Skip to main content

मन्याचे श्लोक(स्वता:चे....स्वता:साठीच!!)

"तो"विश्वाचा अधिपती आणि तु एक त्याचाच भाग,
याची जाणिव झाल्यावर तरी स्वता: स्वता:शी नीट वाग.

कोण तुझ्याबद्दल काय म्हणतो याने काहीच फरक पडत नाही,
योग्य असेल तर बदल नाही तर पुढे चल इतरांवाचुन तुझ कहीच अडत नाही.

अनेकदा स्वता:च ठरवलेल्या संकल्पाला निष्क्रीयतेचा 'शाप' जडतो,
छोट्या-छोट्या कामापासुन सुरुवात कर त्यातुनच मोठा प्रताप घडतो.

मुंग्या गोळा करण्यासाठी साखर जवळ असायला हवी,
आणि आशा साखरे साठी जमिन सातत्याने कसायला हवी.

लक्षात ठेव ज्याच्याबद्दल असते jealousy,anger,hatred त्याचे कहीच नाही होत नुकसान,
पण ज्याच्या मनात असतात या भावना, तो मनात कुढुन घालवुन बसतो स्वता:ची च मुस्कान.

मेहनत कर या विश्वासाने की उद्या चांगलाच घडणार आहे,
हळु हळु पायरी पायरी ने का होइना तुही सपुंर्ण जिना चढणार आहे.

बर्‍याचदा काय पिकते यापेक्षा जास्त महत्वाचे ठरते ते काय विकते,
पण तु त्याच्या मागे लाग जे 'सदासर्वकाळ' टिकते.

जिंक॑ण्या-हरण्यापेक्षाही महत्वाचं असतं ते लढणं,
फक्त लढुनही उपयोग नाही महत्वाचं ते लढण्यातुन घडणं.

स्वता:स तु शेळी समजतोस हाच माझा तुझ्यावर राग आहे,
सोडुन दे हा गैरसमज मग बघ तुझ्यातही दडलेला एक परक्रमी वाघ आहे!!

'न'वी बाजू Mon, 27/04/2015 - 16:23

jealousy,anger,hatrate

हे hatrate काय असते? की jealousy आणि angerनंतर ती hat-trick साधण्यासाठी केवळ काहीतरी पादपूरणार्थ?

गवि Mon, 27/04/2015 - 17:33

जिंक॑ण्या-हरण्यापेक्षाही महत्वाचं असतं ते लढणं,
फक्त लढुनही उपयोग नाही महत्वाचं ते लढण्यातुन घडणं.

लाख बोललात मनोजसाहेब, लाख बोललात.. संदीप खरेंच्या "मी डाव रडीचा खास जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो" या ओळी डोळ्यासमोर तरळल्या. या दोन ओळींनी तुम्ही त्यांच्या पंगतीत जाऊन पोचलात.

"कोशिश करनेवालों की कभी हार नही होती" ही शाळेतली कविता. तिच्यात एक मुंगी भिंतीवर चढते, पुन्हा पडते, पुन्हा चढते.. लढाईच आहे ही. अस्तित्वाची लढाई..आयुष्याची लढाई.. पण ती लहानशी मुंगीही हरण्या-जिंकण्याचा विचार न करता "लढण्यातून घडत" राहते. खूप खोलवर विचार आहे या ओळींत..!!

मनोज गीत Tue, 28/04/2015 - 10:55

In reply to by गवि

गविसाहेब आपण दिलेल्या प्रेरणादायी प्रतिक्रियेबद्दल लाख लाख धन्यवाद. मात्र मी विन्रमपणे एक सुधारणा सुचवु इच्छितो की संदिप खरेंच्या पंगतीत मला पोहचवणे म्हणजे गजबजलेल्या शहरातील गर्दीने दाटलेल्या चिंचोळ्या गल्लीत खेळणार्‍या एखाद्या क्रिकेटर ला सचिन तेडुंलकर च्या पगंतीत बसवण्यासारखे होइल..

गवि Tue, 28/04/2015 - 11:09

In reply to by मनोज गीत

मी त्या दोन ओळींबद्दल म्हणतो आहे.

पूर्ण कवितेत कधीकधी एखादी ओळ अशी येऊन जाते.

अशाच जास्त जास्त ओळी येऊ लागल्या की संदीप किंवा अधिक चांगला कवी बनतो. पहिल्या कवितेपासून सर्वजण तसे नसतात.

राजेश घासकडवी Tue, 28/04/2015 - 07:06

"तो"विश्वाचा अधिपती...

