पु . ल . तुमच्यासाठी!

महाराष्ट्राचे लाडके दैवत
मनापासुनी हा केला गौरव

‘आपुलकी’ ही साऱ्यांची
उदंड केले प्रेम तुम्हावरी

‘पुरचुंडी’ ही तुम्ही बांधली
‘खिल्ली’ कोटयानी उडवली

‘पूर्वरंग’ हा तुम्ही सजवला
‘वंग-चित्रे’ ना साज चढवला

‘जावे त्यांच्या देशा’ जेव्हा
‘गणगोत’ सारे जमते तेव्हा

‘बटाटयाची चाळ’ असो
वा ‘वाऱ्यावरची वरात’ असो

भेटले ‘व्यक्ती आणि वल्ली’
‘हसवणूक’ ही झाली न्यारी

आम्हास वाटे ‘अपूर्वाई’
फळास आली आमुची पुण्याई

शब्दरूपी हा खजिना तुमचा
भाग्य आमुचे आम्हा लाभला

अनंत या हो उपकारांची
होऊ कशी मी उतराई

ऋणात राहुनी तुमच्या मी
सदैव ‘गुण गाईन आवडी’

– उल्का कडले

(ही कविता मी एक-दीड वर्षापूर्वी केली होती. खास पु. ल. ना श्रद्धांजली म्हणून. पु. ल. आणि त्यांचे साहित्य याविषयी वाटणाऱ्या नितांत आदरातून ही कविता सुचली आहे.)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

************** पुढील प्रतिसाद गंभीरपणे लिहिलेला आहे. *****************
************* श्रेणी विनोदी किंवा इतर काही दिसत असली तरीही हा प्रतिसाद गंभीरच समजावा ही विनंती. ****************
सर्वप्रथम उल्काचं स्वागत. वेल्कम उल्क.
टिंगल टवाळी खेचाखेची हा माझा प्रांत नाही. दंगा करायला आवडतं; पण मुळात माझा मी एकटाच दंगा करत असतो. त्यात कुणाची टांग खेचणे, टोमणे हा उद्देश नसतो. ह्यावेळी कधी नव्हे तो प्रकार केला. जर काही आवडलं नाही; तर मी ते सांगत बसत नाही. जे आवडलय , त्याबद्दल बोलतो. (हे पुलंच्या प्रमाणेच वागतो --गुण गाइन आवडी.) अगदिच फार आवडलं नाही आणि सांगायचच असेल तर आडवळ्णं , तिरकसपणा टाळून थेट "आवडलं नाही" असं सांगतो. ह्यावेळी कधी नव्हे तो हा प्रकार केला. उल्कांना आवडलं नसेल तर क्षमा मागतो. नवीन लोकांनी यावं, आणि त्याच-त्या लेह-प्रतिक्रियाआंक्रियात काहीतरी वैविध्य यावं; असं मला वाटतं. तुम्ही सहभागी होत रहाल अशी आशा करतो.
आता पुलंबद्दल -- माझं त्यांच्याशी एक विचित्र लव्ह -हेट नातं आहे. ते मला आवडतातही आणि पकवतातही. आज दवनीय म्हणता याव्यात अशा त्यांच्या कैक क्वोट्स आहेत.तरी आवडतात.
धागाकर्तीनं लिहित रहावं अशी इच्छा. ह्यापुढे टप्ली मारणार नाही, हा शब्द देतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद वाचला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

कवितांना फारसे प्रतिसाद मिळत नाहीत. फारच थोड्या कवितांना दोन आकडी प्रतिसाद मिळतात, बर्‍याचशा एकेरीतच राहतात. सदर कविता मात्र शतक गाठणारसे दिसतय!

(मिपावरील 'मोकलाया' हा एकमेव सन्माननीय अपवाद!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त,
बाकि पुलंच्या हजरजवाबीपणाला तोड नाही.
.
.
.
.माठाच्या नळाचं पाणी ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

इंग्रजीत जे वुडहाऊसचं स्थान माझ्या मनात आहे ते मराठीत पुलंचं. दोघांचे (बरेचसे) लेखन असे की त्याचे योग्य भाषांतर होणे महाकठीण !

