Skip to main content

ट्रम्प यांची मुक्ताफळे !

"मेक्सिको आपले सर्वात वाईट नागरिक इकडे पाठवितो. ते सगळे बलात्कारी, खुनी असे असतात. त्यांना थांबविण्यासाठी भिंतच बांधायला पाहिजे , ते मी, आणि मीच करू शकतो."
"तिला नाकातून आणि देव जाणे आणखी कुठूनकुठून रक्तस्राव होत होता..": एका वार्ताहर बाई बद्दल .
"त्याला झोडपून काढा . तुमच्यावरील खटल्याचं खर्च मी देईन!" : ट्रम्प च्या सभेत निदर्शने करणाऱ्या काळ्या माणसाबद्दल .
"सर्व परदेशी मुसलमानांवर अमेरिकेत येण्यावर बंदी घातली पाहिजे. (आपली माणसाची संभाव्य दहशतवादी असण्याची शक्यता तपासायची प्रक्रिया पूर्ण सुधारल्यावरच ही बंदी उठवावी !"
"आपण अनेक देशांच्या संरक्षणाचा खर्च उगाचच, आणि परवडत नसताना करतो. तो त्यान्च्याकडून वसूल करावा : उदा. दक्षिण कोरिया , जपान. किंवा त्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच उचलावी: त्यात त्यांनी अणुबॉम्ब बनविला तरी चालेल ."
वगैरे इत्यादी! एक अर्धशिक्षित गोरे पुरुष कामगार सोडले तर बाकी कोणत्याही जातीच्या मतदारांत ट्रम्प यांच्याविषयी निदान 70% नकारात्मक मत आहे. आणि असे गोरे कामगार जेमतेम 33% आहेत.
कसे व्हायचे ?

दगड Mon, 11/07/2016 - 01:18

तुम्ही अमेरिकेत राहाता का हो? आणि रहात असाल तर मतदान करण्यास पात्र आहात का? नाही, अमेरिकेतल्या राजकारणाबाबत जरा उत्साही दिसताय म्हणून विचारलं.

मिलिन्द Mon, 11/07/2016 - 03:36

In reply to by दगड

हो, मी न्यू जर्सी मध्ये राहतो .
मतदान करण्यास पात्र आहात का? : हो. दोनदा ओबामाला मत दिले आहे. आता माझा पाठिंबा हिलरीला आहे .

ब्रह्मास्त्र Wed, 13/07/2016 - 23:31

In reply to by दगड

तुम्ही अमेरिकेत राहाता का हो? आणि रहात असाल तर मतदान करण्यास पात्र आहात का? नाही, अमेरिकेतल्या राजकारणाबाबत जरा उत्साही दिसताय म्हणून विचारलं.

सहमत,
एवढचं तुम्ही विचारलयं तर तुम्हाला निरर्थक श्रेणी देलीय दगडसाहेब,
म्हणजे तुम्ही या धाग्यावर ट्रंपला श्या नाही दिल्या तर तुम्हाला निरर्थक श्रेण्या मिळतील.

दगड Thu, 14/07/2016 - 04:29

In reply to by ब्रह्मास्त्र

तुम्ही या धाग्यावर ट्रंपला श्या नाही दिल्या तर तुम्हाला निरर्थक श्रेण्या मिळतील. - याबद्दल तुम्हाला माझ्यातर्फे मार्मिक.

राजेश घासकडवी Mon, 11/07/2016 - 05:42

मिलिन्द,

माझ्या मते इतक्या छोट्या गोष्टी स्वतंत्र लेख म्हणून येण्याऐवजी 'ही बातमी समजली का?'मध्ये याव्यात. चर्चाविषयासाठी अधिक व्यापक मांडणी अपेक्षित आहे. या लेखात जर उद्धृतांनंतर 'कसे व्हायचे?' यासारख्या प्रश्नातून 'लोकहो, मी काहीतरी थोडंसं सांगितलं, तुम्ही लिहा निबंध' असं म्हटल्यासारखं वाटतं. त्याऐवजी जर या उद्धृतांमागची पार्श्वभूमी, जगभर होत असलेला राइटविंगी नेतृत्त्वाचा उदय, यांसारखे विचार बाळगणारा माणूस न जाणो अमेरिकेचा अध्यक्ष झाला तर काय परिस्थिती येऊ शकेल, ट्रंप जिंकून येण्याची शक्यता किती आहे वगैरे मुद्द्यांचा तुम्ही थोडा उहापोह केला असता तर ठीक आहे.

राजेश घासकडवी Mon, 11/07/2016 - 06:28

In reply to by नितिन थत्ते

मला वाटतं हे मुळात 'ही बातमी समजली का' मध्येच आलं होतं. त्यावर पुरेशी चर्चा व्हायला लागल्यावर स्वतंत्र धागा केला गेला. ऐसीचे संपादक अशा स्वतंत्र चर्चा वारंवार वेगळ्या करतात.

मारवा Mon, 11/07/2016 - 13:56

In reply to by नितिन थत्ते

http://www.aisiakshare.com/node/5353
थत्तेंचा आक्षेप माझ्या मते
. चर्चाविषयासाठी अधिक व्यापक मांडणी अपेक्षित आहे. या लेखात जर उद्धृतांनंतर 'कसे व्हायचे?' यासारख्या प्रश्नातून 'लोकहो, मी काहीतरी थोडंसं सांगितलं, तुम्ही लिहा निबंध' असं म्हटल्यासारखं वाटतं.
नेमका इथे असावा
म्हणजे मला अस वाटत.तुम्ही जी अपेक्षा मिलींदजी कडुन करत आहात तसे त्यांनी दिलेल्या लिंक मध्ये झाले नाही.
तुमचा प्रतिसाद वाचुन असे वाटते की चर्चा धाग्याचा लेखक हा धागालेखक व्यापक मांडणीच्या जबाबदारीतुन मुक्त आहे किंवा बहुधा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असे वाटते की प्रतिसादकांनी एखाद्या विषयावर उत्तम पुरेशी चर्चा केल्यासही तो धागा ही बातमी वाचली का मधुन "आपोआप" चर्चाविषय मध्ये येण्यास पात्र होतो.
असे जर असेल तर मग मिलिन्दजी कडुन वा कोणाकडुनही व्यापक मांडणीची अपेक्षाच गैर वाटते.
मला समजले तितके

नितिन थत्ते Mon, 11/07/2016 - 14:00

In reply to by मारवा

आक्षेप वगैरे कै नै हो.

नव्या सदस्याला डीमॉरलाइज करू नये म्हणून.

हे सदस्य जोवर "अमुक औषध रोज अमुक प्रमाणात घेतले तर तमुक रोग बरा होतो" अशा जनरल पोष्टी टाकत नाहीत तोवर त्यांच्या लेखनावर बंधने येऊ नयेत.

मारवा Mon, 11/07/2016 - 14:13

In reply to by नितिन थत्ते

मिलीन्दजी फार उत्कृष्ठ कविता लिहीतात. त्यांच्याविषयी त्यांच्या प्रतिभेविषयी फार कौतुकाची भावना आहे. त्यांच्या कविता नेहमीच अधीरतेने वाचत असतो. म्हणूनच असे बोलतो. डिमॉरलाइज करण्याचा अजिबात हेतु नाहीच.
केवळ एक चर्चाविषया च्या मांडणी संबंधी थोडीफार अपेक्षा होती इतकेच. पण असो
त्यांच्या किंवा कुणाच्याही लेखनावर बंधन नकोच.
या विषयावर हा शेवटचा प्रतिसाद.

राजेश घासकडवी Mon, 11/07/2016 - 18:24

In reply to by मारवा

मूळ चर्चेसाठीचा धागा हा व्यापक, काहीतरी दात रुतवण्याजोगं असावा अशी अपेक्षा आहे. याउलट कुठच्यातरी विषयावर लहानसं लिहायचं असेल तर ते बातमी समजली का मध्ये यावं असा विचार आहे. आता बातमी... मध्ये काहीतरी लहानसं आलं आणि इतर सदस्यांनी त्यावर तिथे विस्तृत चर्चा करायला सुरूवात केली तर त्या चर्चेला एक स्वतंत्र अस्तित्व येतं. म्हणून असे धागे वेगळे काढण्याचा आमचा प्रयत्न असतो. मग त्यासाठी मूळ बीज लहान असलं तरी चालतं. तुम्ही दिलेल्या ब्रेक्झिटच्या धाग्याचंही असंच झालेलं होतं. जर लेखकाला आपल्या चर्चेचं स्वतंत्र रोप लावायचं असेल तर त्यासाठी मशागत हवी इतकंच म्हणणं आहे. नुसतंच बी टाकून जायचं आणि ते रोप फुलेल अशी आशा धरायची असं सगळ्यांनीच केलं तर खूप लहानलहान सुकलेल्या रोपांचं भरताड ट्रॅकरवर दिसेल. ते टाळल्याने बोर्ड कमी वेगाने हलतो खरा, पण एकोळी दोनोळी धागे कमी होतात.

तिरशिंगराव Tue, 12/07/2016 - 12:32

In reply to by राजेश घासकडवी

काहीतरी दात रुतवण्याजोगं असावा अशी अपेक्षा आहे.

या वाक्यामुळे,ऐसीवरील अनेक 'दांत' शिवशिवत असलेल्या आयडीज डोळ्यांसमोर आल्या.

अरविंद कोल्हटकर Mon, 11/07/2016 - 08:12

'ऐसी'चे वाचक भोळेभाबडे असून त्यांना जगात काय चालले आहे त्याची काहीच माहिती नसते, त्यांना चालू घटनांचा आपणच परिचय करून दिला पाहिजे असा बहुतेक मिलिन्द ह्यांचा अंदाज असावा आणि म्हणूनच खालील प्रकारचे simplistic आणि trite धागे त्यांच्या लेखणीमधून घडयाळाच्या ठोक्यासारखे बाहेर पडत असावेत.

आम्हाला हे सगळे आधीच माहीत आहे, काही नवे असल्यास सांगा असे सुचवू काय?

आयसिस = "धर्मोध्दारक भाईबंदांचे बंड" (इखवान)
ट्रम्प यांची मुक्ताफळे !
Bloody Ramadan 2016
हिंसामग्न अतिरेक्याची लक्षणे
ओर्लान्डो मधील कत्तल : काही निरीक्षणे

धर्मराजमुटके Mon, 11/07/2016 - 14:25

In reply to by अरविंद कोल्हटकर

कोल्हटकर यांचे आजवरचे लिखाण पाहून ते फक्त गंभीर व माहितीपुर्णच लिहू शकतात असे वाटले होते मात्र ते विनोदी ही लिहू शकतात हे पाहून आनंद झाला. :)
प्रतिक्रिया खवचट नसून प्रामाणिक आहे याची नोंद घेणे.
ता.क. भारतीय राजकारणी जेव्हा विनोदी बोलत नसतात तेव्हा आम्ही माध्यमांत ट्रम्पच्याच विनोदी वचनांची शोधाशोध करत असतो. आणि ते कधीही आम्हाला निराश करत नाहित. आता अमेरिकेचा प्रथम विनोदी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होते काय याचीच उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र ज्यु. बुश देखील कमी विनोदी नव्हते हे ही आवर्जुन नमूद केले पाहिजे. मात्र ट्रम्प साहेबांची सर त्यांना आहे की नाही यासाठी आम्हाला कोणी "अभ्यास वाढवा" असा उपदेश देण्याची गरज आहे.

मिलिन्द Thu, 14/07/2016 - 00:59

In reply to by अरविंद कोल्हटकर

"'ऐसी'चे वाचक भोळेभाबडे असून त्यांना जगात काय चालले आहे त्याची काहीच माहिती नसते" हे केवळ न्यूनगंडातून आलेले भाष्य आहे. सर्व वर्तमानपत्रे , भाष्यकार साधारण याच जातीचे काम करतात (अर्थातच अधिक ऍडव्हान्स्ड -मी काही पत्रकार नाही) . तर मग त्यांचे स्वतःच्या वाचकवर्गाबाबत असेच मत असते असे धरावे काय ?
simplistic आणि trite ही केवळ शिवीगाळ झाली, त्याला उत्तर देण्याचे कारण नाही .
आणि माझा आणि ऐसीचाही हेतू "ज्ञान पाजणे" हा नसून चर्चेला आवाहन करणे हा आहे, ही अत्यंत उघड गोष्ट वरच्या पोष्टकारांच्या लक्षात आली नसावी याचे आश्चर्य वाटते . कदाचित स्वतः लिहिताना त्यांचा हेतू ज्ञान पाजणे हा असल्यामुळे असे होत असावे . असो!

अनुप ढेरे Mon, 11/07/2016 - 10:35

"आपण अनेक देशांच्या संरक्षणाचा खर्च उगाचच, आणि परवडत नसताना करतो. तो त्यान्च्याकडून वसूल करावा : उदा. दक्षिण कोरिया , जपान. किंवा त्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच उचलावी: त्यात त्यांनी अणुबॉम्ब बनविला तरी चालेल ."

यात काय चुक आहे?

अनु राव Mon, 11/07/2016 - 10:50

In reply to by अनुप ढेरे

आता माझा पाठिंबा हिलरीला आहे

ढेरेशास्त्री, त्यांना हिलरी ला पाठींबा देण्यात चुक वाटत नाही, मग पुढे काय बोलणार?

हीलरी क्रोनी कॉर्पोरेट, वॉल स्ट्रीट ची लोके, गो.सॅक सारखे लफडेबाज, सोरोस, लॉबीइस्ट लोकांची प्रतिनिधी आहे हे त्यांना अमेरीकेत राहुन दिसत नाहीये. गेल्या २० ते ३० वर्ष अमेरीकेच्या सर्वसामान्य लोकांना लुटणार्‍या ह्या लोकांना ट्रंप किंवा दुसरा कोणीही जो सिस्टीम बाहेरचा माणुस आहे तो नको आहे.
बर्‍याच कंपन्यांनी टृंप ला फंडींग करायला नकार दिला आहे. म्हणे ट्रंप च्या सात पट ( सेव्हन बरंका ) हिलरी साठी फंडींग जमले आहे.

ट्रंप कीतीही वेडा असु दे, पण २ टर्म तरी पुर्णपणे बाहेरचा माणुस येणे गरजेचे आहे.

मिलिन्द Mon, 11/07/2016 - 21:53

In reply to by अनु राव

"क्रोनी कॉर्पोरेट, वॉल स्ट्रीट ची लोके, गो.सॅक सारखे लफडेबाज, सोरोस, लॉबीइस्ट " या लोकांनी दोन्ही पक्षांना खिशात ठेवले आहे . पण लोकशाही कशी चालते याचे शून्य ज्ञान असणारा , आणि केवळ स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर संबंध जग बदलीन अशा खुळचट भ्रमात वावरणाऱ्याला ट्रम्पला आणणे हा मूर्खपणा आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर कोणताही प्रश्न विचारला की मी तिथे योग्य तो "एक्स्पर्ट " नेमीन असे त्याचे उत्तर असते . त्यामुळे फर्स्ट लेडी , सिनेटर आणि परराष्ट्रमंत्री असा प्रचंड अनुभव असणाऱ्या हिलरी क्लिंटन नावाच्या "एक्स्पर्ट" ला लोकांनी प्रेसिडेंट नेमायचे ठरविल्यास आश्चर्य वाटू नये.

सैराट Mon, 11/07/2016 - 23:19

In reply to by मिलिन्द

सहमत आहे. आणि हिलरी कुठे कमी पडत असल्या तरी lesser Evil म्हणून त्यांनाच निवडावं असं माझं मत आहे.

अनु राव Tue, 12/07/2016 - 09:07

In reply to by मिलिन्द

"क्रोनी कॉर्पोरेट, वॉल स्ट्रीट ची लोके, गो.सॅक सारखे लफडेबाज, सोरोस, लॉबीइस्ट " या लोकांनी दोन्ही पक्षांना खिशात ठेवले आहे

तेच तर मी म्हणतीय, म्हणुनच ट्रंपसारखा बाहेरचा माणुस पाहिजे. वर उल्लेख केलेल्या लोकांना दुसरा कोणीही प्रॉपर रीपब्लिकन पण चाललाच असता. तसेही दोन्ही पक्षा वैचारीक भेद वगैरे नाहीयेतच. म्हणुनच प्रायमरीज जिंकुन सुद्धा ट्रंप ची उमेदवारी घोषित करत नाहीयेत.

त्यामुळे फर्स्ट लेडी , सिनेटर आणि परराष्ट्रमंत्री असा प्रचंड अनुभव असणाऱ्या हिलरी क्लिंटन नावाच्या "एक्स्पर्ट" ला लोकांनी प्रेसिडेंट नेमायचे ठरविल्यास आश्चर्य वाटू नये.

एक्स्पर्टाईज आहे पण ती कशात हे महत्वाचे नाही का? हिलरी बाईंची एक्स्पर्टाइज अमेरीकन माणसांच्या विरुद्ध च काम करेल. तसे भारतात चिदु, सिब्बल वगैरे प्रचंड एक्स्पर्ट आहेतच की.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/07/2016 - 21:42

In reply to by अनु राव

दोन्ही पक्षा वैचारीक भेद वगैरे नाहीयेतच. म्हणुनच प्रायमरीज जिंकुन सुद्धा ट्रंप ची उमेदवारी घोषित करत नाहीयेत.

उमेदवारी जाहीर करण्याचं काम पक्षाच्या महाअधिवेशनात (convention) होतं असं मी ऐकून आहे. हे खरं आहे का, अनुतै?

ओ अनुतै, तुमचा ट्रंप २००८ सालात उमेदवारीचे इरादे जाहीर करण्याच्या विचारात होता तेव्हा त्याला हिलरी उपाध्यक्ष म्हणून चालणार होती, तेव्हा ती राष्ट्राष्यक्षा बनण्यास पात्र होती असंही त्याचं मत होतं. असे व्हिडीओ आज बातम्यांमध्ये झळकत होते; हे व्हिडीओ डॉक्टर्ड नसावेत असा अंदाज आहे.

अनु राव Wed, 13/07/2016 - 12:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती तै, मी कोणाच्याच बाजुची नसते त्यामुळे ट्रंप्च्या बाजुची आहे असे म्हणता येणार नाही. पण मी काही लोकांच्या विरुद्ध मात्र असते.

उत्तर सहज पणे आणि गणिती पद्धतीने सापडणार नसेल तर मी एलिमीनेशन ची पद्धत वापरते. हिलरी किंवा भारतापुरते बोलायचे झाले तर चिदु, सिब्बल, कमलनाथ ही लोके मी एलिमीनेट केली आहेत. मग उरलेल्या लोकांच्यात उत्तर शोधायचे. मिळाले तर ऊत्तम, नाही मिळाले तर त्यांना ही एलिमिनेट करायचे.

पूर्णपणे सिस्टीम बाहेरचा माणुस येणे मला गरजेचे वाटते कारण सध्या सिस्टीम मधे असणार्‍यांनी निराशा केलीय ( त्यात हिलरी, बुश, चिदु, सिब्बु आले ). म्हणुन मला केजरीवाल निवडुन यायला हवा होता. तसेच अमेरीकेत ट्रंप. कमीतकमी गेले काही दशके ठाण मांडुन बसलेली सिस्टीम ढवळुन तर निघेल.

मोदी आल्यामुळे बाकी काही झाले नाही तरी सर्व सरकारी संस्थांवर स्वताची मालकी असल्यासारखी मांड ठोकुन बसलेले डावे, 'सिक'युलर ढवळुन तर निघाले. हे ही नसे थोडके असा पॉझीटीव्ह विचार त्यात आहे.

ट्रंप आला निवडुन तर कमीतकमी फक्त क्रोनी चोरांसाठी सरकार चालवुन चालणार नाही. थोडा विचार तरी जनतेचा केला पाहिजे इतकी समज येइल ही आशा.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 13/07/2016 - 21:50

In reply to by अनु राव

कमीतकमी गेले काही दशके ठाण मांडुन बसलेली सिस्टीम ढवळुन तर निघेल.

हे काम सध्या बर्नी सँडर्सही करत आहेच, उमेदवारी न मिळूनही.

उदाहरणार्थ हा लेख पाहा - Bernie's philosophical victory

अनु राव Wed, 13/07/2016 - 22:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बर्नी साठी सिलरी नी रस्ता मोकळा करुन द्यायला पाहिजे होता ना. पण ती आणि तिच्या मागे उभे असलेले चोर हटणार नाहीत.
डेमोक्रेटीक मतदारांनी पण तिलाच काठावर का होइना निवडुनच दिले. खरे तर बर्नी सपोर्टर्स नी ट्रंम्प ला मत द्यायला पाहिजे.

हिलरी जिंकुन येइल ह्याची मला अल्मोस्ट खात्री आहे.

Nile Thu, 14/07/2016 - 00:22

In reply to by अनु राव

हिलरी जिंकुन येइल ह्याची मला अल्मोस्ट खात्री आहे.

वा! सच्च्या ट्रंप समर्थकाप्रमाणे घूमजाव केलेले दिसते. अर्थात, ट्रंप समर्थक म्हणल्यावर त्याच्या वागण्या-बोलण्याचेही अनुकरण होणारच नाही का!

अतिशहाणा Thu, 14/07/2016 - 00:35

In reply to by अनु राव

हिलरी जिंकुन येइल ह्याची मला अल्मोस्ट खात्री आहे.

रोज वेगवेगळे ट्रेंड्स दिसत आहेत.
आजचा ट्रेंड https://www.qu.edu/news-and-events/quinnipiac-university-poll/2016-pres…

मिलिन्द Thu, 14/07/2016 - 00:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वैचारीक भेद :

  • स्त्रियांना संतती नियमन आणि गर्भपाताचा हक्क असावा की नसावा .
  • कोणताही सरकारी खर्च (संरक्षण सोडल्यास) योग्य की अयोग्य.
  • कराचे प्रमाण किती असावे?
  • अमेरिका हा ज्युडिओ-ख्रिश्चन देश मानावा की इहवादी देश मानावा?
  • सरकारने समाजातील दुबळ्यांसाठी काही करावे का न करावे?
  • गे मॅरेज . गे लोकांना मूल दत्तक घेता येणे .

या सर्व बाबतीत प्रचंड मतभेद आहेत .

मिलिन्द Tue, 12/07/2016 - 22:41

In reply to by अनु राव

हिलरी चे कौशल्य कशात असू शकते:
1. 401 (के) (निवृत्ती-निधी) याची किंमत वाढवत नेणे (किंवा निदान टिकवून ठेवणे!).
2. अमेरिकेला आणि जगाला उ . कोरिया, चीन किंवा रशिया यांच्याबरोबर अणुयुद्धातून दूर ठेवणे.
3. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या राजकीय रचनांमधले काय कालबाह्य झाले आहे आणि काय अजूनही टिकवणे प्राप्त आहे याची अचूक कल्पना.
4. मुस्लिम दहशतवाद मोडून काढायला मुस्लिम राष्ट्रांचेच प्रचंड सहकार्य लागते याची जाणीव आणि योग्य कृती .
5. विरोधी पक्षाकडून थोडीफार तरी स्वीकारार्हता . अमेरिकेचे खरे राजकारण सेंट्रिस्ट मार्गाने आणि देवघेवीवर चालते याची स्पष्ट जाणीव.
6. अश्वेत लोकांचे हितसंबंध जपण्याबाबतची विश्वासार्हता .
यातला एकही गुण ट्रम्प जवळ आहे असे दिसत नाही .

मिलिन्द Wed, 13/07/2016 - 21:37

In reply to by अनु राव

सिस्टीमबाहेरचा केपेबल मनुष्य आणण्यामागची भावना मी समजू शकतो . पण सिस्टीमबाहेरचा माकड आणून कसे चालेल ?

अनु राव Wed, 13/07/2016 - 22:09

In reply to by मिलिन्द

सिस्टीम मधल्या दोन्ही बोक्यांनी लोण्याचा गोळा फस्त केलाय. आता माकड तर माकड पण हे बोके नकोत.

मिलिन्द Mon, 11/07/2016 - 21:44

In reply to by अनुप ढेरे

यात "चूक" असे आहे की जपानच्या कल्चरमध्येच एक सुप्त आक्रमण , साम्राज्यवाद आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानने किती भयानक युद्ध-गुन्हे केले होते हे जगजाहीर आहे . त्यामुळे जपानला सैन्य ठेण्याची परवानगी न देऊन अमेरिकेने जगावर , आणि विशेतः पॅसिफिकच्या पूर्व किनाऱ्यावर मोठे उपकार केले आहेत. जर्मनीचेही तसेच.

पण जगाचं संरक्षण करण्याची जबाबदारी अमेरिकेला कोणी दिली? आणि आता त्यांना ते नको असेल तर? इराकी लोकांची सुटका करायची म्हणून सद्दाम हुसेनला हटवलं. त्याची फळं दिसत आहेतच आता.

उलट चीनवर वचक म्हणून आक्रमक जपान छान होईल.

मिलिन्द Mon, 11/07/2016 - 22:29

In reply to by अनुप ढेरे

पण जगाचं संरक्षण करण्याची जबाबदारी अमेरिकेला कोणी दिली? हे मान्य आहे . पण "यूनो" नावाचा विनोदी, केवळ ठराव पास करणारा, कागदी वाघ हा सद्दाम , मिलोसेविक किंवा आयसिस अशासारख्या संकटांवर काहीच करू शकत नाही असे दिसते. कोणाला तरी ते आव्हान स्वीकारावेच लागते . दोन वर्षांपूर्वी आयसिस ग्रस्त लोणना मदत म्हणून युनोने एक समिती स्थापन केली . ती फक्त डोहामध्ये बसून कागद सरकवते! अमेरिकन लोकांना परदेशी युद्धे नकोशीच झालेली आहेत, आणि ती थांबल्यास त्यांना आनंदच आहे .

अमेरिकन लोकांना परदेशी युद्धे नकोशीच झालेली आहेत!

सर्व ठिकाणी ** घातल्यावर आता नको झालेली आहेत, बरोबरे. चूह्यांचा जिनोसाईड करूनच ही बिल्ली हजला चाललेली आहे. हे असले काही लिहिताना काही वाटत कसे नाही कोण जाणे.

मिलिन्द Wed, 13/07/2016 - 03:17

In reply to by बॅटमॅन

अमेरिकन जनता आणि अमेरिकन "निओकॉन" राज्यकर्ते (ज्यात सुप्तपणे हिलरीही मोडते!) यांच्यात फरक करण्याची साधी, पण प्रौढ, कपॅसिटी तुमच्यात निर्माण होईल तो सुदिन! जनता युद्धाला कंटाळली आहे ; अफगाण युद्ध सुरू होऊन आता 14 वर्षे झाली : अनेक सैनिकांच्या 7-8 फेऱ्या झाल्या आहेत. याउलट अमेरिकन "निओकॉन" राज्यकर्त्यांची महत्वाकांक्षा अफाट आणि अमर्याद , न संपणारी आहे . (उजव्या प्रवृत्तीच्या लोकांची हांव संपल्याचे कधी पाहिले आहे का ?)

अमेरिकन जनता आणि अमेरिकन "निओकॉन" राज्यकर्ते (ज्यात सुप्तपणे हिलरीही मोडते!) यांच्यात फरक करण्याची साधी, पण प्रौढ, कपॅसिटी तुमच्यात निर्माण होईल तो सुदिन!

अमेरिकन राज्यकर्ते आभाळातून पडले असल्यास तुमचे म्हणणे मान्य, नपेक्षा ही फक्त एक सोयीस्कर मखलाशी आहे. कार्पेट बाँबिंग करून अलकायदा व तालिबानी लगेच शरण येतीलसे वाटलेले तेव्हा हीच जन्ता एकदम प्रो युद्ध होती. झेपत नै म्हटल्यावर लगेच अँटीयुद्ध झाली. इराकचेही तेच. स्वहस्ते सगळं विस्कटल्यावर विस्कटलं म्हणून लोक ओरडू लागले. असल्या चोरांची वकिली करताना जनाची नै तर मनाची तरी वाटली पाहिजे.

मिलिन्द Wed, 13/07/2016 - 21:28

In reply to by अनिरुद्ध गोपाळ…

ज्या सहजतेने तुम्ही 4-5 कोटी लोक ठार मारायच्या गोष्टी करता ते ऐकून थक्क व्हायला होते. 4.1 कोटी पश्तून लोकात जेमतेम 20-25 हजार तालिबानी असतील.

अहो ते सर्वच तालेबानी आहेत. त्यातले काही बंदुका घेऊन मारामारी करतात. त्या चार कोटीतल्या २-२.५ कोटी बायकांना तर गुराइतकी पण किम्मत नाही.
-------------

साधे बघा. रशियानी जेंव्हा अफगणीस्तान ताब्यात घेतला. त्या नंतर तिथली परीस्थिती वाईट होती का? शांतता होती, शाळा कॉलेज, हॉस्पिटल चांगली सुरु होती. नविन बांधकामे होत होती. बायकांना बुरखे घालुन रहावे लागत नव्हते. असे असताना कोणीही माणुस ज्याचे देशावर आणि समाजावर प्रेम आहे तो मुजाहिद झाला नसता. पण ह्यांच्या डोक्यात घाणेरडे विचार असल्यामुळे रशियाला त्रास दिला. रशियानी पण मरहाण केली ती प्रत्युत्तर म्हणुन. नाहीतर आज अफगणीस्तान चा तुर्कस्तान तरी झाला असता.
पण नाही त्यांना इतिहासात कधीही माणसा सारखे जगणे जमले नाही.

