ही बहुतांश लिबरल-डेमोक्रॅट आहे. (रिपब्लिकनांचे कडवे धर्मप्रेम त्याला थोडे फार जबाबदार आहे.) त्याच बरोबर, अमेरिकेत येऊन बरीच वर्ष झालेल्या, सेटल झालेल्या, घर-मुलं बाळं असलेयांपैकी भारतीयांमध्ये (ओपन)रिपब्लिकन लोक जास्त दिसतात (ओपन) डेमोक्रॅट्सपेक्षा असं माझं निरीक्षण आहे. (ह्या निरीक्षणाला माझ्या सोशलवगैरे सर्कलच्या मर्यादा आहेत हे सांगणे न लगे.)

तात्पर्यः आजची तरूण पिढी पुढे रिपब्लिकन होईल का, किंवा ही आजची रिपब्लिकन पिढी तरूणपणी डेमोक्रॅट होती का? ह्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे तुर्तास नाहीत.

अशा लहानसहान गोष्टींसाठी ऐसीवर 'मनातले छोटेमोठे प्रश्न व विचार' हा धागा तयार केलेला आहे. तिथे त्या मांडाव्यात ही विनंती.

ओके , पुढील वेळेस काळजी घेईन.

माझ्या माहितीतले बऱ्यापैकी भारतीय-अमेरिकन डेमोक्रॅट्स आहेत. अर्थात हे माझ्या मर्यादित वर्तुळातलं मत

गर्दीतला दर्दी

एक अमेरिकन सिटिझन म्हणून अशा विषयावर मी मराठी संस्थळांवर मत देत नाही कारण इथे कुणालाच अमेरिकेविषयी काही ममत्व पडलेलं नाहीये. किंबहुना मी विखारी विरोधच वाचलाय...
तरीही तुम्ही दोन तीनदा अगदी कळवळून "मूळ प्रश्नाबद्दल मत कळेल?" असं विचारलंत म्हणून एकदाच उत्तर देतो.

इथे लोक जेंव्हा एच१बी किंवा ग्रीनकार्डवर असतात तेंव्हा त्यांचे पाय अमेरिका आणि भारत ह्या दोन्ही दगडांवर असतात. अमेरिकेचं अतोनात भलं व्हावं अशी त्यांची फारशी काही जिव्हाळ्याची इच्छा असतेच असं नाही. इथे त्यांना द्यायचं काहीच नसतं, जमलंच तर घ्यायचंच असतं. गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली असा हा पवित्रा असतो. प्रांजळपणे सांगायचं तर मी देखील त्यास्थितित असतांना त्याला अपवाद नव्हतो.

मात्र जेंव्हा लोक इथलं नागरिकत्व स्वीकारतात तेंव्हा त्यांना व्यावहारीक बाबींबरोबरच बर्‍याच भावनिक बाबींना तोंड देऊन काही सडेतोड निर्णय घ्यावे लागतात. ते आणि त्यांच्या पुढील सर्व पिढ्या यापुढे अमेरिकेतच रहाणार असं ग्रूहित धरून त्यांना 'अमेरिका फर्स्ट' हा विचार करावा लागतो. मग त्यासाठी भारतात जॉब्ज आऊटसोर्स करण्याने अमेरिकेतली बेकारी जर वाढत असेल तर तिला विरोध करणं अपरिहार्य असतं. जसा फिलिपाईन्स, श्रीलंका, बांगलादेशातल्या ऑटसोर्सिंगला विरोध तसाच भारतातल्या आउटसोर्सिंगला विरोध, नथिंग स्पेशल अगेन्स्ट भारत...

