वाकून नमस्कार करणे "जाचक" का वाटू लागले असावे?
शीर्षकावरुन असे वाटू शकेल कुणालाही की एकतर मी वाकून नमस्कार करण्याचे समर्थन करतोय वा वाकुन नमस्कारास जाच समजणार्यान्ची खिल्ली उडविणारे किन्वा जाचक प्रथान्ना विरोध करणारे!
पण यातले मला काहीच करायचे नाहीये.
माझ्या नजरेसमोर वेगळीच बाब येत्ये. ज्यान्ना वाकून नमस्कार करणे हा जाच वाटतो, तर तो का वाटत असावा, याची माझ्या नजरेतून (अन अर्थातच एकान्गी) कारणमिमान्सा सुरवातीस करतो. मग त्यानन्तर विषयानुरुप ज्यान्नीत्यान्नी त्यान्चि मते मान्डली तरी चालतील! असो
बर्याच ठिकाणी, लग्न मुन्ज इत्यादी कार्यक्रम, देवळात भटजीसमोर, घरच्याघरी वडीलधारे पाहुणे आले असता, हल्ली हल्ली तर टीव्हीवरील रिअॅलिटी शोमधे देखिल, अनेक "ज्युनिअर" त्यान्च्या सिनियर्सना वाकून नमस्कार करताना दिसतात.
ते तसे वाकून नमस्कार करत अस्ताना, ज्यान्ना ते तो नमस्कार करतात, त्या व्यक्तिन्चे वागणे व्यक्तिनुरुप इतके तर्हेवाईक असते की माझ्या सारख्याला वाटेल "XX मारली अन यान्ना नमस्कार केला". काय कारण असे वाटण्याचे?
तर एखाद्याने वाकून नमस्कार केल्यानन्तर, त्याचे दुनियेला ऐकु जाईल इतक्या खणखणीत आवाजात अगदी जरी नसले, तरी नमस्कार करणार्या व्यक्तिला ऐकु जाईल इतपत मोठ्याने "अभिष्टचिन्तनात्मक आशिर्वचन" उच्चारण्याची अक्कल्/कुवत ज्यान्ची नाही, त्यान्नी दुसर्यास वाकवुन नमस्कार तरी का करवुन घ्यावा? नै का?
यावर अधिक विचार करता माझ्या असेही लक्षात आले की, दुसर्यास नमस्कार करावा, उभारुन वा वाकून वगैरे शिकवले जाते, पण दुसर्याच्या नमस्काराप्रित्यर्थ, त्या बदल्यात त्या व्यक्तिचे वयानुरुप ज्येष्ठतेस धरुन कसे अभिष्टचिन्तन करावे हेच शिकवले जात नाही. येऊन जाऊन गेल्या शतकभरात लोक "थ्यान्क्यु" येवढेच शिकलेत असे केवळ वाटत नाही तर अनुभवलय!
साला मी नमस्कार केला वाकून, तर समोरील व्यक्ती म्हणते "थ्यान्क्यू"
अन मी आशिर्वाद दिला तरी तेच... थ्यान्क्यू!
आता या तर्हेला काय म्हणाव?
वाकुन नमस्कार घेताना, कुणी नुस्त कैतरी पुटपुटतं, कुणी हात उन्चावल्यासारख करत पण हात कोपरातुन मोडल्याप्रमाणे हालचाल होते, कुणाचे तिकडे लक्षच नस्ते, एकतर दुसर्याकुणाशी बोलत असतात किन्वा फोटोग्राफरकडे बघताना काही बोलायचे विसरुनच जातात, कुणी अहन्कार सुखावल्याप्रमाणे महा आढ्यतेखोरीने वाकलेल्या बकर्यान्कडे अन जमलेल्या गर्दीकडे बघत असतात.
काही निवडक सोवळे, स्वतःचेच पाय मागे ओढत नको नको करत नमस्कार घेण्याचे टाळतात.
याला अपवाद भटजी देखिल नस्तात (हे दुर्दैव).
लिम्बीचे बाबा वगळता, खणखणीत आवाजात सु:स्पष्टपणे आशिर्वाद देणारी व्यक्ती अजुनही माझ्या पहाण्यात आलेली नाही!
हे कशाचे द्योतक?
खिशातली फुटकी कवडी देखिल दुसर्यांस न देण्याची व्रुत्ती आशिर्वाद देण्यापासून परावृत्त करते?
की आशिर्वचने व ती यथायोग्य पणे देण्याची पद्धतच शिकवली जात नाही?
अर्थात मुद्दामहून शिकवणी लावुन शिकण्यासारखी ही गोष्ट नाहीच, पण एखाद्या व्यक्तीला केलेल्या नमस्काराबद्दल उत्कृष्ट आशिर्वादाचा कधी अनुभवच आलेला नसेल तर ती व्यक्ती अनुभवातुन तरी शिकणार काय? अन काहीच शिकायला, निदान आशिर्वचन ऐकायला मिळणार नसेल, तर नमस्कार करणार्यास तो "जाचच" वाटला तर विशेष ते काय?
आपल्याला काय वाटते?
(क्रुपया थोताण्डपन्थियान्नी इकडे लिहीण्याची तसदी घेऊ नये ही णम्र विणन्ती)
+१ जनरल वयाच्या ज्येष्ठतेपोटी
+१
जनरल वयाच्या ज्येष्ठतेपोटी वाकून नमस्कार करण्याच्या अपेक्षेला फाट्यावर मारणं हे ठीकच. पण काही काही अशी वयोवृद्ध माणसं भेटतात, जी मनापासून आवडतात. ेती आपल्याला आवडली आहेत, हे त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा सर्वाधिक प्रभावी मार्ग - त्यांना वाकून नमस्कार करणे हाच असतो. अशा काही आवडलेल्या माणसांना मी आवर्जून वाकून नमस्कार करते आणि त्यांच्याकडून पसंतीची दाद मिळवते. ;-)
निव्वळ वयाच्या जेष्ठतेमुळे
निव्वळ वयाच्या जेष्ठतेमुळे वाकून नमस्कार सक्तीने करायला लावण्यामुळे तसे करणे जाचक वाटते.
सामान्य लोकांना नक्की काय आदरणीय आहे, असावे हे कळायची अक्कल यायला पण बर्यापैकी अवधी लागत असावा.
---------------------------------
सर्व प्रौढांना (ज्यात बरेच अनादरणीय आले) मतदानाचा हक्क असणे आणि त्यांच्यापेक्षा जास्त आदरणीय मायनरांना नसणे हे देखिल जाचकच असावे.
डब्ल्यू टी एफ
>>सामान्य लोकांना नक्की काय आदरणीय आहे, असावे हे कळायची अक्कल यायला पण बर्यापैकी अवधी लागत असावा.
पण आपल्या समाजात नमस्कार करण्यासाठी आदरणीय असणे हा क्रायटेरियाच नैये.
उदा. माझ्या बहिणीचा (समजा वय वर्षे ३५) मान राखण्यासाठी माझ्या पत्नीने (वय वर्षे ४०) माझ्या बहिणीला वाकून नमस्कार करावा इतकेच नाही तर त्या बहिणीच्या मुलांनाही (वय वर्षे १० व ८) वाकून नमस्कार करावा अशी आपल्या समाजात पद्धत आहे.
वरील पद्धत समाजात रूढ आहे आणि त्यानुसार नमस्कार केला जातो असे माहिती आहे.
गाडगे महाराज
स्वच्छता अभियानासाठी प्रसिद्ध असलेले गाडगे महाराज, कोणी पाया पडल्यास, त्याच्या पाठीत काठी मारत. माझेही तेच मत आहे. जिथे खरी समानता आहे, तिथे असली थेरं करण्याची जरुर काय ? आणि आशीर्वाद द्यायला तुम्हाला काय दैवी शक्ती आहे का? जो तो आपल्या नशिबाने जगतो व मरतो. कुणाच्या आशीर्वादाने वा शापाने काही फरक पडत नाही.
कुणाच्या आशीर्वादाने वा
कुणाच्या आशीर्वादाने वा शापाने काही फरक पडत नाही.
+१११११११११११११११११११११११११११११११११११
आशीर्वादातून अन शापातून फक्त त्या त्या व्यक्तीची मानसिक धाव अन मनाचा पोत (कोतेपणा, द्वेष, मत्सर, श्रीमंती, दानत) कळून येतो. मला तर इतका पश्चात्ताप आहे नको त्या वयस्क गाढवांचे पाय धरल्याचा.
