पॉर्नोग्राफी - एक भयानक व्यसन

लेख

पॉर्नोग्राफी - एक भयानक व्यसन

- गोपाळ आजगांवकर

प्रास्ताविक: पॉर्नोग्राफी हे अगदी अलीकडचे, म्हणजे गेल्या १०-१५ वर्षांमधले, व्यसन आहे; पण आज लक्षावधी लोक या व्यसनाला बळी पडलेले आहेत आणि लक्षावधी नाही, तर कोट्यवधी लोक बळी पडण्यासाठी विंगेत उभे आहेत. पण हे व्यसन इतके नवे आहे, की आपल्याकडील साध्यासरळ लोकांना पॉर्नोग्राफी म्हणजे काय हेच माहीत नाही. पॉर्नोग्राफी हे व्यसन लागण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण इंटरनेट आहे. त्याचा शोध १९९३ साली लागला. इंटरनेटला जोडलेला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप (आणि आता स्मार्टफोन) असला, की कोणीही व्यक्ती - मग ती लहान असो की मोठी, शिक्षित असो की अशिक्षित, गरीब असो की श्रीमंत - या व्यसनाला बळी पडू शकते. या पॉर्नोग्राफीच्या व्यसनाची भयावहता स्पष्ट करणारा हा लेख.

'पॉर्नोग्राफी इज अ‍ॅन इन्सल्ट टू सेक्स.' - ऑस्कर वाइल्ड

पॉर्नोग्राफीला मराठी शब्द वेश्याव्यवहारवर्णन / बीभत्स लिखाण-ग्रंथ / संभोगवर्णन / संभोगदर्शन असे आहेत. मात्र या लेखात मी पॉर्नोग्राफी हाच शब्द वापरणार आहे. पॉर्नोग्राफीची व्याख्या साधारणपणे 'लैंगिक भावना उत्तेजित करण्याच्या एकमेव उद्देशाने केलेले लैंगिक व्यवहाराचे तपशीलवार / भडक / विकृत चित्रण' असे करता येईल.

पॉर्नोग्राफीचे ढोबळमानाने दोन प्रमुख प्रकार म्हणजे छापील पॉर्नोग्राफी आणि सिनेमा / व्हिडिओ / इंटरनेट पॉर्नोग्राफी. छापील पॉर्नोग्राफी भारतात विसाव्या शतकात प्रचलित झाली. सिनेमा / व्हिडिओ पॉर्नोग्राफी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आली. इंटरनेट पॉर्नोग्राफी मात्र गेल्या पंधरा-वीस वर्षांमधील आहे. या लेखाचा मुख्य भर इंटरनेट पॉर्नोग्राफीच्या व्यसनाधीनतेवर आहे.

त्याअगोदर थोडी पार्श्वभूमी पाहू या. एकोणिसाव्या शतकापर्यंत स्त्रीला सर्वच व्यवहारांमध्ये दुय्यम स्थान होतं. सर्वच धर्मांनी स्त्रीला करकचून जखडून टाकलं होतं. लैंगिक बाबतीतही स्त्रीने थंड राहावं अशी अपेक्षा होती. समसंभोग हे पाप होतं. लैंगिक शब्द उच्चारणं भयंकर असभ्यपणाचं होतं.

विसाव्या शतकाच्या आरंभी सिग्मंड फ्रॉइड आणि हॅलॉक एलिस या थोर लैंगिक तज्ज्ञांनी संशोधन करून, पुरावे देऊन ग्रंथ लिहिले आणि लैंगिक वातावरण मुक्त केलं. हॅलॉक एलिसने 'Studies in the Psychology of Sex'चे सहा खंड प्रसिद्ध केले. फ्रॉइडने लैंगिकतेचा मनावर पडणारा प्रभाव स्पष्ट करणारं लिखाण केलं. १९२०मध्ये रसेलने 'मॅरेज अ‍ॅण्ड मॉरल्स' हा ग्रंथ लिहून नैतिकतेची चिकित्सा केली. अशा प्रकारे लैंगिक दडपणाविरुद्ध या विचारवंतांनी जोरदार टक्कर देऊन लैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला.

लैंगिक दडपणाविरुद्धची एक प्रतिक्रिया पॉर्नोग्राफी ही होती. (आपल्याकडील तांत्रिकांचे वामाचार या संदर्भात पाहता येतील.) गुटेनबर्गने छापखान्याचा शोध लावल्यापासून छापील पॉर्नोग्राफी चालू झाली असावी. एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये पॉर्नोग्राफिक मासिकं छापली जात. त्यात चुटके, कविता (लिमरिक्स), कथा आणि क्रमश: कादंबर्‍या (सर्व पॉर्नोग्राफीक) असत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर कॅमेरा आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सिनेमा उदयास आला. कॅमेऱ्याचा उपयोग नग्न दृश्यं दाखवण्यासाठी करून घेण्यात आला. विसाव्या शतकाच्या मध्यावर टीव्हीचं आगमन झालं. व्हिडिओज सर्वत्र उपलब्ध झाले. अ‍ॅडल्ट व्हिडिओज नावाचं नवं रोपटं जोमदारपणे फोफावायला लागलं. पण गेल्या पंधरा वर्षांमध्ये यात अत्यंत क्रांतिकारी बदल झाला, तो म्हणजे इंटरनेटचा. इंटरनेट पॉर्नोग्राफीपुढे पूर्वीची सर्व पॉर्नोग्राफी अगदी बाळबोध वाटावी अशी आहे.

पॉर्नोग्राफी हा युरोप-अमेरिकेचा प्रश्न आहे, भारताचा नाही असं एखाद्याला वाटू शकेल. तर आता ही आकडेवारी वाचा - गूगल ट्रेंड्स दाखवतो, की २०१० ते २०१२ या दोन वर्षांच्या काळात भारतामध्ये पॉर्न या शब्दावर जाणं दुप्पट झालं आहे आणि पॉर्न शोधणार्‍या जगातील पहिल्या दहा शहरांमधील सात शहरं भारतीय आहेत. आयएमआरबी सर्वे २०११नुसार मोबाईल वापरणार्‍या दर पाच भारतीयांपैकी एकाला आपल्या फोनवर अ‍ॅडल्ट कंटेंट (म्हणजेच पॉर्न) हवं असतं. दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलने केलेल्या सर्वेक्षणानुसार दर दिवशी ४७ टक्के विद्यार्थी पॉर्नबद्दल बोलतात. नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरोच्या अहवालानुसार सायबर गुन्ह्यांमध्ये पॉर्नचा क्रमांक पहिला आहे.

पहिली गोष्ट लक्ष्यात घेतली पाहिजे, की पॉर्न आंतरराष्ट्रीय आहे. जगातील कुठलीही पॉर्न साइट भारतातील कुठल्याही शहरात/ तालुक्यात/ खेड्यात बघता येते. पॉर्न म्हणजे स्त्रीपुरुष संबंधांचं विकृतीकरण. फक्त ५ टक्के पॉर्न हे सरळ स्त्रीपुरुष संबंधाचं असतं. बाकीचं पॉर्न बलात्कार, मुखमैथुन, गुदमैथुन, स्त्री-समसंभोग, पुरुष-समसंभोग, गट-संभोग असं असतं. पण हेसुद्धा आता जुनं झालंय. वर्ल्ड वाइड वेबवर आता यापुढचं पॉर्न अधिकाधिक येऊ लागलं आहे. विकृतीचे नाना प्रकार पॉर्नमध्ये दाखवले जाऊ लागले आहेत.

MILF पॉर्न म्हणजे 'मदर्स आय लाइक टू फक'. MILF पॉर्न वेबसाइट्स आहेत ४,०६,००,०००. त्यातील एकाची टॅग-लाइन आहे - 'पाहा अत्यंत लबाड, गरमागरम, प्रौढ आया वासनांध झाल्या आहेत आणि तरुण आंडीलांकडून संभोगल्या जाताहेत.' ('Check out the most notorious, hot, mature moms going crazy and getting fucked from young studs'). एक Ravished Bride पॉर्न साइट सांगते - 'A hot and sexy bride is getting raped brutally'. गरोदर बायकांचं पॉर्न हा आणखी एक पॉर्नप्रकार -'Are you ready to see these moms-to-be in action?'. इंसेस्ट म्हणून एक (भाऊ-बहीण, बाप-मुलगी, आई-मुलगा) पॉर्नप्रकार आहे. चाइल्ड-पॉर्न बेकायदा आहे म्हणून ते टीन-पॉर्न म्हणून दाखवलं जातं. आणखी एक प्रकार ऍम्प्युटी-पॉर्न आहे. त्याच्यामध्ये नाना प्रकार आहेत. एबनी, ब्लॅक, एशियन, ब्लाँड, ब्रुनेट् असे अनेक प्रकार आहेत. मुतणं, आंघोळ करणं असे प्रकार आहेत. कुत्रे, घोडे, डुकरे यांच्याशी स्त्री-पुरुषांचा संभोग दाखविणारं पॉर्न आहे. एक 'ग्रॅनी' पॉर्न आहे ज्यात म्हातार्‍या स्त्रियांचं पॉर्न दाखविलेलं असतं. डीपी (डबल पेनीट्रेशन), टीपी (ट्रिपल पेनीट्रेशन) असे प्रकार आहेत. यात योनीमध्ये एकाच वेळी दोन लिंगं, गुदद्वारात दोन लिंगं किंवा योनी आणि गुदद्वारात एकाच वेळी एक-एक लिंग असे प्रकार आहेत. हे प्रकार नुसते वाचूनही सर्वसाधारण माणसाला किळस येईल. पण आज जगात कुठल्याही वेळी किमान पन्नास लाख माणसं ही घाण चवीने बघत असतात.

भारतात पॉर्नोग्राफी किती झपाट्याने पसरत आहे याची झलक दाखवणार्‍या या काही बातम्या पाहा; म्हणजे आकडेवारीत कोणतं बीभत्स सत्य दडलेलं आहे, हे लक्ष्यात येईल.

पहिली बातमी : दिनांक - २१-१२-२००५.
दिल्लीच्या पब्लिक स्कूलमधील १७ वर्षांचा मुलगा आणि १६ वर्षांची मुलगी हे एकमेकांच्या प्रेमात आहेत. मुलाने मुलीचे मुखमैथुन करतानाचे वगैरे फोटो काढले. ते मोबाइलवर टाकले. वेगाने ते सगळीकडे पोहोचले. ते बाझी.कॉमला मिळाले. बाझी.कॉमवर जाहिरात - 'आयटेम नंबर, ओरल सेक्स. डीपीएस गर्ल हॅव फन. ज्या व्हिडिओ क्लिपने सर्व दिल्लीत खळबळ माजवली आणि जिच्याबद्दल सर्व देशामध्ये बोललं जात आहे ती व्हिडिओ क्लिप तुम्हांला बघायची आहे का? मग वाट कसली बघता? प्रॉडक्टची ऑर्डर द्या आणि काही तासांतच हा व्हिडिओ तुमच्याकडे ई-मेल करण्यात येईल. हा व्हिडिओ डीपीएस आरकेपुरमच्या मुलीचा आहे आणि तो तिच्या बॉयफ्रेंडने एक्स्ट्रीम सेक्शुअल कंडिशनमध्ये घेतला आहे. किंमत फक्त दीडशे रुपये.'

दुसरी बातमी : दिनांक - ७-११-२०११.
केरळमध्ये २० चाइल्ड-पॉर्न व्यसनींना पकडलं. इंटरपोलने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन महिने या व्यसनींवर नजर ठेवली होती. चाइल्ड-पॉर्न पाहणं हा अजामीनपात्र सायबरगुन्हा आहे. पोलिसांनी सांगितलं, की चाइल्ड-पॉर्न सर्फिंग केरळमध्ये वेगानं वाढत आहे.

तिसरी बातमी : दिनांक - ८-२-२०१२.
कर्नाटक विधानसभेत भाजपच्या तीन मंत्र्यांना मोबाइल फोनवर अश्लील नाच आणि लैंगिक दृश्यं पाहत असताना टेलिव्हिजन कॅमेर्‍याने पकडलं. या मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला.

चौथी बातमी : दिनांक- १४-६-२०१२.
रोहटक येथील 'अपना घर' या अनाथालयातील ५ ते १० वर्षांच्या अनेक मुलामुलींना मुखमैथुन करायला आणि नग्न वावरायला लावण्यात येत होतं. 'अपना घर'मध्ये १०१ मुलं होती. 'अपना घर'च्या संचालिका जसवंती देवी यांचा जावई जय भगवान आणि ड्रायव्हर सतीश या दोघांच्याबरोबर मुलांना हे करायला लावण्यात येई.

पाचवी बातमी : दिनांक - ७-५-२०१२.
मुंबईतील लेफ्टनंट कर्नल जगमोहन बलबीर सिंगला चाइल्ड-पॉर्नोग्राफीच्या २५० क्लिप्स इंटरनेटवर अपलोड करण्याबद्दल अटक करण्यात आली. या क्लिप्स ३ ते १० वर्षांच्या कॉकेशियन मुलींच्या आहेत. यू-टोरेंटमध्ये या गोष्टी डाउनलोड करताना त्या आपोआप अपलोड होतात, हे जगमोहनला माहीत नव्हतं. त्याने आपल्या जबानीमध्ये म्हटलं आहे, की तो आसाममध्ये २००७ साली होता, तेव्हा त्याला पॉर्न पाहायची सवय लागली आणि नंतर तो चाइल्ड-पॉर्नकडे वळला.

आपण डोळे उघडून पेपर वाचायला सुरुवात केली, की अशा बातम्या अधूनमधून आपल्याला दिसू लागतात, जाणवू लागतात. अर्थात हे लक्ष्यात घेतलं पाहिजे, की पॉर्नोग्राफी हे या भयनगाचं वर दिसत असलेलं एक किंचितसं टोक आहे. ज्यांनी कायद्यानं सिद्ध होईल असा कोणताही गुन्हा केलेला नाही किंवा ज्यांच्या कृत्याला कोणतीही प्रसिद्धी मिळालेली नाही, अशी अक्षरश: हजारो माणसं या पॉर्नोग्राफी व्यसनाधीनतेच्या रोगानं तडफडत आहेत.

पॉर्नोग्राफी व्यसनाधीनतेबद्दल सर्वात प्रथम आपण एक गोष्ट लक्ष्यात घेतली पाहिजे, की एखादी व्यक्ती जितक्या लवकर पॉर्नोग्राफी बघायला सुरुवात करेल, तेवढीच ती व्यक्ती नंतर पॉर्नोग्राफीच्या व्यसनाधीन होण्याची शक्यता जास्त असते. हे दारू, तंबाखू, अंमली पदार्थ यांच्या बाबतीतही तेवढंच खरं आहे. आता दुसरी गोष्ट लक्ष्यात घ्या. इंटरनेट सर्फिंग करणार्‍यांपैकी १० टक्के लोक पॉर्नोग्राफी बघतातच बघतात. आणि आजच्या पुढारलेल्या आधुनिक विश्वामधील ८-१० वर्षांची मुलं सतत इंटरनेट सर्फिंग करत असतात. त्यामुळे त्यांना पॉर्नोग्राफीच्या साइट्स मिळतातच. आणि त्यात जर त्यांना एकान्त मिळाला, मित्रमंडळींची साथ मिळाली; तर मग काय 'सोने पे सुहागा'. सेक्स म्हणजे नक्की काय याची जाणीव नसलेली ही मुलं मग पॉर्नोग्राफीकडे वळण्याची (आणि कालांतराने पॉर्नोग्राफीच्या अधीन होण्याची) शक्यता असते. पॉर्नोग्राफी अ‍ॅडिक्शन रिकव्हरी साइटवरील पत्रं वाचली, की काळीज हलतं. आजची ही पिढी कुठल्या थराला पोहोचत आहे हे वाचून डोळे खाडकन उघडतात. एक मुलगी आपल्या पत्रात म्हणते, ''गेली ८ वर्षं मी अ‍ॅडिक्शनविरुद्ध झगडत आहे, तरीही मला त्यातून सुटका मिळत नाही. आणि माझं वय फक्त १५ आहे.''. एक मुलगा म्हणतो, ''माझं वय चोवीस आहे आणि गेली बारा वर्षं मी या व्यसनामध्ये पूर्णपणे बुडून गेलोय. अनेक वेळा मी त्यामधून झगडत झगडत बाहेर पडलो; पण पुन्हा या जाळ्यामध्ये गुरफटून गेलो. स्वत:ला या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आता काय करावं, हेच कळेनासं झालंय.'' तर अशा प्रकारची शेकडो पत्रं या साइटवर आहेत.

