Skip to main content

ऑफिस मध्ये सोशल साइट्स वापरणे

मला वाटते या विषयावर यापूर्वी भरपूर चर्चा झालेली आहे , पण तरीही मूळ समस्या तशीच असल्याने आज हा विषय मांडत आहे .

खाजगी उद्योग अथवा सरकार (Employer) हा आपल्याला ऑफिस मध्ये त्यांचे काम करण्याचा पगार देतो . म्हणजे कामाचे जे तास असतील तेवाढे तास आपण ऑफिसचे काम करण्यास बांधील असतो .

असे असताना ऑफिस मध्ये फेसबुक /whatsapp / व इतर मराठी सोशल साइट्स वापरत टाइमपास करणे हे नैतिक दृष्ट्या अयोग्य वाटते .

असे असताना देखील अनेक लोक ऑफिस-अवर्स मध्ये सोशल साइट्स वापरत असतील तर त्या गोष्टीवर उपाय काय ?

सोशल साइट्स ब्लॉक करणे अथवा मोबाइल jammer लावणे / ऑफिस मध्ये मोबाइल वापरण्यास बंदी करणे अशा टेक्निकल उपायाऐवजी Employees नीच मनापासून हे तत्त्व किंवा business ethics / professional work culture चा भाग म्हणून स्वत:हून सोशल साइट्स ऑफिस अवर्स मध्ये टाळल्या पाहिजेत असे माझे मत आहे ...

चिमणराव Thu, 12/11/2015 - 16:02

असं करू शकणारे मल्टीटास्किंगवाले असतात.कानात काडी घालत बसणाय्रांपेक्षा बरे.

नितिन थत्ते Thu, 12/11/2015 - 16:39

ऑफीस अवर्स ही संकल्पना बहुतांश* कालबाह्य झालेली आहे.

प्रत्यक्ष काउंटरवर बसून ग्राहकांशी संपर्क येणार्‍यांखेरीज इतरांना ठरलेले काम पूर्ण करणे हा केआरए असतो. त्यामुळे ते कामे पूर्ण करीत आहेत तोवर काही हरकत नसावी. प्रश्न आहे तो इंटरनेटसाठी कंपनीने जो प्लॅन घेतलेला असतो त्याबाबत. कर्मचार्‍यांनी फेसबुक वापरले नाही तर कंपनीला कमी साइजचा प्लॅन घेता येईल का?

*जे तथाकथित ऑफीस अवर्समध्ये जालावर पडिक असतात त्यांच्या बाबतीत.

धर्मराजमुटके Thu, 12/11/2015 - 18:04

बहुधा लोक्स आपापली मुख्य कामे सांभाळूनच बाकीचे धंदे करतात.

असे असताना ऑफिस मध्ये फेसबुक /whatsapp / व इतर मराठी सोशल साइट्स वापरत टाइमपास करणे हे नैतिक दृष्ट्या अयोग्य वाटते .

तुमची काय इच्छा आहे ? त्या गोष्टीतल्या भुतासारखे काम नसल्यावर दोरीवरुन वरखाली चढत उतरत राहावे काय ?

Nile Thu, 12/11/2015 - 20:40

आत्ता हाफिसात असल्याने उत्तर देऊ शकत नाही. उद्या घरी येऊन भेटा. ५०० रू १५ मिनीटाचे पडतील.

चिमणराव Thu, 12/11/2015 - 21:55

चार कर्मचाय्रांना अशी टंगळमंगळ न करता कामाला लावण्यासाठी बारा एचआरवाले दोरीवरून वर खाली चढउतार करत असतात आणि दमतात बिच्चारे.