एक प्रचलित लोककथा

काही नव-परंपरावादी करतात त्याप्रमाणे जर हरेक बाबीचे गौरवीकरणच करायचे ठरवले तर काहीही लिहिता येणे शक्य आहे. त्याचप्रमाणे जर चष्माच उलट लावला तर जी ती कथा,परंपरा वाईटच दिसू शकते. त्यांनी जर हरेक कथेचं गौरवीकरण केलं; तर त्याच्या उलटही करता येणं शक्य आहे; हे दाखवण्यासाठी हा धागा काढला आहे.
एका प्रसिद्ध कथेचा अन्वयार्थ लावायचाच तर पुढील प्रमाणेही लावता येइल.
**************************कथा सुरु**************************
अग्निपरीक्षा म्हणजे प्रत्यक्षात जाळून मारण्याचा प्रयत्नच वाटतो. ह्याच चष्म्यातून त्या कथेतल्या ठळक घटनांचं वर्णन मी केलेलं आहे.
.
.
एक असतो राजा . असतात त्याला चार राण्या. मोठा पुत्र लै व्रात्य, उद्दाम, बेमुर्वतखोर, अय्याश. संधी मिळेल तेव्हा तो क्रौर्य दाखवायला कमी करत नाही. त्याच्या हाती राज्य देणं म्हणजे बट्ट्याबोळ करणं. लग्न केल्यावर तरी कारटं सुधारेल असं वाटतं पब्लिकला. पोराचं लग्न लावून देतात. पण कसलं काय. हा सुधारत नाहिच. उलट बिचार्‍या पत्नीची जिंदगी व्हायला लागते खराब. तो तिला त्रास देत आपला सगळा राग तिच्यावर काढतो. बिचारी हतबल स्त्री.... करणार तरी काय. सोसत राहते. पब्लिक वैतागलेली असते. असल्या ह्या नालायक, खुनशी ,क्रूर माणसाला राज्यातून घालवून द्यायचं शेवटी राज्यातले लोक ठरवतात. घालवतातही. वनवासात जा म्हणतात तेरा वर्षांच्या. अर्थात तो राजकुमार इतका ड्याम्बिस असतो की जाताजाता बापाला, म्हंजेच राजाला विष घालतो. म्हातारा राजा विषप्रयोगानं खंगून खंगून मरतो. आणि इकडे हा राज्याबाहेर घालवलेला टग्या एकटा जात नाही. सोबत दुसर्‍या तशाच टग्या भणंग धाकट्या सावत्र भावाला घेउन जातो. शिवाय अशा खडतर वनवासात बिचार्‍या त्या मुलीलाही म्हणजे पत्नीला घेउन जातो. तिला नाही म्हणायचीही सोय नाही. शेवटी एका दूरच्या बेटावरच्या कुठल्याशा राजाला तिची दया येती. तो तिला सोडवायला म्हणून येतो. हा टग्या नि त्याचा तसलाच भाउ घरात नसताना तिला घेउन जातो. व्यवस्थित बडदास्त ठेवतो. काहीही गैरप्रकार करत नाही.सज्जनतेने वागतो. पण इकडे ह्या टग्याचे डोके फिरते. "अश्शी कश्शी गेली पोट्टी मला सोडून" असं त्याला वाटतं. खुनशीपणा जागा होतो.
तिला वाचवणार्‍या त्या दूरच्या बेटावरच्या राजाला तो धडा शिकवायचा ठरवतो. पण धडा शिकवणार कसा ? आपण असे हद्दपार.
आणि तो सहृदयी राजा... बेटाचा राजा ससैन्य. आपली औकात ती काय ?
पण समानशीले व्यसनेषु सख्यम्.
त्याला अजून एक रानटी जमातीचा रानोमाळ भटकरणारा , वानरांसारखा दिसणारा प्रमुख भेटतो. ह्याला त्याच्या उपद्व्यापांमुळे जमातीच्या प्रमुखानं हाकललेलं असतं. जमातीच्या प्रमुखाचा हा सख्खा धाकटा भाउ असतो. झालं. दोघं ठरवतात दग्यानं खून करायचा जमातीच्या प्रमुखाचा. प्लान अंमलात आणतातही. आणि आख्खी जमात कब्जात घेतात.
.
.
ह्या जमातीतल्या वानरांसारख्या चपळ असणार्‍या लोकांना घेउन हा इसम त्या बेटावर हल्ला करायचं ठरवतो. जमातीतल्या लोकांच्या जीविताची तशीही फिकिर करण्याची ह्याला गरज नसतेच. करा म्हणतो हल्ला. हे रानटी जमातवाले कशीबशी इलुशी खाडी पार करुन बेटापर्यंत पोचतात. तिथे सुसभ्य, नागरी समाज नांदत असतो. (प्रगत , नागर समाज असल्याची वर्णनं "सोन्याचे बेट" लेबलमध्येच आहेत मुख्य ग्रंथात )तो ह्यांच्याच्यानं बघवत नाही. नुसता वानरविचका करायला लागतात. मोठं युद्ध वगैरे होतं. हे बट्ट्याबोळ करतात बेटाचा. कशासाठी करतात ? कारण त्या बेटावरच्या राजाला एका रानोमाळ भटकणार्‍या स्त्रीची -- त्या टग्या राजकुमाराच्या पत्नीची मदत कराविशी वाटली म्हणून ? असो.
तर युद्ध होतं; प्रगत , सुस्थिर नागर सुसभ्य समजाचा बट्ट्याबोळ होतो परक्या भटक्या खुनशी आक्रमकांमुळे.
.
.
आता तो बेटाचा राजा मेलाच आहे म्हटल्यावर हा टग्या राजकुमार आपल्या पत्नीला ताब्यात घेतो. एक अप्रत्यक्ष सवाल असतो -- "अब बचके कहां भागेगी" शेवटी तिच्या आयुष्याचं वाटोळं ठरलेलच असतं. दुसर्‍यासोबत पळून जातेस काय ? आधीची जिंदगी बरी वाटेल असे तुझे हाल करतो बघ आता; असं हा टग्या राजकुमार म्हणतो. आधी मी तुला माझ्यासोबत रानोमाळ भटकवत होतो. आता फेकावी हिला एकटिला भटकायला दूर जंगलात; असं मनाशी ठरवतो.
परत जाउन आपलं वरिजनल राज्य ताब्यात घेतो. "कसं घेतो " विचारु नका. त्याला आता नाही म्हटलं तर तो काय नृशंस धुडागूस घालतो हे पब्लिकनं पाहिलेलच असतं. आपले हाल त्या सुसभ्य संस्कृती असलेल्या बेटासारखे होउ नयेत; म्हणून लोक निमूटपणे त्याला झेलायला लागतात.
.
.
इकडे हा त्या बिचार्‍या स्त्रीला फेकायचं निमित्त शोधतच असतो. निमित्त मिळतं आणि अत्यंत अवघड अशा प्रसंगी, अवस्थेत तिला जंगलात सोडणयत येतं. गरोदर स्त्रीशी शत्रूदेखील असे वागणार नाहित; इतकं हे क्रौर्य.
.
.
दरम्यान लोक आपल्याला घाबरत असले तरी माघारी वाईट साइटच बोलतात; ह्याची टग्याला जाणीव होते. तो म्हणतो बोला, भुंका लेको. किती बोंबलाल? तुम्ही असे पर्यंत तुमचे आवाज राहतील. नंतर काय ? नंतर मात्र लिखित परंपरा कायम राहिल. माझ्याबद्द्दल जे लिहिलं गेलय ते खरं मानण्यात येइल. तोंडी गप्पा हवेत विरुन जातात. लिखित बाबी अधिक काळ टिकतात. आता बघा लिखित बाबींची मज्जा. असं म्हणतो.
.
.
एका भयम्कर मोठ्ठ्या खुनी दरोडेखोर आणि जगभरचे न जाणो कोणकोणते गुन्हे केलेल्या माणसाला तो रिक्रूट करतो. सदर माणूस जबरदस्त पिसाट खुनी असतो. एक खून केला की एक खडा रांजणात टाकयाचा असे हा करत असतो. असे सात रांजण त्यानं भरलेले असतात. किती हे क्रौर्य!
अर्थात ह्या खुनशी माणसाकडे एक मोठ्ठा प्लस पॉइण्ट असतो. त्याला लिहिता वाचता येत असते. त्याकाळी ही बाब कमी प्रचलित असावी.शेवटी विन-विन सिच्युएशन येते. टग्या राजा म्हणतो तू मला महान म्हण, माझी स्तुती कर, आरती ओवाळ. मला परमेश्वर म्हणून सर्टिफाय कर. मी तुला परमेश्वराचा मेसेंजर, थोर ऋषी वगैरे म्हणून सर्टिफाय करीन. झालच की. फारच सोप्पं.हा म्हणतो म्हणून तो परमेश्वर. आणी परमेश्वर म्हणतो म्हणून हा परमेश्वराचा दूत्/ मेसेंजर. भले शाबाश. सर्क्युलरता जिंदाबाद.
.
.
कथा लिहिली जाते. टग्या राजाला देवबिव घोषित करणयत येतं. त्यानं ज्या लोकांना छळलं त्यांचे वंशजही उलट त्याला देव बिव मानू लागतात.
.
उल्लेखित सर्व घटना ऑल्मोस्ट जशाला तशा त्या थोर ग्रंथात आहेत.
**************************कथा समाप्त**************************

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.875
Your rating: None Average: 3.9 (8 votes)

गरोदर स्त्रीशी शत्रूदेखील असे वागणार नाहित; इतकं हे क्रौर्य.

गरोदर स्त्रीशी शत्रू नक्की किती क्रौर्याने वागतात याचे कै परिमाण आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नरोडा पटिया अन कौसर बानू असलं काहीतरी ऐकलंय खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ROFL ROFL मेले मनोबा हसून फक्त जीव जायचा बाकी आहे. वानरविचका काय, ट्ग्या काय, नृशंस धुडगूस काय.
आजपासून पठण बंद Wink
___
धागा फार आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजपासून पठण बंद

काश एका विशिष्ट प्रकारचे लोकही तुमच्यासारखा विचार करते....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छानच लिहीले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटाइत काकांची हिंदी लहेजावाली मराठी आवडाते. पण दरवेळी गौरवीकरण का करायचे ते समज्त नाही. जर हरेक बाबीचे गौरवीकरणच करायचे ठरवले तर काहीही लिहिता येने शक्य आहे. त्याचप्रमाणे जर चष्माच उलट लावला तर जी ती कथा,परंपरा वाईटच दिसू शकते. त्यांनी जर हरेक कथेचं गौरवीकरण केलं; तर त्याच्या उलटही करता येणं शक्य आहे; हे दाखवण्यासाथी हा धागा काढला आहे.
रामायणाचा अन्वयार्थ लावायचाच तर पुढील प्रमाणेही रामकथा साम्गितली जाउ शकते.

किमान ऐसीवर तरी "हिंदू धर्माला दुष्ष्ष्ट वैट्ट दाखवता येतं बरं का" याला टाळ्याच पडतील. ते एक असोच.

मेन मुद्दा इतकाच, की एकूणच चष्म्याचे दुष्परिणाम पहा, हा इंटेंडेड इफेक्ट होणे अवघड वाटतेय. पर्सेप्शन वुड बी मोर लैक- चुकीचा चष्मा घातला की असेच दिसते. आमचा चष्मा बरोबर आहे.

आणि हे सगळे उघड लिहिण्याच्या डेरिंगबद्दलही मनापासून अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अभिनंदन.

अशा प्रकारचे पर्यायी दृष्टिकोन वापरून गोष्टी लिहिणं हे नवं नाहीय. भारताला तर नाहीच नाही. एकाच महाकाव्याला एखाद्या पटासारखं वापरून, त्यातल्या पात्रांची सर्वदूर लोकप्रियता वापरून घेऊन, त्याकरवी निरनिराळ्या समूहांच्या गोष्टी सांगण्याचं हे कसब अतिशय अतिशय जुनं आहे. रामायणा-महाभारतासारख्या काल्पनिक महाकाव्यांच्या गोष्टी निरनिराळ्या दृष्टिकोनांतून सांगणार्‍या आवृत्त्या तर लोकमान्य आहेतच. पण इतिहासाचंही पुनर्कथन पुन्हापुन्हा होत असतं, त्यासाठी कळत-नकळत माध्यमं परिणामकारकपणे वापरली जातात, त्यातून काही प्रदेशांच्या अस्मिता अलगद विणल्या जातात... हेही वास्तव आहे. (रोचना यांना आमंत्रण. त्यांनी त्यांचा कळपाट बडवला, तर फार फार बरं होईल. माझं अनभ्यस्त लेखन त्याशिवाय थांबणार नाही. त्यांनी ही धमकी हेच अगत्याचं आमंत्रण समजावं. ;-))

अगदी अलीकडच्या साहित्यातही हे आहेच की. खाली अदितीनं चि.विं.च्या लंकेबाबतच्या लेखनाचा उल्लेख केला आहे. तशीच 'वायफळाचा मळा'मधली त्यांची चिलया बाळाबद्दलची गोष्टही अशीच आहे. त्यात मुक्त हस्ते त्यांनी त्या मूर्ख कहाणीची जी काही रेवडी उडवलीय ती अशक्य भारी आहे. संजय पवार यांचं एकलव्याबद्दलचं नाटक, 'शिवाजी इन भीमनगर मोहल्ला' हे संभाजी भगतांचं नाटक, 'यदाकदाचित'सारखं मुख्य धारेतही लोकप्रिय झालेलं संतोष पवारांचं नाटक... ही आणि काही उदाहरणं.

या प्रकारच्या कथनानं आणि लेखनानं जो विविधरंगी-निरनिराळ्या पोताचा उभेआडवे धागे असलेला अस्सल भारतीय सर्वंकष असा पट विणला आहे, तो अद्भुत आहे. हल्लीच लोकांच्या भावनांची पोसलेली गळवं ठसठसत असल्यामुळे असलं मुक्त सुरातलं लेखन थांबल्यासारखं झालं आहे. त्या जातीचं लेखन करून त्यामागचे अन्वयार्थांचे लवचीक रस्ते धीटपणे दाखवून दिल्याबद्दल मनोबाचं अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रतिसाद अतिशय आवडला. पुराणकथांची अनेकांनी अनेक अंगांनी चित्रणं केली आहेत. अगदी भवभूतीच्या उत्तररामचरितापासून कुसुमाग्रजांच्या कौंतेयपर्यंत अनेकांनी आपापल्या प्रतिभेनुसार नायक/नायिकांना खलनायक/नायिका आणि खलनायकांना नायक बनवून दाखवले आहे. कित्येक खलमानवांच्या खलप्रवृत्ती धूसर करून टाकल्या आहेत तर नायकांच्या सुवृत्तीची कौतुकाची कोंदणे खणून काढून त्या जागी महत्त्वाकांक्षा, असूया याची पुटे चढवली आहेत. कौंतेय मध्ये मला वाटतं, कर्ण एका जागी कुंतीला 'तू फक्त मादी आहेस, मादी' असं म्हणताना दाखवला आहे.(चूभूदेघे.)
तेव्हा, हे घडतच असतं. फक्त काळाच्या आधी घडलं की दगड झेलावे लागतात. दगड मारणार्‍यांचं मतपरिवर्तन त्या त्या काळात होऊ शकतच नाही. मग पर्याय एकच. दगड ही फुलंच, म्हणून स्वीकारणं. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अग्निपरीक्षा म्हणजे प्रत्यक्षात जाळून मारण्याचा प्रयत्नच वाटतो.

जर अग्निपरीक्षा = जाळून मारणे हे इक्वेशन घेतले तर "अग्निपरीक्षेत शुद्ध झाल्यावरही त्याग केला" याची संगती कशी लावणार? की तो नंतरचा कव्हर अप मानणार? नै म्हणजे पूर्ण काळाच दाखवायचा तर..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही कथा कशाबद्दल आहे हे बॅट्या तुझं इन्टरप्रिटेशन आहे, माझं आहे. हा धागा पूर्ण ललित आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसे असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जबरदस्त!

ही लोककथा याच दृष्टिकोनातून जास्त पटणेबल वाटते.

या अल्टरनेट हिस्ट्री प्रकारच्या कथनाला एकच नियम घातला पाहिजे - कोणत्याही घटनेला "प्रक्षिप्त" म्हणून सोयिस्कर वगळावगळी नाय करायची. सगळंच्या सगळं साहित्य वापरूनही पदार्थ रुचकर झाला पायजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कथा आवडली. वेगळीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हीच कथा, पलिकडे ते मिसळपाव चापीत बसलेले आहेत ना, त्यांच्यासमोर वाचून दाखवा. नंतर झालेला राडा वाचायला मज्जा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या मजेची व्याख्या भलतीच स्फोटक असेल तर मग असहिष्णुता आहे का नाही हे तपासण्यासाठी चिक्कार विदा मिळेल. तुमच्या मजेची व्याख्या गुळमुळीत असली तर सहिष्णुता निश्चितच आहे.

मनोबा, चिविंचं लंकावैभव नावाचं पुस्तक आहे. जरूर वाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मिसळपाववर अवलिया यांनी कुरुक्षेत्रावरील गीता सांगण्याच्या प्रसंगावर एक विडंबन लिहिले होते असे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ही रावणायणातली कथा दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे काय हे मनोबा ... हसून हसून गाल दुखायला लागले माझे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग नको हसूस ना गालातल्या गालात Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय अर्धवटपणा आहे हा?

गरोदर अवस्थेतही सगळे घरकाम करायला लावणे, अनैसर्गिक शरीरसुखाची मागणी करणे अशा त्रास देण्याच्या प्रकारांमुळे ती संधी मिळताच पळून जाते हा पाठभेद माहित नाही अन् म्हणे क्रौर्य.
वनवासात असतानाही सहृदय राजा येऊन वाचवत-बिचवत नाही. नवर्‍याच्या अनुपस्थितीत दीर त्रास द्यायला लागतो म्हणून तेव्हाही ती पळून जाते आणि शिकारीला आलेल्या राजाच्या छावणीत शिरते. व्हाईट जसं फुल्टू व्हाईट रंगवतात तसं डार्कपण कसं फुल्टू डार्क पाहिजे. बाकी आयड्या आवडली.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मनोबानी ही लिहीली होती की खफ वर पूर्वीच.

मनोबा कथा चांगली आहे आणि ती खरी असण्याची शक्यता पण खुप आहे.

तरीपण

मनोबा - तू पटाईत काकांसारखे सॉफ्ट टारगेट निवडलेस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा नाही वाचली अजून पण नाव वापरण्यात चूक झाली असे वाटते. शक्य झाल्यास नाव काढून योग्य तो context टाका. याची इतरही काही कारणे आहेत, पण जनरल शिष्टाचार हे कारण सध्यापुरते देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खफवर वाचलेली खरड म्हणून.पण विपना कशाला आणलंय उगाचच? तसे रामायणातल्या घटनांवर खासगीत विनोद केले जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्ली आमच्या संस्कृतीवर अनेक लोक सराइत पणे हल्ले करण्यात पटाईत झाले आहेत.
पटत नाहीच पण नाइलाज आहे
करणार काय करु शकलो असतो तर दाखवुन दिले असते.
ठीक आहे आम्ही लोकशाहीत राहतो आमचेही व्यवसाय आहेत आमचेही "राम" देव च आहेत
सत्ययुगात या मग बघुन घेतो.
संस्कृतीवादी संस्कृतीरक्षक सुसंस्कृत
मारवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर हरेक कथेचं गौरवीकरण केलं; तर त्याच्या उलटही करता येणं शक्य आहे; हे दाखवण्यासाथी हा धागा काढला आहे.

बास मित्रां आज जिंकलस तु मला...! सत्याचा विपर्यास करणार्‍यांवर आज तु एक खाडकन मुस्काटात ओढली आहेस, अर्थात त्यांची उतरली असेल तरच त्यांना याची जाणीव झाली असेल, नसेल तर अजुन असे धागे तु लिहणे भाग आहे. जेणे करुन लक्षात येइल की वैयक्तीक अजेंड्यासाठी अशा व्यक्तीरेखा टार्गेट करणे आता तरी सोडले पाहीजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मनोबा तु आयडी बदलून ".." का झालास?
अर्थात आयडी बदलला तरी तुझी लेखनाबद्दलची जबाबदारी टळत नाही. ती तुझ्यावरच रहाते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पटाइत काकांची हिंदी लहेजावाली मराठी आवडते. पण दरवेळी गौरवीकरण का करायचे ते समज्त नाही.

हे पहिले वाक्य कशासाठी उगाचच गोडगोड. हे म्हणजे अ‍ॅप्रेझल कॉमेंट सारखे झाले. जर टोला च द्यायचा आहे तर थेट टोलाच द्यावा ना, त्या आधी तुमचे डोके कीती गोल गरगरीत आहे अशी साखरपेरणी कशाला?

असे म्हणतात की "पण" ह्या शब्दाच्या आधी बोललेल्या वाक्याला काहीही अर्थ नसतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे म्हणतात की "पण" ह्या शब्दाच्या आधी बोललेल्या वाक्याला काहीही अर्थ नसतो

काय तेजायला जबरदस्त वाक्य आहे हे.

या वाक्यातले पहिले ३ शब्द काढून टाकायला हवे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेम ऑफ थ्रोन मधले असावे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंतर लेखकाचे नाव गायब. मग लेखाचे ओरीजनल टायटल गायब, मनोबा काय चालवलेस हे ? उद्या ही लिहलेली कथा पण बदलशील बे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

कथाही बदलली तर ऐसीवरचा गिरिश कुबेर म्हणावं काय? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझा ऐसीबाबत अभ्यास कमी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

.. __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोनोबा मस्तच रे.
पण नाव बदललं हे काही फार पटलं नाही. असो नावात काय आहे म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त ३ ओळी दिसतत.. आधीच्यांनी काय वाचून प्रतिसाद दिले आसत ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या प्रत्यक्षातल्या व्यक्तीचा सदस्यनामात वापर करणं ही कदाचित कायद्यानुसार अब्रूनुकसानीयोग्य कृती ठरेल. त्यामुळे ती टाळावी ही व्यवस्थापनाकडून विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुरुस्ती केली आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबा मनोबा टरकलास का?
कुबेरांच्या गिरीशमागे लपलास का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहीलंयस मनोबा. आयडी कशाला बदलायचा? 'मनोबा' हे तसंही तुझं टोपणनाव, मग डबलढक्कन कशाला पायजे रे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंटेंटला व्हाइट्वॉश देणे आणि नंतर आय्डी बदलणे हे वाढत्या असहिष्णुतेचे पुरावे मानावेत काय?

टीप - शीर्षक बदलले हे मात्र योग्यच. पूर्वीचे शीर्षक फारच वैयक्तिक झाले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वी लोकांनी भृसुंडी रामायणही पचवलेलं आहे. त्यापुढे हे काहीच नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भृसुंडी रामायण

लिंक, विदा, इ. असल्यास देणे.

बाकी बंगालात रामायण + महाभारत या दोहोंचे कंबाईन्ड एक अतिशय अश्लील निरूपण प्रचलित आहे त्याला 'महायन' किंवा बाँग अ‍ॅक्सेंटमध्ये 'मोहायोन' असे म्हणतात. एका मिनिटापलीकडे ऐकवले गेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लिंक नाहीये, पण शुचिने म्हटल्याप्रमाणे 'मेनका' मासिकातच क्रमशः वाचले होते. मला वाटतं की आनंद साधले लेखक होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेनका मधील भृशुंडी रामायणावरचा एक मोठ्ठा उतारा मी वाचला आहे. एरॉटिक होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरं झालं व्हाईट वॉश दिलास आता काही बालकांच्या मनावर परीणाम होणे टळेल. अगदी इच्छा असेल तेच जाऊन वाचतील वर अवैधानिक चेतावनी का काय तीही दे की कोवळ्या मनांवर परीणाम होऊ शकतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण दरवेळी गौरवीकरण का करायचे ते समज्त नाही. जर हरेक बाबीचे गौरवीकरणच करायचे ठरवले तर काहीही लिहिता येणे शक्य आहे. त्याचप्रमाणे जर चष्माच उलट लावला तर जी ती कथा,परंपरा वाईटच दिसू शकते. त्यांनी जर हरेक कथेचं गौरवीकरण केलं; तर त्याच्या उलटही करता येणं शक्य आहे; हे दाखवण्यासाथी हा धागा काढला आहे.

गौरवीकरणाला उपरोध म्हणून अधिक गौरवीकरण केले जाते.
विकृतीकरणाला उपरोध म्हणून अधिक विकृतीकरण केले जाते.

वरील लेख विकृतीकरणाला उपरोध आहे हे स्पष्ट आहे.

आता एखाद्या साहित्यातील काळाला धरून नसलेली तरीही लोकांकडून गौरवली जाणारी गोष्ट दाखवून देणे .. जसे पंचकन्यांबाबतचे काही प्रतिसाद.. हे तुम्हाला विकृतीकरण वाटते का? कारण त्याला समोर ठेवून केलेला हा उपरोध आहे हे स्पष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. मी सत्यनारायण कथेचे गौरवीकरण केले याला पुरावा काय. एक अक्षर न बदलता कथेत जे लिहिले आहे तेच सांगितले आहे.
२. सत्याचा पुरस्कार करण्यात मला तरी गौरव वाटतो.
३. सामान्य जनता धार्मिक वृत्तीची आहे, धार्मिक कथा जर त्यांना सलोख्याने राहायला सांगते, एकत्र सलोख्याने राहण्याचा संदेश देते, त्याचा गौरव करण्यात काय गैर.
४. धार्मिक कथा चांगला संदेश देणारी असेल तरी त्याचा विरोध करणे म्हणजे पुरोगामित्व कि मानसिक विकृती. थंड डोक्याने विचार करा. तुमचे उत्तर तुम्हाला मिळेल.

पहिले वाटले, कागज कोरा आहे, पण नंतर माउसचा उपयोग केला तर लेख दिसला. एवढेच म्हणेल विकृती प्रत्येकात असते, संस्कार म्हणा / नैतिकता म्हणा/ धर्म म्हणा, माणसाला विकृती पासून दूर ठेवतात. पण काहीना हे शक्य होत नाही. एक स्वरूप जे दिवसा दिसते आणि एक स्वरूप रात्रीचे असते. आपल्या रात्रीचे विकृत स्वरूप स्वत:च्या नावाने दाखविणे शक्य नसते. मग असे काही तरी नाव घेऊन काही तरी विकृत लिहायचे. याला हास्य , व्यंग , विडंबन किंवा विकृती काय म्हणावे. दलित आदिवासी वनवासी समजाला, भटकी रानटी टोळी म्हणणे तुमची मानसिक अवस्था काय आहे हे दाखविते. एकांतात बसून शांत डोक्याने विचार करा. तुम्हाला उत्तर अवश्य मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सत्यनारायणाची ओरिजिनल कथा कुठे वाचायला मिळेल? इथे लिंक वगैरे देऊ शकता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या विधान क्र. १ ला पुरावा तुमचीच पुढची ३ विधाने.
जर १ मधे म्हणताय की गौरवीकरण केलेले नाहीये मग पुढे जस्टीफिकेशन कशासाठी?? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“War is peace.
Freedom is slavery.
Ignorance is strength.”

“Doublethink means the power of holding two contradictory beliefs in one's mind simultaneously, and accepting both of them.”

― George Orwell, 1984

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सर्व वाचक , प्रतिसादकांचे आणि माझ्या मनःस्वास्थ्याची काळजी करणार्‍या हितचिंतकांचे आभार.
@बॅटमॅन

गरोदर स्त्रीशी शत्रू नक्की किती क्रौर्याने वागतात याचे कै परिमाण आहे का?

युद्ध, आपात्कालिन स्थिती , इतकच काय अपहरणाच्या केसेसमध्येही स्त्रिया, लहान मुले ह्यांना विशेष वागणूक दिली जाते खूपदा. देणे अपेक्षित असते. अलिखित नियम. स्त्रिया व मुले ह्यांच्यापेक्षाही अधिक प्राधान्याची सौजन्याची वागणूक गरोदर स्त्रीला असते. अगदि युद्धात गुंतलेल्या शत्रू देशाकडूनही.

@मेघना:-
विशेष आभार. खच्चून भरलेले संदर्भ व विचारपूर्वक दिलेला प्रतिसाद आवडला. ह्याहून अधिक काही लिहिणे/सांगणे अवघड. रोचना ह्यांना वेळ मिळाला तर फार बरं होइल.
@आदुबाळ :-
लेखाच्या शेवटी जो भाग आहे. त्यामुळे एक जस्टिफिकेशन इतर घडामोडिंना देता यावं. की घडलेल्या घटना योग्य त्याच रंगात रंगवण्याचच कंत्राट मूळ लेखकानं घेतलय.मूळ लिखाण हेच डिस्टॉर्शन आहे; अस्दा दावा करता यावा. (ह्याबद्दलचे पॉइण्टर्स, मूळ कथेतच आहेत.)पण हो, आल्टरनेट हिस्ट्रीची कल्पना इंट्रेस्टिंग आहे.
@तिमा --
काय की. मी काही टाक्णार नाही इतरत्र. इतर कुणी कॉपी पेस्ट करुन टाकला; तरी तक्रार करनार नाही ह्याने माझा लेख ढापला म्हणून. तुम्ही टाकलात तरी चालेल.
**प्रतिसाद अपूर्ण**

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युद्ध, आपात्कालिन स्थिती , इतकच काय अपहरणाच्या केसेसमध्येही स्त्रिया, लहान मुले ह्यांना विशेष वागणूक दिली जाते खूपदा. देणे अपेक्षित असते. अलिखित नियम. स्त्रिया व मुले ह्यांच्यापेक्षाही अधिक प्राधान्याची सौजन्याची वागणूक गरोदर स्त्रीला असते. अगदि युद्धात गुंतलेल्या शत्रू देशाकडूनही.

जिनेव्हा कराराचे नियम अगोदरही लागू होते हे पाहून भडभडून वगैरे आले. नक्की कुठली पुस्तके वाचता हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

@थत्ते --
अवलियाचा धागा शोधावा म्हणतोय. फुरसतीत शोधतो. तुमच्याकडे लिंक असेल तर तोवर दिलीत तरी चालेल.
@वल्ली --
मूळ कथा त्यातील पात्रं ह्यांची नावं घेणं टाळतोय. ग्रीक लोकांच्या भावना दुखावतील. ट्रॉय पिक्चर पाहिलास का ब्रॅड पिट वाला. त्याच्याशीही किंचित साम्य आहे म्हणे ह्या धाग्याचं.
@ननि --
काहीही हां नि.
@ रेड बुल --
हम्म. म्हंजे.... कथा दोन्ही बाजूनी डिस्टॉर्ट करणं शक्य असतं; असं म्हणतो अहे.
@ तिमा --
भृशुंडी रामायणाबद्दल ठौक नव्हते. नवीन माहितीबद्दल आभार.
@बाळ सप्रे --
विक्रुतीकरण की काय ती नेमकी टिप्पणी नाही करु शकत. पण मूळ पंचमहाकन्यांच्या कथेचं कितपत डिस्टॉर्शन केलय ते पहावं लागेल. त्या धाग्यावर मला वाटतं पंचमहाकन्या कोण हाच अजून वाद सुरु आहे.(मर्यादित काळ जाल अ‍ॅक्सेस असतो, सर्व धाग्यांतले सर्व प्रतिसाद वाचून होत नाहित.)

**************प्रतिसाद अपूर्ण**************

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(मर्यादित काळ जाल अ‍ॅक्सेस असतो, सर्व धाग्यांतले सर्व प्रतिसाद वाचून होत नाहित.)

माहितीपूर्ण अशी काहीतरी श्रेणी देण्यात आली आहे ह्या वाक्यासाठी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

. त्या धाग्यावर मला वाटतं पंचमहाकन्या कोण हाच अजून वाद सुरु आहे

असे असते तर धाग्याकडे ढुंकुनही बघितले नसते पण वाद पंचमहाकन्या कोण हा नसुन महाकन्या कोण असा काहीसा वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

@पटाइत काका --
चिंतातुर जंतूंचा http://www.aisiakshare.com/node/5076#comment-128416 हा प्रतिसाद विचार करण्यासारखा वाटला. शिवाय होतय काय, एखादा वाईट भाग दाखवून दिल्यास आपण तो तेवढा भाग प्रक्षिप्त आहे, भेसळ आहे, बाहेरुन घुसवला आहे, असं म्हणून मोकळे होतो. पण तो खरोखरच प्रक्षिप्त आहे,ह्याबद्दल अधिक पुरावा , संदर्भ देता आले तर दाव्याला बळ मिळतं. नाहितर हरेक वाईट बाबीला "ती बाहेरुन आलेली भेसळ आहे" हेच म्हणण्याचा पॅटर्न तयार होउ शकतो. ह्यातून होतं काय, की एक अनावश्यक दबाव तयार होतो "नॅरेटिव्ह"चा. की मूळ ग्रंथ, कथांना चांगलच म्हणलं पाहिजे. वेगळ्या भाषेत सांगायचं तर अडचणीचे प्रश्न विचारता कामा नयेत.
ह्यामुळे जगभरात एका पंथाच्या प्रेषिताला "द परफेक्ट" लेबल लावलं जात आहे. आधी त्यांना परफेक्ट म्हणायचं आणि मग पुढे काय ते बोलायचं असा दबाव वाढतो. ह्यात एक उदाहरण http://www.aisiakshare.com/node/2157 ह्या धाग्यात "खुदा के लिये" ह्या चित्रपटाचं लिहिलेलं आहे.
तशी अवस्था जगातील मोठ्या भूभागात एका पंथाची झालेली आहे. इतरत्रही तसेच होउ नये; अशी इच्छा आहे.(वाईट भाग हा प्रक्षिप्त होता, ह्याचे संदर्भ मिळाल्यास मत बदलायला तयार आहे. )
बाकी, मला असं वाटतं एकमेकांशी बोलताना "तुझं अमुक पटतं/पटत नाही; तुझ्या लिखाणात अमुक अमुक चुका आहेत " असं सुचवलत तर जास्त सोपं होतं बोलणं . एकदा एकानं विकृत वगैरे म्हण्णं, आणि समोरच्यानं एकदम त्वेषानं उत्तर देणं ह्यातून बोलणं/गप्पा/संवाद मागे पडून भांडणं होतात. त्यामुळे त्याला उत्तर देत नाही. दलित आदिवासी वनवासी हे वाईटच असतात; असा समज असेल तर तो समज चुकीचा आहे, इतकच सुचवतो. त्या समाजगटातलं एक पात्र जे वागतं, त्याच्या वागण्याचं हेसुद्धा एक इंटारप्रिटेशन असू शकतं; इतकच सुचवत आहे. आणि त्यांनी उध्वस्त केलेला प्रदेश--बेट सुसंस्कृत, नागर होता, होता, ह्याचे तिथेच उल्लेख आहेत ना. आणि हेच इंटारप्रिटेशन बरोबर आहे, असं कोण म्हणतय . "उपलब्ध तथ्यांद्वारे असाही अर्थ होउ शकतो. तितपत स्कोप आहे" असं म्हणतोय. ह्याउप्पर माझ्या मानसिक अवस्थेची काळजी करण्यबद्दल आभार.
.
.
गप्प बसवत नाही, आणि मग लिहितो. कुनालाही दुखवायला नको वआटतं. पण गप्पही बसवत नाही. मग घोळ होतो. लोकं नाराज होतात. म्हंजे मग लोकांचे दोन प्रकार होतात माझ्या नजरेतून नाराज असलेले, आणि नाराज नसलेले. मित्र-दोस्त असे नाहिच. भरभक्कम पाठिंबा वगैरे काही कुठून मिळत नाही. सगळ्यांशीच गोड राहण्याच्या नादात सगलेच नाराज किम्वा अलिप्तवाले राहतात. विचित्र गोची आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण तो खरोखरच प्रक्षिप्त आहे,ह्याबद्दल अधिक पुरावा , संदर्भ देता आले तर दाव्याला बळ मिळतं. नाहितर हरेक वाईट बाबीला "ती बाहेरुन आलेली भेसळ आहे" हेच म्हणण्याचा पॅटर्न तयार होउ शकतो.

अगदी अगदी. त्यामुळे दोन्ही बाजूने विधाने तपासून घेतली पाहिजेत, नाहीतर हरेक बाबीला "ती तिथे आहेच" असे म्हणण्याचा पॅटर्न तयार होऊ शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काहीही? तुमच्या प्रचलित कथेत तिला जंगलात सोडूनच द्यायचे होते तर झक मारायला युद्ध करायला कशाला गेला तो? की बाईने स्वतःच सुटकेची धडपड करणे हे तुमच्या कथेतसुद्धा काहीही आहे? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जंगलात सोडायचं होतं तर इतकी रिस्क घेऊन युद्ध करण्याची गरज नव्हती.
यामुळे कथा भुसभुशीत झाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे ऑनर किलिंग असावे काय ? ह्म्म

(आधी घरी चल मग बघतोच Wink )
बादवे, त्या भरताचे काय करावे. तो पादुका ठेवून राज्य करत होता म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

मजा आ गया.

त्या बेटा वरच्या सुसंस्कृत राजाला सुद्धा एक वाया गेलेला भाऊ होता कि काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला या धाग्याच्या फक्त पहिल्या तीनच ओळी दिसताहेत.
पूर्ण धागा कुणी दिसता करू शकेल काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पांढर्‍या अक्षरामधे लिहिलाय पुढचा सगळा मचकूर. का कोण जाणे..
सिलेक्ट करुन वाचा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगले आहे कल्पनारंजन. पण यात धाडसाचा काय भाग आहे ?
मुख्य मजकूर पांढरया अक्षरात का लिहिला आहे समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे असे करणे म्हणजे पुरेश काळजी घेणे आणि अ‍ॅट द सेम टाईम धाडसही दाखवणे आहे अशी धारणा असावी बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक खवचट श्रेणी माझ्यातर्फे! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एक खवचट श्रेणी माझ्यातर्फे! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मनोबा - लोक खुप खेचतायत तुझी, आता पुन्हा काळ्या शाईत टाक तो लेख आणि टवाळखोरांची तोंडं बंद कर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबा आपल्या मूळ अवतारात परत आलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण गेला कधी होता जो परत आये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माघारतज्ञाची माघार Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0