देशभक्ती आणि स्वार्थत्याग
नुकताच एक 1930 साली बनलेला पहिल्या महायुद्धावरील चित्रपट All Quiet on the Western Front पाहिला . युद्ध सुरू असताना तरुणांना देशभक्तीने प्रेरित करून लष्करात भरती करण्यासाठी जर्मन सरकार प्रयत्नशील असते. अशाच एका प्रोफेसरच्या देशभक्तीपर प्रेरणादायक भाषणाने भारावून गेलेले काही कॉलेज-युवकांची एक बॅच सैन्यात भरती होते , परंतु लवकरच त्यांचा भ्रमनिरास होतो कारण प्रत्यक्षात युद्धभूमीवर चित्र निराळे असते . अपुरे अन्नपाणी व तुटपुंजा शस्त्रपुरवठा आणि खडतर प्रवास .त्यात शत्रू अधिक बलवान आणि शस्त्रसंपन्न. त्यामुळे या बॅच मधील बहुतेक जण मृत्यूमुखी पडतात . शेवटी पॉल नावाचा एक सैनिक सुट्टी घेवून घरी येतो ,पण घरीदेखील आशादायक परिस्थिती नसते ! अन्नतुटवडा आणि इतर अडचणी शहरात देखील असतात .पण प्रत्यक्ष युद्धभूमीवरील परिस्थितीची जरादेखील कल्पना नसलेले नागरिक आता जर्मनी फ्रान्सचा लवकरच पराभव करून पॅरिस वर जर्मन झेंडा फडकावील आशा भ्रमात असतात . नाइलाजाने पॉल सुट्टी लवकर संपवून युद्धभूमीवर परत जातो आणि शेवटी शहीद होतो ! देशभक्ती व इतर गोष्टी या कागदावरच्या गप्पा ठरतात ,प्रत्यक्षात फक्त मृत्यू हा एकच त्या अभागी सैनिकांच्या सुटकेचा उपाय बनून राहतो ...अशी काहीशी कथा आहे .....
चित्रपट पाहिल्यावर् मनात काही विचार आले, एक तर ही 100 वर्षापूर्वीची कथा आहे. आज परिस्थिती फार निराळी आहे. आज प्रत्येक देशाकडे किंबहूना भारताकडे समर्थ व पुरेशा संख्याबलाचे सैन्य आहे. पण न जाणो कधी अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, व सरकारने युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले ,तर किती तरुण त्यासाठी तयार होतील? आज भौतिक सुख-साधने व ऐशोआराम यात गुंग झालेल्या म्हणा अथवा रोजगाराची अधिक साधने उपलब्ध झाल्याने म्हणा ,वैयक्तिक स्वार्थाला अधिक प्रेफरन्स देण्याची वृत्ती वाढीस लागल्याचे जाणवते. अशा परिस्थितीत देशावर संकट कोसळले म्हणून देशभक्तीने प्रेरित होवून अथवा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून किती लोक लष्करात जायला तयार होतील ? यात सध्या कोणतातरी अन्य रोजगार उपलब्ध असलेले /कार्यरत /नोकरदार व्यक्ती आणि बेरोजगार व्यक्ती यातील कोण किती प्रमाणात “देशासाठी” वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देण्यास तयार होतील ? असा प्रश्न पडला !
जातील सुद्धा लोक. जसे
जातील सुद्धा लोक. जसे त्यावेळच्या जर्मनांना जर्मनी फ़्रान्सचा पराभव करणार आहे असे वाटत असते तसेच आपल्या देशातल्या बहुतांशांना वाटत असते. [आपले लष्कर पाकी लष्करापेक्षा कैच्याकै ष्ट्राँग आहे वगैरे].
मशीद पाडायला स्वयंसेवकांची कमतरता भासली नव्हती. (सेम ऑन अदर साइड).
