अलिकडे काय पाहीलत - २२

जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***
काल "राही मतवाले" हे तलत मेहमूद यांचे गाणे ऐकून, त्यांचा व सुरैय्याचा "वारीस" हा १९५४ चा सिनेमा पाहीला. एकदम खूप आवडला. सशक्त व नाट्यमय कथा, अतिशय गोड गाणी. तलत मेहमूद देखणे दिसतातच पण डायलॉगमध्ये त्यांचा मृदू आवाज .... ओह माय गॉड!! साध्या बोलण्यातही, इतका मृदू, मखमली आवाज. सिनेमा फार छान आहे.
.
यु ट्युबवर सापडेल.
.
राही मतवाले ....................... तलतच्या आवाजात (मधुर)
राही मतवाले ....................... सुरैयाच्या आवाजात (अतिशय मधुर)

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

मनोज कुमार यांचा मी जबरी पंखा

मनोज कुमार यांचा मी जबरी पंखा . त्यांचे सिनेमे हे नेहमीच stress buster च काम करतात . विशेषतः 'क्लर्क ' हा मास्टरपीस आहे . त्यातलं 'मै हु क्लर्क ' या अप्रतिम गाण्याने आयुष्याला 'णवीण ध्येय ' मिळते . त्याचं सिनेमातला एक अप्रतिम सिन जो लिखाण /दिग्दर्शन /अभिनय या आघाडीवर मैलाचा दगड ठरेल. असा हा अप्रतिम प्रसंग खास तुमच्यासाठी .
टीप -परीक्षक म्हणून नितीन मुकेश , सलीम खान , मंगेशकर भगिनी ,अनुप जलोटा यांची नाव वाचण्यात आली . यांच्या हातात असत तर यांनी मोदी यांनाच फाळके पुरस्कार दिला असता . पण शिंचे नियम आडवे आले असतील

https://www.youtube.com/watch?v=2JtoYmOZFQE

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

पाहिले मी

एका सुंदर गीताला हा चार "चंद्र" लावणारा टू ब्याड इट्स गुड विडिओ :

वा वा मजा आली

मला हे गाणेच माहीत नाही त्यामुळे फरक पडला नाही पण म्यूट करून बघताना आणखी मजा येते.
- तुझमे रब दिखता है प्रमाणे त्याला तिच्यात सुरेश वाडकर दिसतो
- टॉवेल ने अंग पुसून पुन्हा पाण्यात जाउन बसण्यात काय पॉइण्ट आहे कळत नाही
- निसरड्या जागेत तिने जाउन बसणे यात काहीतरी प्रतीक असावे.
- रेखाचित्रे काढायचा प्रयत्न मी शाळेतील बोअर तास संपल्यापासून पुढे कधी केलेला नाही पण कोणतेही चित्र काढताना चित्राकडे पूर्ण तोंड करून, म्हणजे मागच्या कॅमेर्‍याकडे पाठ करून, काढले तर हाताचा अँगल बरोबर येइल ना? अर्धा कॅमेर्‍याकडे फेस करून पेन्सिल कशीबशी चित्रावर टेकवणार्‍या अँगल मधे चित्र कसे काढता येइल? हुक शॉट मारायला स्केवर कटचे पोझिशन घेतल्यासारखे वाटते येथे.
- नदीकाठी असलेल्या सुंदर ई. तरूणीकडे बघताना कपाळाला आठ्या असलेला नायक पहिलाच असेल
- आणि अरे त्याला ती कायम फुल फ्रेम मधे दिसते ना? मग "पायाकडून क्लोज अप मधे एण्ट्री" कशाला तिची?
- हे भासदृष्य आहे, की प्रत्यक्ष सीन? भास असेल तर तिच्यापासून त्याला लपायची गरज काय आहे? आणि प्रत्यक्ष सीन असेल तर पेरिफेरल व्हिजन नावाचा एक प्रकार असतो ज्यामुळे डेड समोर असलेल्या गोष्टींच्या आजूबाजूच्या गोष्टीही आपल्याला दिसतात, हे त्यांना कोणीतरी सांगायला हवे.
- तिने प्रत्यक्ष कुंकू लावलेले नाही पण त्या चित्रात कुंकू आहे. म्हणजे नायकाला ती भावी बायको म्हणून दिसते. टॉम अ‍ॅण्ड जेरी मधल्या प्राण्यांना समोर कोंबडीचे पिल्लू पाहिजे की त्यात चिकन डिश दिसते तशी.
- हे पाह्ताना ऑर्चर्ड सप्लाय हार्डवेअर ची जाहिरात का दिसते हे बघायला त्या दुकानात जाउन येणार आहे मी.

कॅमेरा हे कॅमेरामनचे डोळे असं

कॅमेरा हे कॅमेरामनचे डोळे असं धरलं तर तो कॅमेरामन चांगलाच उंचानिंच असावा. कारण कॅमेरा वरून खाली मारलेला आहे. कदाचित त्याला सुपिरियोरिटी कॉम्प्लेक्स असेल.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

हे गाणे जर तुम्हाला माहित

हे गाणे जर तुम्हाला माहित असते आणि ग्रेसच्या उदासी विराण्या, गूढ भावगर्भ कविता यांचा आस्वाद घेता येत असेल (!) तर अजून बहार आली असती. मुळातच गाणे काहिसे दुखरे आहे, त्याला अशी गुलाबी छटा देताना दिग्दर्शकाच्या मतिला जे जे सुचेल ते पाहताना, शब्दांशी जमेल तितकं रिलेट होताना नायकाची जी त्रेधा उडाली आहे त्याने काय कहर मजा आलेली आहे!!!
पण शेवटी तुम्ही काही कमी नाही ते सोडाच!

आता ऐकतोही

गाण्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. आता ऐकतो (स्माईल)

दुर्दैवाने ...

दुर्दैवाने, तुम्ही दोघंही गाण्याची समीक्षा करताना कमी पडताय असं म्हणावं लागतंय.

१. गुलाबी छटा याचा उल्लेख नील लोमस करतात. पण डोळ्यांतल्या गुलाबी रंग ओळखणाऱ्या पेशी जाळणारा बाईचा गुलाबी पेहेराव किती सुंदर आहे याबद्दल चकार शब्द नाही.
३. गुलाबी कापड आणि पिवळा-केशरी टॉवेल ही रंगसंगती किती गडबडीत आणि खडबडीत याबद्दल काहीही भाष्य नाही.
२. मुळातच 'नदीच्या किनारी' म्हणताना ही नदी एवढी गरीब आहे तर गाणं किती गरीब असेल असा प्रश्न तुम्हाला दोघांनाही पडला नाही.