पुलं ना "महाराष्ट्राचे लाडके दैवत" असं वारंवार संबोधलं जातं ते मला खटकतं पण "चालायचच" म्हणून सोडून देते. कवितेमागची भावना समजू शकते. पुलं वाचत रहा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुलं ना "महाराष्ट्राचे लाडके दैवत" असं वारंवार संबोधलं जातं

तो शब्द व्यक्तिमत्व असा ऐकला होता. दैवत शब्द रुढ झाला हे वाचून आश्चर्य वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्वद्योत्तर दशकात 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' ही जागा अनिल अवचट यांनी भूषवली. पण ते दीर्घकाळ त्या पदावर राहू शकले नाहीत. नंतर मराठी वाहिन्यांच्या मदतीनं त्या पदासाठी अनेक क्यांडिडेट्स प्रयत्न करून गेले. अभय बंग, सिंधूताई सपकाळ, नाना पाटेकर इत्यादि. (नाही, माधुरी दीक्षित आणि सचिन तेंडुलकर ही निराळी क्याटेगरी आहे.) पण तिथे कुणाला म्हणावा तसा जम बसवता आला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला वाटतं अशा लिस्ट्स करायला मजा येईल.

महाराष्ट्राचं पहिलं लाडकं व्यक्तिमत्व : पु. ल.
महाराष्ट्राचं दुसरं लाडकं व्यक्तिमत्व : भावोजी
महाराष्ट्राचं तिसरं लाडकं व्यक्तिमत्व : निलेश साबळे

हजार वर्षांत होणार नाही असं पहिलं व्यक्तिमत्व : आचार्य अत्रे
हजार वर्षांत होणार नाही असं दुसरं व्यक्तिमत्व : (म्हागुरु)सचिन पिळगावकर
...
...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

फारच भारी
सचिन पिळगावकर फार पिळतो हल्ली
बघा मी किती तरुण आहे अजुन
बघा आमचा जोडा किती तरतरीत आहे अजुन
बघा मी कसला भन्नाट नाचतो अजुन
बघा बघा बघा
फारच पिळतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो कधी कधी "महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व" असंही ऐकलेलं आहे. "महाराष्ट्राचे लाडके दैवत पुलं" असे जालावर शोधल्यास बर्याच लिंक्स दिसतील आणि हे ही रूढ झालेलं असल्याचं पटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दैवत म्हणणे मलाही खटकते. त्यानाच का कोणत्याही व्यक्तिला.
पण महाराष्ट्रातील बर्याच लोकानी केलाय तसा गौरव म्हणुन मी कवितेत वापरला इतकेच.
पी जी वुडहाउस त्यान्चा लाडका लेखक होता असे ऐकुन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

वाक्य जरा लांब आहे, पण ..

पुलंचं साहित्यात सर्वात मोठं योगदान म्हणजे साहित्यविषयात आपण आता सामान्य (लोकप्रिय) पातळी ओलांडून खूप वर पोचलेलो आहोत असं दाखवण्याच्या फेजमधे असलेल्या पुढच्या तरुण पिढीतल्या अनेकांना पाय ठेवण्यासाठी ते पायरीचा दगड बनले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगा खवचटपणा बरं का गवि. बिनकामी अन बिनबुडाचा निव्वळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उगा खवचटपणा बरं का गवि. बिनकामी अन बिनबुडाचा निव्वळ.

बॅटमनाचा खवचटणे, झालिया जगी शहाणे
म्हणोनि काय गवणे खवचटूचि नये?! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅटमनाचा खवचटणे, झालिया जगी शहाणे
म्हणोनि काय गवणे खवचटूचि नये?! (डोळा मारत)

चुकून ते 'खरचटूचि नये' असं वाचलं. आणि 'गवणे' वाचून घावणे आठवले आणि घावणे-चटणी खावयाची इच्छा झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>म्हणोनि काय गवणे खवचटूचि नये?!

प्रवीण गवणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी तुम्हाला विनोदी दिली. आता वरच्या माझ्या आणि बॅट्याच्या "अवांतर" सुधारुन द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मध्यंतरी पुलं आवडणारे ते नीचभ्रू, बूर्झ्वा, टुकार वगैरे आणि जीए आवडणारे ते उच्चभ्रू, एलिट, प्रगल्भ साहित्यिक जाणीवा असणारे वगैरे असं काही तरी ऐकलं होतं खरं... Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भटोबा, मधल्या काळात शिलॅबस बदलला बरं. आता जीए आवडणारे उच्चभ्रू नसून जुनाट झाले आहेत. काळासोबत पावले टाका बरं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आता उच्च्भ्रु, एलिट वगैरे काहीही न आवडणार्‍यांना म्हणतात Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

<मेघना मोड ऑन>

मार्मिक श्रेणी देऊन समाधान होईना, म्हणून हा प्रतिसाद.

<मेघना मोड ऑफ>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुलंविषयी खूपच उलटसुलट प्रतिक्रीया येत असल्याने खूपच आठवणी दाटून आल्या..
मी हळवा वगैरे अजिबात नाहीये पण पुलंची व्यक्तिचित्र वाचून/ऐकून खूप हळवा होतो. वाचन वगैरे अजिबात दांडगं नाहिये पण पुलंच्याबाबतीत सखाराम गटणे होतो.
बर्‍याच प्रसंगी पुलंच (एखाद्या पात्राच) एखाद वाक्य/ शब्द वाक्प्रचारासारखं वापरायची सवयच लागली जसं "अण्णू गोगट्या होणं" हा अंतू बर्वांनी बहाल केलेला वाक्प्रचार तसे पुलंच्या पुस्तकांनी कितीतरी वाक्प्रचार बहाल केले. असा वाक्प्रचार कुणी वापरलेला ऐकला/ वाचला की लगेच त्या व्यक्तीबरोबर जन्मांतरीची ओळख असल्याचा भास होतो. पुलंच्या लेखनातील शब्द त्या त्या जागी इतके चपखल आहेत की नाटक/चित्रपट वगैरे पुनर्लेखन कुणीही केलं तरी ते भावतं नाही. त्यांच्या भाषणातून/ कथाकथनातून आवाज इतका डोक्यात बसलाय (बरचसं श्रेय अलूरकरांना) प्रभावळकरांसारख्या भल्या भल्या नटांच्या तोंडूनही त्याची नक्कल ऐकवत नाही. रावसाहेबांची जशी अवस्था त्या नवोदीत नटाच्या तोंडून "या नवनवल नयनोत्सवा (या नवनवोत्सवा)" ऐकून होते तशी अवस्था होते पुलंचे शब्द दुसर्‍या कुणाच्या तोंडून ऐकले की..

वैचारीक म्हणून लेखन त्यांनी केले नसेल पण काही गंभीर लेखनात उतरलेले त्यांचे विचार नक्कीच प्रगल्भ होते. विवेकी होते. किंबहुना देवाधर्माविषयी दुरावा माझ्या विचारात दाभोळ्कर यांचे लेखन वाचनात येण्यापूर्वी पुलंच्या प्रभावाने आलाय असं म्हणू शकतो.
त्यांच्या संगीत आणि जुन्या संगीतातील दिग्गजांवरच्या लेखांनी प्रचंड उत्सुकता जागृत केली .. हिंदुस्थानी संगीताची गोडी लागण्यात त्यांचा नक्कीच वाटा आहे.
एकंदरीत या व्यक्तीमत्वाने प्रचंड भारावलय.. कोणा ओळखीच्या व्यक्तीच्या निधनाने डोळ्यात पाणी आल नसेल पण पुलं गेले तेव्हा आपसूकच डोळे पाणावले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुलं गेले ते वर्षही किती सिंबॉलिक आहे! २०००. पुलं गेले आणि 'त्या' पिढीचा शेवटचा साक्षीदार हरपला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी. "पुलं गेले" अशी मटाची हेडलाईन होती त्या दिवशी. निधन किंवा तत्सम शब्द न वापरता घरचं कोणी गेल्यावर सांगतात तशी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्‍या दिवशीचं 'चिंटू' देखील आठवतय. खिडकीबाहेर दु:खी होउन बघत असलेला चिंटू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+११११

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'प्रयाग' हॉस्पिटलच्या गेटबाहेर, गर्दीत एक मध्यमवयीन जोडपं 'तुमने मुझ को हँसना सिखाया' असं कॅप्शन असलेला पुलंचा फोटो घेऊन उभं होतं, तेही आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या भावना अचूक पकडणारा हा एक ब्लॉग-लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

वाचला हा लेख. मस्त लिहिलाय. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

नात्यतल्या न गोत्यातल्या दोन व्यक्तिन्च्या जाण्याने 'माझेही डोळे पाणावले' म्हणा किन्वा 'मीही खूपच हळहळले' म्हणा.
१. पुल २. एपीजे कलाम.
अवतरण चिन्हात लिहायचे कारण ह्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत हे कळावे म्हणुन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

अवतरण चिन्हात लिहायचे कारण ह्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत हे कळावे म्हणुन.

अहो, तुम्ही इतक्या डिफेन्सिव्ह होऊ नका ओ. इथे (इन जनरल मराठी आंतरजालावर) जरा खेचाखेची चालणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां ना. पुलं या विषयावर धुळवड खेळायला तुमच्या पिचकारीचं निमित्त झालं. सोडून सोडा हो. आणखी काहीतरी लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

डिफेन्सिव नव्हे हो हायलाइट करतेय. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

स्टँड-अप कॉमेडी हा प्रकार आता आपल्याकडे बराच मूळ धरतो आहे. अलिकडेच भारतीय स्टँड-अप बद्दल एक डॉक्युमेंटरी पाहिली. त्यात अनेक सद्य स्टँड-अप कलाकारांच्या मुलाखती (किंवा बाईट्स आहेत). त्यात कोणीतरी पु.लं. हे आद्य स्टँड-अप कॉमिडिअन होते असा उल्लेख केला होता. जे पटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ती टीव्हिएफ्ची डॉक्युमेंटरी ना .. बरेच दिवसांपूर्वी पाहिलेली.
मात्र त्यांचे निरिक्षण मला पटलं नाही. पुलंची जातकुळी अभिवाचनाची होती. त्याचे लेखन व्यवस्थित केलेले असे.
उत्स्फुर्तपणे किंवा फार कमी स्क्रिप्टेड अशी "स्टँड अप" कॉमेडी असे त्याचे स्वरून नव्हते. अर्थात वर म्हटलंय तसं त्यांचा वाचिक अभिनय बेफाम होता.. कित्येक स्टँड अप कॉमेडीयन्सच्या तोंडात मारेल असा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हो तीच. स्टँडअप हे स्क्रिप्टेडच असतं की. उत्स्फूर्त थोडीच असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तसं नव्हे. स्टँडपचं स्क्रिप्ट हे वाचण्यासाठीच लिहिलेलं असतं.
पुलंनी अपुर्वाईपासून रावसाहेबपर्यंत लेखन म्हणून केलेल्या गोष्टी सादर केल्या. अपुर्वाई लिहिताना किंवा व्यक्तिचित्र लिहिताना ती सादर करायला म्हणून लिहिली नव्हती (आणि त्यांनी सगळे लेखन सादरही केले नाही)

==
माझ्या आठवणीनुसार त्या डॉक्युमेंटरीतही त्यांनी अपुर्वाईचाच भाग स्टँडअप कॉमेडी म्हणून टाकलाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थोडंसे विषयांतर होतंय पण पुलंचं रसग्रहण वाचून मी देखील 'गोपाला...मेरी करुणा क्यूं नहीं आए...' अनुभवला...

आठवणीतील मैफल

गोपाला...मेरी करुणा क्यूं नहीं आए....

पुलंनी केलेली ‘गोपाला...मेरी करुणा क्यूं नहीं आए...’ ची समीक्षा वाचूनच मी याच्या प्रेमात पडलो...पंडित सीआर व्यास यांनी म्हटलेलं गोपाला...ऐकायला मिळालं आणि ते रसग्रहण अनुभवता आलं...
नागपूरच्या सप्तक या संस्थेने शंकरनगर चौकातील मूक-बधिर शाळेत 1996 साली लायड म्यूजिक फेस्टिवल आयोजित केला होता. त्यांत पंडित सीआर व्यास यांची मैफल ऐकली ती आठवणीत घर करुन आहे. कामानिमित्त अकोलाहून परत येतांना नागपूर ला थांबलो. सकाळी पेपर मधे लायड म्यूजिक फेस्टिवल ची जाहिरात बघितली-शुजात खान ची सतार आणि पं. सीआर व्यास यांचं गायन अशी मैफल होती. म्हणून मुद्दाम धरमपेठच्या मावशी कडे मुक्काम केला. तिथून शंकरनगर जवळच की. मावशीच्या मुलांना अभ्यास होता, तर मी एकटाच गेलो. मैफिलीत जाण्याला एक कारण आणखीन होतं. त्याच्या काही दिवसां पूर्वीच आकाशवाणी संगीत संमेलनात पं. व्यांसाचं गाणं एेकलं होतं, ते सुश्राव्य होतं.
‘डार-डार पात तू ही समायो,
तेरो ही रंग तू ही बनायो...’
ही बंदिश तर धमाल होती. म्हणूनच नागपूरच्या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता होती, त्यांना प्रत्यक्ष बघण्या-ऐकण्याचा योग अनायास आला होता. शुजात खान ला अप्रतिम संगत केली होती शफात अहमद खान यांनी. त्यानंतर पंडित सीआर व्यास मंचावर आले. तबल्यावर होते पं. विजय घाटे. मला चांगलं आठवतं तबला जुळवतांना त्यांनी समोर बसलेल्या शफात खान यांना खूण करुन खातरजमा केली होती की तबला नीट जुळलाय ना...त्या कार्यक्रमात पंडितजींनी शेवटी म्हटलेली भैरवी ‘गोपाला...मेरी करुणा क्यूं नहीं आए...’ एेकून डोळयांचं आणि कानांचं पारणं फिटलं.

‘गोपाला’...आणि पुलं...

पुलं देशपांडे यांनी एका लेखात ‘गोपाला, मेरी करुणा क्यूं नहीं आए...’ याचं सुंदर रसग्रहण केलंय. ते वाचलेलं असल्या मुळे या गोपाला ची लज्जत वाढली. आणि ते सुर कानांत घर करुन राहिले.

पं. फिरोज दस्तूर आणि ‘गोपाला...’

काही दिवसांपूर्वी पं. फिरोज दस्तूर यांनी म्हटलेला ‘गोपाला...’ एेकायला मिळाला. त्यांची सोबत करणारा शिष्याला ते सांगतात-‘ही पुरती जागा एका श्वासातच आली पाहिजे...’ आणि ती जागा ते एका श्वासातच घेऊन दाखवतात, ती चीज ऐकण्या-अनुभवण्या सारखी आहे. गंमत म्हणजे ही रिकार्डिंग त्यांनी सत्तरी गाठल्या नंतर आहे बरं का...

तबले से प्यार किया: थिरकवा

पंडित सी. आर. व्यास ह्यांच्या षष्ठ्यब्दपूर्तीचा समारंभ २ नोव्हेंबर १९८४ रोजी मुंबईच्या पोदार कॉलेजमधे झालेल्या समारंभात पुल देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हा किस्सा सांगितला होता-

तिरखवां खांसाहेबांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी एका रात्री अप्रतिम तबला वाजवला. मला राहवेना म्हणून मी त्यांचे हात असे हातात घेतले आणि बघतो तर अगदी मुलायम हात. मी म्हटलं ‘खांसाहेब, आपके हाथ कितने मुलायम हैं?’ ते म्हणाले ‘तो क्या हो गया?’. मी म्हणालो ‘नहीं, आपने जिंदगीभर इतना तबला बजाया!’ त्यावर खांसाहेब म्हणाले ‘अरे बेवकूफ, मैंने तबले से झगडा थोडे ही किया? मैंने तबले से प्यार किया. बेटे, किसी सुंदर लड़की के गालों पर हाथ फिराते हो तो हाथ थोड़े ही खराब होते हैं?’. एवढं सगळं सांगितलं पण पुढचं फार महत्वाचं आहे. मला म्हणाले ‘मगर एक बात सुनो, अभी-अभी त्रिताले का अंदाजा आ रहा है’. वयाच्या ऐंशीव्या वर्षी तो मनुष्य सांगतो की मला त्रितालाचा आत्ता कुठे अंदाज यायला लागला आहे. या रागांचा वाह्यातपणा हाच आहे. सगळा राग आला असं वाटत असतानाच तो लांबा जाऊन उभा रहातो. ‘स्थिरचर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला’ असं म्हटलंय ना, त्याप्रमाणे हा राग कुठेतरी दशांगुळे उरलेला असतो. तो पुन्हा तुम्हाला खुणावायला लागतो आणि परत त्याच्याकडे धावावं लागतं. ‘विठो पालवीत आहे’ असं म्हटलंय तसे हे राग ‘पालवीत’ आहे याचा साक्षात्कार ज्यांना झाला तेच गवई व्यासांसारखे मोठे होतात आणि अशा गवयांचे आपण कृतज्ञतेने सत्कार करत असतो.
(पुलंच्या भाषणातून साभार)
---------------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

तुमचे मनापसुन आभार.
मी जेव्हा ही कविता प्रकाशित केली तेव्हा मला 'असेच काहीसे पुलंच्या आठवणींचे विविध किस्से एकतर प्रतिसाद म्हणुन येतील किंवा ह्या धाग्याकडे पूर्णतः दुर्लक्ष तरी केले जाईल' अशी अपेक्षा होती.
कारण माझी कविता म्हणजे फार काही अलंकारीक काव्य नाहीच आहे. त्यांच्या काही पुस्तकांच्या नावाना एकत्रित गुंफलय आणि शेवटच्या चार सहा ओळीत माझ्या भावना गुंफल्या. बस्स!
पण ह्या धाग्यावर जे हल्ले झाले ते इतके अनपेक्षित होते की मी ही दुर्लक्ष नाही करु शकले. आणि सर्वच मनाविरुद्ध होत गेले. जाऊ दे. नको परत तो कटु विषय.
परंतु आज तुमच्या ह्या प्रतिसादाने ह्या धाग्याची अपेक्षापूर्ती झाली असे नक्कीच म्हणेन मी.
आणि हो हे विषयांतर नाही ऊलट विषयाला अगदी अनुसरुन आहे.
पुनश्च धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

आभार,
तुमच्या कवितेत पुलंच्या पुस्तकांची नावे आहेत, पैकी आपुलकी, पुरचुंंडी, बटाट्याची चाळ, हसवणूक आणि गुण गाईन आवडी या पुस्तका मज जवळ आहेत.
सगळया पुस्तका वाचनीय, संग्रहणीय आहेत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

ही संज्ञा राखीव आहे.

'सब कुछ पु.ल.' म्हटले तर एकच गोष्ट निर्दिष्ट होते. 'गुळाचा गणपती'.

छान पिच्चर होता. काहीसा 'द शिक्रेट लाइफ ऑफ वाल्टर मिटी'वर बेतला होता, असे ऐकून आहे. (हाही एक छान पिच्चर होता. असो.) खखोपुजा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संग्राह्य की संग्रहणीय?
मला अंधुकसं आठवतय त्यानुसार संग्रहणी हा डायरीया की तत्सम आजार आहे. ते पुस्तक काढून शब्द पुन्हा चेक करेन. शोधावं लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने