फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६
.

१) एबीपीमाझावर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मिळणा-या मिसळीचे प्रकार दाखवत होते. नाशिकच्या एका ठिकाणच्या मिसळीमध्ये चिवडा, पोहे वगैरे काहीच नसते. मोड आलेली वेगवेगळी कडधान्ये, वेगवेगळ्या प्रकारची शेव, तर्री. मोड आलेल्या कडधान्यांवर एक निखारा ठेवलेली पणती, त्यापासून येणारा धूर आत कोंडावा म्हणून वरून झाकण. त्याचा वेगळाच स्वाद येतो. अशा प्रकारे आपल्याला हवे तसे कमी-अधिक तिखट करून घेता येते

मग ते झाल्यावर ठाणे, पुणे वगैरे टिकाणच्या.

इंग्रजी किंवा इतर कोणत्याही चॅनलवर अशा कार्यक्रमांमध्ये दाखवले जाणारे टीव्हीवाल्यांचे चवीचे रसिक सहसा सडपातळ नसतात; किंबहुना सडपातळ म्हणता येईल याच्या जवळपासही नसतात, यामागचे रहस्य काय असावे?

दुसरी गोष्ट म्हणजे हे खवैय्ये विविध पदार्थ चाखताना उऽऽऽम, वगैरे प्रशंसादर्शक, मादक आवाज काढत असतात, त्यावेळी त्यांच्या कॅमेरामनच्या तोंडाला किती पाणी सुटत असेल. की आधी कॅमेरामनचा पोटोबा शांत करून हे शुटिंग केले जाते? मला विमानतल्या हवाईसुंद-या, रेस्टॉरंटमधले वेटर्स यांच्याबाबतही नेहमी हाच प्रश्न पडतो. त्यांच्यापैकी कोणी पदार्थ वाढताना सारखे आवंढे गिळताना दिसत नाही.

यातला सर्वात मोठा व क्रूर विरोधाभास म्हणजे इकडे हे लोक मिटक्या मारत मिसळ खाण्याचे आधीच रेकॉर्ड केलेले चित्रीकरण दाखवले जात असताना खालच्या पट्टीत काश्मीरमधील कुपवाडात झालेल्ता चकमकीत एक चांदवडचा तर दुसरा विजापूरचा असे दोन जवान मृत झाल्याची व एक मेजर पदाचा अधिकारी गंभीर जखमी झाल्याची बातमी दाखवली जात होती.

यावेळी मात्र सांगलीकडचे कुपवाड आणि काश्मिरातले कुपवाडा यांच्यात गल्लत न करण्याइतके टीव्हीवाले शहाणे झालेले दिसत होते.

२) देशद्रोह म्हणजे नक्की काय ते एकदा ठरवण्याची वेळ आली आहे. देशद्रोह म्हणजे देशाबाहेरच्या शक्तींशी संधान साधून त्यांना संवेदनशील माहिती पुरवणे एवढाच आहे का?

‘कोणी पादले तरी तो देशद्रोह समजला जाईल’ अशी पोस्टही या निमित्ताने पाहण्यात आली. त्यांना हा प्रश्न खडसावून विचारला पाहिजे. केवळ इतरांचा द्वेष करायचा या एकमेव भुमिकेतून विविध पक्षात विभागलेले दलित एकत्र येऊन इतरांचा द्वेष पसरवण्याच्या स्वत:च्या अजेंड्यात साथ देत नाहीत म्हणून थयथयाट करणारे हे महाभाग कळतनकळत या देशद्रोह्यांनाच साथ देत आहेत. त्यामुळे ख-या देशद्रोह्यांवर टीका केली तरी यांच्या पोटात दुखताना दिसते. त्यातूनच कोणी पादले तरी त्याला हे सरकार देशद्रोह समजेल काय अशा हास्यास्पद फुसकुल्या हे महाशय फोडताना दिसतात.

या महाशयांच्या वॉलवर त्यांचे समविचारी मित्र इतर जातीयांचा द्वेष करणा-या कमेंट्स सर्रास महात्मा फुले इत्यादींच्या नावावर नियमितपणे खपवताना दिसतात आणि त्याला यांची अजिबात हरकत नसते. मी कुठल्याही जातीच्या आधारावरील संघटनाविरूद्ध आहे, कारण ते एकूण समाजाच्या हिताचे नाहीच. पण हे महाशय ब्राह्मणांच्या एकत्र येण्याच्या आवाहनांच्या पोस्ट्स वेचून वेचून एकत्र करतात व त्यावर त्यांचे समविचारी मित्र वर उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मणविरोधी कमेंट्स करतात. याला अर्थातच यांची हरकत नसते. मात्र इतरत्र ब्राह्मणांवर जहरी टीका करणा-या पोस्ट्सही इतरत्र सर्रास दिसत असताना त्यात मात्र यांना काही वावगे दिसत नाही. यांच्या स्वत:च्या वॉलवर हा एकांगी प्रकार नेहमीच जळत असताना यांची देशद्रोहाबद्दलची किंवा देशविरोधाची संवेदनाच बधीर झालेली दिसते यात काय आश्चर्य?

जेएनयुमधील विद्यार्थ्यांचे वर्तन देशविरोधी घोषणा वा दहशतवादावरून फाशी झालेल्यांच्या समर्थनार्थ घोषणा देणे हे देशद्रोही वर्तनच समजले पाहिजे. या पार्श्वभुमीवर जेएनयुमध्ये देशविरोधी स्वरूपाच्या घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याची केन्द्र सरकारच्या भुमिकेचे स्वागतच करायला हवे. त्याचबरोबर या देशद्रोह्यांच्या समर्थनासाठी वेगवेगळे मुखवटे चढवून कोण पुढे येते यावरदेखील लक्ष ठेवले पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे हैद्राबाद विद्यापीठातील त्याच्या संघटनेने याकूब मेमनच्या फाशीला मानवतेच्या आधारावर समर्थन करण्याच्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले गेले किंबहुना पाठीशी घातले गेले. असे समर्थन करण्याच्या उद्योगांमुळे तोही देशद्रोही होता का असा प्रश्न विचारला गेला. डॉ. आंबेडकरांचे नाव तुमच्या संघटनेला देता, त्यांचे कार्य जरूर पुढे न्या, मात्र त्यांच्या नावाची ढाल पुढे करून तुमचे सगळेच उद्योग पवित्र करून घेतले जातील या भ्रमात राहू नका हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे.

अभाविपचे कोठे चुकत असेल, तर ते जरूर दाखवून द्या, त्यांच्या हातून काही गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य घडत असेल, तर ते करणा-या त्यांच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर जरूर कारवाई करा. मात्र ते करतात ते सगळेच चूक आणि आम्ही राजकीय चळवळीत असूनही वेळ आली की सोयीप्रमाणे दलित, कम्युनिस्ट वगैरे चेहरे मिरवणार आणि स्वत:ला सरसकट निर्दोष, अभागी म्हणवून घेणार. हे यापुढे फार काळ चालेल असे वाटत नाही.

मुळात या मुलांना या वाटेने जाण्यास प्रोत्साहन देणारे कोण आहे हे शोधायला पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे निमित्त झाल्यामुळे हैद्राबाद विद्यापीठात दिवसभर ‘उपोषण’ करणारा नाटकी पप्पू काल जेएनयुमध्येही आला, कारण येथेही भाजपचा निषेध करण्याची संधी त्याला दवडायची नव्हती. मात्र ज्या विद्यार्थानी तेथे देशविरोधी घोषणा दिल्या त्याबद्दल तो काही बोलला नाही.

या लोकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नेहमी देशद्रोह्यांच्या किंवा दहशतवाद्यांची भलावण करण्यातच कसे खर्ची होते, हा प्रश्न कोणालाच कसा पडत नाही?

