वंकूकुमारच्या कविता

मुखपृष्ठाविषयी.

वंकू कुमारच्या कविता

- वंकू कुमार

१. पिंकी एमएमएस क्वीन

संपली गुलाबी दुपार पिंकी
मागे फिरायला नाही हरकत
मन थिंकी ते वैरी न थिंकी…
बिब्टे अस्तात नॅश्नल पार्कात.

नको गं अत्ता कोडी-चकवे
जंगल जंगळ खेळून दमलो,
रेस्ट ईज नीडेड थोडी आत्ता,
जवळच घेतलाय रेंटवर बंगलो

मला दिव्यांची गरजेय पिंकी
काळं आकाश पसरत चाललंय.
तुला तर दिसतो मृत्यू मोकळा,
जन्म जणू काय रिचार्ज झालंय.

सकाळ-दुपारचं फुटेज बघूया
नॅचरल लाईटेय, स्किन-ग्लो ब्राईटेय.
इनडोर फुटेजचा कचरा होणारेय,
लाईट नसेल तर बंगलो वाईटेय.

थोडी‌ एन्जॉय करायला शीक ना,
नेटवर स्ट्रिपिंग बघितलं नाहीस का?
थोडंसं खेळायचं वरती - खालती,
स्प्रेड करायचा बॉडीवर मस्का.

सकाळी गुलाबी दिसत होतीस
फिल्मवर हवापण धुरकट होती.
सॅच्युरेटेड पिवळा टोनेय आता
मॅक्झिमम न्यूड हो तू रात्री.

जंगलात आता पुरे झाले,
शॉटही वेगळे लागत नाहीयेत.
नवीन कोणती येताहेत आसनं?
डॉगी, ब्लोजॉब, कमशॉट झालेयत.

कॅमेरा कॉन्शस कशाला होतेस?
चेहरा काळोखात कसा काय दिसेल?
फक्त बॉडी हलताना दिसतेय
कॅमेराय माझा टू मेगापिक्सेल

रडून आता कसला फायदा?
अजून कशी काय लाजेय मनात?
जग काय म्हणतंय दुर्लक्षायचं
फॉलो करायचा आतला आवाज.

हॅन्ड्ल कर तू स्वत:च स्वतःला
रिमेंबर, हे कुठे पर्सनल आहे!
हॉर्नी, पॉर्नी एमएमएस क्वीनला,
हाच रस्ता अटळ आहे

================================

२. हॉट चॉकलेट

बीट बाय बीट, तुझा रिदम सोड मीत
चीत झालो असे करू शोल्डरवरून चीट.

जीभ झाल्येय मी तुझी हवा तसा बोल
ढांगा ताणून बस मीये पॉपकॉर्न बोल

विंडचाइम्स पडलेत पाठी टॅटू हिप्सवर
बूब्ज झालेत बाळ, कडक नॅनी ब्रेसियर.

हात तुझा वेडावाकडा अपलोड करतोय फाईल
माझ्या पोटी दडून आहे मोनालिसा स्माईल.

हॉट चॉकलेट गंध आहे तुझ्या मध्यावर
बॉटल करते प्रेस, तू ये, स्प्रे माझ्यावर.

================================

३. हायवे - रेडी

मूर्ग खिमा हायवे बोटी आणि रोटी
खात, बियर पीत आपण बसलोय
सुवर्ण चतुष्कोनाच्या एका अंगाला
एनएच फोरवर एनएच वनच्या
इंप्रेशन्सखाली.

शून्यात आहोत, बोलत भोळेभाबडे
जागतिक लायकपणाचे वेडे धडे
रटत. पॅडेड ब्रा आणि बेयरबॅक
असणार्‍या. काही चॉपस्युई मोहांपलीकडे
आपले निश्चित एम.

चार बाजू, दोन आवाज, असंख्य कोन
सहन न होण्याइतकं डेफिनेट वजन
एक्स्प्रेस न करता येणार्‍या इंप्रेशन्सचा
खिमा पुढ्यात, चार लेन्सच्या नॅशनल हायवेस
टायर तयार.

================================

४. जिम पोरी जिम

१.
जिम पोरी जिम
पावर फ्लेक्स जिम
बर्न करो कॅलरी ऍन्ड
बन जाओ स्लिम.
जिम पोरी जिम
पावर फ्लेक्स जिम…

२.
ओ, २० मिन्टं ट्रेडमिल मारा
मॅम आज फक्त कार्डिओ करा
स्पीड कमी करा… स्पीड कमी करा…
आजच व्हायचं का प्रियांका चोप्रा?
आज मारा कार्डिओ, उद्या मारा वेट्स
सहा दिवस प्रोग्रॅम, संडेला घ्या रेश्ट.
काळजी करु नका, होनार तुम्ही स्लिम.
गॅरेंटीड वेट लॉसची आहे तुमची स्कीम…

३.
नाही गं, नाही गं… मला होत नाही ग
गणित मेलं कच्चं तुझं, सेट्स किती सांग.
सोप्पा दे ना जमेल असा मला एक्सरसाईझ.
खाली नाही वाकता येतेय, बघ ना माझी साईझ.
गोळी बिळी नाही का, स्टेरॉईड्स घेऊ का?
जिमला येण्याआधी रोज देवळात जाऊन येऊ का?
बघ ना जरा शे्ड्यूलमध्ये चेंज होईल का एक?
अर्धा तास ’खवय्ये’ बघू, घेऊ छोट्टा ब्रेक.

४.
मॅम तुम्ही ऐका माझं, वाढवा आता वेग.
ब्रीदीन ब्रीदाऊट करा, उचला भरभर लेग.
किती दिवस झाले आता, धाप लागते कशी?
डाएट जरा स्ट्रिक्ट करा, सीट दिसतेय उशी.
लेग-रेजच्या आधीच तुमचे पोट जंप घेते.
भडकू नका माझ्यावरती, दिसतं तेच सांगते.
लोकांकडे बघू णका, आपली बॉडी आपला त्रास.
जिद नसेल तर होणार णाय, पर्फेक्ट तुमचा बॉडीमास.

५.
बेबी एसी वाढव जरा, चिकचिकाट झालाय नुस्ता.
झक मारली, जिम लावली, उपद्व्यापेय नसता.
जरा टीव्ही वळव इथे, रिमोट दे तो इकडे.
कंबर कशी वळते तुझी, खातेस काय गं सुकडे!
लग्न केलंस एकदा की ट्रॅजडी कळेल आमची
पोरं-बिरं झाली ना की दशा होते फॉर्मची.
आपल्याला कुठे करायचाय रॅम्पवर कॅट्वॉक?
नवरा ऍबरप्ट गपेल तेव्हा बसेल तुलाही शॉक.

६.
मॅडम तुम्ही लक्ष द्या, बोलू णका धावताना…
स्टॅमिना कसा वाढनार, रोज स्कूटीवर येता ना?
माझी काळजी करू नका, माझं लग्ण झालंय.
मंगळसूत्र अडकतं म्हनूण बॅगेत काढून ठेवलंय.
पोरा-सोरांचं सांगू नका, मलापन मुलीयेत दोन.
जिबेवरचा कन्ट्रोल गेला की शरीर होतं गोन.
पोटात कोंबा तुम्ही, नाय होताना पिझ्झा, पास्ता.
नायकी विकत घेता, आनी जिमात येऊन बसता!
जगनंच तुमचं झालंय, चीझ, बटर अन व्हाईट सॉस.
पैसा खर्च करता तेवढा सोप्पा नाही वेट लॉस.

७.
जिम पोरी जिम
पावर फ्लेक्स जिम
बर्न करो कॅलरी न्ड
बन जाओ स्लिम.
जिम गेली भरून
पोरी आल्या दमून.

भरभर पोरी धावल्या.
घामाने भिजल्या सावल्या.
घाम काही सुकेना.
दंगा केला भुकेनं.

***

कवीच्या सौजन्याने पुनर्प्रकाशित

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

________/\________

जिमची जास्त आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांत आकर्षक काय असेल, तर यातली भाषा. काय बयेनं अवतार घेतला आहे.. अहाहा! मन 'थिंकी' ते वैरी न 'थिंकी', 'लाईटेय-ब्राईटेय-वाईटेय', 'अजून कशी लाजेय मनात?'... भारीच. इतकी साधी-आंग्लाळलेली-रोजमर्रा मराठी बघता बघता कविता कशी होऊन जाते कळत नाही. कळेस्तो आपण नादात गुंग झालेले असतो.

या भाषेच्या पाठोपाठ त्या विलक्षण प्रतिमा. बॉडीवर मस्का स्प्रेड करणे, बाळ बूब्ज आणि कडक नॅनी ब्रेसियर, मध्यावरचा हॉट चॉकलेट गंध - या प्रतिमा अगदी नव्या, विलक्षण चमकवणार्‍या तर आहेतच. पण त्यात भुकेचा एक धागा आहे, शरीराशी जोडलेला.

आणि ती अखेरची कविता - साष्टांग नमस्कार. सौंदर्यसाधनातला पॉर्नोग्राफिक हव्यास आणि थांबताच न येणं त्या कवितेत अचूक येतं. एकदा पावलं पडायला लागल्यावर, थांबताच येत नाही, नाचतच राहावं लागतं - यातला असहाय भाव त्या 'जिम पोरी जिम'मध्ये आला आहे. बघता बघता ती कविता करुण होते.

नमस्कार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन