इराक

रक्ताचे एक दाट थारोळे सारे आकाश व्यापत चाललेले असते .
काळ्या छोट्या बाहुल्या कण्हत कण्हत
सूर्य ओढतात त्यातून कसाबसा,
त्यांच्या पावलागणिक ऐकू येतात
बॉम्बस्फोट , बायकामुलांचे आक्रोश, किंकाळ्या ,
रात्रीचे दार बंद होते . वेदनांच्या शहरातून गाडी बाहेर पडते.
हळूहळू आक्रोश दूर जातो . टेबलावर शुभ्र पांढरी पाकिटे:
आजची मेल, माझी वाट पाहत असते .
टीवीवर हास्याचे फवारे , जेवायला इडली-सांबार
मग आइस-क्रीम असा बेत.
मांजर जेवायची वाट बघत असते,
टक लावून!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नितिन कुलकर्णींच्या इथल्या दोन्ही कविता आठवल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

जबर कविता मिलिन्द
आनंद आनंद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0