सारखी टीका करते असं वाटू नये म्हणून -
१. मूळ व्हीडीओ देणं हीच थोर गोष्ट आहे.
२. तो व्हीडीओ म्यूट करून बघा हे सांगणारा फारएण्डही थोर आहे.
३. नायकाची त्रेधा - होय, होय! तो व्हीडीओचा हाय पॉइंट आहे.
४. टॉम अँड जेरी, ऑर्चर्ड ... लोल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे मुद्द्दे

ही विचारात घेण्यासारखे आहेत नक्कीच. या पार्श्वभूमीवर तो व्हिडीओ नव्याने पाहायला व ऐकायला हवा आता. मात्र नदीकिनारी ओलेती सुंदर ई. नायिका बाजूलाच राहून इतर गोष्टींवरच चर्चा व्हावी इतक्या ताकदीचा व्हिडीओ आहे हे मात्र मान्य व्हावे (स्माईल)

आता अलिगढ पाहिला.. एखादा

आता अलिगढ पाहिला.. एखादा चित्रपट पाहून किती अस्वस्थ वाटावे! मनोज वाजपेयीने उभा केलेला प्रा.सिरस नुसता एक विवक्षित व्यक्ती न उरता आपल्या समाजातील पापभिरू माणसाचं प्रतिक बनतो. कवी मनाच्या हळव्या, अबोल, प्रज्ञावान व्यक्तीला या समाजात स्थान आहे का? असा मुलभूत सवाल उभा करणारा हा चित्रपट बघुन आल्यापासून डोळ्यांचे कढ थांबलेले नाहीत.चित्रपट काहीच न बोलता इतके काही बोलतो की आपलीच समाज म्हणून असणारी प्रतिमा भेसूर दिसू लागते. मनोज वाजपेयी ही भुमिका जगलाय हा कितीही घिसापिटा ड्वायलाग असला तरी तो त्या जगण्याइतकाच खरा आहे.
त्यातील एकेक प्रसंग आठवून आणखी किती दिवस डोळे भरून येणार आहेत कोण जाणे! खूप खोलवर घाव घालणारा आणि तिथेच रुतून हेलावून टाकणारा चित्रपट. चित्रपट बघताना केवळ आपण बघत जातो त्यात रुतत जातो पण तो संपला की मनात उठणारे विचारांचे काहूर शमता शमत नाही

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी देखील पाहिला वीकांताला.

मी देखील पाहिला वीकांताला. नाजूक विषय एकदम संवेदनशीलपणे पण बोल्डली हाताळलाय. सिनेमातलं पात्र म्हणतं त्याप्रमाणे हा समलैंगिक वि विरोधक हा मुद्दा नसून एका माणासाच्या बेडरूम प्रायवसीचा आहे. भारतात वैयक्तिक प्रायवसीची फार किंमत नसते हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. राजकुमार रावच्या बेडरूममध्ये मालकीण बिनदिक्कत दार न वाजवता येणं, तिथे तो नसताना पोरांचे क्लास घेणं वगैरे आणि ऑफकोर्स मनोज वाजपेयीवरचं स्टिंग दाखवून. मधुर भांडारकर सारख्या तथाकथित सामाजिक भानवाल्या हिंदी सिनेमात गे लोकांचं जे स्टिरिओटाइप्ड चित्रिकरण असतं त्यातुलनेत हा बराच वरचा आहे सिनेमा

पण मराठी बोलताना मनोज वायपेयीच बिंग फुटतं. च्/ज सारखे उच्चार पूर्ण हिंदीष्टाइल येतात. याच दिग्दर्शकाचे शाहिद आणि सिटी लाइट्स जास्तं चांगले वाटले मला.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मधुर भांडारकर सारख्या तथाकथित

मधुर भांडारकर सारख्या तथाकथित सामाजिक भानवाल्या हिंदी सिनेमात गे लोकांचं जे स्टिरिओटाइप्ड चित्रिकरण असतं त्यातुलनेत हा बराच वरचा आहे सिनेमा

+१
मुळात त्याला आपली लैंगिकता, प्रेम, भावना अशी शब्दांच्या कप्प्यांत बंद करणं (गे म्हणणं) आणि मग त्या आधारावर त्याच्याशी आचार करण्याने मनात खोलवर झालेली जखम त्याच्या डोळ्यात उतरते त्याला तोड नाही. पहिल्यांदा "इन तीन अक्षरोमे ये समाये ऐसी चीज नही है" असं काहीसं म्हणताना किंवा नंतर होडीत असताना "प्यार" बद्दल बोलताना त्याचा कायिक अभिनय, चेहरा, डोळे सगळंच उच्च आलंय.
मराठी उच्चाराबद्दल सहमत. विशेषतः मी मज हरपून गाताना हिंदी 'ज' एकदमच बोचतो.
शिवाय सिनेमॅटोग्राफी, धुक्यातले अलीगढचे रस्ते दाखवणे, शक्यतो रुळावरचा क्यामेरा न वापरता एका जागी क्यामेरा ठेऊन केलेल्या चित्रीकरणामुळे एकुणच पात्राला दिलेला ठहराव.. त्याच्या अगदी आपल्याच सारख्या विचारा-आचाराने अस्वस्थ वाटावं इतकं सहजपण टिपणार्‍या फ्रेम्स / प्रसंग.. काय लिहावं नि किती!

किमान एकदा तरी मोठ्या पडद्यावर 'बघण्या'सारखा अनुभव आहे हा चित्रपट शब्दांत लिहिणे-बोलणे पुरेसे नाही.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अलीगढ

अलीगढविषयी लिहायलाच आले होते. मीही पाहिला काल आणि भारावून गेले. मनोज वाजपेयींचा अभिनय पाहून खरोखर थक्क झाले. काही ठिकाणी 'कोर्ट' सिनेमाची आठवण झाली. सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे चित्रपट ज्या घटनेभोवती फिरतो, ती घटना समलिंगी संबंधाशी संबंधित असली, तरी त्या घटनेला, आणि त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींना केवळ तेवढेच लेबल न लावता त्या घटनेला असणारे अनेकविध आयाम दाखवले आहेत. समलिंगी संबंध, खाजगीपणा/ एकांत जपण्याचा मुद्दा हे मांडताना मुख्य पात्राला एक माणूस म्हणून उभं केलं आहे, ते आवडलं.
[ढ खाली टिंब (नुक्ता) कसं द्यायचं?]

वाचा शब्दोंके अंतराल मे

वाचा शब्दोंके अंतराल मे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जब से हम तुम बहारोंमे ___

जब से हम तुम बहारोंमे ___ सुमन कल्याणपूर व रफी यांचं अत्यंत गोड युगुलगीत. चित्रपट - मै शादी करके चला. संगीत - चित्रगुप्त.
.
.

हे बर्‍याच दिवसांनी ऐकलं.

माझं आवडतं आहे.

माझं आवडतं आहे.

अजि म्या धन्य जाहलो

आजच्या मुहूर्तावर मी हे पाहिलं आणि धन्य झालो -

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पर्मनंट रूममेट्स ही

पर्मनंट रूममेट्स ही टीव्हीएफची पहिली वेबमालिका (आणि पाठोपाठ त्यांचीच 'पिचर्स' ही दुसरी मालिका) पाहिली आणि ती बघायला दीडेक वर्ष उशीर केल्याबद्दल स्वतःलाच शिव्याशाप दिले.

खणखणीत अभिनय, तांत्रिक सफाई, तपशिलांची श्रीमंती, साटल्य, पकड घेणारी-चटकन आपली वाटणारी-समकालीन गोष्ट - आणि स्मार्ट-संपृक्त-सहज लेखन हे सगळं आहेच. त्याबद्दल कितीही बोलता येईल. बोललं जातंही आहे. (कोरा किंवा यू ट्यूबवर जाऊन पाहा. लोक आनंदानं मालिकेची चीरफाड करताहेत (चीरफाड हा थोडा नकारात्मक शब्द आहे. पण बिंज वॉचिंग करून गोष्टीच्या एकेका दृश्य भागाचं विश्लेषण करणं, त्यावर प्रचंड वेळ दवडणं, लेखक आणि दिग्दर्शकांच्या हेतूंबद्दल अंदाज बांधणं हा आधुनिक टीव्हीप्रेक्षकांचा आवडता छंद आहे आणि तो आनंददायीही आहे हे अनेक परदेशी मालिकांची फ्यानडमं (या शब्दाबद्दल मराठी सारस्वताची माफी मागत आहे)पाहताना लक्षात आलं आहे. ते भारतीय टीव्हीबद्दल होताना प्रथम पाहिलं. या मालिकांचं रसग्रहण करताना, त्यातल्या बाऽरीक चुका दाखवतानाही लोक 'पण तुमची सिर्यल भारी आहे हां, कीपिटप!' असं लिहायला विसरत नाहीत. ते तसंही अध्याहृत आहेच.), पुढचा सीझन लवकर आणा-आम्ही हवे तर पैसे देऊ अशा फर्मायशी करताहेत, एकदाचा टीव्ही-तुंबा फुटला म्हणून आनंदित होताहेत.)

पण खरा आनंद झाला तो टीव्ही-ट्यार्पी-प्रेक्षकशरणता-निर्बुद्धपणा या दुष्टचक्रातून निर्माण झालेली कोंडी फुटली याचा. टवरण्टकृपेमुळे इंग्रजी आणि अमेरिकी मालिका चुटकीसरशी पाहायला मिळतात, पण त्या बघून आनंदाच्या पाठोपाठ चिडचिडाट होतो. "बर्‍या बॉ यांच्याकडे इतके भारी लोक इतक्या भारी गोष्टी बनवतात. नाही तर आमच्याकडे... अकलेची दिवाळखोरी.." असा शरमयुक्त राग कम्पल्सरी आळवला जातो. पण ही मालिका बघितली आणि एकदम आनंदविभोर वाटलं. एकतर टीव्हीचा त्या मालिकेशी का-ही-ही संबंध नाही. (टीव्हीएफच्या परिचयचित्रफितीत एका टीव्हीचा कपाळमोक्ष दाखवला आहे ते काही उगाच नव्हे!) टीव्हीपाठोपाठ येणारे ट्यार्पीचे बथ्थड संकेत, २५ किंवा ५० मिनिटांचे भाग बनवण्याची जबरदस्ती, जाहिरातींचे संतापजनक ब्रेक, म०म०व०म०व० लोकांच्या अकलेचा लसावि किंवा मसावि काढायची मखलाशी... यांतलं काहीही त्यात नाही. किंबहुना या गोष्टींना मुद्दामहून दिलेला नकार आहे. या नकारातून निर्माण होणार्‍या अनेक शक्यतांमुळे एकदम धन्य धन्य वाटलं. नाही म्हणायला, प्रायोजकांच्या उत्पादनांचा मारा केला जातो आहे खरा. पण जोवर त्यामुळे दर्जाशी तडजोड होत नाहीय, तोवर त्याला कुणाचा आक्षेप असायचं कारण नाही.

पण मन सालं कायम भुकेलं. "हिंदीत सुचलं. मराठीतले हेऽ एवढाले ट्यालंटेड लोक नक्की कुठे झोपा काढताहेत?" असा किडा लग्गेच चावला. त्यामुळे जी काय मनःशांती हराम झाली ती झाली. एरवी 'पर्मनंट रूममेट्स'चा दुसरा सीझन व्ह्यालेन्टाईनदिनी प्रदर्शित होतो आहे, त्या आनंदात मग्न.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भारी आहे मालिका. S1E2 फारच

भारी आहे मालिका. S1E2 फारच आवडला.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

मला सगळ्यांत जास्त चौथा

मला सगळ्यांत जास्त चौथा एपिसोड आवडला. त्यात जितेंद्र कुमार हा थोर नट भेटला, धन्य झाले.

@अदिती
ही काही ब्लॅक मिरर नव्हे. तितक्या थौर्याची अपेक्षा असेल, तर भंग नक्की होईल. पण भारतीय संदर्भात इतकेही तपशील, प्रेक्षकानुनयाला फाटा, तांत्रिक सफाई, उत्तम लेखन मिळायची चोरी आहे. त्या पार्श्वभूमीवर या गोष्टींचा समकालीनपणा अतिशय आवडला.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जितेंद्र कुमार म्हणजे तो

जितेंद्र कुमार म्हणजे तो गिट्टू ना? "बेबी ओव्हर में बाईस रन्स तुडवाये थे..." वाला?