जेएनयुसारखी विद्यापीठे ही डावे विचार असलेल्यांचा बालेकिल्ला मानली जातात, त्यामुळे डी. राजा, सीताराम येचुरी हे तेथील कारवाईवरून चिडणे साहनिकच आहे. पण कुठली कृत्ये देशहिताची नाहीत हे समजण्याइतकी समज कॉंग्रेसकडे; जो राष्ट्रीय पक्ष म्हणवतो; नसावी? पप्पूच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष म्हणून किती दिशाहीन झाला आहे याचेच हे लक्षण आहे.

जेएनयुमधून पास झालेल्या आर्मीतल्या बुजुर्ग निवृत्त अधिका-यांनीही तेथे चाचलेल्या देशविरोधी उद्योगांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे व असेच प्रकार चालू राहिले तर आम्हाला या विद्यापीठाकडून मिळालेल्या पदव्या परत कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले आहे.

३) द्रमुक – कॉंग्रेसची हातमिळवणी देशाला लुटणारे पुन्हा एकत्र

तामिळनाडुतल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी द्रमुक व कॉंग्रेसच्या युतीची आज घोषणा झाली. याच दुकलीने मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेच्या आड देशाला लुटले होते. लुटले होते हा शब्दही तोकडा ठरावा इतके लुटले होते.

२जी घोटाळे उघड झाल्यावर द्रमुकचे तोन मंत्री थोडाकाळ गजाआड गेल्यामुळे या दोन पक्षांमध्ये वितुष्ट असल्याचे चित्र होते. मात्र आता निवडणुका जवळ आल्या की हे दोन्ही लुटारू पुन्हा एकत्र आलेले आहेत.

या मैत्रीवरून पप्पूला कोणी विचारल्याचे ऐकिवात नाही. त्याच्या पक्षाने च द्रमुकने केलेल्या लुटालुटीची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे काही बोलणे योग्य नसल्याचे कारण पप्पू देईल.

इकडे अशा अभद्र युत्या, तिकडे पंजाबात भाजपही अकाली दलाशी असलेली युती सोडेल अशी चिन्हे नाहीत. अकाली दलानेही पंजाबला व पंजाबातील तरूणांना देशोधडीला लावण्यात कसलीच कसर सोडलेली नाही. महाराष्ट्रात यापूर्वी भाजप शिवसेनेच्या भ्रष्टपणाच्या व गुंडगिरीच्या दावणीला बांधलेला होता, तोच प्रकार त्यांच्याबाबतीत पंजाबमध्ये झाला आहे. पंजाबात अमरिंदरसिंग यांच्या नेतृवाखाली कॉंग्रेसचे सरकार येऊन त्यांनी तरी तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी इच्छा आहे.

४) थॅचर यांच्या ख्रिसमसचे जबरदस्तीचे पाहुणे

टिम बेल हे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे मित्र व सल्लागारही. त्यामुळे सलग जवळजवळ १२ वर्षे त्यांना थॅचर यांच्या निवासस्थानी ख्रिसमस साजरा करावा लागला.

पहिल्या वर्षी त्यांना जेव्हा यासाठीचे निमंत्रण मिळाले तेव्हा त्यांना कोण आनंद झाला होता. पंतप्रधानांच्या घरचा ख्रिसमस. परंतु त्यानंतर सलग एवढी वर्षे त्यांच्याकडेच ख्रिसमस साजरा करावा लागल्यामुळे व त्यात अगदी तोचतोचपणा असल्यामुळे व एकूणच रडाळपणा असल्यामुळे ते इतके कंटाळले होते की आता थॅचर पंतप्रधानपदी न राहतील तर बरे असे त्यांना झाले होते.

