खिडकी

माझ्या खिडकीत बसून मी बाहेर बघते ... बदलणारे ऋतू .... कलणार्‍या सावल्या ... बहरांच शैशव ... शिशिराचं तांडव.. सारं बघते.

ही खिडकी माझी आहे. माझं नातं आहे तिच्याशी. ती बोलते माझ्याशी. माझ्या मनातल्या भावनांसारखी ती ही बदलते.

मला वाटतं ... प्रत्येकाचीच अशी एक खिडकी असते. मनाची खिडकी! त्यातून तो सारं जग बघतो. कधी रागाने खिडकी बंद करून घेतो... कधी स्वतःजवळ शांत बसतो. कधी लाथ मारतो खिडकीला तर कधी पागोळ्या हातात पकडतो कवी होऊन जातो.

ही प्रत्येकाची आपली खिडकी असते. ती share नाही होऊ शकत. ती आपल्यातलं आपलेपण जपते. प्रत्येकाची स्वतःची space असते ती!

कधीकधी ती खूप मोठ्ठी होत जाते. मधले bars गळून पडतात. आपण अलगद बाहेर पडतो. सारं जग कवेत घेतो. देवाला मिठी मारतो. फुलांशी बोलतो. स्वतःच्या जवळ येतो.

मी माझी खिडकी कधीच बंद करणार नाही. मी ती open ठेवेन कायम. तिला गंजही लागू देणार नाही. तिला जपेन. तिच्यातनं दिसणारा प्रत्येक ऋतू तटस्थपणे बघत राहीन. कधी रडेन उन्हात पोळले तर. कधी पावसाचा शिडकावा अंगावर घेईन. ती माझी space आहे. ती फक्त माझीच रहाणार आहे.

माझ्या मनाच्या या खिडकीत बसून मी अशीच लिहीत रहाणार आहे.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मुक्तक बरं आलंय.
या लेखात शेअर, स्पेस, बार्स, ओपन हे इंग्रजी शब्द पाहून मात्र बिल गेट्सला बोलवावं असं वाटत गेलं... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'बार्स' या शब्दाची योजना मला आवडली. गजांआड अडकवून ठेवलेलं नाही यात 'नो बार' याचा पंच* येत नाही.

स्वतःला दिलेलं आश्वासन पाळून लिहीत रहा.

*हा ही इंग्लिश शब्दच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बार्सचं गजांआड हे भाषांतरच होतं. सहमत. वेगळं काही करता यावं. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुन बरंच काही लिहीता आलं असत. लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

लेख ठीक.
छोट्याशा लेखाला चार-पाच प्रतिक्रिया? नशिबवान आहात. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खिडकी की तुरुंगाचा झरोका? जस्ट किडींग Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0