मराठी हस्तलिखित केंद्र (संचालक श्री.वा.ल.मंजुळ) ह्यांच्या हस्तलिखित संग्रहातील प्रतींच्या नकला (सरोगेट कॉपीज)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

जरा एलॅबोरेट करा ना. एका लिंकवरुन काय कळणार कप्पाळ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो लिंक उघडून तरी बघा. जुन्या ग्रंथांची हस्तलिखिते स्क्यान करून अपलोडवलेली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाहीलं मी उघडून. लिस्ट पाहीली. पण धागाकर्त्याने काहीही एकही शब्दाने नक्की काय आहे, मांडू नये याचे तुम्ही समर्थन करताय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी मागे कधीतरी याचा दुवा दिला होता - अप्रतिम संग्रह आहे! फेल्डहाउस बाईंचे आणि मंजुळसरांचे किती आभार मानावेत तितके कमीच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता साइट उघडली नाही,उद्या बघु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलेला दुवा उघडून पाहिला पण नुसत्या सुचीवरून अधिक काही बोध होत नाही. तसेच एकही प्रत उघडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडया अधिक स्पष्टीकरणाची धागाकर्त्याकडून अपेक्षा आहे.

ह्या यादीचा आम्ही कसा उपयोग करू शकतो? ह्यातील कोरडी माहिती दिसत आहे पण त्यापलीकडे जाता येत नाही. हस्तलिखितांच्या स्कॅन केलेल्या प्रती पाहता येतील अशा अपेक्षेने View digital version येथे क्लिक केले पण webpage not available असा कोरडा जबाब आला.

(वा.ल.मंजूळ आणि मी एकाच वेळी कॉलेजात होतो आणि तेव्हा त्यांचा आणि माझा अल्पपरिचय होता. नंतर व्यवसायभिन्नतेमुळे तो राहिला नाही इतकी वैयक्तिक माहिती नोंदवतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखकाने जरी स्पष्टीकरण दिले नसले तरी दुवे स्वतः बोलताहेत. व्यंकटेश स्त्रोत्राचा दुवा उघडून पाहिला. हस्ताक्षर एक नंबरच. मात्र लिखाणातली शब्दजोड व शब्दतोड आजच्या व्याकरण नियमांपेक्षा वेगळी दिसतेय. तसेच वेलांटीचे नियम देखील वेगळे दिसताहेत. जुन्या काळची हिंदी बघीतली पाहिजे. काही साम्य आढळते काय याचा अभ्यास करणे रोचक ठरु शकते. शिवाय कोल्हटकर, राही किंवा बॅटमनसारख्यांनी आयते ताटात आणून वाढले तर जास्तच बरे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय आत्ता उघडून पाहीले. पैकी ज्ञानेश्वरी (#३७८) वाचता आली. बाकीच्यांची लिपी किंचित वेगळी आहे. रामेश्वरमहात्म्य देखील वाचता येते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यंकटेशस्तोत्रावरून आठवले - मराठीतील कमीत कमी चार सुप्रसिद्ध वचने, जी आपण सरसहा वापरतो, त्यांचा उगम व्यंकटेशस्तोत्रात आहे.

पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद - श्लोक १३.
उडदामाजी काळेगोरे, काय निवडावे निवडणारें - श्लोक १४
समर्थाघरचे श्वान - श्लोक १७
अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा - श्लोक २२.

हे स्तोत्र 'देवीदास' नावाच्या कोणी हे केले आहे असा उल्लेख स्तोत्रामध्येच आहे. हा देवीदास कोण, तो केव्हा होऊन गेला, हे स्तोत्र किती साली निर्माण झाले अशी काही माहिती कोठे उपलब्ध आहे काय? हे एकच स्तोत्र नव्हे, मराठी-संस्कृत मिळून काही शे स्तोत्रे लोकांच्या नित्य पठनात असतात. त्यांच्या इतिहासाबद्दल कोठे काही संशोधन केले गेले आहे काय असे जाणून घ्यायला आवडेल.

(माझ्या आईच्या तोंडामध्ये व्यंकटेशस्तोत्र नेहमी असे. तिचे ऐकून माझेहि हे स्तोत्र जवळजवळ मुखोद्गत झाले होते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संग्रहातील 'केकावलि' माझ्या चांगली परिचयाची आहे म्हणून ती लिंक उघडली. तेथे एकूण १७ पानांची चित्रे आहेत. त्यापैकी पान १ संग्रहातील नोंदीचे आहे आणि २ ते १६ मध्ये केकावलीची १५ पानांची चित्रे आहेत. त्यांना क्र.१ ते १५ असे क्रमांक देऊन ती नीट निरखून पाहता खालील गोष्टी जाणवल्या.

१) ही पाने हस्तलिखित नसून जुन्या शिळाप्रेसवर छापलेली असावीत. क्र.१ वर '(२४७) केकावलि (मोरोपंत) असे कोणाच्यातरी हस्ताक्षरामध्ये आहे. क्र.२ वर 'नवनीतातील पृ. ३५३ यातील मयूरकविकृत केकावली सान्वयार्थ' असा उल्लेख आहे. ह्यावरून असे वाटते की ही १५ पाने नवनीताच्या कोणत्यातरी आवृत्तीतील असावीत. १८५४ पासून नवनीत छापत आले आहे आणि प्रारंभीच्या आवृत्त्य शिळाप्रेसच्या असाव्यात.
२) ह्या १५ पानांमध्ये पूर्ण केकावलि मावणे शक्य नाही. येथे आपल्यापुढे श्लोक क्र. १ पासून ३० पर्यंत अशा ३० श्लोकांतील मधलेमधले वगळून काही श्लोक आहेत. त्यांचे टाकलेले क्रमांक नीट दिसत नाहीत पण माझ्याजवळील प्रतीशी ताडून पाहता पुढील मजकूर आढळला.
क्र.१ (श्लो. १), क्र.२ (श्लो. ३), क्र.३ (श्लो. ३), क्र.४ (श्लो. ४ केवळ अर्थ), क्र.५ (श्लो. १० केवळ अर्थ), क्र.६ (श्लो. १७), क्र.७ (श्लो. १७ अर्थ, श्लो.२०), क्र.८ (श्लो. २० अर्थ), क्र.९ (श्लो. २१ अर्थ), क्र.१० (श्लो. २३ अर्थ), क्र.११ (श्लो. २७ अर्थ), क्र.१२ (श्लो. २८), क्र.१३ (श्लो. २९ अर्थ, श्लो.३० अन्वय), क्र.१४ (श्लो. ३० अर्थ, श्लो.३१ अन्वय). क्र.१५ म्हणजे क्र.१४ दुसरा स्कॅन आहे.

संग्रह करण्याचा प्रयत्न प्रशंसापात्र आहेच. पण ह्या 'केकावलि'च्या संग्रहामध्ये जुन्या छापील पुस्तकाची काही विस्कळित पानेच दिसतात.

(लिहिण्याचा मोह आवरत नाही म्हणून थोडे वैयक्तिक म्हणता येईल असे अवान्तर. मला जवळजवळ सर्व केकावलि मुखोद्गत आहे. त्याचे कारण म्हणजे माझ्या आजोबांनी मी ५व्या इयत्तेत असता एक केकावलीचे पुस्तक मला दिले आणि अक्षर सुधारण्यासाठी मला जमेल तसे एक एक श्लोक, त्याच्या अवघड शब्दांचे अर्थ, अन्वय आणि सरळ अर्थ असे लिहून काढायला सांगितले. तदनंतर एकदीड वर्षे हे करून मी पूर्ण केकावलि वहीत उतरवली. ती वही आता जीर्णावस्थेत ६५ वर्षे माझ्यापाशी आहे. तिचे हे पहिले पान पहा.

Kekaavali 1

ह्यातील पहिल्या श्लोकाच्या पहिल्या दोन ओळी आजोबांच्या हातच्या आहेत. त्यांना वृद्ध वयात कंपवात होता हे लिहिण्यातून जाणवत आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0