अधिक महिना व जावया साठी वाण

अधिक महिना होता..
सावित्री बाईंची लगबग चालू होती..
जावई केशव व मुलगी सुनंदा प्रथमच परगावा हून धोंड्या च्या महिन्या निमित्त सासुरवाडीला येणार होते..
जावई केशव तसा साधा भोळा माणूस असतो..लग्ना नंतर प्रथमच तो सासुरवाडीला येणार असतो..
आपला मुलगा प्रथमच सासुरवाडीला जात असल्याने केशवच्या आई वडिलांनी सासुरवाडीला कसे वागावे याचे सल्ले दिलेले होते..
मोजकेच बोलावे.. मोजकेच खावे..एखादा पदार्थ आवडला तरी हावरटासारखा मागून नये इत्यादी टिपा केशवला दिल्या असतात..
सासरे मालदार असतात बागायती शेती असते..चौसोपी वाडा असतो..
.
सायंकाळच्या सुमारास केशव व कन्येचे आगमन होते ..
सा.बु. व सा.बा..जावयाचे आगतम स्वागतम करतात..
हात पाय धुतल्यावर केशव सास~या शी गप्पा मारत असतो व जेवण तयार असल्याची वर्दी येते..
सासू बाईनी भरली वांगी..घडीच्या पोळ्या चटणी कोशिंबीर असा बेत केलेला असतो..
जेवण सुरू होते अन सासरा पत्नीस म्हणतो अग काही गोड धोड नाही केले?
यावर सासू म्हणते उद्या पुरणावरणाचा बेत आहे..म्हणून आज साधेच केले..त्यावर सासरा म्हणतो..असो निदान काकवी तरी वाढा सा~याना...
हे ऐकताच सासूने रामू गड्यास हाक मारते व त्याला लाकडी घोडा घेऊन यायला सांगते
काकवी माठात शिंकाळ्या वर ठेवलेली असते .. रामू माठ खाली काढतो सासूबाई काकवी काढून घेतात व मडके तो परत आढ्याला टांगतो व रमू घोडा घेऊन जातो..
सासूबाई वाटीत काकवी काढतात त्यात ४ केशराच्या काड्या मिसळतात व वाटी जावई व पतीस देतात..
जेवणाचा बेत झकासच असतो... केशवाने प्रथमच काकवी खाल्लेली असते त्या ला ति खूपं आवडते..४ घासातच काकवी संपते..व त्याला ति परत मागावीशी वाटते पण आईचा सल्ला आठवतो अन आपण हावरटा सारखा वागतो असे सासुरवाडी च्या लोकांना वाटेल या भीतीने तो मनास आवर घालतो....
.
रात्री गप्पा झाल्यावर झोपायची वेळ होते..हवेत उष्मा असल्याने मुलगी आई व बाबा ओसरी वरच पथारी मांडतात मात्र जावया साठी माडीवरील खोलीत सोय केली असते..
.
केशव वर झोपायला जातो मात्र त्याच्या जिभेवर काकवीची चव रेंगाळत असते..व त्याला काकवी खाण्याची इच्छा होते..
रात्र झालेली असते सारे जण झोपी गेलेले पाहून केशव दबक्या पाउलाने माडी वरुन स्वयंपाक गृहात येतो..
.
आत आल्यावर त्याची नजर त्या उंच टांगलेलेल्या काकवीच्या माठावर जाते...
खाली कसा काढावा या विचारात असतानाच त्याची नजर कोप~यातल्या काठीवर जाते..
काय करावे न कळल्याने तो विचार करतो की काठी ने मडक्याला छिद्र पाडावे अन व काकवीचा आस्वाद घ्यावा व तो तसे करायला आतो पण मडके कच्चे असल्याने फुटते व सारी काकवी अंगावर सांडते...
करायला गेलो एक अशी अवस्था केशवाची होती काकवीने तो नखशिकांत भिजला असतो..
.
अंग साफ करावे म्हणून अंगणात बाजूला कोठीची खोली असते तिथे जातो..
सासरे बुवांनी कपाशीची वेचणी केलेली असते ते कापसाचे ढीग खोलीत असतात..
खोलीत अंधार असतो..केशव चा पाय कशाला तरी अडखळतो अन तो जाऊन कापसाच्या ढिगावर पडतो..उठताना अंधारामुळे परत पडतो..व खोलीतील काही सामान असते ते पण कोसळते व मोठा आवाज होतो..
आवाज झाल्यावर गडी जागे होतात व कोण आहे असे म्हणू लागतात..
हे ऐकताच केशव खोलीच्या बाहेर येतो..त्याच्या अंगावर काकवी असल्याने कापूस सर्वांगाला चिकटला असतो.
व त्याचे रूप खूप मजेदार दिसत असते..
.
तो तसाच खोलीकडे जायला निघतो..पण जाताजाता त्याचा पाय सासू बाईच्या पायावर पडतो..व सासूबाई जाग्या होतात..
समोर पाहतात तर एक सर्वांगाला कापूस चिकटलेली भयाण व्यक्ती पाहिल्यावर त्या घाबरतात..व जोरात भूत..भूत असे ओरडू लागतात...
सासूबाईच्या आरडाओरड्याने वाडाजागा होतो..
गडी धावत येतात व केशवला पकडतात..
..मालक हा तर चोर आहे चोरी करायला आला आहे असे म्हणत केशव ला बडवायला सुरवात करतात..
मार पडल्यावर मात्र केशव ओरडून सांगतो की "मी चोर नाही आपला जावई केशव आहे.."
अहो जावई बापू आपले असे कसे झाले? असे सासू बाई विचारताच केशव त्यांना सारी हकिगत सांगतो..हे ऐकून सारे जण हसू लागतात..
शेवटी सासू बाई पाणी तापवून देतात केशव स्वच्छं अंघोळ करतो व खोलीत झोपायला जातो...
.
सकाळी उठल्यावर हा एक चर्चेचा विषय बनतो..
मात्र सासूबाई मनातून खूश असतात...
आपली मुलगी साक्षात म्हाळसा आहे..तिला असा साधा भोळा नवरा मिळाल्या मुळे त्या मनातून खूश असतात..
त्यांना खात्री असते जावई मुलीच्या मुठीत राहणार..
जेवण झाल्या वर सासूबाई एक ऐवजी खूश होऊन एका ऐवजी २ चांदिच्या ताटात अनारशांचे वाण देतात..
व जावयाची सन्मानाने बोळवण करतात

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लहानपणी आजीच्या तोंडून ऐकलेली गोष्ट, पुन्हा वाचायला मिळाली. मजा आली. मन:पूर्वक धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी काकवीच्या ऐवजी तोंडल्याची गोष्ट ऐकली होती.
जावईबापू संकोचाने जेवतात. रात्री बायकोबरोबर माडीवर झोपतात. मध्यरात्रीनंतर त्यांना फार भूक लागते. ते खाली स्वयंपाकघरांत येतात. खायला शोधताना धक्का लागून आवाज येतो, म्हणून सासुबाई बघायला येतात. अंधारात जावईबापू मागच्या अंगणात पळ काढून तोंडल्याच्या वेलाच्या मांडवावर चढून बसतात. सासुबाई विचार करतात, आता उठलेच आहे तर जरा उद्यासाठी तोंडली खुडून ठेवावीत. त्या रोवळी घेऊन परसदारी येतात आणि तोंडली खुडू लागतात. पण एक तोंडले खुडलेच जात नाही.
पुढे काय होते ते माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__/\__

मचाक व्हर्शन Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेतुमाधवराव पगडींच्या जीवनसेतू नामक आत्मचरित्रातही अशा काही ऐकीव अन सुरस आणि चमत्कारिक गोष्टी आहेत, उदा. एका मुलीचा बाप अतिशय प्रोटेक्टिव्ह असतो. जावई किती जरी नरमाईसे पेश झाला तरी मुलीला 'तेव्हा' इजा ही होणारच, म्हणून त्याने योग्य ठिकाणी दोर बांधलेला असतो. मुलीचा आवाज आला की दोरी खेचणे इ.इ. साठी. अखेर ती वेळ येते अन तिला कळत नाही की नवरा असा अर्धवटासारखा काय करतोय ते. तेव्हा तो काय ते सर्व दाखवतो, सासरा दाराआडून 'आता होऊन जाऊदे' म्हणतो इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सासरा दाराआडून 'आता होऊन जाऊदे' म्हणतो

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

ROFL ROFL ROFL
आता ही गोष्ट विसरेस्तो तोंडले खाणे अवघड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.