माझा स्वभाव
Rajvardhan
भातुकलीचा खेळ मांडणे हा तुझा रियाज
न खेळ मोडणे माझा स्वभाव
मध्य रात्री पाठ फिरवणे हा तुझा नित्यक्रम
न दुर्लक्षित करणे माझा स्वभाव
रात्री अनेक गेल्या तुझ्या आठवांची
न दिवस मोजणे माझा स्वभाव
उत्तरार्ध तर तुझा कविता संग्रह
न पूर्वार्ध योजने माझा स्वभाव
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात इंद्रधनू बरसात
न आसू ढाळणे माझा स्वभाव
ओठी तुझ्या न आले अद्याप माझे नाव
न ओठ शोधणे माझा स्वभाव
@@ मी मात्र@@ राजवर्धन
रसग्रहण
रसग्रहण करण्यापूर्वी या धाग्यावर नजर टाका. सुरेश भटांच्या काव्यपंक्तींशी साम्य हा केवळ योगायोग ?
रसग्रहण
कवितेची प्रत्येक ओळ वाचताना मनात काय विचार आला ते लिहित आहे. बाकी आपण कविता सिरियसली लिहिली असली तरी रसग्रहण हलक्याने केलेले आहे. शिवाय आम्हाला काव्यातलं काहीही कळत नसल्यामुळे अस्सल रसग्रहण काव्यभ्रमर धनंजय यांजकडून करून घेणे.
========================================================================================================
भातुकलीचा खेळ मांडणे हा तुझा रियाज
(रियाज फक्त संगीताचा असतो. सवय साठी रियाज शब्द चूक असावा.)
न खेळ मोडणे माझा स्वभाव
(मराठे चौथ वसुलित तसा हा स्टँड वाटला.)
मध्य रात्री पाठ फिरवणे हा तुझा नित्यक्रम
(नक्कीच लग्न बिग्न झालेलं असणार)
न दुर्लक्षित करणे माझा स्वभाव
(असं पाठ फिरेपर्यंत, उशिरा झोपायची सवय असावी.)
रात्री अनेक गेल्या तुझ्या आठवांची
(आता जुदाई चालू आहे तर? अरेरे कैतरी दैवानं लोचा केलेला दिसतोय.)
न दिवस मोजणे माझा स्वभाव
(जुदाईची सवय झालेली दिसते.)
उत्तरार्ध तर तुझा कविता संग्रह
(एखादी ओळ समजत नाही. पुढची वाचू.)
न पूर्वार्ध योजने माझा स्वभाव
(काही लॉजिक्स स्पेशली फॉर कविज असतात. अजून पुढे वाचू.)
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात इंद्रधनू बरसात
(सौंदर्यवर्णन)
न आसू ढाळणे माझा स्वभाव
(तीव्र जुदाई...दु:ख रोखून ठेवलेले)
ओठी तुझ्या न आले अद्याप माझे नाव
(कंफ्यूजन! अरे हे लव नक्की कोणत्या स्टेजला पोहोचले होते?)
न ओठ शोधणे माझा स्वभाव
(कवितांचा क्लायमॅक्स अजून आपला प्रांत नाही.)
@@ मी मात्र@@ राजवर्धन
(ही देखिल कवितेची ओळ?)
============================================
(राजवर्धन साहेब, ही निव्वळ गंमत आहे. नथिंग सिरियस.)