५) व्हॅलेंटाइन डे आपल्याकडे का साजरा करावा? अगदी कोणी पती पत्नी नसले तरी एकमेकांचे वाढदिवस असतात. त्याव्यतिरिक्त साजरे करायला सतत काही ना काही निमित्त लागते हेच त्यामागचे कारण असते. पतीपत्नींना एकमेकांच्या वाढदिवसाशिवाय लग्नाचा वर्धापनदिन तरी असतो, आमचे काय ही प्रेमींची अडचण असावी.

पण एखाद्या दिवशी ठरवून आपले प्रेम व्यक्त करायचे यातच कृत्रिमपणा येत नाही का? की तो कृत्रिमपणाही आजकाल आवश्यक झाला आहे?

प्रतिक्रिया

स्वतःच्या कमाईतून कर भरणे म्हणजे नक्की काय?

मी नोकरी धरतो तेव्हा कंपनी मला किती पगार देणार हे सांगते. त्यावर लागणारा कर वजा जाता उरलेली मला "हातात मिळणारी रक्कम मला पुरेशी वाटली" तर मी (इतर बाबी पटल्यास) ती नोकरी स्वीकारतो. मला ७० रुपये हातात हवे असा माझा विचार असतो तेव्हा मी १०० रुपये कंपनीने द्यायला हवेत असा आग्रह धरतो. आणि असा पगार देणारी नोकरी मी धरतो/शोधतो. म्हणजेच (टेक्निकली) मला लागणारा टॅक्स मी कंपनीकडून वसूल केलेला असतो. तसेच कंपनीला नफ्यावर जो टॅक्स लागतो त्याबाबतीतही शेअरहोल्डर्स कंपनीचा नफा न पाहता अर्निंग पर शेअर (म्हणजे करोत्तर उत्पन्न) पाहतात. आणि हे करोत्तर उत्पन्न किती आहे/असावे/असेल याचे लक्ष्य संचालकांना देतात.

माझी अपेक्षा १०० रुपयांची असते म्हणून मी १०० रुपयेवाली नोकरी स्वीकारतो आणि मग ३० टक्के कर कापला गेल्यावर मला धक्का बसतो अशी स्थिती नसते.

तसेही स्वतःच्या उत्पन्नातून भरलेला कर एकूण कर उत्पन्नाच्या १०-१५ टक्क्याहून जास्त नसतो. तेव्हा तथाकथित प्राप्तिकर भरणार्‍यांना फार टिमक्या वाजवू नयेत हे म्हणणे योग्यच आहे.

शिवाय व्यक्तीचे उत्पन्न कष्टाने कमाबलेले असते ही समाजवादी संकल्पना आहे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ज्यांची कमाई कर भरण्याइतकी नाही त्यांना कमी लेखण्याचा प्रश्न नाही. पण स्वत:च्या कमाईतून कर भरणे याला महत्त्व दिलेच पाहिजे. अर्थमंत्रीही करदात्यांचा उल्लेख करतात तो त्यामुळेच. त्यांच्या कर भरण्याचे विशेष नसते तर केवळ अप्रत्यक्ष करांमधूनच देश चालवा असे म्हणता आले असते की. एखादी नोकरी परवडणे न परवडणे हा भाग वेगळा. तुम्ही म्हणता तशी हवी तशी नोकरी मिळण्याची ऐष फारच थोड्यांच्या नशिबी असते.

जगण्यासाठी आवश्यक अश्या ज्या वस्तू असतात त्यावर शक्यतो टॅक्सच नसतो किंवा अगदी निग्लिजिबल असतो. त्यामुळे तो पॉईंट जे लोक मांडतात ते वाईट हेतू नी प्रेरीत असतात.

राकु - आज फुबा ला बराच उशीर झाला. चातकीणी सारखी वाट बघत होते मी. Smile

काहीही पोस्ट करायला अनेकदा खूप अडचणी येतात. आपोआप लॉगआउट होणे, संस्थळाची उद्दिष्टे हे पान येणे, तुम्हाला येथे बंदी आहे, वगैरे. काल हा प्रकार फार वेळा झाला. अखेर नाद सोडला.

माफ करा, चुकून 'चेटकिणी सारखी' असे वाचले.

हाहाहा. तुफान विनोद.

काही औषधे फार महाग झाली आहेत असे वाटते.

फुसके बार – ०२ मार्च २०१६
.

१) दारूला प्रतिष्ठा

लग्न झाल्यावर साधारण वर्षभरातच एका जोडप्याचा घटस्फोट होण्याचे कारण काय असावे? पत्नी सोशल ड्रिंकर होती. त्याच्या मागे लागली होती की त्यानेही पिण्यास सुरूवात करावी. आता याच्या वडलांच्या प्रमाणाबाहेर दारू पिण्यामुळे त्याच्या आईच्या संसाराची वाताहात झालेली, वडील दारू पिण्यामुळे लवकर गेले, तेव्हापासून आईने कष्ट घेऊन मुलांना वाढवलेले. हे सर्व मुलांनी पाहिलेले. त्यामुळे हा दारूचा तिरस्कार करणारा. माझ्या दारू पिण्यामुळे आईला फार मनस्ताप होईल, शिवाय त्याचा पुढे स्वत:च्या मुलांवर कसा परिणाम होईल याचा नेम नाही. त्यामुळे दारू न पिण्याचा याचा निश्चय.

तेव्हा या विसविशीत माणसाबरोबर आयुष्य काढणे तिला अशक्य झाले, आणि अर्थात घटस्फोट हा त्यावरचा सर्वात सोपा उपाय.

आणि आता तुषार नातूंनी उल्लेख केलेले हे उदाहरण पहा.

“तो पहिल्यांदा आमच्याकडे २००७ साली उपचारांना आला तेव्हा बायकोने त्याच्या दारुला कंटाळून घटस्फोट घेतला होता. त्याच्या कुटुबियांनी ५ वर्षाच्या मुलाला आमच्या कडे ठेवा असा आग्रह केला तर जास्त वाद न घालता मुलगा त्याच्याकडेच ठेवून ती निघून गेली. इतकी वैतागली होती याच्या दारूला. जेव्हा त्याचे पालक आंम्हाला भेटायला आले तेव्हा त्यांनी आमची सुन कशी नालायक होती याचे वर्णन करुन घटस्फोट आंम्हीच घेतला असे सांगून मुलाचे समर्थन केले.
नंतर तो जेमतेम चार पाच महिने चांगला राहीला. लगेच घरच्यांनी त्याचे दुसरे लग्न करुन दिले. अन वर्षभरात पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला. बाहेर पडल्यावर पुन्हा व्यसन सुरु केले. मग दुस-या बायकोने पण घट्फोट घेतला.
त्या दु:खात तो जास्ती प्यायला लागला. त्या बायकोने असे करायला नको होते. तिच्या माहेरचे लोक ठिक नव्हते. त्यांनीच तिला फुस लावून घटस्फोट घ्यायला लावला असे याच्या कुटुंबियानी आम्हाला सांगत पुन्हा याची बाजू घेतली.
मग पुन्हा एकदा उपचार घेतले. वर्षभर चांगला राहीला अन मग तिसरे लग्न लावले कुटुंबियांनी याचे. आता पुन्हा दारु प्यायला सुरुवात केलीय.
आम्ही कुटुंबीय त्याला उपचार केव्हा देतील याची वाट पहातोय. शिवाय आता तिसऱ्या पत्नीने घटस्फोट घेतला तर याचे पालक काय समर्थन देतील हे पण ऐकायचे आहे.
अजून एक महत्वाचे. एकाही उपचारात याच्या पालकांनी कधीच आमच्या केंद्राची पूर्ण फी भरलेली नाहीय.
आपला मुलगा नालायक आहे हे जोवर पालक स्वीकारत नाहीत तोवर खरी सुधारणा होणे कठीणच असते.

२) यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत हे तर नेहमी ऐकतो. तो काही युगे युगे ‘संभवत’ नाही, त्यामुळे त्यातली निरर्थकता कळलेली आहे.

हे संभवामि युगे युगे प्रकरण उगाच भोळ्यांची समजुत घालण्यासाठी आहे हे खरे.

पण जेव्हा जेव्हा उकाडा असह्य होतो, तेव्हा आभाळ भरून येते आणि पाऊस पडून वातावरण थोडेफार तरी सुसह्य होताना दिसते. येथे निसर्ग बहुतेक वेळा आपले काम करताना दिसतो (ती व तो भेटले व निसर्गाने काम केले या अर्थाने नव्हे).

३) कोरा या वेबसाईटवर टाइम्स नाऊच्या अर्णब गोस्वामीचा पगार महिन्यास एक कोटी इतका असल्याचे म्हणले आहे. आरडाओरडा करण्यासाठी एवढे पैसे मिळतात याबद्दल तेथे आश्चर्यही व्यक्त केले गेले आहे.

४) तिसरी मुंबई परिसरातील जमीनविक्रीतील फसवणूक

मराठी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्यांना हाताशी धरत सध्या टीव्ही – वर्तमानपत्रांमध्ये महाराष्ट्रभर व त्यातही विशेषत: नव्याने उदयास येत असलेल्या तिसरी मुंबई परिसरात प्लॉटविक्री करण्याच्या मोठमोठ्या जाहिराती सध्या दिसतात. मागे पुण्याजवळ शिंदेवाडी येथे दोनएक वर्षांपूर्वी तुफान पाऊस झाल्यानंतर तेथे केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे एका कार वाहून गेल्यामुळे दोघांचा मृत्यु होण्यास जबाबदार असलेल्या एकावर या निमित्ताने खटला चालू आहे. या व्यक्तीवर मोठाच राजकीय वरदहस्त असल्यामुळेच त्याच्यावर ती कारवाई न करण्याबद्दल मोठा दबाव होता असे बोलले जात होते. मोठ्या उशीराने त्या व्यक्तीने तेथे केलेले अतिक्रमण पाडण्यात आले व नंतर त्याच्या जमिनीचा लिलावदेखील करण्यात आला होता. ही व्यक्तीच आता त्याहीपेक्षा प्रचंड प्रमाणावर मोठ्या जमीनविक्री रॅकेटच्यामागे असल्याचे बोलले आहे. अशा जाहिराती करणा-या या कंपनीच्या प्रवर्तकांची नावे विचारली असताना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

तिसरी मुंबई म्हणून उदयास येणा-या भागामध्ये प्रत्यक्षात हातात फारशा जमिनी नसतानाही मोठमोठ्या जाहिराती करून लोकांना फशी पाडत आहे. प्लॉट्स पाडताना रस्त्यासारख्या किमान गरजांसाठीही जागा मोकळी न सोडता सगळी जागा विकून मोकळे होत आहेत. जमीन विकताना खरेदीदाराची जमीन नक्की कोठे असणार याची निश्चित माहिती दिली जात नाही. अशी परिस्थिती असताना लोकांकडून फ्लॅटचे बुकिंगदेखील घेतले जात ऄअशा प्रकारे लोकांची उघडउघड फसवणूक होत आहे.

सरकारने या प्रकारांमध्ये वेळीच हस्तक्षेप करून या प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काळामध्ये खूप मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्यातल्या गुंठामंत्र्यांप्रमाणेच या भागातही जमिनी विकून आलेल्या पैशातून अचानक श्रीमंत झाल्यामुळे महागड्या गाड्या उडवणे, प्रचंड खर्च करून लग्ने करणे हे नेहमीचे झालेले आहे. वधुवरांनी लग्नस्थळी हेलिकॉप्टरमधूनच यायला हवे असा जणू अलिखित नियम झालेला आहे. यामुळे लग्नामध्ये वायफळ खर्च केला जाऊ नये यासाठी तेथील लोकांचे समुपदेशन केले जात आहे.

५) रेल्वे बजेट, प्रभू व बच्चन

रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करतेवेळी मंत्री सुरेश प्रभू यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील काही भाग वापरला. भाषणापूर्वी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी त्याबाबत चर्चा केली. शिवाय अर्थसंकल्पाचे भाषण सादर केल्यानंतर त्यांनी पुन्हा बच्चन यांना फोन केला व त्यांच्याकडून त्या कवितेचे सादरीकरण व्यवस्थित झाले का हेदेखील विचारले.

६) इशरत जहान यह नाम मैं ने सुना था और पोलिस के साथ चकमक में वह मारी गयी थी ऐसा डेव्हिड हेडलीने कहा। – उज्ज्वल निकम यांच्यावरच कोणी हिन्दीला भ्रष्ट करण्यावरून खटला भरला तर आश्चर्य वाटायला नको.

७) सतत चिडणा-या व्यक्तीला शांत करण्याचा हमखास उपाय म्हणजे तिला फुटबॉल खेळायला प्रोत्साहन देणे. आता खेळ म्हणल्यावर आपल्याकडील बॉल सतत आपल्याकडे राहणार नाही, कोणी तरी तो आपल्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणारच; तेव्हा त्याबाबत सतत चिडून खेळणे चालणार नाही हे सत्य तिला त्यानिमित्ताने जाणले तरी तिचे उर्वरीत आयुष्यही सुख-संयमात जावे.

तुम्ही खेळता राकु फुटबॉल?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फुसके बार – ०३ मार्च २०१६
.

१) एखादी कविता लिहून झाल्यावर कालांतराने ती आपण कोणत्या अर्थाने लिहिले असेल बरे, असा स्वत: कवीचाच गोंधळ होण्याचा प्रकार झाला, असे होत असेल का?

२) संस्कृतींमधला फरक?

दोह्यात असताना माझ्या गो-या मित्राबरोबर मसइदच्या प्लॅंटमध्ये जात होतो. तो गाडी चालवत होता. समोर एका अरबाची गाडी होती. तो बराच वेळ त्याला ओलांडून जाण्यास जागा देत नव्हता. अखेर थोडे पुढे गेल्यावर त्याने नाइलाजाने गाडी स्लो लेनमध्ये घेतली. आमच्या गो-याने थॅंक्यु म्हणत त्याला अंगठा दाखवला. झाले, तो अरब ड्रायव्हर पिसाटला. गाडीचा वेग वाढवून आमच्या गाडीच्या पुढे आणून आमची गाडी थांबवायला भाग पाडले. गाडीतून उतरून तरातरा आमच्या गाडीकडे आला आणि काही कळायच्या आतच आमच्या मित्राच्या थोबाडीत मारली आणि म्हणाला पुन्हा अंगठा दाखवशील तर अंगठाच कापून टाकीन.

दोन संस्कृतींमधील फरक वगैरे म्हणण्यापेक्षा कोणी गोरा असो की आणखी कोणी, आमच्या देशात आम्हीच राजे हा माजच त्यामागे दिसत होता.

३) पप्पू जस्ट कान्ट डिलिव्हर साला

सध्याचे अधिवेशन सुरू होतेवेळी पप्पूने मोठ्या वल्गना केल्या होत्या की हे सरकार मला घाबरते, त्यामुळे मला संसदेत बोलू दिले जाणार नाही.

मात्र या बढाया मारल्यानंतर आज पप्पूने अपेक्षेप्रमाणे त्याच्यावर आशा लावलेले कोणी असेलच, तर त्या सा-यांना तर त्यांना तोंडघशी पाडले. जवळजवळ प्रत्येक वाक्यानंतर मान खाली करून खाली लिहिलेले वाचणे आजही चालू राहिले. ‘पप्पू कान्ट डिलिव्हर साला’ हे त्याने सिद्ध केले. पुन्हा एकदा. शेवटचे साला हे पप्पूला उद्देशून नाही.

