फ्रिडा काहलो : वेदनेतून बहरलेली चित्रकार

असे म्हणतात की जीवनात माणूस जितका जास्त दु:खाचा आणि वेदनेचा अनुभव घेईल (हिंदीत याला चपखल शब्द म्हणजे दर्द) घेईल तितका तो कलाकार म्हणून अत्युच्च स्थानावर पोहोचतो. फ्रिडा काहलो हि चित्रकर्ती याचे मुर्तिमंत उदाहरण आहे. आयुष्यात तिने असंख्य शारीरिक आणि मानसिक द:खे सहन केली आणि याची परिणिती म्हणजे तिने तयार केलेल्या कलाकृती. यात दिडशे पेंटिग्स्चा समावेश असून पंचावन्न चित्रे हि तिची सेल्फ पोर्टेटस् आहेत. फ्रिडाचा जन्म सहा जुलै एकोणाविसशे सात मध्ये मेक्सिकोत झाला. फ्रिडाच्या लहानपणीच तिच्या उजव्या पायाला पोलिओ झालेला. (आणि याचमुळे तिने आयुष्यभर लांब पायघोळ झगे घातले.) एवढेच कमी नव्हते की काय, ऐन तारूण्याच्या उंबरठ्यावर तिने भयंकर अशा बस अपघातला तोंड दिले. हा अपघात एवढा जबरदस्त होता की यात तिच्या मउक्यांना जबरदस्त इजा झाली. खांद्याचे हाड, फासळ्या आणि माकडहाड मोडले. उजवा पाय जो आधीच पोलिओग्रस्त होता त्याला तब्बल अकरा फ्रॅक्चर्स झाली. तीन महिने ती हि सगळी हाडे जुळेपर्यंत स्टिलच्या सापळ्यात (body cast) अडकली होती. असंख्य प्रयत्नानंतर जरी ती चालायला लागली तरी या अपघाताच्या वेदना तिला आयुष्यभर पुरल्या. अपघातामुळे ती महिनोनमहिने अथंरूणाला खिळलेली असायची. या काळात वेदनांचा विसर पडावा म्हणून तिच्या आईने तिच्या हातात कॅनव्हास आणि ब्रश दिला. चित्र काढण्यात ती मनोमन रमली की तेवढा काळ तिला आपल्या वेदनांचा विसर पडत असे. तिच्या आईने तिच्यासाठी खास असा इझल बनवून घेतला जूणेकरून ती ओणव्या स्थितीत पेंटिंग करू शकत असे.

आपल्या आजारपणाच्या काळात तिने बहूतांशी सेल्फ पोर्टेटस् बनवली. हि पोर्टेटस् तिच्या वेदनांचे प्रतिबिंब कॅनव्हासवर उमटवणारी असत. आपल्या सेल्फ पोर्टेटस् बवबबत विचारल्या गेल्यावर ती उत्तर देत असे कि मी स्वत:ला इतक्याखोलवर समजून घेतलय की मी स्वत:च्या त्या वेळच्या भावनांनांच वेगवेगळ्या कॅनव्हासवर मांडते. प्रामुख्याने स्वत:चीच व्यक्तिचित्रे असलेल्या कलाकॄती ह्या तिच्या वेदनेचा हुंकार अहेत. फ्रिडाची चित्रे हि मेक्सिकन चित्रशैलीचा वारसा सांगत. चमकदार रंग आणि सरियलिस्टिक शैली हे तिच्या चित्रांचे वैशिष्ट.सेल्फ पोटर्रेट विथ थॉर्न नेकलेस ऍन्ड हमिंगबर्ड या चित्रात तिची वेदना प्रकर्षाने दिसते. (चित्र क्र.एक ) या पेंटिगमध्ये ती स्वत:हा निर्विकार चेहर्‍यात आहे. पण मागील पानाफूलात काळे माकड आणि मांजर थंडपणे तिच्या मानेभोवती काट्यांचे जाळे विणत आहेत. जणुकाही वेदनांचा पाशच तिच्याभोवती घट्टपणे विणला जातोय. त्या काट्यांच्या खाली दिसतो तो पंख पसरलेला हमिंगबर्ड पक्षी. तिच्या मानेभोवती काटे विणनारे माकड आणि दबा धरून बसलेली मांजर पाहून अंगावर काटा नाही आला तर नवलच. नियतीच जणू तिच्या मानेभोवती वेदनेचे, दु:खाचे जाळे क्रुरपणे विणत आहे. हमिंगबर्ड हा मुकपणे रूदन करणारा पक्षी तिने तिची प्रतिक्रिया म्हनूनच वापरला असावा. हे पोट्रेट तिच्या व्यक्तिगत अनुभवांचे असले तरी एकूणच स्त्रिविश्‍वाच्या वेदना प्रकट करणारे ठरते. आपली वेदना सरळ सरळ थेटपणे आणि कुठल्याही अमुर्त प्रतिकांशिवायती मांडते. आपल्याला तिच्या वेदनांच्या जगात नेते आणि म्हणूनच तो दृश्य अनुभव थेटपणे अंगावर येतो. आंद्रे बेटन या सरियलिस्टने तिच्याबद्दल लिहून ठेवले आहे की फ्रिडाची चित्रे म्हणजे नेटक्या आणि सुंदर वेष्टनात लपवलेला बॉम्बच!

फ्रीदा काहलो

कॅक्स फ्रुट या चित्रात तिने कॅक्टसची फळे सोलून त्याचं स्थिरचित्रण केले आहे लालभडक कॅक्टस हि निव्वळ सही सही चित्रित केलेली फळे नसुन तिच्या वेदनांचे दॄश्यच. फ्रिडा हि सरीयलिस्टिक चित्रकार असली तरी ओल्ड मॅन हे रेखाचित्र तिची रेष किती ताकदीची आहे हे दाखवून देते. रेषेची असली जोरकस वळणे दाखवण्यासाठी तुम्ही चित्रकलेतील मझेंहूऐ खिलाडी असावे लागते.

तरूणचणीच झालेल्या अपघातामुळे फ्रिडाला वेळेवेळी पाठीच्या शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले. आणि अशाच एका शस्त्रक्रियेनंतर तिने केलेले पेंटिंग आहे वाउंडेड डिअर
या चित्रात फ्रिडाने स्वत:ला हरिणीच्या स्वरूपात दाखवलयं. अंगावर अनेक बाणांनी झालेल्या जखमा, डोक्यावरची शिंगेही वेदनेच्या झुडूपात अडकली आहेत. आणि दुरवर दिसते ते मोकळे स्वच्छ आकाश, वेदनांपासून मुक्ततेचे प्रतिक. फ्रिडा हरिणीला आशा आहे कि ती तिथे कधितरी पोहोचेल. पण नाहीच ती तिथे पोहोचू शकत नाहीये आणि तिची तगमग तिच्या चेहर्‍यातून स्पष्ट दिसतेय. फ्रिडा जरी आपल्या वेदना कॅनव्हासवर मांडत राहिली तरी तिने इतरही अनेक चित्रे केली. त्यात दृश्यानुभवाच्या दृष्टीने एकाहून एक उत्तम स्थिरचित्रे आणि व्यक्तिचित्रांचा समावेश होतो. टू वूमन हे तिच्या आईच्या घरी घरकाम करणार्‍या स्त्रियांचे व्यक्तिचित्र. हे चित्र मेक्सिकन स्त्रियांची चेहर्‍याची वैशिष्ट्ये दाखवणारे आणि बारकाईने चित्रित केले आहे. मागील सुंदर पानांच्या नक्षीवर जीवनाकडे सकारात्मकतेने पाहणार्‍या या दोन स्त्रिया सुखद अनुभव देतात. फ्रिडा उणेपुरे सत्तेचाळीस वर्षाचे आयुष्य जगली. वयाच्या बाविसाव्या वर्षी तिने दिएगो रिव्हेरा या नावाजलेल्या मेक्सिकन म्युरल आर्टिस्टशी लग्न केले. चित्रकलेच्या प्रवासाची जेव्हा फ्रिडाने सुरूवात केली तेव्हा दिएगोनेच तिला तुझ्यात प्रतिभा आहे म्हणून प्रोत्साहन दिले होते. दिएगोसोबतचे तिचे वैवाहिक जीवन उनपावसासारखे असले तरी तो तिचा कलेच्या प्रवासातील अखंड सोबती राहिला हे निश्‍चित. फ्रिडा आपल्या वैयक्तिक आयुष्यात टिकेला सामोरी गेली तरी तिच्या चित्रतपश्‍चर्येने कलेचे अत्युच्च शिखरावर पोहोचवले. मेक्सिकोने तिचे घर हे तिच्या कलाकॄतींचे म्युझियम म्हणून जतन केलयं. आणि तिच एकमेव स्त्री चित्रकर्ती आहे जिची चित्रे लिलावात कोटीच्या कोटी उड्डाणे घेतात. मेक्सिकोने तिच्या सन्मानार्थ चलनी नोटाही छापल्या आहेत आणि ज्युली टेमोर या दिग्दर्शिकेने तिच्यावर चित्रपटही बनवलाय.

