सूर्य - २

मागचा भागः सूर्य - १

मागच्या भागात सूर्याच्या शांत भागाची, अर्थात रवाळ दिसणाऱ्या पृष्ठभागाची माहिती घेतल्यावर आता अशांत पृष्ठभाग कसा दिसतो, त्याचा आपल्यावर काही परिणाम होतो का आणि अशांततेची आत्तापर्यंत आपल्याला माहित असलेली कारणे, निरीक्षणे यांची माहिती घेऊ.

शाळेत केलेला एक प्रयोग कदाचित तुम्हाला आठवत असेल. एका पुठ्ठ्यावर पट्टी चुंबक ठेवायचा आणि त्याभोवती लोखंडाचे कण टाकून पुठ्ठ्याला हळूच टिचकी मारायची. डाव्या बाजूच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे लोखंडाचे कण पट्टी चुंबकाभोवती लंबवर्तुळ बनवतात आणि चुंबकाच्या दोन टोकांपाशी चुंबकाच्या जवळ येतात. लोखंडाच्या कणांनी ज्या 'काल्पनिक' रेषा तयार होतात त्यांना चुंबकीय रेषा (magnetic lines of force) असे म्हणतात.

सूर्याला स्वतःचे चुंबकीय क्षेत्र आहे. सूर्याचे चुंबकीय क्षेत्र साधारण पट्टीचुंबकाच्या प्रकारचे आहे. पण सूर्य हा वायूंचा गोळा असल्यामुळे त्यात पुढे क्लिष्टता निर्माण होते. सूर्यात साधारण ७५% हायड्रोजन, २४ हेलियम आणि १% इतर जड मूलद्रव्य आहेत. सूर्याच्या चुंबकीय रेषा या वायूंमधे अडकल्या आहेत. सामान्य वापरातले उदाहरण बघायचे झाले तर इलॅस्टीक ज्याप्रकारे कापडामधे शिवून अडकवले जाते, साधारण तशाच प्रकारे या चुंबकीय रेषा वायूंमधे अडकल्या असतात. कापड जसे फिरवले जाते तसे इलॅस्टीक फिरते. चुंबकीय क्षेत्राची क्लिष्टताही अशाच प्रकारे निर्माण होते. सूर्याच्या आतली स्थिती अर्थातच फार जास्त गुंतागुंतीची आहे, एकेक करून आपण त्यांचा आढावा घेऊ या. चुंबकीय रेषा सूर्याच्या पृष्ठभागावरही असतात. जिथे त्या तुटतात तिथे पृष्ठभागाचे तापमान कमी होते. कारण खालच्या भागातून अभिरसणाच्या बुडबुड्यांमधून येणारी ऊर्जा तुटलेल्या चुंबकीय रेषांमुळे अडवली जाते. त्या ठराविक भागापर्यंत कमी ऊर्जा आल्यामुळे हा भाग तुलना करताना (कॉन्ट्रास्टमुळे) काळपट दिसतो. खालच्या चित्रात जो काळा डाग दिसतो आहे, तो त्याचमुळे तयार झाला आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान ५००० केल्व्हीन असतं तर या काळ्या भागात साधारण ३००० केल्व्हीन. या काळ्या भागाला सौर डाग (sun spot) म्हणतात.

साधारणतः एक सौर डाग पृथ्वीच्या आकाराशी तुलना करता येईल एवढा मोठा असतो. उजव्या बाजूच्या चित्रात तुलनेसाठी सौर डाग आणि पृथ्वी एकाच स्केलवर दाखवले आहेत. चित्राच्या मध्याच्या जवळ असणारा हा डाग सरासरी आकाराचा आहे. सौर डागांच्या मधोमध गडद भाग असतो ज्याला umbra आणि फिकट भागाला penumbra असे म्हणतात. या डागाच्या मध्यातून तंतूसारख्या बाहेर आलेले काळ्या रेषा दिसत आहेत. या काळ्या रेषाची चुंबकाभोवती लोखंडाचे कणांची रचना असते, त्याच प्रकारची दिसते. सौर डागांमधे चुंबकीय क्षेत्राचे योगदान त्यातूनच लक्षात यावे. चित्रात मध्याच्या उजव्या बाजूला एक मोठा सौर डाग दिसत आहे आणि त्याच्या खाली एक छोटा डाग आहे. अनेक छोटे डाग एकत्र येऊन कधी कधी असा मोठा आणि अतिशय गुंतागुंतीची रचना असणारा मोठा सौर डाग तयार होतो.

सूर्याच्या चुंबकीय रेषांमुळे असे कमी उर्जा असणारे भाग कसे तयार होतात हे समजून घेण्यासाठी सूर्याच्या अंतर्भागाची रचना पुन्हा एकदा पहावी लागेल. सूर्य हा वायूचा गोळा असल्यामुळे सूर्याचे परिवलन घन वस्तूंप्रमाणे होत नाही. सूर्याच्या विषुववृत्तावर परिवलनाची गती सर्वात जास्त आहे आणि ध्रुवप्रदेशात सर्वात कमी. पृथ्वीवर सर्व ठिकाणी दिवस २४ तासांचा असतो, पण सूर्याचा दिवस(!) विषुववृत्तावर साधारण २४.५ दिवसांचा (२४.५ X २४ तास) असतो तर ध्रुवप्रदेशात २६ दिवसांपेक्षा थोडा मोठा असतो. अशा प्रकारच्या परिवलनास differential rotation म्हणतात. खालच्या कार्टूनमधे डाव्या बाजूच्या पहिल्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सुरूवातीला चुंबकीय रेषा सरळ असतील तर सूर्याचे विषुववृत्तावर एक परिवलन होईपर्यंत या रेषा थोड्या ताणल्या जातात. (संदर्भासाठी मधली आकृती पहा.) काही काळानंतर विषुववृत्तावरच्या रेषांचे एक ध्रुव प्रदेशापेक्षा एक परिवलन जास्त होते. (शेवटची उजव्या बाजूची आकृती पहा.) कालांतराने या रेषा एवढ्या ताणल्या जातात की त्या तुटतात. चुंबकीय रेषा वायूत अडकल्या असल्यामुळे रेषा जिथे तुटतात तिथे अंतर्भागातून कमी वायू आणि त्यामुळे उर्जापुरवठा झाल्यामुळे त्या भागात सौर डाग तयार होतात. चुंबकीय एकलध्रुव (magnetic monopole) अजूनपर्यंत पाहण्यात नाही, त्याचप्रमाणे चुंबकीय रेषा तुटल्या की अर्थात तिथे दोन चुंबकीय बेटे तयार होतात आणि सौर डाग जोडीनेच तयार होतात. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राप्रमाणे या डागांची ध्रुवीयता ठरते. एका गोलार्धातले 'पुढचे', सूर्याच्या परिवलनाच्या दिशेला असणारे, सर्व डाग एकाच ध्रुवीयतेचे असतात. भौगोलिक उत्तर गोलार्धात 'पुढचे' डाग उत्तर ध्रुवीयतेचे असतील तर दक्षिण गोलार्धात दक्षिण ध्रुवीयतेचे डाग पुढे असतात.

सूर्याच्या अंतर्भागात चुंबकीय रेषा गुंडाळल्या जातात, त्याचे कार्टून.

सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना साधारणपणे पट्टीचुंबकाशी करता येईल. त्यासाठी आपण सध्यापुरते सूर्याचे वैचित्र्यपूर्ण परिवलन बाजूला ठेवू. साधारण पट्टीचुंबकाप्रमाणेच सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राला दोन ध्रुव असतात, उत्तर आणि दक्षिण. सूर्याचे भौगोलिक ध्रुव किंवा ज्या काल्पनिक आसाभोवती सूर्य फिरतो, त्या आसाची दोन टोके आणि चुंबकीय ध्रुव एकाच ठिकाणी असतील असे नाही. पृथ्वीच्याही बाबतीत भौगोलिक आणि चुंबकीय ध्रुव एकाच जागी नाहीत, दोन्हीमधे साधारण ११०० किमी एवढं अंतर आहे. पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर गोलार्धात चुंबकीय दक्षिण ध्रुव आहे आणि दक्षिण गोलार्धात उत्तर ध्रुव. पण सूर्याची ध्रुवीयता पृथ्वीप्रमाणे स्थिर नाही. सूर्याचे चुंबकीय क्षेत्र दर अकरा वर्षांनी दिशा बदलते, किंवा उत्तर आणि दक्षिण ध्रुव आपले स्थान बदलतात. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचे ११ वर्षांचे चक्र आहे, ज्यात ते नियमितपणे कमी-जास्त होत रहाते. सूर्याचं चुंबकीय क्षेत्र जेव्हा जास्त बलवान असतं तेव्हा सौर डागांची संख्या वाढते, खग्रास ग्रहणात सूर्याचे प्रभामंडळ दिसते, ते खूप मोठे आणि वर्तुळाकार दिसते, सूर्याकडून येणारी भारीत कणांची संख्या वाढते. जेव्हा हे क्षेत्र सगळ्यात अशक्त असते तेव्हा सौर डाग कमीतकमी दिसतात, प्रभामंडळ दीर्घवर्तुळाकार दिसते आणि सूर्याकडून येणारी भारीत कणांची संख्याही कमी असते. सॅम्युअल हेन्रिच श्वाब या शास्त्रज्ञाने सौर डागांच्या संख्येची नोंद ठेवून सर्वप्रथम हा शोध लावला.

माँडरची फुलपाखरांसारखी दिसणारी आकृती

इ. वॉल्टर आणि अ‍ॅनी माँडर या नवरा-बायको शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम सौर डागांची संख्या अक्षांशाप्रमाणे नोंदवून ठेवली. वर्षानुवर्ष हे काम करून डागांचे स्थान आणि संख्या या य-अक्षावर आणि काळ क्ष-अक्षावर असा आलेख काढला, तेव्हा त्यांना त्यात फुलपाखरासारखा आकार दिसला. वरच्या चित्रात तीच आकृती दिली आहे. यात दर अकरा वर्षांनी होणारी सौरडागांच्या संख्येतली वाढ बघता येईल. शिवाय या आकृतीतून हे ही दिसतं की सौरडाग साधारण सूर्याच्या दोन्ही गोलार्धांच्या वीस अंशाच्या आसपास तयार होतात, आणि कालांतराने विषुववृत्ताच्या जवळ येऊन दिसेनासे होतात. सौरडागांच्या निर्मितीपासून नष्ट होण्यापर्यंतचा 'प्रवास' शोधल्याबद्दल या आकृतीला माँडरची फुलपाखराची आकृती असं नाव दिलं आहे.

सूर्याच्या 'अशांत'पणामुळे सौर कमानी, सौर ज्वाळा, प्रभामंडळाचा आकार बदलणे हे ही होते, याची माहिती आपण पुढच्या भागात घेऊ.

पूर्वप्रकाशित लेखनावरून केलेले संपादित लेखन. सर्व चित्रे, फोटो, आंतरजालावरून साभार. लेखनासाठी आंतरजाल, विकीपीडीया आणि आर्काईव्हवरच्या विविध संदर्भाचा वापर केला आहे.
१. या कणांचा अंतर्भाव वैश्विक किरणांमधे (cosmic rays) होतो.

पुढचा भाग: सूर्य - ३, सूर्य - ४

field_vote: 
4.4
Your rating: None Average: 4.4 (5 votes)

प्रतिक्रिया

फारच छान तांत्रीक लेख. पुढील भागाची वाट पाहतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

उत्तम! यावेळी बरेच शब्द कटाक्षाने मराठीत ठेवले आहेत त्याचे कौतुक वाटले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जिथे त्या तुटतात तिथे पृष्ठभागाचे तापमान कमी होते. कारण खालच्या भागातून अभिरसणाच्या बुडबुड्यांमधून येणारी ऊर्जा तुटलेल्या चुंबकीय रेषांमुळे अडवली जाते.

कालांतराने या रेषा एवढ्या ताणल्या जातात की त्या तुटतात. चुंबकीय रेषा वायूत अडकल्या असल्यामुळे रेषा जिथे तुटतात तिथे अंतर्भागातून कमी वायू आणि त्यामुळे उर्जापुरवठा झाल्यामुळे त्या भागात सौर डाग तयार होतात.

हा भाग जरा बाऊन्सर गेला. म्हणजे कारण कळलं नाही. अर्थात दोष माझ्या बुद्धिमांद्याकडे.

ते वगळता सर्व कळलं आणि अत्यंत रोचक वाटलं. अशी उत्तम माहिती मराठीतून मिळणं हा ऐ.अ.चा यूएसपी होत चालला आहे. नुकतीच किरणोत्सारावरही अशीच डीटेल लेखमाला आली होती. निळेभाऊची वैज्ञानिक / गणिती कोडीही बुद्धीला खाद्य देणारी आहेत.

उत्तम.. अत्यंत उत्तम..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गवि, हे मलाही समजायला थोडं कठीण गेलं होतं. ही सगळी समीकरणं आता आठवत नाहीत, आणि ती आठवत असती तरीही इथे देऊन तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला नसता! Wink मराठीत लिहीण्याचाही शक्यतोवर प्रयत्न करत आहे, पण या विषयात विचार नैसर्गिकतः इंग्लिशमधून केला जातो आणि पुढे भाषांतर करून लिहीते आहे. सदोष वाक्यरचना, शब्दप्रयोग यांच्याबदल आधीच माफी.

चुंबकीय रेषा या प्रत्यक्षात काही प्रकारचे दोर आहेत असा विचार करू. हे दोर सूर्याच्या पृष्ठभागावर ताणलेले आहेत. ही ताणण्याची क्रिया सूर्याच्या पृष्ठभागाच्या थोडीच आत सुरू होते, या भागाला tachocline असं नाव आहे. चुंबकीय रेषा पदार्थाच्या प्रवासाच्या दिशेला लंब असतात; अभिसरणाचे बुडबुडे radial दिशेत असतात, चुंबकीय रेषा पृष्ठभागावर, त्यांना लंब. दोर तुटतात तिथे खालून वर पदार्थ येऊ शकत नाही. किंवा जिथे चुंबकीय रेषा तुटतात तिथे अभिसरण बुडबुड्यांच्या प्रवाहात विरोध निर्माण होतो आणि तिथे कमी उर्जा पोहोचते. अलिकडेच केलेल्या निरीक्षणांनुसार सौर डागांच्या जागी पृष्ठभाग थोडा "खचलेला" असतो.

चुंबकीय रेषा mechanical movement ला लंब का असतात आणि त्या तुटल्या की या हालचालीत रोध का निर्माण होतो हे सांगण्यासाठी मला पाठ्यपुस्तकं शोधावी लागतील. शिवाय पुन्हा आठवलं तरीही ते रंजक पद्धतीने मला मांडता येणार नाही अशी भीती आहे. त्यामुळे सध्या "मी म्हणते म्हणून" असं अवैज्ञानिक उत्तर देते आहे. Sad

१. सूर्याच्या गाभ्याशी सूर्याचे परिवलन घन वस्तूप्रमाणे होते, पृष्ठभागावर differential. हा बदल होतो तो भाग tachocline, जो पृष्ठभागाच्या किंचित खाली असतो.
२. मोठ्या दीर्घिकांमधेही (Active galactic nuclei) साधारणत: चुंबकीय क्षेत्र जेट्सना लंब दिशेत असतं. त्याबद्दल नंतर कधीतरी लिहेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुद्देसूद प्रतिसादाबाबत धन्यवाद..

पोच द्यायला उशीर झाला त्याबद्दल स्वारी..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान माहिती. Magnetic monopole नसतो आणि सौर डाग जोडीनेच तयार होतात ही माझ्यासाठी नविन माहिती... पण पूर्ण पणे लॉजिकल.
पुढील माहिती / लेखाच्या प्रतिक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चुंबकीय रेषा 'तुटतात' म्हणजे नक्की काय होतं? त्या सूर्याच्या पृष्ठभागाच्या आतून किंवा बाहेरून आल्यामुळे तुटल्याप्रमाणे वाटतात की खरोखरच तुटतात?
- सूर्याच्या परिवलनाची गती विषुववृत्तावर सर्वात जास्त का असते? मी विचार करतो आहे ते एखाद्या द्रव पदार्थाचा. जिथे वेग (किंवा खरं तर वेगाचा ग्रेडियंट) जास्त असतो तिथे विष्यंदिता जास्त असायला हवी. त्यामुळे विषुववृत्ताचा कोनीय वेग कमी असेल असा अंदाज होता.

बाकी सूर्याच्या डागांचा आणि चुंबकीय क्षेत्राचा संबंध उलगडून दाखवणारा लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसादाला उशीर होण्याबद्दल दिलगिरी.

व्हाईट बर्चः चुंबकीय एकलध्रुव ही एकप्रकारची फॅण्टसी आहे. त्याबद्दल कधी पुढे सविस्तर लिहीण्याचाही विचार आहे. Electric monopole सहज सापडतात.

पुढचं स्पष्टीकरण मला कितपत नीट देता येत आहे हे माहित नाही. समजत नसल्यास क्षमस्व.

राजेशः चुंबकीय रेषा या प्रत्यक्षातल्या रेषा नसल्या तरी त्यांचं वर्तन तसंच असतं. चुंबकीय क्षेत्र वायूमधे अडकतं, चुंबकीय क्षेत्र उभं असतं आणि त्याला लंब रेषेत डिफरन्शियल रोटेशनमुळे ग्रेडीयंट तयार होतो. उभ्या दिशेतलं चुंबकीय बल आणि आडव्या दिशेतला मेकॅनिकल फोर्स यांच्यात ओढाताण होऊन चुंबकीय क्षेत्र पुन्हा मूळ स्थितीत जाण्याचा प्रयत्न करतं, आणि त्यातून रेषा तुटतात. रेषा तुटल्यामुळे वायूच्या डिफरन्शियल रोटेशनमधे कमी अडथळा येतो.
सूर्याच्या परिवलनाची द्रवाशी तुलना करता यावी. विषुववृत्तावर कोनीय वेग कमी का असावा हे समजलं नाही. ध्रुव आणि विषुववृत्त प्रदेशात संवेग (momentum) सारखं असण्याची आवश्यकता नाही. ध्रुवांवर संवेग शून्य असणार, ध्रुव प्रदेशात संवेग शून्याच्या जवळपास असणार आणि विषुववृत्तावर सर्वात जास्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चुंबकीय रेषांच्या बाबतीत तुटणं या शब्दामुळे थोडा गोंधळ झाला. चुंबकीय क्षेत्र हे एकध्रुवीय नसतं. त्या तुटल्यामुळे एकध्रुवीयत्वाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.

विषुववृत्तावर कोनीय वेग कमी का असावा हे समजलं नाही. ध्रुव आणि विषुववृत्त प्रदेशात संवेग (momentum) सारखं असण्याची आवश्यकता नाही.

विष्यंदितेमुळे सूर्याच्या वेगवेगळ्या अक्षांशांवरचा वेगांमधला बदल (ग्रेडियंट) महत्त्वाचा ठरतो. ध्रुवावरचा शून्य कोनीय वेग विषुववृत्तापर्यंत काही विशिष्ट वेगापर्यंत येत असेल तर तो ध्रुवाजवळ लवकर वाढेल व विषुववृत्ताजवळ वाढण्याची गती कमी असेल (चित्रात दाखवलेल्या आंतर्वक्र ऐवजी बहिर्वक्र व्हेलॉसिटी डिस्ट्रिब्यूशन) असं मला वाटलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विष्यंदिता म्हणजे काय? गुर्जी, इंग्रजीही शिकवा!

सूर्याच्या पृष्ठभागाच्या गतीचा हा प्लॉट सापडला.
य-अक्षावर अंश प्रति दिवस या एककात गती दिलेली आहे. सूर्यावरही पृथ्वीप्रमाणे अक्षांश-रेखांश आखले तर य-अक्षावर रेखांश्/प्रति दिवस अशी गती आहे. क्ष-अक्षावर उत्तर+दक्षिण अक्षांश दिलेले आहेत. सहा वेगवेगळे कर्व्ह्ज असण्याचं कारण सहा वेगवेगळ्या प्रकारे गती मोजलेली आहे. यातल्या Hα filaments बद्दल मी पुढच्या भागात लिहीते. सौरडागांच्या गटांबद्दल माहिती इथेच आहे. 'डॉप्लर शिफ्ट'बद्दल पुढच्या एखाद्या भागात माहिती येईल. बाकी तीन मोजमापांसाठी पेपर वाचून काही समजल्यास सांगते.