मला सर्वात आवडलेली पात्रं म्हणजे लक्ष्मण आणि तो मोबाईलवाला घरमालक बन्सल.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

होय होय, तोच. पुरुषोत्तम नामक

होय होय, तोच. पुरुषोत्तम नामक एजन्टही मला अतिशय आवडला.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तो TVFच्या Pitchersमधेसुद्धा

तो TVFच्या Pitchersमधेसुद्धा होता.

पिचर्समध्ये कोणत्या रोलमध्ये

पिचर्समध्ये कोणत्या रोलमध्ये आहे? पहिल्या चार भागांत आहे का? (पाचवा भाग पाहणं अत्यंत क्लिष्ट आहे, त्यामुळे ते पुढे ढकललं आहे.)

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

तो पूर्ण मालिकेत आहे, अतिशय

तो पूर्ण मालिकेत आहे, अतिशय महत्त्वाचा रोल आहे. (बादवे, पाचवा भाग पाहणं का क्लिष्ट आहे म्हणे?)

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तूनळीवर नाहीये. कुठेसं

तूनळीवर नाहीये. कुठेसं रजिस्टर करून पहावं लागतं.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

हां, ते टीव्हीएफचं ऍप. किंवा

हां, ते टीव्हीएफचं ऍप. किंवा त्यांची साइट. फार काही कष्ट नाहीत. गूगलनेपण लॉगिन होतं. इट्स वर्थ इट!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

होय, तो 'पिचर्स'मधे भारी

होय, तो 'पिचर्स'मधे भारी रोलमधे आहे.

***

'पर्मनन्ट रूममेट्स'च्या नवीन सीझनचा पहिला भाग आला. त्यात तनूची सासू आणि तनू यांच्यात एक प्रसंग आहे. तो अशक्य थोर जमलेला आहे. तेवढ्यासाठी तरी हा भाग नक्की बघावा.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मालिका बघितली. (दोन दिवस

मालिका बघितली. (दोन दिवस धावता-धावता सगळी मालिका संपून गेली.)

मेघनाच्या प्रशंसेमुळे अपेक्षा फारच वाढल्या होत्या. काही तुकडे फारच आवडले; प्रेम आणि इमोसन आल्यावर पकायला झालं. ऋतू, पुरुषोत्तम, लक्ष्मण ही पात्रं फारच आवडली. (आज फोनवर बोलताना थोडी पुरुषोत्तमगिरी करून बघितली.)

या मालिकेतले काही कलाकार या बेफाट विडंबनातही दिसतील. (फ्रेंच शब्दांचे उच्चार कसे होतात याचे नियम माहीत असतील तर आणखी मजा येईल बघताना.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

श्रुतीफोन !!

कर्नाटकात एका मंदिरात गेले असताना तिथे पारंपारिक आरती सुरु झाली. नंतर अचानक सॅक्सोफोनवर कर्नाटकी संगीत ऐकू आल्याने विस्मयचकित आणि रोमांचित झाले.तो स्थानिक वादक रोज आरतीला येऊन काही रचना भक्तीभावाने सादर करत होता.पंडित विश्वमोहन भट यांच्या गिटारमध्ये अनुकूल बदल करुन त्याला मोहनवीणा असे नांव देऊन शास्त्रीय संगीत ऐकले होते. सासकीया राव यांच्या अदभूत चेलो वादनचा अविस्मरणीय अनुभव आहेच, त्यात अजून एका श्रुतीफोन वादनाचा मनोहारी लाभ झाला.

जोनाथन आणि अँड्रयू के ही भावंडे कॅनडाचे सॅक्सोफोन ब्रदर्स म्हणून प्रसिद्ध आहेत . हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या मोहिनीने त्यांना भारतात खेचून आणले. गेली सहा वर्षे ते कोलकात्याला पंडित शंतनू भट्टाचार्य यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकत आहेत.सॅक्सोफोनवर शास्त्रीय संगीत वाजवणे शक्य व्हावे म्हणून त्यांनी त्यात काही बदल करुन त्याला श्रुतीफोन असे नांव दिले आहे.

काल नागपुरात प्रथमच "टेंपल परफॉर्मन्स" हा प्रकार बालाजी मंदिराच्या प्रांगणात सादर झाला.तिथे जोनाथन आणि अँड्रयू यांनी त्यांचाही प्रथमच "टेंपल परफॉर्मन्स" दिला.सायंकालीन मारवा रागाच्या अप्रतिम सादरीकरणाने त्यांनी मंत्रमुग्ध केले.त्यांचे युगल वादन आणि आलाप, तानांचे लटके झटके लाजवाब होते. सॅक्सोफोन हे गारुड करणारे वाद्य आणि हिंदुस्थानी संगीतात अद्ध्यात्मिक अनुभूती लाभल्यामुळे दुधात साखर विरघळावी तसे मिसळलेले जोनाथन आणि अँड्रयू आम्ही आता भारतीयच आहोत असे म्हणाले.

आभार उसंत सखू !

सहर्ष धन्यवाद !
यापूर्वी कर्नाटिक संगीत सॅक्सोफोनवर ऐकले आहे (उदा. कद्री गोपालनाथ) पण त्यात सॅक्सोफोनच्या आवाजाची, त्यातल्या हेलकाव्यांची जादू काढून घेतल्यासारखे वाटले होते. कदाचित कर्नाटिक संगीताच्या मांडणीमुळे असू शकेल. मात्र रहमानने 'ड्युएट' या तमिळ चित्रपटात त्याच कद्री गोपालनाथांकडून वाजवून घेतलेली कर्नाटिक धून आवडली होती. तरी फार समाधान वाटले नव्हते. पण तुमच्या प्रतिसादानंतर के बंधुंचे वादन यू ट्यूबवर शोधून ऐकले तेव्हा खरेच खूप आवडले. त्यांच्या वादनात सॅक्सोफोनचा नाद भर टाकतो आहे असे वाटले. कदाचित हिंदुस्थानी नि कर्नाटिक मांडणीतला फरक वा सॅक्सोफोनचे श्रुतिफोनातले अवस्थांतरण कारणीभूत असावे. 'घाटावरचे भट' काही प्रकाश टाकू शकतील काय ?

बेटर कॉल सॉल

नुकताच बेटर कॉल सॉल, 'ब्रेकिंग बॅड'चा स्पिनऑफ, चा पहिला सिझन नेटफ्लिक्सवर आला. एकूणात ठिक वाटला. कथानकात अधूनमधून ब्रेकिंग बॅडची आठवण करून देतो. ब्रेकिंग बॅडपेक्षा जास्त 'ड्रामा' असल्याने ब्रेकिंग बॅडच्या फॅन्सना फारसा आवडणार नाही असा अंदाज. सॉल गुडमनचे खरे नाव जिमी मक्गील. पहिला सिझन 'सॉल गुडमन' जन्माला यायच्या अगोदरची कथा सांगतो. शेवटाला सॉल गुडमन लवकरच येईल असे संकेत दिसतात. सॉल गूडमन कडून यापेक्षा जास्त अपेक्षा आहेत.

ब्रेकिंग बॅडपेक्षा जास्त

ब्रेकिंग बॅडपेक्षा जास्त 'ड्रामा' असल्याने

बेटर कॉल सॉलमध्ये ब्रे-बॅ पेक्षा जास्तं ड्रामा? ऑ?
मला तर पहिला सीझन ठीक एवढ्याच लेवलचा वाटला. सॉलपेक्षा माईकची गोष्ट चांगली आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

हो

बेटर कॉल सॉलमध्ये ब्रे-बॅ पेक्षा जास्तं ड्रामा? ऑ?

हो.
व्याख्या:
a. A prose or verse composition, especially one telling a serious story, that is intended for representation by actors impersonating the characters and performing the dialogue and action.
b. A serious narrative work or program for television, radio, or the cinema.

ब्रेकिंग बॅड 'थ्रिलर' कॅटेगिरीत जास्त आहे, ड्रामापेक्षा. (व्याख्या देऊ का?)

द्या ना व्याख्या...

द्या ना व्याख्या...

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

दुसरा सीझन येतोय का? मला

दुसरा सीझन येतोय का? मला उत्सुकता आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो

व्हॅलेंटाईनच्या पढच्या दिवशी येतोय.

हाऊस ऑफ कार्ड्स आणि एपिसोड्स

हाऊस ऑफ कार्ड्स आणि एपिसोड्स या दोन मालिकांचं काय पुढे?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाऊस

हाऊस ऑफ कार्डस्चा पुढचा सिझन मार्च मध्ये येतोय. एप्रिल मध्ये गेम ऑफ थ्रोन्सचा. जॉन ऑलिव्हर व्हॅलेंटाईनडेला. बिल माहर सुरू झाला. बाकीचे आम्ही पहात नाही. मॅट ल ब्लांकला टॉप गिअरने उचलला, ही अवांतर माहिती.

द इन्टर्न

आजच "द इन्टर्न" पाहिला

तुफान आवडला

रॉबर्ट डी नीरो आणि अ‍ॅने हाथवे ....दोघेही जस्ट सुपर्ब

Mandar Katre

"द इन्टर्न"मध्ये एका मुद्याला

"द इन्टर्न"मध्ये एका मुद्याला हलकासा स्पर्श केला आहे. आजकालचे पुरुष थोडेसे बालिश असतात का मागच्या पिढीतल्या पुरुषांपुढे? गेल्या पिढीत मुला-मुलींना समान वागवण्याच्या जाणिवेपोटी मुलींना "यु गो गर्ल" असा सपोर्ट मिळाला आणि मुलगे मात्र दुर्लक्षित राहिले का? असा प्रश्न ॲन हॅथवे विचारते. त्यात थोडेसे तथ्य असावे असे मला वाटते.
असो.
"द रेवेनन्ट" पाहिला. छायाचित्रण आणि वातावरणनिर्मिती झकास आहे पण मी ह्युग ग्लासच्या सूडभावनेत इमोशनली गुंतू शकलो नाही. त्याची जिद्द व त्याचा खडतर प्रवास अलिप्तपणे पाहिला जातो. फ्लॅशबॅकमध्ये त्याच्या बायकोची आठवण येण्याचे प्रसंग तितकेसे भिडत नाहीत त्यामुळे आणि तो नायक असल्याने त्याचा बदला पूर्ण होणारच हे गृहीतक असल्याने सूड कसा पूर्ण होतो इतकीच उत्सुकता राहते. प्रेक्षक कासावीस वगैरे होत नाही. पण कॅनडातला तो बर्फाळ परिसर खूप छान टिपला आहे. माझ्या लक्षात त्या गोष्टीपेक्षा तो रुद्र आणि रासवट निसर्गच लक्षात राहिला. लिओनार्डो डि काप्रिओने अभिनय चांगला केला आहे पण ऑस्कर मिळायला हवे असे काही वाटले नाही.

Hope is NOT a plan!

पाहिलं बोले तो

'आज काय पाहिलं' बोले तो आज आकाश पाहिलं. चंद्रकोर आणि पाच ग्रह स्पष्ट दिसले. पहाटे पाच वाजता. तेजस्वी गुरु, लालसर मंगळ, शुक्र, बुध शनी सार्‍यांनी व्यवस्थित दर्शन दिलं. शनीने आडकाठी केली नाही. उंबरठा ओलांडावा लागला पण शनी काsssही म्हणाला नाही.

(No subject)

हे गाणं पार विसरलेच होते. आज

हे गाणं पार विसरलेच होते. आज कितीदा ऐकलं त्याला लिमिटच नाही. एकदम धुंदावणारं गाणं आहे.

