अहमदनगर येथे 'विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६ आयोजन'चे आमंत्रण प्रस्तावासाठी अनुमोदन हवे आहे

मराठी विकिपीडियाचा लेखक आणि वाचक वर्ग संबंध महाराष्ट्रात तसेच महानगरांपलिकडे उर्वरीत भारतात पसरलेला आहे परंतु संघटनात्मक आयोजने सहसा केवळ महानगरांपुरती मर्यादीत रहातात. विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६साठी भारतातील शहरांकडून प्रस्ताव मागितले गेले आहेत आणि महानगरांची काँपीटीशन असेल परंतु विकिमिडीया चळवळीचा मुख्य हेतु सर्वत्र पोहोचण्याचा आहे या दृष्टीने अहमदनगर येथील अनुभवी विकिपीडियन्सना विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६साठी प्रयत्न करण्याचे आवाहनास त्यांनी प्रतिसाद दिला आहे. अहमदनगर महाराष्ट्रातील पुण्यासहीत औरंगाबाद, नासिक, जळगाव या शहरांपासून साडेतीन चार तासांच्या अंतरावर तसे मध्यवर्ती पडते. तसा कॉन्फरन्सचा उद्देश भारतभरातल्या विकिपीडियन्सना तीन दिवस एकत्र आणण्याचा असतो समांतर मराठी किंवा लोकल भाषांचे ट्रॅक आयोजीत करता येतात. विकिपीडिया विषयक चर्चा ट्रेनिंग तांत्रिक सुधारणा भेटीगाठी इत्यादी गोष्टी त्यात होतात.

मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:चावडी/इतर_चर्चा#विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६ आयोजन (अहमदनगर) येथे प्रस्तावास सहभाग अनुमोदने हवी आहेत, अर्थात अनुमोदन करु इच्छित व्यक्तींना अनुमोदन मराठी विकिपीडियावरील पानावरच करावे लागेल.

धन्यवाद

(व्यवस्थापन : धाग्याला लांबलचक विषय दिल्यास धाग्यांची यादी काही छोट्या स्क्रीन्सवर विचित्र दिसायला लागते. म्हणून धाग्याचा विषय संपादित केला आहे. )

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अनुमोदन दिले आहे. 'विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६' ला शुभेच्छा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कॉन्फरन्स मराठी विकीची आहे का भारतातील विकीची?
जर भारतीय विकीची असेल तर नगरला पोहोचणे इतरांना कष्टप्रद व्हावे. त्यापेक्षा भारताच्या साधारण मध्यभागी म्हणजे नागपूरला ती कॉन्फरन्स व्हावी असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नागपूरचे आमंत्रण देऊ शकणारे कुणी कार्यकर्ते असतील तर तसा प्रस्ताव मांडू शकतात. खरेतर मांडला पाहीजे केवळ मुंबई-पुणे आणि त्याचत्या शहरांपलिकडे ज्ञानकोशीय लेखनाची चळवळ पोहोचावयास हवी. माझी इच्छा मोठ्या शहरांशिवाय अगदी भारतीय स्तरांच्या कॉन्फरन्ससाठी सुद्धा छोट्या शहरांनाही संधी मिळावी एवढीच आहे, आमत्रेच्छुकात अथवा निर्णयकात दोन्हीतही माझे स्वतःचे नाव नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

माझी इच्छा मोठ्या शहरांशिवाय अगदी भारतीय स्तरांच्या कॉन्फरन्ससाठी सुद्धा छोट्या शहरांनाही संधी मिळावी एवढीच आहे,

सहमत आहे मात्र त्या शहरांत तितक्या सोयींचा अभाव असल्याने अनेकदा मोठ्या शहरांमध्ये कॉन्फरन्सेस होतात

नागपूर हे शहर विमान, रेल्वे या दोन्ही मार्गांनी भारतभरात जोडलेले असल्याने तसेच मध्यवर्ती असल्याने ते नाव सुचवले. ते महाराष्ट्रात आहे हा योगायोग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नागपूर मध्यवर्ती आहे मूळचे विदर्भातली मंडळी मराठी विकिपीडियावर आहेत पण आमंत्रण देऊन कॉन्फरन्स अरेंज करावी असे माझ्या परिचयात कुणी नाही, आपलीही कल्पना चांगली आहे, आपण नागपूरहून असल्यास तसा प्रस्ताव अवश्य मांडावा.

मात्र त्या शहरांत तितक्या सोयींचा अभाव असल्याने

हे खरेच पूर्ण खरे असते का ? मी काही अगदी खेडेगावात कॉन्फरन्स घेण्याचा आग्रह धरत नाही आहे, विकिकॉन्फरन्ससाठी इंटरनेट बँण्डविथ जी फारतर एकावेळी फारतर पाच पन्नास लोकांनाच लागते त्यातही टेक्स्टचेच काम अधिकतम असते. जनरेटर बॅकअप सगळीकडेच देता येतो आणि लागतोही, विकिकॉन्फरन्स प्रदीर्घ काळापासून ठरवलेली असते निवासाची शे पाचशे लोकांसाठी व्यवस्था मध्यम आकाराच्या शहरातही आजकाल सहज होऊन जाते. लक्झरींची थोडीफार कमतरता राहू शकते. विमानतळ असलेल्या भारतातल्या महानगरातल्या महानगरातही जाण्यायेण्यासाठी ट्रॅफिक जॅममध्ये चारचार तास जातातच त्याच तीन तासात कमी वर्दळीच्या गावात जाऊन जास्त आणि नव्या लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होत असल्यास खासकरुन विकिचळवळ ही सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी विकिकार्यकर्त्यांनी जाण्यास काहीही हरकत नसावी. इनफ्रास्ट्रक्चर हा खरे तर खूप मोठा मुद्दा नसावा. इच्छाशक्तीची गरज आहे. महात्मा गांधींनी काँग्रेस आधिवेशने खेड्यात नेण्याचा आग्रह धरला तेव्हा आतापेक्षा अधिक इनफ्रास्ट्रक्चर होते असे नव्हे एका खेड्यात गेल्याने काँग्रेस सर्व खेड्यात पोहोचली असे नव्हे पण कार्यकर्त्यात ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचा संदेश पोहोचला तो महत्वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

ही सभा महाराष्ट्राबाहेर झाली तर गोमांस खाणाऱ्यांची सोय व्यवस्थित होईल, गुजराथबाहेर झाली तर दारूप्रेमींची सोय व्यवस्थित होईल. व्यवस्थित उदारमतवादी जागी ही सभा भरली तर सभेला जाऊन लोकांना आनंद मिळेल; आनंद झाला की विकीपीडीयाचं स्वयंसेवी काम करण्यासाठी अधिक हुरूप येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लैच निरर्थक प्रतिसाद. एपिक फेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+१ निरर्थक श्रेणी दिली आहे
विनोद हुकलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विनोद एपिक फेल, हुकलेला वाटला नाही. विनोदी श्रेणी दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हा विनोद का वाटतो ते समजत नाही.

चांगलं खाणंपिणं मिळत असताना मनुष्यांच्या चित्तवृत्ती आनंदी असतात. कोणतंही काम चांगलं, व्यवस्थित करण्यासाठी आनंदी असण्याची गरज असते. त्यातून स्वयंसेवी काम करायचं असेल तर आनंद मिळालाच पाहिजे. आनंद होत नसेल हजामपट्टीचे धंदे कोण करणार? (मी तर निश्चितच करणार नाही.) ऐसीच्या दिवाळी अंकाचं काम असतं ते किती, पण ते करतानाही चांगलं खाणंपिणं असेल याची आवर्जून सोय बघितली जाते. एवढी मोठी जीएमआरटी दुर्बीण बांधतानाही जवळ नारायणगाव आणि तिथल्या वायनरी आहेत याचा विचार केला गेला. विकीपीडीयासारखं महाप्रचंड काम पुढे ढकलायचं असेल तर पर्यटनाच्या संधी, खाणंपिणं यांचा विचार महत्त्वाचा वाटतो. त्याच हिशोबात मोठ्या शहरांमध्ये होणारे ट्रॅफिक जॅम हा प्रकार हानीकारक ठरू शकतो हा माहितगारमराठी यांचा विचार ग्राह्य आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विकीपेडीयावर काम करणारे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतील असे तुम्हाला वाटते हा विनोद नाही का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

याच्याइतका तत्काळ खवचट प्रतिसाद पाहिला नव्हता. यात काय फेल आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पातळी दाखवणारा विनोद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोमांस आणि दारू उपलब्ध असलेली काही ठिकाणे - बारामुल्ला , अनंतनाग , कुपवाडा . थंडगार आणि उदारमतवादी ठिकाणे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0