गणित विषयक शिलालेख-मथळ्याच्या दोन ओळींचे लेखन माहित करून हवे आहे

एका (बहुधा अभारतीय आंतरजालीय) अभ्यासकाने खजुराहोच्या पार्श्वनाथ जैन मंदिरातील आदर्श जादुई वर्ग (Most-perfect_magic_square) चा उल्लेख असलेल्या शिलालेखाचे खालील छायाचित्र दिले आहे आणि मथळ्यातील वरच्या दोन ओळीतील अक्षरे (लेखन) माहित करून देण्याची विनंती मराठी विकिपीडियावर केली आहे.

खालील शिलालेख चित्रातील आकड्यांचा टेबल त्याला वाचता आलेला आहे तो बहुधा
७ १२ १ १४
२ १३ ८ ११
१६ ३ १० ५
९ ६ १५ ४
असा आहे.

त्यास खालील गणित विषयक शिलालेख-मथळ्याच्या दोन ओळींचे लेखन माहित करून हवे आहे.
.
.
.
.

shilalekh

(छायाचित्र मोठे करुन पाहण्यासाठी विकिमिडीया कॉमन्सवरील या दुव्यावर उपलब्ध आहे.)
.
* इंग्रजी विकिपीडियावर Jain temples of Khajuraho आणि खजूराहोतील मंदीरे बनवून घेणारे Chandela राजघराणे विषयक लेख उपलब्ध आहेत.
.
.

* विकिप्रकल्पातून उपयोग होत असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त समजले जातील.
* अनुषंगिका व्यतरीक्त इतर आवांतर टाळण्यासाठी आणि प्रतिसादांसाठी आभार

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

'… … पुत्र श्री देवसर्म्म' हे वाचन करता येत आहे पहिली दोन अक्षरे कोणती ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

… … जयतु ॰ ॥ दुसर्‍या ओळीत ह्या अक्षरांचा बोध होतो आहे. पहिली दोन अक्षरे कोणती ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

पहिल्या ओळीतली शेवटची दोन अक्षरं जर सर्म्म असतील तर त्या ओळीतलं पहिलं अक्षर सा किंवा शा आहे. दुसरं ट असावं असा अंदाज.
साटपुत्रश्रीदेव सर्म्म
शाटपुत्रश्रीदेव सर्म्म
शात्पुत्रश्रीदेव सर्म्म
शाप्पुत्रश्रीदेव सर्म्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहील अक्षर आणि शेवटून दुसर म्हणजे सारख दिसणार अक्षरातील साम्य तुम्ही म्हटल्यामुळे लक्षात आल.

प्राचीन जैन साहीत्य अर्ध मागधितप्राकृतात असे आणि प्राकृतात आता श असा उच्चार करतो त्याचा उच्चार स राहीला असू शकतो म्हणून ते र्म्म्च्या आधीचे अक्षर स आहे असे गृहीत धरले.

तत्कालीन चंडेल राजघराण्यातील पहिल्या नावात 'देव' शब्द दिसतो आहे पण दुसर्‍या नावात सहसा 'वर्मा' शब्द दिसतो आहे. शिलालेखात व हे अक्षर वेगळे आणिस सुस्पष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

साटपुत्रश्रीदेवसर्म्म
वीर जयतु :||

अन खाली जादूचा चौरस दिलेला आहे.

दुसरे अक्षर र हेच आहे. पहिले अक्षर वी असावे असे वाटते. ते नसेल तर पी असू शकेल पण मग संस्कृतप्रमाणे अर्थ लागत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सतपुत्रच उच्चारण आणि लेखन साटपुत्रश्रीदेवसर्म्म केल असेल का, साट शब्द विशेषनाम अथवा वेगळ्या अर्थाने येण्याची शक्यता वाटते ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मेबी उच्चारणच वेगळं असेल असं वाटतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>शाटपुत्रश्रीदेव सर्म्म

आजच्या काळात असं नाव असतं तर खरोखर तो माणून 'सरमे'ने मेला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यद्यपि बहु नाधीषे, तथापि पठ पुत्र व्याकरणम् |
स्वजनो श्वजनो मा भूत् सकलं शकलं सकृत् शकृत् ||

"पोरा, लै शिकला नाहीस तरी व्याक्रण तरी शीकच. नैतर स्वजन हा श्वजन (कुत्रा), सकल (पूर्ण) म्हणजे शकल (भाग), सकृत् (एकदा) म्हणजे शकृत् (सोनखत) असा अनवस्थाप्रसंग ओढवेल."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वजनो श्वजनो मा भूत् सकलं शकलं सकृत् शकृत् ||

असलं इंट्रेष्टींग संस्कृत (खालचा रफार जमला एकदाचा..) आमच्यावेळी कुठं गेलतं कुनाला ठाऊक!

"पोरा, लै शिकला नाहीस तरी व्याक्रण तरी शीकच.

व्याकरणानीच घात केला हो..!पाणिनीय सूत्रांनी (ऐऊण..र्रृलृक..जबगडदश... खफछठत.. असलं कांही तरी..खरं काय ते वाघूळबाबाच जाणोत!) सुरुवातीलाच तोंडाला जो फेस आला- त्याच्यामुळे ही गंमत राहूनच गेली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

पाणिनीय सूत्रांनी (ऐऊण..र्रृलृक..जबगडदश... खफछठत.. असलं कांही तरी..खरं काय ते वाघूळबाबाच जाणोत!) सुरुवातीलाच तोंडाला जो फेस आला- त्याच्यामुळे ही गंमत राहूनच गेली!

आठवीनौवीत तर पाणिनीचे नाव सोडून झाट काही माहिती नव्हते. पुस्तकात अन शाळेतही फक्त नियम शिकवायचे. पाणिनीची सूत्रेबित्रे कुठेच नव्हती. सुभाषिते होती काही बरी, पण वट्टात पाठांतरच जास्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असलं कांहीतरी (एका विशिष्ट क्रमाने येणारे २५ का २६ अक्षरसमुह) पाठांतर होतं! त्याचं नाव कांही वेगळं असेल.. पण त्यानेच संस्कृतचा आमचा संबंध तोडला हे नक्की! Sad

झाट काही माहिती नव्हते

पोर्ण बॅण केलेले हाय याची णोंद घ्यावी!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

हम्म ती सूत्रे. अइउण्ऋलृक् वगैरे...

बाकी संस्कृतचा विषय निघाल्याने शष्प हा शब्द जास्त योग्य ठरेल हे विसरूनच गेलो होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं