Skip to main content

विरहणी आणि वीज

उन्हाळ्यात सर्वांच्या अंगांची लाही लाही होऊ लागते, त्यात विरहाने व्याकूळ विरहणीची दशा काय झाली, कल्पनाच करणे अशक्य. १०० डिग्री सेंटीग्रेड तापलेल्या या विरहणीच्या शरीराचा काय बरा उपयोग होऊ शकतो, अशी खट्याळ कल्पना मनात आली.

विरहणीच्या डोक्स्यावारी
मी पाण्याची धार धरली
वाफेचा उसळत्या डोंबावरी
चालविला जनरेटर भारी
अशी म्या वीज वाचविली.
ज्ञानियाचा पाठीवर
भाजली होती पोळी
विरहणीच्या पाठीवर
मी *पिज्जा बेक केला.
अशी म्या वीज वाचवली.
(* युग बदलले आता पोळीच्या जागी पिज्जा)
पण कधी कधी असे ही होऊ शकते
विरहणीच्या अंगाला
मजनूने हात लावला
करंट ४४० लागला
मजनू खलास झाला.

काव्या Sat, 23/05/2015 - 21:08

=)) मि-ष्कि-ल!!!!
___
चंदनाची चोळी,
माझे अंगांग जाळी
ची आठवण आली.

विवेक पटाईत Sun, 24/05/2015 - 08:28

विरहणी म्हणजे काय?= प्रियकराच्या विरहात असलेली. विरह हा माणसाला दग्ध करतो.

'न'वी बाजू Sun, 24/05/2015 - 16:57

In reply to by विवेक पटाईत

तीस मराठीत (झालेच तर बहुधा संस्कृतातसुद्धा) 'विरहिणी' असे म्हणतात, असे वाटते. हिंदीबद्दल कल्पना नाही.

(चूभूद्याघ्या.)