Skip to main content

काळ काम आणि वेग

सकाळी सकाळी रात्रीची आठवण, पु.ल. एक साठवण.
जायफळाच्या नादाने कॉफीचा मृत्यू.
जिराफाच्या कानाने ऐकलेल्या घंटा, चर्चचे टोले-बम् भोले!
इति चडफडाट.कॉम.
स्वप्नातून बाहेर यायची वेळ येते, पण- स्लोली स्लोली.
.
सकाळी सकाळी ब्रश केला की बरं वाटतं. मग माझ्या मनातली पुटं मी काढून टाकतो.
माझे न्यूरॉन्स मग गोगलगायीच्या वेगाने कासवाच्या वेगापर्यंत जातात, पण - स्लोली स्लोली.
.
आरशापुढे उभं राहून दातांना नमस्कार करून जेव्हा माझा ब्रश पुढे दाढांपर्यंत पोचतो तेव्हा सिग्नल असतो लाल.
मग पिकप घेऊन थोडी चक्कर मारल्यासारखी निव्वळ एक नक्कल करून ब्रश पुन्हा जबड्याबाहेर येतो.
घनघोर जलप्रपात वॉशबेसिनमधे पडता पडता चहाच्या आधणावरचा खदखदता वास माझ्या नाकपुड्यांपर्यंत येतो, पण - स्लोली स्लोली.
.
आंघोळ: एक सोपस्कार ह्या परिसंवादात भाग घेण्याचं निमंत्रण मला येतच असतं
नाईलाजाने ते स्वीकारून मी शॉवरला उपकृत करतो आणि केसांना तरीही वंचित ठेवतो. *LOL*
दिलवालेतल्या काजोलचा विरह सहन करून मग एक टॉवेल माझ्यापर्यंत येतो, मी त्याच पावली बाहेर जातो.
आधणाचा बट्याबोळ झालाय तसा त्या निमकाळरंगी टोस्टाचा होऊ नये म्हणून प्रयत्न चालूच असतात, पण - स्लोली स्लोली.
.

घडयाळ नामक एक शत्रू - त्यात डिजिटल दु:खाचे ९ वाजतायेत.
टोस्टरच्या रागाची परीसीमा होणारं "खट्ट" - कानात सर्र्कन घुसलंय.
तयार झालेल्या चहाचे घोट घशात घालताना- (जास्त झालेलं!) आलं झणझणलंय.
माझं केवळ तिफेर लक्ष, कारण चौथा फेर कामं करण्यात गुंतलाय, पण - स्लोली स्लोली.
.

फायर ब्रिगेड मोड ऑन करून मग माझे अवयव चालू होतात.
कपडे, भांग, चेहेर्‍यावरचं रोगण आणि पायाला कवचबूट सगळे सगळे.
रेडी झालेले जबड्याचे चारी स्नायू सॅल्यूट करतात. हसनेका बॉस.
इतक्यात ,, आयडिया थोडा चेंssssज.
.
कवी: मेरे कू लगता है की आज शायद वर्क फ्रॉम होम करनेका.
वाचकः तो फिर फुकटमे च्यायला मेरा टैम वेस्ट किया, वोह भी... स्लोली स्लोली.

.

~ऐसीचे नवकवी तोतया ह्यांना सप्रेम अर्पण.

शुचि. Thu, 09/04/2015 - 00:30

कवी: मेरे कू लगता है की आज शायद वर्क फ्रॉम होम करनेका.
वाचकः तो फिर फुकटमे च्यायला मेरा टैम वेस्ट किया, वोह भी... स्लोली स्लोली.

वा! मस्त पंच लाईन :)
पण घरुन काम करतानाही, मी फॉर्मल कपडे चढवून , आवरुन (जो काही इट्सी बिट्सी मेकप) बसते, नाहीतर फार अजागळ वाटतं अन कामात लक्ष लागत नाही :(

राजन बापट Thu, 09/04/2015 - 00:33

मुहोब्बत रंग लाती है
मगर स्लोलीस्लोली
स्लोली स्लोलीसे मेरी जिंदगी में आना
ओ यारा स्लोलीस्लोली

शुचि. Thu, 09/04/2015 - 01:19

In reply to by राजन बापट

स्लोली स्लोली चल चांद गगन मे,
कहीं ढल ना जाए रात.... टूट ना जाए सपने :)
____
स्लोली स्लोली बादल जा रे स्लोली स्लोली जा
मेरा बुलबुल सो हा है शोरगुल ना मचा

अतिशहाणा Thu, 09/04/2015 - 04:38

In reply to by शुचि.