शुचिताई - पाया पडल्यावर कोणी
शुचिताई - पाया पडल्यावर कोणी शाप तर देणार नाहीच ( दाखवण्यासाठी तरी ), मग कसा कळणार मनाचा पोत?
अजुन एक निरीक्षण - लोकांना पटकन आशीर्वाद काय द्यायचा ते सुचत नाही. बर्याच वेळेला "कशाला कशाला" असे काहीतरी पुटपुटतात किंवा नीट पायाच पडुन देत नाहीत. वेळ प्रसंग आणि पाया पडणार्यासाठी अनुरुप असे आशीर्वाद पाठ करुन ठेवायची गरज आहे.
हे अजिबातच व्यक्तिशः आपणांस
हे अजिबातच व्यक्तिशः आपणांस उद्देशून नाही. पण ही फ्रेज इथे उद्भवली आहेच तर ... ऐसीवर कोणीही नॉन-एंटीटी सुद्धा अजोंशी असहमती दाखवून बरीच वाहवा मिळवू शकते. तो अगदी एक एंडेमिक आहे इकडे. वाईट गोष्ट म्हणजे त्याबद्दल अलिकडे माझ्याकडून आय अॅम लविंग इट प्रकारचा प्रकार होत आहे.
मला वाकून नमस्कार करणे तसेच
मला वाकून नमस्कार करणे तसेच नमस्कार करवून घेणे हे आवडत नाही. कदाचित लहानपणी मोठ्यांना वाकून नमस्कार करणे हे कंपल्शन होते त्यामुळे मोठे झाल्यावर बंडखोरीचा भाग म्हणुनही हे असेल . मनातुन उस्फुर्तपणे असे वाकून नमस्कार कुणाला करावास वाटत नाही. प्रचंड आदर असणार्या व्यकिंविषयी देखील आदराचे प्रतिक म्हणुन असा नमस्कार करावासा वाटला नाही. परंतु उभ्यानेच हात जोडून नमस्कार करण्यात काही गैर वाटत नाही. मी तो नम्रपणे करतो देखील. मृतदेहाला मात्र वाकून नमस्कार करतो श्रद्धांजली वाहण्यासाठी.
बर्याचदा पाया पडणे ही यांत्रिक पद्धतीने उरकण्याची गोष्ट असते. पाया पडणार्या व पाया पडून घेणार्या माणसांचे एकमेकांशी भावनिक नाते कसे आहे यावर बरच काही अवलंबून आहे. पाया न पडताही आदराची भावना असू शकते. राजकीय पटलांवर काही उद्दाम लोक जनभावना आपल्याला अनुकूल करुन घेण्यासाठी सुद्धा पाया पडतात. याचा अर्थ ते विनम्र असतात असा होत नाही.
गाडगेबाबांना पाया पडलेले आवडत नसे. म्हणजे स्वतःला इतरांकडून पाया पडवून घेणे अशा अर्थाने. असे त्यांच्या वरील असलेल्या पुस्तकात वाचले होते.त्या विचाराचा माझ्यावर कुठतरी परिणाम आहे. कधी कधी नात्यातील मुले वयाने कनिष्ठ लोक धार्मिक सणा प्रसंगी माझ्या पाया पडतात. तेव्हा मी अरे नको! असू असू दे असे म्हणून दूर व्हायचा क्षीण प्रयत्न करतो पण तोपर्यंत त्यांचे पाया पडून झालेले असते. त व्यक्ती पाया पडल्यावर आपण त्याच्या आदरास पात्र राहू ना? अशी शंका / भय देखील वाटते.
मात्र कधी कधी अस देखील वाटत की जर वाकून पाया पडल्याने ज्येष्ठांना जर बर वाटत असेल तर त्यांना बर वाटाव म्हणुन करायला काय हरकत आहे? तेवढेच त्यांचे सदिच्छातरंग
मी १२ - १४ वर्षांचा होतो
मी १२ - १४ वर्षांचा होतो तेव्हा आमच्या नातेवाईकांत एक "महाशय" होते. आम्हा मुलांपैकी कुणालाच त्यांना नमस्कार कसावेसे वाटत नसे. त्यातून ते अध्यात्मवादी होते त्यामुळे इतरांना (ज्येष्ठांना) उगीचच त्यांच्याप्रति एक गूढ आदर असे. मला बाबांनी एक दिवस त्या व्यक्तीला नमस्कार करण्याची सक्ती केली. मी नमस्कार करायला नाखूष होतो. त्यांना लक्षात येईल इतक्या ऑकवर्ड पद्धतीने वाकून नमस्कार केल्यासारखे केले अन तिथून निघालो. नंतर बाबांनी नेहमी प्रमाणे मला लेक्चर दिले - "त्यांचा आदर केल्याने तुझा आदर कमी होत नसतो" वगैरे ५००% बकवास. बाबांच्या लेक्चरबाजीचा वैताग आला होता. जेव्हा बाबांच्या तोंडाचा पट्टा अजिबातच थांबेना असे दिसले तेव्हा मी - "अहो बाबा, त्यांनी मला नमस्कार करावा एवढी सुद्धा त्यांची लायकी नैय्ये" असा डायलॉग मारला होता. त्या डायलॉगमुळे बाबांच्या गुश्श्याचा कडेलोट झाला. मग बाबांनी अशी काही धुलाई केली होती त्यावेळी..... पूछो मत.
----
वरील किस्सा हा मूळ प्रश्नाचे थेट उत्तर नाही. परंतु बँडवॅगन इफेक्ट/herd behavior चा विचार व्हावा.
केस
गब्बरजी, एक हायपोथेटीकल केस कंसिडर करा.
समजा महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग तुमच्या नातेवाईकांतले एक महाशय आहेत. तुमचे गरीब, शेतकरी आणि त्यांचे निर्दालन इ इ वरील विचार त्यांना ठावे आहेत. ते तुमच्या बाबांना सांगू लागले कि हाच* गब्बर अनेक समांतर विश्वांत आहे. कुठे तो घरदार, मोहमाया, दारू सोडून गरीबांच्या सेवेत गुंतला आहे तर अन्यत्र कुठे त्याने शेतकर्यांच्या सबसिड्यांसाठी जीवाचे रान केले आहे. याँ. त्याँ.
तर आपण त्यांचेप्रति, एक शास्त्रज्ञ महाशय म्हणून, आदर व्यक्त केला असता काय? नसता तर खरोखरीच समांतर विश्वे असतील तर?
============================================================
*हाच म्हणजे साक्षात तुम्ही. दुसरं काय नाही. नॉट अॅन आयोटा ओफ अ डिफरन्स.
प्रश्न एकदम विचार करण्यासारखा
प्रश्न एकदम विचार करण्यासारखा वाटला - वाकून नमस्कार करावा अशा व्यक्ती कोण?
माझ्या मते, ज्या व्यक्तींबद्दल आदर वाटतो अशांना वाकून नमस्कार करावासा वाटतो.
शिवाय ज्या वयोवृद्ध, स्निग्ध व्यक्ती आहेत (आजी,आजोबा) त्यांचा हात पाठीवरून फिरावा असं वाटतं, त्यांनाही वाकून नमस्कार होतो. तेबी खूष, आपुनभी खुश!
वाकून नमस्कार करणं हा एक प्रकारचा बहुमान असला पाहिजे. उठसूठ कुणालाही वाकून नमस्काराची खिरापत वाटायला ते काही फिल्मफेअर अवार्ड नोहे.
(आणि हे लिम्बीचे बाबा कोण?)
धर्मासंबंधी
धार्मिक पुस्तकांत गृहस्थाश्रमी माणसांसाठी काही नियम सांगीतले आहेत. त्यात बरेचवेळा वयोवृद्ध, तपोवृद्ध व ज्ञानवृद्ध व्यक्तींना आदराने नमस्कार करावा असे सांगीतले जाते. आदर दाखविण्याची भारतीय पद्धत म्हणजे वाकून नमस्कार करणे. मात्र आता बर्याच जणांना असे करणे आवडत नाही.
मी बर्याच प्रमाणात धार्मिक अंधश्रद्धाळू असल्याकारणाने हे नियम पाळण्याचा शक्य तितका प्रयत्न करतो. मात्र दरवेळी ते शक्य होतेच असे नाही.
हीच परंपरा मी बिजनेस संबंधी मिटिंग्समधे देखील पाहिली आहे. दोन अनोळखी व्यक्ती पहिल्यांदा समोरासमोर येतात तेव्हा व्हिजीटींग कार्डची देवाणघेवाण होते. ९९% व्यक्ती समोरच्याच्या हातात आपले कार्ड देताना दोन्ही हातांनी पकडून थोडेसे खाली झूकून समोरच्याला देतात आणि समोरचा देखील ते तसेच स्वीकारतो.
आपल्या घरी आलेली व्यक्ती परत जाताना तिला गावाच्या वेशीपर्यंत सोडावयास जावे असा उल्लेख येतो. ( आता कमीतकमी बिल्डींगच्या गेटपर्यंत जावे असे मला व्यक्तीशः वाटते व तसे मी करतो. कमीतकमी घराच्या दरवाजापर्यंत तरी जावे एवढे नक्की. पण बरेच जणांना बसली जागा उठवत नाही. दरवाजा लोटून घ्या म्हणतात जाताना. लॅच असतोच हल्ली दरवाजांना त्यामुळे आपोआप बंद होतातच.)
युपी, बिहारी, मारवाडी बांधवांत मात्र ही परंपरा अजून तितक्याच दक्षतेने पाळली जाते. अगदी रेल्वे स्टेशनवरदेखील कोणी भेटला तरी अगदी वाकून, पायाला स्पर्श करुनच प्रणाम केला जातो.
मराठी माणूस जात्याच सुधारक (!) म्हणून ओळखला जातो म्हणून म्हणा, किंवा मोडेन पण वाकणार नाही / चारशे दिवस शेळीचे जीवन जगण्यापेक्षा चार दिवस वाघाचे जीवन जगा / मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही यासारखी बाणेदार वाक्ये नको तितक्या वेळा त्याच्या कानावरुन गेली असल्यामुळे म्हणा किंवा बदलत्या जीवनशैलीमुळे पोटाचा आकार वाढल्यामुळे कदाचित त्याला वाकून नमस्कार करणे जमत नसावे असा प्राथमिक अंदाज आहे.
बिजनेस संबंधी मिटिंग्समधे
बिजनेस संबंधी मिटिंग्समधे देखील पाहिली आहे. दोन अनोळखी व्यक्ती पहिल्यांदा समोरासमोर येतात तेव्हा व्हिजीटींग कार्डची देवाणघेवाण होते. ९९% व्यक्ती समोरच्याच्या हातात आपले कार्ड देताना दोन्ही हातांनी पकडून थोडेसे खाली झूकून समोरच्याला देतात.
इथे वाकून नमस्कार करायला थोतांड म्हणणारी मंडळी हा नालायकपणा १००० दा आणि अवश्य करत असणार.(एक गेस. काही नसतील.) तुम्ही इतकेच शहाणे असाल, तर समोरची व्यक्ति आदरणीय व्यक्ति आहे कि नाही ते अगोदर पहा. मग ते २ ग्राम वजनाचे कार्ड दोन्ही हातांनी उचलून वाकून द्या आणि त्याचे पण कार्ड घेताना दोन हात लावा आणि वाका. पण नको - ते भारतीय नाही ना.
च्यायला, भारतीय म्हटलं कि लोकांना इतका न्यूनगंड का येतो? अॅलोपॅथीत (हे आवश्यक. आयुर्वेदाचा न्यूनगंड असल्याने) याच्यावर गोळी आहे का?
आणि हे कोण्या गाढवानं सांगीतलं नमस्कार हा (फक्त) आदर व्यक्त करण्यासाठी असतो? हे देखिल नविनच ऐकतोय. नमस्कार अनंत भावना व्यक्त करून जातो - प्रेम, आदर, श्रद्धा, विश्वास, आपुलकी, इ इ.
भारतीय नमस्कार नक्की कोण कोणाला का करेल याचा भरोसा नाही. लातूरमधले लिंगायत लोक (सणासुदीला) आणि उत्तर प्रदेशातले शरयोपायी ब्राह्मण (रोजच) आपल्या मुलींना नमस्कार करतात. अगदी ९० वर्षाची थेरडी माणसं शेंबड्या पोरींना साष्टांग दंडवत घालतात. अलिकडे या परंपरा शिथिल पडल्या आहेत, पण तरीही बर्याच प्रमाणात पाळल्या जातात.
माझ्यामते वाकणं हे माज कमी असल्याचं लक्षण आहे. सगळी अक्कल आपल्यालाच आहे, आहे कोण आदरणीय आहे नि कोण नाही हे आपल्यालाच कळतं, इ इ वाटणारे लोक कधीच वाकून नमस्कार करणार नाहीत.
इथे एका प्रतिसादात गब्बरने दिलेले उदाहरण बघून मला नरहरी सोनाराची आठवण झाली. तो म्हणतो कि मी शैव असल्यामुळे वैष्णव विठ्ठलाचा कडदोरा (जे काय ते)बनवणार नाही. अरे, तो गब्बरच्या घरी आलेला बाबा गूढ अध्यात्मिक असो नैतर अजून काही असो, तुला (गब्बर लहान होता म्हणून तुला) दिक्षा घ्यायला थोडीच सांगीतलंय? फक्त एक सामान्य सामाजिक संकेत पाळायचा आहे. वैचारिक मतांतराचा आणि लोक भेटल्यावर कसे हेल करतात त्याचा काय संबंध? इथेच दुसर्या एका धाग्यावर मी हॉकिंगला महाचुत्तड म्हणालो तेव्हा घासकडवी म्हणाले कि त्यांची अशी विधाने चूक असावीत, गांभीर्याने घेऊ नयेत हा भाग वेगळा पण हॉकिंगला कसं संबोधावं याचा संकेत आहे तो पाळला जात नाहीय हे बरोबर नाही. ही वॉज राइट. मतांतर वेगळं आणि संकेत न पाळणं वेगळं.
जुलमाचा राम राम जाचक वाटणारच
जुलमाचा राम राम जाचक वाटणारच ना?
काहींना वयपरत्वे आणि वजनामुळे ( भौतिक आणि सामाजिक) --- वाकणे नकोसे वाटत असावे.
मी, माझे आई, बाबा आणि देवाला (फारसा विश्वास नाही तरीही) , मनापासून नमस्कार करते.
इतरांना नमस्कार करायची वेळ आलीच तर , ईश्वराचे स्मरण करून करते, म्हणजे माझा नमस्कार त्यालाच असतो.
माझ्याहून वयाने बर्याच मोठ्या व्यक्तींना (वाढदिवसाच्या वगैरे ) शुभेच्छा देताना वाकून नमस्कार करते, कारण त्यांच्याशी हस्तांदोलन करणे योग्य वाटत नाही. आणि उभ्या उभ्या हात जोडणे फारच -- कोरडे/अलिप्त, असे वाटते.
कुणी अनोळखी व्यकी बरोबर ओळख करून दिली तर उभ्या उभ्या हात जोडते. ( आपल्याकडे स्त्रीने हस्तांदोलन करणे निषिद्धं मानतात, आणि आपल्या संस्कृतीतील हात जोडणे काहींना 'कैतरीच्च' वाटते. मग नुसतेच अवघडल्यासारखे हसून 'हो का! अरे वा! ' असे काहीतरी निरर्थक बोलावे लागते :) )
यावरून आठवले .. थायलंड मधे दोन्ही हात जोडुन , "संवास्दीखब" असे म्हणतात. बॅकॉक मधे असताना पाहिले, तिथल्या सुपर मार्केट्स , शॉपींग मॉल मधे आपण बील दिल्यावर , आपल्याला रिसीट देताना, ते लोक दोन्ही हात जोडून नमस्कार करतात. आणि सर्वसामान्य लोक सुद्धा (अजूनही) एकमेकांना हात जोडुनच अभिवादन करतात.
आपल्या संस्कृतीतील हात जोडणे
आपल्या संस्कृतीतील हात जोडणे काहींना 'कैतरीच्च' वाटते.
काय की. मला असा नमस्कार करून संभाषणाला सुरुवात करायची खोड आहे, असे आता विचार करताना जाणवते आहे. फार काय, फोनवरही समोर मराठी व्यक्ती असेल अशी खातरी असेल, तर तोंडून ’हेल्लो’च्या जागी आपसूक ’नमस्कार’ येतो. पण हे काही ठरवून नव्हे. सवय.
का वाटत नसावं
It may be, kind of, reminding some, of submission for a doggy style*!!!
=========================================
(काही नमस्कार कर्त्यांस ते ब्लो-जॉबसाठीचे पण सबमिशन वाटू शकते. आय मीन पोझिशनिंग तसंच होतं.)
(वाचणारांनी हसावं म्हणून असं लिहिलं आहे. संस्थळाच्या मर्यादेपलिकडे असेल तर विनम्र क्षमाप्रार्थना आणि उडवण्याची विनंती.)
बाय द वे, या श्रेणीदानातही एक
बाय द वे, या श्रेणीदानातही एक पॅटर्न आहे. पेशव्यांच्या राज्यात म्हणे महार गल्लीतून गेला कि मूर्ख ब्राह्मण लोक लगेच गोमूत्र शिंपडत आणि म्हणे तो शुद्ध करत. तसा मी प्रतिसाद लिहायचा अवकाश कि दनादन २-३ तरी ऋण श्रेण्या बरसल्याच समजा. तेच बामन जसा गल्लीतून जाण्यासाठी सडा शिंपडत तसे अँटी-अजो लॉबी मला कोणी काहीही प्रतिसाद लिहिला कि दनादन धन श्रेण्यांंचे गंगाजल शिंपडते.
पण सुदैवानं अशा लोकांपेक्षा लालूचे खासदार संसदेत जास्त आहेत.
It may be, kind of, reminding
It may be, kind of, reminding some, of submission for a doggy style*!!!
=========================================
(काही नमस्कार कर्त्यांस ते ब्लो-जॉबसाठीचे पण सबमिशन वाटू शकते. आय मीन पोझिशनिंग तसंच होतं.)
(वाचणारांनी हसावं म्हणून असं लिहिलं आहे. संस्थळाच्या मर्यादेपलिकडे असेल तर विनम्र क्षमाप्रार्थना आणि उडवण्याची विनंती.)
खूपच तरल विनोदबुद्धी जाणवते या प्रतिसादातून.
स्वत: वाकून नमस्कार करणे नाही
स्वत: वाकून नमस्कार करणे नाही तर दुसर्^यानी वाऊन आपल्याला नमस्कार केला आपल्याला घातलेला तो नमस्कार काहीही आशिर्वाद न देण्याएवढा जाचक का वाटतो? असं म्हणायच ना?
आपल्याला क्कोणी असा वाकून नमस्कार करत नाही मग काय सांगणार. नाही म्हणायला माझ्या मुलीचं पाळणाघर हे एक कानडी लिंगायत कुटुंब होतं आंणि एकदा त्यातल्या माझ्याहून केवळ दहा-बारा वर्षांनी लहान मुलीने मला गुढग्यावर बसून माझ्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला तेव्हा मला प्रचंड अवघडल्यासारखं झालं होतं. " मला नको गं असा नमस्कार करुस " असं मीच तिला कळवळून म्हणालेले. त्यावर ती हसत सुटली आणि म्हणाली "पपा करायला लावतातच ना".
हा असा जुलमाचा नमस्कार घालायला आणि घ्यायलाही आवडत नाही. मनापासून वाटलं तर आवर्जून वाकून नमस्कार केला जातो.
मला औक्षण केलेल खूप आवडत. पण
मला औक्षण केलेल खूप आवडत. पण नंतर पाया पडायच म्हटल्यावर ते जमत नाही. वाढदिवसाच्या दिवशी किंवा दिवाळी वगैरे ला जेष्ठ नातेवाईक महिला औक्षण करतात.आपल्यातील नम्रतेच भावना जागृत ठेवण्यासाठी हल्ली बर्याचदा ठरवतो कि आता पाया पडाव पण प्रत्यक्षात होत नाही. बायको मात्र पडते. एक मन सांगत असत कि एवढा ताठा बरा नव्हे! पण काय होत कुणास ठाउक पाया पडण होत नाही. वर एका प्रतिक्रियेत सविस्तर म्हटलेच आहे कि हा बंडखोरीचा भाग आहे म्हणुन. ज्या ज्येष्ठांना पाया पडल म्हणजे आपला आदर केला अस वाटत असेल असा आपला अंदाज असल्यास त्यांच्या पाया पडाव अस दरवेळी ठरवतो.
आपण नम्र रहावं, माजू नये
आपण नम्र रहावं, माजू नये म्हणून वाकून नमस्कार करायचा. समोरचा नसेल देत आशिर्वाद तर (टकमक) टोकावर गेला.