आता आपण हे व्यसन कसं लागतं आणि त्याचं व्यसनाधीन होण्यात कसं रूपांतर होतं ते पाहू. पॉर्नोग्राफी व्यसनाच्या चार पायर्‍या धरल्या जातात.

पहिली पायरी: व्यसन - इंटरनेट सर्फिंग करणारी व्यक्ती अपघातानं किंवा मुद्दाम पॉर्नोग्राफी साईटवर येते. तेथे स्त्री-पुरुष/ स्त्री-स्त्री/ पुरुष-पुरुष लैंगिक संबंध तपशीलवारपणे, लैंगिक भाग ठळकपणे कॅमेर्‍यामध्ये येतील अशा प्रकारे, चित्रित केलेले पाहते. एक-एक व्हिडिओ क्लिप ५ ते ३० मिनिटं चालणारी असते. (५ पेक्षा कमी ते साधारण ३० मिनिटांपेक्षा जास्त अशी त्यांची वर्गवारीच असते.) पॉर्नोग्राफीच्या अशा क्लिप्स प्रथमच पाहताना त्या व्यक्तीला जबरदस्त धक्का बसतो, कारण असं काही त्या व्यक्तीने कधीच पाहिलेलं नसतं. इथे ते जिवंतपणे आणि खुल्लम-खुल्ला दाखवलेलं असतं. ती व्यक्ती त्यानंतर सतत काहीशी अस्वस्थ होते. आपण काही चूक तर केलेली नाही ना, अशी भावना तिच्या मनात येऊन जाते. (कारण लैंगिक क्रिया ह्या एकान्तातच करायच्या असतात असा संस्कार मनावर असतो.) मात्र असं असलं तरीही ती व्यक्ती पॉर्नोग्राफीची ती क्लिप पाहतच राहते. कारण तिच्या शरीरामध्ये डोपामाईन स्रवू लागल्याने सुखसंवेदना वाहू लागलेल्या असतात. हा अत्यंत परमोच्च सुखदायी अनुभव त्या व्यक्तीला मिळत असतो. हळूहळू त्याची तीव्रता वाढत जाते आणि त्याचा शेवट हा लैंगिक मुक्ततेत म्हणजेच हस्तमैथुनामध्ये होतो. (सर्व पॉर्नोग्राफी क्लिप्सचा अंतिम परिणाम हस्तमैथुन हाच असतो.) हा अनुभव मनाला आणि शरीराला सुखकारक वाटत असल्यामुळे त्या व्यक्तीला पुन्हा-पुन्हा त्याकडे यावंसं वाटतं आणि लवकरच ती व्यक्ती पॉर्नोग्राफीच्या व्यसनामध्ये पूर्णपणे अडकून जाते (हूक्ड होते). पहिल्यांदा, वेळ आणि एकान्त मिळेल तेव्हा ती व्यक्ती पॉर्नोग्राफी बघते आणि नंतर मुद्दाम वेळ काढते आणि एकान्त मिळवते. मग त्या व्यक्तीला याची सवयच लागते आणि पुन्हा-पुन्हा पॉर्नोग्राफी बघण्यासाठी ती व्यक्ती उद्युक्त होत राहते. पॉर्नोग्राफीमधील त्या लैंगिक प्रतिमा ह्या व्यक्तीच्या मनामध्ये सतत घोळत राहतात. पॉर्नोग्राफी व्यसनाधीनता पुरुषांमध्ये जरी जास्त दिसत असली, तरी व्यसनाधीन होणार्‍या स्त्रियांचं प्रमाणही फार कमी नाही. (७० टक्के पुरुष, ३० टक्के स्त्रिया). आपल्या समाजातील श्रीमंत आणि बुद्धिमान वर्ग (डॉक्टर, इंजिनियर, वकील, नटनट्या, पत्रकार वगैरे) पॉर्नोग्राफीच्या या व्यसनाला जास्त बळी पडतात असं दिसून आलंय. याचं एक कारण असं असावं, की पॉर्नोग्राफी बघण्यासाठी कॉम्प्युटरसमोर एकट्यानं बसणं आवश्यक असतं आणि ते श्रीमंतीमुळे शक्य होतं. बुद्धिमान लोकांची कल्पनाशक्ती जास्त तल्लख असल्यामुळे ते 'मनात घोळवणं' हा प्रकार जास्त प्रभावीपणे करू शकतात आणि त्यामुळेच जास्त व्यसनी होऊ शकतात.

दुसरी पायरी : व्यसन वाढणं - या स्थितीला ती व्यक्ती आल्यावर स्वत:च्या व्यसनपूर्ततेसाठी ती कुठल्याही गोष्टीचा बळी देते. या व्यक्तीचं व्यसन घरी उघड होतं आणि मग कौटुंबिक संबंध ताणतणावाचे होतात. घरामध्ये भांडणं होऊ लागतात. यातून घर सोडून जाणं, लग्न मोडणं असे प्रकार सुरू होतात. व्यसनी माणूस नाती तोडतो, घर सोडतो; मात्र व्यसन सोडत नाही. नवरा-बायकोमध्ये जर नवरा पॉर्नव्यसनी असेल, तर तो बायकोला पॉर्न फिल्ममध्ये पाहिलेले लैंगिक चाळे करण्यास भाग पाडतो. (जे शंभरपैकी नव्व्याण्णव बायकांना अजिबात आवडत नाही.) यामुळे बायकांची स्थिती खूप चमत्कारिक आणि वाईट बनते. एखाद्या बाईने जरी नवर्‍याला असल्या प्रकारांमध्ये थोडीशी साथ दिली, तरी पॉर्नव्यसन हे अधिकाधिक वाढत जाणारं असतं आणि स्त्री तेथपर्यंत जाऊ शकत नाही. शिवाय काही काळानंतर पॉर्नव्यसनीला अधिकाधिक तीव्र असा पॉर्न-डोस लागतो. तो अधिकाधिक विचित्र, विकृत, बीभत्स अशा लैंगिक क्रियांकडे ओढला जातो. प्रत्यक्ष संबंध त्याला फारच मिळमिळीत, सौम्य, पांचट वाटू लागतो. आता त्याला प्रत्यक्ष संबंधापेक्षा पडद्यावरचे जास्त ठळक आणि अधिक किळसवाणे लैंगिक संबंध पाहणं आवडू लागतं. पॉर्न पाहणं आणि हस्तमैथुन करणं, ही बाब त्याला जास्त समाधान देते. असं असूनही जरी तो आपल्या एखाद्या मैत्रिणीकडे किंवा बायकोकडे लैंगिक संबंधासाठी वळला, तरी तो त्यांच्याकडे व्यक्ती म्हणून अजिबात पाहतच नसतो; तर पडद्यावरची जी प्रतिमा त्याने मनामध्ये घोळवलेली असते, ती समजून त्यांच्याकडे पाहत असतो. मैत्री, प्रेम, जबाबदारी या भावना त्या व्यक्तीच्या मनातून खाक होऊ लागतात.

तिसरी पायरी : संवेदनाहीनता येणं - व्यसनी व्यक्ती या स्थितीला येते. अशा स्थितीमध्ये पूर्वी ज्या पॉर्न क्लिप्स या व्यक्तीला धक्कादायक, किळसवाण्या किंवा बीभत्स वाटत होत्या; त्या तशा वाटत नाहीत. पूर्वी बघितलेल्या लैंगिक क्लिप्सचा मनावरील पगडा ओसरत जातो. आता पूर्वीएवढीच लैंगिक उत्तेजना येण्यासाठी अधिक बीभत्स, जास्त क्रूर, अधिक विचित्र व्हिडिओ क्लिप्स त्याला बघायला लागतात. अशा क्लिप्समध्ये एक स्त्री-अनेक पुरुष/एक पुरुष-अनेक स्त्रिया/एक स्त्री/योनी किंवा गुदद्वारात दोन लिंगं अशा पॉर्नोग्राफीच्या क्लिप्स त्याला सतत बघाव्याशा वाटू लागतात. ही संवेदनाहीनता येण्याचा परिणाम संख्यात्मकतेने मोजण्यासाठी काही प्रयोग करण्यात आले आहेत. एका मुलामुलींच्या गटाला बलात्काराच्या पॉर्न क्लिप्स दररोज वारंवार दाखवण्यात आल्या. साधारण आठ-दहा दिवसांनंतर पन्नास टक्के मुलांच्या आणि तीस टक्के मुलींच्या बलात्काराबद्दलच्या भावना पूर्वीएवढ्या तीव्र राहिल्या नाहीत. म्हणजेच 'बलात्कार ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे' इथपासून 'बलात्काराचा एवढा बाऊ कशाला केला पाहिजे' इथपर्यंत त्यांचं मत बदललं. यातूनच 'जेव्हा एखादी स्त्री नाही म्हणते, तेव्हा खरं तर तिला ते हवं असतं' अशी मनोभूमिका तयार होते.

प्रत्यक्ष कृती करणं : पॉर्न व्यसन वाढतच गेलं, तर त्याचा शेवट प्रत्यक्ष कृतीमध्ये होण्याची शक्यता जास्त असते. प्रत्यक्ष कृती म्हणजे बलात्काराचा प्रयत्न करणं, लहान मुलांशी लैंगिक चाळे करणं, स्ट्रिपक्लबमध्ये जाणं, वेश्यांकडे जाणं, छळ करणं किंवा छळ करवून घेणं, बांधणं किंवा बांधून घेणं. म्हणजे एकूण जे व्हिडिओ क्लिप्समध्ये शेकडो वेळा पाहिलं ते प्रत्यक्षात आणणं. कारण आतापर्यंत वारंवार पॉर्न बघून मन संपृक्त झालेलं असतं. डोक्यामध्ये पॉर्न ठासून भरलेलं असतं. आता त्या व्यक्तीला माणसं न दिसता केवळ त्याचे लैंगिक अवयवच दिसत असतात. पॉर्न क्लिप्समध्ये पाहिलेले विविध प्रकार मनात दिवसरात्र तरळत असतात. मनामधली नीतीची आणि कायद्याच्या भीतीची सीमारेषा पुसून गेलेली असते. माणसाचं रूपांतर जीवनमृतामध्ये (झोम्बीमध्ये) झालेलं असतं. नियंत्रण सुटलेली गाडी सुसाट वेगानं धावत असावी तशी त्या व्यक्तीची अवस्था झालेली असते. ही गाडी कुठेतरी जाऊन एकदाची आदळावी, अशीच जणू त्याची इच्छा असते.

चाइल्ड-पॉर्नोग्राफी या अत्यंत अमानुष गोष्टीचा उगम तिसर्‍या आणि चौथ्या अवस्थेत होतो. या चाइल्ड पॉर्नोग्राफीबद्दल आपण काही आकडेवारी बघू या.

इंटरनेट-पूर्व काळामध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या सर्वसाधारणपणे एखाद्या मूठभर प्रतिमा जप्त व्हायच्या; पण २००५ सालात ब्रिटनमध्ये एका माणसाला लहान मुलांच्या १० लाख अश्लील प्रतिमा जवळ बाळगल्याबद्दल शिक्षा ठोठावण्यात आली.

१९८८ सालात ब्रिटनमध्ये चाइल्ड-पॉर्नोग्राफीचा कायदा कडक करण्यात आला. त्यावर्षी पोलिसांनी ३५ व्यक्तींना पकडलं. २००१ मध्ये पकडण्याचा वार्षिक दर हा ५४९ एवढा वाढला होता. (१५०० टक्के वाढ). नेमकी एवढीच वाढ इंटरनेटची झाली होती. २००३ सालच्या अखेरीस या गुन्ह्यासाठी पकडण्याचा दर २०००च्या आसपास गेला होता. (१९८८च्या मानाने ६५०० टक्के वाढ.)

अमेरिकेमध्ये हा दर १९८८ सालच्या तुलनेत २०५० टक्क्यांनी वाढला.

अर्जेंटिनामध्ये असं दिसून आलं आहे, की २० लाख माणसं चाइल्ड-पॉर्नोग्राफी साइट्सशी जोडलेली आहेत.

यूएस कस्टमस् सर्व्हिसला २००१ सालच्या सर्वेक्षणामध्ये असं दिसून आलं, की १ लाख साइट्स चाइल्ड-पॉर्नोग्राफीशी निगडित आहेत.

अनेक अभ्यासकांनी दाखवून दिलं आहे, की चाइल्ड-पॉर्नोच्या प्रतिमा पाहणं/ जवळ ठेवणं आणि लहान मुलांचा लैंगिक छळ करणं या दोन्ही गोष्टींमध्ये मजबूत दुवा आहे. अमेरिकेमध्ये १९९७ ते २००४ या सात वर्षांमध्ये पकडलेल्या १८०७ चाइल्ड पॉर्नोग्राफर्सपैकी ३६ टक्के हे प्रत्यक्षामध्ये लहान मुलांचा लैंगिक छळ करणारे होते. हे उघडकीस आल्यामुळे ८३९ मुलांची सुटका करण्यात आली. याचा स्पष्ट अर्थ असा होतो, की जी व्यक्ती चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहते/ संग्रह करते ती व्यक्ती लहान मुलांचा लैंगिक छळ करणारी संभाव्य गुन्हेगार असते.

२००० साली इंडोनेशिया आणि रशियामधून तीन माणसं आणि अमेरिकेतील टेक्ससमधून एका जोडप्याला, लहान मुलं मोठ्या माणसांबरोबर लैंगिक संबंध करतानाचे फोटो आणि व्हिडिओज, इंटरनेटच्या द्वारे विकत असल्याबद्दल; अटक करण्यात आली. यांतील काही मुलं तर ४ वर्षं इतकी लहान होती. या साइटवर जाण्यासाठी टेक्ससचं जोडपं महिन्याला २९.९५ यूएस डॉलर्स एवढा आकार लावायचे. त्यातून त्यांनी वर्षाला ११ लाख डॉलर या दराने पैसे कमावले. यातील दोन तृतीयांश पैसा इंडोनेशिया आणि रशियातील वेबमास्टर्सना देण्यात आला. या व्यवहारातील ग्राहक अनेक देशांमधले होते.

१९९९ साली युएस पोलिसांनी लँडस्लाइड या वेबसाइटवर बंदी आणली तेव्हा त्यांना आढळलं, की ६६ देशांमधील ३ लाख लोकांनी आपली क्रेडिट कार्ड्स वापरून या वेबसाइटवरून चाइल्ड-पॉर्नोग्राफी खरेदी केली होती.

चाइल्ड-पॉर्नोग्राफी या धंद्यामध्ये संघटित गुन्हेगारी टोळ्या आहेत. त्यांतील गुन्हेगार २० लाख डॉलर्स कमावू शकतात. त्यामुळे नवनवीन व्हिडिओज तयार करण्यासाठी अधिकाधिक मुलं वापरली जातात. म्हणजे जी माणसं हे व्हिडिओज पाहतात/ विकत घेतात, ती माणसं नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या थेटपणे मुलांच्या लैंगिक शोषणाला जबाबदार असतात.

२००५ सालच्या एका अभ्यासात असं सिद्ध झालं आहे, की चाइल्ड पॉर्नोग्राफी ही थेटपणे संघटित गुन्हेगारी, तसंच मुलं पळवणं, त्यांना वेश्याव्यवसायात विकणं, त्यांचं लैंगिक चित्रीकरण याच्याशी संबंधित आहे.

अमेरिकन सरकारच्या कबुलीप्रमाणे दरवर्षी लाखो मुलं लैंगिक गुन्हेगारांचे बळी ठरतात. त्यांच्या तज्ज्ञांच्या अनुमानानुसार अमेरिकेतील ५ पैकी एका मुलीचा आणि १० पैकी एका मुलाचा वयात येण्यापूर्वी लैंगिक छळ झालेला असेल.

अशी खूप आकडेवारी देता येईल. भारतासारख्या खंडप्राय देशातून अनेक मुलं गायब होतात आणि पुढे त्यांचा थांगपत्तासुद्धा लागत नाही. तर आपलं मूल या जाळ्यात अडकणार नाही यासाठी पालकांनी जागरूक राहून त्यांची काळजी घेतली पाहिजे. काही साध्या-सोप्या गोष्टी केल्या तर ही लहान मुलं यात अडकणार नाहीत.