संदर्भः R. Brajsa et al, A&A, Volume 414, Number 2, 2004

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक क्लिष्ट विषय मराठीत आणि तेही सुरस करून सांगितल्याबद्दल धन्यवाद. बरीच नवीन माहिती कळतेय. लिहित रहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

लेख आवडला. बरीच क्लिष्ट माहिती असूनही समजल्यासारखे वाटतेय.
सौर ज्वाळा म्हणजेच सौर वादळे का? सौर वादळे का होतात वगैरे पुढच्या लेखात येईलच, त्याचबरोबर पृथ्वीवर सौरवादळांचा परिणाम कसा होतो आणि तो मंगळावर होणार्‍या परिणामांपेक्षा वेगळा का आहे याचेही विवेचन करता आले तर छान होईल.
डोक्यातली माहिती सुसंगतपणे मांडण्याचे आणि मराठीत भाषांतर करून लिहिण्याचे कष्ट घेतल्याबद्दल धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is NOT a plan!

सौर ज्वाळा म्हणजेच सौर वादळे का?

साधारणतः होय.
चुंबकीय क्षेत्रात होणार्‍या वादळांमुळे सूर्यावरची वादळं होतात त्याचा एक परिणाम म्हणजे सौर ज्वाळा. तशा सौर कमानीही दिसतात.

पृथ्वीवर सौरवादळांचा परिणाम कसा होतो आणि तो मंगळावर होणार्‍या परिणामांपेक्षा वेगळा का आहे याचेही विवेचन करता आले तर छान होईल.

गुड क्वेश्चन. अशा पद्धतीने त्याचा परिणाम मांडता येईल असा विचार केला नव्हता. ड्राफ्टमधे लगेच हा मुद्दा टाकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुंदर माहिती आहे आदिती,

पुढील भागांत तू परामर्श घेशीलच तरीही (माझा इंटरेस्ट) सांगत आहे. Smile
सूर्य आणि प्लाझ्मा यांच्यावर थोडा प्रकाश टाकू शकलीस तर बघ.
कारण प्लाझ्मा आणि उच्च तापमान यांचा घनिष्ठ संबंध आहे आणि ते फक्त तार्‍यांतच बघावयास मिळते.

प्लाझ्मा या घटकाचा सौरवादळांशी अथवा सौरज्वाळांशी कितपत संबंध आहे हे माहिती करुन घेणे मनोरंजक ठरेल Smile
कारण द्रव स्वरुपातील प्लाझ्मा सूर्यावरील संवहनाशी निगडीत आहे आणि त्यातून जे गुरुत्वीय बल नियंत्रित वा अनियंत्रित होते त्याचा या सौरवादळांशी काही संबंध आहे का?

पुढील आठवड्यापासून नियमितपणे तुझे सर्व लेखन वाचून चर्चेत सहभागी देखील होईन Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तारे दिले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुव्यां बद्दल धन्यवाद अदिती.
दोन्ही भाग आताच वाचुन काढले. खुप छान माहिती उकलून सांगीतली आहेस.
वाचकांच्या प्रतिसादातुनही बहुमोल माहिती मिळतेय.
पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

५-६ जूनच्या शुक्राच्या अधिक्रमणाच्या वेळेस काढलेल्या फोटोंमधेल सौर डागः


फोटोचे श्रेय: निखिल तुंगारे. स्थान: हैद्राबाद. (फोटोवर क्लिक केल्यास मोठ्या आकारातला फोटो दिसेल.)

उजव्या बाजूच्या वरच्या बाजूला वर एक मध्यम आकाराचा आणि लगेच खाली एक लांबुडका डाग दिसतो आहे. या फोटोत नीटसा दिसत नसला तरी या दोन्हीच्या मधे, लांबुडक्या डागाच्या वर एक छोटासा डाग आहे. लांबुडका डाग आणि त्याच्या जवळचा छोटा डाग हे काही दिवस/आठवड्यांपूर्वी दोन जोड्या, अर्थात चार डाग असणार. यातले दोन किंवा तीन डाग एकत्र आले आणि एक छोटा डाग बाजूलाच राहिला. एकत्र आलेल्या डागांचा तो लांबुडका डाग आता दिसतो आहे.

उजव्या बाजूला खाली दिसणारा मोठा डाग हा सुद्धा कदाचित अनेक डाग एकत्र येऊन मोठा झाला असेल. आधीचे फोटो पाहिल्यास हे सहज समजू शकेल.

माझ्याकडची दुर्बिण फोटो काढण्यासाठी फार उपयुक्त नाही, त्यामुळे फोटोंची क्वालीटी फार चांगली नाही. पण दुर्बिणीतून पहाताना लांबुडक्या डागाच्या शेजारी छोटा डाग स्पष्ट दिसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.