अल्पना

यंदाच्या लोकसत्ता च्या दिवाळी अंकात एक लेख वाचत होतो आसाराम लोमटे यांचा भवताल आणि भुमिका नावाचा. लेख अत्यंत सुंदर आहे त्यात एके ठीकाणी लोमटे त्यांच्या एका कथेचा उल्लेख करतात त्यात एका कार्यकर्त्याची कथा आहे नेत्यांसाठी त्याची संपलेली उपयुक्तता. टीचलेपण दाखवण्यासाठी एक शब्द वापरलेला "टिचरीगोटी" टीचलेली गोटी लहान पोरं सुद्धा खेळात घेत नाहीत. दुसरा शब्द "उकळलेली पत्ती" ज्याची रग आणि धग वापरुन झालेली आहे असा वापरुन फ़ेकलेला कार्यकर्ता अशा अर्थाने हे शब्द त्यात येतात. आता ती कथा वाचलेली नाही मात्र अगदी एका नेमक्या योजलेल्या शब्दात किती ताकद आहे बघा. अशा कार्यकर्त्याचा चेहरा झर्रक्कन डोळ्यासमोर तरळतो. तर सांगायच तात्पर्य असा एखाद दोन शब्दात जणु चिमटीत पकडल्या सारख एक माणुस नजरेसमोर उभा करणं, त्याच अर्कचित्रच जणु काढण हा प्रकार मला तरी रोचक वाटतो.. कवीमंडळी अर्थात असच काहीसं नेहमी कवितेतुन करताना आपण बघतोच.. अशीच एक खुप दिवसांपुर्वी अलेक पदमजी या विख्यात जाहीरात क्षेत्रातल्या वल्लीची मुलाखत बघितली होती. त्यात आता नक्की आठवत नाही पण ते असच मुलाखतकर्ता एकेका प्रसिद्ध व्यक्ती चे नाव घ्यायचा आणि पदमजी अगदी एकाच शब्दात त्याच चपखल सुंदर वर्णन करायचे.तर मग मलाही थोडी हुक्की आली. किंवा खाज म्हणा अचुक शब्द. म्हटल लोमटे/ पदमजी नाही तर आपल्या चिल्लर पातळीवर गंमत करुन बघायला हरकत ती काय आणि बिघडेल ते काय तर मित्रांनो बघा माझाही एक.प्रयत्न. आणी हो एक निवेदन कमीत कमी शब्द वापरण्यामूळे अर्थातच पुर्ण व्यक्ती/विषय/ कार्य अर्थातच व्यक्त होइलच असे नाही.म्हणुन हा काही त्या व्यक्तीवर विषयावर मारलेला अंतिम शिक्का म्हणुन न घेता जाणवलेला वा मुद्दाम अधोरेखीत केलेला ठळक विशेष समजावा. त्याचा अर्थ ती व्यक्ती तो विषय त्या विशेषणा पलीकडेही अर्थात बरीच शिल्लक राहु शकतो हे गृहीतच आहे.. आणि पुन्हा हे सर्व अर्थातच सब्जेक्टीव्हच असत. मला जाणवलेल माझ्यापुरत दुसर्‍याला कदाचितं त्या व्यक्ती/विषय संदर्भात दुसरं काही जाणवु शकतं त्यावर अर्थातच काही म्हणण नाही आणि फ़ार मोठा काही दावा आग्रह वगैरे मुळीच नाही. म्हणुन काही आवडलं तर घ्या खटकल तर सोडुन द्या इतकचं, तर हे बघा एका व्यक्त्ती/विषया बद्दल एकापेक्षा अधिक असेल तर स्लॅश त्याच्यासाठी.

