धरलं तर चावतय ...

पूर्वी अन्य संस्थळावर ही मौजमजा टाकलेली आहे. सध्या कामिनी चे ४१ वे प्रकरण जोरात असल्याने इथे टाकते आहे. (डोळा मारत)
_______________
दोनदा चिरपरिचीत बेल वाजली आणि मी ओळखलं कामिनी आली आहे. हसत हसत दरवाजा उघडला.कामिनीच होती. पण नेहेमीसारखी हसरी आणि खळकर मूड्मधे नव्हती. आज जरा फुगा होता.
मी विचारलं "काय ग? अशी काय दिसते आहेस?"
"पाणी दे मग सगळं सांगते." - कामिनी
मी फ्रीजमधलं थंड पाणी दिलं.
कामिनी नी घटाघटा प्याल आणि पहीलं वाक्य बोलली ते हे की " शुचि कधी तुला अनुभव आहे का गं धरलं तर चावतय अन सोडलं तर पळतय चा?"
मी हसायला लागले "अगं झालं तरी काय? परवापर्यंत तर बरी होतीस."
मला हसताना पाहून कामिनीचा पारा अधिकच वर गेला पण तशी ती बॅलन्स्ड आहे , ताबा ठेवून म्हणाली - "शुचि असं बघ तुला एखादी व्यक्ती अतिशय आवडते, म्हणजे खूप म्हणजे फार आवडते. अगदी "Head over heels" तू तिच्या प्रेमात पडतेस मग तू काय करशील?"
"इश्श्य्य ! अगदीच डेस्परेट दिसणार नाही अशा रीतीने करता येईल ते करेन" (डोळा मारत) - अस्मादिक
" हो की नाही? मी ही तेच केलं मी अगदी रंगून गेले त्याच्या प्रेमात पण स्वारी कवितेच्या ओळींखेरीज पुढेच जाईना मग शेवटी ४ महीन्यानी हिंट देऊन देऊन देऊन शेवटी सरळ सांगीतलं माझं तुझ्यावर प्रेम आहे." - कामिनी
"अय्या मग? मस्तच की." - मी कामिनीला लाडवाची बशी देत देत म्हटलं.
"मग काय आता बोंबला! तो निघालाय महाडँबीस. त्यानी त्यावर मला २ नाही ४ कवितांच्या ओळी ऐकवल्या परत प्रेमाचा इजहार केला नाही तो नाहीच." Sad इति कामिनी
"अगं मग तू त्याला सरळ कन्फ्रंट का नाही करत?" मी विचारलं
"तेच ना शुचि , तू आणि मी भोळ्या आहोत जशा बर्‍याच बायका असतात. हे पुरुष महाडँबीस असतात. सगळे पत्ते यांच्या हातात ठेवतात. आता बघ मी जर त्याला विचारलं आणि तो जर नाही म्हणाला तर सगळं मुसळ केरात. :("
"अगं पण कामिनी कशावरनं तो नाही म्हणेल तो सुद्धा तुझा फॅन असेल"
"पण शुचि तेच तर आहे ना त्याला मी विचारलं आणि तो जर हो म्हणाला तरीदेखील काय चार्म राहीला गं? इतका अट्टाहास, आटापीटा करून होकार पदरात पाडायचा त्यात सगळी गोडी निघून जाते."
"ह्म्म! खरय" - मी
"म्हणून म्हणतेय धरलं तर चावतं अन सोडलं तर पळतं असं झालय नुसतं." कामिनी बशीतला लाडवाचा तुकडा मोडत मोडत म्हणाली.
_____
आम्हाला तरी या समस्येवर काही तोडगा सुचत नाही आहे तुम्हाला काही माहीत असेल तर सांगा.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्तये

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किस्सा म्हणून छान आहे. पण अशी एखादी केस खरोखर समोर आली तर मी असा सल्ला देइन :-
होकार येणं ही आनंददायक बाब आहे. होकार हा शेवट असल्याचं मानल्यामुळं हा घोळ होतोय.
होकार हा फक्त एक टप्पा आहे, एक पायरी पुढच्या अजून रोमांचक किश्शांसाथी असं बघ.
मग कै चिंता/संभ्रम वाटणार नै.
नकाराच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू होते. एक नकार हा त्याच व्यक्ती कडून किंवा अजून कोनाकडून भविष्यात होकार येण्यापूर्वीची पायरी असू शकते.
किंवा आयुष्यात त्याव्यतिरिक्त इतर काही रोमांचक घडण्यापूर्वीची पायरी असू शकते.
एकदाचं चित्र काय ते लख्ख स्पष्ट झालं की उलट बरं असतं.
.
.
तुम्ही असं बघा....
समजा एखाद्या गावात्/लहान शहरात राहताय. चैनीची मोठीच व्याख्या म्हणजे जत्रा असलेल्या ठिकानी तुम्ही राहताय.
तुम्ही जत्रेत गेलेला आहात आणि तुमच्या पन्नासेक रुपयेच आहेत. आणि विविध अ‍ॅक्टिव्हिटिज् ची तिकिटं दहा-वीस-तीस रुपये आहेत.
तुम्ही सर्वच राइड्स करु शकणार नाहित; हे स्पष्ट आहे. शिवाय काही राइड्स अगदि मनापासून करायच्या आहेत; पण काही अडचणींमुळे त्या करता येणार नाहियेत.
म्हणजे आताच गच्च जेवण करुन आलेला असल्याने भन्नात असं रोलर-कोस्टर स्टाइल तुम्ही काही करु शकणार नाही; नाहीतर गाडी पार उटीपुल्टी होत असताना तुमच्या ब्याण्ड वाजेल. किंवा जत्रेतले जादूचे खेळ तर पहायचेत; पण जादुगारानं कालच गाशा गुंडाळला काही कारणानं आणि तो निघून गेलेला आहे.
.
.
सध्या जत्रेत आकाश पाळणा आहे, टोरा टोरा आहे, एखादी फिल्लमही आहे तंबूतली.
शिवाय हे सगळं करुन तुम्हाला चटपटित चाट पदार्थ भेळ, रगडा प्याटिसही घेता येणार आहेत.
किंवा मस्त कुल्फीही आहे जवळच्याच गाडीवर.
.
.
साधारणतः असा काहीतरी प्रसंग आहे. तुम्ही "जादुचे प्रयोग पाहताच येणार नाहित(किंवा रोलर कोस्टरमध्ये बसताच येणार नाही) .भ्यां....." करुन रडत बसलात तर ही उपलब्ध असलेली मौजमजाही निघून जाइल. पुन्हा पुढल्या वर्षी तुमच्याकडे पैसा असेल की नाही, तुमच्या गावात जत्रा येइल की नाही, काहिच ठाउक नाही.
.
.
आत्ता ह्या क्षणी तुम्ही जे जे उरलय ते ते अटेण्ड करुन धम्माल करु शकता. रडून भेकून फक्त जे आहे तेही घालवून बसाल.
.
.
तस्मात् नकार आला, तरी तो जत्रेतून आदल्या दिवशी निघून गेलेला जादुगार किंवा रोलर कोस्टर समजावा.
बाकी , जिंदगी है आपकी, मर्जी़ है आपकी ; वगैरे वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0