द स्ट्रेट स्टोरी (१९९९ : दिग्दर्शक डेव्हिड लिंच )

एका ७३ वर्षाच्या जिद्दी म्हाताऱ्याच्या अतर्क्य प्रवासाची सत्यकथा,' द स्ट्रेट स्टोरी ' अमेरिकन समाजाबद्दलच्या कितीतरी समजुतींना धक्के देते. प्रकृतीची फारशी साथ नाही, मधुमेहामुळे डोळे नीट काम करत नाहीत त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स नाही आणि थेट बस नसल्याने, स्वतः प्रवास करुन आजारी मोठ्या भावाला भेटायला जाण्याची अल्विन या ७३ वर्षाच्या हिरोची जिद्द पाहून विस्मयचकित झाले. ३७० मैल दूर गावाला जाण्यासाठी तो चिमुकले लॉन मोर दुरुस्त करतो ,त्याला ट्रेलर जोडतो आणि प्रवासाला निघतो.ते वाहन नादुरुस्त होते आणि त्याला परत यावे लागते. तो चिकाटीने शोधून ,' पाच मैल प्रती तास' धावणारे (!) लॉन मोर विकत घेतो आणि पुन्हा डुगुडुगु प्रवासाला निघतो.विशाल क्षितिजावर मैलोनमैल पसलेली शेतं पहात,वेगवान महाकाय वाहनांच्या बाजूने संथगतीने,चिवट आशेने आणि आनंदाने प्रवास करत रहातो. रात्री ट्रेलरमध्ये झोप काढून ,दिवसभर लॉन मोरच्या चिरंतन आवाजाच्या सोबतीने प्रवासात छोट्या ,मोठ्या संकटांचा सामना करत रहातो.
ठाय लयीत सुरु असलेल्या या प्रवासात भेटणारे लोकं आणि त्यांच्याशी होणारे संवाद यातून त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडत जातात.
मरणाच्या दारात असलेल्या मोठ्या भावाशी दहा वर्षांपूर्वी झालेले मतभेद दूर व्हावेत म्हणून त्याला भेटायला निघालेल्या या माजी सैनिकाचं भावावर आणि मानसिक अपंग असलेल्या स्वतःच्या मुलीवर असलेलं निरपेक्ष प्रेम अतिशय लोभस आहे.रिचर्ड फार्न्सवर्थ या कलावंताने अप्रतिम काम केलं आहे. विशाल निळ्या आकाशात ,काळ्याभोर अनंत रस्त्यावर तो ऐटबाज हॅट घातलेला तऱ्हेवाईक म्हातारा विलक्षण देखणा दिसतो.अविस्मरणीय चित्रपट !

(No subject)

'प्लासिबो'

.
'प्लासिबो'बद्दलचा लेख.
----------------------------

बाप रे. किती बंडल फिल्म होती.

बाप रे. किती बंडल फिल्म होती. काय statistics नावाचा गंध नाही, कशाचा कशाला संबंध नाही, उगाच artsy शो off.

हाईट डॉग आणि इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष

'व्हाईट डॉग' नावाचा चित्रपट बघितला. क्रायटेरियनने डीव्हीडी काढल्ये म्हणजे चांगलाच असणार. निराशा झाली नाही.

चित्रपटाची गोष्ट अशी -

एका उभरत्या नटीला, ज्यूलीला, रस्त्यात कुत्रा सापडतो. पांढरा जर्मन शेफर्ड. त्याचा मालक मिळेस्तोवर ती त्याला दत्तक घेते. एका रात्री तिच्या घरात घुसलेल्या बलात्काऱ्यापासून कुत्रा तिला वाचवतो, बलात्काऱ्याला मारतो म्हणून तिला कुत्रा परत देऊच नये असं वाटायला लागतं. प्रत्यक्षात तो कुत्रा वंशवादी पांढरा/गोरा कुत्रा असतो. कोणीही कृष्णवर्णीय व्यक्ती दिसली की हल्ला करणारा. दोन लोकांवर असे हल्ले झाल्यानंतर त्या कुत्र्याचं काहीतरी केलंच पाहिजे हे ती मान्य करते.

या आक्रमक कुत्र्याला आवरणार कोण असा प्रश्न असतो. तिला शेवटचा आधार असतो तो प्राण्यांकडून काम करवून घेणारा ट्रेनर (गोरा) करूदर्स याचा. तोही नकार देतो. कुत्र्याला मारावंच लागेल असं त्याचंही म्हणणं असतं. पण त्याच्या बरोबर काम करणाऱ्या कीज नावाच्या कृष्णवर्णीय माणसाला या कुत्र्याला ट्रेनिंग देऊन बदलता येईल असं वाटत असतं. 'या एका कुत्र्याचा वंशद्वेष्टे विचार मी बदलू शकलो तर वंशद्वेष कमी होण्यासाठी मदत होईल', असा त्याचा आशावाद असतो. प्रयत्नपूर्वक तो कुत्र्याचा वंशद्वेष संपवतो. पण तेव्हाच तो गोऱ्या करूदर्सवर हल्ला करतो आणि करूदर्सच्या आयुष्यासाठी कुत्र्याला गोळी मारून संपवावं लागतं.

इथे चित्रपट संपतो. चित्रपटात विशेषतः कीजच्या पात्रात बरेच अधिक रंग आहेत. चित्रपटाची वंशद्वेष-विरोधी मांडणी उघडच आहे. मूळ कादंबरीत कीज हे पात्र गांधीवादी दाखवलेलं नाही. मूळ कादंबरीत हा दरवेशी राग मनात ठेवून कुत्र्याला गोऱ्यांना मारणारा बनवतो असं वर्णन आहे. दिग्दर्शकाने ती मांडणी बदलून कृष्णवर्णीय, दरवेश्याला उच्च नैतिक भूमिका दिली आहे.

तरीही १९८२ साली बनवलेला चित्रपट लोकभयास्तव, विविध धमक्यांमुळे चित्रपटगृहांमध्ये आलाच नाही. काही फिल्म फेस्टिवल्समध्ये आणि ठराविक काही ठिकाणी प्रदर्शित झाला तेवढंच. आता उघडउघड एवढा वर्णद्वेष (किंवा भारतीय संदर्भात जातीद्वेष) दिसत नाही. त्यामुळे २००८ साली क्रायटेरियनने डीव्हीडी काढली तरी हे सगळं बैल गेला न्‌ झोपा केला असं वाटलं.

