"कॉन्व्हेण्ट" मुलांच्या पालकांवर कारवाई करा .. - भालचंद्र नेमाडे बडबडले !
भालचंद्र नेमाडे या व्यक्तीबद्दल कधीही फारसा आदर नवता.
आता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर म्हतार् चळ लागलेला दिसतो
हे पहा त्यांची मुक्ताफळे
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/punished-those...
‘कॉन्व्हेण्ट’ मुलांच्या पालकांवर कारवाई करा
Maharashtra Times| Aug 14, 2015, 03.49 AM IST
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतल्याने आपल्या पाल्याचे भवितव्य घडते, ही पालकांची अंधश्रद्धा आहे. उलट पालक आपल्या पाल्याचे भविष्य बिघडवत असून, कॉन्व्हेण्ट शाळांच्या 'कत्तलखान्या'तील घोकंपट्टीमुळे ते आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहेत. याला सर्वस्वी पालक जबाबदार आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना कॉन्व्हेण्ट शाळेत घालणाऱ्या पालकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर कायदा करावा, असे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईत व्यक्त केले.
मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्राने कलिना संकुलातील फिरोजशहा मेहता सभागृहात 'समकालीन साहित्य आणि समाज' या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.
देशी भाषांची जननी संस्कृत नाही
'देशात एक हजार ६५७ भाषा आहेत, मात्र, यापैकी एकाही भाषेची जननी ही संस्कृत भाषा नाही. उलट भारतीय भाषांमधून संस्कृत भाषेचा जन्म झाला. मात्र, संस्कृत भाषेला भारतीय भाषांची जननी असल्याचे काही प्रस्थापित भाषांमधून बिंबवले जात असले, तरी संस्कृत भाषा ही कधीही भारतीय मूळ भाषांची जननी नव्हती,' असे ठाम वक्तव्य डॉ. नेमाडे यांनी यावेळी केले. मराठी भाषेच्या साहित्याचा उगम हा इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात झाला. त्या काळात जैन मराठी व्याकरणकारांनी मराठी भाषा पुढे आणली. परंतु, त्यांचा इतिहास हिंदूंकडून पुसला गेल्यानेच मराठीचा उगम बाराव्या शतकात झाल्याचे सांगण्यात येते. ही बाब इतिहासाला धरून नसल्याचेही नेमाडेंनी यावेळी स्पष्ट केले. साहित्याचे समाजीकरण आणि विस्तारीकण होणे ही काळाची गरज असून, समकालीन साहित्य आणि समाज या दोन्ही परस्पर पूरक बाबी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
----------------------
आपले मत काय ?
बाय द वे यांना कॉन्व्हेण्ट शाळा अपेक्षित आहेत कि सर्व इंग्लिश माध्यमाच्या शाळा ? यांना त्यातला फरक तरी माहित आहे ना ? सध्याच्या अनेक चांगल्या शाळा जसे कि जमनाबाई , मानेकजी , रायन , DPS , पोदार या कॉन्व्हेण्ट नाहीत.
आणि माझी मुलगी इंग्लिश शाळेत शिकते कारण मला ते आवयाषक वाटते. भले मराठी माध्यमातून अनेक महान लोक निघाले असतील .. पण मी जेवा मराठी माध्यमातून आलेले DJ , VJ , इंग्लिश लेखक ( मराठी लेखनात पैसा मिळत नाही - जातो !) , सुपर मोडेल ( मधुताई साप्रेंचा अपवाद वगळता - आणि अनेकजणी तीचापेक्षा मोठ्या हत्या) कोण विचारतो - तेवा मला कोणीच समाधानकारक उत्तर देत नाही ..
त्यांना बोलू द्या. त्यांचं
त्यांना बोलू द्या. त्यांचं खरं आहे असं त्यांना वाटतंय.सामान्य माणूस कोणा एकाचा व्यासपिठावरचा सल्ला ऐकून निर्णय करत नाही.
विजया राजाध्यक्षांनी असे
विजया राजाध्यक्षांनी असे विधान केलेले होते की - "पालकांनी आंग्लाळलेल्या मुलांच्या कानाखाली आवाज काढावा".
त्यापेक्षा नेमाडेंचे हे विधान बरे.
( अर्थात माझा कारवाईस पाठिंबा नाहीच. )
नेमाडे दुपट्टी आहेत, स्वत:
नेमाडे दुपट्टी आहेत, स्वत: आंग्ल भाषेचे ज्ञाता आहेत, ज्ञानपीठ पुरस्कार घेताना त्यांना मराठीचा विसर पडला, फक्त आंग्ल भाषा लक्ष्यात राहिली.
आता पालकांना मारण्याची भाषा करतात. आंग्ल भाषेत शिकणार्या मुलांना हि मराठी विषय हा असतोच. शिवाय भाषे साठी शाळेची गरज नाही. त्या भाषेच्या आवडीची गरज असते.