पहिल्या शब्दालाच ठेचाळलात हो! विश्वाला अधि'पती' आहे म्हटलंत, आणि तो म्हणून संबोधलंत. कशावरून विश्वनिर्माता पुरुष आहे? कोणाला हा प्रश्न 'कशावरून पितांबर पिवळं आहे?' यासारखा वाटेलही. पण मुद्दा तोच आहे, हे शब्दच साले असे बनले आहेत की त्यातून जागोजागी पुरुषप्रधानता आपलं कुरूप डोकं वर काढते. ऐसीवरच्या स्त्रीवादी आयडींकडून यावर टीका होणार नक्की.

असो.

कोण तुझ्याबद्दल काय म्हणतो याने काहीच फरक पडत नाही,
योग्य असेल तर बदल नाही तर पुढे चल इतरांवाचुन तुझ कहीच अडत नाही.

मेहनत कर या विश्वासाने की उद्या चांगलाच घडणार आहे,
हळु हळु पायरी पायरी ने का होइना तुही सपुंर्ण जिना चढणार आहे.

या ओळी कवितालेखनासाठीही लागू पडतील अशी आशा आहे.

'न'वी बाजू Tue, 28/04/2015 - 08:42

In reply to by राजेश घासकडवी

पहिल्या शब्दालाच ठेचाळलात हो! विश्वाला अधि'पती' आहे म्हटलंत, आणि तो म्हणून संबोधलंत. कशावरून विश्वनिर्माता पुरुष आहे?

नाही म्हणजे... मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, पण... "'ती' विश्वाची अधि'पत्नी'" आहे म्हटले असते, तर अंमळ चमत्कारिक अर्थ प्रतीत झाला असता, नाही?

('नगरवधू'बद्दल ऐकून होतो. बोले तो, अहमदनगरची चि.सौ.कां. हे 'विश्ववधू' थोडे मोठे प्रकरण दिसते आहे. असो चालायचेच.)

अंतराआनंद Tue, 28/04/2015 - 08:55

In reply to by राजेश घासकडवी

जाउदे. स्त्रीवाद्यांना विश्व चालवण्याची आकांक्षा नाही. जी वाट लावायची ती लावायला अधि'पती' पुरेसे आहेत. :p
अर्थात आम्ही अधिपती नाही म्हटल्यावर चांगलं वागायची जबाबदारी मुदलातच येत नाही.( स्वत्:शी आणि दुसर्^यांशीही ) हा फायदाच म्हणावा. ;)

बाबा बर्वे Tue, 28/04/2015 - 10:06

In reply to by राजेश घासकडवी

कशावरून विश्वनिर्माता पुरुष आहे? कोणाला हा प्रश्न 'कशावरून पितांबर पिवळं आहे?' यासारखा वाटेलही. पण मुद्दा तोच आहे, हे शब्दच साले असे बनले आहेत की त्यातून जागोजागी पुरुषप्रधानता आपलं कुरूप डोकं वर काढते. ऐसीवरच्या स्त्रीवादी आयडींकडून यावर टीका होणार नक्की.

पहा -अधिप (p. 025) [ adhipa ] m S अधिपति m S A lord, sovereign, ruler, master. Ex. of comp, ग्रामाधिपति, देशाधि- पति, राज्याधिपति.

अधिपती म्हणजे निर्माता नव्हे .. अधिपती म्हणजे प्रमुख / राजा ... तस्मात विश्वाधिपती म्हणजे विश्वाचा प्रमुख किंवा विश्वाचा राजा .. विश्वनिर्माता नसून विश्वनिर्माती आहे असं जरी म्हटलं तरी लिखाण त्या निर्मातीच्या पतीला उद्देशून आहे असं मानायला जागा आहे. मन्याला "त्या"च्याशी बोलायचय की "ती"च्याशी यावर संपादकीय मंडळाने टिप्पणी करणं योग्य नव्हे.

शब्दांचे चुकीचे अर्थ प्रसारीत करून ऐसीवर स्त्रीवादी आणि पुरुषवादी अशी भांडणं लावण्याच्या संपादकीय प्रयत्नांचा जाहीर निषेध ...

असो ... लेखन सुंदर आहे .. अब्राहम लिंकनने मुलाला लिहिलेल्या पत्रासारखं वाटलं

मनोज गीत Tue, 28/04/2015 - 15:05

In reply to by राजेश घासकडवी

मला जे म्हणायचे होते ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो.माझ्या अत्यल्प ज्ञानानुसार हे विश्व म्हणजे जड(mass) आणि चैतन्य(energy) यांचे combination आहे. नाव,लिंग,जात,पद इ. गोष्टी या व्यक्तीच्या शरीराशी म्हणजेच "जड" तत्वाशी निगडीत आहे.
पण जोवर या जड तत्वात चैतन्याचा(energyचा) शिरकाव होत नाही तोवर त्या जड तत्वास काही अस्तित्वच नसते. उदा. ट्युबलाईट मध्ये जोवर वीज जात नाही तोवर प्रकाश पडत नाही. यातील ट्युबलाईट जड आणि वीज ही उर्जा (चैतन्य)आहे.त्याचप्रमाणे मानवाचे शरीर हे जड आहे आणि त्यात जोवर उर्जा असते तोवरच मनुष्य जिवीत असतो.या उर्जेलाच "आत्मा" म्हणतात.
हा आत्मा,ही उर्जा विश्वाची निर्मिती करणार्‍या ,विश्वाच्या चराचरात अस्तित्वात असलेल्या supreme energyचाच एक भाग आहे.यालाच उद्देशुन वरील ओळी आल्या आहेत.यात विश्वाचा अधिपती हे परमत्मा अर्थात supreme energy ला म्हटले आहे.याला आपण "ती"energy(उर्जा),तो आत्मा,ते चैतन्य आशा कोणत्याही स्वरुपात आपण संबोधीत करु शकतो.मी माझ्या सोयीनुसार "तो" वापरले आहे.
यात पुरुषसत्ताक्,स्त्रीवादी वैगेरे शोधत बसु नये.कारण या जन्मात एक शरीर धारण करुन पुरुषाची भुमिका निभावणारे चैतन्य कदाचीत पुढील जन्मात स्त्री ची भुमिकाही निभवु शकेल..

अजो१२३ Tue, 28/04/2015 - 18:11

In reply to by मनोज गीत

उदा. ट्युबलाईट मध्ये जोवर वीज जात नाही तोवर प्रकाश पडत नाही.

(कळविण्यास अत्यंत खेद होतो कि पार्टी बदलली असल्याने मला तुमच्या विरोधात बोलावयाचे आहे. ऐसीकरांच्या गुडबूकांत राहण्यासाठी! अन्यथा मी तुमचे म्हणणे कसे सत्य आहे हे सिद्ध करण्यासाठी प्राणपणाने लढलो असतो. आता, आमच्या नविन पोझिशन्नुसार, तुमची बाकी वाक्ये खोटी आहेतच हे म्हणत हे देखिल म्हणेन कि कोट केलेले हे वाक्य देखिल खोटे आहे.)

१. ट्यूबलाईट मधे वीज नै गेली तरी प्रकाश पडत असतो. तिच्यातून बाहेर येत असतो. फक्त आपण तो डिटेक्ट करू शकत नाही इतका मंद असतो.
२. समजा ट्यूबलाईटवर बाहेर प्रकाश नाही पडला तरी ती अनंत काळ प्रकाश पाडत राहिल. तो पाहणे फारच कठीण असले म्हणून काय झाले?
३. 'जोवर वीज जात नाही' मंजे काय? ट्यूबलाईट हमेशाच बरीच वीज असते.
४. ट्यूबलाईटच्या मासचे उर्जेत रुपांतरण करून देखिल बर्‍यापैकी प्रकाश पाडून घेता येईल.
५. मध्ये हा शब्द चूक आहे, मधून असं असायला हवं. वीज ट्यूबमधे जाऊन आराम करत नाही.
६. ट्यूबलाईट शब्द देखिल चूक. ईलेक्ट्रिक ट्यूब किंवा नुसते ट्यूब म्हटले असते तर चालले असते. अहो, प्रकाशात प्रकाश घालणे मंजे काय?
७. जोवर आणि तोवर मधे एक इंप्लाईड instantneousपणा आहे. वास्तवात थोडा गॅप असतो.
८. 'तोवर प्रकाश पडत नाही' मंजे 'तोवर प्रकाश पडतच नाही' असं कसं मंता? आरसा चमकावला तरी ट्यूब मधून प्रकाश पडेलच ना?
९. ट्यूब फोडून तिच्यात पणती लावली तरी तिच्यातून प्रकाश पडेल.
१०. कंचीही वीज दिली तर ट्यूबचा प्रकाश पडत नसतो. ते वोल्ट आणि अँपिअर मॅच व्हावे लागतात.
११. ट्यूबच्या दोन टोकांमधे, साध्या हवेत, हमेशा अल्पस्वल्प का होईना वोल्टेज डिफरन्स असतोच. मग पडतो का प्रकाश?
----------------------------------------------------------------------------
तर लक्षात कि जडत्व आणि चैतन्य सारखे प्रतिगामी प्रतिसाद लिहाल तर तुमच्या साध्या वाक्यांचंच भजन करण्यात येईल. अध्यात्मिक वाक्ये कशी धुडकावायची इथपर्यंत जायची गरजही नाही. पण लक्षात घ्या कि आम्ही जितका कडक विरोध करू तितके लवकर पुरोगाम्यांच्या गुडबूकांत जाऊ हा मूळ उद्देश आहे. (हा साक्षेपी खुमखुमीदार प्रतिसाद शुद्ध मनोरंजन कारणे उपयोजिला आहे, गंभीरतेने न घेणे ही विनंती करत खाली बसतो.)