फ्रिडा आयुष्यभर वेदनेशी झुंजत राहिली. भयंकर अपघातामुळे तिला कधी मुलही होऊ शकले नाही आणि याचे दु:ख तिला सतत छळत राहिले. आपल्या मृत्युपूर्वी तिने आपल्या डायरीत लिहीले होत, मृत्यू तरी सुसह्य होईल अशी मला आशा आहे आणि तो (मूत्यू) येईल तो पुन्हा या जगात परत न येण्यासाठीच! खरोखरच ती वेदनांशी झगडून हतबल झाली होती का? की तिला परत या जगात यायची इच्छा नाही राहिली? वेदनांना सहन करण्याची तपश्‍चर्या तिने आयुष्यभर केली आणि या तपश्‍चर्येचे फळ म्हणून तिच्या इच्छेनुसार तिला मोक्ष मिळाला असेल का? एक मात्र खरे वेदना आणि दु:ख तिच्या चित्रांमागची प्रेरणा होती आणि याच वेदनांनी तिला चित्रकलेच्या उत्कृष्ट स्थानापर्यंत पोहोचवले.
कनक वाईकर
kanak.waikar@gmail.com

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मेक्सिको सिटीमध्ये शहराच्या मध्यस्थानी, जेथे स्पेन-पूर्व काळातील अ‍ॅझटेक सामाज्याचे प्रमुख मंदिर आणि राजाचा राहता राजनिवास होता तेथेच आता मेक्सिकोचे प्रमुख कॅथीड्रल, अध्यक्षाचा निवास आणि जुन्या अ‍ॅझटेक मंदिराचे अलीकडेच उत्खनन करून प्रकाशात आलेले अवशेष आहेत. अध्यक्षनिवासाच्या दुसर्‍या मजल्याकडे जाणार्‍या जिन्याच्या सर्व बाजूंनी दिएगो गार्सिया - प्रख्यात मेक्सिकन म्यूरलिस्ट आणि फ्रिडाचा काही काळ नवरा - ह्याने काढलेली आणि मेक्सिकोचा अ‍ॅझटेक-पूर्व काळापासूनचा इतिहास दर्शविणारी भित्तिचित्रे आहेत. त्यापैकी एकामध्ये फ्रिडा स्वतः एका गणिकेच्या स्वरूपात दर्शविली आहे. (सर्व भित्तिचित्रातील प्रत्येक चित्राला स्वतःचा अर्थ आहे पण तो येथे विस्तारभयास्तव सांगत नाही.) मी काढलेल्या त्याच्या फोटोचा हा एक तुकडा:

Frida in Mural

खर्‍याखुर्‍या फ्रिडाची ही छोटी चित्रफीत यूट्यूबवर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक माहिती. याबद्दल अजून लिहिलेत तर नक्कीच आवडेल.
जाता जाता: तुम्ही मेक्सिको सिटीमधले, कार्लोस स्लिम याने सुरू केलेले Museo Soumaya बघितले आहे का?

तळटीपः अरविंद कोल्हटकर यांना प्रतिसाद येण्याऐवजी स्वतंत्र प्रतिक्रिया आली आहे. क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@उपाशी बोका.

वरील चित्राचे अधिक वर्णन माझ्या ह्या एक वर्षापूर्वीच्या लेखात येऊन गेले आहे. अन्य भित्तिचित्रांवरहि असेच लेख लिहिण्याचा मानस होता पण पहिल्याला मिळालेला थंडा प्रतिसाद पाहून मेक्सिकोच्या जुन्या इतिहासात कोणालाच स्वारस्य वाटत नाही असे जाणवले आणि पुढचे लेख बासनात बांधून ठेवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! उत्तम माहितीपूर्ण लेखन!
अनेक थोर चित्रकार मंडळींची आयुष्य अनेकदा खडतरच असतात हे खरेच Sad

ऐसीवर स्वागत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गेल्या वर्षी 'माय लाईफ माय दिअ‍ॅगो' हया एकपात्री नाटकाचा प्रयोग इथे बंगलोरमध्ये झाला. संध्या नावाची भारतीय नटी होती. तिचा अभिनय खूप छान होता. मला ती सलमा हायेकपेक्षा आवडली!

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी