काही बेसिक वैज्ञानिक प्रश्न

काही बेसिक वैज्ञानिक प्रश्न

तसे आमचे वैज्ञानिक नॉलेज बेसिक असल्याने काही बेसिक प्रश्न मनात आले. आपण याची ऊत्तरे द्याल अशी खात्री आहे.

१.
प्रकाशाच्या वेगानं जाण्याऱ्या यानात मी बसलो आहे. ( प्रकाशाच्या वेगानं म्हणजे 99.99% of light )
समजा माझ्या हातात एक बंदूक आहे. आणि त्यातून मी समोरच्या दिशेने एक गोळी झाडली तर त्या गोळीचा वेग किती?
प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त ?

२.
दोन ट्रेन प्रकाशाच्या वेगाने धावत आहेत. पण विरुद्ध दिशेने.
जेव्हा या दोन ट्रेन एकमेकींना क्रॉस करतील तेव्हा पहिल्या ट्रेन मधील observer ला दुसऱ्या ट्रेनचा वेग किती दिसेल?
दुप्पट?

सापेक्ष वेग जरी असला तरी तो प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त कसा असू शकतो?

यालाच जोडून एक उपप्रश्न -
पृथ्वीवर मी ५० किमी प्रतितास वेगाने स्कुटर चालवत आहे. चंद्रावरुन पाहिल्यास ह्याच स्कुटरचा वेग कितीतरी जास्त वाटेल. सुर्यावरुन पाहिल्यास अजून वेगवान वाटेल. दिर्घीकेच्या केंद्रापासून पाहिल्यास अजून अफाट वाढलेला दिसेल. अजून कुठूनतरी पाहिल्यास हाच वेग प्रकाशाच्या वेगाएवढा वाटेल.
यावरुन हा निष्कर्ष काढावा काय?
विश्वातील प्रत्येक गोष्ट ही प्रकाशाच्या वेगाने जात असते.

३.
बिग बँग- विश्वाचा जन्म एका बिंदूच्या स्फोटापासून झालाय असे सर्वमान्य आहे. मात्र स्पोटाअगोदर जर तो एक बिंदू अस्तित्वात असेल तर असे अनेक बिंदू अस्तित्वात असले पाहिजेत. आणि त्यांच्या स्फोटांतून अनेक विश्वे निर्माण झाली असली पाहिजेत.

multiuniverse थेरी ग्राह्य धरली जावी का?

४.
पेशी (cells) आणि विषाणू (virus) जीवनाच्या उगमापासून अस्तित्वात आहे. पेशींचा विकास झाला मग विषाणूंचा का नाही?

पेशींचा विकास विषाणूंच्या वारंवार हल्ल्यांमुळेच होत गेला. विषाणू असे हल्ले का करतात? त्यांचे अंतिम ध्येय काय असावे?

उपप्रश्न - झाडांचाही अजून म्हणावा तसा विकास का झालेला नाही?

५.
प्रतीगुरुत्वाकर्षण -
गुरुत्वाकर्षण म्हणजे आजूबाजूच्या पदार्थाला स्वतःकडे खेचून घेणारे.
प्रतीगुरुत्वाकर्षण म्हणजे स्वतःपासून दूर ढकलणारे.
प्रतीगुरुत्वाकर्षण असलेला पदार्थ आपल्या कणांनाही दूर ढकलेल आणि त्याचे अस्तित्व लवकरच नष्ट होईल. मुळात असा पदार्थ तयार होणेच शक्य नाही. याचा अर्थ असा घ्यावा काय?
प्रतीगुरुत्वाकर्षण अस्तित्वात नसते.

field_vote: 
0
No votes yet

मी समोरच्या दिशेने एक गोळी झाडली तर त्या गोळीचा वेग किती?

तुमच्यासाठी त्या गोळीचा वेग हा सर्वसाधारण गोळीच्या वेगाइतकाच. मात्र बाह्य निरीक्षकासाठी तुमचा वेग अधिक गोळीचा वेग हा प्रकाशापेक्षा कमी राहील. त्या गोळीचं वस्तुमान इतकं प्रचंड वाढलेलं दिसेल, की तुमच्या बंदुकीतल्या दारूच शक्ती पुरेशी पडणार नाही.

सापेक्ष वेग जरी असला तरी तो प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त कसा असू शकतो?

सापेक्ष वेगही प्रकाशापेक्षा जास्त असू शकत नाही.

अजून कुठूनतरी पाहिल्यास हाच वेग प्रकाशाच्या वेगाएवढा वाटेल.

नाही. कुठूनही पाहिलं तरी प्रकाशापेक्षा जास्त वेगाने जाताना तुम्ही कोणालाच दिसणार नाही.

multiuniverse थेरी ग्राह्य धरली जावी का?

जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत नाही.

प्रतीगुरुत्वाकर्षण असलेला पदार्थ आपल्या कणांनाही दूर ढकलेल आणि त्याचे अस्तित्व लवकरच नष्ट होईल. मुळात असा पदार्थ तयार होणेच शक्य नाही.

हा युक्तिवाद तितकासा बरोबर नाही. कारण विद्युतभार (चार्ज) हा समान विद्युतभारांना दूर ढकलतो. तरीही तो एकत्र साठून राहातो. त्यासाठी तो चार्ज धरून ठेवणारं काहीतरी असावं लागतं. तत्त्वतः गुरुत्वाकर्षणाचंही तसं होऊ शकतं. मात्र गुरुत्वाकर्षण हे आकर्षक बल आहे हे खरं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< तुमच्यासाठी त्या गोळीचा वेग हा सर्वसाधारण गोळीच्या वेगाइतकाच>> ओके. इथे बदूकीऐवजी मी समोरच्या दिशेने टॉर्च मारला तर?

<< सापेक्ष वेगही प्रकाशापेक्षा जास्त असू शकत नाही.>> नाही पटले. कारण ट्रेन च्या उदाहरणात तो सरळ सरळ जास्त वाटतोय.

<<नाही. कुठूनही पाहिलं तरी प्रकाशापेक्षा जास्त वेगाने जाताना तुम्ही कोणालाच दिसणार नाही.>> ओके. पण मी इथे प्रकाशाचा वेग 99.99% speed of light एवढाच गृहित धरलाय.

<< जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत नाही.>> ते तर आहेच. पण अनेक स्फोट झालेच नाहित (/ अनेक बिंदू नाहितच ) याला तरी कुठे पुरावा आहे. असा एक ऊलट प्रश्न देखील पडतो.

<< हा युक्तिवाद तितकासा बरोबर नाही.>> म्हणजे प्रतीगुरुत्वाकर्षण अस्तित्वात आहे तर? की माझा प्रश्नच चुकला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे बदूकीऐवजी मी समोरच्या दिशेने टॉर्च मारला तर?

तुमच्यासाठी तुम्ही स्थिर आहात. त्यामुळे तुम्हाला प्रकाशाच्या वेगानेच ते फोटॉन्स जाताना दिसतील. मात्र बाह्य निरीक्षकालाही त्या प्रकाशाचा वेग तितकाच दिसेल.

नाही पटले. कारण ट्रेन च्या उदाहरणात तो सरळ सरळ जास्त वाटतोय.

पटून न पटून काही फरक पडत नाही. आहे हे असं आहे.

मी इथे प्रकाशाचा वेग 99.99% speed of light एवढाच गृहित धरलाय.

प्रकाशाचा वेग ऐवजी तुम्हाला तुमचा वेग म्हणायचं असावं. हो, तुम्ही त्या वेगाने जाताना दिसू शकाल. पण बंदुकीची गोळी प्रकाशाचा वेग पार करून जाताना दिसणार नाही. निरीक्षकासाठी तिचं वस्तुमान इतकं वाढलेलं असेल की तुम्ही वापरलेली बंदुकीची दारू त्या गोळीला अतिशय हळू पुढे ढकलताना दिसेल. म्हणजे ती गोळी तुमच्या पुढेच जाताना दिसेल पण ०.०१% वेगाने नाही, तर त्याहून हळू जाताना दिसेल.

पण अनेक स्फोट झालेच नाहित (/ अनेक बिंदू नाहितच ) याला तरी कुठे पुरावा आहे.

तसा अनेक गोष्टींना नसण्याचा पुरावा नाही. त्यामुळे तो एक हायपोथिसिस म्हणून मांडता येतो. पण प्रयोग अगर निरीक्षणांनी सिद्ध नाही झाला तर त्याला एक आकर्षक कल्पना यापलिकडे फारसा अर्थ राहात नाही.

म्हणजे प्रतीगुरुत्वाकर्षण अस्तित्वात आहे तर?

तसं नाही, पण प्रतिगुरुत्वाकर्षण अस्तित्वात नसण्यासाठीचं कारण बरोबर नाही. वस्तुमान असलेले पदार्थ एकमेकांना आकर्षित करताना दिसतात, हेच पुरेसं कारण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< विश्वातील प्रत्येक गोष्ट ही प्रकाशाच्या वेगाने जात असते.>> याबद्दलही तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे विधान बरोबर नाही. विश्वातला प्रत्येक प्रकाशकिरण हा प्रकाशाच्या वेगाने जात असतो आणि कुठच्याही वेगाने जाणाऱ्या निरीक्षकाला तो त्याच वेगाने जाताना दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>दोन ट्रेन प्रकाशाच्या वेगाने धावत आहेत. पण विरुद्ध दिशेने.

प्रकाशाच्या वेगाने कोणाच्या सापेक्ष?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दुरुन पाहणाऱ्या निरीक्षकाच्या सापेक्ष .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

४.
पेशी (cells) आणि विषाणू (virus) जीवनाच्या उगमापासून अस्तित्वात आहे. पेशींचा विकास झाला मग विषाणूंचा का नाही?
पेशींचा विकास विषाणूंच्या वारंवार हल्ल्यांमुळेच होत गेला. विषाणू असे हल्ले का करतात? त्यांचे अंतिम ध्येय काय असावे?
उपप्रश्न - झाडांचाही अजून म्हणावा तसा विकास का झालेला नाही?

कोण म्हणतो झालेला नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

१.
प्रकाशाच्या वेगानं जाण्याऱ्या यानात मी बसलो आहे. ( प्रकाशाच्या वेगानं म्हणजे 99.99% of light )
समजा माझ्या हातात एक बंदूक आहे. आणि त्यातून मी समोरच्या दिशेने एक गोळी झाडली तर त्या गोळीचा वेग किती?
प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त ?

हाच प्रश्न सहज शक्य कोटीतला असा विचारला असता तरी चालला असता:

मानवनिर्मित सर्वात वेगवान स्पेस व्हेईकलचा जो काही वेग असेल (उदा. ७० किमी प्रतिसेकंद) त्याच्या तोंडाशी एक हेडलाईट समोरच्या दिशेने प्रकाश फेकत असेल तर त्या प्रकाशाचा वेग मूळ नॉर्मल वेग + ७० किमी प्रतिसेकंद असा वाढेल का?

बाकी असं काही होत नाही हे इतरांनी उत्तरात उत्तमरित्या समजावलं आहेच.

मुळात प्रकाशाच्या वेगाने जाऊ गेलो तर वस्तुमान इन्फिनिटी होऊन त्यापुढे कितीही अ‍ॅक्सिलेटर दाबला तरी वेग आणखी वाढणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0