अंतराआनंद Wed, 29/04/2015 - 22:52

In reply to by मनोज गीत

जडत्व, चैतन्य वैगेरे भारी अध्यात्मिक शब्द वापरुन दिलेल्या तुमच्या स्पष्टीकरणामुळे अजो तुमचे फॅन झाले आहेत पण हा फॅन ऐसीच्या स्वीचबोर्ड वर लावल्याने तुम्हाला हवा देउ ईच्छित नाहीत एवढा एकच मुद्दा आहे त्यांचा.
(हा साक्षेपी खुमखुमीदार प्रति-प्रतिसाद शुद्ध मनोरंजन कारणे उपयोजिला आहे, गंभीरतेने न घेणे ही विनंती करत खाली बसते.)

मनोज गीत Thu, 30/04/2015 - 09:05

In reply to by अंतराआनंद

म्हणजे हा फॅन हवा देउ इच्छितो पण ऐसी च्या स्वीच्बोर्ड मुळे त्यांचा नाईलाज झाला आहे असे म्हणायचे आहे का?? असे असेल तर बाहेर होणार्‍या पुरोगामींच्या गळ्चेपी चा निषेध नोंदवणारे ऐसी कर इथे स्वाता:ची मत परखड मते मांडणार्‍या अजो ची गळ्चेपीच करत आहेत असे म्हणावे का?कालपरवा येऊन ऐसीकरांबद्दल असे मत मांडणे अतीधाडसाचे ठरेल हे महीती असुनही क्रुपया कोणीही गंभीरतेने न घेणे ही विनंती करुन माझे बोलणे संपवतो.
जडत्व ,चैतन्य वैगेरे शब्दांना आपण च अतिआध्यात्मिक समजुन जड करुन ठेवले आहे.Energy and mass तितकेसे जड(आणि विचित्र) नाही वाटतं.

अंतराआनंद Thu, 30/04/2015 - 09:50

In reply to by मनोज गीत

असा त्यांचा मुद्दा आहे मी तो लक्षात आणून दिला इतकंच.
मला यावर काहीच म्हणायचं नाही.
एनर्जी आणि मास हे ही तितकेच जड वाटतात. पण त्याबद्द्लचे नियम सिद्ध होत असतात. ज्यांना हे शब्द माहितही नाही त्यांनाही ते लागू पडतात पण हे आत्मा वैगेरेच्या कसोट्या आणि नियम व्यक्तीगणिक वेगळे आणि ज्यच्या त्याच्या विश्वासावर अवलंबून म्हणून जरा......

जाउच दे. तुमचा विषय वेगळाय उगाच भरकटायचा.

अजोंना किंवा कोणालाही वरिल ( याअधीची) टीप्पणी जिव्हारी लागली असेल तर क्षमस्व. मला शब्द्चमत्कार योजनेची ( :p ) लहर आल्याने ती मजे मजेत टाकलेली होती.

मनोज गीत Thu, 30/04/2015 - 10:42

In reply to by अंतराआनंद

तुम्ही त्यांचा मुद्दा लक्षात आणून देता आहात हे समजले हो..

बहुधा सर्वांनी मजाक वारीच घेतले असेल..

अजो१२३ Thu, 30/04/2015 - 11:31

In reply to by अंतराआनंद

अजोंना किंवा कोणालाही वरिल ( याअधीची) टीप्पणी जिव्हारी लागली असेल तर क्षमस्व

अतिशय अनावश्यक वाक्य.

अजो१२३ Thu, 30/04/2015 - 11:32

In reply to by अंतराआनंद

जडत्व, चैतन्य वैगेरे भारी अध्यात्मिक शब्द वापरुन दिलेल्या तुमच्या स्पष्टीकरणामुळे अजो तुमचे फॅन झाले आहेत.

अज्जिबात नाही असं.

तिरशिंगराव Thu, 30/04/2015 - 19:56

नाव,लिंग,जात,पद इ. गोष्टी या व्यक्तीच्या शरीराशी म्हणजेच "जड" तत्वाशी निगडीत आहे.
पण जोवर या जड तत्वात चैतन्याचा(energyचा) शिरकाव होत नाही तोवर त्या जड तत्वास काही अस्तित्वच नसते.

वरील गोष्टीतील फक्त लिंग हा शब्द घेतला, तर वरील वाक्य म्हणजे अगदी शब्दचित्र आहे हो! आहात बुवा खरे शब्दप्रभू!