जेव्हा माझ्या कर्जांना (एका बँकरचे गार्‍हाणे) - विडंबन

जेव्हा माझ्या कर्जांना उधळी मुजोर माल्ल्या
माझा न राहतो मी हरवून हा 'सहारा'

काँग्रेस भाळ होते, होती प्रफुल्ल दक्षी
ओढून कर्ज घेते, हे राष्ट्रवादी पक्षी
शरदास सिंचनाच्या नाही मुळी फवारा | जेव्हा माझ्या कर्जांना...

डोळे मिटून घेतो, पण व्याजही फिटेना
हे कर्ज कोट्यावधींचे, लाखांतही चुकेना
देऊन थकलो मी सारखा तुला इशारा | जेव्हा माझ्या कर्जांना...

नोटांस हा बिअरचा, का सांग वास येतो
जिवंत कॅलेंडराचा, नुसताच भास होतो
केव्हा किंगफिशरचा उगवेल सांग तारा | जेव्हा माझ्या कर्जांना...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

निवृत्तीच्या क्षणांना मी भयभीत होतो
निरोपांत येई विघ्न, की निष्कलंक जातो
लटके हवेत फंड, की हाती येतो
वरचे तसे निवांत, माझाच अंत होतो

- बँकर्सचा सहानुभूतीदार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुजवीण मज भासे व्यर्थ जीवनाचा पसारा
परतुन ये मल्ल्या, आमचा तुच एक सहारा

डोळे मिटुनी कागदपत्रांवर सह्या केल्या
वजन कीती ते बघुन फायली पुढे सरकवल्या
पोटात कीती फुकटच्या रक्तवारुणी ढकलल्या |तुजवीण मज भासे ....

दुवई, फुकेत, पटाया नावे घेऊ तरी मी कीती
पन्नाशी नंतर तुझ्या मुळे झालो मी ययाती
तू गेल्यावर मला विसरल्या शबाना आणि रती |तुजवीण मज भासे ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाण्ण!! भारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0