नेमाड्यांनी महाराष्ट्र भूषण (रत्न) पुरंदरेंच्या बाबतीत हि मूर्खपणाचे विधान केले होते. (ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य गढ-किल्याना आपल्या पायदळी तुटविण्यात खर्च केले, त्यांना इतिहास माहित नाही). इतिहास फक्त नेमाड्यांना माहित आहे किंवा संभाजी ब्रिगेडच्या मूर्खाना. द्वेषपूर्ण आणि मूर्खपणाचे विधान करणाऱ्या या माणसाला ज्ञानपीठ देणे म्हणजे कोकीळ सोडून कावळ्याचा गौरव करणे असेच म्हंटले पाहिजे.
अविवेकी विधान
नेमाडेंच्या विधानाचे मी समर्थन अजिबात करत नाही. मात्र ज्ञानपीठ त्यांना जे देण्यात आले ते त्यांच्या साहित्यातील योगदानासाठी. त्यांनी केलेली समीक्षा व प्रसवलेले साहित्य हे अव्वल दर्जाचे आहे. ते मराठी साहित्यातील एक ट्रेंड सेटर आहेत यात काहिच वाद नाही. नेमाडेंची समीक्षा अत्यंत युनिक आहे आणि त्याच पुस्तकासाठी त्यांना ज्ञानपीठ मिळालय आता यात साहित्यीक नेमाडे आणि वक्ता नेमाडे असा एक फरक करता येईल. त्यांनी अनेक न पटणारी वक्तव्ये केलेली आहेत. ती अधिकच आक्षेपार्ह अशा साठी बनतात की त्याचे कुठलेही विस्तृत स्पष्टीकरण ते देण टाळतात. शिवाय ती अनेकदा परस्परविरोधी असतात, त्यामागे सखोल मांडणी नसल्याने त्यांचा दर्जा सनसनाटी एकांगी बनतो. तेंडुलकर हि अशा प्रकारचीच विधाने आणि उतारवयातच करत असत माझ्या हाती बंदुक द्या इ. टाइप. पाश्चात्य साहित्यीक सार्त्र संदर्भात ही एक वर्गीकरण केले जाते पुर्वाधाचा सार्त्र व उत्तरकालीन कम्युनिझम च्या रंगात रंगलेला सार्त्र तसे इथे करता येऊ शकते. नेमांडेंचा सर्वोत्क्रुष्ठ प्रतिवाद अलीकडच्या कसबे पेक्षाही विलास सारंग यांनी केलेला आहे. मात्र दोन्ही एकमेकांचे घनिष्ठ मित्र ही होते एकमेकांच्या काहि पुस्तकांचे अनुवाद इ. दोघांनी केलेले आहेत. पॉइंट इज नेमाडेंच्या विधानबाजीने त्यांनी साहित्यात केलेल्या भरीव योगदाना कडे दुर्लक्ष करणे, व आपल्याला न पटणारे विधान केले म्हणुन ते ज्ञानपीठाला पात्र नाही असे विधान करणे म्हणजे आपण नेमाडेइश अविवेकी च विधान करतोय असा होतो. .
बाबासाहेब पुरंदरे गढ किल्ले पायदळी तुडवतात मेहंदळे बहुधा फक्त खुर्ची तुडवतात दोन्ही शिवाजी या एकाच विषयावर आयुष्य वेचणारे लोक एक तुलनात्मक अभ्यास दोघांच्या शिवाजी वरील कार्याचा महाराष्ट्राला आजच्या घडिला करुन देण अगत्याच आहे अस मनापासुन वाटतय. माझे व्यक्तीगत मत मेहंदळे ओरीजीनल आहेत असो.
" If you kill a killer, the number of killers in the world remains the same " Batman
>>माझे व्यक्तीगत मत मेहंदळे
>>माझे व्यक्तीगत मत मेहंदळे ओरीजीनल आहेत असो.
मी अगदी अलिकडेपर्यंत मेहेंदळ्यांचे नाव ऐकले नव्हते. [कदाचित ब्रिगेडींचं म्हणणं बरोबर असेल का?]
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१
मीही २००६-७ मध्ये प्रथमच त्यांचे नाव ऐकले. तेव्हा भारत इतिहास संशोधन मंडळात रेग्युलरली जाणे सुरू झाले होते आणि अंगभूत आगाऊपणामुळे तिथे येणार्यांच्या संभाषणात वेळप्रसंगी नाक खुपसताना त्यांच्याशी ओळख झाली. मग मित्राला सांगितले, "अरे ते मंडळात कुणी मेहेंदळे म्हणून आहेत, त्यांचं नॉलेज लै भारीये". मित्र उडाला आणि त्याने सगळी स्टोरी सांगितली अन मग मीही उडालो.
