गझल
जुळवूनी अक्षरांना - लिहावी म्हणले गझल |
हिशोब मात्रांचा चुकला - रचता रचता गझल ||
लघु-गुरु, अंत्य यमकांना - बसविले मी क्रमात |
अक्षरांच्या ओळी झाल्या - पण हरविली ती गझल ||
उनाड कल्पनांना - काबूत आणताना |
हरले , दमले मी अन् फसली ती गझल ||
रद्दीफ कोणता घेउ ? अर्थ साधणारा ...|
ठरविता न आले .. म्हणून - लिहिलीच नाही गझल ||
बाराखडी गझलेची - वाचता पुन्हा पुन्हा |
समजले असे की मजला .. जमणार नाही गझल ||
काव्य हे असले - उच्च खानदानी |
लिहिणे नकोच आता .. नुसतीच ऐकू गझल ||
प्रतिक्रिया
प्रयत्न
आयुष्यातलं ध्येय प्राप्त करण्याला गझल रचण्याची उपमा देण्याचा प्रयत्न आवडला. या कवितेत वृत्तापासून घेतलेली फारकत मात्र खटकली. मतल्यात हिशोब मात्रांचा चुकला म्हटलं आहे खरं, पण पुढच्या शेरात अक्षरांच्या ओळी झाल्या - पण हरविली ती गझल म्हटलं आहे, त्यातला - मी सर्व काही नियमांप्रमाणे केलं, ते करता करताच आयुष्य हरवून गेलं - हा अर्थ येण्यासाठी रचना छंदबद्ध असायला हवी होती असं वाटतं.
"आयुष्यातलं ध्येय प्राप्त
"आयुष्यातलं ध्येय प्राप्त करण्याला गझल रचण्याची उपमा देण्याचा प्रयत्न ..."
हा माझ्या कवितेचा अर्थ आवडला (पण मला सुचत असलेले शब्द - गझल च्या फॉरमॅट मधे बसवता न आल्याच्या वैफल्यातून लिहिलेली ही कविता आहे :))
>रचना छंदबद्ध असायला हवी होती असं वाटतं.
सहमत ..ती तशी नाहीये हे अगदी मान्य .
धन्यवाद!
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
आवडली
एक रचना म्हणून चांगलीये.. मात्र ही गझल नाही!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अगदी बरोबर ओळखलत. हा
अगदी बरोबर ओळखलत.
हा काव्यप्रकार नसून कवितेचे शिर्षक आहे .
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
गझल रचण्याचा बेत मनात
गझल रचण्याचा बेत मनात ठरवला
तो ठरवला...म्हणुनच तिचा आत्मा हरवला..!
''मी तंबाखु खाणारच''