विजय मल्ल्या - विलासी
ऐश्वर्या राय- - लासी
तेंडुलकर सचीन- शालीन
अलका कुबल - जलयुक्त शिवार
करीना कपुर - आरुषी
डेमी मुर- - ला ग्रॅन्डे बेल्लेझा
सोनाक्षी सिन्हा- आम्रपाली/ वसंतसेना
आलिया भट्ट - अ‍ॅलीस इन वंडरलॅन्ड
माधुरी नेने - परीणीता
मधुबाला - एक्स्टसी
अल पचिनो- कंदर्प
जॅकी चॅन- अ‍ॅक्रोबॅट
प्रवीण दवणे- चॉकलेटी जंगलातला गुलकंदी धबधबा
जी.ए. कुलकर्णी- मणिकर्णीका
डोस्टोव्हस्की- एथिकल ड्रामा
मिलन कुंदेरा- ब्रेथलेस जोकर
व.पु/.फ़डके - निऑन साइन्स
ग्रेस च्य कविता - धुक्याची स्पंदने/ संध्यारागीचे रंग
कोलटकर- रिलक्टंट मसीहा/ जेजुरीचा टुरीस्ट
बेकेटचे साहीत्य- निस्तब्धतेचा निखारा
गार्सीया मार्क्वेझ - मंत्रमुग्ध
वि.स.खांडेकर- आदर्श घोटाळा
नेमाडे - पोकळीतली वाळवी / उंट
विजय तेंडुलकर - ब्लेड
सतीश आळेकर - गारठा
विलास सारंग- खोली सोडलेला माणुस
गुलजार - अभिजात
मौज प्रकाशन - उडदामाजी काळे गोरे
श्री.पु.भागवत- इनक्युबेटर
लिटील मॅगॅझीन्स- पोकळीचा पोत
विटगेन्स्टाइन- द एन्ड
इको उंबर्तो- भुलभुलैय्या
कुरुंदकर- क्रिस्टल क्लीअर
सुब्रतो रॉय- फ़ॉल फ़्रॉम ग्रेस
इंदिरा गांधी- दुर्गा
महात्मा गांधी- बनिया
पहीला बाजीराव- अजिंक्य
दुसरा बाजीराव- पेन्शनर
अखिलेश यादव - नाकतोडा
देवेंद्र फ़डणवीस- सखाराम गटणे
केजरीवाल - एकलव्य
नरेंद्र मोदी- दुष्यंत
जसोदाबेन मोदी- रकाना
शत्रुघ्न सिन्हा- गणशत्रु
शशी थरुर- मोस्ट एलीजीबल बॅचलर
ममता बॅनर्जी- भडका
सोनिया गांधी- होणार सुन मी ह्या..
मनेका गांधी- लाइव्ह-स्टॉक
किम जोंग- गालगुच्चा/ फ़ॅट बॉय
मनोगत-उपक्रम- हडप्पा व मोहेंदोजरो
मिपा प्रतिसाद- - रंगपंचमी
रामायण - लव्ह स्टोरी
महाभारत- युग-स्पंदन
इसिस - तमस
बगदादी - ड्रॅकुला
केकी मुस- एकांत
राजु परुळेकर- प्रश्नोपनिषद /जीनीयस
सुधीर गाडगीळ- सेल्फ़ी/शाल-श्रीफ़ळ/ची शोभा
पंकज उधास- गरीबांचा जगजीत सिंग
जगजीत सिंग- सुकुन
डेव्हीड ब्लेन- मॅजीक रीअलीझम
तलत मेहमुद- वेल्वेट
रविंद्रनाथ टागोर- सत्यम शिवम सुंदरम
इंडियन पॉप - मलेशियन विमान
इंडीयन पॉप सिंगर्स- त्यातील प्रवासी
परवीन बाबी/ बाजपेयी- लोनली प्लॅनेट/ तनहाई
काटजु- विचीत्र विणा वादक
राजश्री प्रॉडक्शन- संस्कृतीवर्ग
विशेष फ़िल्म्स - विकृतीवर्ग
यशराज फ़िल्म्स- कागज के फ़ुल.
भारतीय संस्क्रुती- क्ले बॉक्स.
भारतीय अध्यात्म - काहीही हं श्री !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अल्पना हे नाव आणि लेखही आवडला. ब्लेड, रकाना, तमस, वेलवेट हे शब्दही चपखल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंदर्प म्हणजे काय? कंदर्पकोटी लावण्य असा शब्द श्लोकात ऐकला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कांदा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शी! ROFL
___
सापडला - कामदेव असा अर्थ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कांदा हा अफ्रोडीझियाक (उच्चाराची आयमाय... आय मीन, चूभूद्याघ्या.) असतो, असे कोठेसे वाचलेले आहे ब्वॉ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅफ्रोडिझिअ‍ॅक भले असेल, पण नंतर जवळ येववणार नाही त्याचे काय Sad
___
तरीच श्रावणात वर्ज्य असतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते गाण यावरुनच आल असाव
तेरा दो टके का कांदा मेरा लाखो का सावन जाए
तेरी दो टके कांदे की पात पण घेता येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कांदा त्यातील गुणधर्म भले अपेक्षीत उंचीचे शिखर गाठावयास उपयुक्त होतील.
मात्र रंगमहालात कांदा खाऊन जाणार्‍या नायकाचे स्वागत होण्याची शक्यता अंमळ कमीच वाटते.
त्यापेक्षा अंजीर इ. निरुपद्रवींचा विचार व्हावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केशर ही. केशर तर इतका राजस घटक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुहागरात चा
त्यात काही टीपीकल घटक असतात.उदा
पलंगाभोवती फुलांच्या माळा मधला एक सेंटर हुक घेऊन मच्छरदाणी सारख्या खाली सोडलेल्या असतात
नायिका बसलेली असते वाट पाहत घुंघट मे
नायक आत येतांना बाहेरुन चावट लोक काहीतरी जोक करुन हसण्याचा आवाज व मग नायकाला आत ढकलुन जातात.
दरवाजा बंद होतो.
नायिका उठते आणि दुधाचा ग्लास ( हमखास पिवळ्या रंगाचा मोठ्ठा ) असतो स्टेनलेसस्टील चा नसतो. देते.
त्यात केशर असत असेल बहुधा.
कारण नायिकेचा दुध पाजण्याचा आग्रह अनाकलनीय तीव्र असा असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विमल. दाने दाने में हय केसर का स्वाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नायिकेचे नाव विमल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चावट ही श्रेणी देण्यात येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मला मदनाचा पुतळा या अर्थाने अल पचिनो साठी शब्द अपेक्षीत होता. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर गॉडफादर मधला अल पचिनो होता. ते थोड आउट ऑफ बॉक्स च्या नादात सहज पर्यायाला आव्हान द्या च्या नादात कंदर्प घेतला. पण गल्ली चुकलीच यात शंका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तलत मेहमुद - भूलोकीचा गंधर्व
ज्ञानेश्वर - अक्षर
फेसबुक - रात्र थोडी सोंगे फार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तलत मेहमुद - भूलोकीचा गंधर्व