०. आपल्या मुलांशी चांगला संवाद साधा. खरं तर मुलांशी मित्रभावनेने वागा.
०. कॉम्प्युटर नेहमी हॉलमध्ये ठेवा. जर तो एखाद्या स्वतंत्र खोलीत असेल तर खोलीचे दार नेहमी उघडे ठेवा.
०. कॉम्प्युटरचे बिल अव्वाच्या सव्वा येत नाही ना, हे पहा.
०. आपल्या मुलाची मनोवस्था अचानक बदलली आहे का; ते घाबरलेले, कावरेबावरे, आपल्यापासून काही लपवून ठेवणारे दिसते आहे का, ते पहा. मूल खूप वेळ कॉम्प्युटरवर घालवते आहे, त्याला अचानक भेटी यायला सुरुवात झाली आहे, ही धोक्याची लक्षणे आहेत.
०. कॉम्प्युटरवर फिल्टर किंवा सिक्युरिटी सिस्टिम लावून घ्या.
०. चाइल्ड पॉर्नोग्राफर्स मुलांना चॅटरुममध्ये गाठतात. ते आपलं नाव-पत्ता खोटा देतात. वय मुलाएवढं सांगतात. गप्पा मारून ते मुलाचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर मुलाला आपलं नाव, पत्ता, फोटो, आईवडिलांची, मित्रांची माहिती, फोटो वगैरे द्यायला सांगतात. हळूहळू मुलाला पॉर्नोग्राफिक फोटो/व्हिडिओ चढत्या क्रमाने पाठवतात. वाढदिवसाला भेटी वगैरे पाठवतात. अशा प्रकारे त्या मुलाला उत्तेजित करणं, मैत्री देणं, उपकृत करणं, शरमिंदा करणं, त्याच्याशी जवळीक साधणं वगैरे अवस्थांतून गेल्यावर भेटीला बोलावतात आणि त्याचा लैंगिक उपयोग करून घेतात. मुलांपेक्षा मुलींच्या बाबतीत हे प्रमाण दुप्पट आहे.

आता आपण पुन्हा सर्वसाधारण पॉर्नोग्राफीकडे वळू. आजची इंटरनेट पॉर्नोग्राफी, पूर्वीच्या सर्व प्रकारच्या; म्हणजे छापील पुस्तकं, चित्रं, पत्ते किंवा त्यापूर्वीची शिल्पे; या प्रकारांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. पूर्वीच्या पॉर्नोग्राफीपेक्षा आजची इंटरनेट पॉर्नोग्राफी ही लाखो पटींनी अधिक आकर्षक, अधिक मादक, अधिक सहजसाध्य, अधिक व्यसनी बनवणारी आणि म्हणून अधिक धोकादायक आहे. तिची तुलना पूर्वीच्या पॉर्नोग्राफीशी करणं हे अत्यंत हास्यास्पद आणि ठार अज्ञानाचं आहे. आपण या पॉर्नोग्राफीची वैशिष्ट्ये पाहून हा मुद्दा समजून घेऊ.

इंटरनेट पॉर्नोग्राफी फुकट आहे. ती घरामध्ये (एका खोलीचे दार लावून) पाहिली जाते किंवा लॅपटॉपवर पाहिली जाते (आता तर मोबाईलवरसुद्धा), म्हणजेच पूर्णपणे खाजगी आहे. एका क्लिकने हजारो-लाखो व्हिडिओज पाहता येतात, म्हणजेच ती अगदी सहज उपलब्ध आहे. दिवसाचे चोवीसही तास ते उपलब्ध असतात. शिवाय हे व्यसन कोणालाही न कळता वर्षानुवर्षे चालू राहू शकतं.

या पॉर्नोग्राफीशी हस्तमैथुन आणि ऑरगॅझम निगडित होतो. छापील पॉर्नोग्राफीचं उद्दिष्टही तेच असतं, पण अक्षरं किंवा चित्रं यांच्यापेक्षा व्हिडिओजचा परिणाम हजारो पटींनी तीव्र असतो.

इंटरनेट पॉर्नोग्राफी बघताना बघणार्‍याच्या मनात लैंगिक सुखाच्या भरतीबरोबरच अपराधी वाटणं आणि शरम या भावनासुद्धा येत असतात. नेमक्या याच भावना त्याचं पॉर्नोग्राफी व्यसनचक्र पुढे नेण्यास हातभार लावतात.

इंटरनेट पॉर्नोग्राफीचं पूर्वीच्या छापील वगैरे पॉर्नोग्राफींपेक्षा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील नावीन्य. वर्षाला सत्तर हजार पॉर्नोग्राफिक व्हिडिओज आज बनवले जात आहेत, त्यामुळे नावीन्य कधीच संपत नाही. चित्र पाहिलं, पुस्तक वाचलं, आणि हस्तमैथुन केलं; की पुन्हा ते कोणी बघत नाही/वाचत नाही. इथे कॉम्प्युटरच्या समोर बसलं की तासन्‌तास ती व्यक्ती पॉर्नोग्राफी बघत राहू शकते. सर्फिंग केलं की नवीन व्हिडिओ सुरू.

दारू, चरस, कोकेन या व्यसनांना शारीरिक मर्यादा आहे. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे माणूस जाऊच शकत नाही. इंटरनेट पॉर्नोग्राफीला शारीरिक मर्यादा नाही. इंटरनेट पॉर्नोग्राफी पाहत आठ-आठ,दहा-दहा तास बसणारी माणसं आज शेकडो आहेत.

दारू आणि जुगार या व्यसनांमध्ये माणूस जेवढा जास्त व्यसनाधीन होतो, तेवढा तो व्यसनामध्ये जास्त वेळ घालवतो. पॉर्नोग्राफी व्यसनामध्ये माणूस जसजसा जास्त व्यसनाधीन होतो तसतसा तो अधिकाधिक धक्कादायक, क्रूर, बीभत्स पॉर्नोग्राफीकडे वळतो. (याच स्थितीला तो आला की चाइल्ड-पॉर्नोग्राफीकडे वळतो.)

आता पॉर्नोग्राफीचं व्यसन कसं लागतं, ते आपण पाहू या. कुठल्याही प्रजातीच्या जनुकीय नकाशात एक आज्ञावली असते - ती म्हणजे टिकून राहणं. त्यासाठी नराला जितक्या माद्यांना फळवायला मिळते, तितक्या माद्यांना तो फळवीत राहतो. आता जेव्हा माणूस आदिम शिकारी-भटक्या अवस्थेत राहत होता, तेव्हा एक पुरुष एका दिवसात किती स्त्रियांना पाहत असेल? फार तर दहा-वीस. आणि त्यातील किती जणी त्याच्याशी संभोग करायला तयार असतील? आता जो पुरुष पॉर्नो-व्यसनी झाला आहे, तो आदिम पुरुषाने आपल्या आयुष्यात जेवढ्या संभोगोत्सुक स्त्रिया बघितल्या असतील तेवढ्या एका बैठकीत पाहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंदू जे 'पाहतो' ते 'खरं' मानतो. म्हणजे मेंदू त्या पॉर्न-व्यसनीला पडद्यावरच्या बाईला फळविण्याची (संभोग करण्याची) आज्ञा देत असतो. अशा प्रकारे पॉर्न मेंदूला 'अती उत्तेजना' देतं.

आपण एक प्रयोग पाहू या. एका नर उंदराला पिंजर्‍यात असलेल्या संभोगोत्सुक मादी उंदरावर सोडलं. तो अत्यंत उत्साहाने मादीला जुगला. पण नंतर तो स्वस्थ राहिला. आता पहिली मादी पिंजर्‍यातून काढून दुसरी मादी आत घातली. नर पुन्हा मोठ्या आवेशाने जुगला आणि स्वस्थ बसला. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा चालू ठेवता येते - फक्त पिंजर्‍यात प्रत्येक वेळी नवीन मादी सोडायची. जेव्हा नर मेल्यासारखा थकतो तेव्हाच तो निपचित पडून राहतो.

पॉर्नव्यसनीसुद्धा नेमका असाच वागतो. हा जनुकीय कार्यक्रम आहे. पॉर्नव्यसनीच्या लिंगात तो नसून मेंदूत आहे. जास्त मुलं जन्माला घालणं हे त्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असतं; तसंच वेगवेगळ्या माद्या फळविणं आणि अशा प्रकारे नराच्या संततीची जनुकीय विविधता वाढवणं, हे त्या कार्यक्रमाचं दुसरं उद्दिष्ट असतं. यालाच कूलीज परिणाम म्हणतात.

रेतस्खलन

एक्स अक्षावर उंदराच्या माद्यांचं प्रतिनिधित्व आहे. वाय अक्षावर नर उंदराला रेतस्खलनाला लागलेला वेळ आहे. जेव्हा एकच मादी नर-उंदराला संभोगासाठी देण्यात आली, तेव्हा क्रमाक्रमाने रेतस्खलनाचा वेळ वाढत गेला. पाचव्या रेतस्खलनाला त्याला तब्बल १८ मिनिटं लागली. उलट जेव्हा वेगवेगळ्या माद्या त्याच्यासमोर आल्या, तेव्हा रेतस्खलनाला जवळजवळ प्रत्येक वेळी तेवढाच वेळ, म्हणजे २-३ मिनिटंच लागली. म्हणजे प्रत्येक वेळी नर अत्यंत उत्तेजित झाला होता.

जेव्हा पॉर्न वापरणारा पॉर्नव्यसनी होतो, तेव्हा त्याला उंदरासारखंच सतत नावीन्य लागतं. हे पुरुषांएवढंच स्त्रियांसाठीसुद्धा खरं आहे. माकडांवरही काही प्रयोग करण्यात आले. माकडांना गोड आवडतं, पण या प्रयोगात माकडांनी मादी-माकडांचे नितंब पडद्यावर बघण्यासाठी फळांचा त्याग केला. पॉर्नव्यसनी माणसंसुद्धा खाणंपिणं सर्व सोडून पॉर्न बघत असतात.

असं का घडतं, याचा आपण मेंदूविज्ञानात शोध घेऊ. मेंदूचे दोन भाग आहेत. लिम्बिक सिस्टिम आणि त्याला वेढून असलेला सेरिब्रल कॉर्टेक्स. लिम्बिक सिस्टिम हा भाग पुरातन आहे. साधारण १० कोटी वर्षे एवढा जुना आहे. त्याचं काम आहे तगून राहणं. तो भीती, आनंद, राग अशा भावनांचं नियंत्रण करतो. जोडीदाराची निवड, लैंगिक गरजा, भूक यासह आपल्या बहुतेक इच्छा आणि प्रेरणा यांचं मूलस्थान तो असतो.

म्हणजेच लैंगिक इच्छा लैंगिक अवयवामध्ये निर्माण होत नाही. ती येथे निर्माण होते. येथेच तुम्हांला कूलीज परिणाम जाणवतो आणि पॉर्नव्यसनांसह सर्व व्यसनांचा जन्म इथे होतो.

लिम्बिक मेंदू सर्व प्राण्यांमध्ये सारखा असतो, पण इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसाचा सेरिब्रल कॉर्टेक्स मोठा असतो. विवेक, विचार, तर्क यांचे स्थान सेरिब्रल कॉर्टेक्स असतो. कृतीचे परिणाम काय होतील हे सेरिब्रल कॉर्टेक्स जाणतो. लिम्बिक सिस्टिमला परिणाम जाणता येत नाहीत. सर्व प्राण्यांमधील लिम्बिक सिस्टिमची रचना एकसमान असते. भूक, वात्सल्य, संभोग, लैंगिक इच्छा किंवा अगदी व्यसन या सार्‍यांसाठी एकसमान मेंदू-रसायनं आणि रचना, एकसमान कार्ये सर्व सस्तन प्राण्यांमध्ये करतात. लिम्बिक सिस्टिमचा मूलभूत गुणधर्म 'वेदना टाळणं' आणि 'सुख पुन्हा पुन्हा मिळविणं' हा असतो. या दोन घटकांवरच 'तगून राहणं' अवलंबून असतं. काळोख वाईट, उंचावर जाणं वाईट, आइस्क्रीम चांगलं, साप वाईट, पॉर्न चांगलं - असं लिम्बिक सिस्टिम सांगते.

लिम्बिक सिस्टिमच्या मध्यभागी रिवॉर्ड सर्किट असतं. माणसाच्या सर्व इच्छा आणि लैंगिक क्रिया, ऑरगॅझम यासारखी सुखं यांचा अनुभव रिवॉर्ड सर्किटमध्ये घेतला जातो. माणसाला व्यसन इथंच लागतं. ज्यावेळी माणूस आपल्या तगून राहण्याला; अधिक अचूक बोलायचं तर आपल्या जनुकांच्या त्या वेळी तगून राहण्याला पुढे नेणारी कोणतीही कृती करीत असतो, त्यावेळी हे सर्किट उत्तेजित होतं.

नियम असा आहे, की कृती करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी तुम्ही मेंदूमध्ये 'रिवॉर्ड'ची नोंद केली पाहिजे. हे सर्किट सुखाचा अनुभव सक्रिय करतं, तसंच सुख मिळवण्यासाठी कृती करण्याची तुम्हांला प्रेरणा देतं. ते तुम्हांला खायला लावतं, लैंगिक संबंध करायला लावतं, धोका पत्करायला लावतं, जोडीदार शोधायला लावतं. जेव्हा तुमचा संघ जिंकतो, तेव्हा तुम्ही 'मर्द' आहात असं तुम्हांला वाटतं किंवा जेव्हा तुम्ही षटकार खेचता तेव्हाही ते सक्रिय झालेलं असतं.

अनुभव जेवढा थरारक तेवढं हे सर्किट अधिक सक्रिय होतं. मात्र लक्ष्यात घेतलं पाहिजे की निसर्गातील सुंदर दृश्य पाहणं, जंगलात भ्रमंती करणं, मित्रमैत्रिणींंबरोबर गप्पा मारणं अशा साध्या-साध्या आनंदांनीसुद्धा हे सर्किट सक्रिय होतं.

मेंदूच्या विशिष्ट भागांना विशिष्ट रसायनं सक्रिय करतात. रिवॉर्ड सर्किटला सक्रिय करणारं रसायन आहे डोपामाइन. रिवॉर्ड सर्किट हे इंजिन आहे आणि डोपामाइन हे इंधन आहे. कमी कॅलरी अन्नापेक्षा जास्त कॅलरी अन्नामुळे जास्त डोपामाइन स्रवतं. आपण साखरेचे पदार्थ जास्त खातो कारण ते मेंदूमध्ये जास्त 'रिवॉर्डिंग' म्हणून नोंदले जातात. साखरेमुळे जास्त डोपामाइन स्रवतं. मात्र सर्वात जास्त डोपामाइन (कोकेन, मेथ सारखे अंमली पदार्थ सोडून) ऑरगॅझममुळे स्रवतं.

डोपामाइनचं टोपणनाव आहे 'मला ते मिळालंच पाहिजे, मग काय वाट्टेल ते होवो' असं मेंदूरसायन. कुठलीही कृती करण्याच्या मागे डोपामाइन असतं, कारण सर्व प्रेरणांच्या मागे रिवॉर्ड सिक्युरीटी असते. खरं तर कुठल्याही माणसाला रिवॉर्ड सिस्टिमचं जास्त उत्तेजन हवं असतं. आपणाला लॉटरी जिंकायची नसते, आपणाला रिवॉर्ड सर्किट सक्रिय करायचं असतं.

एखाद्या कृतीमुळे जितक्या जास्त प्रमाणात डोपामाइन स्रवेल तितक्या जास्त प्रमाणात माणसाला ती कृती हवी असते. सतत आणि मोठ्या प्रमाणावर डोपामाइन स्रवत राहावं, अशी ती इच्छा असते.

डोपामाइन स्रवण्याची एक ठरावीक पद्धत आहे. समजा एखादा माणूस भुकेलेला आहे तेव्हा डोपामाइनची पातळी वाढत जाते. मग तो कोंबडी / श्रीखंड खाण्याचा विचार करतो. डोपामाइनची पातळी अधिक वाढते. कोंबडी / श्रीखंड तयार होऊ लागलं की डोपामाइन अधिकाधिक वाढू लागतं. तो माणूस पहिला घास घेतो तेव्हा डोपामाइन सर्वोच्च पातळीत असतं. जसजसा माणूस खाऊ लागतो तसं डोपामाइन कमी-कमी होऊ लागतं. शेवटी ते नेहमीच्या पातळीला येतं आणि त्या माणसाचं पोट भरलेलं असतं.

असाच घटनाक्रम संभोगात आणि हस्तमैथुनात आढळून येतो. मात्र ऑरगॅझमचा अनुभव बहुधा ओपिऑइडसमुळे येतो, डोपामाइनमुळे नाही. डोपामाइन माणसाला ऑरगॅझमच्या दिशेने धावडवतं, पण अनुभव ओपिऑइडमुळे येतो.