शिवाय "अंतिम विजय आपलाच आहे" हे एक heady विधान व्हॉलंटिअरना उद्युक्त करते.
आपले लष्कर पाकी लष्करापेक्षा
आपले लष्कर पाकी लष्करापेक्षा कैच्याकै ष्ट्राँग आहे वगैरे
आपली स्वतःची काय कल्पना आहे? भारतीय लष्कर पाकी लष्करापेक्षा अत्यंत दुर्बल आहे?
-------------------------------
You can have enemies of far lesser strength than yours. You can just kill that minuscule stuff in a shot. But problem is that the story does not end there...
However, this does not mean that you are not strong.
मला नक्की ठाऊक नाही. परंतु
मला नक्की ठाऊक नाही. परंतु मी उपलब्ध काही माहितीवरून अंदाज केले. [तुम्ही त्या इंच इंच धाग्यावेळी मिसळपाववर होता की नाही ते ठाऊक नाही].
१. १९४८ चे काश्मीर युद्ध सव्वा वर्ष चालले. त्यात आपल्या फौजांना उरलेला काश्मीर घेता आला नाही. तो सहज घेता येण्यासारखा नव्हता, दुर्गम प्रदेश होता वगैरे मान्य आहे.
२. १९६२ चे युद्ध सोडून देऊ (कारण ते चीन विरोधातले युद्ध होते)
३. १९६५ चे युद्ध आपण जिंकले असे आपण समजत असलो तरी स्टेलमेट झाला असे बाहेरचे लोक म्हणतात.
४. १९७१ चे युद्ध आपण जिंकले हे निर्विवाद
५. १९९९ चे कारगिल युद्ध (म्हणजे घुसखोरांना हाकलणे हेसुद्धा बराच काळ चालले. पण सध्या तेही बाजूस ठेवू).
६. संसदेवर हल्ला झाल्यावर "अब आर या पार की लडाई होगी" असे पंतप्रधान म्हणाले आणि फौजा सीमेवर नेण्यात आल्या. परंतु शेवटी युद्ध न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
७. नव्या ष्ट्राँग सरकारच्या कारकीर्दीत पाकिस्तानच्या कुरापती चालूच आहेत आणि अजूनतरी "जोरदार उलट गोळीबार" इतपतच प्रतिक्रिया भारताकडून दिली जात आहे. एका शिराच्या बदल्यात दहा शिरे वगैरे आलेली दिसत नाहीत.
त्यामुळे आपले सैन्य पाकिस्तानपेक्षा भलतेच ष्ट्राँग आहे असे म्हणायला काही कारण दिसत नाही.
------------------------------------
>>आपली स्वतःची काय कल्पना आहे? भारतीय लष्कर पाकी लष्करापेक्षा अत्यंत दुर्बल आहे?
हा अगदीच बालीश प्रकारचा प्रश्न आहे. कैच्या कै बलवान नाही याचा अर्थ कै च्या कै दुर्बल आहे असा होत नाही. पाकी लष्करापेक्षा बलवान असले तरी किती प्रमाणात बलवान असेल तर नक्की पाडाव करता येईल याचे (लष्कर + आधीचे व आताचे सरकार यांचे) काही आडाखे असतील त्यावरून युद्ध करायचे की नाही याचे निर्णय घेतले जात असतील. छातीचा आकार दाखवण्यासाठी आपली सरकारे (इन्क्लुडिंग मोदी सरकार) युद्धे करत नाहीत ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे.
------------------------------------
आपल्या आजवरच्या सरकारांनी लष्कराला बलवान होऊच दिले नाही. त्यांना हवी असलेली इक्विपमेंट दिलीच नाहीत अशी आर्ग्युमेंटे असतील तर ती वेगळी आहेत. त्याची चर्चा वेगळी होऊ शकते.
मशीद पाडायला स्वयंसेवकांची
मशीद पाडायला स्वयंसेवकांची कमतरता भासली नव्हती. (सेम ऑन अदर साइड).
मशीदीचा इतिहास काय आहे ते माहित असून, त्याकाळी हिंदू या शब्दाचं पोलिटिकल पोटेंशिअल पुढे आलं नसल्यानं, खर्याला खरं न म्हणणार्या धर्मनिरपेक्ष बांडगुळांची कमतरता देखिल भासली नव्हती.
वास्तविक जनतेची धार्मिक आणि सांस्कृतिक अस्मिता आणि तिच्या संबंधित आवश्यक असणारा न्याय हा आपल्या हस्तिदंती मनोर्यातल्या अधार्मिक, निधर्मी, धर्मनिरपेक्ष आणि नास्तिक विचारसरणीमुळे डावलणार्या मंडळीची १९९२-१९४७ इतकी वर्षे सतत सत्ता करायला देखिल कमतरता भासली नव्हती.
==============================================================================================================
अस्मितेला स्पर्श करणार्या कोणत्याही कारणासाठी स्वयंसेवकांची कमतरता पडत नाही.
===========================================================================================================
सामान्य जणासमोर पर्याय उरतात ते असे-
१. आपली बाजू ओळखणे नि तिच्या बाजूने लढणे, समर्थन करणे, इ.
२. योग्य ती बाजू ओळखणे नि तिच्या बाजूने लढणे, समर्थन करणे, इ.
३. गप्प बसणे आणि लढाईचे आपल्यावर परिणाम न करून घेण्याचे प्रयत्न करणे.
४. परिस्थितीचा व्यक्तिगत लाभासाठी फायदा उठवणे.
कोणी कोणता का पर्याय अवलंबिला असेना, त्याचे स्वतःचे मते त्याने पर्याय क्रमांक २ निवडलेला असतो. परंतु सत्य, नैतिकता आणि न्याय यांचं आकलन करून योग्य तो पर्याय निवडण्यासाठी मानसिक, बौद्धिक ताकत लागते. Everything else is what is fashion in one's circle.
देशभक्ती आणि स्वार्थत्याग
देशभक्ती आणि स्वार्थत्याग हे शब्द फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीसाठी राखीव आहेत. इतर दिवशी त्यांचा उच्च्चार करण्याचे कारणच काय ? युद्ध जिंकायचे असल्यास एसएमएस स्पर्धा घ्यावी किंवा फेसबुकच्या 'वुई लव्ह इंडीया' पेजेसला जास्तीत जास्त लाईक्स द्यावात. देशभक्तीपर मेसेज व्हॉटअपवर फॉरवर्ड करावेत, वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवर तज्ञांच्या कंठाळी चर्चा आयोजीत कराव्यात. लैच खाज असेल तर शत्रुराष्ट्राच्या शासनाची संकेतस्थळे हॅक करुन त्यावर आपला राष्ट्रध्वज फडकावावा. प्रत्यक्ष लढाई कशाला करायची ?
प्रश्न
अशा परिस्थितीत देशावर संकट कोसळले म्हणून देशभक्तीने प्रेरित होवून अथवा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून किती लोक लष्करात जायला तयार होतील ? यात सध्या कोणतातरी अन्य रोजगार उपलब्ध असलेले /कार्यरत /नोकरदार व्यक्ती आणि बेरोजगार व्यक्ती यातील कोण किती प्रमाणात “देशासाठी” वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देण्यास तयार होतील ? असा प्रश्न पडला !
असा (हा नव्हे) प्रश्न मला देखिल पडलेला.
१. आदर्शतः देश हे फक्त (काय, कधी, कुठे, कसे, इ इ) करावे यांचेबद्दल समान मते असणार्या लोकांचा (जागांचा नव्हे) चंचल समूह असावा.
२. आदर्शतः देशांत वैमनस्य नसावे, युद्धे होऊ नयेत.