पण आता तर तो भूलोकी नाही. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरय. Sad
.

.
.

.
.
वेडी झाले!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकाचा रात्रीशी संबंध समजला नाही.

- (बिगरफेसबुकी) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सब्स्टन्स फार नाही दिखावाच जास्त Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुक हे 'मला आज सकाळी पातळ शी झाली' ही बातमी ('स्टेटस') जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळात पोहोचविण्याकरिता उत्कृष्ट साधन आहे, असा काहीसा आमचा ग्रह आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त धागा. विशेषतः न आवडडणाऱ्या किंवा रटाळ लोकांची लावलेली वासलात फारच आवडली; गुलकंदाचा धबधबा, काहीही हं श्री, सेल्फ़ी/शाल-श्रीफ़ळ/ची शोभा, जलयुक्त शिवार, पेन्शनर, गटणे, एलिजिबल बॅचलर (यांच्याबद्दल न्यूट्रल मत आहे.).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मारवा :व्यासंगी वाचनाचा प्रपात.

#ज्यांना दुध तुप परवडत नाही ते कांदा खातात.
हे पूर्वीचं आता कांद्याच्या चढत्या भावाने बदलावं लागणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यादी छान.

वि.स.खांडेकर- आदर्श घोटाळा

ही काही समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साहीत्यातुन जो टीपीकल आदर्शवाद यायचा त्याचा वास्तवाशी जो कॉन्फ्लीक्ट होत असे त्या संदर्भातुन आजच्या काळातील जो घोटाळा जो विसंगत नावापासुनच जाणवतो जुळवणी करुन पाहत होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओक्के

