चटकदार मसाला पापड

चटकदार मसाला पापड
साहित्य
१. पापड
२. चीज
३. १ लिंबू
४. १ कैरी
५. १ कांदा
६. १ काकडी
७. १ टोम्याटो
८. बारीक शेव
९. कोथिंबीर
१०. १ चमचा चाट मसाला
११. १ चमचा लाल तिखट
१२. पिठी साखर चवीप्रमाणे
१३. मीठ चवीप्रमाणे

कृती
प्रथम पापड (मोठा) तळून घ्यावा. कैरी. कांदा, काकडी टोम्याटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. चीज किसून घ्यावे. तळलेला पापड एका पसरट प्लेट मध्ये ठेवा. त्यावर बारीक चिरलेले कैरी. कांदा, काकडी टोम्याटो, कोथिंबीर व किसलेले चीज घाला. त्यावर चवीप्रमाणे चाट मसाला पिठीसाखर,लाल तिखट, मीठ घाला व बारीक शेव पसरा. हवे असल्यास वरून लिंबू पीळा.असा हा चटपटीत मसाला पापड लगेच खायला घ्या.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हम्म.

मसाला पापड 'नुसताच' कसा खायचा? त्यातून अजूनही मंगळवारच चाललाय! Sad

(विकांतोत्सुक) सुनील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त आहे ही कल्पकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

पापड सपाट तळला जाण्यासाठी काही क्लृप्ती आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ROFL
तेल अर्धवट तापले असताना तळा. बेक्कार पण सपाट होतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

तेल चोपडून मायक्रोवेव्ह करणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

प्रयत्न केलाय. पण तो तळल्यासारखा नाही होत आणि तेल सर्वत्र नीट लागत नाही (तेलात बुडवूनच काढावे लागेल त्या साठी).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मायक्रोवेव्ह आणि तळणे या दोन्ही रासायनिक प्रक्रियात फरक आहे. त्यामुळे तो तळल्यासारखा (खुसखुशीत+कुरकुरीत)होणारच नाही. मात्र दोन्ही बाजूंना किंचित तेल लावून मायक्रोवेव केला तर खाण्यायोग्य होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण हाटिलात तर तळून मिळतो.
तो इतका सपाट कसा राहत असेल? मोठ्ठा झारा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हॉटेलात सपाट तळला जाण्याचे कारण मोठी कढई असावी असं वाटतंय. तव्यावर तेल टाकून तळण्याचा प्रयत्न केला तर बऱ्यापैकी सपाट तळला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह! आभार!
प्रयत्न करून बघतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जमल्यास, तळताना झाऱ्याने, कालथ्याने दाब देऊन पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दोन छोट्या ताटल्यांच्यामध्ये ठेवून दोर्‍याने बांधून तळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेल सर्वत्र नीट सहज लावता येईल. तेलात बुडवायला नको - बोटाने चोपडलं तरी जमेल. पण मायक्रोवेव्ह रॅडीएशन काहि 'उजेड' पडल्यासारखं एकसमान नसतं ओव्हनमधे. 'हॉट्स्पॉट्स' असतात. त्यामुळे एक ईंचाचा पापड कदाचित सारखा होईल पण मेहेमीच्या आकाराचा पापड नाही. एक ईंचाचा करून बघतो हां नंतर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....