पण दुसऱ्याच दिवशी न्यूयॉर्करमधला हा लेख वाचला. Seeds of Peace - Ayman Odeh’s unlikely crusade. अयमान ओदेह नावाचा इस्रायलमध्ये राहणारा पॅलेस्टिनी/अरब राजकारणी हा लेखाचा मुख्य विषय आहे. ओदेह सध्या इस्रायली संसद - नेसेटमध्ये खासदार आहे. त्याला द्विराष्ट्राचा पर्याय मान्य आहे; पॅलेस्टिनी बाजूने होणारे बाँबहल्ले त्याला मान्य नाहीत; इस्रायलच्या नेसेटमध्ये गोल्डा मायर, डेव्हीड बेन गुरीयन यांचे फोटो लावलेलेही त्याला डाचतात. थोडक्यात त्याचा 'दुरितांचे तिमिर जावो' यावर विश्वास आहे. हा लेख वाचल्यावर 'व्हाईट डॉग' या चित्रपटाचा अर्थ अधिक समजला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'व्हाइट डॉग'

'व्हाइट डॉग' एका फ्रेंच कादंबरीवर आधारित आहे. कादंबरी काही प्रमाणात आत्मचरित्रात्मक असावी, कारण लेखक रोमँ गारी जीन सेबर्ग ह्या आपल्या अमेरिकन अभिनेत्री पत्नीसोबत हॉलिवूडमध्ये काही काळ राहिला होता. दोघा पती-पत्नींचं आयुष्य एकंदर अतिशय रोचक आहे. त्यातला एक कालखंड कादंबरीत दिसतो. एकीकडे अमेरिकेतली कृष्णवर्णीयांची आपल्या हक्कांसाठीची चळवळ आणि दुसरीकडे फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांची चळवळ ही कथेची पार्श्वभूमी आहे. चित्रपट पाहिलेला नाही, पण त्यात फ्रेंच पार्श्वभूमी नसावी असा अंदाज आहे. ह्या पार्श्वभूमीवर हॉलिवूडचं वातावरण आणि एका स्ट्रगलर अभिनेत्रीचं संवेदनशील असणं असे अनेक पदर कादंबरीत आहेत. जीन सेबर्गचा 'ब्लॅक पॅन्थर'ला जाहीर पाठिंबा असल्यामुळे जे एडगर हूवरच्या अखत्यारीत एफबीआयची तिच्यावर नजर होती. त्यामुळे ती ब्लॅकलिस्ट झाली असावी हा एक अंदाज. गोदारच्या 'ब्रेथलेस' चित्रपटातून 'फ्रेंच न्यू वेव्ह'चा एक चेहरा बनलेल्या ह्या गुणी अभिनेत्रीनं पुढे आत्महत्या केली. त्यामागे असे सगळे संदर्भ असावेत. त्यानंतर वर्षभरातच रोमँ गारीनंही आत्महत्या केली. त्यांच्या भविष्याची एक करुण सावली आज ह्या सगळ्याच्या पश्चात कादंबरी वाचताना जाणवते. चित्रपट बहुधा वंशद्वेषाच्या मुद्द्याभोवतीच फिरत असावा असा अंदाज आहे.

(जाता जाता : गोंकूर हा फ्रान्सचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार एका लेखकाला एकदाच मिळतो. पण टोपणनावानं लिहून तो दोनदा मिळवणारा रोमँ गारी हा एकमेव लेखक.)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Aisi Taisi Democracy

Aisi Taisi Democracy https://www.youtube.com/watch?v=MsvlXgYg2_A

-रवी

नार्को'ज

नेटफ्लिक्स वर असलेल्या सिरीज चा एक सीझन जो उपलब्ध आहे सध्या तो पाहिला. जबरी आहे. पाब्लो एस्कोबार बद्दल फारशी माहिती नसल्याने यातील घटनांबद्दल आधी कल्पना नव्हती. त्यामुळे थ्रिलरसारखाही इफेक्ट येतो आपोआप. एक चित्रपटही आहे बहुधा नेफिवरच त्याच्यावर.

+१

मीही दुसऱ्या सीझनची वाट पाहतोय.

+१

सामान्य जनांमध्ये रॉबिन हूड समजला जाणारा गुंड कसा ठरतो, हा प्रवासही रंजक आहे. (अतिशहाणाने या मालिकेबद्दल ऐसीवरच कुठेतरी लिहिलंय. तो प्रतिसाद शोधला पाहिजे.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आठवतो

हो मलाही वाचल्यासारखा वाटतो. चेक करतो.

माझ्या वरच्या पोस्ट मधली अपोस्ट्रोफी इग्नोअर करा. का दिली कोणास ठाउक (स्माईल)

नटसम्राट

आजच, पुणे -मुंबई प्रवासात 'नानाचा नटसम्राट' पाहिला.
ओरिजिनल नाटक जर मेलो मेलोड्रामा मानले तर हा चित्रपट म्हणजे मेलो मेलो मेलो मेलो ड्रामा आहे.

एकच बुद्ध
बाकी सारे निर्बुद्ध

माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने

माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने पाहीला. त्यांना फारच आवडला.

बालगंधर्व, कट्यार आणि आता

बालगंधर्व, कट्यार आणि आता नटसम्राट आला हे पाहून जुन्याच लोकप्रिय गोष्टींचं भांडवल करुन चित्रपट चालवायचं तंत्र गवसलेलं दिसतंय मराठी पिच्चरवाल्यांना.
म्हणून मिपावरच्या नटसम्राटच्या धाग्यावर मी असा प्रतिसाद लिहीला आहे:

टू सी ऑर नॉट टू सी? दॅट इज द क्वश्चन.
बघावं की न बघावं? हा एकच सवाल आहे.
अखंड मनोरंजनाच्या लखलखाटात पल्लेदार भाषेची झालर लावलेलं आप्पा बेलवलकरांचं आत्मकेंद्री जुनाट दु:ख जाऊन बघावं निर्बुद्ध नॉस्टॅल्जिक आनंदानं...
की रोखून धरावं स्वत:ला नाविन्याच्या कंटाळवाण्या प्रतीक्षेत मनाच्या मनोरंजनाच्या व्यसनासह आणि करावा अस्वीकार एकाच क्षणी जुनाटपणाचा, नॉस्टॅल्जियाचा, पाट्या टाकण्याचा आणि कल्पनाशून्यतेचाही?
नाविन्याच्या नवलाईने जुनेराला असा रंग मारावा की नंतर येणाऱ्या नवलाईला स्मरणरंजनाचा वासही नसावा!
पण..पण अशी नवलाई आलीच नाही तर?
तीच तर खरी मेख आहे. नव्या नवलाईच्या नागड्या अनुभवांना फकीर होऊन भिडण्याची हिंमत होत नाही म्हणूनच आम्ही सहन करतो हे जुन्याचेच नवथरलेपण. सहन करतो विचारशक्तीवर माहितीच्याच गोष्टीसाठी टाळ्या पिटण्याचा बलात्कार. कवटीच्या गाभाऱ्यात असलेल्या मेंदूची विटंबना आणि अखेर?
पॉपकॉर्न घेऊन उभे राहतो दाखवतील ते बघण्यासाठी.
मराठी माणसा, तू इतका विचारहीन का झालास?
एका बाजूला ज्यांनी आमच्या पैशाचा पुरेपूर दाम द्यायला पाहिजे ते आम्हाला गृहीत धरतात आणि दुसरीकडे नवनवीन प्रयोग करणाऱ्यांकडे मात्र तू पाठ फिरवतोस.
मग जुन्याच तोंडाला नवा रंग फासून फडावर उभ्या राहिलेल्या या नाट्य-चित्रसृष्टीकडे पाहून कौटुंबिक विषय, पुणेरी भाषा आणि गोरे(च) नायक-नायिका स्विकारणाऱ्या तुझ्या बेगडी चित्र-नाट्य प्रेमाचं कौतुक आम्ही कुठवर करायचं?

Hope is NOT a plan!

आहाहा, काय लिहीलय ननि तुम्ही.

आहाहा, काय लिहीलय ननि तुम्ही.

+१

सहमत... (काय दिवस आलेत.) (डोळा मारत)

हे शेअर करायच आहे फेबु आणि

हे शेअर करायच आहे फेबु आणि व्हाट्स अप वर. काय नावाने शेअर करावे लागेल. व्यनि करुन सन्गितल तरि चालेल

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

रिव्हर

नेटफ्लिक्स स्ट्रीमिंगवर बीबीसीने काढलेली 'रिव्हर' नावाची मालिका बघायला सुरुवात केली आहे. पहिला सीझन अर्धा बघितला.

जॉन रिव्हर हा एकलकोंडा पोलिस सध्या त्याच्या एकमेव मैत्रिणीचा, सोबत काम करणाऱ्या पोलिस - स्टीव्हीच्या खुनाचा तपास करत आहे. रिव्हरने या केसवर काम करणं अपेक्षित नसूनही तो कंपल्शन असल्यासारखा स्टीव्हीच्या केसवर काम करतोय. शिवाय इतर काही गुन्ह्यांचा तपास, वरिष्ठांचा जाच कमी व्हावा म्हणून का होईना, करत आहे. रिव्हरला स्किझोफ्रेनिया आहे. काही मृत व्यक्ती त्याच्याशी बोलतात आणि तो सुद्धा त्यांच्याशी बोलतो. पण समोर असणाऱ्या जिवंत माणसांबद्दल त्याला भावना व्यक्त करता येत नाहीत. पण त्याला इतर लोकांबद्दल करुणा, प्रेम, आपुलकी नाही असंही नाही.

रिव्हर ही गुन्ह्याचा तपास, सीआयडी छाप, मालिका नाही. गुन्ह्यांचा तपास या पार्श्वभूमीवर 'अॅबनॉर्मल' समजल्या जाणाऱ्या मनुष्याचं समाजातल्या इतर लोकांशी असणारं नातं, त्यांचं बदलतं रूप असं मालिकेचं स्वरूप आहे. स्टीव्ही आणि रिव्हर आणि इतर सगळ्याच अभिनेत्यांचा उत्तम अभिनय, टिपीकल ब्रिटीश अंडरस्टेटमेंट ही मालिकेची सगळ्यात मोठी जमेची बाजू. पण असं म्हणणं हे मालिका लेखकांवर अन्याय करणं ठरेल.

'ब्लॅक मिरर'एवढी ही मालिका आवडली नाही; पण तिच्याशी तुलना करावीशी वाटत्ये एवढी रिव्हर ही मालिका आवडल्ये. अर्थात दोन्ही मालिकांची जातकुळी फारच निराळी आहे.

---

'रिव्हर' ही मालिका पूर्ण बघितली. फारच आवडली. मैत्रिणीच्या खुनाच्या तपासातून रिव्हरचा स्वतःचा प्रवास; स्किझोफ्रेनिया सांभाळत स्वतःचा एकांडेपणा कमी करण्याचा, आपल्याबद्दल प्रेम, आपुलकी, काळजी वाटणाऱ्या लोकांच्या भावनांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करणं भावलं. अशा प्रकारच्या मालिका आणि चित्रपट बघायला फारच आवडतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय हे पुस्तक वाचले आहे.

होय हे पुस्तक वाचले आहे. तुम्हीच कधीतरी प्रतिसादात याचा उल्लेख केलेला होतात. पुस्तक वाचण्याआधी मैत्रीबद्दलचा जो naive आणि gilded दृष्टीकोन होता , तो या पुस्तकाने बदलला. जास्त intellectual (बौद्धिक) पातळीवर ही संकल्पना लक्षात आली. छान आहे पुस्तक. बरं झालं परत उल्लेख आला. परत ग्रंथालयातून घेइन (स्माईल)

.ही चर्चा पाहतोय आत्ता -

.
ही चर्चा पाहतोय आत्ता - चर्चेचा विषय - सोशल मिडिया मुळे मैत्री या संकल्पनेस बाधा पोहोचत आहे का ?
.
जाताजाता - मैत्री या विषयावरचे एक अत्यंत सुंदर पुस्तक - Friendship: An Expose by Joseph Epstein
.
.

Quantity Vs Quality

ऐकते आहे..... मी Totally "roger scruton" यांच्या बाजूची आहे. पण दुसरी बाजूही (Tyler Cowen) ऐकते आहे ....
.
आत्ता तरी Tyler Cowen फक्त टक्केवारे अन विदा फेकताहेत. पूर्ण intellectual approach. अज्जिबात आवडत नाहीये.

स्टारट्रेक

काल यू ट्यूबवर 'जेम्स कर्क', 'स्पॉक', 'पिकार्ड' आणि त्याचा 'नंबर वन!' यांची 'गायनन' ने घेतलेली एकत्रित मुलाखत/परिसंवाद पाहिला..
स्टारट्रेकींना आवडावा...
(आता लिंक हाताशी नाहीये, नंतर देईन)
ही घ्या...
https://www.youtube.com/watch?v=z9G5ciMqFNM