मध्येच त्याने सत्ताधा-यांना उद्देशून तुम्ही सावरकरांना फेकून दिलेत का असे पुन्हापुन्हा म्हणण्याची मर्दुमकी मात्र दाखवली. यावरून हे भाषण त्याला मणिशंकर अय्यरनी लिहून दिले होते की काय अशी शंका आली. कॉंग्रेसवाल्यांनी या ठोंब्याच्या बाळबोध विधानांवर व आविर्भावावर मधूनमधून टाळ्या वाजवत त्याचे अर्थहिन व निर्जीव भाषण उचलून धरण्याचा प्रयत्न केला, पण ते प्रभावी झाले नाही ते नाहीच. ते तसे झाले असते तरच काळ्या धनाला पावन करून घेण्याच्या बजेटमधील घोषणेला त्याने दिलेल्या ‘फेअर अँड लव्हली’ या उपमेला काही वजन प्राप्त झाले असते.

माझी भावना अखेर जेटलींनी बोलून दाखवली. ते म्हणाले की राहूल गांधींना बोलताना ऐकले की नेहमीच हा प्रश्न पडतो की त्यांना खरेच काही माहित आहे का आणि त्यांना खरेच केव्हा काही माहित होईल. (कधी तेवढी समज येईल).

४) सुकाळ हा शब्द दुष्काळ या शब्दाच्या विरूद्ध अर्थाने म्हणून वापरला जातो, तरी अमुक गोष्टींचा सुकाळ झाला आहे असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तो शब्द अनेकदा चांगल्या अर्थाने वापरलेला नसतो. काय कारण असावे याच्यामागे? सुकाळ या शब्दाच्या योग्य वापराबद्दल काय करता येईल?

५) जेएनयुमधील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याला अंतरिम जामीन मिळण्याची बातमी हा एक प्रकारचा अँटीक्लायमॅक्स झाला. त्याला जामीन तर मिळाला, परंतु विद्यापीठात यापुढे देशविरोधी घोषणांची घटना यापुढे होणार नाही याची काळजी तेथील प्राध्यापक व प्रशासन या दोघांनीही घ्यावी अशी सूचना उच्च न्यायालयाने केली आहे. देशविरोधी घोषणांचे इन्फेक्शन या विद्यापीठाला झालेले दिसते, ते धुवून काढले पाहिजे व बरे केले पाहिजे असे निरिक्षणही न्यायालयाने नोंदवले.

दुसरीकडे वकील वृंदा ग्रोव्हर म्हणताहेत की सुरूवातीला पुरावा म्हणून न्यायालयात सादर केलेला व्हिडियो बनावट असल्याचे आजच स्पष्ट झाल्यामुळे ही बाब कोर्टापुढे आणता आली नाही. त्यामुळे न्यायालयाने तशी निरिक्षणे नोंदवल्याचे त्या म्हणाल्या.

६) पूर्वी चित्रपट चालू होण्याआधी चित्रपटगृहात एक वार्तापट किंवा डॉक्युमेंटरी दाखवली जाई. माझा एक मित्र आहे. तो कोणत्याही सिनेमाला जाताना नेहमीच वेळेत जाण्यासाठी आग्रही असे.
त्याचे म्हणणे असे की ही डॉक्युमेंटरी, नंतर दाखवले जाणारे सेंसर बोर्डाचे सर्टिफिकेट हे सारे पाहणे गरजेचे असते. सर्टिफिकेटमध्ये सिनेमाची किती रिळे आहेत हे दाखवले जाते, तेही पाहिले पाहिजे. अशा प्रकारे प्रत्यक्ष सिनेमा सुरू होण्यापूर्वी छान वातावरण निर्माण झाले पाहिजे असा त्याचा आग्रह असे.

पाने