मिलिन्द Wed, 13/07/2016 - 23:55

In reply to by अनु राव

ज्यांनी अश्रफ घनी सारख्या अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाची डॉक्टरेट मिळविलेल्या माणसाला पंतप्रधान केले आहे , पार्लमेंट मध्ये बायका निवडून दिल्या आहेत आणि जे भारताबरोबर देश-उभारणीसाठी उत्तम सहकार्य करीत आहेत अशा अफगाण लोकांना सरसकट तालिबानी म्हणणे चुकीचे आहे .

अफगाण तालिबानचा उदय हा रशिया आणि अमेरिकेमुळे झालेला आहे. रशियन ऑक्युपेशनच्या काळातली परिस्थिती कै. सुस्मिता बॅनर्जी यांच्या "काबुलीवालार बाङाली बोउ" नामक आत्मचरित्रपर बंगाली पुस्तकात वाचायला मिळते.

तालिबान्यांनीच त्यांची हत्या केली.

अतिशहाणा Thu, 14/07/2016 - 00:21

In reply to by बॅटमॅन

हॅहॅहॅ कुणाला समजावताय बॅटमॅनशेठ. त्यांना अमेरिका-ब्रिटन हे जगाचे उपकारकर्ते आणि एकंदर थर्ल्ड वर्ल्ड लोकांपेक्षा जगण्यास अधिक पात्र वाटतात असे आजवर प्रतिसादांतून दिसलेले आहे.

पण नाही त्यांना इतिहासात कधीही माणसा सारखे जगणे जमले नाही.

http://www.goodreads.com/book/show/163921.Full_Tilt

या लेखिकेने आयर्लंड ते दिल्ली हा एकट्या स्त्रीचा सायकलप्रवास प्रामुख्याने मध्यपूर्व आणि अफगाणिस्तानातून केला. इतिहासात कधीही माणसासारखे जगणे न जमणाऱ्या लोकांनी तिला बरीच मदत केली असे तिचे म्हणणे आहे. असो.

मिलिन्द Thu, 14/07/2016 - 00:48

In reply to by अतिशहाणा

अमेरिकेच्या खऱ्या पापांची (व्हिएतनाम, पर्यावरण, गुलामगिरी , स्थानिक लोकांचा नाश)निंदा करणे आवश्यकच आहे . पण तिसऱ्या जगातली एलिट्स स्वतःचे दारुण अपयश झाकण्यासाठी अमेरिकेला ज्या सतत शिव्या घालतात ते बघून कीव येते. हल्ली भारतीय राजकारण्यांनी हा प्रकार जरा कमी केला आहे हे सत्य आहे. पण जित्याची खोड..

बॅटमॅन Thu, 14/07/2016 - 01:22

In reply to by अतिशहाणा

अमेरिका-ब्रिटन हे जगाचे उपकारकर्ते आणि एकंदर थर्ल्ड वर्ल्ड लोकांपेक्षा जगण्यास अधिक पात्र

बाटगा-बांग-जोर-न्याय.

बायदवे तुम्हीही ज्या सहजतेने अमेरिकन साम्राज्यवादाचा उदोउदो करता ते पाहून थक्क आणि सर्द व्हायला होते.

मिलिन्द Thu, 14/07/2016 - 02:55

In reply to by बॅटमॅन

सत्याची ऍलर्जी आणि इतिहासाचे (आणि वर्तमानाचेही) प्रगाढ अज्ञान असल्यावर असे वाटायचेच ! पूर्वाश्रमीची अनेक कम्युनिस्ट राष्ट्रे सध्या अमेरिकी "साम्राज्यात" जमा होण्यासाठी (म्हणजेच मोठ्या प्रमाणात अमेरिकन भांडवलाची आयात करण्यासाठी) मरत आहेत! व्हिएतनाम , चीन, पूर्व युरोपातील सर्व राष्ट्रे इत्यादी. तसेच संघाला ठोकरून मोदीही! असो!

बॅटमॅन Thu, 14/07/2016 - 10:32

In reply to by मिलिन्द

एकदा अजेंडा ठरवला की मानसिक आणि प्रत्यक्ष मांडलिक स्टेटसचेही काही वाटेना होते. चालायचेच!

अनु राव Wed, 13/07/2016 - 12:26

In reply to by बॅटमॅन

कार्पेट बाँबिंग करून अलकायदा व तालिबानी लगेच शरण येतीलसे वाटलेले

असे नाहीये बॅट्या. कार्पेट बॉम्बींग केलेच नाही हा प्रॉब्लेम आहे. फारच थोडी आणि बिचकत बिचकत कारवाई केली. वर चुक म्हणजे स्वताची माणसे जमिनीवर उतरवली**.

पूर्ण ताकदीने आणि फक्त हवेतुन हल्ले केले असते तर प्रश्न कधीच निकालात लागला असता. अमेरीकन जनतेचे मत पण युद्धाच्या विरुद्ध झाले नसते. गुहेत लपुन राहीले असते तर अन्नपाण्यावाचुन तरी मेले असते.

----------
** : ओबामानी सत्तेवर आल्यावर पहिली गोष्ट केली ते म्हणजे सैन्याचे अधिकार कमी केले. तालीबानी दिसुन सुद्धा त्यांना मारायला बंदी घातली, फक्त पकडायचे आणि १-२ महिन्यांनी सोडुन द्यायचे. त्यामुळे अमेरीकन पेट्रोलिंग टीम ला तेच तेच तालीबानी ३-४ वेळा पकडायला लागायचे.

बॅटमॅन Wed, 13/07/2016 - 12:29

In reply to by अनु राव

कार्पेट बॉम्बींग केलेच नाही हा प्रॉब्लेम आहे.

नक्की का? मला आठवते त्याप्रमाणे असे बाँबिंग केल्याच्या बातम्या वाचल्या आहेत.

बायदवे या केसमध्ये अमेरिकनांना सहानुभूती देणे अशक्यप्राय आहे कारण तालिबान हे त्यांनीच उभे केलेले भूत आहे. रशियाला शह म्हणून लोकल गुंडांना ट्रेनिंग आणि साहित्य दिले. त्र्याण्णव सालची एक बातमी ओसामाला 'फ्रीडम फायटर' म्हणून संबोधताना आढळली.

अनु राव Wed, 13/07/2016 - 12:34

In reply to by बॅटमॅन

नक्की का? मला आठवते त्याप्रमाणे असे बाँबिंग केल्याच्या बातम्या वाचल्या आहेत

जर केले असेल तर अजुन १०० पटीने जास्त करायला हवे होते.

रशियानी पण तिच चुक केली. अफगाणी शिल्लकच नसते ठेवले तर मुजाहीदी आणि मग तालेबानी कुठुन आले असते?

अनु राव Wed, 13/07/2016 - 12:36

In reply to by बॅटमॅन

रोमन लोकांनी कार्थेज आणि त्यात रहाणारे सवे एका फटक्यात नष्ट केल्यामुळे पुढे १०० वर्ष त्यांना त्रास झाला नाही. तुला तर हे चांगलेच माहीती आहे बॅट्या.

बॅटमॅन Wed, 13/07/2016 - 12:40

In reply to by अनु राव

होय, रोम-कार्थेजचं माहिती आहे. इथेही हेच झालं असतं का? माहिती नाही. सध्या जे चालू आहे ते पाहता वाटत नाही की असं कै झालं असतं इतकंच काय ते.

ऋषिकेश Thu, 14/07/2016 - 09:43

In reply to by बॅटमॅन

चोरांची वकिली करताना जनाची नै तर मनाची तरी वाटली पाहिजे.

अगदी सहमत
मला तर अश्या जगभर उच्छाद मांडणार्‍या चोर देशात पाहुणा म्हणून रहाताना सुद्धा स्वतःबद्दल दहादा नैतिक प्रश्न पडत होते.
अश्या जगभर मुजोरी करणार्‍या आणि अनेक देशांतील नागरीकांचे जीणे हराम करणार्‍या देशात, लोक कायचे चिकटून कसे काय राहु शकतात आणि ह्या अश्या देशाचा स्वेच्छेने नागरीक झालो आहे असे कबूल करताना आरशात तोंड कसे बघु शकतात असा प्रश्न मला तेव्हा पडायचा - अजूनही त्याचे उत्तर मिळालेले नाही!

अनिरुद्ध गोपाळ… Thu, 14/07/2016 - 10:00

In reply to by ऋषिकेश

वा वा वा...इतके स्पष्ट आणि सडेतोड शब्द अमेरिकेबाबत मराठी मध्यमवर्गी माणसाकडून प्रथमच ऐकले...

LEON WIESELTIER:
"...For decades now in America we have been witnessing a steady and sickening denigration of humanistic understanding and humanistic method. We live in a society inebriated by technology, and happily, even giddily governed by the values of utility, speed, efficiency, and convenience. The technological mentality that has become the American worldview instructs us to prefer practical questions to questions of meaning – to ask of things not if they are true or false, or good or evil, but how they work...."

बॅटमॅन Thu, 14/07/2016 - 12:13

In reply to by ऋषिकेश

अश्या जगभर मुजोरी करणार्‍या आणि अनेक देशांतील नागरीकांचे जीणे हराम करणार्‍या देशात, लोक कायचे चिकटून कसे काय राहु शकतात आणि ह्या अश्या देशाचा स्वेच्छेने नागरीक झालो आहे असे कबूल करताना आरशात तोंड कसे बघु शकतात असा प्रश्न मला तेव्हा पडायचा - अजूनही त्याचे उत्तर मिळालेले नाही!

या देशात राहून मला पैसे मिळत असतील तर बाकी जग जाऊदे तेल लावत असा साधा सोपा विचार केलेला असतो. टोचणी अधूनमधून लागली तरी ती सुपरबॉलच्या आवाजात विरून जात असावी.

चिंतातुर जंतू Thu, 14/07/2016 - 13:05

In reply to by ऋषिकेश

>>अश्या जगभर मुजोरी करणार्‍या आणि अनेक देशांतील नागरीकांचे जीणे हराम करणार्‍या देशात, लोक कायचे चिकटून कसे काय राहु शकतात आणि ह्या अश्या देशाचा स्वेच्छेने नागरीक झालो आहे असे कबूल करताना आरशात तोंड कसे बघु शकतात असा प्रश्न मला तेव्हा पडायचा - अजूनही त्याचे उत्तर मिळालेले नाही!

हे तर्कशास्त्र नीटसं कळलं नाही. जगभरातली सरकारं कमीअधिक प्रमाणात आणि झेपेल तितकी मुजोरी करत असतात - स्वतःच्याच नागरिकांवर किंवा परदेशातही. 'काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे' असं म्हणत राहण्यासाठी भारत सरकार अनेक गोष्टी करत असतं. उदा :

WikiLeaks cables: India accused of systematic use of torture in Kashmir (२०१०ची बातमी)

मग भारतात राहायचं की नाही हे ठरवताना (किंवा एरवीदेखील) मी भारत सरकारच्या काश्मीरमधल्या मानवी हक्क उल्लंघनांचा विचार करून स्वतःला आरशात तोंड पाहायच्या लायकीचं मानू नये का?

(हे अमेरिकन किंवा भारतीय सरकारचं समर्थन नाही. लोकशाही प्रक्रियेत माझ्या व्यक्तिगत मतांपैकी सगळंच काही माझं सरकार ऐकणार नसतं. अनेकदा ते त्यांच्या विरोधात जाईल. त्याचा मी कदाचित लोकशाही मार्गानं विरोधदेखील करेन. पण मग त्यासाठी नक्की कधी मी स्वतःला अपराधी किंवा नैतिकदृष्ट्या जबाबदार मानावं असा प्रश्न आहे.)

ऋषिकेश Thu, 14/07/2016 - 13:59

In reply to by चिंतातुर जंतू

जन्म होऊन एखादा देश मिळणं वायलं नि तो खास निवडून तिथे स्थायिक होणं वायलं. माझी शब्दयोजना नीट बघा!
आणि तसंही भारत आपल्या देशाबाहेर असा काय उच्छाद मांडतो ते ही सांगाल काय?

आपल्याच नागरीकांवर सगळेच बडे देश अत्याचार करतात हे मान्य! पण बाहेरच्या देशांवर ते ही विनाकारण (उगाच खुमखुमी) हल्ला करणारे किती देश तुम्हाला माहितीयेत?
इराक युद्ध कसा गुन्हा होता हे ब्रिटिश लोक मान्य तरी करताहेत. अमेरिकेला तर त्याची खंतही नाही! अश्या जागतिक गुन्हेगार देशात रहाताना - तो ही स्वतः निवडून- काहिच नैतिक पेच पडू नयेत म्हणजे निबरपणाची कमाल आहे! मला तरी अमेरिकेत रहाताना मी या देशात रहातो हे सांगायला बर्‍यापैकी लाज वाटे.

चिंतातुर जंतू Thu, 14/07/2016 - 15:20

In reply to by ऋषिकेश

>> जन्म होऊन एखादा देश मिळणं वायलं नि तो खास निवडून तिथे स्थायिक होणं वायलं. माझी शब्दयोजना नीट बघा!
आणि तसंही भारत आपल्या देशाबाहेर असा काय उच्छाद मांडतो ते ही सांगाल काय?

माझ्या अनेक नातलगांप्रमाणे, मित्रांप्रमाणे किंवा सहकार्‍यांप्रमाणे आज मलाही इतर देशांत स्थायिक होण्याचा पर्याय आहे. तरीही मी भारतात राहतो आहे. म्हणजे ती माझी निवडच आहे, आणि (त्यामुळे मिळणार्‍या फायद्या-तोट्यांसह) तिची जबाबदारी मी घेतो. त्यामुळे परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेताना वेगळं तर्कशास्त्र आणि भारतातच राहताना वेगळं तर्कशास्त्र असा फरक मी करत नाही.

शिवाय, भारत देशाबाहेर उच्छाद मांडतच नाही असं मी काही छातीठोकपणे सांगू शकत नाही. श्रीलंकेमध्ये आपलं सैन्य गेलं होतंच. काश्मीरला भारताचा भाग मानायचा की नाही हेच अनेक परकीयांसाठी स्पष्ट नाही. पाकिस्तान-बांगलादेश-अफगाणिस्तान-नेपाळ वगैरे जवळच्या देशांत तर आपले नक्कीच काही ना काही छुपे उद्योग चालत असणार. मात्र, माझा मुद्दा तो नाही. अमेरिका (किंवा कोणत्याही काळातली कोणतीही जागतिक सत्ता) अनेक प्रकारची अनैतिक कृत्यं करत असते ह्याविषयी मला खात्री आहे. तुमच्या तर्कशास्त्राविषयी मला पडलेले प्रश्न असे आहेत :

  • सरकारनं नक्की किती (आणि कुणावर) अत्याचार केले की मला ह्या देशात राहायची लाज वाटायला हवी?
  • देशाबाहेरचा उच्छाद अधिक लाजिरवाणा का? आपल्याच नागरिकांचा छळ तितकाच लाजिरवाणा का नाही?
  • निबर म्हणवून न घेण्यासाठी किती काळ अशी लाज वाटायला हवी? आज एखाद्या जर्मन नागरिकाला नाझी अत्याचारांबद्दल तितकीच (अमेरिकन नागरिकाइतकीच) लाज वाटायला हवी का? किंवा रशियन नागरिकाला स्टॅलिनच्या अत्याचारांबद्दल?
  • एक सामान्य नागरिक म्हणून माझा जर सरकारच्या धोरणांना विरोध असला, तर अपराधगंड वाटून घेण्याची माझी जबाबदारी किती?

अबापट Thu, 14/07/2016 - 15:48

In reply to by चिंतातुर जंतू

वा , वा १०० % सहमत ( लिखाण गबाळे किंवा आक्रस्ताळे न होऊ देता तर्कशुद्ध मांडणी करत मतभेद मांडण्याचा तुमची एखादी शिकवणी वगैरे असल्यास , गुरुवर्य , हा एक शिष्य ती घेण्यास कवाबी तयार आहे )

ऋषिकेश Thu, 14/07/2016 - 17:16

In reply to by चिंतातुर जंतू

मुद्दा जराही समजून न घेता कै च्या कै तिसरीचकडे घोडं दामटल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा! चालु दे. मला टंकाळा आलाय

ऋषिकेश Thu, 14/07/2016 - 17:42

In reply to by चिंतातुर जंतू

हाहाहा मुद्दा आहेच कुठे?
आपला जन्म ज्या देशात होतो त्या देशाचं नागरिकत्व मिळणे हि "निवड" आहे असा विचार करून त्यावर काहीतरी चार ओळी लिहिल्या म्हणजे मुद्दे होतात? =))

माझ्यासाठी मी भारतीय म्हणून घडणे हे नैसर्गिक आहे. मी इथे जन्म घेतल्याने माझे भारतीय असणे ही माझी निवड नाही. मी इथे वाढल्याने आपोआप भारतीय घडलो आहे. असो नाही समजायचं ते तुम्हाला, कारण भारतीय असणं हे तुमच्यासातजी स्वाभाविक (डिफॉल्ट) नसून ती तुम्ही केलेली निवड आहे.

चिंतातुर जंतू Thu, 14/07/2016 - 17:47

In reply to by ऋषिकेश

>> आपला जन्म ज्या देशात होतो त्या देशाचं नागरिकत्व मिळणे हि "निवड" आहे असा विचार करून त्यावर काहीतरी चार ओळी लिहिल्या म्हणजे मुद्दे होतात?

नागरिकत्व मिळणं ही निवड नसून अधिक संपन्न, स्वच्छ आणि प्रगत वगैरे देशात जाण्याचा पर्याय सहजगत्या उपलब्ध असूनही तो न घेणं ही निवड आहे. असो.

>> भारतीय असणं हे तुमच्यासातजी स्वाभाविक (डिफॉल्ट) नसून ती तुम्ही केलेली निवड आहे.

निव्वळ विशिष्ट कुटुंबात, जातीत, प्रांतात किंवा देशात जन्मलो म्हणून त्या लोकांसारखं / तिथल्या संस्कृतीनुसार वागण्यापेक्षा माझ्या बुद्धीला पटेल तसं वागण्याचा मी प्रयत्न करतो. एक प्रौढ व्यक्ती म्हणून ती माझी निवड असते आणि त्याची जबाबदारी मी घेतो.

ऋषिकेश Thu, 14/07/2016 - 17:56

In reply to by चिंतातुर जंतू

रेसिडन्ट नॉन इंडियन्स असतात असे अनेक जण म्हणायचे आता मला ते पटूही लागले आहे.

बाकी मुद्दा सोडून सारखं स्वतःचं कौतुक कसं करून घ्यावं याचा काही क्लास घेता का तुम्ही?

ऋषिकेश Thu, 14/07/2016 - 18:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यांनीच म्हटलंय कि मुद्द्याचा प्रतिवाद करा. त्यांना मुद्दा मांडू द्या की तुम्ही का मध्ये येताय?

अनुप ढेरे Thu, 14/07/2016 - 19:59

In reply to by अतिशहाणा

हाहाहा. हेच विचारायचं होतं अनेक दिवस. या ड्यांबिस मालकांनी ऋला लय त्रास दिलेला दिसतोय. ती मेघ्ना पण गायब!

Nile Fri, 15/07/2016 - 01:19

In reply to by मिहिर

गेल्या काही दिवसांतील ऋषिकेशची धक्कादायक मतं पाहून सखेदाश्चर्य वाटलं हे या निमित्ताने नोंदवतो.

सैराट Fri, 15/07/2016 - 01:45

In reply to by Nile

मला ऋषिकेश यांची इतर मते माहिती नाहीत पण इथे या थ्रेडवर त्यांचं चुक्याच. चिं.ज रॉक्स !

.शुचि. Fri, 15/07/2016 - 01:34

In reply to by अनुप ढेरे

हाहाहा. हेच विचारायचं होतं अनेक दिवस. या ड्यांबिस मालकांनी ऋला लय त्रास दिलेला दिसतोय. ती मेघ्ना पण गायब!

अगदी हेच्च.

मिलिन्द Fri, 15/07/2016 - 07:56

In reply to by ऋषिकेश

रेसिडन्ट नॉन इंडियन्स = परिस्थिती निष्पक्षपातीपणे बघू शकणारे ! असे जितके जास्ती निघतील तितके चांगलेच आहे ! सध्या केवळ शाळकरी "देशभक्ती" बोकाळली आहे.

बॅटमॅन Fri, 15/07/2016 - 10:14

In reply to by मिलिन्द

रेसिडन्ट नॉन इंडियन्स = परिस्थिती निष्पक्षपातीपणे बघू शकणारे !

पु ल देशपांड्यांनंतर इतके विनोदी वाक्य वाचण्यात आले नव्हते. अनेक आभार.

Nile Thu, 14/07/2016 - 16:55

In reply to by ऋषिकेश

पण बाहेरच्या देशांवर ते ही विनाकारण (उगाच खुमखुमी) हल्ला करणारे किती देश तुम्हाला माहितीयेत?

दाव्याच्या समर्थनार्थ काही माहिती मिळेल का?

इराक युद्ध कसा गुन्हा होता हे ब्रिटिश लोक मान्य तरी करताहेत.

लोक म्हणजे? चिकोलेट(?)चा रिपोर्ट का? तसले अनेक रिपोर्ट अन अनेक कमिट्या अमेरिकेतही झाल्यात. अन अमेरिकन लोकही मान्य करतात असे कोणी म्हणून शकतो (तितक्याच उथळपणे).

अमेरिकेला तर त्याची खंतही नाही! अश्या जागतिक गुन्हेगार देशात रहाताना - तो ही स्वतः निवडून- काहिच नैतिक पेच पडू नयेत म्हणजे निबरपणाची कमाल आहे! मला तरी अमेरिकेत रहाताना मी या देशात रहातो हे सांगायला बर्‍यापैकी लाज वाटे.

लोल! हास्यास्पद आणि बालिश. असो.

अतिशहाणा Thu, 14/07/2016 - 18:32

In reply to by ऋषिकेश

आमचे आवडते प्रवासवर्णन असलेल्या 'अमेरिकायण'मध्ये तसे काही अ‍ाढळले नाही ब्वॉ! किमान 'मला तरी अमेरिकेत रहाताना मी या देशात रहातो हे सांगायला बर्‍यापैकी लाज वाटे.' हे तरी नक्कीच नाही. (नंतर उपरती झाली असल्याची शक्यता संपूर्णपणे मान्य!)
http://www.manogat.com/node/15592

"काय दिले मला अमेरिकेने? काय मिळाले तुला अमेरिकायणात? " मी स्वतःला विचारले
"आनंद आणि आत्मविश्वास! " लगेच दुसऱ्या कोपऱ्यातून उत्तर आले देखील..

खरंच अमेरिकेने हातचं काहीही न राखता मला दिला तो निव्वळ, निखळ, निर्व्याज, निर्विष आनंद! इथे भेटलेले प्रत्येक जण अजूनही मला आठवतात. अमेरिकेत मी मनसोक्त फिरलो अक्षरशः बागडलो. आणि हा आनंद देतानाच मला या अमेरिकेने एक नवा आत्मविश्वास दिला. स्वतः काहीतरी करू शकतो यावर माझा इथे पूर्ण विश्वास बसला.

बाकी चिंजंशी सहमत. १९८४ मध्ये दिल्लीत, गोध्रा प्रकरणाच्या वेळी गुजरातेत आणि अशा असंख्य वेळी (जेव्हा जेव्हा सरकारपुरस्कृत अत्याचार होत आहेत तेव्हा) त्यात्या ठिकाणी टोचण्या लावून घेऊन राहणे अशक्य झाले असते.

जॉर्ज १

अबापट Thu, 14/07/2016 - 13:22

In reply to by ऋषिकेश

विचार अत्यंत उदात्त ( वगैरे ) आहेत . पण हा criterion लावला तर कुठेही राहणे शक्य आहे का ? जगातील उर्वरीत देश केवळ तेवढी power ( यात सगळी आली , आर्थिक , मिलिटरी वगैरे वगैरे ) आज नसल्यामुळे " उर्वरित जगभर उच्छाद " मांडत नसावेत असे वाटत नाही का ? ( चान्स न मिळाल्यामुळे जसे बरेच जण नीतिमान राहतात त्या धर्तीवर ) मूळ मुद्दा असा आहे की एकंदरीत मनुष्यजात ही डुक्कर आहे , त्यामुळे हे होणारच . ते डॉलर कमावणे वगैरे मी नाही बोलत पण अमेरिका सर्वसामान्यांना मोकळेपणानी राह्यला बरी जागा असावी असे वाटते . ( जेव्हा गेलो तेव्हा ते अमेरिका किती भारी , भव्य वगैरे वगैरे अजिबात वाटले नाही , पण routine राह्यला बरी जागा आहे असा समज झाला )

ऋषिकेश Thu, 14/07/2016 - 13:55

In reply to by अबापट

अगदीच शक्य आहे. अमेरिका (व ब्रिटनसारखे त्यांचे मांडलिक देश), चायना व रशियाइतके जगात उच्छाद मांडणार्‍या देशात (काही वाळवंटी देशातील व्यक्ती सोडल्यास) अन्य कोणता देश तुम्ही टाकाल? वाळवंटी देशही हे ऑफिशोयली करत नाही. अमेरिकादी देश मात्र ऑफिशियली सरकारतर्फे जगभरात कल्ला करते.

अबापट Thu, 14/07/2016 - 15:35

In reply to by ऋषिकेश

आज "अमेरिका (व ब्रिटनसारखे त्यांचे मांडलिक देश), चायना व रशिया " , जगभर उच्छाद मांडताहेत .... ४०० -५०० वर्षे ते ५० -७० वर्ष पर्यंत मागे गेलात , तेव्हापर्यंत बहुतेक सर्व युरोपिअन देश ( हो अगदी बेल्जियम सारखा छोटा देश सुध्दा ) जगभर हीच काशी करत होते , १०० वर्षांपूर्वी पर्यंत ओट्टोमान साम्राज्यांनी इस्टर्न युरोप ते आशिया मध्ये हीच काशी केली त्यामागे गेलात १००० -२००० वर्षे गेलात तर .... यादी लै मोठी आहे . ही अमेरिकेची बाजू घेणं अजिबात नाहीये सध्या अमेरिका (व ब्रिटनसारखे त्यांचे मांडलिक देश), चायना व रशिया यांनी मांडलेल्या उच्छादावर माझेही तीव्र चं मत आहे पण माणूस हा हलकटपणा कायमच करत आलेला आहे . आजचे हलकट बहुधा अमेरिका (व ब्रिटनसारखे त्यांचे मांडलिक देश), चायना व रशिया हे आहेत . तरीही अमेरिकेत राहण्याची लाज वाटावी इतका तो देश गया गुजरा वाटला नाही. उच्च जातीच्या मंडळींनी नीच जातीच्या मंडळींवर हजारेक वर्षे तरी अत्याचार केले , म्हणून पुण्यात राहायची लाज बाळगू का ? शिवाय ऑफिशिअली करणे किंवा अनोफिशिअली करणे यात डावे उजवे काही आहे का ? ( सौदी ने वहाबी इस्लाम चा आक्रमकपणे केलेला प्रसार हा ऑफिशिअल का अनोफिशिअल )

ऋषिकेश Thu, 14/07/2016 - 17:20

In reply to by अबापट

कोणीतरी इतिहासात काहितरी केलं म्हणून आज लाज बाळगायला सांगत नाहिये. तर आज आत्ता चालु असलेल्या गैरकृत्यांबद्दल किती जण लाज बाळगून आहेत असा तो प्रश्न आहे.
अमेरिका आज आत्ता जगभरात उच्छाद मांडून आहे, तरीही अशा आपला जन्म न झालेल्या देशात चिकटून रहाताना आज आत्ता किती जणांना नैतिक डायलेमा वाटतो?

बाकी भारत नै का करत आपल्या टिचभर शेजारी देशांत वगैरे कुतर्काला तर्क म्हणायलासुद्धा लाज वाटते. त्यामुळे त्यावर मी तोंड बंद!

बाळ सप्रे Thu, 14/07/2016 - 17:48

In reply to by ऋषिकेश

हेच लॉजिक आणखी ताणून जगभर उच्छाद मांडणार्‍या देशात असलेल्या सर्वरवरील संकेतस्थळावरदेखिल (तेपण संपादक त्या उच्छाद करणार्‍या देशाचे नागरीक (??).. बाबौ) चिकटून रहाताना नैतिक डायलेमा वगैरे वाटला पाहीजे का??
:-)
:-)

.शुचि. Fri, 15/07/2016 - 01:51

In reply to by ऋषिकेश

अमेरिका आज आत्ता जगभरात उच्छाद मांडून आहे, तरीही अशा आपला जन्म न झालेल्या देशात चिकटून रहाताना आज आत्ता किती जणांना नैतिक डायलेमा वाटतो?

मस्त वाटतं मला तरी उच्छाद मांडून न्युसन्स व्हॅल्यु मेंटेन केलीये हे मस्त वाटतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 15/07/2016 - 02:11

In reply to by .शुचि.

इराकवर युद्ध लादून तिथे काय केलं हे एकवेळ डोळ्यांआड केलं तरीही तिथून परत आलेल्या अमेरिकी सैनिकांवर त्याचे काय आणि किती दुष्परिणाम होत आहेत; अर्थव्यवस्थेवर किती ताण आणलेला आहे ह्याचा विचार केला तरीही ह्याला 'न्यूसन्स' म्हणण्याएवढं हे क्षुद्र प्रकरण नाही. बाकी आंतरराष्ट्रीय राजकारण, आखाती भागातली युद्धखोरी, शस्त्रास्त्रं विकण्याचा धंदा हे फारच गुंतागुंतीचे विषय, माझ्या आवाक्याबाहेरचेच. तो कोळसा न उगाळलेलाच बरा.

(सानिया मिर्झाने राजदीपला खिजवण्यात कौतुक करण्यासारखं उपद्रवमूल्य आहे, ते निराळं आणि अमेरिकेचा उच्छाद फारच निराळा.)

अनु राव Thu, 14/07/2016 - 16:51

In reply to by ऋषिकेश

ह्या अश्या देशाचा स्वेच्छेने नागरीक झालो आहे

ज्या देशाचे स्वेच्छेनी नागरीक झाले आहेत, त्याच देशाबद्दल दुसर्‍या देशातल्या लोकांशी बोलताना ( इथे भारतीय ) हे स्वेच्छा अमेरीकन लोक अमेरीकेला नावे/शिव्या कसे घालु शकतात?

ह्या स्वेच्छा-अमेरीकी लोकांनी दुसर्‍या अमेरीकी नागरीकांशी बोलताना अमेरीकेच्या वागण्याबद्दल शिव्या घातल्यातर मी समजु शकते पण दुसर्‍या देशांच्या लोकांसमोर स्वताच्या देशाला डीफेंड करणे तर सोडा वर शिव्या घालायच्या. हा प्रकार मला न समजणारा आणि न पटणारा आहे.

माझ्या तोंडातुन कधी माझ्या देशाबद्दल हाम्रीकी किंवा भारतीय लोकांशी बोलताना वाईट साईट येते का?

पिवळा डांबिस Fri, 15/07/2016 - 10:09

In reply to by अनु राव

ह्या स्वेच्छा-अमेरीकी लोकांनी दुसर्‍या अमेरीकी नागरीकांशी बोलताना अमेरीकेच्या वागण्याबद्दल शिव्या घातल्यातर मी समजु शकते पण दुसर्‍या देशांच्या लोकांसमोर स्वताच्या देशाला डीफेंड करणे तर सोडा वर शिव्या घालायच्या. हा प्रकार मला न समजणारा आणि न पटणारा आहे.

बरखा दत्त फक्त भारतातच असतात असं का बरं वाटलं तुम्हाला?
हे आमचे बरखा दत्त!!!!!

मिलिन्द Fri, 15/07/2016 - 02:29

In reply to by ऋषिकेश

तुमच्या थोर नैतिकतेला सलाम. पण दंडकारण्य, उत्तर-पूर्व (नागालँड वगैरे) आणि काश्मीर येथे (बरोब्बर अमेरिकेने केल्या तशाच) कत्तली, आदिवासींची जमीन दडपणे , खोट्या चकमकी ,मास ग्रेव्हस, मानवी-हक्क उल्लंघन वगैरेबद्दल जगभर प्रसिद्ध झालेल्या "भारत" नावाच्या सत्तेत तुम्ही कसे राहू शकता असा मलाही प्रश्न आहेच. नैतिक मनुष्य एकाच प्रकारे आजच्या भारतात (अमेरिकनांप्रमाणेच!) राहू शकतो: ते म्हणजे या भागांतील सरकारी/लष्करी दडपशाहीविरुद्ध सतत आवाज उठवीत! ते आपण करीत असाल अशी आशा आहे. अखेर हे बरेचसे अत्याचार शहरी मध्यमवर्गाचे हितसंबंध पुढे रेटण्यासाठी (उदा. औद्योगिकीकरण), त्यांच्या नावाखाली, आणि त्यांच्या मूक संमतीनेच केले जातात !

अमेरिकन जनता आणि अमेरिकन "निओकॉन" राज्यकर्ते (ज्यात सुप्तपणे हिलरीही मोडते!) यांच्यात फरक

लोकशाहीत असा फरक करायची गरज भासू नये.

मिलिन्द Wed, 13/07/2016 - 21:19

In reply to by सुनील

या रेटने काँग्रेस किंवा भाजप सरकार जे काही करत आहे/होते त्याला तुमची पूर्ण संमती आहे असे मानतो . ज्या सुमारे एक अब्ज भारतीयांनी भाजपला मते दिलेली नाहीत, त्यांचेही तसेच.

यात "चूक" असे आहे की जपानच्या कल्चरमध्येच एक सुप्त आक्रमण , साम्राज्यवाद आहे. त्यामुळे जपानला सैन्य ठेण्याची परवानगी न देऊन अमेरिकेने जगावर , आणि विशेतः पॅसिफिकच्या पूर्व किनाऱ्यावर मोठे उपकार केले आहेत.

या हिशेबाने अमेरिकेचे सगळे सैन्य कधीच बरखास्त केले पाहिजे होते. मोठे आले जगाला शहाणपणा शिकवणारे, भोगा आपल्या कर्माची फळे. काय हिपोक्रसी आहे तेच्यायला.

Nile Mon, 11/07/2016 - 20:08

In reply to by .शुचि.

तो आल्याने तुम्हाला झळ बसणार नाही असं वाटलं का काय? अनुराव वगैरे भारतात* बसून काहीही एकवेळ बरळले तर समजू शकतो, त्यांना डिरेक्ट झळ बसणार नाहीए. भिंत बांधायचा अन इमिग्रंट्सना परत पाठवायचा पैसा कसा उभा केला जाईल त्यावर तुमचे किती हाल होतील हे अवलंबून आहे.

*आधी सवयीने पुण्यात लिहणार होतो..

मिलिन्द Mon, 11/07/2016 - 21:43

यात "चूक" असे आहे की जपानच्या कल्चरमध्येच एक सुप्त आक्रमण , साम्राज्यवाद आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानने किती भयानक युद्ध-गुन्हे केले होते हे जगजाहीर आहे . त्यामुळे जपानला सैन्य ठेण्याची परवानगी न देऊन अमेरिकेने जगावर , आणि विशेतः पॅसिफिकच्या पूर्व किनाऱ्यावर मोठे उपकार केले आहेत. जर्मनीचेही तसेच.

हे म्हणजे पातेलीने किटलीला .......
किंवा व्हाइस व्हर्सा

मिलिन्द Mon, 11/07/2016 - 22:22

In reply to by नितिन थत्ते

हे म्हणजे पातेलीने किटलीला ... हे मान्य आहे ,पण दुसऱ्या महायुद्धानंतरचा अमेरिकी साम्राज्यवाद (हेगेमोनी) हा पूर्वीच्या साम्राज्यवादापासून अगदी वेगळा आहे . त्यात मांडलिक राष्ट्रांचे बरेच कल्याणच होते असे मानायला जागा आहे . त्यांची इंडस्ट्रीही वाढते, पूर्वीप्रमाणे मारली जात नाही . दक्षिण कोरिया, पश्चिम जर्मनी , जपान, सिंगापूर , तैवान ही याची उदाहरणे असू शकतात.

नितिन थत्ते Tue, 12/07/2016 - 06:58

In reply to by मिलिन्द

>>त्यात मांडलिक राष्ट्रांचे बरेच कल्याणच होते असे मानायला जागा आहे

उदा. पाकिस्तान? सौदी अरेबिया?
जर्मनी हे अमेरिकेचे मांडलिक राष्ट्र आहे/होते का?

मिलिन्द Wed, 13/07/2016 - 03:08

In reply to by नितिन थत्ते

उदा. पाकिस्तान? सौदी अरेबिया? : नाही, फायदा होण्यासाठी औद्योगिक/तांत्रिक टॅलेन्ट लागतो, जो यांच्याकडे अजिबात नाही.
जर्मनी हे अमेरिकेच्या संरक्षणाखाली असलेले राज्य आहे, जुन्या अर्थाने मांडलिक राष्ट्र नाही . दुसऱ्या महायुद्धात उध्वस्त झालेला जर्मनी परत उभा करायला अमिरिकेने प्रचंड मदत केली होती हे आठवत असेलच.

ऋषिकेश Tue, 12/07/2016 - 10:39

In reply to by मिलिन्द

काका तुम्ही अजून शीतयुद्धपुर्वकाळाच्या भिंगातून जग बघत आहात असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.

बॅटमॅन Tue, 12/07/2016 - 12:04

In reply to by ऋषिकेश

अगदी अगदी. आशिया आता पूर्वीसारखा गरीब राहिलेला नाही. भले अजून छाताडावर नाचण्याइतका ष्ट्राँग नसेल पण कुणीही या आणि ** मारून जा इतका दुबळा तर नक्कीच नाही.

अतिशहाणा Tue, 12/07/2016 - 18:06

In reply to by बॅटमॅन

+१

अमेरिकेत चायनाला इतक्या शिव्या घातल्या जातात की चायना किती मारत आहे याची कल्पना येते.

.शुचि. Tue, 12/07/2016 - 21:08

In reply to by अतिशहाणा

चायनीज फुड आवडतं. पण मी इंडिया मेड , नेपाळ मेड व अमेरीका मेड वस्तू जास्त प्रिफर करते. अमेरीका मेड फार फार कमी दिसतात. इंडीया मेड खूप दिसतात कारण सारख्या मेटॅफिजिकल्/अस्ट्रॉलॉजिकल/स्पिरिच्युअल दुकानांच्या वार्‍या होतात.
.
खालच्या फोटोत दाखवलेली राजस्थानी एथनिक ज्वेलरी (म्हणजे सोन्या चांदीची नाही अगदी तांब्याची, जस्ताची वगैरे) मस्तच.
.
https://scontent-ord1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/13627130_1725797467694265_1534704824059872529_n.jpg?oh=47159c348a4dea735876db880a27791b&oe=57F22832

'न'वी बाजू Thu, 14/07/2016 - 16:54

In reply to by .शुचि.

या 'झुरळखाऊ' थियरीच्या उगमाबद्दल कुतूहल आहे. आजतागायत एकाही चायनीज (किंवा इंडियनचायनीज) रेष्टारण्टाच्या मेनूकार्डावर झुरळाची एकही डिश पाहिलेली नाही. (हं, आता भटारखान्यातील एकंदर अस्वच्छतेत एखादे झुरळ एग्ड्रापसुपात हळूच सूर मारून जात असल्यास किंवा दुसरे एखादे झुरळ कुंग्पावचिकनावरून गुप्तपणे पदयात्रा करत असल्यास कल्पना नाही, परंतु मग हे तर भारतीय रेष्टारण्टातही होऊ शकते. बोले तो, एग्ड्रापसुपात किंवा कुंग्पावचिकनात नव्हे, पण सांबारात किंवा पालकपनीरात. मग (तुमच्यासारख्या) भारतीयांना किंवा (आमच्यासारख्या) भारतवंशीयांनासुद्धा 'झुरळखाऊ' का म्हणू नये?)

'न'वी बाजू Thu, 14/07/2016 - 17:07

In reply to by बॅटमॅन

गेला बाजार आमच्या आजोबांच्या (ईमृशांदे) उमेदीच्या काळापासून ही 'झुरळखाऊ' किंवदन्ता प्रचलित आहे.

आमच्या आजोबांच्या उमेदीच्या काळात डिस्कव्हरी च्यानेल नव्हता. (सोडा, तेव्हा टीव्हीच नव्हता. निदान भारतात/महाराष्ट्रात तरी.)

बॅटमॅन Thu, 14/07/2016 - 17:14

In reply to by 'न'वी बाजू

जगभरातील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी वर्तमानपत्रांमध्ये अनादिकाळापासून प्रकाशित होत आलेल्या आहेत. तशाच एखाद्या पेपरमध्ये किंवा कुठल्याशा पुस्तकात ते आले असावेसे वाटते.

'न'वी बाजू Thu, 14/07/2016 - 17:36

In reply to by बॅटमॅन

ही शक्यता अर्थातच नाकारता येत नाही.

किंवा, साम्राज्यवादी शक्तींनी अथवा त्यांच्या पाइकांनी अज्ञानातून, आकसातून वा अन्य कारणांकरिता, अजाणता किंवा जाणूनबुजून, अशी कंडी पिकविली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

ते काही का असेना, आपण (किंवा पुलंनी) तिच्या प्रसारास हातभार का लावावा, एवढेच म्हणतो मी.
..........

व्हैट्टम्यान्स 'बर्डन' थियरी.

'न'वी बाजू Thu, 14/07/2016 - 17:21

In reply to by 'न'वी बाजू

तेही सोडा. पुलंनी 'पूर्वरंगा'त झुरळखाऊ थियरीचा वारंवार ज़िक्र केलेला आहे. (उदा. 'झुरळाच्या लोणच्याचे अजीर्ण झालेल्या चिनी म्हाताऱ्यास पडलेले दु:स्वप्न म्हणजे (सिंगापुरातले) टायगरबामगार्डन' की असेच काहीतरी.) आता, त्या काळात पुलंनी टीव्हीक्षेत्रात थोडीफार उमेदवारी करून झालेली असली, तरीसुद्धा 'डिस्कव्हरी च्यानेल'शी त्यांचा संबंध आला नसावा, असे मानावयास जागा आहे. (चूभूद्याघ्या.)

मिलिन्द Wed, 13/07/2016 - 01:08

In reply to by अतिशहाणा

चीन : दिवसाला दोन ते तीन अमेरिकन डॉलर्स मध्ये (नाईलाजाने) काम करायला तयार असणारे कोट्यवधी गुणवंत, कष्टकरी कामगार विरुद्ध अमेरिका : तासाला सहा सात डॉलर्स किमान वेतन सरकारी नियमाप्रमाणे मिळणारे, बऱ्याच प्रमाणात दारुडे, दांड्या मारणारे कामगार अशी ही स्पर्धा आहे. चीनची अनेक वैशिष्ट्ये भारतीय कामगारांमध्येही आहेत , आणि नसलेली साध्यही करता येतात . ते करून ही स्पर्धा जिंकणे भारताला सहज शक्य आहे. मोदींचे अतीव अमेरिका-प्रेम आणि भेटी त्याच दिशेने चालू असाव्यात .

अतिशहाणा Thu, 14/07/2016 - 00:28

In reply to by बॅटमॅन

फिलिपाईन्सजवळच्या सागरी सीमांवरुन चाललेल्या वादाबाबत (अमेरिकापुरस्कृत) आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयाला चीनने नाकारले आहे. हा अगदी कालपरवाच दिलेला ठोसा!

नंदन Tue, 12/07/2016 - 13:01

ट्रम्पच्या दाव्यांवर, आकडेवारीवर, विधानांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जमेल तितकी शहानिशा केलेली बरी असते. निदान दोन टोकांच्या भूमिकांच्या स्पेक्ट्रममधले कंगोरे तरी थोडेफार ध्यानी येतात.

पहा: www.factcheck.org/2016/04/u-s-foreign-military-support/

आडकित्ता Tue, 12/07/2016 - 19:20

वगैरे इत्यादी! एक अर्धशिक्षित गोरे पुरुष कामगार सोडले तर बाकी कोणत्याही जातीच्या मतदारांत ट्रम्प यांच्याविषयी निदान 70% नकारात्मक मत आहे. आणि असे गोरे कामगार जेमतेम 33% आहेत.
कसे व्हायचे ?

आमच्याकडे अतीशिक्षित, अर्धशिक्षित, अशिक्षित अशा सगळ्या मिळून ३१% वर पाशवी बहुमत आलंय. तुम्हीच बघा कसे व्हायचे ते...

आडकित्ता Tue, 12/07/2016 - 23:11

In reply to by बॅटमॅन

तुमचे प.पू. मोदीजी ती व्यवस्था बदलून लोकशाही व्यवस्थेचा समूळ नायनाट करतील अशी आम्हा मूर्ख लोकांची भीती आहे.
आहे ती लोकशाही व्यवस्था बदलायचा तुमच्या आराध्य दैवताचा व विचारसरणीचा मूळ उद्देश तुम्ही(तुमच्या सहीनुसार) जाहीरपणे मांडल्याबद्दल आभार.

बॅटमॅन Wed, 13/07/2016 - 01:15

In reply to by आडकित्ता

तुम्ही बर्नॉल घ्या अगोदर. नैतर कुठले क्रीम चालेल ते सांगा म्हणजे केमिस्टाला ते ठेवायला बरे. मोदीला काही श्या घातल्या तरी मला शष्प फरक पडत नाही. तुमची जळजळ पाहून काळजी मात्र वाटते.

अनुप ढेरे Tue, 12/07/2016 - 20:10

In reply to by आडकित्ता

अत्यंत बोगस प्रचार अनेक दिवस विचारवंतांकडून चालू आहे. भाजपाला ३१% मतं असली तरी NDAला ३९% टक्के मतं आहेत. NDAतल्या चिल्लर लोकांना ( शिवसेनेला १८ जागा!, अपना दल वगैरे आदी) केवळ मोदींच्या नावामुळे सिटा मिळाल्या असही म्हणता येईल. सो ३१ टक्के हा अत्यंत बोगस प्रचार आहे. पाशवी बहुमत वाल्या राजीव गांधींना देखील ४९% होते. पन्नासच्या वर नाही.

नितिन थत्ते Wed, 13/07/2016 - 11:36

In reply to by अनुप ढेरे

बंगाल, तामिळनाडू, केरळ, ओरिसा, तेलंगाणा, पंजाब या राज्यांत १५३ जागा आहेत त्यातल्या भाजपने ६ निंकल्या आहेत.

हे पाहता असे दिसते की या राज्यांत भाजपला खूप कमी मते मिळाली आहेत. पण उत्तरेतील मोठ्या राज्यांमध्ये भाजपने ४०% हून अधिक मते मिळवली आहेत आणि ती राज्ये जवळजवळ स्वीप केली आहेत.

हा भारताच्या फर्स्ट पास्ट द पोस्ट पद्धतीचा परिणाम आहे आणि तो आधीच्या निवडणुकांमध्येही दिसून येत होता. काँग्रेसने देखील ५०% हून अधिक मते मिळवली नाहीत पण 'मोठी बहुमते' मिळवली आहेत. फर्स्ट पास्ट द पोस्ट ही पद्धत बदलण्याची लगेच निकड वाटत नाही.

ब्रह्मास्त्र Wed, 13/07/2016 - 23:34

अरे जिंकून जिकूंन जिंकणार कोण, ट्रंप शिवाय हायच कोण??
अरे ह्यो आवाऽऽऽऽऽऽज कुणाचा?????????
ताई,माई,आक्का विचार करा पक्का,ट्रंपवर मारा शिक्का!!!

मिलिन्द Fri, 29/07/2016 - 09:31

In reply to by गब्बर सिंग

Moore is not very wrong: America has a vast white "loser" class who are clueless about what has been happening in American since (and by) Ronald Reagan. They also have a terrible sense of "entitlement": That SINCE they are Americans, they must get the best of everything. Well, the world thinks otherwise and has moved on. You CANNOT compete with a three dollars a day wage China pays to its skilled workers, as opposed to 7 dollars AN HOUR in the US (the state minimum). Trump claims that he will rectify this- How? His answer seems to be "by the sheer force of my personality!". Go figure!