हाच ग्राफ कुठल्याही नवीन गोष्टीसाठी खरा आहे - नवीन सिनेमा, नवीन फॅशन, नवीन गाणं, कुठल्याही नवीन गोष्टी. कारण डोपामाइनला नावीन्य आवडतं. घरात अनेक कपडे असले तरी कपडे घ्यावेसे वाटतात ते डोपामाइनमुळे.

अशा प्रकारे रिवॉर्ड सर्किटमध्ये वाढणारं डोपामाइन तृप्तता, पूर्णता किंवा समाधान यांवर मात करतं. आपला विवेकी/ तार्किक मेंदू जरी नाही सांगत असला तरी माणसं पॉर्न बघतात ती याच कारणामुळे.

मात्र डोपामाइनची पातळी खाली आली की नावीन्याचा थरार संपतो.

आता आपण कूलीज परिणाम पाहूया. या कूलीज परिणामाच्या मागे डोपामाइन असतं. प्रत्येक पुढील संभोगाच्या वेळी रिवॉर्ड सर्किट कमी-कमी डोपामाइन बाहेर टाकतं. शेवटी नर मादीशी संभोग करू शकत नाही, कारण तेवढं डोपामाइन नसतं.लैंगिक इच्छेमागे डोपामाइन असावं लागतं.

कूलीज परिणामाच्या मागे डोपामाइन असतं.

डोपामाईन

आता पिंजर्‍यात दुसरी मादी सोडा. नराला आणखी एक डोपामाइनचा डोस मिळतो, त्याची लैंगिक इच्छा झटकन वाढते आणि तो संभोग करू लागतो.

नेमक्या याच कारणामुळे पॉर्नव्यसनी सतत नवीन पॉर्न व्हिडिओज पाहत असतो. (याच कारणामुळे इंटरनेट पॉर्नोग्राफी ही छापील पॉर्नोग्राफी, अश्लील चित्रे वगैरेंपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि अतिशय धोकादायक आहे.) कोकेन, निकोटिन, अल्कोहोल यांसारखे सर्व अंमली पदार्थ रिवॉर्ड सर्किटमध्ये डोपामाइनचा पूर आणतात. व्यसन लावणारे सर्व रासायनिक पदार्थ आणि क्रिया डोपामाइनची पातळी वाढवतात. मात्र व्यसन लागण्यासाठी त्यांचा सातत्याने वापर होणं आवश्यक असतं.

प्रत्यक्ष सुखाच्या पातळीने नव्हे तर सुखाच्या अपेक्षेने डोपामाइन स्रवतं. डोपामाइन ही 'हे मिळव' अशी प्रेरणा आहे. सर्व व्यसने ही डोपामाइनचा पाठलाग करत असतात. ऑरगॅझम किंवा खाणं यातील आनंदाची अनुभूती ओपिऑइड्समुळे येते. डोपामाइन म्हणजे 'हवं असणं', ओपिऑइड म्हणजे 'आवडणं'. म्हणजेच व्यसन म्हणजे 'अधिक हवं असणं', पण 'कमी आवडणं'.

आता आपण आणखी एक उंदराचा प्रयोग पाहू. या उंदराच्या रिवॉर्ड सर्किटमधील इलेक्ट्रोडला वायर जोडलेली आहे. जेव्हा उंदीर तरफेवर पंजा आपटतो, तेव्हा ते उंदराची रिवॉर्ड सर्किट उत्तेजित होईल एवढी वीज पाठवतं. शास्त्रज्ञांना दिसून आलं, की उंदीर सातत्याने तरफेवर पंजा आपटीत राहतो. तासातून हजारो वेळा तो पंजा आपटतो. अगदी थकून जाऊन निपचित पडेपर्यंत तो पंजा आपटीत राहतो. तो खात नाही, पीत नाही, संभोग करीत नाही, पिलांची काळजी घेत नाही. तरफ दाबण्यासाठी या सार्‍या गोष्टी तो सोडून देतो. अंमली पदार्थांच्या पूर्ण आहारी गेलेल्या अमल्यांचं वर्तन असंच असतं.

दुसर्‍या एका प्रयोगात शास्त्रज्ञांनी तरफ आणि उंदरामध्ये एक इलेक्ट्रिक ग्रिड ठेवली, जी उंदराला वेदनादायी शॉक देईल. उंदीर शॉक सहन करूनसुद्धा तरफेला दाबत राहिला. आणखी एका प्रयोगात शास्त्रज्ञांनी उंदीर आणि अन्न यांच्यामध्ये वेदनादायी इलेक्ट्रिक ग्रिड ठेवली, तेव्हा उंदरांनी ती ग्रिड ओलांडली नाही. त्यापेक्षा त्यांनी उपाशी राहणं पसंत केलं. आणखी एका प्रयोगात उंदरांचा डोपामाइनला देण्यात येणारा प्रतिसाद थांबवण्यात आला, तेव्हा त्याच्या सर्व प्रेरणा थांबल्या. अशा प्रयोगात उंदीर खाण्याच्या दिशेकडे जात नाहीत आणि ते भुकेने मरतात. मात्र त्यांना अन्न आवडत असतं. जर त्यांच्या तोंडात अन्न घातलं तरच ते अन्न खातात आणि बरं वाटल्याचं त्यांच्या चेहर्‍यावर उमटतं. पण त्यांना अन्नाच्या थाळीपर्यंत जायची प्रेरणा होत नाही. तसंच ते लैंगिक क्रिया करणार नाहीत. ते फक्त पडून राहतील.

यातून महत्त्वाचा मुद्दा हा हाती येतो, की माणसाला डोपामाइनची योग्य पातळी हवी - तरच माणूस व्यवस्थित जगू शकतो. डोपामाइनमुळे माणसाची दृष्टी सकारात्मक होते, वर्तन चांगलं होतं, काम करण्याची प्रेरणा मिळते. पण त्याच डोपामाइनच्या असंतुलनामुळे मानसिक समस्या निर्माण होतात - त्यातील एक म्हणजे पॉर्नो-व्यसन.

अमेरिकन सायकिअ‍ॅट्रिक असोसिएशनने एक प्रश्नपत्रिका तयार केली आहे. त्यातील तीन प्रश्नांना जर एखाद्या व्यक्तीचं उत्तर हो असं असलं तर ती व्यसनी आहे हे समजणं. ही प्रश्नपत्रिका आपण पॉर्नोग्राफीसाठी वापरू शकतो.

१) सुसह्यता (टॉलरन्स) - तुमचा वापर काळानुसार वाढत गेला आहे का?
२) थांबणं (विथड्रॉवल) - जेव्हा तुम्ही वापर थांबवला तेव्हा तुम्हांला कधी शारीरिक किंवा भावनिक त्रास झाला का?
३) तुम्हांला वापर नियंत्रित करणं कठीण जातं - तुम्हांला स्वत:ला थांबावंसं वाटूनही तुम्ही अधिक, किंवा जास्त काळ वापर करता का?
४) नकारात्मक परिणाम - मन:स्थिती (मूड), स्व-आदर (सेल्फ एस्टिम), आरोग्य, नोकरी, कुटुंब वगैरेंवर वाईट परिणाम होत असूनही वापर चालू ठेवता का?
५) ठरविलेल्या किंवा नेहमीच्या कामांकडे दुर्लक्ष - सामाजिक अभिसरण, क्रीडा-मनोरंजन हे कार्यक्रम किंवा नोकरीधंदा, घरची कामं तुम्ही व्यसनामुळे पुढे ढकलता का किंवा कमी करता का?
६) कमी करण्याची इच्छा - वापर कमी करण्याच्या किंवा नियंत्रित करण्याची तुम्हांला कधी इच्छा झाली आहे का? तसा अयशस्वी प्रयत्न तुम्ही केला आहे का?
७) मोठा काळ किंवा भावनिक शक्ती खर्च करणे - व्यसनासाठी व्यसनपदार्थ मिळविणं, लपविणं, वापरणं, योजना आखणं, त्यातून बाहेर पडणं यासाठी किंवा आपण पकडले जाऊ नये यासाठी तुम्ही कधी योजना आखली आहे का?

यातील तीन किंवा अधिक प्रश्नांना व्यक्तीचं उत्तर हो असलं तर ती व्यक्ती व्यसनी असते.

अल्कोहोल, कोकेन, निकोटिन, मेथ हे अंमली पदार्थ मेंदूवर परिणाम करतात हे सर्वमान्य आहे. पण खाणं, जुगार, लैंगिकता, शॉपिंग, ऑनलाइन व्हिडिओ गेम्स यासारखी वर्तणूकव्यसनंसुद्धा मेंदूवर परिणाम करतात.

खाणं आणि लैंगिकता या कोणत्याही प्राण्याच्या नैसर्गिक मूलभूत गरजा आहेत. अंमली पदार्थ वापरणार्‍यांपैकी फक्त १५ टक्के लोक व्यसनी होतात, पण अमेरिकेमध्ये त्याहून कितीतरी टक्के अधिक लोक खाण्याचे व्यसनी आहेत. (अमेरिकेमध्ये ६६ टक्के लोक जास्त वजनाचे आणि १५ टक्के स्थूल-ओबीज आहेत.) अर्थात त्याला खूप अधिक काळ लागतो.

आता विचार करा, कोणालाच जाड व्हायचं नसतं. तरीही युरोप-अमेरिकेतील कोट्यवधी लोक जाडे आहेत. उलट उंदरांचा जाडबारीक असण्याचा काहीच प्रश्न नसतो. पण जेव्हा ते पाश्चिमात्य अन्न खातात, तेव्हा ते प्रमाणाबाहेर आणि खा खा खातात आणि नुसते जाड नाही तर स्थूल (ओबीज) होतात. यावरून काही निष्कर्ष निघतात -

१) आपलं रिवॉर्ड सर्किट अशा प्रकारे विकसित झालेलं आहे, की ते आपणाला खाणं आणि संभोग यांकडे ढकलतं - ड्रग्जकडे नाही. यामुळे इतक्या प्रचंड संख्येनं लोक पॉर्नव्यसनी होतात.
२) अतिउत्तेजित करणारं अन्न आणि लैंगिकता आपणाला व्यसनी बनवू शकतात - जरी जनुकीयदृष्ट्या, आपण अंमली पदार्थांमुळे, सर्वसाधारणतः व्यसनी बनू शकत नाही.

आता पुढचा मुद्दा असा की नैसर्गिक सामर्थ्यदाता असलेलं अन्न आणि संभोग, या गोष्टी व्यसन कसं लावतात?

१) जेव्हा त्यांचं स्वरूप अतिउत्तेजित करणारं असतं.
२) जेव्हा त्या अमर्याद प्रमाणात उपलब्ध असतात.
३) जेव्हा त्या नवनवीन स्वरूपात उपलब्ध असतात. येथे नावीन्याचं न संपणारं आकर्षण हा मुद्दा येतो.
४) जेव्हा त्या निरुपद्रवी आहेत असा आपला समज असतो.

जंक (मॉडर्न) फूड आणि इंटरनेट पॉर्न या चारही अटी पूर्ण करतात. दोन्ही गोष्टी मेंदूच्या 'समाधान' (पुरे झालं ही भावना) या यंत्रणेवर विजय मिळवतात. लक्ष्यात घ्या - कॅलरी मिळविणं आणि गर्भधारणेच्या संधी मिळविणं, हे आपल्या जनुकांचं म्हणजेच लिम्बिक सिस्टिमचं प्राथमिक कर्तव्य आहे.

जर व्यसन लागले तर मेंदूला अतिउत्तेजनाची सवय लागते. त्यामुळे रिवॉर्ड सर्किट बधीर होतं आणि मेंदू सर्किटं रिवायर होतात.

बधीर रिवॉर्ड सर्किटमुळे कमी सुखाची भावना होते. त्यामुळे सुखाची ती पातळी गाठण्यासाठी तडफड सुरू होते - म्हणजेच व्यसन लागतं.

रिवायरिंगचे प्रमुख दोन भाग आहेत -

१) 'त्या गोष्टीसाठी प्रयत्न कर' असा तीव्र संदेश दिला जातो. मेंदूपेशींचा एक जुडगा 'आपण पुन्हा ते करू या! आपण पुन्हा ते करू या!' असं किंचाळू लागतो. बधीर रिवॉर्ड सर्किटमुळे जी तडफड होते, त्यात या किंचाळण्याची भर पडते. हा जुडगा तुम्ही जितका वापरता, तितका तो बळकट होत जातो. (स्नायू जसा वापरामुळे बळकट होतो तसा)

२) मेंदूमधील नियंत्रण सर्किट दुबळं बनतं (स्नायू जसा बिनवापरामुळे दुबळा बनतो तसं). मेंदूमधील हा विवेकी, विचारी, परिणाम जाणणारा भाग जितका कमी वापरावा तेवढा दुबळा बनत जातो. (व्यसनी माणसाची इच्छा असूनही तो व्यसन सोडू शकत नाही.)

व्यसनामध्ये नियंत्रणसर्किटचं आणि मेंदूपेशींच्या वरील जुडग्याचं टग-ऑफ-वॉर होतं, ज्यात 'आपण पुन्हा ते करुया' सर्किट जिंकतं. व्यसन समजण्यासाठी आपण काय बदल होतो हे समजून घेतलं. बदल मेंदू पेशींमध्ये होतो. मेंदूमध्ये अब्जावधी मज्जापेशी असतात. त्या सर्किटमध्ये जोडलेल्या असतात - म्हणजे रिवॉर्ड सर्किट आणि अशी असंख्य सर्किटे.

जेव्हा सर्किट उत्तेजित होतं तेव्हा आपणाला भावना, विचार, अनुभव येतो - जो त्या उत्तेजित धातूच्या सर्किटशीच केवळ संबंधित असतो.

मज्जापेशी एकमेकींना एका अत्यंत छोट्या पोकळीत (गॅपमध्ये) जोडलेल्या असतात. ज्याला सिनॅप्स म्हणतात. मज्जापेशींमधून वीज वाहत असते, पण ती या पोकळीपाशी थांबते. त्यामुळे प्रेषक मज्जापेशीमधून न्युरोकेमिकल (येथे डोपामाइन) सोडलं जातं. हे न्युरोकेमिकल पोकळीतून वाहत जाऊन स्वीकारण्यार्‍या मज्जापेशीला चिकटतं. जेथे ते चिकटतं त्या जागांना रिसेप्टर्स म्हणतात.

मेंदू मज्जापेशी

रिसेप्टर्स हे स्वीकारणार्‍या मज्जापेशीच्या कानांसारखे असतात, जे पाठवला जाणारा मेंदू संदेश 'ऐकतात'. मेंदूमध्ये अनेक वेगवेगळी न्युरोकेमिकल्स असतात आणि त्यातील प्रत्येकाचा संदेश वेगवेगळा असतो. जर एखाद्या विशिष्ट प्रकारची पुरेशी न्युरोकेमिकल्स प्रेषक मज्जापेशीकडून मुक्त केली गेली, तर स्वीकारणारी मज्जापेशी तो 'संदेश' ग्रहण करते आणि तो मनोविकार अनुभवला जातो.

जर प्रेषक मज्जापेशीकडून जास्त डोपामाइन सोडलं गेलं, तर स्वीकारणार्‍या मज्जापेशीकडून जास्त डोपामाइन ग्रहण केलं जातं आणि जास्त तीव्र थरार अनुभवला जातो. पॉर्नच्या बाबतीत ऑरगॅझमकडे वाटचाल सुरू होते. (''आता मी धावणार नाही'') जर अगदी डोपामाइन मुक्त केलं गेलं (म्हणजे ऑरगॅझमच्या नंतर) तर थरार संपतो. (''आता मी कूस बदलून झोपतो.'') म्हणजे मुक्त झालेल्या न्युरोकेमिकलवर (येथे डोपामाइनवर) संदेशाची शक्ती अवलंबून असते. मेथअ‍ॅम्फेटॅमाइन किंवा कोकेन घेतल्यावरसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर डोपामाइन मुक्त होतं.

आता व्यसनामध्ये काय होतं ते पाहू. व्यसनामध्ये संदेश स्वीकारणार्‍या रिसेप्टर्सची संख्या कमी होते. व्यसनाची थरार (किक, हाय) अनुभवण्यासाठी स्वीकारणार्‍या पेशीवरील सर्व डी २ रिसेप्टर्स सक्रिय होणं आवश्यक असतं. आता व्यसनामध्ये डी २ रिसेप्टर्सची संख्या कमी होते. सर्व व्यसनांमध्ये हे घडून येतं. सतत अतिउत्तेजना मिळत राहिली तर (जंक फूड, इंटरनेट पॉर्न, ड्रग्ज) स्वीकारणारी पेशी जणू म्हणते, ''आता फार झालं. इतके डोपामाइन मी हाताळू शकत नाही'' म्हणजे जर कोणीतरी आपल्या कानापाशी किंचाळत असेल तर आपण कान बंद करून घेतो तसं.