३. वास्तवात सर्वसाधारणपणे अगदी कोणत्याही देशातल्या सामान्य जनतेचे अगदी शत्रू देशातील सामान्य लोकांबद्दल वैमनस्याचे मत नसते. अज्ञात लोकांत वैर नसते. जास्तीत जास्त वैरी जवळचे असतात असे म्हणता यावे. (तुमच्या जीवनातल्या टॉप १० नावडत्या लोकांच्या यादीत बरीच नावे भारतीय असण्याचा संभव अधिक आहे.)
४. देशांमधले ९९%* वैर हे सहसा फक्त परस्परांच्या राजकीय आणि वाणिज्यिक सेट-अप्स यांचेतील असते. त्यांची ध्येये, इप्सिते सुनिश्चित असतात. कितीही छोटा प्रदेश आणि कितीही कमी लोक कितीही मोठ्या प्रदेशावर आणि कितीही लोकसंख्येवर राज्य करण्याची आकांक्षा बाळगून असतात. अशी आकांक्षा पूर्ण करणे आणि असे राज्य करणे हे संभव असते.
५. इथे आपल्या देशाला योग्य वा अयोग्य म्हणावं का आणि युद्धप्रयत्नात सामिल व्हावं का असे प्रश्न येतात. देश शब्दाची तीन प्रतले आहेत - सरकार; सामान्य लोक; लोकांपैकी आपण एक स्वतः (आपली बरीच मोठी ओळख नि अस्मिता आपली राष्ट्रीयता असते या अर्थाने). सरकारने सांगीतलेले युद्धाचे कारण समर्थनीय असो वा नसो, सरकार युद्धखोर असो वा नसो, युद्धात विजय होणार असो वा नसो, युद्धातील पराभवाचा सामान्य लोकांवर युद्धकाळात नि नंतर प्रचंड परिणाम होतो.
जिथे शत्रूशी लढण्याची वृत्ती आहे हे दिसते तिथे पराभवनंतर तह होतो, शत्रूला कळते कि इथे आपण राज्य करू शकत नाही. जिथे लढण्याची वृत्तीच नाही, तिथे शत्रूची निरंकुश सत्ता चालते. शत्रूसत्तांचं नेहमीच "बाह्य" असं क्लिअर आयडेंटीफिकेशन होऊन देखिल ही वृत्ती भारतीयांनी शेकडो वर्षे दाखवली नाही. अशी लढावू वृत्ती ज्या बॅनरखाली दाखवायची होती तो बरीच शतके थेट धार्मिक होता, तत्कालिन सर्वोच्च अस्मितांच्या खूप जवळचा. त्यामानाने आजचा भारतीयतेचा बॅनर सामान्य लोकांसाठी एक सोय आहे. (काही निवडक राज्ये वगळता (पंजाब, जम्मू)) सैन्यसेवा ही एक मस्त एंप्लॉयमेंट आहे. बट इव्हन दॅट अपिल, दॅट मॉडेल वर्क्स.
'देव देश अन् धर्मासाठी, प्राण
'देव देश अन् धर्मासाठी, प्राण घेतलं हाती' म्हणणारांची संख्या प्रत्येकच देशात जितकी कमी होईल तितकं चांगलंच आहे. गेल्या साठ वर्षांत 'देशासाठी शहीद व्हा' टाइप आवाहनंही कमी झाली आहेत. युद्धाचं ग्लोरिफिकेशन होण्याऐवजी त्यांत होणाऱ्या मानवी खर्चाविषयीची कळवळ वाढलेली आहे. हे असंच चालू राहून युद्धं जेव्हा पूर्णपणे नाहीशीच होतील तो सुदिन.
'देशभक्ती' वगैरे गोष्टी जरा मागेच पडून लोक जास्त आत्मकेंद्री होत आहेत ही अतिशय उत्तम गोष्ट आहे.
जरूर. पण असे प्रयत्न फारसे
जरूर. पण असे प्रयत्न फारसे यशस्वी झालेले नाहीत हे लक्षात घ्या. :)
युद्धांच्या व्याख्येत
युद्धांच्या व्याख्येत दहशतवादी हल्ले बसत नाहीत का ? अनेक देश असे आहेत की जे दहशतवाद हे तंत्र युद्धाचा सब्स्टिट्युट म्हणून वापरतात.
पुनश्च - हे केवळ एक निट पिकिंग आहे. कारण तुमच्या मूळ मुद्द्याशी मी एकदम सहमत आहे. (उगीचच खुसपटातला मुद्दा उपस्थित करून मी फार इन्साईटफुल बोल्तोय असा आव आणत नैय्ये.)
बसतील की. पण दहशतवाद्यांनी
बसतील की. पण दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मेलेल्यांची संख्या सर्वसाधारण युद्धांच्या तुलनेत नगण्य आहेत. इथे एकविसाव्या शतकातल्या युद्धांची आणि अॅट्रोसिटींची यादी आहे. त्यातल्या महत्त्वांच्या युद्धांत दोन दोन लाख माणसं मेलेली आहेत. सगळी बेरीज सुमारे एक मिलियन येते. दहशतवादी हल्ल्यांमध्ये मेलेल्यांची संख्या काही हजारात येईल.
एकविसाव्या शतकाच्या पंधरा वर्षात जितके लोक गेले त्याच्या तिप्पट लोक १९५० ते १९५३ या काळात एकट्या कोरिअन युद्धात मारले गेले. म्हणजे पंधरापट तर सरळ मृत्यूच जास्त झाले. त्यात त्याकाळी लोकसंख्या एक तृतीयांश होती हे लक्षात घेतलं तर दर दहा हजार लोकांमागे सुमारे पंचेचाळीसपट लोक मेले. मूळ मुद्दा असा आहे की एकविसाव्या शतकाचा कालखंड हा १९५०-१९५५ सालच्या कालखंडापेक्षा खूपच युद्धविरहित आहे.
एकविसाव्या शतकाच्या पंधरा
एकविसाव्या शतकाच्या पंधरा वर्षात जितके लोक गेले त्याच्या तिप्पट लोक १९५० ते १९५३ या काळात एकट्या कोरिअन युद्धात मारले गेले.
ईश्वर करो असे न होओ...पण...
पण एकविसावे शतक अजून जायचे आहे...
आणि तिथले कदाचित तीन वर्षे नव्हे तर मोजून फक्त तीन तास अख्ख्या विसाव्या शतकाच्या तीन पट जीव घेऊ शकतात...
=========================================
जगात शस्त्रांचा अवाढव्य व्यापार चालत असतो. युद्धच नाही झाले तर तो बंद होईल. तो चालूच राहावा याकरिता खरोखरीची युद्धे व्हावीत अशी मनीषा असणारे लोक आणि देश आहेत.
चीफ फायनान्शियल ऑफिसर -
चीफ फायनान्शियल ऑफिसर - कंपनीचा सेल एवढा कमी कसा काय झाला?
डायरेक्टर ऑफ सेल्स - सर, सेल्स वाढलेले आहेत.
चीफ फायनान्शियल ऑफिसर - (अविश्वासाने) खरंच?
डायरेक्टर ऑफ सेल्स - सर, आपण गेल्या वर्षी कार्स विकायचो. आणि आता लहान मुलांच्या ट्रायसिकल्स विकायला लागलो आहोत. त्यामुळे संख्या बघितली तर सेल्स जवळपास तितकाच आहे.
चीफ फायनान्शियल ऑफिसर - पण या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं आहे, गेल्या वर्षी पाचशे कोटींचा धंदा झाला. यावर्षी फक्त दहा कोटी. याला तुम्ही सेल्स वाढले म्हणता?
डायरेक्टर ऑफ सेल्स - अर्थात सर. शेवटी गाडीची व्याख्या काय सांगा? ज्यात बसून पुढे जाता येतं असं यंत्र. या व्याख्येनुसार तुमच्या हातात जो रिपोर्ट आहे, त्यातच आहे की एकंदरीत विकली गेलेली युनिट्स तेवढीच आहेत. व्याख्या महत्त्वाची आहे सर. नाहीतर आपण संवाद साधणारच कसा?
चीफ फायनान्शियल ऑफिसर - (निःशब्द, अवाक् वगैरे होऊन कपाळाला हात लावतो)
-----
थोडक्यात, युद्धाची व्याख्या तुम्ही हवी तशी करून युद्धं शंभरपट झाली आहेत हे सिद्ध करून दाखवा. कदाचित नवराबायकोच्या भांडणालाही युद्ध म्हणून नाव द्या. शहीद होणाऱ्या लोकांचं प्रमाण कित्येक पटींनी घटलं आहे तोपर्यंत काही फरक पडत नाही. बॉटमलाईन पाहा हो.
विदा कसा प्रेझेंट करावा याचं
विदा कसा प्रेझेंट करावा याचं हे आदर्श उदाहरण आहे.
उदा. काश्मिरमधे १९८२-८४ प्॑र्यंत दहशतवाद नव्हता. १९४७ च्या भारत पाक युद्धात प्रत्येक जान ते डिसे या कॅलेंडर वर्षांत १००० लोक मेले (एकूण दोन्ही बाजूचे अंदाजे २०००) ही नोंद १९४७ साठी या आलेखात आहे.
आता इथला टेबल पाहा.
http://www.satp.org/satporgtp/countries/india/states/jandk/data_sheets/…
इथल्या १९८८ ते २०१५ पर्यंतच्या ४३,००० मृत्यूंची नोंद आलेखात नाही. कारगिल युद्धाची देखिल नाही!!!! कारण? मेथडॉलॉजी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अस्मिताजन्य मृत्यूभयहिनता १९४७ ते १९८८ =२०००, १९८८ ते २०१५ = ४३०००!
त्याहून वाईट अवस्था ईशान्य भारताची आहे.
नक्षलवादाला प्रणव, चिदंबरम यांनी व्यवस्थित हँडल केले नाहीतर तीच अवस्था लालपट्ट्याची असती.
==============================================================================
मेथडॉलोजी बदलल्यानं जगाचं वास्तव बदलत नाही. लोकांच्या अस्मिता भयंकर संवेदनशील आणि तीव्र झाल्या आहेत.
दुसर्या महायुद्धानंतर कोल्ड वॉर संपेपर्यंत युद्धांची संख्या वाढत गेली आहे आणि आकार कमी होत गेला आहे. आता आकार इतका कमी झाला आहे कि तो युद्ध या संज्ञेच्या रडारबाहेर जातो.
http://ourworldindata.org/data/war-peace/war-and-peace-after-1945/
====================================================================================================
तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता नाही म्हणता का? ते झालं तर वरचा ग्राफ टॉप्सी टर्वी होऊन जाईल. देश ज्या गतीनं युद्धसज्ज होत आहेत ते पाहता स्थिर वाटणार ट्रस कधी क्रंबल होईल सांगता येत नाही.
१९६० आणि २०१५ मधला वरचा ट्रेंड देखिल स्टीडी लिनिअर डाउनवार्ड ट्रेंड आहे खरा - पण हा या मार्केटचा टेक्निकल अनालिसिस झाला. फंडामेंटल अनालिसिस करणं देखिल आवश्यक आहे.
१९४० ते १९६० = युद्ध हे एक लष्कर दुसर्या लष्करासोबत करणार.
१९६० ते २००० = पहिले लष्कर दुसर्या देशाचे सिविलियन आणि वाईस वर्सा (कोल्ड वार)
२००० ते २०१५ = अतिरेकी विरुद्ध सिविलियन
एकविसाव्या शतकात योग्य
एकविसाव्या शतकात योग्य मेथडॉलॉजी वापरून किती लोक मेले असावेत याचा तुमचा अंदाज सांगा. आता त्याची १९५० ते १९५३ मध्ये फक्त तीन वर्षांत तीस लाख लोक मेले हे लक्षात घ्या. आणि हिशोब करून त्यावेळपेक्षा किती जास्त प्रमाणात लोक मरतात ते दाखवून द्या.
फंडामेंटल अनालिसिस करणं देखिल आवश्यक आहे.
स्टीव्हन पिंकरने त्याच्या पुस्तकात केला आहे.
'देव देश अन् धर्मासाठी, प्राण घेतलं हाती'
गुर्जींना खरेतर ' देव आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती' असचं म्हणायचं असणार पण मग अजो नाहीतर बॅटमन लगेच तलवारी पाजळत येणार अशी मनोमन भीती वाटल्यामुळे मुळ रचनाकाराने (शांता शेळके) यांनी दोन शब्दांबरोबर देशाचेही नाव घेतले आहे असे पाहून त्यांचा जीव नक्कीच भांड्यात पडला असणार. :)
तसं नाही. देव आणि धर्मापेक्षा
तसं नाही. देव आणि धर्मापेक्षा त्याग करण्याच्या दृष्टीने देश ही बरीच चांगली कल्पना आहे. मात्र असे त्याग करणं, शहीद होणं वगैरेंची गरज पडण्यापेक्षा जर व्यवस्था बऱ्यापैकी चांगली चालत असेल तर प्रत्येकाने आपापलं काम चोख केलं तर त्यातून सगळ्यांचंच भलं होऊ शकतं. शेवटी भगवान श्रीकृष्णांनीच सांगितलेलं आहे - आपलं कर्म करत राहा...
मात्र असे त्याग करणं, शहीद
मात्र असे त्याग करणं, शहीद होणं वगैरेंची गरज पडण्यापेक्षा जर व्यवस्था बऱ्यापैकी चांगली चालत असेल तर प्रत्येकाने आपापलं काम चोख केलं तर त्यातून सगळ्यांचंच भलं होऊ शकतं.
त्याग मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येकजण आपले काम चोखपणे करतो तेव्हा तो आपल्या सेवेचे वा उत्पादाचे जे मूल्य मानतो ते आणि बाजारात त्या सेवेला वा उत्पादाला असलेला भाव यांच्या बरीच तफावत नेहमीच असते. तरीही माणूस ते ट्रँझॅक्शन करतो, त्याला करावे लागते. इथे तुमचा तोटा झाला तर तो तुमचा त्यागच असतो, तुम्ही त्याला त्याग शब्द वापरा वा नको. तुमचा फायदा झाला तर तो समोरच्याचा त्याग असतो.
Jingoiism
वरील धागा 'जिंकू किंवा मरू', 'My Country, Right or Wrong', 'तेथे कर माझे जुळती' 'Into the valley of Death, Rode the six hundred', 'वेडात दौडले वीर मराठे सात', 'Britannia, rule the waves: Britons never will be slaves' अशा प्रकाराची स्फूर्तिदायक वळणे घेत मारुतीच्या शेपटापरमाणे लांबत जाणार हे अनुभवी मंडळींना उघड दिसत आहे. मी इतकीच अवान्तर माहिती देऊन गप्प बसतो की Jingoiism हा नवा इंग्रजी शब्द १८५०च्या दशकातील रशियाविरुद्धच्या क्रिमिअन युद्धाच्या वेळी लिहिण्यात आलेल्या पुढील गीतावरून प्रचारात आला आहे.
"The Dogs of War" are loose and the rugged Russian Bear,
Full bent on blood and robbery, has crawl'd out of his lair;
It seems a thrashing now and then, will never help to tame
That brute, and so he's out upon the "same old game."
The Lion did his best to find him some excuse
To crawl back to his den again, all efforts were no use;
He hunger'd for his victim, he's pleased when blood is shed,
But let us hope his crimes may all recoil on his own head.
CHORUS:
We don't want to fight but by jingo if we do,
We've got the ships, we've got the men, and got the money too!
We've fought the Bear before and while we're Britons true
The Russians shall not have Constantinople.
The misdeeds of the Turks have been "spouted" thro' all lands,
But how about the Russians, can they show spotless hands?
They slaughtered well at Khiva, in Siberia icy cold,
How many subjects done to death will never perhaps be told,
They butchered the Circassians, man, woman, yes and child,
With cruelties their Generals their murderous hours beguiled,
And poor unhappy Poland their cruel yoke must bear,
Whilst prayers for "Freedom and Revenge" go up into the air.
(CHORUS)
May he who 'gan the quarrel soon have to bite the dust,
The Turk should be thrice armed for "he hath his quarrel just,"
'Tis sad that countless thousands should die thro' cruel war,
But let us hope most fervently ere long it will be o'er;
Let them be warned, Old England is brave Old England still,
We've proved our might, we've claimed our right, and ever, ever will,
Should we have to draw the sword our way to victory we'll forge,
With the battle cry of Britons, "Old England and Saint George!"
(CHORUS)
ह्याच प्रश्नाची उलटी बाजू दाखविणारी ही गोष्ट सध्या अमेरिकेत जोरात चर्चेत आहे. (Trump Says He Heroically Avoided Capture in Vietnam by Staying in U.S.)
दोन माणसांमधली माहीतीची तफावत
दोन माणसांमधली माहीतीची तफावत ही संधी असते. द्रोणाचार्यां सारखे आचार्य गुरुदक्षिणा मिळवतात त्यातून. व क्लास काढणारे बक्कळ कमवतात. कृतीची अपेक्षा व क्षमता/वृत्ती यात तफावत असेल तर कृति ज्याच्याकडून अपेक्षित आहे त्याच्या वतीने ती करणारे पैदा होतात. बक्कळ कमवतात सुद्धा.
जार्गन मंजे सर्वसाधारणपणे
जार्गन मंजे सर्वसाधारणपणे एकत्र ठेवल्यास ज्या शब्दांना काहीही अर्थ नसतो त्यांना एक अर्थ देऊन त्या फ्रेजची हूल उठवणे आणि स्वतःचा शहाणपणा दाखवणे.
उदा. दोन पक्षांना एकमेकांची गरज असते पण माहिती नसते. त्यांना एकमेकांची माहिती देणे किंवा एकाचा माल घेऊन दुसर्याला विकणे. याला दलाली हा शब्द आहेच. दलालीच्या पार्श्वभूमीला इंफॉर्मेशन असेमिट्री म्हणायचे.
पुन्हा एकदा
दोन माणसांमधली माहीतीची तफावत ही संधी असते. द्रोणाचार्यां सारखे आचार्य गुरुदक्षिणा मिळवतात त्यातून. व क्लास काढणारे बक्कळ कमवतात. कृतीची अपेक्षा व क्षमता/वृत्ती यात तफावत असेल तर कृति ज्याच्याकडून अपेक्षित आहे त्याच्या वतीने ती करणारे पैदा होतात. बक्कळ कमवतात सुद्धा.
नाय समजलं. पुन्हा एकदा सांगा!
-वासूअण्णा
“देशासाठी” वैयक्तिक
“देशासाठी” वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देण्यास तयार न होणारे जास्तीतजास्त लोक असावेत. यातले लढण्याचे मॅक्झिमम काम मशिन्स कडे संक्रमित केले जावे. मॅक्झिमम म्हंजे संपूर्ण नव्हे.
-----
मुद्द्याला एक सिरियस अँगल आहे. व तो समजून घेण्यासाठी हा दुवा वाचा.