पुस्तक ओळख - Diffusion of Innovations

एखादे innovation अर्थात नावीन्यपूर्ण कल्पना जनमानसात कशी रुजते. ती स्वीकारली जाते अथवा नाकारली जाते जाते का? असल्यास कारणे व त्या निर्णयामागील विचारप्रक्रियेचे घटक यांचे सखोल मीमांसा करणारे एक अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तक माझ्या वाचनात आले. Diffusion of Innovations, 5th Edition: Everett M. Rogers हे पुस्तक फार आवडले. विशेषतः व्यासंगपूर्ण भाषा, कल्पना व अतिशय प्रभावी कल्पना, सोप्या शब्दात मांडण्याची लेखकाची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.

.
कोणतीही नावीन्यपूर्ण कल्पना ही जर सामान्य जनांस उपयुक्त असेल तर ती जनमानसात रुजणारच या श्रद्धेस धक्का देणारे उदाहरण म्हणून लेखकाने, dvorak कळफलक चे उदाहरण दिले आहे.
आपल्यापैकी कोणाला हे माहीत आहे की, जो keyboard सध्या प्रचलित व popular आहे त्या कळफलक ला QWERTY कळफलक म्हणतात. हे नाव त्या कळफलक मधील सर्वात वरच्या रांगेतील पहील्या ६ अक्षरांवरुन पडले आहे. ही माहीती तर सोडाच पण आपल्यापैकी किती जण हे जाणतात की QWERTY कळफलक हा मुद्दाम typing चा वेग नियंत्रित करण्यासाठी बनवला गेला आहे? हा कळफलक असा बनविला बनविला गेलेला आहे की ज्यायोगे, typing हे awkward व अकार्यक्षम व्हावे. अन असे असूनही १८७३ पासून QWERTY कळफलक च प्रचलित व popular आहे. QWERTY हा keyboard , Christopher Latham Sholes याने typing चा वेग मंद व्हावा या हेतूने प्रेरीत होऊन बनविला ज्याचे कारण हे होते की शेजारच्या २ कळा एकत्र व जास्त वेळा दाबल्यास, त्या कळा जॅम होत. हे समस्या दूर करण्याकरता QWERTY चा जन्म झाला.
QWERTY पेक्षा अनेक पटीने कार्यक्षम keyboard हा Prof. August Dvorack यांनी शोधला. त्यांनी तब्बल एक दशक अनेक films काढून, या गोष्टीचा अभ्यास केला की लोक type कसे करतात व नक्की कोणत्या sequence मध्ये हा वेग मंदावतो. त्यावर संशोधन करुन त्यांनी नवा keyboard बनविला ज्यायोगे प्रत्येक बोटावरती त्या त्या बोटाच्या कौशल्य व ताकदीनुसार, बोजा पडून typing अधिक जलद तसेच सोपे व्हावे. एका हाताने एक कळ दाबली असता ,, सातत्याने येणार्‍या अक्षराची दुसरी कळ , दुसर्‍या हाताच्या बोटाने त्वरीत व कमीत कमी प्रयत्नांनी दाबता यावी. या संशोधनामुळे, typing rhythm सुधारली. typing मध्ये स्वर हे ४०% इतक्या सातत्याने येतात ते डाव्या हाताने type करता यावेत व व्यंजने ही उजव्या हातानी type करता यावीत असे design आहे.
QWERTY keyboard मुळे अशक्त डाव्या हातावर ५७% बोजा पडे याउलट Dvorack कळफलक मुळे सशक्त उजव्या हातावर ५६% भार पडतो अन ४४% अशक्त डाव्या हातावरती भार पडतो. जो Home row असतो अर्थात, मधली मुख्य रांग असते तिच्यावर QWERTY keyboard मध्ये ३२% च typing होते याउलट Dvorack keyboard मध्ये, ७०% होते. शिवाय एका रांगेतून दुसर्‍या रांगेकडे बोटांचे जाणेयेणे हे संक्रमण Dvorack कळफलक मध्ये कमीत कमी होते. यावर विश्वास बसणे अवघड आहे परंतु, QWERTY कळफलक वर typing करताना, बोटे , १२ मैल प्रवास एका दिवशी करतात ज्यामुळे मेंदूवर ताण येतोच पण carpal tunnel syndrome ची शक्यता अतोनात वाढते.
.
dvorak कळफलक खालीलप्रमाणे दिसतो -

.
आपल्याला असे वाटेल की मग इतका सुयोग्य कळफलक का रुजला नाही तर याचे कारण प्रस्थापित typing प्रशिक्षक, कळफलक विक्रेते व प्रत्यक्ष वापरकर्ते यांचा विरोध. अर्थात कोणतीही नवीन कल्पना रुजण्यासाठी अनेक घटकांची अनुकूलता आवश्यक असते.
.
innovation diffusion - याची व्याख्या लेखकाने अशी केलेली आहे की, ही अशी एक प्रक्रिया आहे ज्यायोगे, विविध माध्यमातून, बर्‍याच काळापर्यंत, नवीन कल्पना, समाजातील घटकांपर्यंत, विविध स्तरात पोचविली जाते, प्रसारीत होते.
.
सार्वजनिक आरोग्यविषयक यशस्वी योजनेचे रुजुकरण म्हणून सॅन फ्रान्सिस्कोमधील "STOP AIDS program" चे उदाहरण घेता येईल. सॅन फ्रान्सिस्को मधील गे लोकांनी आयोजिलेल्या या योजनेचा आराखडा हा " diffusion model" वरती आधारीत होता. काय आहे model तर -
(१) The innovation
(२)is communicated through certain channels
(३) over the time
(४) among the members of social system.
जवळजवळ ७००० गे कार्यकर्ते हे सॅन फ्रान्सिस्को मधील गे लोकं जास्त असलेल्या विविध वसाहतींमध्ये जाऊन "सुरक्षित संभोग" या विषयावर चर्चा घडवून आणत व पत्रके, कार्यक्रम, चर्चा यातून संदेश जनमानसात पोचवत. या चळवळीचा मुख्य हेतू हा अधिकाधिक प्रभावी नेत्यांपर्यंत हे प्रशिक्षण पोचविणे हा होता. अन तो यशस्वी झाला कारण या नेत्यांमार्फतच तो अधिकाधिक सामान्य गे लोकांत पसरला.
.
तेव्हा गे लोकांची संख्या १४२,००० होती. ही चळवळ इतकी यशस्वी झाली की ७,००० लोक हे ३०,००० नेत्यांपर्यंत पोचले अन त्या नेत्यांमार्फत अन्य लोकांपर्यंत तिचा प्रसार होऊ शकला. १९८३ मध्ये HIV infection च्या केसेस ज्या ८,००० होत्या त्या १९८५ मध्ये ६५० इतक्या कमी झाल्या. आणि असुरक्षित संभोगाचा दर जो १९८३ मध्ये ७१% होता , तो १९८७ मध्ये २७% झाला. अन AIDS Epidemic आटोक्यात आले.
.
असाच mouth publicity मधून कल्पना पसरविण्याचा अजुन एक कार्यक्रम म्हणजे "Electric Cars" चा. १९९० च्या सुरवातीला कॅलिफोर्निआ व अ‍ॅरीझोना राज्यसरकारने लॉस एंजेलिस व फिनीक्स शहरांमधील प्रदूस्।अणयुक्त धुके कमी करण्याकरता, मोटर कंपन्यांवरती निर्बंध घातले की कमीत कमी १०% मोटारींची विक्री ही प्रदूषण कमी करणार्‍या मोटारींची अर्थात Electric व hybrid Cars ची केली पाहीजे.हा प्रस्ताव GM Motors ने उचलून धरला व या प्रकल्पात २ बिलीअन डॉलर्स गुंतविले. यामागे GM Motors चा हा स्वार्थ होता की त्यांची जनमानसातील प्रतिमा ऊंचावी, पुरोगामी , Advanced अन Trailblazers (पायंडा पाडणारे) अशी व्हावी. GM Motors ने अनेक वृत्तपत्रात जाहीरात दिली की ज्यांना अशा कारची Test Drive घेण्यात रुचि असेल त्यांनी संपर्क साधावा. यामागे असा स्वच्छ हेतू होता की हे car-nuts स्वतः कार विकत घेतीलच पण त्यांच्या ओळखीत mouth-publicity करतील. अन असेच लोकं सहसा Test Drive करता तयार होतील जे जाणकार असतील व त्यामुळे लोकांवर प्रभाव टाकू शकतील. अन तसे झालेही.
.
अशा अनेक कल्पनांची उदाहरणे लेखकाने देऊन diffusion model स्थापित केले आहे तसेच त्यावरील टीकाही उधृत केलेली आहे.
.
एक शेवटचे उदाहरण आहे एका नावीन्यपूर्ण कल्पनेचे जी कल्पना अमेरीकेत रुळू शकली नाही. ती म्हणजे - रॅप संगीत. कृष्ण्वर्णीय व निम्न-आर्थिक स्तरातील तरुणांमध्ये popular असलेले हे संगीत अमेरीकेत विशेष रुळले नाही. या संगीताचे बोल हे संताप, खदखद व हिंसा प्रकट करणारे असून या भावनांना वाट देणारे माध्यम म्हणून रॅप संगीत रचले व गायले जाते. याउलट युरोपियन संगीत हे मधुर व आल्हाददायक असते. जेरी कुमारवयीन व महाविद्यालयीन तरुणांमध्ये हे संगीत popular झाले तरी त्यास वाव मिळाला नाही.
.
अतिशय व्यासंगपूर्ण व अभ्यासपूर्ण असे हे पुस्तक वाचकांकरता मेजवानी आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

Qwerty Vs. Dvorak

पुस्तक व त्याचा विषय रोचक आहे. आठ दहा दिवसांपूर्वी माझ्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांशी इमेल वर युरोपियन युनिअन मधल्या नवीन अँटिट्रस्ट प्रस्तावांवर चर्चा केली तेव्हा या पुस्तका चा विषय आला. त्याच पुस्तकाचे लेखक Liebowitz, Stan J. and Stephen E. Margolis यांनी मिळून वरील लेख लिहिलेला आहे. Qwerty Vs. Dvorak असे नाव मी दिलेले आहे पण मूळ नाव THE FABLE OF THE KEYS असे आहे. हा लेख थोडासा Qwerty च्या बाजूने आहे. मला यात काही भूमिका नाही, बाजू घ्यायची नाही पण धागाकर्तीच्या मुद्द्याची दुसरी बाजू म्हणून वाचण्यास योग्य असा लेख आहे असा माझा समज आहे. मी हा अनेक वर्षांपूर्वी वाचला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद गब्बर, जरुर वाचेन.
_____
ह्म्म्म खूपच रोचक लेख आहे. नेव्ही च्या प्रयोगावरती अनंत फाटे फोडलेले आहेत, अनेक पळवाटा, गाळलेल्या जागा दाखविल्या आहेत.
पण खरच QWERTY का इतका प्रस्थापित झाला? तो आधी आला म्हणून की Dvorack ची मार्केटींग स्ट्रॅटेजी फसली म्हणून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

चांगलं वाटतय पुस्तक. छान ओळख . अजून कश्याकश्यावर लेख आहेत ते लिही ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म लिहीते. आयोवा चे बटाटा पिकवणारे शेतकरी, प्रत्येक राज्याने हेट-क्राइमविरुद्ध केलेले कायदे व अन्य बरीच innovations ची उदाहरणे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

ड्वोरॅक संकल्पना माहिती आहे पण

QWERTY keyboard मुळे अशक्त डाव्या हातावर ५७% बोजा पडे याउलट Dvorack कळफलक मुळे सशक्त उजव्या हातावर ५६% भार पडतो अन ४४% अशक्त डाव्या हातावरती भार पडतो.

हे माहिती नव्हतं. पण मग त्या अनुषंगाने अजून एक प्रश्न लगेच येतो की 'अशक्त डाव्या हातावरती' हे डावर्‍या माणसांच्या बाबतीत उलटं असेल. म्हणजे खरं तर डावर्‍या माणसाला ड्वोरॅकपेक्षा क्वर्टी की बोर्ड जास्त सोईचा! त्याबद्दल काही पुस्तकात आहे का? किंवा उजव्या माणसांपेक्षा डावर्‍या लोकाना कार्पेल टनेलचा त्रास कमी होतो (अर्थात सगले क्वर्टी वापरतायत असं धरून) असं काही स्थापित झालंय का? जालावर थोडीफार शोधाशोध केली त्यात असं काही आढळून आलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

रोचक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान ओळख ! टायपिंगचे क्लास आणि सुरुवातीचे काहि दिवस लागलेली करंगळीची वाट. सगळे कसे डोळ्यासमोरुन गेले. संगणक देवो सुखी भव :

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद मुटके साहेब. खरं तर ओळख फारच अपूर्ण आहे. इतक्या खोलात जाऊन लेखकाने मुद्दे मांडले आहेत की ते लिहीणं मला जिकीरीचं वाटतय. तरीही एखादा सिक्वेल (अर्थात अंतराने वरती म्हटल्याप्रमाणे अधिक इनोव्हेशन्स ची उदाहरणे अ थोडी थिअरी देइन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

रोचक वाटतय पुस्तक. छान ओळख करून दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0