दुसर्‍या एका उदाहरणाने हा मुद्दा स्पष्ट होईल. तुमच्याकडे भरपूर पेट्रोल म्हणजे डोपामाइन आहे. पण इंजिनामध्ये काही सिलींडर्स नाही आहेत, कमी डोपामाइन रिसेप्टर्स म्हणजे कमी प्रतिसाद. या स्थितीत खरं तर मेंदू तडफडत असतो, ''मला ठीकठाक वाटण्यासाठी आणखी डोपामाइन हवंय.'' पण हा संदेश ऐकण्यासाठी पुरेसे रिसेप्टर्स नसतात.

डोपामाइन रिसेप्टर्स कमी झाल्यामुळे आणखी काही परिणाम होतात - थकवा, चिंता, अस्वस्थपणा, उदासीनता, चिडचिड वगैरे. जोपर्यंत ती व्यक्ती व्यसन सोडत नाही आणि डोपामाइन रिसेप्टर्सची पातळी पुन्हा पहिल्याइतकी होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला नेहमीसारख्या साध्यासरळ गोष्टींमधून समाधान आणि आनंद मिळत नाही.

अतिउत्तेजनानं डोपामाइन रिसेप्टर्स कमी होत गेल्याने व्यसनाचं चक्र सुरू होतं. पहिल्यासारखी किक मिळण्यासाठी जास्त वेळ किंवा जास्त तीव्र व्यसन-विषय असावा लागतो, त्यामुळे डोपामाइन रिसेप्टर्स आणखी कमी होतात, किक कमी होते, व्यसनाची तडफड सुरू होते आणि मग त्याहून जास्त तीव्र किंवा जास्त वेळ व्यसन करावं लागतं आणि हे चक्र चालू राहातं. पॉर्नोव्यसनाच्या बाबतीत पॉर्न प्रतिमा मनात आल्याबरोबर डोपामाइन वाढणं सुरू होतं, जे त्या व्यक्तीला पॉर्नोग्राफीकडे खेचून नेतं आणि सुटका मिळण्यासाठी ती व्यक्ती पॉर्न पाहू लागते. जणू मेंदूच त्या व्यक्तीला पॉर्नोकडे खेचून नेतो.

अन्न आणि संभोग ह्या सर्व प्राण्यांच्या नैसर्गिक गरजा आहेत. पण अतिउत्तेजित करणारे पदार्थ खाण्याचं व्यसन लागू शकतं आणि ड्रग्जच्या व्यसनाने मेंदूमध्ये जे बदल घडून येतात, तेच बदल खाण्याच्या व्यसनाने झालेले दिसतात. जेव्हा उंदरांना त्यांच्या नेहमीच्या उंदीरअन्नाऐवजी कॅफेटेरिया अन्न म्हणजे सॉसेज, चीजकेक, फ्रॉस्टिंग, बेकन आणि डिंगडाँग (केक) संपूर्ण वेळ देण्यात आलं तेव्हा त्यांनी ते खा खा खाल्लं. त्यांचे डोपामाइन रिसेप्टर्स ताबडतोब कमी झाले. ते सुस्त आणि स्थूल झाले.

त्याच प्रयोगात, इतर उंदरांना कॅफेटेरिया डाएटमध्ये फक्त एक तास प्रवेश देण्यात आला. त्यांच्या मेंदूमध्ये बदल दिसून आला नाही - निदान प्रयोगाच्या मर्यादितत कालावधीमध्ये तरी.

म्हणजेच अमर्याद प्रवेश आणि अतिरिक्त वापर यामुळे मेंदूमध्ये बदल घडून आले. इंटरनेट पॉर्नमध्ये या दोन्ही गोष्टी होतात.

याच प्रयोगामध्ये स्थूल उंदरांना त्यांचा नेहमीचा उंदीर आहार पुन्हा सुरू करण्यात आला. अगदी लहानपणापासून जरी ते तोच आहार खात आले असले तरी आता त्यांनी प्रथम त्या आहाराला तोंडच लावलं नाही. कारण त्यांना तो उत्तेजक न वाटता कंटाळवाणा वाटला. म्हणजेच नेहमीच्या आहाराबद्दल त्यांना असमाधान वाटलं. खूप पॉर्न पाहणार्‍यांमध्ये नेहमीच्या जोडीदाराबरोबर सरळसाधा संभोग करताना असंच असमाधान, कंटाळा वाटतो.

१) जुने पॉर्न आता कंटाळवाणे वाटते. ते पुरेसे उत्तेजक वाटत नाही.
२) पॉर्नमध्ये जितका वेळ जास्त घालवावा तेवढी व्यसनी माणसाची रुची बदलत जाते - काही वेळा तर ती धक्कादायक वाटेल एवढी बदलते. या दोन्ही गोष्टी आणखी उत्तेजना मिळविण्यासाठी मेंदू जी तडफड करतो (क्रेव्हिंग्ज) त्यामुळे घडून येतात.

उंदरांमध्ये आणखी एक गोष्ट दिसून आली. त्यांना त्यांचं नेहमीचं खाणं सुरू करून दोन आठवडे झाले (जेव्हा प्रयोग संपला) तरीही त्यांचं डोपामाइन रिसेप्टर्स नेहमीच्या पातळीवर आलं नव्हतं. (उंदरावर कोकेनचा असाच प्रयोग केला असता फक्त दोन दिवसांमध्ये डोपामाइन रिसेप्टर्स नेहमीच्या पातळीवर आले.)

यामागे जैविक प्रेरणा असावी, जेवढं मिळेल तेवढं खाऊन घ्या आणि जेवढा मिळेल तेवढा संभोग करा असा प्राण्याला जनुकीय आदेश असतो. सूटी नावाच्या गिनीपिगची सत्य हकीगत याबाबत उद्बोधक आहे. सूटी हा नर गिनीपिग आपल्या पिंजर्‍यातून निसटला आणि तो ज्या पिंजर्‍यात २४ मादी गिनीपिग ठेवल्या होत्या त्या पिंजर्‍यात घुसला. एका रात्रीत त्याने सर्व माद्यांशी संभोग केला. दुसर्‍या दिवशी जेव्हा मालकाने त्याला त्या पिंजर्‍यात शोधून काढलं तेव्हा तो ढाराढूर झोपला होता आणि त्याने पूर्ण दोन दिवस झोपून काढले. कालांतराने तो ४३ पिलांचा बाप झाला.

इंटरनेट पॉर्नवर पुरुष (आणि स्त्रियाही) असंच वागतात. प्रतिमा आणि प्रत्यक्ष यात मेंदू फरक करीत नाही आणि इंटरनेट अक्षरश: असंख्य बायका (त्याही सुंदर आणि संभोगोत्सुक) समोर उभ्या करीत असतो. सेरीब्रल कॉर्टेक्स जरी त्या प्रतिमा आहेत, खर्‍या नाहीत असं सांगत असला, तरी लिम्बिक सिस्टिम त्या खर्‍या मानते. म्हणजेच ज्याप्रमाणे कोणताही शहाणा सस्तन नर प्राणी आपली जनुके जास्तीत जास्त ठिकाणी विखरून टाकेल त्याप्रमाणे पॉर्न व्यसनी वागत असतो. आणि इथे संभोग-कालाला मर्यादा नसते. सतत नवनवीन संभोगसंधी (इंटरनेट पॉर्न) - कूलीज परिणाम (पॉर्न पाहत राहणं) - डोपामाइन रिसेप्टर्स कमी होणं - जर तुम्ही पॉर्न व्यसन चालू ठेवलं तर - अधिक उत्तेजना मिळण्यासाठी मेंदूची तडफड - अधिक पॉर्न हे हे चक्र चालू राहातं.

मेंदूमध्ये आणखी एक प्रक्रिया घडून येते, ती म्हणजे मेंदूचं रिवायरिंग. ज्या मेंदूपेशी एकत्रितपणे काम करतात त्या जोडल्या जातात. ('नर्व्हसेल्स दॅट फायर टुगेदर, वायर टुगेदर'). रिवायरिंगमध्ये मेंदूपेशींमधील जोडण्या बळकट होतात ज्यायोगे त्या संदेशवहनाचे काम अधिक सहजपणे करू शकतात. व्यसन लागतं तेव्हा मेंदूपेशी सर्किट्स तयार करतात. जोडण्या जेवढ्या बळकट तेवढ्या सहजपणे या सर्किट्समधून संदेशवहन होतं.

पुनरावृत्तीमुळे म्हणजेच रिवायरिंगमुळे आपण शिकू शकतो. नवीन आठवणी ठेवू शकतो. रिवायरिंगमुळे आपण चालणं शिकतो, सायकलिंग शिकतो, कोणतंही कौशल्य शिकतो. एका उदाहरणाने हे स्पष्ट होईल. समजा तुम्ही उंच गवतामधून चालत आहात. प्रथमप्रथम हे खूप जड जाईल. पण जर तुम्ही त्याच मार्गाने वारंवार गेलात तर ती पायवाट बनून जाईल. ही पायवाट म्हणजे आठवण किंवा कौशल्य - किंवा व्यसन. तुम्ही तोच मार्ग पुन्हा पुन्हा निवडता, कारण तो फार सोपा असतो. बधीर आनंद- प्रतिसाद आणि आठवण यामुळे माणसाला पॉर्न पुन्हा-पुन्हा पाहण्याची इच्छा होते.

तीव्र भावना तीव्र आठवणी निर्माण करतात. ज्या गोष्टीचा तीव्र भावनिक परिणाम होतो ती गोष्ट आठवणीत राहाते. उदाहरणार्थ मुलाचा जन्म, अपघात, मृत्यू वगैरे. डोपामाइन आठवणी निर्माण होण्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि जर खूप अ‍ॅडरिनॅलिन स्रवलं गेलं तर आठवणी अधिकच बळकट बनतात. म्हणजेच आता व्यसनी माणूस चालून पायवाट निर्माण करीत नाही आहे, तर गवतकापणीचं यंत्र त्याच्या हातात आहे. जर पॉर्न बघताना माणसाच्या थरार, भीती, धक्का, किळस, लाजशरम या भावना जागृत झाल्या तर पॉर्नची स्मृती मनात अधिकच ठसते.

व्यसन म्हणजे अत्यंत शक्तिशाली स्मरण, अधिक बधिर सुखप्रतिसाद. यात रिवॉर्ड सर्किट हे बधीर झालेलं असतं आणि माणूस डोपामाइन वाढविण्यासाठी तडफडत असतो.

व्यसन म्हणजे ''आरामस्थिती (रिलीफ) गाठण्यासाठी असलेला सर्वात कमी प्रतिकाराचा म्हणजेच सोपा मार्ग.'' पॉर्न हा आता व्यसनी माणसाचा सर्वात विश्वासार्ह स्रोत बनलेला असतो आणि लिम्बिक सिस्टिम एकसारखी सांगत असते, 'होय, होय, पॉर्न पाहा.'' हे तडफडीचं स्वरूप असतं. यामुळे व्यसनाला प्रेरणा मिळते.

तडफड होणं हे स्वाभाविक असतं. मेंदू तडफड निर्माण करतो आणि त्यामुळे आपण खातो, पितो, लैंगिक संबंध करतो. 'इशारा' (क्ल्यू किंवा हिंट) ही विचार, भावना, आठवण वास-चव-स्पर्श असतो जो तडफड सक्रिय करतो. तुमचा मेंदू 'इशारा'ची सांगड 'पारितोषिका'शी घालतो. स्वयंपाकघरातून चांगला वास आला (इशारा) की खावंसं वाटतं- जरी भूक नसली तरी. जर तुम्ही सिगरेट ओढणारे असाल तर जेवण होणं हा सिगरेट ओढण्यासाठी इशारा असतो. घंटा वाजल्यावर पाव्हलॉव्हच्या कुत्र्याची लाळ गळायला लागायची तसाच हा प्रकार आहे. बार बघितल्याबरोबर (इशारा) दारूड्याची पावलं तिकडे वळतात.

'इशारा' मिळाल्याबरोबर ती कृती करण्याची अनावर इच्छा असते. पण सेरिब्रल कॉर्टेक्स (विवेक मेंदू) कृतीच्या परिणामांची कल्पना देतो आणि कृती थांबवतो. 'आपल्याविरुद्ध बोलणार्‍याचं थोबाड फोडावं' अशी इच्छा होते. पण सेरिब्रल कॉर्टेक्स त्याचे परिणाम सांगते आणि ती कृती थांबवते. व्यसनांमध्ये परिणामांची सूचना देणारं नियंत्रण अशक्य होतं तर व्यसनाची पायवाट बळकट होते. व्यसनामध्ये विवेकी मेंदू अशक्त होतो तर लिम्बिक सिस्टिम बळकट होते. त्याचवेळी व्यसनामध्ये बधीरता आलेली असते. पूर्वीसारखा परिणाम मिळविण्यासाठी जास्त वेळ किंवा जास्त तीव्र पॉर्न पाहणं (अधिक डोपामाइन मिळवण्यासाठी) आवश्यक ठरतं. त्यामुळे नुसत्याच नग्नपणाकडून संभोगाकडे, त्यानंतर चित्रविचित्र संभोगाकडे, पशुसंभोगाकडे, बालसंभोगाकडे, अधिकाधिक
क्रूरतेकडे वाटचाल चालू होते. जितकं नावीन्य, जितका धक्कादायकपणा तेवढं अ‍ॅडरीनॅलिन जास्त स्रवतं. त्यामुळे डोपामाइन + अ‍ॅडरीनॅलिन मिळालं का? त्या सर्वाला, सर्वात मोठं बक्षीस (सर्वात जास्त किक) मिळते. पण त्यामुळे स्मरण आणखी बळकट होतं आणि मेंदू आणखी घट्टपणे रिवायर होतो.

मेंदू हा स्वत: परिवर्तनीय असतो. त्यामुळे तो लैंगिक बाबतीत नवीन रुची/पसंती प्राप्त करतो. ज्या कृती पहिल्यांदा अत्यंत ओंगळ वाटल्या होत्या, त्या कृती बघितल्याशिवाय राहवत नाही. जरी इंटरनेटमधील कृती बीभत्स वाटली, जरी सेरीब्रल कॉर्टेक्स असं सांगत असला; की असली गलिच्छ, फालतू गोष्ट तू का बघत आहेस?; तरी जर ती 'धक्कादायक', 'आश्चर्यकारक', 'निषिद्ध' असली तरी ती रिवॉर्ड सिस्टिमला आवडते आणि तो माणूस ती कृती पाहतो.

पॉर्नव्यसन जसजसे वाढत जाते तसतशी त्याची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात. पॉर्नव्यसनाची लक्षणं आहेत -

१. जोडीदाराबरोबर संभोग न करता येणं - पॉर्नव्यसनीला पॉर्न बघताना लिंग ताठरता येते, पण जोडीदाराबरोबर लिंग ताठरता न आल्यानं तो संभोग करू शकत नाही. याचबरोबर जोडीदाराबरोबर संभोग करण्याची इच्छासुद्धा मावळत जाते. ते 'काम' कंटाळवाणं, मिळमिळीत वाटतं.
२. पॉर्नव्यसनी वारंवार हस्तमैथुन करतो, पण त्यातील समाधान झपाट्याने कमी होतं.
३. आपण अधिकाधिक क्रूर, बीभत्स, किळसवाणं पॉर्न पाहत आहोत याबद्दल अतिशय वाईट वाटणं, लाज-शरम वाटणं, स्वत:चा राग येणं.
४. लैंगिक संबंधात नवीन रुची आत्मसात करणं. (परपीडन, स्वपीडन, समसंभोग, वगैरे)
५. पॉर्नचं व्यसन अधिक वाढलं तर लैंगिक ताठरता येणं थांबतं.
६. समाजात मिसळण्याची भीती, लाज वाटणं जास्तीत जास्त वाढत जाते.
७. सतत थकवा येणं, काहीही करावंसं न वाटणं.
८. अस्वस्थपणा, लक्ष एकाग्र करता न येणं.