डेमोक्रॅट्सचे मनसुबे बहुदा नोबल असतात पण ते पार पाडण्यासाठी पैसा कुठून आणायचा याबद्दल त्यांचे प्लान अतिशय भोंगळ असतात (बघा, सॅन्डर्सचा जाहीरनामा). अमेरिकेत सिटिझन झालेले बहुतेक भारतीय हे उच्चविद्याविभूषित आणि आर्थिक वरच्या स्थरातले आहेत. त्यांच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे हे उपलब्ध जॉब्ज (त्यांच्यासाठी नव्हे, ते सुस्थितीत आहेत, त्यांच्या पुढल्या पिढ्यांसाठी), इल्लिगल इमिग्रेशन, टेररिझम, लॉ अ‍ॅन्ड ऑर्डर, आणि अमेरिकेचं नंबर १ सुपरपॉवर हे स्थान हे आहेत. गे राईटस, प्रो चॉईस आणि विशेषतः ट्रान्सजेंडर लोकांचे विसर्जन अधिकार हे त्यांच्या द्रूष्टीने गौण मुद्दे आहेत. तेंव्हा जेंव्हा त्यांना हे दिसतं की डेमोक्रॅट्सना त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी फक्त श्रीमंत लोकांचा पैसा काढून घेणे हाच योग्य पर्याय वाटतो तेंव्हा ते डेमोक्रॅट्सपासून दूर रहाणं पसंत करतात (वैयक्तिकदृष्ट्या नव्हे तर राजकीय दृष्ट्या). आता इथे फक्त दोन पार्टी सिस्टम असल्याने त्यांना रिपब्लिकन पार्टी हाच एक उरलेला पर्याय आहे.
बहुतांशी रिपब्लिकन देशी सिटिझन्सचा प्रो लाईफ, अ‍ॅन्टी गे, ख्रिश्चन कॉन्झर्व्हेटिझम वगैरे सोशल रिपब्लिकन अजेंडाला पाठिंबा आहे असं नाही पण त्यांचा डेमोक्रॅटिक आर्थिक अजेंड्याला विरोध निश्चितच आहे जो त्यांच्या द्रूष्टीने जास्त महत्वाचा आहे.
असो. मला वाटतं मी पुरेसं स्पष्टीकरण केलं आहे ज्यामुळे तुमचं शंकानिरसन व्हावं. अर्थात ऐसी अक्षरेचा स्थापनेपासून सभासद असल्याने माझ्या ह्या प्रतिसादावर उलट्यासुलट्या प्रतिक्रिया येणार ह्याची मला जाणीव आहे. पण हे कधीतरी ओपनली लिहायलाच हवं होतं असं मला वाटलं म्हणून मी लिहिलं. प्रतिक्रिया देणार्‍यांना त्या द्यायचं स्वातंत्र्य आहेच (फर्स्ट अमेंडमेंट!!). पण मी मात्र तुमच्या आणि जे अमेरिकन नागरिक आहेत अशी माझी खात्री आहे अशांच्याच प्रतिक्रियांना उत्तर देईन. जे नाहीत त्यांच्या प्रतिक्रियांबद्दल आभार पण त्यांना उत्तर देणं मी बांधील समजत नाही.
God Bless the USA

त्यांच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे हे उपलब्ध जॉब्ज (त्यांच्यासाठी नव्हे, ते सुस्थितीत आहेत, त्यांच्या पुढल्या पिढ्यांसाठी), इल्लिगल इमिग्रेशन, टेररिझम, लॉ अ‍ॅन्ड ऑर्डर, आणि अमेरिकेचं नंबर १ सुपरपॉवर हे स्थान हे आहेत. गे राईटस, प्रो चॉईस आणि विशेषतः ट्रान्सजेंडर लोकांचे विसर्जन अधिकार हे त्यांच्या द्रूष्टीने गौण मुद्दे आहेत.

एकदम मार्मिक.

खरी गंमत तर तेव्हा वाटते जेव्हा इतर देशाचे नागरिक शहाणपणा शिकवतात की अमेरिकेने काय धोरण ठेवले पाहिजे? आणि वर म्हणतात की मला तर अमेरिकेत आल्याची पण लाज वाटत होती.

ROFL येतात कशाला मरायला ? Wink

God Bless the USA , या प्रांजळ मताबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन ( ही कंमेंट अजिबात तिरकस नाही . त्यामुळे अभिनंदन याचा गैरअर्थ कृपया घेऊ नये ) गेलात तिथले झालात हे सर्वात उत्तम . ( मी गेलो असतो तर हाच विचार केला असता )