मेहेंदळे सर कागदपत्रांवरच सगळे लक्ष केंद्रित करतात हे खरेय. पण त्यांनी लिहिलेले शिवचरित्र जमल्यास फक्त एकदा नजरेखालून घालावे अशी विनंती आहे. माहितीचा इतका अफाट महासागर आणि तोही तर्कशुद्ध विचारांच्या कुंपणाने बद्ध असलेला असा अन्यत्र कुठल्याच शिवचरित्रात पहायला मिळणार नाही. मराठी शिवचरित्र (अपूर्ण आहे, तूर्त अफझलखानवधापर्यंतच लिहिलेय. पुढील भाग लिहून तयार आहे, १-२ वर्षांत मार्केटात येईल मोस्टलि) खंड १ मध्ये 'शिवचरित्राची साधने' हे प्रकरण फक्त बघावे. शंभरेक पाने फक्त त्याकरिता खर्चलेली आहेत. खंड २ मध्ये फक्त परिशिष्टे आहेत- शिवजन्मतिथी, शिवाजीची साक्षरता, इ. विषयांना प्रत्येकी ७०-८० पाने वाहिलेली आहेत. इतके तर्कशुद्ध, विदासंपृक्त शिवचरित्र दुसरे होणे नाही. सर्वसामान्य पब्लिकचं सोडा, पण ज्यांना एखाद्या गोष्टीबद्दल शक्य तितके नेमके आणि अनबायस्ड वाचायचे असते त्यांनी हे चरित्र अवश्य वाचावे अशी आग्रहाची शिफारस आहे. सुदैवाने त्यांनी एक इंग्लिश शिवचरित्रही लिहिलेले आहे जे पूर्ण १६८० पर्यंत आहे. ६५० पानी चरित्र आणि २००-३०० पानी फक्त संदर्भसूची. बाकी तळटीपा तर वेगळ्याच.
आणि मजा म्हणजे त्यांचा मूळ विषयही शिवचरित्र हा नव्हेच. मिलिटरी हिस्टरी हा त्यांच्या एम ए चा आणि आवडीचाही विषय. दुसर्या महायुद्धाचा एक अनेकखंडी इतिहास लिहिण्याचा त्यांचा मानस आहे. पैकी पहिला खंड ऑलमोस्ट लिहून होण्याच्या टप्प्यात आहे. दुसर्या महायुद्धाबद्दल त्यांच्याकडून ऐकणे हा एक नितांत आनंददायी अनुभव असतो.
अॅज़ फॉर आर्मचेअर हिस्टोरियन- नॉट एग्झॅक्टली. ते तरुण असताना न्यूजपेपरतर्फे (नाव विसरलो) बांग्लादेश युद्धाचे वॉर करस्पाँडंट होते. बॉर्डर ओलांडूनही जाऊन आलेले आहेत.
ते लोकांना माहिती नसण्याचे कारण म्हणजे प्रसिद्धीपराङ्मुखता आणि कमी नंबर ऑफ पब्लिकेशन्स. इतिहासकार लोक फक्त पुस्तके न लिहिता पापिलवार लेख, छोटेसे रिसर्च पेपर, इ. अनेक गोष्टी लिहित असतात. सरांनी अगदी मोजके अपवाद वगळता तसे कधी केले नाही. त्यामुळे लोकांना ते माहिती नाहीत. त्यांचे शिवचरित्रही १९९७ साली प्रकाशित झाले. त्याची तितकी जाहिरातही झालेली नाही कारण ते माससाठी नाही हे ते चाळल्यावर क्षणार्धात समजते. आणि हे काम त्यांनी फक्त पुण्यात बसूनच केलेय असे आजिबात नाही. पुणे, मुंबै, औरंगाबाद, कोल्हापूर, दिल्ली, पटना, अलीगढ, बंगलोर, मंदसोर, कलकत्ता, इ. अनेक ठिकाणच्या पुराभिलेख कार्यालयांमध्ये त्यांच्या खेपा झालेल्या आहेत. मंडळ सोडून ते कुठेही व्याख्यान इ. देत नाहीत. पण मंडळात त्यांचे व्याख्यान सुरू झाले की विषयाचा जो विस्तीर्ण लँडस्केप दिसतो त्याला तोड नाही.
त्यांच्याशी थोडीशी ओळख असणे हा मी माझा बहुमान मानतो. इतका ज्ञानी आणि तरीही कायम जमिनीवर असलेला व नेहमी अॅक्सेसिबल असलेला माणूस आजवर पाहिला नाही.
सरांचे आजपर्यंतचे प्रकाशित ग्रंथः
श्री राजा शिवछत्रपती (दोन खंड, अपूर्ण.)
शिवाजी-हिज़ लाईफ & टाईम्स (इंग्रजी, पूर्ण).
शिवछत्रपतींचे आरमार.
आदिलशाही फर्माने.
जाता जाता: सरांची दूरदर्शनवरील एक दुर्मिळ मुलाखत.
https://www.youtube.com/watch?v=j1p2F9n2tUo
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ब्याट्या, मस्त लिहिलेय्स.
ब्याट्या, मस्त लिहिलेय्स. दोनदा वाचले.
रोचक
शिवचरित्र वाचायला आवडेल
संभाजी ब्रिगेडच्या भांडारकर
संभाजी ब्रिगेडच्या भांडारकर वरच्या धुमाकुळाच्या निषेधार्थ मेहंदळ्यांनी त्यांनी लिहिलेल्या शिवचरित्राची पाने फाडून टाकली होती. हे खरे आहे का बॅटमॅन?
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
होय. पण परम सुदैवाने ते
होय. पण परम सुदैवाने ते रिकव्हर करण्यातही यश आलेले आहे. ब्रिगेडच्या हल्ल्यामुळे त्यांना वैफल्य आले होते त्यामुळे त्यांनी तसे केले. आता तसे कै होणार नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅटमॅन तुमच्या विषयीचा आदर दुणावला
बॅटमन
तुमच्याविषयी आदर होताच तुमचा मेहंदळे वरील हा प्रतिसाद वाचुन व तुमचा त्यांचा व्यक्तीगत परीचय आहे हे जाणुन
तुमच्याविषयी चा आदर आणखीनच वाढला.
तुम्ही खरोखर एक तुलनात्मक अभ्यास पुरंदरे व मेहंदळे यांच्या कार्याचा असा करुन दाखवायला हवा याची आज अत्यंत गरज आहे असे मनापासुन वाटते.
" If you kill a killer, the number of killers in the world remains the same " Batman
तुलना करण्याइतका अभ्यास नै ओ.
तुलना करण्याइतका अभ्यास नै ओ. त्याला अजून खोलवर अभ्यास पायजे. काही उघड उघड जाणवणार्या गोष्टी मांडल्या इतकेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
ऐसी चा न त्यानुषंगाने बॅट्याचा विचार आज बसमध्ये आलेला - हाच प्रतिसाद आठवला.
मस्त
बॅटमॅन, खूपच छान प्रतिसाद. मेहेंदळे यांच्याबाबत इतकी माहिती नव्हती.
+१०००
प्रतिसाद अतिशय आवडला. मलाही अगदी असेच लिहावयाचे होते. समीक्षक आणि साहित्यिक नेमाडे मलाही आवडतात, जरी त्यांची 'हिंदू' आवडली नसली तरी. पण भाषण करताना मात्र ते बरीच ठाम विधाने कुठलेही स्पष्टीकरण न करता रेटून करतात आणि कित्येकदा ती परस्परविरोधी असतात.
मेहेंदळ्यांचे शिवचरित्र अस्सल, समतोल आणि सर्वंकष आहे हे तर बहुतेकांना मान्य असेल. त्यांनी त्यासाठी गडकिल्ले तुडवलेले नसावेतही कदाचित.
नेमाड्यांचे 'अंग्रेजी हटाओ' हे मत मला मान्य नसले तरी त्यांचे मराठीच्या उगमाविषयीचे मत विचारात घेण्याजोगे वाटते. देशातला विचारवंतांचा एक फार मोठा गट आज प्राकृताच्या बाजूने उभा आहे असे चित्र आहे. आणि ही नुसती बहुजनवादी हुल्लडबाजी नाही.
+१
असेच.
व्यक्तिस्वातंत्र्य
घटनेने व्यक्तिस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे त्यांना त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यांनी सांगितले म्हणून शासन काही तसा कायदा करणार नाही.
पण, लहान वयांत, आपल्या मातृभाषेत शिकल्याने फंडाज जास्त स्पष्ट होतात, असे माझेही व्यक्तिगत मत आहे. ते इतरांनी ऐकावे असा आग्रह, मी माझ्या मुलांच्या वेळेसही धरला नाही.
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
नेमाडे काहीही बरळतोय. पहिले
नेमाडे काहीही बरळतोय. पहिले त्यालाच आत टाका.
(नको तिथे अनेकवचन वापरायची इच्छा होत नाही.)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पण मला हे समजत नैय्ये ... की
पण मला हे समजत नैय्ये ... की तुम्ही लोक अभिव्यक्तीच्या इतके विरुद्ध का आहात ???
त्यांनी म्हंटलेले तुम्हाला पटलेले नाही. ठीक. पण त्यांच्यावर इतका गुस्सा ???
काय राव गब्बर, गुस्सा
काय राव गब्बर, गुस्सा करण्याच्या स्वातंत्र्याबद्दल इतके आश्चर्य का वाटावे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं