विडंबन : त्याला पाऊस आवडत नाही , तिला पाऊस आवडतो……. (गारवा)

तिला दारू आवडत नाही
त्याला दारू आवडते
पिउन तो आल्यावर मग
तिच्या तावडीत सापडतो

मी तुला आवडतो
पण दारू आवडत नाही
असले तुझे गणित
मला कळत नाही

दारू म्हणजे मरण
दारू म्हणजे वाईट
दारू म्हणजे कल्ला सारा
दारू म्हणजे टाइट

दारू यकृत खराब करतो
दारू म्हणजे वैतागवाडी
दारू म्हणजे मजा
दारू म्हणजे ताडी

दारू म्हणजे घाण वास
दारू म्हणजे त्रास उगाच
दारूमध्ये गुपचूप मन
येउन जाते रंगात

दरवेळी पिउन येतो
दरवेळी असं होत
दारूवरून भांडण होऊन
लोकांमध्ये हस होत

दारू जरी आवडत नसली
तरी तो तिला आवडतो
दारूसकट आवडावा तो
म्हणून तोही झगडतो

रुसून मग ती निघून जाते
भिजत राहते आसवात
त्याचे तिचे भांडण असे
"ओल्या पार्टीच्या " दिवसात ………. !!!!!!!!

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

विडंबन म्हणजेच दारु
विडंबन म्हणजेच संडास
विडंबन म्हणजेच ग्लास
किंवा मग घाण वास..

दारु टमरेल नाही पण
वाचकांना विडंबन आवडतं
संडासदारुसहित आवडावं
म्हणून कविमन झगडतं.

तुषारभाऊ.. शब्दरचना चांगली आहे. आम्हीही एक गंमतीचा प्रयत्न करुन पाहिला. हलकेच घेणे हो..!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दारूसकट आवडावा तो
म्हणून तोही झगडतो

विडंबन वैगेरे कै नै. अतिशय गंभीर कविता आहे ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!