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही ज्या ढंगात दिलय त्यात हा प्रकार भारिच वाटतो आहे.
हल्लीच्या यशस्वी मुलाखत टाइअपच्या कार्यक्रमात " रॅपिड फायर " राउंड असतो; त्याचाच हा उपप्रकार.
पण आसपास सध्या उलट ह्याचा अतिरेक आधीच झालेला आहे.
सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया वगैरे मध्ये लोकं अशीच विशेषणं वापरुन समोरच्याला थेट होलसेलमध्ये डिस्क्रेडिट करतात.
नमोरुग्ण, भक्त, स्युडो सेक्युलर, 'sick'ular , , AAPtards , चड्डीवाले.....
ही सगळी तसं म्हटलं तर विशेषणं आहेत की.
आणी वापरणारी बहुतांश मंडळी इतकी संतापलेली असतात की समोरच्याचं काही ऐकून घ्यायचीच तयारी नसते.
" त्या अमक्या-तमक्यानी म्हटलय ना, मगच ते हेच्च असणार. थुत तिच्यायला " असा एकूणात सूर असतो.
समोरच्याची आख्खी भूमिका जशाला तशी गपगुमान गिळा असं कुणीच म्हणत नाही हो; पण निदान त्याच्या भूमिकेतले कंगोरे लक्षात घ्या.
त्याच्या म्हण्ण्यात कधी काही तथ्य वगैरे दिसतय का ते तरी पहा ना.
.
.
बहुतांश केडर बेस्ड संघटनेत एक मोठा वर्ग हा कार्यकर्त्यांचा असतो. तो सगळाच बुद्धीमान वगैरे असत नाही. शिवाय तो एकत्रित सगळा असा एकाच छापाचाही नसतो. त्यात खूपशे लबाड धूर्त असतातही, उद्याची काहीतरी सुसंधी शोधत आलेले ; तसेच खूपसे मनापासून त्या सिद्धांतांवर श्रद्धा ठेवणारेही असतात. ह्यांची बौद्धिक कुवत फारशी नसली तरी सचोटिनं वागतात.
.
.
हाच प्रकार त्याच संघटनेच्या नेत्यांमध्येही असतो. त्यातल्या एखाद्यात संवेदनशीलताही असते; एक मिनिमम पातलीचा बरेकीपणा व बुद्धीमत्ता असतेच; शिवाय झकास अशी निगोशिएअशन स्किल्स असतात; जमाव हाताळाण्याची कौशल्यं असतात ( हल्ली मिडिया हाताळण्याचं कौशल्यंही आवश्यक झालय)
.
.
ही अशी सगळी गुंतागुंत असते. पण हे काहिच न पाहता; धडाधड समोरच्याला वरती दिलेली विशेषणं देत, लेबलिंगचा भडिमार करत लोक लिंका शेअयर करत सुटतात तेव्हा आश्चर्य वाअटतं.
.
.
एकूणात संघ परिवाराच्या मूळ संकल्प्नांबद्दल , ढाच्याबद्दल माझं फारसं चांगलं मत नसलं ; आणि त्यांचे लोक असा स्वस्त प्रचार करत असले तरी संघविरोध करु पाहणारे कैक असे लोक जे अदरवाइज बुद्धीमान, संवेदनशीलही आहेत ; विचारी आहेत; ते एकदम बिथरल्यासारखे स्वस्त विरोध, लेबलिंग करायला लागतात; आणि त्याहून वाईट म्हणजे तुम्हाला दुसर्‍या कळपात असल्याबद्दल शिव्या घालून दूर लोटातात; तेव्हा दु:ख होतं.
.
तुम्ही दुसर्‍या कळपात नसताच.
आणि दोस्तांनी मात्र तुम्हाला लाथ घालून हाकललेलं असतं. Sad
.
.
थोडक्यात सांगायचं तर सुरुवात चांगल्या ठिकाणाहून झाली तर कधी अल्लाद उतारावरुन गाडी विखारीपणाकडे जाइल ; घाउक वाक्यांकडं जाइल हे सांगता येणं कठीणे .
.
.
सगळय मुस्लिमांना "आयसिसवाले" ह्या लेबलाखाली आणलं तर कसं वाटेल ?
सूज्ञ, विचारशील असा एखादा माणूस जन्मानं मुस्लिम असेल आणि त्याला हे लेबल त्याच्या अदरवाइज चांगल्या छान मैत्री असणार्या परधर्मातील दोस्तानं लावलं तर कसं वाटेल ? तोवर त्या मुस्लिमाला कल्पनाच नसेल की हा आपल्यालाअ इतकं काय काय समजतो ते.
.
.
तो चकित होइल ; दु:खी होइल; ( खरं तर स्वतःवर इतका घाणेरडा आरोप झाल्यावर त्याला राग यायला हवा; पण मैत्रीचं नातं विचित्र असतं; मान्वी मनं महाविचित्र असतात.). तो फारतर "मी नाहिये हो आयसिसवाला" असं काहीबाही सांगू पाहिल; पण समोरचा कदाचित ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसेल; तो परधर्मिय त्याला आयसिसमुळं पोचलेल्या दु:खानं स्वतःच बेभान असेल.
मुस्लिम मित्र शांत आहे; समजूतदार आहे; पण अत्ता त्याला काय करावं हेही समजत नाहिये. आरडाओरड करणं हा त्याचा स्वभाव नाही.
शांतपणे समोरच्याला पटवून देणंही शक्य नाही.
समोरच्याला कदाचित आयसिअसमुळं त्रास झाला असावा; ह्याची त्याला कल्पना आहे.
आणि एवढा एक अँगल सोडला तर अदरवाइज त्यांची दोस्ती इतके दिवस चांगली होती; ह्याचीही ह्याला कल्पना आहे.
.
.
किंवा दोस्ती चांगली असल्याचं निदान हा मुस्लिम तरी समजत होता.
आख्ख्या ग्रुपमध्ये हा परधर्मिय त्याला जबरदस्त लेबल लावून मोकळा झालाय.
ग्रुपमध्ये इतरही त्याला कोणीच अडवलं नाही. ( म्हणजे बाकीचेही आपल्याला थेट म्हणत नसले तरी "आयसिसवाला" समजतात की काय हेही त्याला समजत नाही.)
.
.
.

जबरदस्त धक्का बसलेला तो मुस्लिम आता काहिसा निराश आहे; भरल्या कट्ट्यावरुन उठून जातोय.
खांदे पडलेत; नजरेत निराशा आहे, डोक्यात संभ्रम आहे.
आणि खुनशी माणसांशी हायफनेट केलं गेल्याबद्दल , त्या लेबलबद्दल तीव्र दु:ख आहे.
"हे आपल्याला असं समजत असल्याचं आपल्याला अधीच कसं कळलं नाही"
"ह्यांना आपण असे नाहित; हे कसं कळत नाही"
"मी अजून काय करायला हवं होतं"
असे अनेकानेक प्रश्न त्याला पडताहेत.
तो गेल्यावरही तसा फारसा कुणालाही फरक पडलेला नाही.
त्याला बाकीच्यांची जितकी आवड होती; तितकी बाकीच्यांना ह्याची नव्हती.
ह्याला ते तरी आधी समजायला हवं होतं.
अजूनही जाता येता त्यांच्या गप्पांचे , खिदळण्याचे आवाज येतात.
त्याला आपण असताना केलेली मौज मस्ती आठवते; पण आता परत जाताही येत नसतं.
प्रश्नांची पोतडी, धक्क्याचं ओझं फार काळ वागवून आपणच मूर्ख थरनार हे कळत असतं; पण वाळत नसतं.
तसंही तो व्यवहारी असा कधी नसतोच. तो ओझं वागवत राहतो.

.
.
आणि ह्याच वेळी एक पॅर्‍अलल प्लॉटही सुरु आहे. खरोखरीची खुनशी, कट्टार असणारी माणसं तशीही त्याला आधी अप्रोच होतच होती. ती अजूनही होताहेत.
"बघ बघ. आपल्या जमातीवर कसा अन्याय होतोय. आपल्याला वेचून वेचून मारलं जातय. ह्याचा सूड हवाय सूड. आपला जीव गेला तरी बेहत्तर पण आपल्या जमातीच्या शत्रूंना वठणीवर आणायचच" अशा छापाचे संदेश त्याच्यावर येउन आदळत असतातच.
तो तसाही ह्या भडकाउ संदेशवाल्यांपैकी नसतोच. त्यांना सामील होत नाही.
.
.
त्याला जे विचारी वाटत त्यांनी मात्र भडकाउ ठरवून टाकलेलं आहे; काहीही बोलण्याची संधी न देता!
.
.
आता तो एकटा आहे.
.
.
अपूर्ण.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटचा पार्ट छान. एकदम नवीन/अभिनव कल्पना. सॉरी अल्पना. कांती शाह छान सिनेमा काढेल यावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ह्यावर आधीच "आमिर" हा चित्रपट येउन गेलाय. (थोडास्सा असाच)
तो माणूस बिचारा तुमच्या आमच्यासारखाच आम आदमी असतो.
त्याच्या घरच्यांना किडन्याप केलं जातं; त्याला कुटुंबियांना सोडवण्याच्या बदल्यात र बाँब ठेवून यायला साम्गितलं जातं.
तो मग बॉम्ब घेतोही; काय करावं त्याला कळत नाही; घालमेल होते.
शेवटी बॉम्ब बसम्ध्ये जाउन ठेवून यायचा असतो.
त्यावेळी तो एकदम बॉम्ब घेउन पळत सुटतो जवळच्याच निर्मनुष्य जागी.
बॉम्ब फुटून तो मरतो .
बाकीची पब्लिक त्याला दहशतवादीच समजत असते.
लोकांच्या नजरेत तो दहशतवादी ठरतो.

.
.
टर उडवायला का असेना , दखल घेतलिस, ह्याबद्दल आभार.
घाउक लेबलिंग , शेरेबाजी नकोच; असच अजूनही वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके. सॉरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुमचा प्रतिसाद पुर्ण कळला नाही मात्र जो समजला तो असा की हे एक प्रकारे लेबलींग आहे आणि लेबलींग सारख वापरल जात असत. आणि लेबलींग किंवा शिक्का मारणे योग्य शब्द हा प्रकार साधारण ठराविक वर्ग करतो. बाकी सर्वसाधारण जनता जी एकीकडे जगत असतांना ज्या भाव भावना विचार नकळत नेणीवेच्या पातळीवर जगत असते. त्यांना प्रतिकुल अस व्यक्त होण्यासाठी हे लेबलींग काम करत. म्हणजे जो द्वेष नेणीवेच्या पातळीवर विकसीत होत आहे तो या लेबलने अजुन भडकला जातो अशा अर्थाने. तुम्ही म्हणता हे खर आहे. एक एक जहरी शब्द शिक्का लेबल राजकारण्यांकडुन कॉइन केल जात त्याचे दुरगामी मानसिक परीणाम होत असतात. एकच एक विशिष्ट वंश जातीवाचक शब्द ठळक करुन वापरला की तो ज्यांना फारसा विचार करण्याची कुवत वा गरज भासत नाही त्यांना व्यक्त व्हायला स्फोटक शैलीत व्यक्त व्हायला कींवा बोट दाखवायला फार सोइचा होतो. सरसकटीकरण होत स्व-विवेक वापरण्याच्या तापातुन माणुस मुक्त होतो.
हे सर्व असे कदाचित तुम्हाला अभिप्रेत असावे तर हे खरच गंभीर आहे.
मी मात्र असा विचार केला नव्हता मी एक किएटीव्ह चाळा खाज म्हणुन प्रयोग करुन बघत होतो. इतकच. आणि माझ्या मते नॉन पॉलिटीकल व्यक्ती व विषय यांवर हे रोचक होत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमकं. बरचसं असच म्हणायचं आहे.
अर्थात मूळ धाग्यातली विशेषणं मस्त मिश्किल आहेत; आणि आवडलितही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेबलं लावणं बरेचदा घातक, काही अंशी चुकीचं ठरतं, हे मान्य आहे. पण लेबलं म्हणजे सदासर्वकाळ काहीतरी विषारी आणि बाय डिफॉल्ट वाईट असा काहीसा सूर आहे, त्याच्याशी असहमती.

म्हणजे असं पाहा, आपण आज-आत्ताच्या क्षणात जगणं हेच बेष्ट आणि अतिशय जिवंत-प्रॉडक्टिव असं म्हणतात, ते बरोबर आणि आदर्श आहे. पण आदर्श सदासर्वकाळ पाळत नाही ना आपण? मुळात अनुभव आणि त्यांची स्मृती असते, तोवर त्यांचा वापर करून काहीएक आडाखे बांधणं थांबत नाही. तसं थांबलं, तर एकूणच माहितीच्या साठ्याची आणि त्यातून काहीएक व्यवस्था लावून त्यातून विज्ञान निघण्याची (निरीक्षण-माहितीचं दस्तावेजीकरण-त्याचं पुन्हा निरीक्षण-पॅटर्न (मराठी शब्द सुचवा, प्लीज) हुडकणं-भविष्याबद्दल अंदाज बांधणं-ते बरोबर आल्यास व न आल्यास त्यातून काहीएक नियम आणि/किंवा अपवादनिश्चिती) प्रक्रियाच रद्दबातल ठरेल. हे निदान काही प्रमाणात तरी मानवी वर्तनाला लागू नाही का? सदासर्वकाळ दिसला माणूस की घाल कप्प्यात, हे घातक आहेच; त्याच्याशी सतत झटापट केली पाहिजेच. पण तरीही एखादा माणूस घरात शिरल्या शिरल्या चिडचिड करत असेल असं महिन्याभरात २० वेळा दिसलं, तर 'संध्याकाळी हा माणूस चिडचिडलेला असतो' असा नियम डोक्यात तयार होईल की नाही? उजव्या पक्षाचे (आणि बरेचदा, कुंपणावरचे / अध्यातमध्यात नसणारे लोकही) "सगळ्याच अतिरेक्यांची नावं कशी हो मुसलमान दिसतात? कायतरी झोल असेल की नाही?" असा प्रश्न विचारताना दिसतातच की. तेव्हा त्यांना पूर्णपणे चुकीचं ठरवता येत नाही, म्हणून तर अनेक विचारवंतांनी मुस्लीम धर्मग्रंथांचा आणि सामाजिक संस्थांचा अभ्यास करायचं पेव फुटलं असेल की नाही?

हे माणसांनाही लागू आहे. कितीही जवळचे झाले, तरी जिवश्चकंठश्च मित्रांनाही. असली लेबलं इतकी जिवाला लावून का बरं घ्यावीत? तो लेबलाचा क्षण तेवढा खरा, आणि बाकी बिनलेबलांचे सगळे क्षण खोटे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वरचा प्रतिसाद अपूर्ण होता. आता राहू देत तसाच Sad
"असली लेबलं इतकी जिवाला लावून का बरं घ्यावीत " ; असं विचारलं जातं; "तेव्हा आम्ही लेबलं वापरणारच " ;
असं म्हणायचय की काय असं वाटत राहतं. तसं म्हणायचं असेल तर अवघड आहे; कारण एक बाजू लेबल लावत राहणार
आणि समोरच्यानं बोलूही नये अशी अपेक्षा करणार. कमाल म्हणजे आयसिसबद्द्ल लोकांची तीच तक्रार असते.
"ते इतके वाईट लोक आहेत की ते बोलायलाही तयार नसतात" अशी तक्रार.
आणि एखाद्या मुस्लिमाला हिणक्स शेरा मारुन "तूही त्यांच्यातलाच" असं म्हणून घालवलं जातं ; तेव्हा आपण आयसिस पेक्षा वेगळं काय करत असतो ?
तेव्हा "असली लेबलं इतकी जिवाला लावून का बरं घ्यावीत " ह्याब्द्दल इतकच म्हणता येइल ज्या व्यक्तींना किंमत देतो त्यांच्या लेबलांनाही किंमत देतो. शिवाय प्रत्युत्तर म्हणून प्रतिलेबल न देणं; हेही करता येइल. म्हणजे....., ह्याशिवाय अजून करता येण्यासारक।ं काय असतं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेबलांचा घातकपणा मी दोनदा मान्य केला आहे. तरी मी परत एकदा वर विचारलेलाच प्रश्न निराळ्या प्रकारे विचारते: अशा प्रकारची लेबलं संपूर्णपणे हद्दपार करणं शक्य आहे का? आदर्श आहे, मान्य. शक्य आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लेबलं नसणं माझ्यामते आदर्श नाही.
जोवर माहिती लक्षात ठेवायला वर्गीकरणासारखी सोपी पद्धत मेंदु अवलंबतो तोवर लेबलं/कप्पे असणारच परंतु त्याचा वापर ढोबळ प्रमाणात व्हावा, त्यावर आधारीत कृती/निर्णय घातक

एखाद्या व्यक्तीबद्दल धर्मावरून/जातीवरून/लिंगावरून किंवा कशाहीवरून ढोबळ ठोकताळे/आखाडे/अंदाज बांधणे वेगळे आणि आपल्या मनातील प्रतिमेलाच चिकटून त्याच्याबद्दल एखादा निर्णय घेऊन टाकणे किंवा निष्कर्ष काढणे वेगळे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एकावेळी पाच सात ओळींहून अधिक इथे लिहिता येत नाही. म्हणून दरवेळी एकदा प्रकाशित करुन पुनः पुनः संपादित करावं लागतं. आणि प्रतिसादही अपूर्ण राहतात. पण ऐसीकर निदान प्रतिसादाची दखल घेतात हे बरं वाटतं. ढेरे, मारवा , मेघना , ऋ ह्यांचे आभार.
.
.
वरील दोन्ही प्रतिसाद अपूर्ण आहेत.

वरचा प्रतिसाद अपूर्ण होता. आता राहू देत तसाच Sad
"असली लेबलं इतकी जिवाला लावून का बरं घ्यावीत " ; असं विचारलं जातं; "तेव्हा आम्ही लेबलं वापरणारच " ;
असं म्हणायचय की काय असं वाटत राहतं. तसं म्हणायचं असेल तर अवघड आहे; कारण एक बाजू लेबल लावत राहणार
आणि समोरच्यानं बोलूही नये अशी अपेक्षा करणार.
कमाल म्हणजे आयसिसबद्द्ल लोकांची तीच तक्रार असते.
"ते इतके वाईट लोक आहेत की ते बोलायलाही तयार नसतात" अशी तक्रार.
आणि एखाद्या मुस्लिमाला हिणकस शेरा मारुन "तूही त्यांच्यातलाच" असं म्हणून घालवलं जातं ;
तेव्हा आपण आयसिस पेक्षा वेगळं काय करत असतो ? त्याच्याशी बोलायचं नसेल तर प्रत्यक्षात आयसिसची तत्वं
मुसलमानाहून जास्त बाकीचेच पाळताहेत असं होणार नाही का.
तेव्हा "असली लेबलं इतकी जिवाला लावून का बरं घ्यावीत " ह्याब्द्दल इतकच म्हणता येइल ज्या व्यक्तींना किंमत देतो त्यांच्या बोलण्यालाही
किंमत देतो.
शिवाय प्रत्युत्तर म्हणून प्रतिलेबल न देणं; हेही करता येइल. पण ते करणं म्हणजे उपाय नव्हे. त्यातून फारतर अजून चिखलफेक
व्हायची टाळता येइल. मूळ शेरेबाजीचं काय ? अहो त्याच्याबद्दल बोलू तर द्या. बोलू दिलं जाणार नसेल तर आयसिसला वाईट म्हण्ण्यत
काय प्वाइण्ट आहे ?
.
.

तर लेबलं देणं टाळता येइल का, हा म्हटलं तर अवघड प्रश्न आहे. हे म्हणजे "संतापानं वागू नये" , "क्रोधानं कृती करु नयेत" ,
किंवा "खोटं बोलू नये" असं म्हटल्यावर त्याबद्दलही हाच प्रश्न विचारला जाउ शकतो . "असं पूर्णतः करणं शक्य आहे का" वगैरे.
तर सांगायचं म्हणजे लेबलं वापरण्म व्यावहारिक जगात चालायचच , १००% वापर नाही थांब्वता येणार हे मान्य करतो.
.
.
पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपण लेबल लावतोच आहोत तर समोरच्याला बोलू तरी द्यावं.
तुम्ही मारलेल्या शिक्क्याबद्दल त्याच्वं म्हण्णं ऐकून घ्यावं. ( कारण त्यानं थेट तुमचं बेधडक मारलेलं लेबलसुद्धा ऐकून घेतलय. शिवाय तो
तुम्हाला , तुमच्या मताला किंमतही देतोय. आणि शिवाय स्वतः प्रतिलेबल द्यायच्या भानगडित पडलेला नाही. त्याला संवाद हवा आहे.
शेरेबाजी किंवा पूर्ण अबोला; ह्या दोन्हीपेक्षा वेगळं असं. त्य्साठी प्रसंगी तात्कालिक शेरेबाजी ऐकून घ्याय्चीही तयारी आहे. )
.
.
तर सांगायचं मह्णजे दोन गोष्टी आहेत :-
१. लेबलं लावणं
२. नंतर समोरच्याचं ऐकूनही न घेतलं जाणं .

पहिल्याबद्दलची व्यावहारिक अडचण समजते आहे. पण मग दुसर्‍याचं काय ?
.
.

लेबलांचा घातकपणा मी दोनदा मान्य केला आहे.

हो, बरोबरे. त्याबद्दल आभार. मीही दोन पावलं पुढं येत लेबलांची अपरिहार्यता समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे.
पण अशी लेबलं दिल्यावर समोरुन आदर्श प्रतिसाद काय असावा अशी अपेक्षा असते; ते समजत नाही.

शिवाय लेबलं आणि hating in plurals ही जवळपास सारखीच प्रकरणं आहेत ना.
.
.
ह्याशिवाय अजून एक बाब म्हणजे हे सगळच एका गृहितकावर आधारित आहे. मुळात सोबत्यांना/ सवंगड्यांना विशेष किंमत देउ नये; असे म्हणणे असेल तर गोष्ट आटली. व्यक्ती सवंगड्यांना किंमत देते हे ह्यात गृहितक आहे.
एखाद्यानं आपल्याला बोचकारल्यावर सर्वोत्तम प्रतिसाद कोणकोणते असू शकतात. काय काय प्रतिसाद असावेत.
आपल्याला प्रत्युत्तर म्हणून बोचकारायचं नसेल , तर आपल्याकडे कोणकोणते पर्याय शिल्लक राहतात ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे अंमळ व्यक्तिगत होत आहे. त्यामुळे वाटल्यास व्यनि वापरू. इथे पूर्णविराम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शिवाय लेबलं आणि hating in plurals ही जवळपास सारखीच प्रकरणं आहेत ना.

कसं काय? लेबलं ही हेट्रेड रिलेटेडच/नकारात्मक असतील असं थोडंच आहे?

(मुळात धागा मौजमजेसाठी असताना एवढं सिर्यस्ली का घेऊन राहिलाय ओ?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोले तो, मनुष्य जन्माने मुसलमान असू शकतो; मनुष्य जन्माने संघी ('चड्डीवाला') असू शकतो काय?

मानवाच्या आजवरच्या इतिहासात कोणीही चड्डी घालून जन्माला आलेले पाहिलेले नाही. जन्माला येताना सगळे नंगेच येतात. चड्डीवाले नंतर बनतात. पैदाइशी चड्डीवाला कोणीही नसतो.

हं, आता जन्माने हिंदू असलेल्या एखाद्या बिगरसंघी व्यक्तीला जर कोणी उगाच 'चड्डीवाला'म्हणून हिणविले, तर तुमच्या (बिगरआयसिसवाल्या जन्माने मुसलमान व्यक्तीस 'आयसिसवाला' म्हणून हिणविण्याशी) तुलनेत दम आहे, असे कदाचित म्हणता येईल. परंतु तसे काही होत असल्याचे ऐकिवात तरी नाही. किंबहुना, 'चड्डीवाला', 'चड्डीवाला' अशा संततहिणविण्याने ईर्षेस पेटून कोणी गंडा बांधून शाखेची वाट धरल्याचे आणि 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' म्हणो लागल्याचे उदाहरणही परिचयाचे नाही.

सबब, मनोबा, तुमचे उदाहरण फाऊल आहे.
..........

तळटीपा:

तेही परस्त्रीसमोर. (बोले तो, दुसऱ्याच्या बायकोसमोर.)

तेही बहुधा घरच्यांनीच 'जा! चड्डी घाल!' म्हणून चिथावल्याने. मग निमूटपणे शाखेची वाट धरतात. सांगण्याचा मतलब, बाहेरच्या चिथावणीमुळे कोणी चड्डीवाला होत नाही. प्रेरणा म्हणा किंवा चिथावणी म्हणा, घरातूनच असते.

ते 'चड्डी पहन के फूल३अ खिला है' वगैरे सब झूट आहे. (किंबहुना, अपप्रचारार्थ कोणा संघीयानेच ते तेथे घुसडून दिले असावे, अशी आम्हांस दाट शंका आहे.)

३अ Fool?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL मेले!!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात है!
प्रतिसाद ऑफ द डे!!!
ROFL
जियो!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"लासी" म्हजी काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबा, तुम्ही जी उदाहरणं देताय ती सगळी घाऊक लेबलं लावण्याची आहेत. एकेका मनुष्याच्या गुणवर्णनासाठी वापरलेले शब्द किंवा शब्दप्रयोग याबद्दल एवढे का शेंटीमेंटल होताय? उदाहरणार्थ अलका कुबलला जलयुक्त शिवार असं म्हणणं म्हणजे सगळ्या स्त्रियांना किंवा चारचौघात रडून भावना व्यक्त करणाऱ्या सगळ्यांना नावं ठेवली असं होत नाही.

---

स्पष्टीकरणानंतर आदर्श घोटाळा नाव आणखीच आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.