पंकज उधास-
और स्लोली कीजिए बाते
धडकने कोई सुन रहा होगा

आणखी एक (शोर इन द सिटी)-
स्लोली स्लोली, नैनोको स्लोली स्लोली
जियाँ को स्लोली स्लोली, भायो रे सायबो

अंतराआनंद Thu, 09/04/2015 - 06:35

तोतया यांच्या सारखी जमली नाही. एका ओळीचा दुसरया ओळीशी संबध असणे म्हणजे कविता नाही. त्यातून पूर्ण वाचल्यावर त्यातून अर्थ निघतो हे तर फारच बाळबोध. ;)

गवि Thu, 09/04/2015 - 11:39

In reply to by अस्वल

पूर्ण मार्क हो अस्वलभाऊ. तोडलंत. आता धनंजय यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करणे आले. ;) त्यांनी अर्थ सांगितला आणि तो अजोंना कळला की पास झालात खर्‍या अर्थाने.

अनु राव Thu, 09/04/2015 - 11:50

In reply to by गवि

धनंजय यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करणे आले. त्यांनी अर्थ सांगितला आणि तो अजोंना कळला की पास झालात खर्‍या अर्थाने.

ही परीक्षा धनंजयची आहे का अजोंची?

गवि Thu, 09/04/2015 - 11:52

In reply to by गवि

ऑन सेकंड थॉट्स, शेवटच्या दोन ओळींत अर्थ दिसतोय. तिसरीतच नापास, अर्थात शिक्षणाची आबाळ, धिंडवडे इत्यादि झाल्याने मनुष्य (नाईलाजाने) गुन्हेगारी विश्वाकडे वळला आहे. आता त्याला आपल्या आयुष्यातली ती हुकलेली शाळा अन हरवलेलं तालेवार जीवन दिसतंय आणि तो रडतोय असं चित्र डोळ्यासमोर येतं.

अर्थ लागतोय. आता हो?!

राजन बापट Thu, 09/04/2015 - 11:53

In reply to by गवि

आता धनंजय यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करणे आले. (डोळा मारत) त्यांनी अर्थ सांगितला आणि तो अजोंना कळला की पास झालात खर्‍या अर्थाने.

हे म्हणजे

कविता माझा अस्वल ल्हिणार
समीक्षक धनंजय साचार
अजोंना अर्थ कळणार
वाचक मरणार निश्चित।

॥इति उंटावरूनशेळ्याहाकणारमहावाक्यम्‌॥‌

या चालीवर झालं की. :-)

राजन बापट Thu, 09/04/2015 - 11:46

In reply to by अस्वल

"बेडकाच्या जिभेवरची
गुलाबी थंडी
रडणारं रिवॉल्वर-
तिसरीतच नापास."

आहाहा. काय एकदम साल्वादोर दालीचं प्येंटिंगच शब्दांत पकडलंय जनु ;-)

ऋषिकेश Thu, 09/04/2015 - 10:18

स्लोली स्लोली हे कोरसमध्ये किंचित खालच्या पट्टीत / कुजबुजईसम आवाजात म्हणावे

रात अजनबी - स्लोली स्लोली
भिगी चांदनी - स्लोली स्लोली
तिसरा कोई - स्लोली स्लोली
दूर तक नही - स्लोली स्लोली
इतके आगे हम - स्लोली स्लोली
और क्या कहे - स्लोली स्लोली
जानम समझा करो - स्लोऽऽऽली

=====

कविता आवडली. मात्र तोतयाची सर नाही!

---
बाकी टॉवेल काजोलकडून घेतलास हे उत्तम.. तिने नसता दिला तर रणबीर कपूर होताच तयार! ;)

ऋषिकेश Thu, 09/04/2015 - 10:56

In reply to by ऋषिकेश

असे आम्ही "घंटा" हा कोरस-शब्द 'दुनियाने हमको दिया क्या' या गाण्याच्या मुखड्याला जोडत असु ते ही (उगाच) आठवले

दुनियाने हमको दिया क्या - घंऽऽटा
दुनियासे हमने लिया क्या - घंऽऽटा
हम सबकी परवाह करे क्युऽऽ - घंऽऽटा
सबने हमारा किया क्या!!! - घंऽऽटा

आदूबाळ Thu, 09/04/2015 - 11:15

In reply to by ऋषिकेश

असंच एक

अब लौट के आ जा मेरे .... ट्यांव
तुझे मेरे .... ट्यांव
बुलाते हैं.
मेरा सूना पड़ा हैं ... ट्यांव ट्यांव
तुझे मेरे ट्यांव...

अस्वल Thu, 09/04/2015 - 11:19

In reply to by ऋषिकेश

कही दूर जब ..दिन ढल जाये च्या चालीवर
टण टणा ट्ण टण टण टाराsss
चलती है क्या.. नौ से बारा.. नौ से बारा

हेही सामावून घ्यावं.