"कारण इथे कुणालाच अमेरिकेविषयी काही ममत्व पडलेलं नाहीये. किंबहुना मी विखारी विरोधच वाचलाय..." या तुमच्या मताचे कोडे काही उलगडले नाही . आम्हाला इकडे दुसरेच चित्र दिसते . अमेरिकन एम्बसी बाहेर उभे राहिले तर बाहेर येणाऱ्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघितले तरी visa झालाय का नाही कळते ( जग जिंकले expression : झाला , जगबुडी expression : नाही झाला . )असे वाटते की हिकडं लोक गुडघ्याला अमेरिकन बाशिंग बांधूनच व्हिसा काढायला जातात
अमेरिकेतल्या काही म्हाराष्ट्र मंडळांमधील ( मला विनोदी वाटलेली ) दृश्य बघून ( rather विरोधाभास बघून )मला मूळ प्रश्न पडला होता .( मार्च एप्रिल सॉरी चैत्र म्हैन्यात आंबेडाळ ते पन्हे व्हाया मराठी नाटक, आणि अत्यंत वरवरची सांस्कृतिक ओढ वगैरे .... ( व पु via प्रशांत दामले ) १९६० -७० मधील वाटेल असे शुद्ध मराठी .... एक बाजूला republican leaning मते हा घोळ माझ्या फार लक्षात आला नव्हता . तुमच्या प्रांजळ उत्तरामुळे तो थोडाफार आला ) मी ग्रुप मध्ये नवीन आहे सर्वजण आपणास अत्यंत अदबीने संबोधत आहेत , म्हणजे आपण कोणीतरी ज्येष्ठ असणार तेव्हा माझा disclaimer : माझ्या उरफाट्या निरीक्षणांचे आणि प्रश्नांचे कृपया गैर मानून घेऊ नये

'सांस्कृतिक ओढी'बद्दल Smile

... कुणालाच अमेरिकेविषयी काही ममत्व पडलेलं नाहीये. किंबहुना मी विखारी विरोधच वाचलाय...

पिडांकाका ज्याबद्दल बोलत आहेत त्याला मराठी आंतरजालावरचे जुने संदर्भ आहेत. मराठी आंजावर ठराविक भांडणं (ती व्यक्तिगत पातळीवर येणं) जुनं दुखणं आहे. अशा भांडणांसाठी आस्तिक विरुद्ध नास्तिक आणि एन.आर.आय. + येणार-नाय (भारतीय वंशाचे परदेशी नागरिक) विरुद्ध भारतात राहणारे भारतीय हे ते सदाहरित विषय.

पिडांकाकांना काका म्हटलेलं एके काळी फार आवडत नसावं, पण ते पडले पक्के डँबिस. त्यामुळे कोणी खरंच नावं ठेवली तरी ते मिरवतात; म्हणजे ट्रोलांची तोंडं बंद. मग काका म्हटल्यावर काय नाही मिरवणार!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पिवळा डांबिस यांच्या प्रतिसादामुळे भारतातले उच्चवर्गीय बहुतांश राइट विंग का असतात याचेही एक उत्तर मिळते.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

...'फडतूसांना मारून टाकले पाहिजे' (किंवा, गेलाबाजार, 'फडतूस मरत असले/मारले जात असले, तर मरेनात का!') ही मानसिकता वाटते तितकीही अनकॉमन नाही. (फक्त, सगळे इतक्या उघडपणे बोलून दाखवत नाहीत, इतकेच.)

अर्थात, E Pluribus Unum वगैरे आमच्या (आणि योगायोगाने पिडांकाकांच्याही) देशाचे बोधवाक्य दिसायला वगैरे फारच छान आहे. आणि असलेच पाहिजे. बोधवाक्ये ही छानछान दिसण्याकरिताच असतात. पण त्यापलीकडे त्यांच्या अर्थात वगैरे पडायचे नसते.

(अतिअवांतर: बादवे, आजमितीस माझे वय पन्नास आहे. (चर्चिल वगैरे गेला तेल लावत. आणि हो, चर्चिलचे 'ते' मत शिरोधार्य मानणारांकरिता चर्चिलचेच 'हिंदुस्थानचे लोक स्वराज्याकरिता अपात्र आहेत', हे मतदेखील बहुधा चिंत्य ठरावे, एवढेच जाता जाता सुचवावेसे वाटते.) असो.)

(आणि हो, 'फडतूस हे काय यांच्या घरचे नोकर काय?' असले प्रश्न विचारायचे नसतात. किंबहुना, फडतूस घरचे नोकर नसले, तरच असले काहीबाही बिनदिक्कतपणे बोलणे परवडते. अन्यथा, दुसरे नोकर आजकालच्या जमान्यात मिळणे सोपे असते म्हणून वाटले काय?)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

भारतातले उच्चवर्गीय लोक राईट विंग का असतात, तसेच फडतुसांबद्दलची वाक्ये याचा पिडां याच्या प्रतिसादाशी काय संबंध, किंवा त्यावरून हे अनुमान कसे काढले ते समजले नाही.

अमेरिकेतील रिपब्लिकन सपोर्टर्स भारतीय लोक "कर्मठ" कारणांनी सपोर्ट करत नाहीत (अ‍ॅण्टी गे, प्रो लाईफ, ख्रिश्चन बेस वगैरे). याउलट भारतात जे राईट विंग आहे ते धार्मिक कारणांनी, जुन्या चालीरीती अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने तसे असतात. त्यामुळे भारतातील उच्चवर्गीय राईट विंग असतील किंवा नसतील, पण ते त्या प्रतिसादावरून कसे निष्पन्न होते ते कळले नाही.

धन्यवाद, फारएन्ड.

बाकी भारतात असतांना मी कधीच आर्थिक उच्चवर्गीय नव्हतो, चाळसदृष्य वातावरणात लहानाचा मोठा झालो. गेली सव्वीस वर्षे इथे अमेरिकेत आहे. तेंव्हा भारतातले उच्च-मध्यम-कनिष्ठ लोक सध्या कुठल्या विंगेत असतांत याबद्दल मला काहीच माहिती नाही.

आणि मी कुणालाच फडतूस वगैरे म्हणत नाहीये, नवी बाजूंची गल्ली जरा चुकलेली दिसते. (ते आमी नाय वो, ते उत्तरेकडले, होजेनदीच्या पल्याडले!!) Smile

मी फक्त अमेरिकेत काही देशी लोकं हे काही रिपब्लिकन तत्वांना (स्मॉल गव्हर्न्मेंट, लो टॅक्सेशन, स्ट्राँग मिलिटरी, प्रो बिझिनेस, आणि कायदा आणि सुव्यवस्था) मानणारे असतात आणि त्याबाबतची कारणमिमांसा यांचा माझ्या माहितीप्रमाणे खुलासा केला, इतकंच...
चूभूद्या घ्या.

नाही, तुमच्या 'अभिनंदन' ह्याचा अर्थ मी अजिबात तिरकस घेत नाहीये.

"कारण इथे कुणालाच अमेरिकेविषयी काही ममत्व पडलेलं नाहीये. किंबहुना मी विखारी विरोधच वाचलाय..." या तुमच्या मताचे कोडे काही उलगडले नाही . आम्हाला इकडे दुसरेच चित्र दिसते . अमेरिकन एम्बसी बाहेर उभे राहिले तर बाहेर येणाऱ्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघितले तरी visa झालाय का नाही कळते ( जग जिंकले expression : झाला , जगबुडी expression : नाही झाला . )असे वाटते की हिकडं लोक गुडघ्याला अमेरिकन बाशिंग बांधूनच व्हिसा काढायला जातात

वर अदितीने स्पष्टीकरण दिलेलं आहेच. ती कॉमेन्ट 'मराठी आंतरजालावरच्या' विखारी विरोधाला उद्देश्यून होती. एम्बसीपुढे उभ्या राहिलेल्या आणि व्हिसा डिनाय झालेल्या माणसाच्या तोंडून जर काही भलं बुरं बाहेर पडलं तर ते मी समजून घेऊ शकतो. त्याचं तत्कालीन फ्रस्ट्रेशन ते बोलतंय हेही समजण्यासारखं आहे. माझ्या पहाण्यात इथे काही काळ राहून स्वेच्छेने परत गेलेले (फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असल्याने म्हणा, किंवा व्हेजेटेरियन असल्याने इथे जुळवून घेणं कठीण पडलं असल्याने म्हणा) आहेत. ते कधी विखारी विरोध करतांना दिसलेले नाहीत. माझा रोख होता तो अमेरिकेत येऊन, काही काळ इथे राहून, त्या परत गेलेल्यांबद्दल (त्यापैकी ग्रीनकार्ड डिनाय झालं म्हणा, एच१बी एक्स्टेंड झाला नाही म्हणा, किंवा त्यांच्या भारतीय कंपनीनेच परत यायला लावलं म्हणा, इथे आले तरी प्रदीर्घ काळ बेंचवरच बसले होते म्हणा, त्यांच्याबद्दल,) त्यांचा अमेरिकाविरोधातला विखार हा प्रेक्षणीय म्हणजे अगदी फोर्थ ऑफ जुलैच्या फायरवर्क्ससारखा नेत्रमनोहर असतो!!!! त्यांना उद्देश्यून ती कॉमेंट होती, असो.
अमेरिकेतले मराठी सांस्कृतीक कार्यक्रम (नाटकं, एकपात्री प्रयोग वगैरे) याबद्दल म्हणाल तर ती इथल्या काही लोकांची सांस्क्रूतीक गरज आहे म्हणाना! त्याचा डेमोक्रॅट विरुद्ध रिपब्लिकन याच्याशी फारसा संबंध नाही. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लोकल पार्टी अ‍ॅफिलिएशन, ज्यांना जायचंय ते लोक जातात, ज्यांना त्याची जरूर वाटत नाही ते नाही जात. पूर्वी म्हणजे इंटरनेटचा प्रादुर्भाव व्हायच्या पूर्वी अशा कार्यक्रमांना गर्दी असे. पण आताशा तसं राहिलेलं नाही कारण ह्या भारतातून येणार्‍या मंडळ्या व्हिसा आणि भारत-अमेरिकेच्या तिकिटाचा खर्च वाचवण्यासाठी अगदी मोजके, बेअरली आवश्यक तितकेच लोक घेऊन येतात. त्यामुळे त्यांनी सादर केलेला नाट्यानुभव ते भारतात सादर करत असलेल्याच्या तोडीचा नसतो. त्यातून 'सिटिझन' लोकांना युएस-मुंबई तिकिट आता फारसं महाग राहिलं नसल्याने ते आपलया भारतवारीतच हेच पण 'अस्सल' प्रयोग बघून येतात.

मी ग्रुप मध्ये नवीन आहे सर्वजण आपणास अत्यंत अदबीने संबोधत आहेत , म्हणजे आपण कोणीतरी ज्येष्ठ असणार तेव्हा माझा disclaimer : माझ्या उरफाट्या निरीक्षणांचे आणि प्रश्नांचे कृपया गैर मानून घेऊ नये

ऐसी अक्षरेवर सुस्वागतम्! तुम्हाला ज्या शंका असतील त्या नि:संकोचपणे विचारा, मला जी माहिती आहे त्यानुसार मी जरूर निरसन करीन.
बाकी 'अदब/जेष्ठ' यावर जाऊ नका हो! हे ऐसीकर अत्यंत वात्रट आहेत! कधी काका म्हणतील आणि त्याचवेळेस कधी आमच्या धोतराला हात घालतील ह्याचा काही नेम नाही!!!!
Smile

बरोबरे पिडांकाका. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्यांची पोळी व्हाईट हाऊसमधून डिलिव्हर होईल त्यांनी त्याची चिंता वहावी, ज्यांची दिल्लीहून डिलिव्हर होईल त्यांनी दिल्लीची. त्यात वावगे काहीच नाही. साधा न्याय आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.

चूक!

"ज्याची खावी पोळी, त्याचीच वापरावी थाळी." - एक चिनी म्हण. (पु.ल.)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

सौ अन्य प्रतिसादककी एक पिडां की!!!

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !

+१

गेल्याच आठवड्यात "अंताजीची बखर" परत एकदा वाचली. त्या पार्श्वभूमीवर पिडांकाकांचं मत एकदम पटून गेलं.

*********
आलं का आलं आलं?

पिडांकाकांचा प्रतिसाद अतिशय आवडला.
'तुम्ही तरुण असताना समाजवादी नसाल तर तुम्हाला हृदय नाही. पण मध्यमवयातही तुम्ही समाजवादी राहिलात तर तुम्हाला डोकं नाही.' अशी म्हण वाचलेली आहे. त्यात किंचित अतिशयोक्ती असली तरी मुद्दाही आहे. तरुणपणी 'ही साली व्यवस्था ब्येक्कार आहे. तळागाळातल्या लोकांचे इतके हाल होताहेत. तेव्हा ती व्यवस्था मोडून टाकली पाहिजे साली' असं म्हणणं सोपं आणि सेक्सीही असतं. व्यवस्थेचा भाग झाल्यावर लक्षात येतं की फक्त तळागाळातल्या लोकांचे हाल होताहेत कारण ही व्यवस्था रडतखडत का होईना, चालू आहे. ती मोडून टाकून, नवीन बसवून फारसा फरक पडत नाही, कारण शेवटी ती माणसांनी चालवलेली असते. मोडून नवीन बसवण्यासाठीचा खर्च मात्र अवाच्या सवा असतो. त्यापेक्षा हळूहळू व्यवस्था सुधारत नेणं हा जास्त चांगला मार्ग असतो. हा विचारपद्धतीचा बदल बऱ्यापैकी लोकांत होत असल्यामुळे आधी लिबरल आणि नंतर कंझर्व्हेटिव्ह असा प्रवास होणं साहजिक आहे.

तरुणपणी 'ही साली व्यवस्था ब्येक्कार आहे. तळागाळातल्या लोकांचे इतके हाल होताहेत. तेव्हा ती व्यवस्था मोडून टाकली पाहिजे साली' असं म्हणणं सोपं आणि सेक्सीही असतं. व्यवस्थेचा भाग झाल्यावर लक्षात येतं की फक्त तळागाळातल्या लोकांचे हाल होताहेत कारण ही व्यवस्था रडतखडत का होईना, चालू आहे. ती मोडून टाकून, नवीन बसवून फारसा फरक पडत नाही, कारण शेवटी ती माणसांनी चालवलेली असते. मोडून नवीन बसवण्यासाठीचा खर्च मात्र अवाच्या सवा असतो. त्यापेक्षा हळूहळू व्यवस्था सुधारत नेणं हा जास्त चांगला मार्ग असतो. हा विचारपद्धतीचा बदल बऱ्यापैकी लोकांत होत असल्यामुळे आधी लिबरल आणि नंतर कंझर्व्हेटिव्ह असा प्रवास होणं साहजिक आहे.

अमेरिकेतील डेमॉक्रॅटिक पक्षाचे म्हणणे असे आहे असे म्हणायचे आहे का? असेल तर ते कशावरून? मला तरी मेनस्ट्रीम रिपब्लिकन अन डेमोक्रॅट दोहांचेही असे रॅडिकल मत आहे असे वाटत नाही. मोफत शिक्षण वगैरे म्हणणारे बर्नीसारखे किंवा इपीए वगैरे सरकारच्या शाखाच बंद करू म्हणणारे टेड क्रूझ किंवा रीक पेरी सारखे दोन्हीही पक्षात किरकोळ आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना फारसे समर्थन त्यांच्या पक्षांतूनही नाही.

जाता जाता, सद्ध्याचा वॉल बांधू, सर्व मेक्सिकन वगैरेंना हाकलून देऊ (या करता पैसा कोठून आणणार?) वगैरे म्हणणारा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार ट्रंप आहे. त्या उलट हिलरीची प्रेसिडेंसी म्हणजे ओबामाची थर्ड टर्मच (इतकी ती नॉन-रॅडिकल, बोरींग, नॉट सो डिफरंट वगैरे) असे डेमोक्रॅट्सच काय तर रिपब्लिकन सपोर्टर्सही म्हणताहेत.

(खरं तर, गेल्या चार पाच वर्षात अमेरिकन रिपब्लिकन पक्षात डेमोक्रॅटिक पक्षा पेक्षा जास्त 'रॅडिकल' फॅक्शन्स आहेत.)

लिबरल म्हणजे डेमोक्रॅटिक असे गृहितक असेल तर ते इथे लागू होत नाही. लिबरटेरीअन्स रिपब्लिकन पक्षात आहेत तर फिस्कली कंझव्हेटिव्ह लोक डेमोक्रॅटिक पक्षात आहेत वगैरे सर्वांना माहित आहेच.

हो, लिबरल-डावे-डेमोक्रॅट आणि कॉंझर्व्हेटिव्ह-उजवे-रिपब्लिकन असं पोलरायझेशन नाही. बराच ओव्हरलॅप आहे हे खरं. मी फक्त तरुणपणी डावीकडे सुरुवात होते आणि वय वाढतं तसं उजवीकडे सरकायला होतं इतकंच म्हणत होतो. त्यामुळे अनेक लोक अमेरिकेत येतात तेव्हा डेमोक्रॅटांकडे झुकताना दिसतात, तर नंतर रिपब्लिकनांकडे प्रवास होतो. त्याचबरोबर इथे येतात तेव्हा गरीब असतात, आणि वय झाल्यावर श्रीमंतांत गणले जातात, हेही कारण असू शकेल.

रिक पेरी से याद आया. तो तीन गव्हर्नमेण्ट एजन्सीज बंद करायला इतक्या ताडकन निघाला, की त्याला तिसरी एजन्सीच आठवेना Smile
https://www.youtube.com/watch?v=ZCyTQEANlmM&t=1m5s

वरचा प्रतिसाद अपूर्ण आहे. रिककाकांची आणखी फारेण्डी समीक्षा हवी.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बराच मसाला पुरवतात तसा. रिक पेरी, पेलिन, रॉमनी, आणि खुद गब्बर ट्रम्प Smile

Indian-American makes a $1.1 million splash in Trump campaign

या बातमीचा पहिला परिच्छेद पहा.