पॉर्नपासून सुटण्याचा एक मार्ग म्हणजे मेंदूला विश्रांती देणं. अतिउत्तेजित होण्याची सवय लागलेला मेंदू परत पूर्वीसारखा करणं. यासाठी पॉर्न, हस्तमैथुन, ऑरगॅझम, लैंगिक फँटसी या गोष्टी मेंदू पूर्ववत होण्यासाठी टाळणं आवश्यक ठरतं. पॉर्न टाळून काही काळ झाला, की मेंदूमध्ये अधिकाधिक रिसेप्टर्स तयार होतात. तडफड (क्रेव्हिंग्ज) कमी कमी होते. अर्थातच व्यसनमुक्ती ही प्रक्रिया साधीसोपी आणि एकरेषीय नाही. त्यात खाचखळगे आणि चढउतार असतातच.

व्यसनमुक्त होऊ पाहणारी व्यक्ती जितकी मन नियंत्रणात ठेवते तितकी तिची नियंत्रणाची शक्ती (सेरीब्रल कॉर्टेक्सची शक्ती) वाढते. म्हणजे नियंत्रणाच्या पायवाटा बळकट होतात.

पॉर्नव्यसनातून सुटण्यासाठी पॉर्न, हस्तमैथुन, ऑरगॅझम आणि लैंगिक फँटसी या गोष्टींपासून काही काळ (जो प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा पण साधारणपणे ३ महिने असू शकतो) दूर राहणं आवश्यक असतं. पण हे सोपं मात्र अजिबात नसतं. अत्यंत तीव्र इच्छा, भयानक निद्रानाश, अपयशी ठरण्याची भीती, अशा सर्व गोष्टी त्यात येतात. म्हणूनच छंद, मित्रमैत्रिणी, वाचन, व्यायाम, योग, ध्यान या गोष्टीही आवश्यक आहेत.

इंटरनेट पॉर्ननं युरोप-अमेरिकेच्या संस्कृतीला प्रचंड मोठा धोका उत्पन्न केला आहे आणि आज तेच संकट आपल्यासमोर उभं आहे. जॉन मेयर हा अमेरिकेतील अत्यंत प्रसिद्ध पॉप आणि ब्ल्यू रॉक म्युझिशियन, गायक, कवी आणि म्युझिक प्रोड्युसर आहे. वय ३६-३७. त्याची एप्रिल २०१० मध्ये 'प्लेबॉय'मध्ये मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्यात तो म्हणतो. 'पॉर्नोग्राफी? मेंदूचा तो नवा मार्ग आहे. तुम्ही सकाळी झोपेतून उठता, थंबनेल पेज उघडता आणि त्यातून तुम्ही व्हिज्युअल्सच्या पँडोरा बॉक्समध्ये जाता. असे अनेक दिवस आहेत जेव्हा मी बिछान्यातून बाहेर पडण्याअगोदर ३०० योन्या (व्हजायना) बघितलेल्या असत.' लक्ष्यात घ्या. हे फक्त इंटरनेटवरच शक्य आहे. जॉन मेयरकडे एखादं चित्र असतं, पॉर्न मासिक असतं किंवा अगदी एखादी हाडामांसाची स्त्री असती, तर त्याने ३०० वेळा तीच योनी बघितली नसती. 'लैंगिक उत्तेजना सातत्याने देणारे नावीन्य' फक्त इंटरनेट देऊ शकतं.

पुढे जॉन मेयर म्हणतो, "इंटरनेट पॉर्नोग्राफीने आमच्या पिढीच्या लैंगिक कल्पना आरपार बदलून टाकल्या आहेत. तुम्ही विचार करता, की या मुलीवर (प्रतिमेवर) हस्तमैथुन करावं. पण नाही. अधिक हॉट प्रतिमा मिळवण्यासाठी तुम्ही पुढे जाता. तुम्ही सतत आणखी आणखी बघत राहता. यामुळे तुमच्या खऱ्या नातेसंबंधांवर कसा परिणाम होणार नाही? परिणाम होणारच." आणि परिणाम होतोच. जॉन मेयरने एक किस्सा सांगितला आहे. त्याला एक अत्यंत हॉट मुलगी मिळाली, दोघे रत झाले पण १०-१५-२०-२५ मिनिटं झाली. पण जॉन मेयरचं रेतस्खलन होईना. शेवटी 'फेक ऑरगॅझम' रेतस्खलनाची बतावणी करून तो बाहेर आला. तो म्हणतो, "आता किती तरी मुलगे अशीच ऑरगॅझमची बतावणी करतात" दुसरी एक गोष्ट तो नोंदवतो. तो म्हणतो, "मला नवीन मुलींशी मैत्री करायला आवडत नाही. त्यापेक्षा मी घरी जाईन, माझ्या कल्पनाचित्रात रमेन आणि हस्तमैथुन करेन. ते मला जास्त चांगलं वाटतं." म्हणजे वयाच्या ३२-३३व्या वर्षी जॉन मेयर प्रत्यक्ष हाडामांसाच्या मुलीशी संभोग करण्यापेक्षा हस्तमैथुन करणं पसंत करतो.

आता आपण पॉर्नधंद्याची दुसरी बाजू पाहूया. ती म्हणजे त्यात काम करणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष. त्याअगोदर थोडी आकडेवारी. २००७ ते २०१० या कालावधीत उपलब्ध आकडेवारीनुसार ३६ पॉर्नस्टार एचआयव्ही, आत्महत्या, खून आणि ड्रग्सने मेले. ६६ टक्के पॉर्न नटनट्यांना हर्पिस हा न बरा होणारा लैंगिक रोग असतो. २००४ पासून आतापर्यंत २३९६ क्लमीडिया आणि १३८९ गॉनरिया (परमा) केसेसची नोंद झालेली आहे. आतापर्यंत १०० पॉर्न नटनट्या एड्सने मेल्या आहेत. अर्थात ज्या नरकाचं स्वरूप ४२ लाख पॉर्नोग्राफिक वेबसाइट्स, ४२ कोटी पॉर्नोग्राफिक वेबपानं आणि ७ कोटी दररोजची सर्च इंजिन विनंत्या एवढं अक्राळविक्राळ आहे त्यामधील आकडेवारी तशीच भयानक असणार. पॉर्नधंद्यात काही काळ असणाऱ्या शेली लबेन या माजी पॉर्नस्टारने एक फाउंडेशन उभं केलं आहे, जे या धंद्यातून बाहेर पडणाऱ्यांना मदतीचा हात देतं. मुलांच्या आयुष्याच्या कहाण्या वाचताना अंगावर काटा येतो. या अनेक कहाण्यांचा साचा बराचसा एकसारखा आहे. तो असा - आईवडिलांचा घटस्फोट. मग ७-८ वर्षांपासून लैंगिक दुरुपयोग. वयाच्या १२व्या वर्षापासून दारू, ड्रग्ज आणि संभोग. मग अबॉर्शन, शाळेतून बाहेर पडणं. १५-१६ वर्षांपासून स्ट्रिपटीझ क्लब आणि वेश्याधंदा. मग १८-२० वर्षांत पॉर्नची जाहिरात वाचणं, पॉर्नच्या धंद्यात पडणं. पॉर्नचा पहिलाच अनुभव शरीर, मन, आत्मा, स्वप्रतिष्ठा यांचा चोळामोळा करणारा असतो. वारंवार त्याच पोझिशनमध्ये राहावं लागतं, सतत उलटीची भावना होत असते. अख्खं अंग ठणकत असतं. मूत्राशयाला इजा होतेय, मोठं आतडं बाहेर येतंय अशी सार्थ भीती वाटत असते. लघवी करणं, शौच करणं अत्यंत वेदनादायी असतं. एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून आपली किंमत शून्य झाली आहे अशी भावना होते. आत्महत्या करावीशी वाटते, पण त्याचवेळी शूटिंग करताना आपणाला हे सगळं आवडतं आहे, आपण ते एंजॉय करीत आहोत असा चेहरा ठेवावा लागतो. तसंच आपल्या ब्लॉगवरून, साइटवरून 'हे किती छान, आकर्षक, मौजमजेचं आहे. आपल्याला ते किती आवडतं' अशा तऱ्हेचं सतत प्रसिद्ध करावं लागतं. दारू, चरस, हेरॉइन, क्रॅक, एक्स्टसी अशा ड्रग्ज घेऊन तेच किळसवाणे प्रकार करतात - कारण एका शॉटला ३०० ते ५०० डॉलर्स मिळतात. अर्थात त्यांच्या जिवावर निर्माते लाखो डॉलर्स कमावतात ती गोष्ट वेगळी. आणखी एक भयानक भीती असते - ती म्हणजे लैंगिक रोगाची आणि त्यातही एड्सची. पण एड्स किंवा लैंगिक रोग या पॉर्नोजगात नाहीतच असं निर्माते भासवत असतात.

या पॉर्नोजगात म्हणजेच नरकात डोक्यावर अस्थिरतेची टांगती तलवार असते, लैंगिक रोगांची भीती असते, ते सतत लागत असतात, गर्भपात होत असतात, पुरुषांना नपुंसकतेचा प्रश्न भेडसावत असतो. आपण आज-उद्या हा नरक सोडला तरी हे व्हिडिओ वर्षांनुवर्षं राहणार याची भीती, चिंता असते. कोणी खरा मित्र नसतो, कुटुंब केव्हाच तुटलेलं असतं - या सर्वांवर एकच उपाय म्हणजे दारू आणि ड्रग्ज. ड्रग्ज आणि पॉर्नोजगाचं जवळचं नातं आहे. इथली सर्व माणसं व्यसनी असतात. ड्रग्ज आणि दारूचा उपयोग सदसद्विवेकबुद्धी बधीर करण्यासाठी होतोच. पण याच्यामागेही मोठं षडयंत्र आहे.

प्लेबॉयने अमेरिकेच्या मुख्य धारेत पॉर्नोग्राफी प्रतिष्ठित केली. प्लेबॉयने नग्न बायकांचे फोटो, अश्लील विनोद, लैंगिक कथा यांच्या जोडीला कलावंत, राजकारणी, क्रीडापटू यांच्या मुलाखती छापून प्लेबॉय प्रतिष्ठित केलं; इतकंच नव्हे तर अशा प्रकारचं जीवन जगणं हेच उच्च अभिरुचीचं आहे हे अधोरेखित केलं. प्लेबॉय मासिक डिसेंबर १९५३ मध्ये सुरू झालं. त्यानंतर हसलर (१९७४), पेंटहाउस (१९६९) ही मासिकं सुरू झाली. साधारणपणे तीन कोटी लोक यापैकी एक किंवा अधिक मासिकं वाचतात. या मासिकांनी सॉफ्टकोअर ते हार्डकोअर पॉर्नोग्राफीचा, तसंच चाइल्ड पॉर्नोग्राफीचा पाया अमेरिकन समाजात घातला. नोव्हेंबर १९७० पासून प्लेबॉयने ड्रग्जना बेकायदेशीर ठरवू नये असं धोरण आपल्या मासिकातून राबवलं. १९७० मध्ये मॅरिवाना कायदे रद्द करण्यासाठी NORML संस्थेला ५००० डॉलर्सचा निधी दला. त्यानंतर प्लेबॉयने आपलं ड्रग्जना पाठिंबा देण्याचं धोरण चालू ठेवलं आहे.

इंटरनेट पॉर्नोग्राफीचे दुष्परिणाम आपण आता विस्ताराने पाहूया.

कुटुंबावर होणारे परिणाम :
०. लग्न झालेल्या पॉर्नव्यसनी पुरुषांना आपल्या बायकोमध्ये कमीकमी समाधान वाटतं आणि त्यांची बायकोमधील भावनिक गुंतवणूक कमी होते. जेव्हा विवाहित स्त्रीला हे समजतं तेव्हा ती भयानक अस्वस्थ, असुरक्षित होते. तिला हा आपला कमीपणा वाटतो. शरम वाटते. घरामध्ये सातत्याने ताण, भांडणं सुरू होतात. नेटवर अक्षरशः हजारो विवाहित स्त्रियांची याबाबत पत्रं आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नवऱ्याला सोडून द्यावं की त्याला सुधारण्याचा प्रयत्न करावा हे त्यांना कळत नाही.
०. पॉर्नोग्राफीची वाट व्यभिचाराकडे आणि अंतिमतः घटस्फोटाकडे जाते. कौटुंबिक कलहाचं आणि घटस्फोटाचं ते अनेकदा प्रमुख कारण बनतं.
०. जेव्हा नवरा (किंवा बायको) पॉर्नव्यसनी बनतो तेव्हा त्याला बायकोशी संभोग करणं कंटाळवाणं आणि नकोसं वाटतं. पॉर्न जी 'किक' देते ती बायको देऊ शकत नाही. पॉर्नव्यसनी पुरुष बायकोला बऱ्याच वेळा पॉर्नस्टारप्रमाणे वागायला भाग पाडतो. हे वेदनादायी आणि अवमानकारक असतं. जरी बायको त्याच्याबरोबर चार पावलं पुढे चालत गेली तरी पॉर्नव्यसनीची मागणी वाढतच जाते आणि बायको त्याला साथ देऊ शकत नाही. शिवाय जरी तो बायकोशी संभोग करत असला तरी बायको हे साधन असतं, पॉर्नव्यसनीच्या मनात प्रतिमा पॉर्नस्टारचीच असते.
०. बायको (आणि नवरासुद्धा) जोडीदाराचं पॉर्न पाहणं हा व्यभिचार समजतात.
०. पॉर्नोग्राफी ही कुटुंबाची मूल्यव्यवस्था उद्ध्वस्त करणारी आहे. कुटुंबाची कल्पना प्रदीर्घ काळासाठी प्रेम, विश्वास, एकनिष्ठता, आस्था, एकमेकांची काळजी घेणं यावर अवलंबून असते. नवराबायकोचं शारीरिक प्रेम हे भावनिक प्रेमातून निर्माण झालेलं असतं. उलट पॉर्नोग्राफीमध्ये शारीरिक प्रेम हे नुकत्याच भेटलेल्या आणि ज्यांचे आपापसात कोणतेही भावनिक बंध नाहीत आणि पुन्हा भेटण्याची जराही शक्यता नाही अशा स्त्रीपुरुषांमध्ये दाखवलेलं असतं. त्यात कोणतंही प्रेम, आस्था, हळुवारपणा, दीर्घकालीनपणा यांचा लवलेशही नसतो. कुटुंबामध्ये आईवडील, बहीणभाऊ, काका-मामा, आजीआजोबा अशी नाती असतात. या नात्यांमधून व्यक्तीचं आयुष्य भरीव आणि अर्थपूर्ण होतं. पॉर्नोग्राफीमध्ये ही नाती विकृत केलेली असतात (इन्सेस्ट पॉर्नोग्राफी). पॉर्नोमध्ये नर आणि मादी असं एकच नातं असतं. व्यक्तीची सर्व संवेदनशीलता नष्ट करून त्याला अमानवी बनवणं हे पॉर्नोचं उद्दिष्ट आहे.

पॉर्नोग्राफीचा पॉर्नोव्यसनींवर होणारा परिणाम

०. पॉर्नोग्राफीचं व्यसन लागतं. इतर व्यसनं माणूस शारीरिक मर्यादेमुळे काही काळच करू शकतो; पण पॉर्न पाहणारा माणूस दिवसातून कित्येक तास आणि अशी कित्येक वर्षं हे व्यसन करू शकतो.
०. तेच तेच प्रकारचं पॉर्न पाहून माणूस त्या पॉर्नला असंवेदनशील बनतो आणि त्याला अधिक तीव्र म्हणजेच अधिक विकृत, हिंसक पॉर्न लागतं. ग्राहकांचा संतोष हाच कुठल्याही धंदेवाल्यांचा फायदा असतो. पॉर्ननिर्मात्यांनी अधिकाधिक भयानक पॉर्न बनवणं सुरू केलेलं आहे. पण आता त्यांनाही विकृतीची व्याप्ती वाढवणं कठीण झालं आहे. याबद्दल बोलताना एका पॉर्ननिर्मात्याने असे उद्गार काढले, 'शेवटी बाईला तरी किती भोकं असणार?' पॉर्नने किती हीन पातळी गाठली आहे हे या उद्गारांवरून स्पष्ट व्हावं.
०. पॉर्न दीर्घकाळ पाहणाऱ्या पुरुषांत स्त्रियांकडे एक 'वस्तू' म्हणून पाहण्याची शक्यता जास्त असते.
०. पॉर्नोग्राफी स्वैराचाराला उत्तेजन देते. त्यामुळे अकाली गर्भधारणा, गर्भपात, एड्ससारखे लैंगिक रोग पसरतात.
०. दीर्घकाळ पाहणारी व्यक्ती आपल्या मूळ लैंगिक भूमिकेव्यतिरिक्त नव्या रुची आत्मसात करते - उदा. समसंभोग, बलात्कार, गटसंभोग, परपीडन-स्वपीडन, बंधनं वगैरे.
०. चाइल्ड-सेक्स गुन्हेगार दीर्घकाळ पॉर्न आणि विशेषतः चाइल्ड पॉर्न व्यसनी असतात. पॉर्नोग्राफीमधून ते नवेनवे मार्ग शिकतात.

पॉर्नोग्राफीचे इतर दुष्परिणाम

पॉर्नोग्राफी पाहणाऱ्या व्यक्तीला एक चमत्कारिक सुख मिळतं. पण हे सुख एकनिष्ठ जोडीदाराशी केलेल्या संभोगाप्रमाणे समाधान देणारं आणि जोडीदाराबरोबरचा बंध घट्ट करणारं नसतं. पॉर्नोसुखामध्ये शरम, लज्जा, भीती, स्वप्रतिमा मलीन होणं, पापाची भावना या गोष्टी असतात. पॉर्नोग्राफी पॉर्नोव्यसनीला समाजापासून तोडते. समाजात मिसळणं त्याला अधिकाधिक कठीण जातं. आपण वाईट, क्षुद्र, घाणेरडे बनत चाललो आहोत अशी पॉर्नव्यसनीची स्वप्रतिमा बनते. पॉर्नव्यसन आणि ड्रग्ज यांचं अगदी जवळचं नातं आहे आणि ड्रग्ज व गुन्हेगारी यांचंही जवळचं नातं आहे. त्यामुळे जिथे पॉर्नव्यवसाय चालतो तिथे सर्व प्रकारची गुन्हेगारी चालूच असते.

इतकी वर्षं दुष्परिणाम घडवून आणणारा पॉर्नधंदा सरकार बंद का करत नाही असा प्रश्न साहजिकच मनात येईल. एकतर पॉर्नधंदा हा आंतरराष्ट्रीय आहे. अमेरिका व युरोपमध्ये ९०-९५पेक्षा जास्त पॉर्नव्हिडिओ बनतात आणि तिथे व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पना अचाट आहेत. त्यामुळे पॉर्नधंद्याला तिथे प्रतिष्ठासुद्धा आहे. त्याला तिकडे अॅडल्ट इंडस्ट्री म्हणतात. पॉर्नस्टार्सच्या साइट्स असतात. पॉर्नव्हिडिओंना टॉकिंग(?) असतं. आणि तिथे बनलेले पॉर्नव्हिडिओ आपल्याला भारतात सहजपणे इंटरनेटवर उपलब्ध असतात. अर्थात भारतातसुद्धा पॉर्न फैलावाची पूर्वलक्षणं दिसू लागलेली आहेत. छातीवर सिलिकॉनचे फुगे लावणारी पॉर्नस्टार लिऑन आपल्याकडे चित्रपटाची नायिका झालीय आणि तिने मुलाखतीत 'भारतीयांना मी सेक्स मोकळं करून दिलंय' अशी प्रौढी मिरवलीय. 'अमल्या' राहुल महाजन प्रतिष्ठाप्राप्त आहे. रेव्ह पार्टीज आपल्याकडे जोरात चालू असतात. प्रत्येक चित्रपटात एक आयटम सॉंग असतंच. त्यात सर्व प्रकारचं लैंगिक सूचन असतं. ही आयटेम सॉंग्ज/डान्सेस लहान मुलामुलींच्या मनावर काहीतरी परिणाम घडवत असतीलच ना? अशा या लैंगिक स्वैराचारातून पॉर्नोग्राफीचा जन्म होतो.

मग याला उपाय काय?

पालक, शिक्षक, शाळा, लेखक, कलावंत, समाजशास्त्रज्ञ अशा प्रतिष्ठित मंडळींनी याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. चर्च, देवळं, मशिदी यांनीही त्याला हातभार लावला पाहिजे. भारतात पीसी, लॅपटॉप, मोबाइल यांची संख्या सातत्याने वाढते आहे. पॉर्न आता अत्यंत सहजपणे उपलब्ध आहे आणि हा पॉर्नो-नरक सगळी संस्कृती, सगळी मानवी मूल्यं खाऊन टाकणारा आहे. तेव्हा सावधान! युरोप-अमेरिकेत चर्च याबाबतीत फार चांगली कामगिरी करत आहे.

संदर्भ :
१. युवर ब्रेन ऑन पॉर्न
२. इफेक्ट्स ऑफ पॉर्नोग्राफी ऑन अॅडल्ट अॅंड चिल्ड्रेन - मेंटल हेल्थ लायब्ररी इन्फो
३. चाइल्ड पॉर्नोग्राफी - अॅन इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्ह - क्राइम रिसर्च ऑर्ग
४. थीम, पेपर ऑन चाइल्ड पॉर्नोग्राफी

पॉर्नबद्दलच्या गैरसमजुती

०. पॉर्न पाहणं एक गंमत, एक टाइमपास आहे, पॉर्न निरुपद्रवी आहे.
साफ चूक. पॉर्न ही एक निरागस गंमत, टाइमपास नाही. मित्रमंडळीत गप्पा, हास्यविनोद, खेळणं, फिरणं, निसर्गात जाणं ही गंमत आहे. कोणत्याही गमतीने मन उत्साहित, आनंदी, समाधानी झालं पाहिजे. जीवनाबद्दल सकारात्मकता वाटली पाहिजे. पॉर्न हे जीवन उद्ध्वस्त करणारं व्यसन आहे. पॉर्न हा अब्जावधी डॉलर्सचा धंदा आहे. पॉर्न निर्मात्यांना पाहणाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तरी त्याची पर्वा नसते. त्यांना फक्त पैसे कमवायचे असतात.
०. पॉर्न निर्मात्यांना पॉर्न निर्मितीचं, त्यात काम करणाऱ्यांना काम करण्याचं आणि पाहणाऱ्यांना पाहण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे.
ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली केली जाणारी भयानक चूक आहे. सर्व व्यसनांच्या बाबतीत हाच बचाव दिला जातो. पॉर्न हे अंमली पदार्थांपेक्षाही भयंकर आहे आणि त्या अंमली पदार्थांच्या निर्मितीइतकाच पैसा आहे. म्हणून पॉर्ननिर्माते पॉर्ननरक निर्माण करत असतात. पण पॉर्नमध्ये काम केल्यानंतर ते शारीरिक, भावनिक, मानसिक आणि आत्मिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त होतात आणि जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा रोगी, सर्व दृष्टीने खचलेले, व्यसनांनी पोखरलेले आणि कंगाल असे बाहेर पडतात. पॉर्न पाहणारे काही काळानंतर स्वतंत्र राहत नाहीत. ते पॉर्नचे गुलाम बनतात. काही काळानंतर त्यांचे रूपांतर झोंबीजमध्ये (जीवनमृतांमध्ये) होतं.
०. स्त्रियांना आक्रमकपणा आवडतो. जेव्हा त्या नाही म्हणतात तेव्हा त्यांना ते हवं असतं.
पॉर्नने रुजवलेली ही एक भयानक 'मिथ' आहे. विवाहांतर्गत आणि विवाहबाह्य (पण जोडीदाराकडून होणारे) बलात्कार, विनयभंग आणि एकूणच धसमुसळेपणा यांच्यामागे ही 'मिथ' आहे. संभोग म्हणजे मलखांब नव्हे. प्रेम, हळुवारपणा, शृंगार, प्रणय, कलात्मकता, रसिकता या गोष्टी स्त्रीपुरुष शारीरिक संबंधात महत्त्वाच्या असतात; चित्रविचित्र प्रकार करणं नव्हे.
०. पॉर्न पाहणं मी मनात आणेन तेव्हा अगदी सहजपणे सोडू शकेन.
व्यसनी माणसाला व्यसनाच्या प्रारंभिक अवस्थेत नेमकं असंच वाटत असतं. पण लक्ष्यात ठेवा पॉर्नचं व्यसन अंमली पदार्थापेक्षाही घातक आहे. ते दर क्षणी नवी बाई, नवा संभोगप्रकार समोर ठेवतं. ते महिनोन्-महिने कोणाला कळत नाही. तेव्हा जर तुम्हांला खरोखरच असं वाटतं असेल तर आत्ता, या क्षणी पॉर्न पाहणं सोडा आणि किमान तीन महिने तरी पॉर्न, हस्तमैथुन यापासून दूर राहा. जिंकलात तर कायमचे दूर व्हा (आणि नव्या, निरोगी, नैसर्गिक जीवनाचा आनंद घ्या) आणि हरलात, तरी काही हरकत नाही, आता आपण या व्यसनात हळूहळू अडकत चाललो आहोत हे तुमच्या लक्ष्यात येईल. मग पुन्हा तीन महिने दूर राहण्याचा निश्चय करा.
०. पॉर्न पूर्वीपासून आपल्या संस्कृतीमध्ये आहे. मग आताच त्याचा एवढा बाऊ का?
जर पूर्वीचं पॉर्न (खजुराहोची शिल्पं, रसक्रीडांची वर्णनं, लावण्या, त्यानंतरचे पत्ते, पुस्तकं यांना पॉर्न म्हणायचं तर) आणि आजचं पॉर्न यात अक्षरशः जमीनअस्मानाचा फरक आहे. पूर्वीचं पॉर्न एक धरलं तर आजचं पॉर्न एक अब्ज आहे. आजचं पॉर्न अगदी सहज उपलब्ध आहे, ते फुकट आहे, ते सातत्याने नवीन-नवीन आणि अधिकाधिक दाखवलं जातं, ते कधीच संपत नाही. या त्याच्या वैशिष्ट्यामुळेच ते पूर्वीच्या पॉर्नपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. अशी तुलना अज्ञानातून किंवा ढोंगीपणातून किंवा लबाडीने केलेली असते.
०. संभोगाचा आनंद मिळवण्यासाठी अत्यंत प्रमाणबद्ध शरीर - स्त्री असल्यास अत्यंत उभार छाती, पुरुष असल्यास मोठं लिंग आवश्यक असतं.
ही एक भयानक गैरसमजूत पॉर्न रुजवते. यामुळे अमेरिकेत लाखो स्त्रिया आपल्या छात्या कृत्रिमरीत्या फुगवतात. ज्या जोडप्यामध्ये परस्परांविषयी प्रेम, आदर, जिव्हाळा, मैत्री असते त्यांचं लैंगिक आयुष्यही आनंदाचं आणि थरारकही असतं. अगदी ते जोडपं रूपाने, शरीराने अगदी साधारण असले तरीही.
०. गुदमैथुन, मुखमैथुन, त्रिकूट (किंवा याहूनही पुढचे प्रकार) लैंगिक क्रियांमधील सुख आणि थरार वाढवण्यासाठी आवश्यक आहेत.
शेकडा नव्याण्णव पूर्णांक नव्व्याण्णव टक्के बायकांना असले प्रकार आवडत नाहीत. बहुसंख्य पुरुषांनाही असले प्रकार आवडत नाहीत. मात्र ज्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, विश्वास आहे, दीर्घकालीन निष्ठा आहे त्यांनी परस्परसंमतीने शयनगृहात काहीही करावं. पण कोणीच कोणावर जबरदस्ती करू नये.
०. पॉर्नोग्राफीमधून लैंगिक शिक्षण मिळतं.
याच्याएवढं हास्यास्पद विधान नसेल. पॉर्नोग्राफीतून शिक्षण मिळतं असं म्हणणं म्हणजे खरं तर कृष्णाने पुतनामावशीचं दूध गोकुळातल्या सर्व बाळगोपाळांना दिलं पाहिजे होतं असं म्हणण्यासारखं आहे. मुलांना योग्य प्रकारे लैंगिक शिक्षण देणं आवश्यक आहे. पण पॉर्नोग्राफीमधून मुलं नाना प्रकारच्या विकृतीच फक्त शिकतात. याला शिक्षण म्हणायचं का?
०. पॉर्न फॅंटसी आहे हे मान्य. पॉर्न दीर्घकाळ बघितलं तर अपायकारक आहे हेही मान्य. पण आमच्या डोक्यात सेक्सचा जो ज्वालामुखी रटरटत असतो त्याचं काय? त्याला पॉर्नमधून वाट काढून दिली तर त्यात चूक काय? निदान लग्नापर्यंत तरी?
तरुणांच्या मनात लैंगिक विचार येत असतात ही खरीच गोष्ट आहे. शिवाय आजचं वातावरण हे लिंगाळलेलं वातावरण आहे. त्यामुळे कधीतरी केलेलं हस्तमैथुन चूक नाही. (पूर्वीच्या काळी, म्हणजे वातावरणात लैंगिकता जवळजवळ नव्हतीच तेव्हा माणूस क्वचितच हस्तमैथुन करत होता.) मात्र त्यासाठी पॉर्न बघणं म्हणजे आगीत पेट्रोल ओतून तिचा वणवा करणं होय. लक्ष्यात ठेवा, माणूस जेवढा उपभोग घेतो तेवढी त्याची उपभोगाची लालसा वाढत जाते. उपभोग कमी करणं हा उपभोगाची इच्छा कमी करण्याचा सर्वात यशस्वी मार्ग आहे.

पॉर्न आपल्याकडे कसं झिरपत चाललं आहे, त्याची ही सत्य घटना. केईएमच्या उपअधिष्ठाता डॉ. पाटकर यांनी ही केस सांगितली. पोरगा नववीतला. चाळीमध्ये राहणारा. बोर्डिंगमध्ये शिकणारा. सुट्टीत घरी आला. त्याचा आतेभाऊ अकरावीतला. जवळच राहणारा. त्याला त्याच्या आईबाबांनी लॅपटॉप दिलेला. हे भाऊ-भाऊ जवळचे मित्रसुद्धा. तर तो आतेभाऊ याला पॉर्नची गंमत दाखवू लागला. रात्रीचे ते लॅपटॉप घेऊन बसायचे. घरातल्यांना काहीच माहीत नव्हतं. या मुलाचं डोकं भरकटलं. त्याने चाळीतल्या एका लहान पोरीला अश्लील हावभाव करून दाखवले. आईवडील घाबरले आणि डॉक्टरांकडे आले. आता तो पोरगा सुधारलाय. लॅपटॉपमुळे चाळीतही एकांत मिळतो. अशा केसेस आता येऊ लागल्या आहेत.

आपल्या किंवा आपल्या जोडीदाराच्या व्यसनामुळे आयुष्याचं कसं मातेरं झालंय याबद्दल सांगणारी अक्षरशः हजारो पत्रं नेटवर उपलब्ध आहेत. ही सर्व पत्रं गेल्या आठदहा वर्षांतली आहेत ही पत्रं वाचताना पॉर्नव्यसनाच्या अक्राळविक्राळ रूपाने हादरून जायला होतं. त्यातील काही पत्रं पाहा.

०. मी २२ वर्षांचा पुरुष आहे. १५ व्या वर्षी मी प्रथम पॉर्न पाहिलं तेव्हा ते मला तेच-तेच दाखवणारं, उबग येणारं आणि एकूण कंटाळवाणं वाटलं. पण नंतर एक गंमत म्हणून मी हळूहळू पॉर्न पाहू लागलो. माझे सर्व मित्र पॉर्न पाहत होतेच. त्यातून मी या व्यसनात अडकलो. आता मी दिवसभर पॉर्नचा आणि पॉर्न कसं पाहता येईल याचाच विचार करत असतो. अनेक वेळा पॉर्न सोडण्याचा निश्चय करूनही मला पॉर्न सोडता आलेलं नाही.
०. मी १८ वर्षांचा मुलगा आहे. दहाव्या वर्षापासून मी पॉर्न पाहू लागलो. आमच्या घरातलं वातावरण धार्मिक आहे आणि मी सगळ्यांचा लाडका आहे. मला पॉर्न पाहताना भयानक शरम वाटायची. पण मी घरात कोणालाच काही सांगू शकलो नाही. पण आता पॉर्न पाहून हस्तमैथुन करायची मला एवढी सवय झालीये, की अनेक वेळा संधी मिळूनही मी माझ्या गर्लफ्रेंडशी संभोग करू शकलो नाही. खऱ्या संभोगासाठी मी कायमचा कुचकामी ठरलोय अशी मला भीती वाटते.
०. मी २५ वर्षांची तरुणी आहे. गेली दहा वर्षं मी पॉर्नमध्ये सापडलेय. आता मला अतिहिंसक, तीव्र पॉर्न पाहिल्याशिवाय चैनच पडत नाही. मी दिवसेंदिवस अधिकाधिक या गाळात जात चाललेय. मी पॉर्नच्या व्यसनात किती बुडालेय याची कल्पना आहे? काल शनिवार. मी सकाळी ८ला उठले. पॉर्न सुरू केलं ते दुपारी १२ वाजेपर्यंत. नंतर जेवण वगैरे केलं आणि ४ला पुन्हा पॉर्न सुरू केलं ते रात्री १ वाजेपर्यंत. म्हणजे १३ तास. आज रविवारी सकाळी ९ला उठले, पॉर्न चालू केलं ते दुपारी १ वाजेपर्यंत. नंतर लवकर जेवून घेतलं आणि पुन्हा २ वाजल्यापासून आतापर्यंत म्हणजे रात्री १२ वाजेपर्यंत पॉर्न पाहत बसले. म्हणजे १४ तास. देवा... हे मी काय करतेय? मी माझ्या आयुष्याचा पार सत्यानाश करतेय. मी एक तरुण, सुंदर, स्वतंत्र, कर्तबगार मुलगी आहे. माझं अपार्टमेंट आहे, गाडी आहे. सर्वजण माझा हेवा करतात. पण मी डबल लाइफ जगतेय. आतून मी पूर्णपणे रिती आहे. मी आत्महत्या तर करणार नाही?
०. मी १८ वर्षांचा तरुण आहे. तीन वर्षांपासून पॉर्न पाहतोय. जेव्हा पहिल्यांदा पॉर्न बघितलं तेव्हा मला जग जिंकल्याचा आनंद झाला. वाटलं की आता साला पोरींची कटकट गेली. ते गुलूगुलू बोलणं नको की गूळ काढत बसणं नको. आणि त्या केव्हा देतील याची वाट पाहत बसायचं त्यापेक्षा पॉर्न बरं. चिकन्या-चिकन्या पोरी बघायच्या आणि गाडी मारायची. पण आज मला समजतंय, की हे किती भयानक आहे. मी आता फारसा कुठे बाहेर जात नाही, कोणाशी बोलत नाही, घरात बसून फक्त पॉर्न बघत राहतो. कोणाच्याही डोळ्याला डोळे भिडवायला मला भीती वाटते. अतिजागरणामुळे आणि डोक्यात पॉर्न भिरभिरत असल्यामुळे मी सतत अस्वस्थ, चिडचिडलेला असतो. मला सुसंगत विचार करता येत नाही. मला पूर्ण वाक्यसुद्धा बोलता येत नाही. आणि आता मला एक्स्ट्रीम बीडीएसएम पॉर्न पाहिल्याशिवाय गाडी मारता येत नाही. मला या व्यसनातून बाहेर पडायचंय, पण कसा पडू?
०. मी २० वर्षांची तरुणी आहे. पॉर्नने माझ्या आयुष्याची राखरांगोळी केलीय. माझा बाप पॉर्नव्यसनी होता, म्हणून त्याला कामावरून काढून टाकलं. माझे दोन्ही भाऊ पॉर्नव्यसनी आहेत. मी घर सोडलं आणि एका तरुणाला गाठून त्याच्याबरोबर राहायला लागले तर तोही पॉर्नव्यसनी निघाला. पॉर्न बनवणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत आणि सगळं पॉर्न जाळून टाकलं पाहिजे.
०. मी २१ वर्षांची तरुणी आहे आणि गेली तीन वर्षं २२ वर्षांच्या तरुणाबरोबर राहतेय. आम्ही एकत्र राहणं सुरू करण्यापूर्वी मी त्याला विचारलं होतं, की तू पॉर्न पाहतोस का?, तर त्याने नाही सांगितलं होतं. पण सहा महिन्यांपूर्वी तो पॉर्नव्यसनी आहे, हे माझ्या लक्ष्यात आलं. गेले कित्येक महिने तो माझ्याबरोबर झोपत नाही. रात्ररात्र पॉर्न पाहत राहतो. मला अपमानित वाटतं. माझं त्याच्यावर खूप खूप प्रेम आहे. मी त्याला सुधारायचा प्रयत्न करू का सोडू?

***

पूर्वप्रकाशन : मुक्त शब्द, जानेवारी २०१३
लेखकाचा ईपत्ता : ajgaonkar.gopal@gmail.com

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

त्यात कोणतंही प्रेम, आस्था, हळुवारपणा, दीर्घकालीनपणा यांचा लवलेशही नसतो. कुटुंबामध्ये आईवडील, बहीणभाऊ, काका-मामा, आजीआजोबा अशी नाती असतात. या नात्यांमधून व्यक्तीचं आयुष्य भरीव आणि अर्थपूर्ण होतं. पॉर्नोग्राफीमध्ये ही नाती विकृत केलेली असतात (इन्सेस्ट पॉर्नोग्राफी). पॉर्नोमध्ये नर आणि मादी असं एकच नातं असतं. व्यक्तीची सर्व संवेदनशीलता नष्ट करून त्याला अमानवी बनवणं हे पॉर्नोचं उद्दिष्ट आहे.

+१००००
हे अतोनात पटले.
____
पण म्हणुनच पॉर्न एका विशिष्ठ मूडमधे आणि त्या मूडमध्येच पहायचं असतं.
_____
इतकं भयावह व्यसन असेलसं वाटत नाही. व्यसन लागतं वगैरे ऐकलेले आहे. अनुभवलेले नाही. शिवाय अति सर्वत्र वर्ज्यते.
____
खरं तर ते "अनुभवलेलं नाही" वगैरे स्वगत उगाचच जस्टिफिकेशन. कारण धागा इतका सिव्हिअरली जजमेंटल आहे की पट्टकन तो डिसकार्ड करताच येत नाहीये न जाणो कुणी आपल्यालाही त्याच स्केलवर जज करायचं Sad
____
पण सत्य सांगायचं तर मी १५ मिनीटांपेक्षा जास्त पॉर्न बघू शकत नाही कारण .... कारण तेवढाच वेळ स्टिम्युलेशनकरता इनफ होतो. रोज पाहीलच पाहीजे अशीही निकड भासत नाही. व्यक्तीपरत्वे प्रमाण कमी-जास्त असू शकते. पण व्यसन बिसन लागतं यावर माझा तरी विश्वास नाही.
___
धाग्यातील वर्णन भयावह वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पैसे कमवण्याच्या व्यसनामागेही डोपॅमाईन आहे. पण त्या व्यसनाला कोणी भयानक म्हणत नाही. लोक आपल्या आयुष्यातली ३५-४० वर्षे त्या व्यसनात घालवतात. काही लोक मरेपर्यंतचा वेळ त्यात घालवतात. काही लोक तर त्यासाठी भयंकर रुथलेस होऊन लोकांचं शोषण करतात. त्याला कोणी भयानक म्हणत नाही.
पॉर्न पाहणारे आठवड्यातून ३-४ वेळा अर्धा-एक तास बघत असतील फार तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पैसे कमवण्याच्या व्यसनामागेही डोपॅमाईन आहे. पण त्या
व्यसनाला कोणी भयानक म्हणत नाही.

कारण ते व्यसन सुटले तर भिकेला लागायची वेळ येते किंव्हा मान तरी नक्कीच खाली जाते कारण पैसा तुमची सामाजिक पत ठरवतो. तुम्ही आयुष्यात काय काय मिळ्वु शकता याची व्याख्या ठरवतो तसे तुम्ही पोर्न किती तास बघु शकता ही गोष्ट तुमची सामाजिक पत उन्चावु शकत नाही.

पैसा असेल तर प्रत्येक पोर्न तुम्ही जगु शकता पण पोर्न आहे म्हणून प्रत्येक व्यसनी पैसा कमावू शकत नाही.

खरे तर आपला मुद्दा प्रतिवाद करायच्याही योग्यतेचा नाही परंतु सुज्ञ लोकांप्रमाने बाळबोध वाचकही इथे येत असावेत आणि ते आपल्या विचारामुळे मिसगाइड होउ नयेत म्हणून हां प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

पूर्ण सहमत!
लग्न-बिग्न झालेले बाबा-बुवा लोक दुसर्‍यांना ब्रह्मचर्याचा उपदेश देत असतातच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ROFL मस्त!
इथे व्यसन करु नका असं कोण म्हणतंय ते तरी बघा. माणसाच्या अस्तित्वाच्या मोठ्या भागात पैशाचे अस्तित्व नव्हते आणि आता त्याशिवाय जगणे मुश्किल अशक्य वाटते म्हणजे ते व्यसन किती मुरले आहे इतकेच फक्त मान्य करा. कोणतेही व्यसन करु नये असे माझे म्हणणे कधीच नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणसाच्या अस्तित्वाच्या मोठ्या भागात पैशाचे अस्तित्व नव्हते आणि आता त्याशिवाय जगणे मुश्किल अशक्य वाटते म्हणजे ते व्यसन किती मुरले आहे इतकेच फक्त मान्य करा.

आं? पैसा हे संपत्तीचे प्रतीक आहे फक्त. संपत्ती मिळवणे हे प्रत्येक युगात महत्त्वाचेच होते. संपत्तीची व्याख्या फारतर चेंज होत असेल थोडीथोडी, पण बाकी हिशेब एकूण एकच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हेहेहे.. तशा हिशोबाने तर मग सजीव स्वार्थातून एकमेकांना मदत करुन स्वतःचा फायदा करुन घेतात तोही बिझिनेस झाला. संपूर्ण जगणं हाच एक बिझिनेस झाला. कोणत्याही युगात संपत्तीला महत्त्व असले तरी व्यसन फक्त गेल्या दहाहजार वर्षांतच लागले.

मूळ मुद्दा असा आहे की, पोर्नोग्राफी तयार करणारे पैशासाठी ती तयार करतात. त्यांना चाईल्ड, रेप, बीडीएसएम वगैरे करायचं स्वातंत्र्य आहे कारण अमाप पैसा कमवणे हा नुसता लिजिटिमेट उद्योग नाही तर प्रतिष्ठित आणि पूजनीय असा उद्योग आहे. नुकत्याच दुसर्‍या लेखात वाचल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत सेक्स आणणे ह्यावर कोणाचाच आक्षेप नाही. पण पैसा कमवण्याची सोडून इतर अर्जेसवर माणसाने नियंत्रण आणायला पाहिजे असा आग्रह. मग मेंदूवर कसा परिणाम होतो इथपासून तर नातेसंबंधांमध्ये कशी वाट लागते त्याच्या चर्चा. पॉर्न झालं, सिगारेटी झालं, ड्रग्ज झालं, सगळीकडे उत्पादन चालू पण उपभोक्त्यांना आवाहन की व्यसन लागू देऊ नका. स्मार्ट फोन्सच्या उत्पादकाला देव करायचं आणि लोकांना म्हणायचं की त्याच्या आहारी जाऊ नका. म्हणजे फक्त प्रजानिर्मितीसाठीच संभोग करा असं सांगणारे मुल्ला-मौलवी आणि ह्यात काही फरक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर शेतकीपूर्व स्थिती पुन्हा आणायची असेल तर तुमचा मुद्दा मान्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शेतीपूर्व समाजात पझेशन अशी संकल्पना नव्हती हे कितपत खरय? हत्यारं, पाळीव प्राणी, शिकार, आवडती स्त्री ( किंवा पुरूष, उगाच वाद नको) अशा गोष्टींबाबत 'हे माझं आहे' ही भावना नसायची?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अर्थात असायची. सवालच नाही. पण पर्यावरणात लार्जस्केल ढवळाढवळ शेतीमुळे सुरू झाली असे अर्ग्युमेंट आहे त्याला उद्देशून म्हटलो, इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अंहं! ते म्हणतायत पझेशनची भावना किंवा पझेशनला महत्व शेतीपासून सुरू झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शेतीपूर्व काळात ड्युरेबल पझेशन इ. प्रकार एकूण कमीच होता, सबब पझेशनची भावना असली तरी ती ओसाडवाडीच्या राज्याप्रमाणेच होती असे म्हटले तरी चालेल. तो सगळा प्रकार शेतीमुळे बदलला, टँजिबल पझेशन फॉर द फर्स्ट टाईम इन द फॉर्म ऑफ लँड इट्स प्रोड्यूस हे लक्षात आले, इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक्झॅक्टली. आत्ताच्या स्थितीत हे इनेव्हिटेबल आहे आणि आणखीही पुढे अशी अनेक "व्यसने" येतील उदा. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी वगैरे. पॉर्न इज गोईंग टू गेट वे टू "भयानक"!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोल मॅक्स.

शेतीपूर्व काळातही माणसाने अनेक किडे केलेत याची कल्पना आहे ना? उदा. वूली मॅमथचे शिरकाण. अन्यही अनेक उदा. सांगता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

केलेत ना. पण "वूली मॅमथचे शिरकाण" हे एक भयानक व्यसन मानले असेल का ही शंकाच आहे.
आत्ताच्या लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांना एक गोष्ट भारी वाटते आणि त्याच्यासारखीच दुसरी गोष्ट भयानक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यसन माना किंवा नका मानू. लोक करायचे ते करणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक्झॅक्टली. वरती व्यसन आणि भयानक हे शब्द म्हणूनच सारकॅस्टिकली कोट्समध्ये लिहीले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याच्या परिणामाच्या विवेचनात आहे श्वास घेणे हे ही व्यसनच अन सोबत धुर घेणेही व्यसनच पण त्याचे परिणाम वेगळे. बाकी हसणे थानबिवता येत नसल्याने सविस्तर प्रतिसाद नंतर तोपर्यंत ROFL.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

लेख खूपच सविस्तर लिहिला आहे. अभिनंदन! इतक्या नाजूक विषयावर बरीच माहिती दिली आहे.

माझा अनुभव-

माझ्या शाळेमध्ये (बोर्डींग स्कूल- वयोगट १८वर्षापर्यंत) दर आठ-पंधरा दिवसांनी मुलांचे लॅपटॉप तपासले जातात व काही आक्षेपार्ह सापडल्यास थोड्या काळासाठी जप्त होतात. मग त्या काळात मुले लॅपटॉपअभावी बाकीचा अभ्यास पूर्ण करु शकत नाहीत. कित्येकदा दहावीला चांगल्या गुणांनी पास झालेली, अगदी निरागस चेहर्याची मुले सुद्धा ह्यात अडकली की माझे आईचे मन गलबलून येते. मग त्यांना सबमिशन डेड-लाईन वाढवून द्यावी की मार्क कापावे ह्या यक्ष-प्रश्नात मी गुंतत जाते. माझ्यासारख्या शिक्षिकेला त्यांना कसे मार्गदर्शन करावे ते समजत नाही. दरवर्षी ह्यात आणखी लहान मुले अडकत आहेत. नेट सिक्युरीटी भेदून ही मुले कुठून तरी या गोष्टी पैदा करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

पोर्नचा अवास्तव उदो उदो करानार्याना मारलेली खणखाणीत मुस्काटात म्हणजे हां लेख होय. पोर्नचा अवास्तव उदो उदो करानार्या विरोधात सामान्य विरोधक इतके संतुलित व वैज्ञानिक लिखाण नक्कीच करू शकत नाही त्याबद्दल आपले धन्यवाद.

मानसिक कमकुवत पणाला बळी पडून पोर्नचे स्तोम माजवु फानारे तथाकथित बुध्दिवंत याचा वैज्ञानिक प्रतिकार कसा करतात हे बघणे रोचक ठरेल. अर्थात शेपुट वर करता आले तर Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

कधी कधी गम्मत होते एखादी बाब पुर्णपणे चर्चेबल तात्विक मुद्द्यात घेता येते फिरवता घोळता येते.
मात्र त्यात तिचा प्रत्यक्ष जीवनावर होणारा परीणाम व त्याचे महत्व हे पुर्णपणे दुर्लक्षित होते
तो बुद्धाचा डायलॉग हा बाण कुठल्या धातुचा बनलेला आहे ? कीती लांबी रुंदीचा आहे ? कोणी मारला आहे ? किती वेळ झाला आहे असे काहीतरी अनेक प्रश्न विचारता येतात पण बुद्ध म्हणतो
हा जो आता तुझ्या छातीत रुतलेला आहे त्याचे काय
अस काहीस आहे नीट आठवत नाही. चुकभुल देणे घेणे
थोडक्यात छातीत रुतलेल्या बाणाच महत्व तो अधिक मानतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बुद्धाचा किस्सा अतोनात मार्मिक आहे. या किश्श्याबद्दल धन्यवाद घ्याच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक मुद्द्यांशी आणि मुद्द्यांमागच्या गृहीतकांशी ठार असहमती आहे. पण या लेखानं अनेकांच्या मनातल्या भीतीला आवाज दिला, हे जाणवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन