पॉर्न, मी आणि समाज

पॉर्न आणि समाज लेख

पॉर्न, मी आणि समाज

- आनंद करंदीकर

पॉर्नची व्याख्या :

पॉर्न (पॉर्नोग्राफी, pornography) याचा विकिपीडियामधील अर्थ 'the portrayal of sexual subject matter for the purpose of sexual arousal' असा आहे. मला पॉर्नची व्याख्या 'कामोत्तेजक सार्वजनिक अभिव्यक्ती' अशी योग्य वाटते. या व्याख्येतील प्रत्येक शब्द आवश्यक आहे आणि एकत्रितपणे हा शब्दसमूह पुरेसा आहे. खाजगीत, उदाहरणार्थ शयनगृहात, केलेला व्यवहार पॉर्न नाही. लैंगिक कृतीबद्दलचा माहितीपट, लैंगिक शिक्षणाचा अभ्यासवर्ग म्हणजे पॉर्न नाही; कारण ते कामोत्तेजक नसतात. अभिव्यक्तीचे सर्व प्रकार - जर ते कामोत्तेजक असले आणि सार्वजनिक असले तर - पॉर्नमध्ये अंतर्भूत होतात. यांच्यामध्ये चित्रे, शिल्पे, छायाचित्रे, संगीत, नृत्य, कविता, कादंबऱ्या, चलतचित्रे इत्यादी साऱ्या अभिव्यक्तींचा समावेश होतो. या लेखात मुख्यत: माहिती-नभोमंडळात (इंटरनेटवर) पाहायला मिळणाऱ्या पॉर्न चलच्चित्रांचा ऊहापोह आहे.

माझा अनुभव

या लेखात मी जी मते, जे विचार मांडले आहेत; ते माझ्या व्यक्तिगत अनुभवांवर आधारलेले नाहीत. या विषयावर झालेले अभ्यास२,३), स्त्रीमुक्तिवादी संघटनांच्या भूमिका, विचारवंतांच्या भूमिका, कायदे आणि न्यायाधीशांनी व्यक्त केलेली मते या सर्वांच्या तर्कसुसंगत मांडणीतून माझे विचार, माझी मते निर्माण झाली आहेत असे मला वाटते. पण तरीही पॉर्नबद्दलचे माझे स्वत:चे अनुभव हे माझे विचार घडवण्याला अजिबात कारणीभूत नाहीत, असे मी ठामपणे म्हणू शकत नाही. माझ्या व्यक्तिगत अनुभवांमुळे माझे विचार पूर्वग्रहदूषित असण्याची शक्यता आहे. हे कमीत कमी व्हावे म्हणून मी जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. पण हा विषयच असा आहे की... तेव्हा वाचकांची दिशाभूल टाळण्यासाठी माझे स्वत:चे अनुभव थोडक्यात पण स्पष्टपणे सांगणे मला आवश्यक वाटते. मग माझे विचार पूर्वग्रहदूषित आहेत किंवा नाहीत हे वाचक ठरवू शकतात. (हे असे घडले आहे हे वाचकांनी माझ्या लक्ष्यात आणून दिले तर मी आभारीच असेन.)

१. शालेय जीवनात माझा पॉर्नशी काहीही संबंध आला नाही. हे सर्वसाधारण नाही. केंद्र सरकारच्या २००७ सालच्या पाहणीनुसार महाराष्ट्रातील ७६.९% मुलगे असे सांगतात, की त्यांनी पॉर्न चित्रे वयाच्या अठराव्या वर्षाअगोदर पाहिली. (हे फक्त चित्रांविषयी आहे, मुलांना पॉर्नच्या इतर अभिव्यक्तींविषयी प्रश्न विचारण्यात आले नाहीत.) शालेय जीवनात माझा पॉर्नशी काहीही संबंध आला नाही, याचे मुख्य कारण म्हणजे मी १००% मध्यमवर्गीय चित्तपावन ब्राह्मण राहत असलेल्या चाळीत राहत होतो आणि माझे शाळेतील सर्व मित्र परंपराग्रस्त चित्तपावन ब्राह्मण कुटुंबातील होते, हे असावे.

२. मी मुंबई I.I.T होस्टेलमध्ये राहू लागलो आणि नागड्या बायकांची चित्रे असलेली 'प्लेबॉय'सारखी (Playboy) मासिके मला मित्रांकडून पाहायला मिळू लागली. त्याच सुमारास माझे वडील अमेरिकेतील वर्षभराच्या वास्तव्यानंतर परत आले. येताना ते काही कामोत्तेजक (erotic) मासिके आणि पुस्तके घेऊन आले. तीही माझ्या पाहण्यात, वाचण्यात आली. या साहित्याचा पुरवठा फार तुटपुंजा होता आणि असे साहित्य मिळविण्यासाठी मी काही प्रयत्न केल्याचे मला स्मरत नाही.

३. नोकरीला लागल्यानंतर, विशेषत: वयाच्या तिशी-चाळिशीमध्ये, हॉटेलच्या बाहेर, दिल्लीत 'पालिका बझार'मध्ये, मुंबईत फ्लोरा फाउंटनच्या सभोवतालच्या पादचारी मार्गावरील विक्रेत्यांकडे, खूप कामोत्तेजक मासिके आणि पुस्तके मला दिसू लागली. ती विकत घेतेवेळी विक्रेते "सीडी हवी का?" असे विचारू लागले. पुस्तक/मासिक २०० रुपयांना, तर सीडी ३०-४० रुपयांना अशा किमती असायच्या. माझी त्या वेळची कमाई लक्षात घेता या किंमती मला सहजशक्य होत्या. मिळेल ते घ्या. सवडीनुसार, सोयीनुसार पाहा, असा शिरस्ता सुरू झाला.

४. हळूहळू माझ्याकडे शंभराहून जास्त सीडीज्‌ जमा झाल्या. त्यांतील फार थोड्या मी संपूर्ण पाहिल्या. परत परत पाहावी अशी एखाद-दुसरीच होती.

५. मग माहितीनभोमंडळाचा (इंटरनेटचा) जमाना सुरू झाला. घरी हायस्पीड कनेक्शन अंदाजे २००५ साली आले. त्यानंतर योग्य संकेतस्थळे शोधायला काही कष्ट पडले नाहीत. दोन-तीन संकेतस्थळे भरपूर होतात हे लक्ष्यात आले. कधी कंटाळा आला, एकटे वाटले की नवे काय? हे पाहणे सुरू झाले. चालू आहे, आठवड्यातून एखादा तास त्यात जातो.

६. या सगळ्या प्रवासात दुसऱ्याला वाचायला सांगाव्या अशा कथा, पाहायला सांगाव्या अशा चित्रफिती पाच-सहाच आढळल्या, बाकी १०% टाईमपास – ९०% निव्वळ बोअर. (या चांगल्या कथा, चित्रफिती माझ्या संग्रही नाहीत; सर्व सीडीज्‌ तर मी पूर्वीच कचराकुंडीत टाकल्या - याची गरजूंनी नोंद घ्यावी. क्षमस्व!).

सिंहावलोकन

सिंहावलोकन करताना माझ्या वैयक्तिक अनुभवातून मला पुढील गोष्टी जाणवतात:

१. चांगल्या कामोत्तेजक, कलात्मक, मस्त पॉर्नकथा फार तुरळक बघण्यात आल्या.
२. चांगली कामोत्तेजक, कलात्मक, मस्त पॉर्नकथा जो आनंद देते, जी अनुभूती देते ती दुसऱ्या कोठल्या प्रकारे (अगदी सखीच्या शय्यासोबतीतूनही) मिळू शकत नाही. चांगल्या कामोत्तेजक, कलात्मक, मस्त पॉर्नकथेसाठी मी अनेक असह्य पॉर्नकथा सहन केल्या.
३. ज्या ज्या वेळी मी चांगली कामोत्तेजक, कलात्मक, मस्त पॉर्नकथा माझ्या सखीला दाखवली तेव्हा तिलाही ती आवडली. अर्थात हा योग अपवादात्मक होता आणि ती सखी कर्तबगार, आत्मनिर्भर होती हेही नमूद करणे आवश्यक आहे.
४. ९० टक्के पॉर्नकथांमध्ये स्त्री आणि पुरुष ही यंत्रे असतात. तिचे स्तन आणि कुल्ले मोठे असतात, कंबर लहान असते. त्याचे शरीर पीळदार, लिंग मोठे आणि ताठ असते. ती त्याचे लिंग चोखते, तो तिची योनी चोखतो. ती पाय वर करून पाठीवर झोपते किंवा चार पायांवर उभी राहते, तो तिच्या योनीत लिंग आतबाहेर करतो. त्याचा दम मोठा असतो. ती चित्कारते. हाच त्याचा, म्हणजे पुरुषाचा, विजय होय! याच त्या ९०% बोअर पॉर्नकथा.
५. १०% पॉर्नकथांमध्ये थोडे काही वेगळे घडते. ती दोघे काय करायचे ते ठरवतात. त्यांच्यामध्ये संभाषण होते. ती त्याच्यासाठी नटते, इत्यादी इत्यादी.
६. फार अपवादात्मक, चांगल्या पॉर्नकथेमध्ये ती आणि तो एकमेकांना आनंद आणि सुख देण्यामध्ये, घेण्यामध्ये, मग्न होतात. परस्परांबद्दल ते संवेदनाशील असतात. त्यांचे प्रेम ती आविष्कृती व्यापून टाकते.
७. पॉर्नकथांमध्ये BDSM हा एक प्रचलित आणि लोकप्रिय प्रकार आहे. विकिपीडियानुसार, The term BDSM is first dated from 1969. The term BDSM was formed by joining the term B&D (bondage and discipline) with S&M (sadomasochism, or sadism and masochism). BDSM is a variety of erotic practices or role playing involving bondage, dominance and submission, sadomasochism, and other interpersonal dynamics. Relationships within a BDSM context are often characterized by the participants' taking, but unequal roles; thus, the idea of informed consent of both the partners becomes essential." "BDSM मध्ये जास्त वेळा पुरुष कर्ता, DOMINANT असतो, पण दखलपात्र प्रमाणात अनेक वेळा स्त्रीही DOMINANT असते. BDSM पॉर्नमधील "informed consent of both the partners" हा भाग मला चांगला वाटतो.
८. पॉर्नकथांमध्ये दखलपात्र प्रमाणात बलात्काराचे चित्रण असते. सैनिक, पोलीस अधिकारी हे तर बलात्कार करतातच; पण कामाच्या ठिकाणीही बलात्कार दाखवले जातात. अनेक चलतचित्रांत विद्यार्थी शिक्षिकांवर बलात्कार करतात. चित्रफितीत कधीही पुरुषाला शासन होत नाही, दु:ख किंवा पश्चात्ताप होत नाही. शेवटी तो हसत असतो, ती रडत असते. तरीही या चित्रफिती मी बघतो. का बघतो? कधीतरी ती प्रतिकार करेल, विजयी होईल अशी मला आशा असते; असे माझे मी मनाला समजावतो. ते खरे नाही हेही मला माहिती आहे.
९. पॉर्नकथा बघताना मी जेव्हा कामोत्तेजित झालो, तेव्हा हस्तमैथुन करून शांत झालो. पॉर्नकथा बघितल्यावर, किंवा नंतर कधीही, माझ्या संपर्कात आलेल्या स्त्रीचा मी निव्वळ 'लैंगिक उपभोगाचे साधन' म्हणून विचार केला नाही. तिच्यावर आक्रमण करावे असे मला कधीही वाटले नाही. काही स्त्रियांबद्दल मला लैंगिक आकर्षण जरूर वाटले. खरेतर मला प्रत्येकच स्त्रीबद्दल लैंगिक आकर्षण वाटले आहे; काहीबद्दल अधिक वाटले. (सगळ्याच स्त्रिया सुरेख असतात. काही अधिक सुरेख असतात, इतकेच. – डॉ. राममनोहर लोहिया). पण मी प्रत्येक स्त्रीचा कर्तबगार माणूस म्हणूनच विचार केला. मी युक्रांद, जनवादी महिला संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, लोकविज्ञान संघटना यांमध्ये काम करत होतो याचाही हा परिणाम असू शकेल. पॉर्न बघणाऱ्या प्रत्येक पुरुषाची हीच मानसिकता असते, असा माझा दावा नाही.

पॉर्नबद्दलचे काही महत्त्वाचे आक्षेप

१. काही पॉर्नकथांमध्ये बलात्काराचे आनंददायी चित्रण असते. बलात्कार गुन्हा म्हणूनसुद्धा दाखविला जात नाही. पॉर्नचा प्रसार आणि स्त्रियांच्या विरूद्धचे गुन्हे यांच्यात सांख्यिकी अभ्यासातून अजूनही कार्य-कारण संबंध प्रस्थापित करता आलेले नाहीत हे मान्य केले, तरीपण बलात्कार हा गुन्हा आहेच. गुन्हेगारीचे आनंददायी चित्रण हे त्या गुन्ह्याबद्दलची सामाजिक घृणा कमी करणारे आहे. अल्पकाळात वाईट परिणाम दिसले नाहीत, तरी दीर्घकाळात ते दिसू शकतात. इंटरनेटचा प्रसार होऊन अजून २० वर्षेही झाली नाहीत. बलात्कार वाढू द्यात, मग बघू; हे म्हणणे म्हणजे कमालीची बेपर्वाई आहे.

२. काही पॉर्नकथांमध्ये लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे चित्रण असते. सरकारी सर्वेक्षणानुसार आज भारतातील निम्म्याहून जास्त मुले 'आम्ही लैंगिक शोषण अनुभवले आहे', असे सांगतात(9). लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे चित्रण दाखवणे म्हणजे हे शोषण करणाऱ्यांना अधिक प्रशिक्षित आणि सक्षम करण्यासारखे आहे.

३. अनेक पॉर्नकथांमध्ये स्त्री ही वापरायची वस्तू म्हणून दाखवली जाते. स्त्री म्हणजे कोकाकोलाची बाटली. प्या, भोगा आणि फेकून द्या. सध्या स्त्री उपभोगाची वस्तू म्हणून अनेक जाहिरातींतून दाखवली जाते हे खरेच; पण पॉर्नमध्ये ते फार बीभत्सपणे आणि नागडेपणाने दाखवले जाते. त्यातून स्त्रीविषयक विकृत दृष्टिकोन, जो समाजात आधीपासून आहेच, अधिक रुजवला जातो.

पॉर्नबद्दलचे काही वादग्रस्त आक्षेप

१. - पॉर्नकथांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचे शोषण होते. त्यांच्या आरोग्याला हे काम हानिकारक असते.

भांडवलशाही समाजात काम करणाऱ्या कामगारांचे आर्थिक व इतर प्रकारे शोषण होते, या व्यापक अर्थाने हे विधान खरेच आहे. पॉर्नकथांमध्ये काम करणाऱ्या काही स्त्रियांना लैंगिक आजार होतात, एड्ससारखे प्राणघातक रोग होऊ शकतात हेही खरेच आहे. 'डीप थ्रोट' या सुरुवातीला गाजलेल्या पॉर्नकथेमध्ये तोंडाद्वारे केलेल्या संभोगाचे चित्रण होते. काम करणाऱ्या नटीला ते काम करायची सक्ती तिच्या नवऱ्याने केली होती. तिला नंतर तोंडाचा कर्करोग झाला. तिला नुकसानभरपाई मिळावी म्हणून स्त्री-संघटनांना खूप प्रयत्न करावे लागले. पण पॉर्नकथांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना इतर व्यवसायांच्या मानाने कितीतरी अधिक उत्पन्न मिळते आणि पॉर्नकथांमध्ये काम करण्यापेक्षा इतर अनेक व्यवसाय आरोग्याला अधिक धोकादायक आहेत, हेही लक्षात घेण्याची गरज आहे, (उदाहरणार्थ वेश्या व्यवसाय, सफाई कामगार, खाण कामगार, चुलीवरचा स्वयंपाक, इ.). मिरेल मिलर ह्यांनी पॉर्नकथांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या. त्या लिहितात, "या स्त्रियांपैकी काहींना पॉर्नकथांमध्ये काम करणे हा गरिबीतून बाहेर पडून कॉलेज शिक्षणाचा दरवाजा उघडण्याचा मार्ग वाटतो, इतर काहींना हे काम म्हणजे आपल्याला संभोगसुख आवडते, हे सांगण्याचा मार्ग वाटतो."१०

२. - पॉर्न पाहिल्यावर नवऱ्यांच्या भलत्याच नव्या मागण्या सुरू होतात, त्याचा बायकांना त्रास होतो.

गुदद्वारातून संभोग यांसारख्या गोष्टी, कसरतीचे कठीण प्रयोग ठरतील अशा कृती, पॉर्नकथांमध्ये दाखवल्या जातात हे खरेच आहे. त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न पुरुषांनी केला तर स्त्रीला आणि पुरुषाला त्रास होईलच. पण हे आनंददायी नाही हे कोणत्याही संवेदनशील पुरुषाला लगेच लक्षात येऊ शकेल. मग हे प्रयोग सावधपणे, सांभाळून केले जातील. तसे ते केले गेले पाहिजेत. ४०% मध्यमवयीन मराठी स्त्रिया 'आमचे पुरुष आमचे लैंगिक समाधान करत नाहीत' असे सांगतात११. पॉर्नमुळे पुरुष प्रयोगशील होत असले तर त्याचे स्वागतच केले पाहिजे, असे मला वाटते. खरा प्रश्न आहे तो हा, की पुरुषांना स्त्रीचे सुख ही आपली जबाबदारी वाटत नाही; ते याबाबत अजिबात संवेदनशील नसतात आणि लैंगिक सुख मिळणे हा स्त्रियांना आपला अधिकार वाटत नाही. त्याचा दोष पॉर्नला देणे योग्य होणार नाही.

पॉर्नबद्दलचे काही चुकीचे आक्षेप

१. पॉर्नमुळे व्यभिचार वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते. पॉर्न पाहिल्यावर पुरुष किंवा स्त्री इतके कामोत्सुक होतात, की ते मिळेल त्या स्त्रीबरोबर किंवा पुरुषाबरोबर संभोग करू लागतात; हे खरे नाही. तसे घडताना अनुभवास आलेले नाही. पुरुष कामोत्सुक झाले आणि त्यांना जोडीदार उपलब्ध नसेल तर ते वेश्येकडे जातात. त्याला आपल्या 'सुसंस्कृत' समाजात व्यभिचार म्हणत नाहीत. स्त्रियांचा विवाहबाह्य लैंगिक संबंध म्हणजे व्यभिचार, असे पुरुषप्रधान व्यवस्थेचे ठाम सूत्र आहे. पॉर्नमुळे व्यभिचार वाढला तर मी त्याचे स्वागतच करीन; पण तसे होण्याची शक्यता नाही.

२. 'संभोग हा स्त्री-पुरुषांमधील खाजगी व्यवहार आहे, तो खाजगीच राहिला पाहिजे' असे सामान्यत: सार्वजनिक जीवनात पारंपरिक मूल्ये जपण्याचा प्रयत्न करणारे लोक म्हणतात. संभोग हा स्त्री-पुरुषांमधील खाजगी व्यवहार आहे - असे का? हे कोणी ठरवले? वैदिक काळात यज्ञाच्या अग्नीच्या साक्षीने संभोग संपन्न होत असे. खजुराहोच्या शिल्पात संभोगाची सार्वजनिक अभिव्यक्ती आहे. स्त्रियांच्या नग्न चित्रांद्वारे अनेक चित्रकारांनी लालसेची रंगीबेरंगी अभिव्यक्ती केली आहे. प्रणयाची आणि संभोगाची कामोत्तेजक वर्णने केशवसुत, करंदीकर, महानोर यांच्या कवितांत आहेत. 'गजगामिनी' सिनेमात अभिनेत्रीच्या नितंबांचे कामोत्तेजक चित्रण आहे. 'संभोग हा खाजगी व्यवहार आहे' म्हणणारे मग विवाहांतर्गत बलात्काराचे समर्थन याच चुकीच्या भूमिकेतून करतात!

३. "इश्श बाई, शी बाई, पॉर्न ते नको गं बाई!". - संभोग ही नाईलाजाने करायची गोष्ट आहे, ती कृती मुले होण्यासाठी करावी लागते म्हणून करायची, अशी भूमिका अनेक स्त्रियांची असते. अगदी कमावत्या, सुशिक्षित स्त्रियांचीही असते. (कट्टर ख्रिस्ती आणि ज्यू यांची धर्मदत्त भूमिका अशीच असते). मग या स्त्रिया लैंगिक सुखाचा आनंद मोकळेपणे घेऊ शकत नाहीत, देऊ शकत नाहीत. आपण संस्कृतिरक्षण करत आहोत, पुरुषांच्या आक्रमणापासून स्त्रियांचे संरक्षण करत आहोत' अशा भ्रमात त्या असतात. त्यांचे आणि संस्कृतिरक्षक पुरुषांचे चांगले जमते!

पॉर्नमुळे होणारे विवादास्पद फायदे

१. पॉर्नमुळे कामेच्छा बळावते, कामजीवन अधिक आनंददायी बनते असे सांगितले जाते. पॉर्नमुळे होणारे कामोत्तेजन तात्पुरते असते. बहुतांश वेळा पुरुष एकट्याने किंवा इतर पुरुषांच्या बरोबर पॉर्न बघतात. स्त्रीबरोबर संभोग करायची वेळ येते, तोपर्यंत बराच वेळ गेलेला असतो. (आपल्या प्रियकराबरोबर चांगली पॉर्न चित्रफीत बघितली तर फायदा होईल असा माझा कयास आहे, पण त्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.)

२. पॉर्नमधून लैंगिक शिक्षण होऊ शकते, पॉर्न बघून नवी नवी तंत्रे कळतात, त्यामुळे कामजीवन अधिक रंगीत बनते असा दावा केला जातो; हेही विशेष खरे नाही. सुखी, आनंददायी संभोगासाठी विशेष 'आसने' उपलब्ध असल्याचे माझ्या पाहण्यात, वाचनात नाही. काही पॉर्नमध्ये ज्या कसरती दाखवतात त्या सामान्य स्त्री – पुरुष करू गेल्यास त्यांचे कंबरडेच मोडेल!

पॉर्नमुळे होणारा फायदा

पॉर्नमुळे होणारा फायदा मुख्यत: एकच आहे. लैंगिक व्यवहाराबद्दल एक सार्वत्रिक मौन आहे. लैंगिक शिक्षण काही प्रमाणात, काही ठिकाणी आता सुरू होऊ लागले आहे; पण नाहीतर मौन आणि मौनच आहे. एवढ्या महत्त्वाच्या आणि मूलभूत मानवी व्यवहाराबद्दल अज्ञान, घुसमट आणि कोंडी आहे. त्याचा जास्त तोटा स्त्रियांना होतो, पण पुरुषांनाही होतोच. माहिती नभोमंडळावरील (इंटरनेटवरील) पॉर्नचा व्यापक प्रसार हा आता पॉर्नला जवळपास सर्वांपर्यंत घेऊन जाणार आहे. त्यामुळे लैंगिक व्यवहाराबद्दलचे घुसमट मौन आणि कोंडी फुटायला मदत होत आहे. फायदा एकच असला आणि तो सांगायला फार शब्द लागत नसले, तरी तो फायदा खूप महत्त्वाचा आहे असे मला वाटते.

स्त्रीवादी पॉर्नविषयी थोडेसे

स्त्रियांनी स्त्रियांच्या सबलीकरणासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि अभिव्यक्तीसाठी बनवलेले पॉर्न म्हणजे स्त्रीवादी पॉर्न१२). १९८४ साली कँडिडा रोयाल यांनी 'फाम प्रॉडक्शन्स' या कंपनीची स्थापना करून स्त्रीवादी पॉर्ननिर्मितीची सुरुवात केली. स्त्रीच्या दृष्टिकोनातून चलतचित्रांची निर्मिती करणे, हा या कंपनीचा उद्देश होता१३. २००६ सालापासून फेमिनिस्ट पॉर्न अवॅार्ड्सना (स्त्रीवादी पॉर्न पुरस्कारांना) सुरुवात झाली आणि या चळवळीने खरा वेग घेतला. आता ही चळवळ तिसऱ्या लाटेतील स्त्रीवाद्यांची आहे. त्यांच्या मते 'स्त्रियांमध्ये लैंगिक समानता आणि लैंगिक सुख यांबाबत आत्मविश्वास निर्माण करणे' हा स्त्रीवादी पॉर्न या चळवळीचा प्रमुख उद्देश आहे. ट्रिस्टन टाओर्मिनो या फेमिनिस्ट पॉर्ननिर्माती आणि 'द फेमिनिस्ट पॉर्न बुक'च्या सहसंपादिका आहेत. त्या म्हणतात, "फेमिनिस्ट पॉर्नमध्ये कलाकारांची काळजी घेतली जाते अणि त्यांना आदराने वागवले जाते. त्यांना वाजवी मानधन दिले जाते. इच्छा, वासनापूर्ती आणि सत्ता यांबद्दलच्या संकल्पनांचा व्यापक शोध घेण्याचा प्रयत्न फेमिनिस्ट पॉर्न करते. पॉर्नमध्ये काम करणारे कलाकार आणि पॉर्न बघणारे प्रेक्षक, यांचे मानसिक सबलीकरण करण्याचा फेमिनिस्ट पॉर्नचा प्रयत्न आहे."१४

मी फेमिनिस्ट पॉर्न फारसे पाहिलेले नाही, कारण ते माहितीनभोमंडळावर (इंटरनेटवर) सहज आणि मोफत उपलब्ध नाही.

काय केले पाहिजे?

अलीकडे माझ्या एम.बी.ए.च्या चार विद्यार्थ्यांनी स्वत:च विषय निवडून 'पॉर्नवर बंदी' या विषयावर मांडणी केली आणि वर्गात चर्चा घडवून आणली. चर्चेनंतर त्यांनी मतदान घेतले. वर्गात तीस मुलगे आणि वीस मुली होत्या. बंदी हवी या बाजूला एकही मत मिळाले नाही. पॉर्नवर सरसकट बंदी घाला, असे कुठलीही स्त्रीवादी संघटना म्हणत नाही. पॉर्नवर बंदी म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर बंदी, असे म्हणून अनेकांनी सरकारी बंदीला विरोध केला. हा विरोध, विशेषत: तरुणांचा विरोध, इतका जबरदस्त होता की सरकारला ही बंदी काही दिवसांतच मागे घ्यावी लागली१५.

पॉर्नवरील बंदीच्या काळात आणि नंतरही मला अनेक स्त्री-कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता जाणवली. पॉर्न नको, पॉर्न वाईट; पण पॉर्नवर बंदी नको, अशी ही द्विधा अवस्था आहे. पॉर्नमध्ये जे काय वाईट आहे, त्याबद्दल लोकांना समजावून कसे सांगायचे? आपण जे पाहिले नाही, त्याबद्दल आपण किती आग्रहाने बोलायचे? अलीकडे मी या विषयावर ज्या चर्चा ऐकल्या, त्यांमध्ये मला ही कोंडी जाणवली.

पॉर्नचा दर्या खूप मोठा आहे. एकेका संकेतस्थळावर दहा हजारांहून जास्त चलतचित्रे उपलब्ध आहेत, आणि अशी हजारो संकेतस्थळे आहेत. विषय सांगा, शेकडो चलतचित्रे एक-दोन सेकंदांत उपलब्ध होतात. अधिकाधिक माहितीनभोमंडळ (इंटरनेट) वापरणार्‍या देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत आता दुसर्‍या क्रमांकावर आहे. हे वाढतच जाणारे प्रकरण आहे. नाके मुरडून, आपण पाहिले नाही म्हणून हे 'संकट' नाहीसे होणार नाही. तेव्हा पॉर्नबद्दल आपण निश्चित भूमिका घेतली पाहिजे.

पॉर्नची आपण तीन गटांत विभागणी केली पाहिजे :

पहिला गट हा घातक गट आहे. लहान मुलांचा वापर करणारे पॉर्न या गटात मोडते. त्यावर बंदी असलीच पाहिजे. पण याच गटात, म्हणजे बंदीच घालावी या गटात, अजूनही तीन प्रकारच्या पॉर्नचा समावेश केला पाहिजे. बलात्काराचे आनंददायी चित्रण करणाऱ्या सर्व पॉर्नवर बंदी असली पाहिजे - मग तो बलात्कार पुरुषाने स्त्रीवर केलेला असो, स्त्रीने स्त्रीवर केलेला असो, पुरुषाने पुरुषावर केलेला असो किंवा स्त्रीने पुरुषावर केलेला असो. त्याला कोणी बलात्कार म्हणो, रेप (Rape) म्हणो, नॉन-कन्सेन्शुअल सेक्स (Non-consensual sex) म्हणो, की फोर्स्ड सेक्स (Forced sex) म्हणो. विनासंमती क्रौर्य, यातना आणि गुलामगिरी यांचे चित्रण करणाऱ्या पॉर्नवरही बंदी असली पाहिजे. वर्णवर्चस्व, लैंगिक वर्चस्व, यांचे उघड समर्थन करणाऱ्या पॉर्नवरही बंदी असली पाहिजे. (सुदैवाने या प्रकारचे पॉर्न फारसे बनत नाही.)

काही जण असे विचारतील, की अशी बंदी अमलात आणणे शक्य आहे का? हो, ते सहज शक्य आहे. मोदी सरकारने नुसता एक आदेश दिला आणि ८००हून जास्त पॉर्नसंकेतस्थळे लगेच बंद झाली, आणि सरकारने बंदी मागे घेईपर्यंत ती बंदच होती. पॉर्न हा फार मोठा धंदा आहे. हे धंदेवाईक लोक सरकारच्या वाकड्यात शिरत नाहीत. काही प्रकारच्या पॉर्न दाखवल्या नाहीत, तर इतर पॉर्न दाखवता येतात, असे दिसल्यावर त्यांतील अनेक जण स्वत:च बंदीची अंमलबजावणी करतील. काही चोरीमारीचे प्रकार होतील; पण कायदा म्हटला की ते होणार, त्याला इलाज नाही.

पॉर्नचा दुसरा गट हा चांगला गट आहे. या पॉर्नमध्ये व्यक्ती [ सामान्यत: स्त्री आणि पुरुष - पण ती आवश्यक अट नाही, परस्परांच्या संमतीने परस्परांना आनंद देत, आरोग्याला अपायकारक नसलेल्या अशा पद्धतीने लैंगिक व्यवहार करतात. व्यक्ती 'यंत्रावतारी' नसल्या, तर अधिकच चांगले. फेमिनिस्ट पॉर्नचा समावेश अर्थातच याच गटात होईल.

पॉर्नचा तिसरा गट हा पहिल्या आणि दुसऱ्या गटांत न मोडणाऱ्या इतर सर्व पॉर्नचा आहे. यात बीडीएसएम (BDSM), यांत्रिकी संभोग, प्रहसने, चमत्कारिक पण बिनधोक्याचे प्रयोग (उदाहरणार्थ पादपूजा (foot-fetish)) इ. इ. सारे काही येते. याबद्दल आपण सावध असले पाहिजे, कारण यांतील काही पहिल्या गटाच्या सीमेवरील पॉर्नकथा असतील.

चांगल्या पॉर्नचे स्वागत आणि प्रसार करण्यासाठी काय करावे?

पहिले म्हणजे चळवळीतील पुरुषांनी 'संस्कृतिरक्षकांची' आणि 'व्यभिचार-विरोधकांची' भूमिका पूर्णत: नाकारली पाहिजे. चळवळीतील स्त्रियांनी 'पॉर्न ते घाण' या सर्वंकष नकारात्मक मानसिकतेतून जाणीवपूर्वक बाहेर पडले पाहिजे. लैंगिक व्यवहाराबद्दल मौन आणि पापभावना यांचा आपल्या मनावर एवढा प्रभाव आहे, की या पूर्वग्रहांतून बाहेर पडणे सोपे नाही; त्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर विशेष प्रयत्न करावे लागतील. पॉर्न पाहणे आणि त्यांच्यावर चर्चा करणे हा या कार्यक्रमाचा एक आवश्यक भाग असला पाहिजे.

स्त्रियांची आणि पुरुषांची मानसिकता समतेच्या, स्वातंत्र्याच्या बाजूने घडवणे हा स्त्रीवादी पॉर्नचा उद्देशच आहे. सगळ्याच चांगल्या - म्हणजे गट दोनमधील - पॉर्नचा त्यासाठी उपयोग होऊ शकतो. पुरुषांची मने घडवणे हे स्त्री-चळवळीला आवश्यक वाटते आहे. त्यासाठी पुण्यात नुकतीच पुरुषभान परिषदसुद्धा झाली. पुरुषांची मने घडवण्यासाठी चांगल्या पॉर्नचा वापर हे फार प्रभावी साधन ठरेल, असे मला वाटते.

आपल्या देशात चांगले पॉर्न निर्माण करण्याबाबतची कायदेशीर बाजू नक्की काय आहे, हे मला माहीत नाही. नाटकाच्या क्षेत्रात 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी', 'हिजडा' यांसारख्या नाटकांनी विषयाची आणि भाषेची बरीच बंधने तोडली आहेत; पण कामोत्तेजकतेवरची बंधने तोडणे अजून बाकी आहे. सध्याच्या संस्कृती थिजवणाऱ्या, आक्रमक राडेबाजीच्या परिस्थितीत कामोत्तेजकतेवरची बंधने तोडणे कठीण तर आहेच, पण धाडसाचेही आहे. तसे धाडस कोणी केले, तर ते हवेच आहे. पण परदेशात बनवण्यात आलेल्या पॉर्न बघणे, त्यावर चर्चा करून त्यांतल्या चांगल्या पॉर्न कोणत्या हे ठरवणे आणि त्यांचा कळलाव्या पद्धतीने (viral) प्रचार करणे हे तर आपण करूच शकतो. परदेशात निर्माण करण्यात आलेले स्त्रीवादी पॉर्न भारतामध्ये स्वस्तात किंवा मोफत उपलब्ध करून द्यावे, म्हणून आपण त्या स्त्रीवादी पॉर्नच्या निर्मात्यांना आवाहन करू शकतो. भारतातील फार मोठा बाजार त्यामुळे स्त्रीवादी पॉर्नला उपलब्ध होईल. यात त्यांचाही फायदाच आहे.

थोडक्यात, घातक पॉर्नला आक्रमक विरोध आणि चांगल्या पॉर्नचे हार्दिक स्वागत, असा आपला कार्यक्रम असला पाहिजे. चांगले स्त्रीवादी पॉर्न हा वाईट पॉर्नवर इलाज आहे, असे म्हणता येईल काय?

पूर्वप्रकाशित : परिवर्तनाचा वाटसरू, १ ते १५ डिसेंबर २०१५
लेखकाचा इ-पत्ता: anandkarandikar49@gmail.com

संदर्भ :

'What is Pornography', दुवा
'Effects of Pornography', दुवा
Anti-Porn Feminists' What's Wrong With Pornography', दुवा
Feminist views of pornography, दुवा
Teresa Lee 'Why Women Don't Watch Porn' दुवा
Jodie Gummow 'What Kind of Porn Turns Women On?' Http://www.alternet.org/gender/what-kind-porn-turns-women
Gad Saad 'Pornography: Beneficial or Detrimental?' दुवा
Rohas Nagpal 'Cyber Pornography & the IT Act' ,Courseware for the Diploma in Cyber Law and PG Program in Cyber Law conducted by Asian School of Cyber Laws
Kacker loveleen, et.al. "Study of Child Abuse India 2007", Minstry of Women and Child Development, Government of India, 2007
१० https://en.wikipedia.org/wiki/BDSM
११ Suresh Bada Math, Biju Viswanath, et al, 'Sexual Crime in India: Is it Influenced by Pornography? , Indian J Psychol Med. 2014 Apr-Jun; 36(2): 147–152152, दुवा
१२ Kacker loveleen, et.al. "Study of Child Abuse India 2007", Minstry of Women and Child Development, Government of India, 2007
१३ Miller-Young, Mireille. "Empowering to the Women on Screen". The New York Times. 30 May 2013
१४ मीनल जगताप, 'मराठा जात आणि पितृसत्ता', संदर्भासहित स्त्रीवाद, शब्द पब्लिकेशन, २०१४, पृ. ४०२
१५ https://en.wikipedia.org/wiki/Feminist_pornography
१६ Royalle, Candida. "Great Potential for Great Fun". The New York Times. 4 June 2013.
१७ Taormino, Tristan. "Political Smut Makers". Village Voice. 2012-07-14
१८ Government lifts ban on internet pornography after criticism' दुवा

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

लेख प्रचंड आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेन्सिबल, प्रॅक्टिकल, प्रामाणिक आणि प्रांजळ लेख असल्याने फार आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॉर्नमुळे होणारे विवादास्पद फायदे

यामध्ये एक फायदा घालावा लागेल तो हा की "हेल्दी आऊटलेट". अनेक स्त्री-पुरुष , जोडीदारापासून दूर रहातात (मनाने अथवा शरीराने कसेही) अशावेळी जर गुप्तरोगांचा धोका नको असेल, प्रतारणा नको असेल तर पॉर्न हे वन ऑफ द बेस्ट आऊटलेटस आहे. वन ऑफ म्हटले आहे कारण सेक्स चॅट हे दुसरे तितकेच प्रभावी आऊटलेट.
.
हा मुद्दा लेखात असेलही, कदाचित माझाही मिस झालेला असू शकतो.
____
लेख अतिशय काटेकोर व मुद्देसूद आहे. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरीही उहापोह चांगला केलाय.

मला सांगायचे हे होते की इट्स नॉट देट आय डोंट टाक अबोट पॉर्न बट आय डॉन टाक अबोट पोर्न विद द पीपल आय मेंटेन पर्टीक्युलर डिस्तंस.

एक सोपे उदाहरन आहे मैग्नाला एका प्रतिसादात आदितिबैनी 14 चुम्म्मे का काही लिहले आहे. हेच जर मी लिहले असते तर ते मैग्नाला खपले असते की मला कायदेशीर अडचंनीना सामोरे जावे लागले असते ? पॉर्न बाबत समाजातील खुल्या चर्चेत असे मुद्दे नक्कीच अड़थळे आणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

लेख आवडला गेला आहे,अत्यंत मुद्देसुद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

पण घातक पोर्न आणि चांगलं पोर्न यात फरक करायचा कसा?ज्यात बलात्कार दाखवला जातो आणि लहान मुलांचं लैंगिक शोषण असतं ते पोर्न घातक असं म्हटलं तर पुढील शंका येतात - १. बलात्काराचं दृश्य हे dramatization असतं हा बचाव पुढे येऊ शकतो. बलात्कार हा चित्रपटांतही दाखवला जातोच. THE ACCUSED सारख्या चित्रपटांत तर तो अतिशय दाहक आणि अंगावर येईल इतक्या घृणास्पद आणि जबरदस्त प्रकारे दाखवला आहे.
२. लहान मुलांचं लैंगिक शोषण वाईटच आहे पण पोर्न इंडस्ट्रीने त्यावर उपाय काढला असेलच. अनेक संप्रेरकं (hormones) देऊन लहान मुलांना मोठ्या माणसाप्रमाणे दाखवलं जाऊ शकतं आणि त्यांच्या शरीरात तसे बदल घडवले जाऊ शकतात. शेवटी हा व्यवसाय आहे आणि खर्च कमी करणं हे उद्दिष्ट इथेही ठेवलं जाणारच. त्यामुळे लहान मुलांचा वापर अगदी चांगल्या पोर्नमध्येही होत असेल. मग घातक आणि चांगलं पोर्न यामध्ये फरक कसा करायचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्यांव!

विनासंमती क्रौर्य, यातना आणि गुलामगिरी यांचे चित्रण करणाऱ्या पॉर्नवरही बंदी असली पाहिजे. वर्णवर्चस्व, लैंगिक वर्चस्व, यांचे उघड समर्थन करणाऱ्या पॉर्नवरही बंदी असली पाहिजे. (सुदैवाने या प्रकारचे पॉर्न फारसे बनत नाही.)

खरं तर मी जो प्रसंग लिहीलेला आहे तो पॉर्न या गटात मोडत नाही. का मोडतो? मोडत नाही की मोडतो? ही चलबिचल आहे.
हा प्रसंग प्रेक्षकाला titillate करायला लिहीलेला नाही. पण मग बलात्काराची दृष्ये तरी titillate करायला कुठे लिहीलेली असतात? जर तुम्ही बलात्कारास एक प्रकारचं पॉर्न म्हणत असाल तर मग खालील प्रसंगही पॉर्न आहे का? जर बलात्काराच्या दृष्यास जर पॉर्न म्हणत नसाल तर खालील प्रसंग पॉर्न नाही.

पूर्वी एका संस्थळावर हा प्रसंग व मुख्य अस्वस्थता शेअर केलेली होती. त्या लेखाचा काही अंश-
________________

खूप वर्षांपूर्वी, खरं तर लहानपणी "महानंदा" हा चित्रपट पाहीला होता पण तेव्हा सुदैवाने हा सीन सेन्सॉर केलेला होता. दूरदर्शनवर लागला होता. अर्थातच सेन्सॉर केलेला होता. आज परत आपलीमराठी वर पाहीला. व्यक्तीचित्रण अतिशय प्रभावी आहे. जयवंत दळवींसारख्या सिद्धहस्त लेखकाची कथा असल्याने चित्रपट उत्तम असणार यात वादच नव्हता. हा चित्रपट "बेंचमार्क" चित्रपट म्हणून नावाजलेला असल्याने आता कळत्या वयात पहायची उत्सुकता होतीच.
गोव्याच्या पार्श्वभूमीवर एका भावीणीची मुलगी व एक मराठीचा प्राध्यापक यांच्यामध्ये फुललेली प्रेमकथा आहे. जयवंत दळवी लिखीत असल्याने एक तरी वेडसर पात्र असणे जरुरीचे आहे. पण या कथेत २ वेडी पात्रे आहेत.
हे स्फुट चित्रपटाचे परीक्षण नाही तर एका प्रसंगाबद्दलचे मनोगत आहे.
सुदैवाने आतापर्यंत कधीच इतका अस्वस्थ करणारा प्रसंग कोणत्याही चित्रपटात मी पाहीला नाही. हा जो सीन (प्रसंग) मी लिहीते आहे तोदेखील इतका सखोल अस्वस्थ करणारा होता की मी तो पूर्ण पाहूच शकले नाही. गावात एक वेडसर भावीण आहे, जी लक्तरे ल्यालेल्या अवस्थेत, मांड्या कराकरा खाजवत फिरते. ती सदैव अन्न-पाण्याकरता भुकेली, वखवखलेली अशी चित्रीत केलेली आहे. याच गावात एक पोस्ट्मास्तर आहे जो सर्वांची खाजगी पत्रे चोरुन वाचतो.
प्रसंग असा होता की ही वेडसर मुलगी रस्त्यावर एका रिकाम्या खोलीच्या कडेला काहीबाही खात बसलेली आहे, मध्येच हसते आहे, कराकरा अंग खाजवते आहे. आणि पोस्टमास्तर तिचे अन्न हिसकावून घेऊन, तिच्या तोंडापाशी नेत पण तिला न देता तिला त्या रिकाम्या खोलीकडे भुलवत नेतो. कधी गडव्यातील पाण्याची धार तिच्या समोर ओतत, पण पाणी न देत तिला "ये ये" असे म्हणत तिला त्या खोलीत घेऊन जातो. आणि एखाद्या पशुसारखी ही मुलगी अन्न-पाण्याला भुलून, त्याचा कावा न ओळखता त्याच्या मागे मागे जाते.
मला हा प्रसंग बघवला नाही. खूप म्हणजे प्रचंड अस्वस्थता दाटून आली. अन्न-लैंगिकता- वेडसरपणा या तीनही प्रभावी (पोटंट) गोष्टींतून साकार झालेला, पोस्टमास्तरच्या विकृतीचे दर्शन घडवणारा तो प्रसंग मनावर अतिशय ओरखडे उठवून गेला.
जबरदस्त डिस्टरबींग सीन आहे. जयवंत दळवी लिखीत हा प्रसंग दिग्दर्शकाने फार ताकदीने चित्रित केलेला आहे एवढेच म्हणेन.

_________________
विनासंमती क्रौर्य, यातना
या प्रसंगात ती वेडी संमतीने जाते की भुलुन जाते म्हणजे संमती नाही म्हणावं? हा फार कन्फ्युझिंग आणि डीपली डिस्टर्ब करणारा सीन आहे एवढेच खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महानंदा सिनेमातला सीन आणि त्याचे पॉर्नमधे मोडणं किंवा कसे? हा प्रश्न अप्रस्तुत ठरावा.

लेखात म्हटल्याप्रमाणे 'कामोत्तेजक सार्वजनिक अभिव्यक्ती' ही पॉर्नची व्याख्या (मला पटलेली) लक्षात घेता तो सीन ह्या व्याखेत बसूच शकत नाही कारण त्या सीनचे प्रयोजन कामोत्तेजकता खचितच नाही.

वेगवेगळ्या प्रकारची माणसं आणि त्यांच्या प्रवृत्ती आणि मनोव्यापार प्रामाणिकपणे दर्शवणं हा मूळ हेतू त्या सीनमागचा आहे!

- (पॉर्न ओके असे मत असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी असेच मला वाटले (नंतर अधिक विचार करता). या सीनला अ‍ॅट बेस्ट दु:खाचे पॉर्न म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महानंदा पाहिलेला नाही पण हे दृष्य वाचताना कससंच झालं. पण अशी अस्वस्थता वर आणणारे दृश्य पॉर्न नाहीच. सहसा बलात्काराची दृश्ये अशी अस्वस्थता वा शिसारी यावी अश्या प्रकारे चित्रीत केलेली नसतात. काही अपवाद असतील, जसे बॅण्डीट क्वीन मधील दृश्य होते असे वाचनात आले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॉरीबल हॉरीबल दृष्य आहे अंतरा. फार त्रासदायक आहे.
खरं तर मला महानंदा सिनेमा अतोनात आवडतो. पण या दृष्यामुळे मी पहायचं धाडस करु शकतच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय सुंदर मांडणी असलेला आणि मनात असलेलं चपखलपणे मांडाणारा उत्तम लेख! विषेषांकातला आत्तापर्यंत भावलेला लेख!

- (पॉर्न ओके असे मत असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय स्पष्ट आणि सुंदर लेख. विशेषतः 'काय केले पाहिजे' आणि 'चांगल्या पॉर्नचे स्वागत आणि प्रसार करण्यासाठी काय करावे?' हे शेवटचे दोन परिच्छेद.
'स्त्रीवादी पॉर्न' हे नव्हतं माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वच्छ, वस्तुनिष्ठ, तर्कसुसंगत लेख. मांडणी, विचार, पारदर्शीपणा सगळंच आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण परदेशात बनवण्यात आलेल्या पॉर्न बघणे, त्यावर चर्चा करून त्यांतल्या चांगल्या पॉर्न कोणत्या हे ठरवणे आणि त्यांचा कळलाव्या पद्धतीने (viral) प्रचार करणे हे तर आपण करूच शकतो. परदेशात निर्माण करण्यात आलेले स्त्रीवादी पॉर्न भारतामध्ये स्वस्तात किंवा मोफत उपलब्ध करून द्यावे, म्हणून आपण त्या स्त्रीवादी पॉर्नच्या निर्मात्यांना आवाहन करू शकतो.

फारच क्रांतीकारी विचार आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला पॉर्नची व्याख्या 'कामोत्तेजक सार्वजनिक अभिव्यक्ती' अशी योग्य वाटते.

ही व्याख्या झाली पण प्रतिशब्द काय होउ शकतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

समतोल, प्रांजळपणा आणि संदर्भबहुलता हे मला अतिशय आवडलेले या लेखाचे विशेष.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन